✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AQbSgPE5H/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 महत्वाच्या घटना :-• १९९५ - हेल-बॉप धूमकेतूचा शोध• १९२९ - इटलीमध्ये परभाषेतील शब्द वापरण्यास बंदी🎂 जन्म :- • १८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.• १८८६ - वॉल्टर शॉट्की, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.• १९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.• १९०६ - व्लादिमिर प्रेलॉग, नोबेल पारितोषिक विजेता क्रोएशियाचा रसायनशास्त्रज्ञ.• १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.🌹 मृत्यू :- • १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका• २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोंधळलेला पालक*आपल्या मुलांना नेमकं कोणत्या शाळेत आणि कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यावं या संभ्रमात आजचा पालक अडकला आहे..........!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर, गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा टप्पा पार, सहा कोटी लोकांची तपासणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानास सुरुवात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 3.4 टक्के वाढ होण्याची शक्यता, सरकार रक्षाबंधनपूर्वी याबाबत निर्णय जाहीर करू शकते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आधार, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्र नाहीत, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बॉलिवूडच्या 'सैयारा' चित्रपटाचा सुपरस्टार्सना धोबीपछाड; मंडे टेस्टही पास, फक्त 4 दिवसांतच मिळवला 'हिट सिनेमा'चा टॅग; 101.82 कोटींची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T-20 सामन्यात पाकिस्तानाचा सलग दुसरा पराभव, बांगलादेशचा 8 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उदयकुमार शिल्लारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद 👤 अलका कुलकर्णी, शिक्षिका तथा साहित्यिक, बीड 👤 प्रदीप दळवी, इंजिनियर, पुणे 👤 जितेंद्र पाटील, धर्माबाद 👤 आनंदराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते, तेलंगणा👤 विकास पाटील, साहित्यिक 👤 शंकर बोईनवाड, धर्माबाद 👤 लक्ष्मण मलगिरे, लातूर👤 वैभव पाटील, आष्टा, बीड 👤 संतोष सुवर्णकार, सालेगाव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*हरी झंडी लाल लाल कमान, तोबा तोबा करे इंसांन, कौन हूँ मै पहचान …. ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कुलूप ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी निसर्गाने मानवाशी कुटुंबाद्वारे साहचर्य निर्माण केले आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चीनने कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू केले आहे ?२) भारताने मलेरियावरील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या लसीचे नाव काय आहे ?३) ई-सिगारेटवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?४) 'रक्षण करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नुकतेच निधन झालेले सौदी अरेबियाचे ओळखले जाणारे 'झोपेचे राजकुमार' चे नाव काय ? *उत्तरे :-* १) ब्रह्मपुत्रा २) AdFalciVax ३) पंजाब ४) रक्षक ५) प्रिन्स अलवलीद बिन खालीद बिन तलाल बिन अब्दुल अजीज अल सौद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !*डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहसा आपल्याला झोप लागत नाही. पण एखादे स्वप्न जरी पडले की, लगेच गाढ झोप येत असते. आणि त्याच गाढ झोपेमुळे स्वप्नात आपण रमून जातो. स्वप्न बघणे आणि त्यात रमून जाणे हे तेवढ्यापुरते मर्यादित असते. पण आपण बघितलेले स्वप्न साकार करणे ही आपली जबाबदारी असते. गाढ झोपेत स्वप्न साकार होत नाही तर हिंमतीने, जिद्दीने तसेच स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवल्याने तो बघितलेला दिवस आपण स्वतः आणू शकतो म्हणून स्वतः तेवढेच जागे राहणे गरजेचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वामी रामतीर्थ आणि जपानी विद्यार्थी*स्वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्हाची गोष्ट. ते ज्या जहाजात बसले होते त्यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्वामीजींचा त्यांच्याशी परिचय झाला. आणि ते विद्यार्थी स्वामीजींच्या ज्ञानाने फारच प्रभवित झाले. त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण श्रीमंत कुटुंबातील होते. स्वामीजींनी त्यांना बोलता बोलता विचारले, ‘ तुम्ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात का’ सर्वांनी स्वामीजींना विशेष अध्ययनासाठी जात असल्याचे सांगितले तेव्हा स्वामीजींनी त्या सर्वांना सहज प्रश्न केला, ‘ बरं, हे सांगा, बरेच दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार आहात, तर त्यासाठी पैशाची व्यवस्था आपल्याकडे काय आहे’ स्वामीजींच्या त्या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यानी दिले, ‘ स्वामीजी आम्ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणलेले नाही. जहाजात काही काम करून त्याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागवू. आपल्या राष्ट्राचे धन व्यर्थ विदेशात का खर्च करावे, स्वामी रामतीर्थांनी पाहीले की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते. त्यांचे देशप्रेम पाहून स्वामीजी फारच प्रसन्न झाले आणि मनात विचार करू लागले की, विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यानीही असा विचार केल्यास भारताला संपन्न राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.तात्पर्य - देशातील साधनांचा, धनाचा सद्उपयोग अशी राष्ट्रसेवा आहे की ज्यामुळे राष्ट्र जलदगतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment