✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EJbRMpxqa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 184 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०८ – युनायटेड स्टेट्समध्ये सॉफ्ट ड्रिंक "फ्रूट फ्लेवर पेय कोका कोला" प्रथम विक्रीस आले.• १९७९ – भारताने INS Viraat हे विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम सुरू केले.• १९८७ – कनिष्ठ वयाच्या वायूसेनेच्या पायलटचा पहिला उड्डाण दिवस.👤 जन्म :• १८८३ – फ्रांझ काफ्का, झेक लेखक, ‘द ट्रायल’, ‘द मेटामॉर्फोसिस’ या विख्यात कादंबऱ्यांचे लेखक.• १९०४ – सदानंद बखरे, प्रसिद्ध मराठी लेखक व नाटककार.• १९३८ – गुलजारीलाल नंदा, भारताचे हंगामी पंतप्रधान.⚰️ मृत्यू : • १९६९ – ब्रायन जोन्स, प्रसिद्ध ब्रिटिश गिटारिस्ट आणि The Rolling Stones बँडचे संस्थापक सदस्य.• २०२० – सर्वानंद सिंह, माजी भारतीय नेमबाज व राष्ट्रकुल पदक विजेता.📌 जागतिक विशेष दिन :• जागतिक प्लास्टिक बॅग मुक्त दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बदललेल्या सरकारी शाळा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पावसाचा जोर वाढणार, 24 तासांत कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आदिवासी साहित्य संमेलन, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली 7 जुलैला होणार आठवे उलगुलान वेध साहित्य संमेलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईकांमध्ये सभागृहात जुंपली, माजी वनमंत्री सरकारवर भडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास, ICMR चा दावा- लसीशी याचा संबंध नाही, 18-45 वर्षे वयोगटातील लोकांवर संशोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गडचिरोलीत स्टील हब होणार, जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधानसभेत मंजूर; 1000 कोटींची गुंतवणूक येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात शालेय वारकरी दिंडी, १५०० विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होणार सहभागी, शनिवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारत 310/5, कर्णधार शुभमन गिलचे शतक तर यशस्वी जैस्वाल 87 धावावर बाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मण लंके 👤 संतोष नलबलवार, शिक्षक, परभणी 👤 लक्ष्मीकांत गिरोड 👤 साहेबराव कांबळे 👤 सविता सावंत👤 दिगंबर माने 👤 बालाजी मुंडलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 16*मी वेडा नाही तरीही कागद फाडतो, मी पोलिस नाही तरीही खाकी घालतो, मंदिरात नाही तरीही घंटा वाजवतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कांदा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे कार्य तडीस न्यायचे असते ते चिकाटीने केले तर त्यात नक्कीच यश मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले डिजिटल शहर कोणते बनले आहे ?२) आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार कोण ?३) यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?४) 'पूर्वी कधी घडले नाही असे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'डेंग्यू' या रोगाचे वाहक कोण आहे ? *उत्तरे :-* १) इंदूर, मध्यप्रदेश २) महेंद्रसिंग धोनी, भारत ३) आयुष शेट्टी, भारत ४) अभूतपूर्व ५) डास*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌧 *पाऊस केव्हा पडतो ?* 🌧 ************************पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाख वणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण 'येरे येरे पावसा' अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही. जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं.धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात. वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात. ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं.उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात. त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?" या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती दुसऱ्यांच्या विषयी नको त्या शब्दात बोलत असेल किंवा सांगत असेल तर त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास करू नये. आज ती व्यक्ती दुसऱ्या बद्दल बोलते कदाचित परवा आपल्या विषयी सुद्धा बिनधास्तपणे बोलू शकते.ज्याच्या डोक्यात चौफेर धावणारे नकारात्मकपणाचे किडे असतात ते दुसऱ्यांचे कधीच चांगले करू शकत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" सत्याचा विजय "*एकदा एका गावात अर्जुन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. तो खूप हुशार, पण थोडा खोडकर होता. एक दिवस शाळेत खेळताना त्याच्या हातून शाळेच्या खिडकीची काच तुटली. सारे मुले घाबरली. शिक्षकांनी विचारले, "काच कोणी फोडली ?"सर्व मुले शांत होती, पण अर्जुनचे मन चुळबुळ करत होते. त्याला वाटत होते, "सांगितले तर शिक्षा मिळेल, पण खोटं बोलणं चुकीचं आहे." शेवटी त्याने धीर करून शिक्षकांसमोर उभा राहून म्हणाला, "सर, ती काच माझ्या हातून चुकून फुटली."शिक्षकांनी थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं, आणि म्हणाले, "अर्जुन, तू चूक केलीस, पण सत्य बोलून तू मोठं धाडस केलंस. आम्ही तुझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतो." शिक्षकांनी त्याला शिक्षा न देता सर्वांसमोर शाबासकी दिली. तेव्हापासून अर्जुन इतर मुलांसाठी आदर्श ठरला. त्याला एक मोठा धडा मिळाला, सत्य बोलणं हेच खरं धैर्य आहे.तात्पर्य :सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे संस्कार आहेत. चूक झाली तरी तिची कबुली देणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment