✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार 🌺 *आज गौरी पूजन* 🌺~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16UpuAfG35/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 ऐतिहासिक घटना :-• १९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.• १९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.• १९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.• १९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.• १९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.• १९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.• १९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.• १९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.• १९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.• १९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.• १९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.• १९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.• १९६१: NCERT स्थापना• २०२२: सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान - फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे १२७ °F (५३°C) तापमानाची नोंद झाली आहे, सप्टेंबर महिन्यातील ही जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.• २०२२: श्रीलंका आर्थिक आणीबाणी🎂 जन्म :- • १९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग• १९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी• १९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री• १९४९: लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा • १९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी🌹 मृत्यू :-• १५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास• २००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा • २०२०: भारतीय क्रिकेटपटू शेखर गवळी• २०२२: भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या मेरी रॉय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला कवितेच्या जगात*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मनोज जरांगे पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय, आजचौथ्या दिवसापासून पाणी पिणं बंद करणार, मराठा आंदोलनाची धग वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे महापालिकेचे महावितरणला जादा खुदाई शुल्क, पिंपरी-चिंचवडप्रमाणे दर आकारण्याचे अजित पवार यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहार निवडणूक 2025 : मायावतींची मोठी घोषणा; बिहारमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अडीच तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; पुणे व नाशिक हे दोन महत्त्वाचे जिल्हे जोडणारा महाराष्ट्रातील मेगा प्रोजेक्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - डॉ. ज्योती रहाळकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, 'गजानना तू' काव्यसंग्रह आणि 'कबीर वाणी' पुस्तिकेचे स्मिता महाजन यांच्या हस्ते लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कर्करोगामुळे निधन, वयाच्या 38 व्या वर्षी प्रियाने मुंबईत घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश गिरी, उबाठा, उपजिल्हाप्रमुख, धर्माबाद 👤 विजय भगत, शिक्षक, वाशिम👤 आर. के. उन्हाळे👤 सुनिता गायकवाड 👤 नवनाथ पिसे 👤 शिवाजी पाटील येडे 👤 रामेश्वर चिंतलवाड, करखेली👤 प्रल्हाद जाधव 👤 संभाजी कोंडलवाडे👤 नागनाथ कौडगावे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 63*असे काय आहे, ज्याच्या येण्याने उजेड येते आणि जाण्याने अंधार होतो.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पंखा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसा आणि सत्ता एकत्र आली तरी माणसाने माणूसपण सोडू नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ब्रिटन या देशात नुकतेच मतदाराचे किमान वय १८ वरून किती वर्षे करण्यात आले ?२) भारताची प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणालीचे नाव काय आहे ?३) पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य कोणते ?४) 'हत्तीला काबूत ठेवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा कोणत्या वर्षाचा आहे ? *उत्तरे :-* १) १६ वर्षे २) सुदर्शन चक्र ३) महाराष्ट्र ४) माहूत ५) सन १९९४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• पालीचा बल्लाळेश्वर मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात स्थित आहे. हे मंदिर श्री बल्लाळेश्वर भगवानाचे आहे, जे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जाते. पाली येथील हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. पालीचा बल्लाळेश्वर मंदिर विशेषतः त्याच्या प्राचीन शिल्पकला, वास्तुशास्त्र आणि त्याच्या समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.महत्वाचे वैशिष्ट्ये:1. स्थळ : पाली गाव रायगड जिल्ह्यात, मंबा-खोपोली मार्गावर स्थित आहे.2. धार्मिक महत्व : हे मंदिर विशेषतः हृषीकेश किंवा बल्लाळेश्वर रूपात भगवान विष्णूचे पूजन करण्यात येते. येथे येणारे भक्त विविध प्रकारच्या संकटांसाठी भगवान बल्लाळेश्वराकडून आशीर्वाद घेतात.3. शिल्पकला : मंदिराची स्थापत्य कला अतिशय आकर्षक आहे. त्यात विविध शिल्पे आणि नकाशे आहेत, ज्यामध्ये हिंदू देवता व देवतांचे चित्रण केले गेले आहे.4. तयारीची वेळ : पालीचे बल्लाळेश्वर मंदिर मुख्यतः विशेष म्हणजे नवरात्र महोत्सव, शंकराष्टमी, आणि व्रत व उपवासी सणांवर मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा आयोजित केली जातात.5. भक्तांची वर्दळ : येथे अनेक भक्त प्रपंचातील कष्टांवर विजय मिळवण्यासाठी व संकटांचं निवारण करण्यासाठी येतात.हे मंदिर निसर्गाच्या सुरम्य वातावरणात आहे, त्यामुळे येथे येणारे भक्त आध्यात्मिक शांती आणि मानसिक शांती अनुभवतात.उद्याच्या भागात - महाडचा वरद विनायक *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्शपुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचेहाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचेसेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाकी वैरता कोणासोबत होत नाही आणि स्वतःहून ते, कोणी करत नाही. नेहमीच सत्याच्या बाजूने राहिल्याने, परखड शब्दात बोलल्याने किंवा तसेच विचार व्यक्त केल्याने न कळताच आपोआप वैरता निर्माण झालेली बघायला मिळत असते. त्यात आपला काहीही दोष नसतो. म्हणून स्वतः ला दोष देऊ नये. जेथून मनाला विशेष समाधान मिळतो त्याच मार्गांवर चालण्याचा आपण प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 राजा आणि कुत्रा 🛑 एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत.त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा.तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज,मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले.शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला "पहा.पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला"महाराज,जो पर्यंत स्वत:ला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज." तात्पर्य - जी माणसे आपल्या सोबत नेहमी राहून आपल्यालाच ञास देतात,त्यांच्या पासुन दूरच राहीलेले बरे असे मला वाटते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment