✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1E71m1Dz68/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 ऐतिहासिक घटना :• १६०९: गॅलिलिओने जगातील पहिली दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले• १८२५: उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला• १९१९: लंडन ते पॅरिस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली• १९४४: द्वितीय महायुद्धात मित्र राष्ट्रांनी पॅरिसला मोकळं केलं• १९८९: व्हॉयेजर 2 नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचला .• १९८१: व्हॉयेजर 2 शनी ग्रहाच्या जवळ पोहोचला• १९९१: बेलारूसला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले• २०१२: व्हॉयेजर 1 अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली .🎂 जन्म :• १९२३: मराठी साहित्य आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गोपाळ गाडगीळ• १९३०: जेम्स बॉंडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेता शॉन कॉनरी• १९४१: संगीतकार अशोक पत्की• १९५२ - दुलीप मेंडिस• १९६२ - डॉ. तस्लीमा नसरीन• १९६५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक संजीव शर्मा• १९६९: क्रिकेटपटू आणि स्पोर्ट्सकास्टर विवेक राजदान• १९७६ - जावेद कादीर• १९९४: भारतीय लेखक-कादंबरीकार काजोल आयकट🌹 मृत्यू :• १२७०: फ्रान्सचा राजा लुई नववा यांचे निधन .• १८१९: संशोधक जेम्स वॅट यांच्या निधनाचा वर्षदिवस .• १८२२: खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन .• १८६७: शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे यांचे निधन .• २०१२: चंद्रावर पाऊल टाकणारे पहिले मानव, नील आर्मस्ट्रॉंग यांचे निधन .••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकट काळात मन प्रसन्न ठेवा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे दीड लाख मोदकांचे वाटप, यावर्षी ही संस्थानच्या वतीने जय्यत तयारी, पोलिस प्रशासनही सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्ली - भारत जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांत 6 पाणबुड्या खरेदी करणार, सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र देखील खरेदी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ही शेवटची लढाई, प्रत्येकाने मुंबईला या, राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका - मनोज जरांगे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गगनयानची तयारी- क्रू मॉड्यूलची एअर ड्रॉप टेस्ट, चिनूकने 4 किमी उंचीवरून सोडले; ISRO-DRDO, एअरफोर्स, कोस्टगार्डचे जॉइंट ऑपरेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सातनवरी बनले देशातील पहिले स्मार्ट गाव, राज्यातील 3500 गावांमध्ये राबवणार स्मार्ट व्हिलेज प्रकल्प; 18 आधुनिक सेवा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ उद्योजक, 'मॉडर्न ऑप्टिशियन'चे संचालक अनिल गानू यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे होते उपाध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा केला दारुण पराभव मात्र द. आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश चौधरी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, नांदेड 👤 आसावरी टाक👤 नयन पेडगावकर 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदी रामचंद्र, म्युजिक डायरेक्टर👤 प्रमोद गुरुपवार, बिलोली *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 60*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ढोल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सज्जनतेचा बुरखा पांघरून मनाची दुष्टता जात नाही मनाच्या दुष्टतेचे मूळच नष्ट केले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वनराई' या संस्थेचे संस्थापक कोण ?२) सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो ?३) 'भारताचा नेपोलियन' असे कोणाला म्हटले जाते ?४) 'स्वतः श्रम न करता खाणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. मोहन धारिया २) भूमध्य समुद्र व लाल समुद्र ३) समुद्रगुप्त ४) ऐतखाऊ ५) फलोत्पादन व मध*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 *************************रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवराशुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||प्रसन्न होऊनी विघ्न हरावेनम्र कलेचे सार्थक व्हावेतुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||वंदन करुनी तुजला देवारसिक जनाची करितो सेवाकौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुराहे शिवशंकर गिरीजा तनया || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात.पण, माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते. म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment