✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1F1vqeYeP5/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 212 वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :- १४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.• १६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.• १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनले.• १९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.• १९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.• १९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.• १९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.• २०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.• २००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.• २०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.🎂 जन्म :- • १८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर• १८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा • १९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले• १९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी• १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन• १९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर • १९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी• १९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी • १९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज• १९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान• १९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग🌹 मृत्यू :- • १७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा)• १८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई• १८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट • १८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन• १९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग• १९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर • १९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी • १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब• २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य• २०२२: अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी अयमान अल-जवाहिरी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *छडी लागे ( ना ) छम छम*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज 31 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता; तब्बल 17 वर्षानंतरही घटनेच्या आठवणी आजही ताज्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आजपासून मान्सून तीव्र, कोकणासह 17 राज्यांत 6 दिवस मुसळधार पाऊस, कमी दाबामुळे बळकटी, परिणाम दिल्लीपासून केरळपर्यंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *170 तास भरतनाट्यम सादरीकरण ! मंगळुरूच्या रेमोना एव्हेट परेराची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पीएम किसानचे 2000 रुपये 02 ऑगस्ट रोजी येणार, सरकारकडून मोठी अपडेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, आकाश दीपला संघात स्थान दिले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालासाहेब कच्छवे, समुपदेशक तथा मुख्याध्यापक, जि प. हा. चौफाळा, नांदेड👤 मनोज बुंदेले, संपादक, विष्णुपुरी एक्सप्रेस 👤 प्रशिक नंदुरकर, शिक्षक, उमरखेड 👤 प्रीतमकुमार नावंदीकर 👤 दिलीप सोळंके 👤 कैलास श्याम गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 40*मी आहे अशी भाजी* *ज्यात लपलेले आहे एका प्रसिद्ध शहराचे नाव* *सांगा पाहू मी कोण आहे…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वेणी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभवांच्या कमानी प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वतः बांधून त्याखालून जाणेच उचित असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'प्रिन्स' या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटपटू कोण ?२) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ( इग्नू ) इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?३) तिबेट ओलांडल्यानंतर यारलुंग सांगोपा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते ?४) 'लिहिता वाचता येणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) चीनचे पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) शुभमन गिल २) प्रा. उमा कांजीलाल ३) ब्रह्मपुत्रा ४) साक्षर ५) ली कियांग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦇 *वटवाघूळ* 🦇 एखाद्या ओसाड गुहेत कधी गेलात, तर प्रथम स्वागत होईल, ते फडफडणाऱ्या वटवाघळांच्या पंखांच्या फटक्यांनी. तुमची चाहूल लागल्याने निवांत अंधारात गुहेच्या सर्व भागांत लटकून झोपलेली वटवाघळे सैरावैरा उडू लागतात. पंखांची लांबी इतकी अस्ताव्यस्त असते की त्यांचा आवाज व एखादा फटका तुम्हाला स्पर्शूनच जाणार. गावाबाहेरच्या झाडांवरही ही वटवाघळे उलटी टांगून दिवसभर विश्रांती घेताना आढळतीलच. विजेच्या ताराही त्यांना त्यासाठी चालतात.सस्तन प्राणीवर्गातील उडणारा हा एकमेव प्राणी. उडणारा म्हणजे खऱ्या अर्थाने पंख पसरून उडणारा. पण त्याच्या पंखांची रचना मात्र मोठी वेगळीच असते. पक्षांचे पंख पिसांचे बनतात. वटवाघळाचे पंख म्हणजे कोवळ्या नाजुक पापुद्र्यासारख्या कातडीची दुहेरी अस्तराची हाडांवरची सलग पांघरलेली शालच म्हणा ना. जशी हाडे जवळ घेतली जातील, मिटतील, तशी ही पंखांची पसरणही मिटत जाते. मग वटवाघुळ एखाद्या मोठ्या उंदराप्रमाणेच दिसू लागते. त्याच्या कानाची ठेवणही तशीच असते.वटवाघळे साधारण वीस वर्षे जगतात. किरकोळ आकाराच्या लहानखुऱ्या वटवाघळांपासुन प्रचंड आकाराच्या उडत्या कोल्ह्याप्रमाणे दिसणाऱ्या वटवाघळांपर्यंत विविध साडेनऊशे जाती साऱ्या जगभर आढळतात. त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की, जगातील एकूण सस्तन प्राण्यांपैकी एक चतुर्थांश वटवाघळेच भरतील. मोठ्या जातीचे वजन दहा ते पंधरा किलो असू शकते. तर छोट्या जातीत ते एक दोन किलोंवरच राहते. मोठ्या जातीच्या पंखांची लांबी उडताना सहा फुटांपर्यंत जाते, तर लहानांची फुटभरावरच संपते.वटवाघळे काय खातात, याची यादी मात्र आश्चर्यजनक आहे. मध पिण्यापासून मासे खाण्यापर्यंत, उंदीर पकडण्यापासून इतर वटवाघळांनाच खाण्यापर्यंत त्यांना कसलेही अन्न चालते. मुख्यतः लहान किडे हे त्यांचे प्रमुख अन्न. उडते पतंग, किडे उडता उडताच मटकावणे हे कौशल्य वटवाघळांचेच. तोंडाने चित्कार काढत वटवाघूळ उडते व हा आवाज भक्षावर आदळून त्याच्या परत येणाऱ्या लहरी ग्रहण करून त्याची नेमकी जागा हा प्राणी शोधून काढतो. याच तत्त्वाचा वापर रडार यंत्रणेत मानवाने केला आहे.पक्ष्यांचे उडणे व वटवाघळांचे उडणे यात खूपच फरक आहे. कमी वेग, पाहिजे तेथे थांबणे, दिशा सहजगत्या व अगदी थोड्या जागेत बदलणे, उंची खालीवर सहज करता येणे या बाबतीत वटवाघळे पक्ष्यांना मागे टाकतात. अतिथंड प्रदेशातील वटवाघळे काही काळ सुप्तावस्थेतही काढून जीव जगवू शकतात.वटवाघळांच्या दोन-तीन जाती पक्षीही खातात व इतर सस्तन प्राण्यांच्या रक्तावरही जगतात. काही दंतकथांत वटवाघळांना भरपूर स्थान दिले जाण्याचे हेही कारण असावे. वटवाघूळ उलटे लटकले आहे, असे जरी आपल्याला वाटत असले, तरी त्याचे संपूर्ण शरीर मात्र एकाच पातळीवर पण जमिनीला समांतरच असते. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने उडणारी वटवाघळे ज्याने पाहिली आहेत, तो ते दृश्य सहसा विसरणार नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे रूप पाहता देवासुख झाले माझ्या जीवा || धृ ||हे तो वाचे बोळवेनाकाय सांगू नारायणा || १ ||जन्मो जन्मीचे सुकृततुझे वाई रम्मे चित्त || २ ||जरी योगाचा अभ्यासतेव्हा तुझा निजध्यास || ३ ||तुका म्हणे भक्तगोड गाऊ हरीचे गीत || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा होते तेव्हा, मन गहिवरून येतं. खऱ्या अर्थाने समाजाकडून आपल्याला मिळालेली आपल्या नि:स्वार्थ कार्याची ही पावती असते. कर्तुत्ववान लोक स्वतःचा कधीच उदोउदो करत नाही. हेच त्यांच्यातील महान गुण असतात आणि ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले कधीच बघवत नाही ते फक्त, त्या व्यक्तीमधील वाईट शोधून दुसऱ्याच्या मनात नकारात्मकतेचे विष भरतात. अशांची या समाजात कमतरता नाही. म्हणून अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. त्यांचे ते काम करतात, आपण आपले काम करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा महात्मा गांधीजींना अनेक लोक भेटायला येत. गांधीजींच्या नुसत्या सहवासातूनच लोकांना कितीतरी गोष्टी सांगण्याची गांधीजींची पद्धत अतिशय प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीला येणारा प्रत्येक माणूस तेथून निघतांना प्रेरणा घेऊनच निघत असे. एकदा एक गृहस्थ गांधीजींना भेटायला आले. नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे. पण त्या दिवशी गांधीजी त्यांना म्हणाले, ' क्षमा करा, पण आता माझी मंदिरात जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही.' यावर ते गृहस्थ म्हणाले, 'हो का ? मलासुद्धा येथून मंदिरातच जायचे होते त्यामुळे आता आपण सोबतच मंदिरात जाऊ आणि पूजा करू.' हे उद्गार ऐकून गांधीजी किंचित हसले आणि म्हणाले, 'परंतु मला तुम्ही जात असलेल्या मंदिरात जायचे नाही. माझे मंदिर वेगळे आहे. म्हणजे काय हे त्याला कळलेच नाही. तरीही त्या व्यक्तीने गांधीजींसोबत येण्याचा आग्रह केला. गांधीजी म्हणाले, 'ठीक आहे, तुमचा हट्ट आहे तर चला माझ्याबरोबर.' असे म्हणून ते त्या गृहस्थाला आपल्यासोबत घेऊन गेले. गांधीजी ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघून त्या गृहस्थाला मोठा धक्का तर बसलाच ; पण मनापासून गांधीजींचे पाय धरावेसे वाटले. कारण गांधीजी एका वृद्धाश्रमात गेले होते आणि तेथील वृद्धांची ते सेवा करत होते. ते म्हणाले ,'हेच माझे मंदिर आहे आणि जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा आहे.' त्या गृहस्थांच्या मनात गांधीजीबद्दलचा आदर कित्येक पटींनी वाढला.तात्पर्य - जनसेवा हीच ईश्वरसेवा•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment