✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCJvnwhaW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 इतिहासातील ठळक घटना :-• १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.• १९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.• १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.• २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.🎂 जन्म :-• १९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील• १९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके• १९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी• १९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर• १९८९: भारतीय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माली🌹 मृत्यू :- • १९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे• १९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची युवा भारत म्हणून ओळख निर्माण करू या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरजू, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, कर्जमाफीसाठी समिती नियुक्त, अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मूत CRPFची गाडी 200 फूट दरीत कोसळली:उधमपूरच्या बसंतगड भागात अपघात; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NDA चा निर्णय- उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदी-नड्डा ठरवतील, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *Deep fake साठी सरकार कठोर कायदा करणार, वाढत्या धोक्यामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारने नारळी पौर्णिमा आणि जेष्ठा गौरी विसर्जनानिमित्त मुंबई व उपनगर पुरते मर्यादित सुट्टी जाहीर केली, मुंबईतील विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, बालसाहित्यिक, पुणे 👤 घनश्याम पाटील संपादक, चपराक प्रकाशन 👤 अवधूत पाटील सालेगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर 👤 अतुल उदाडे 👤 योगेश पाटील ढगे 👤 ऋषिकेश सोनकांबळे 👤 लक्ष्मण कामशेट्टी 👤 नागेश कानगुलवार 👤 रावजी मारोती बोडके 👤 संतोष वाढवे 👤 चंदू नागूल👤 संतोष हसगुंडे 👤 रवी वाघमारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 47*रिंग आहे, परंतु बोट नाही**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कणीस ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसांना कर्तव्याचा मार्ग दाखवणारा आचारधर्म म्हणजे सुधारणा. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करतो तेव्हा त्या वस्तूवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या कराला काय म्हणतात ?२) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण ?३) 'आदि पेरुक्कू' हा सण ( नदीची पूजा ) कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?४) 'विमान चालवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? *उत्तरे :-* १) टॅरिफ २) जगदीशचंद्र बोस ३) तामिळनाडू ४) वैमानिक ५) खलिल जमिल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाण कणीस*पाण कणी (रामबाण, जंगली बाजरी; हिं. पटेर, गोंड पटेर; गु. घबाजरीन; क. आपिनतैन; सं. एरका; इं. बुलरश, कॅट टेल,एलेफंट ग्रास; लॅ. टायफा अँगुस्टॅटा; कुल-टायफेसी). ही गवतासारखी दिसणारी, परंतु एकदलिकित फुलझाडांपैकी टायफेसी कुलातील व सु. १.५-३ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात आढळते. भारतात सर्वत्र दलदली जमिनीत वाढलेली आढळते. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, फार लांब, अरुंद व जाड असून पर्णतल आवरक (खोडास वेढणारा) व अर्धचितीय असतो. मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जाडजूड असून त्यावर बहुतेक पाने दोन रांगांत असतात. ह्या भूमिस्थित (जमिनीतील) बहुवर्षायू खोडावर ऑगस्ट महिन्यात लांब, सरळ व दंडगोलासारखा फुलोरा (स्थूलकणिश) येतो; तो बाजरीच्या कणसासारखा दिसतो. त्याच्या अक्षावर काही पाने येतात. फुले एकलिंगी, फार लहान, एकाच अक्षावर, लवकर गळून पडणाऱ्या महाछदाच्या बगलेत, पुं-पुष्पे वर व स्त्री-पुष्पे खाली अशी येतात. परिदले केसासारखी; पुं-पुष्पात तीन एकसंध केसरदले, क्वचित अधिक; स्त्री-पुष्पात एकच किंजदल असून किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजधर व किंजल लांबट आणि किंजल्क जिव्हिकाकृती [⟶ फूल]. बीजक एकच व लोंबते असते. कधीकधी दोन प्रकारची फुले भिन्न झाडांवर असतात. वंध्य किंजदले ही स्त्री-पुष्पात आढळतात. फळ (पकालिका) शुष्क व लहान. बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांशयुक्त), एकच व रेषांकित असते.खोडाचा व पानांचा अनेक प्रकारे उपयोग करतात. काश्मीरमध्ये चाळणी आणि झोपड्यांच्या व शिकाऱ्यांच्या छपरांकरिता उपयोग करतात; पंजाबमध्ये चटया, दोर व टोपल्या करतात. मुळे नदीकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात व त्यामुळे धूप थांबते; याकरिता ही झाडे लावली जातात. नदी पार करण्यास खोड व पाने यांच्या ‘तिन्हो’ नावाच्या तात्पुरत्या नावा करतात. फुलांपासून सिंधी लोक ‘बूर’ हा खाद्यपदार्थ बनवितात. सुकी फुले उष्णतारोधक वजनाने फार हलकी असतात. गाद्या व उशा भरण्यास ती वापरतात. मूलक्षोड स्तंभक (आकुंचन करणारे) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून कांजिण्या, हगवण व प्रमेह यांवर उपयुक्त असते. पक्व कणसातील मऊ भाग जखमेत भरल्यास जखम भरून येण्यास मदत होते.एलेफंट ग्रास हे इंग्रजी नाव दोन गवतांच्या जातींसही वापरतात. टायफा एलेफंटिना ही पाणकणसाची दुसरी जाती असून ती भारतात सामान्यपणे आढळते. तिचे उपयोग वर दिल्याप्रमाणेच आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र‌ आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बगळा व लांडगा एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्‍या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्‍याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, 'तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?'तात्पर्य- दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment