✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BpRqUu9Vn/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 195 वा दिवस 🌍 महत्त्वाच्या घटना :-• १७८९ – बास्तिल तुरुंगावर हल्ला झाला. ही घटना फ्रेंच क्रांतीची सुरुवात मानली जाते. त्यामुळे १४ जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.• १९५८ – इराकमध्ये सैनिकी उठाव झाला आणि राजेशाहीची समाप्ती झाली.• १९६५ – मारिनर-४ या अमेरिकन अंतराळयानाने मंगळ ग्रहाच्या खूप जवळून जाऊन पहिल्यांदाच त्याचे छायाचित्र घेतले.• २००४ – नवी दिल्ली येथे फ्रेंच पाणबुडी स्कॉर्पीन करार भारताने स्वाक्षरी केला.👶 जन्म :-• १९१० – विलियम हॅना – अमेरिकन अ‍ॅनिमेटर (टॉम अँड जेरीचे निर्माते).• १९१३ – गेराल्ड फोर्ड – अमेरिकेचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष.• १९२१ – जेम्स गुन – सुप्रसिद्ध अमेरिकन विज्ञानकथा लेखक.• १९३४ – अवतार गिल – भारतीय चित्रपट आणि रंगभूमी अभिनेते.• १९४५ – सुधा मूर्ती – सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका.⚰️ पुण्यतिथी :-• १९५५ – प. भीमसेन जोशी यांचे गुरू पं. सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचे निधन.• १९९२ – पं. नरेंद्र शर्मा – हिंदी कवी व गीतकार.• २०१५ – श्रीकांत जोशी – मराठी लेखक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पोशाखातून व्यवसायाची ओळख*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह सी.सदानंदन मास्तर, हर्षवर्धन श्रृंगला अन् मिनाक्षी जैन यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वच्छता सर्वेक्षण-2024, अहमदाबाद देशात नंबर एक, भोपाळ दुसऱ्या आणि लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर; इंदूरसह 15 शहरे सुपर क्लीननेस लीगमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारप्रमाणे देशभरात मतदार याद्या तपासल्या जातील, EC ची तयारी पूर्ण; 28 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर होईल निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अजित पवारांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन, त्यांच्या जाण्याने विश्वासू सहकारी गमावला, पवारांनी व्यक्त केल्या भावना*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स :- तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचाडाव 192 धावावर संपला, भारतासमोर विजयासाठी ठेवले 193 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद व्यवहारे, जिल्हा परिषद नांदेड 👤 धनंजय गुम्मलवार, जिल्हा परिषद नांदेड 👤 भगवान अंजनीकर, जेष्ठ साहित्यिक, नांदेड 👤 दीपक बोरगांवे, साहित्यिक, निपाणी 👤 नंदकिशोर मोरे 👤 डॉ. अमान खान, धर्माबाद 👤 इरावंत जामनोर👤 नितीन काळे 👤 आकाश आनंद यडपलवार, जारीकोट 👤 शंकर कंदेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 25*पंख नाही तरीही हवेत उडतो, हात नाहीत तरीही भांडतो…ओळखा पाहू मी कोण …? *उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कंगवा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची पूजा करताना गुणग्राहकतेची जरुरी लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे ?२) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आयसीसीचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) ताप मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ?४) 'मासे पकडणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते ? *उत्तरे :-* १) गणेशोत्सव २) संजोग गुप्ता ३) तापमापी ( थर्मामीटर ) ४) कोळी ५) आठ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 *************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागाचंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अपशकुनी*दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली. ‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फाशीची शिक्षा फर्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फर्मावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment