✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/08/2020.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.• १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.• २००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.🎂 जन्म :- • १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी• १८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे• १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर• १९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला• १९६३: भारतीय अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी कपूर 🌹 मृत्यू :- • १७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर• १८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क• १९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर• १९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा• १९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स• १९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले• १९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे• १९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट• १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार• २०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल• २०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज• २०११: बांगलादेशी दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक तारेक मसूद••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लेख, कविता आणि लघुकथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस विभागात 15 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीस दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा, नवीन आयकरमध्ये सुधारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर घातलेली बंदी आणि त्यास उच्च न्यायालयाने दिलेला दुजोरा याला सर्वोच्च न्यायालयानेही दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गरजवंतांची सेवा करता आली; पद्मश्री पुरस्कार समाजाला बहाल- डॉ. डांगरे, नागरी सत्काराला मान्यवरांची उपस्थिती, संस्था व संघटनांकडून सन्मान‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचा असणार सहभाग, जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील आठ लाख विद्यार्थी उद्या गाणार पसायदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचे कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 53 धावाने हरविले, मालिकेत 1-1 ची बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 सुयोग पेनकर, शिक्षणतज्ञ, मुंबई 👤 चंद्रकांत पाटील जुन्नीकर, सचिव, धर्माबाद मार्केट कमिटी 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 गणेश डाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 51*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो**पण रबरासमोर मी हरतो**ओळखा पाहू मी कोण ......?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शून्यातून दुनिया निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे ?२) अवकाशात उपग्रह सोडणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते ?३) लिटमस चाचणीत निळा लिटमस कागद आम्लात बुडवल्यास त्याचा रंग कसा होतो ?४) 'शिकारीसाठी उंच बांधलेला माळा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ? *उत्तरे :-* १) शिपाई २) रशिया ३) लाल ४) मचाण ५) पं. जवाहरलाल नेहरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *कर्करोग म्हणजे काय ?* 📕‘कर्करोग' हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच गरज आहे का, ते आता पाहू.सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे, श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागांचे कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड, तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी संबंधित असतात.शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात फुप्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना हानी पोहोचते.कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, अनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत. कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे उपयुक्त ठरतात. या वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर अचानक जास्त रक्तस्त्राव होणे, स्तनामध्ये गाठ वा व्रण होणे, आवाज बदलणे वा बसणे, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्त्राव होणे इत्यादींचा समावेश होतो.कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. कर्करोग असेल म्हणून घाबरून काही लोक डॉक्टरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त निदान लवकर व्हायला हवे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थाअनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||नमो मायबापा गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहामोहजाळ माझे कोण नीरशीलतुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुरावगुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाशज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूपस्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||एका जनार्दनी गुरुपरब्रम्, तयाचे पै सदामुखी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात, हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जशास तसे एकदा एका कोल्ह्याने एका करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्यापुढे ठेवले. करकोच्याला लांब चोचीमुळे ते काही खाता येईना. कोल्ह्याने मात्र ताट चाटून पुसून लख्ख केले. बिचारा करकोचा तसाच उपाशी राहिला. थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला मेजवानीस बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंबरस घालून त्याला दिला. सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खाता येईना. करकोच्याने मात्र आपली लांब चोच खुपसून तो आंबरस संपवला. तात्पर्य - दुसर्‍याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment