✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2025/08/independence-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.• १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.• १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.• १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.• १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.• १९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.🎂 जन्म :- • १९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर • १९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी • १९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी • १९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर🌹 मृत्यू :-• १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव• २०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर • २०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख • २०२२: भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक राकेश झुनझुनवाला • २०२२: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार विनायक मेटे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त *विचार बदला : देश बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोफत 'सूर्यघर'चा डंका, घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला 1 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा, सरकारकडून 1870 कोटींचे अनुदान मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी विषयी जनजागृती करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमरावती जिल्ह्याचा कौतुकास्पद उपक्रम, शिष्यवृत्तीच्या सरावातून स्पर्धा परीक्षेची तयारी‎, आता नियमित प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा पुढाकार, गुणवत्ता उंचावणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे स्थानकातील गर्दीचा भार होणार हलका, पर्यायी स्टेशन लवकरच सेवेत; पुणेकरांना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *SC/ST आरक्षणात 'क्रीमी लेयर' लागू करण्याची याचिका स्वीकारली, 10 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; केंद्राने लागू केले जाणार नाही म्हटले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी, मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची सांभाळणार धुरा, अजित पवारांनी दर्शवला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज ने पाकिस्तानला 202 धावाने हरविले, कर्णधार शे होप याची वादळी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर 👤 राजू टोम्पे, उपक्रमशील शिक्षक, नांदेड 👤 शंकर कळसकर, शिक्षक, देगलूर 👤 गजानन गंगाधरराव रामोड, सामाजिक कार्यकर्ते, जारीकोट 👤 पवन वळंकी👤 गजानन पाटील 👤 अहमद मुजावर 👤 राम दिगंबर होले 👤 सुनील गुडेवार 👤 मुनेश्वर सुतार 👤 गणेश इबितवार, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 52*असं काय असतं, जे मे मध्ये असतं, पण नोव्हेंबर मध्ये नसतं…आगीत असतं, पण पाण्यात नसतं…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चुंबक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या ठिकाणी कोणत्याही अपेक्षेला थारा नसतो त्याचे जीवन सुखाने दुथडी भरून वाहत असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अहिल्याबाई होळकरांना घराण्यात काय म्हणून ओळखले जाई ?२) कोणत्या तृणधान्यांमध्ये सर्वात जास्त तेल असते ?३) 'मुसाफिर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?४) 'शेती करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हायड्रोक्लोरिक आम्लाचे सूत्र काय आहे ? *उत्तरे :-* १) तत्त्वज्ञानी राणी २) मका ३) अच्युत गोडबोले ४) शेतकरी ५) HCL*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वस्त्रांसाठी धागे* 📙नैसर्गिक धाग्यांनी वस्त्रे विणण्याची कला कित्येक शतके माहिती आहे. अत्युत्तम रेशमी वा तलम कापडाचा वापर करण्याचा हव्यास जगभरच्या अनेकांनी केला आहे. थंडीसाठी विविध जनावरांची लोकर वापरली गेली आहे, तर वस्तूंच्या बांधणी साठवणीसाठी गोणपाटाचा वापर अजूनही करावाच लागतो. या प्रत्येक गोष्टीसाठी धाग्यांची आवश्यकता असते. धागा जितका पक्का, जितका सलग, जितका बारीक, तितके वस्त्र घट्ट विणले जाणार व तलम बनणार.कापूस, लिनन ज्युट यांचे धागे गरजेनुसार बनवणे व वापरणे माणूस करतच आला आहे. त्यांचे उत्पादन, साठवण व त्यापासून हाताने वा यंत्राने निर्मिती करण्याची कला दिवसेंदिवस प्रगत होत जात आज घटकेला इतकी प्रगत झाली आहे की, शेतातील कापूस काढण्यापासून ते यंत्राद्वारे कापडाचा तागा बाहेर पडेपर्यंत कुठेही मानवी स्पर्शही झाला नाही तरी अडत नाही; किंबहुना तशी गरजच राहिलेली नाही.रेशीम व सिल्कचा धागा हा रेशमाच्या किड्यांपासून बनवण्याची पद्धत आता मागे पडून कृत्रिम रेशीम वापरण्याकडे कल वाढत आहे. रेशमाच्या किड्यांची पैदास, त्यांची रोगराईपासून निगा राखणे व या रेशमाला रंग देणे यांसाठी होणारा खर्च अफाट वाढत गेला आहे, हे या मागचे कारण. लोकरी धागे व लोकरीच्या धाग्यांनी विणलेले कापड थंड प्रदेशात वापरले जाण्याचा प्रघातही हळूहळू मागे पडत आहे. त्याऐवजी लोकरीचा धागा कृत्रिम धाग्याबरोबर मिसळून त्याची ऊब व कृत्रिम धाग्याचा टिकाऊपणा यांचे सांगड हल्ली घातली जाते. कृत्रिम धागा बळकटही असतो. टेरिवुल या प्रकारचे धागे त्यामुळे वापरात आहेत.नैसर्गिक धाग्यांचा वापर वस्त्रांसाठी कमी होण्याची प्रमुख कारणे म्हणजे झटपट होणारी झीज, चकचकीतपणा कमी असणे, माल साठवण्याची त्यांची क्षमता जास्त असणे ही आहेत. याशिवाय सहजपणे हे धागे खाणारे किडे निसर्गात आहेत. त्यांचा प्रतिबंध करणे हाही एक उद्योग होऊन बसतो. ठेवणीतल्या कपड्यांना वा स्वेटर्सना कसरीचे किडे लागणे हे अनेकांनी अनुभवले असेल. उत्तम कपड्यांना पडलेली आरपार बारीक भोके कपड्यांचा पूर्ण नाश करतात व त्यांची भारी किंमत पार वाया जाते.कृत्रिम धाग्यांचा वापर मुख्यतः नायलॉन या प्रकारापासून सुरू झाला. आज त्यापुढील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नायलॉन, टेरीलीन, पॉलिएस्टर, कृत्रिम सिल्क, ऑरलॉन या धाग्यांचा वापर आज होतो आहे. पेट्रोलियम पदार्थांपासून अनेक प्रक्रिया करून हे धागे बनतात. दमटपणा शोषून घेण्याची त्यांची क्षमता फार कमी असल्याने शरीरात घाम शोषला जावा म्हणून कापडी धागा व हे कृत्रिम धागे यांचे संयुक्त कापड बनवण्याची पद्धत आहे.सुंदर, आकर्षक दिसावे, यासाठी माणसाची धडपड जोवर चालू आहे, तोवर नवनवीन धाग्यांचा शोध अजूनही चालूच राहील. म्हणतात ना, 'एक नूर आदमी, तो दस नूर कपडा !' 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीनसाई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यानसाई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||वाट असेती वळणाची आले पायाला ते फोडतुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाईतुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीनसाई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात आनंद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे सोबतच इतरांना ही आनंद देणे सर्वाचे कर्तव्य आहे. पण, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. कारण वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही आणि त्या वेळेला कोणी कितीही ताकदवान असेल तरी थांबवू शकत नाही. म्हणून वेळेची किंमत करून आपल्या जीवनाचे सार्थक कशाप्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरं बोलणाऱ्या मुलाची गोष्टएक मुलगा त्याच्या वडिलांसोबत जंगलात गेला होता. त्याला एक मोठा दगड दिसला आणि त्याने वडिलांना विचारले की हा दगड किती मोठा आहे. वडिलांनी सांगितले की हा दगड खूप मोठा आहे. मुलगा म्हणाला, "बाबा, मी त्याला उचलून दाखवतो." वडिलांनी त्याला दगड उचलण्यास सांगितले. मुलगा खूप प्रयत्न करूनही दगड उचलू शकला नाही. तेव्हा वडिलांनी सांगितले की, तू प्रयत्न करत आहेस, हेच खूप महत्त्वाचे आहे.तात्पर्य : प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, जरी यश मिळाले नाही तरी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment