✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DqMy3HMBa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 महत्त्वाच्या घटना :• 1969 – अपोलो 11 या अंतराळ मोहिमेची सुरुवात; नील आर्मस्ट्राँग, बज़ ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स यांनी चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात प्रस्थान केले.• 1999 – भारताचे माजी पंतप्रधान चरण सिंग यांची जयंती. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो.🏆 जन्मदिवस :• 1872 – रोएल्ड अॅमंडसेन, आर्क्टिक-अंटार्क्टिक भागात मोहिमा करणारे नोर्वेजियन संशोधक.• 1901 – महादेवी वर्मा, हिंदीतील प्रसिद्ध कवयित्री आणि साहित्यिक (मरण: 1987).• 1909 – अरुणा आसफ अली, स्वातंत्र्यसैनिक व समाजसेविका• 1916 – नटराज रामकृष्ण, भारताचे प्रसिद्ध नृत्यकार.🕯️ मृत्यू :• 2008 – कृष्णकांत, भारताचे माजी उपराष्ट्रपती.• 2013 – कोरे मोंटेथ, कॅनडियन अभिनेता (Glee मालिकेतून प्रसिद्ध).🛰️ वैज्ञानिक महत्त्व:• 1994 – शूमेकर-लेवी 9 धूमकेतूचे तुकडे गुरू या ग्रहावर आपटले; हा एक ऐतिहासिक खगोलीय प्रसंग होता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शनिवारची दप्तरमुक्त शाळा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *२०३५ पर्यंत भारताची ऊर्जा मागणी दुप्पट होणार, अक्षय ऊर्जा गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी - प्रल्हाद जोशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एससीओ परिषदेत भारताची स्पष्ट भूमिका, दहशतवादाविरोधात जयशंकर यांचा चीनमध्ये ठाम आवाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला तीन इतर साथीदारांसह पृथ्वीवर परतले, ड्रॅगन 'ग्रेस' अंतराळयान दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगोजवळ समुद्रात उतरले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहार मतदार यादीतून 30 लाख नावे वगळली जाणार, पडताळणी दरम्यान BLO ना 14 लाख लोक आढळले नाहीत, 10.50 लाख जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वीज क्षेत्रातील खासगीकरणाच्या विरोधात आता रस्त्यावरची लढाई, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा इशारा, द्वारसभा घेत नोंदवला निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये झेंडा फडकला ! २ सुवर्ण, २ रौप्य पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयवंत हंगरगे, पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 हरिप्रसाद आरेवार, नांदेड 👤 मारोती गाडेकर 👤 सुरेश भाग्यवंत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*कोकणातून आला एक भट, त्याला धर की आपट, सांगा मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वांगे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेची साक्ष देणारे राज्यातील किती किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे ?२) 'अफूचे युद्ध' म्हणून ओळखले जाणारे पहिले अफूचे युद्ध कोणत्या दोन देशात घडून आले ?३) पहिला स्वयंपेशी सजीव कोणता ?४) 'मूर्तीची पूजा करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अष्टपैलू नाट्य अभिनेते निळू फुले यांचे पूर्ण नाव काय ? *उत्तरे :-* १) ११ किल्ले व तामिळनाडूतील एक २) चीन व इंग्लंड ( १८३९ ते १८४२ ) ३) अमिबा ४) मूर्तीपूजक ५) निळकंठ कृष्णाजी फुले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 नखं कापतांना दुखत का नाही ? पण उपटल्यास दुखतात; असे का ? 📙 दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखं कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापतांना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते ? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी!नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत त्वचेतील पेशींपासून निर्माण होणाऱ्या केरॅटिनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरित तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटिनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापतांना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखाचे हे नाम आवडीने गावेवाचे आळवावे विठोबासी || धृ ||संसार सुखाचा होईल निर्धारनामाचा गजर सर्व काळ || १ ||कामक्रोधाचे चलेची काहीआशा मनशा पाही दूर होती || २ ||आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरीम्हणतसे महारी चोखियाची || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीकडे अफाट धनसंपत्ती नसेल म्हणजे ती व्यक्ती कमजोर असते असेही नाही. कारण बरेचदा धनसंपत्ती पेक्षा हिंमत आणि स्वतः वर असलेला विश्वास अफाड धनसंपत्तीपेक्षा कमी नसतो. एकदाची धनसंपत्ती संपून जाईल पण हिंमतीने बरेच काही कमावता येऊ शकते.म्हणून कोणाला लाचार समजून त्याची टिंगल, टवाळी करण्यात वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शौर्याचा पुरावा*बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्छितात. अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. ते दोन्ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, ‘’ आम्ही राजपूत आहोत, आमची तुम्हाला विनंती आहे की, आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्हणजे आम्हाला माहितच नाही. आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्हणाला,’ तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्याच्या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्वाळा बाहेर पडत होत्या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या. उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती. पहिल्याने दुस-याच्या मानेवर वार केला, तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म-मृत्युमध्ये काहीच अंतर मानत नाही. तुम्ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला. तात्पर्य - शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment