✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/177LMD6K2o/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 238 वा दिवस 🚩 ऐतिहासिक घटना :- • 1303 - अल्लाउद्दीन खिलजींनी चित्तोडगड जिंकला. • 1498 - मायकेल अँजेलो यांनी ‘पिएटा’ शिल्पाकृतीवर कार्य सुरू केले. • 1768 - कॅप्टन जेम्स कुक त्यांच्या पहिल्या प्रवासावर रवाना झाले. • 1791 - जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकन पेटंट मिळाले. • 1883 - इंडोनेशियातील क्राकाटाऊ ज्वालामुख्याचा उद्रेक; सुमारे 36,000 लोकांचा बळी. • 1972 - म्युनिच येथे २० वा ऑलिंपिक स्पर्धांला सुरुवात. 🎂 जन्म :-• 1910 - प्रसिद्ध समाजसेविका ख्रिश्चन धर्मगुरु मदर तेरेसा • 1956 - प्रसिद्ध राजकारणी मनेका गांधी• 1968 - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर🌹 मृत्यू :- • 2012 - वरिष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यसैनिक ए. के. हंगल यांचे निधन. ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधी वंदू तुज मोरया*गणपती बाप्पा मोरया - गणेशोत्सव आता राज्य उत्सव झाला आहे. ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नव्या शालेय अभ्यासक्रमात आरोग्य, स्वच्छतेसोबत शेती, स्वयंपाकघरातील विज्ञानाचेही मिळणार धडे; मुलांना अनुभवात्मक अभ्यास, तर्कशक्ती शिकता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अकरावीकरिता अंतिम फेरी प्रवेश प्रक्रिया होणार 26, 27 ऑगस्टला, गुणवत्ता यादी 29 ला; 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पिंपरी चिंचवड विद्यापीठात दीक्षारंभ समारंभ, कृत्रिम बुद्धिमत्तेसह बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा - कांचन भोंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे - गणेशोत्सव आता राज्य महोत्सव, सार्वजनिक मंडळांना 7 दिवस ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा; सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी संघटनांचा एकजूट, कर्जमाफी आणि हमी भावासाठी 28 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आजच होणार पगार जमा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑनलाइन गेमिंगचे विधेयक आल्यानंतर ड्रीम ११ आणि बीसीसीआय यांच्यातील करार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, सांगली 👤 मधुकर बोईनवाड, विशेष शिक्षक, देगलूर👤 संदीप आवरे, धर्माबाद 👤 प्रशांत बोनडलवाड 👤 सुमेध भंडारे 👤 प्रशांत इबितवार, धर्माबाद 👤 संदीप सोनकांबळे 👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 61*मला डोळे आहेत पण मी पाहू शकत नाही.**सांगा मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती किंवा पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयेमुळे दुर्बलांना जग मृदू भासते आणि पराक्रमी माणसांना ते उदात्त वाटते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी खलाशी होता ?२) आझाद हिंद सेनेची घोषणा कोणती होती ?३) जैन साहित्याला काय म्हणतात ?४) 'स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारत व चीन यांच्यातील सीमा किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) पोर्तुगीज २) चलो दिल्ली ३) आगम ४) स्वार्थी ५) ३,९१७ किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीचे आठ प्रसिद्ध व प्राचीन मंदिरांचा समूह. ही मंदिरे प्रामुख्याने पुणे व अहमदनगर जिल्ह्यात आहेत. गणेश भक्तांसाठी ही यात्रा अतिशय पवित्र मानली जाते.अष्टविनायक मंदिरे :1. मोहट्या (मोरेश्वर) गणपती – मोरेगाव, पुणेअष्टविनायक यात्रेतील पहिले स्थान.चांदीच्या नागफणीने सजलेली मूर्ती.गणपतीला "मोरेश्वर" म्हणतात.2. सिद्धिविनायक – सिद्धटेक, अहमदनगरभीमा नदीच्या काठावर.गणपती पार्वतीदेवीच्या इच्छेने येथे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे.3. बल्लाळविनायक – पाळी, रायगडगणपतीचा प्रिय भक्त "बल्लाळ" याचं नाव याला जोडलेले आहे.गणपतीने बल्लाळाला दर्शन दिल्यामुळे या गणपतीला "बल्लाळविनायक" म्हणतात.4. वरदविनायक – महड, रायगडगणपती इच्छित वरदान देतो, म्हणून "वरदविनायक".मूर्ती तलावात सापडली आणि मंदिरात प्रतिष्ठापित केली गेली.5. चिंतामणि गणपती – थेऊर, पुणेमहर्षी कापिलांचा आश्रम येथे होता.चिंतेपासून मुक्त करणारा गणपती.6. गिरिजात्मज विनायक – लेण्याद्री, जुन्नर, पुणेएकमेव गणपती लेण्यामध्ये (गुहेत).पार्वतीच्या इच्छेने येथे गणेश बालरूपात प्रकट झाला.7. विघ्नहर विनायक – ओझर, पुणेविघ्नांचा नाश करणारा गणपती.या मूर्तीवर सोन्याचा कळस आणि सुंदर दीपमाळ आहे.8. महागणपती – रांजणगाव, पुणेगणेशाने येथे त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे.येथे गणपतीला अष्टभुजा व उग्र रूप आहे.• विशेष माहिती :अष्टविनायक यात्रा नेहमी मोरेगावपासून सुरू करून तेथेच समाप्त केली जाते.या आठही ठिकाणांना भक्त वर्षभर मोठ्या श्रद्धेने भेट देतात, पण गणेशोत्सव व अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष गर्दी असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्शपुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचेहाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचेसेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते. निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीसतात्‍पर्य - लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment