✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EsDvuXq2U/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १९६९ – अपोलो ११ चं यान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. नील आर्मस्ट्राँग, बज़ एल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे अंतराळवीर त्यामध्ये होते.• १९८० – मॉस्को (रशिया) येथे २२व्या ऑलिंपिक स्पर्धा सुरू.• १९९२ – किरण बेदी यांना "रॅमन मॅगसेसे पुरस्कार" जाहीर.🎂 जन्म :-• १८१४ - सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.• १८३४ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.• १८७६ - जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८७७ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८९४ - ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.• १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.१९०० - यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान.• १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.• १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.• १९४६ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.• १९५५ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.🌹 मृत्यू :- • १९४७ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.• १९६५ - सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.• १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.• २००४ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलामंध्ये वाचनाची आवड कशी वाढवाल ........?*वाचन हे ज्ञानाचे दार उघडणारे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे माणसाचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि भाषिक विकास होतो. वाचनामुळे विविध विषयांवरील माहिती मिळवू शकतो. इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य इत्यादी. वाचन करताना मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे एकाग्रता, विचारशक्ती, आणि स्मरणशक्ती वाढते. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *NCERT च्या पुस्तकात शीख-मराठा राजांबद्दलचे प्रकरण जोडले, मराठा साम्राज्यावर आता 22 पाने, पूर्वी दीड पाने होती; आठवीच्या पुस्तकात बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई पावसाळी अधिवेशन समाप्त, 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *CGHS ( केंद्रीयआरोग्य योजना ) दरात लवकरच सुधारणा, आरोग्य केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यंदाच्या दहीहंडी कार्यक्रमात दीड लाख गोविंदाना विमाकवच, मुख्यमंत्र्याचे क्रीडा विभागाला निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मनोज बढे 👤 माधव रेड्डी 👤 श्रीनिवास मुरके 👤 गजानन शिराळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 30*नाशकातून आली माझी सखी**तिच्या मानेवर दिली मी बुक्की**तिच्या घरभर पसरल्या लेकी**वापरण्यापूर्वी सालपट काढून फेकी**सांगा पाहू कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बांगडी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( सीडीएस ) जनरल कोण आहेत ?२) 'द वन : क्रिकेट, माय लाईफ अँड मोअर' हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे ?३) हॉकी प्रो लीगच्या २०२४-२५ हंगामासाठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार कोणी पटकावला ?४) 'श्रेष्ठ ( महान ) ऋषी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगातील सर्वोत्तम विमान कंपनी २०२५ चा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीने पटकावला ? *उत्तरे :-* १) अनिल चौहान २) शिखर धवन, भारत ३) दीपिका, भारत ४) महर्षी ५) कतार एअरवेज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तवावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता तुझे गोविंदा, मनी वाहे भरुनी आनंद || धृ ||ऋषीकेशी बन्सी बिहारी || गोकुळीचा कुंजविहारी ||कुणी म्हणती कृष्ण मुरारी | कुणी मिलिंद आणि मुकुंद || १ ||विश्वाचा नाथ म्हणोनी | हसते विश्व तव वदनी |तव नामे तुझिया चरणी | वाहते यमुना जल धुंद || २ ||तू शब्द ओळी ओळीत | तू अर्थ मधुर गीतेत |तू ताल भक्तिगीतात | तू सुरासुरास सुगंध || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नेताजी सुभाषचंद्र बोस*नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडील वकिलांची इच्छा होती की त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषबाबू इंग्लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. याचे त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्यू यांच्याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. मी त्याची ही अट मान्य करण्यासाठी त्याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्यम ड्युक अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्यांच्या वडिलांनी पत्र लिहीले, त्यात ते म्हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्हता.’’ कथासार - राष्ट्रसेवेची आवड असणारे प्रत्येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यास उद्युक्त करते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment