✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16wA3MCvxM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 ठळक घटना :• १७९३ – फ्रान्समध्ये पहिल्यांदाच मॅक्सिमिलियन रोबेस्पिअर यांनी "जनतेच्या सार्वभौमत्व" या कल्पनेचा पुरस्कार केला.• १९४७ – भारताच्या संविधान समितीने राष्ट्रीय ध्वज स्वरूपाला अंतिम मंजुरी दिली.• १९७२ – अमेरिकेचे उपाध्यक्ष स्पिरो आग्न्यू यांनी भारत भेट दिली.• २००३ – भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले.🎂 जन्म : • १८८७ - गुस्ताव लुडविग हेर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.• १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.• १९२१ - विल्यम रॉथ, अमेरिकेचा सेनेटर.• १९२३ - मुकेश, पार्श्वगायक.• १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.• 1959 - अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र • १९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र 🕯️ पुण्यतिथी:• १९३३ – बिपिनचंद्र पाल, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक.• २००४ – सायरा बानो यांची आई नसीम बानो, प्रसिद्ध अभिनेत्री.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचा आणि विचार करा " तुमची जात कंची .......?"..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जगभरातील 60 संशोधकांचे चरित्र मराठीत, 'जनक शोधांचे' पुस्तकाचे प्रकाशन, हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये पोहचले पाहिजे - वेणूगोपाल रेड्डी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- धर्मादाय संस्थांच्या वार्षिक उत्पन्नातून अंशदान वसुली होणार:उच्च न्यायालयाचे शासनाला निर्देश; उचित टक्केवारी निश्चित करण्यास सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा घेतला निर्णय, मध्य रेल्वेने २५०, तर पश्चिम रेल्वेने सोडल्या ५ गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारती एअरटेलने टाटाच्या बड्या कंपनीला मागे टाकत प्राप्त केले तिसरे स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील तरुणांना चित्रपट, माध्यम व मनोरंजन क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या T-20 सामन्यात बांगलादेशने केला पाकिस्तानचा पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय कदम, पत्रकार, देशोन्नती धर्माबाद तालुका प्रतिनिधी 👤 प्रल्हाद तुमेदवार, शिक्षक, बिलोली 👤 अनुराधा हवेलीकर-पदमे 👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोष जाधव 👤 पद्माकर गोपाळराव मुळे 👤 अमोल बबनराव गायकवाड 👤 धनराज वाघ 👤 विश्वनाथ चित्रलवार 👤 दामोधर साळुंके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*ना खातो मी अन्न, ना घेतो मी तुमच्याकडून पगार, तरीही देतो पहारा दिवस रात्र, सांगा पाहू मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वर्ष ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जुन्यांनी नव्यांसाठी मार्ग मोकळा केला पाहिजे, हा सृष्टीचा क्रम आणि नियम आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला राजधातू असे म्हटले जाते ?२) 'गोल्डन बॉल पुरस्कार' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?३) 'घरचा पुरोहित' ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'रणांगणावर आलेले मरण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्र राज्याची पूर्व- पश्चिम लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) सोने ( Gold ) २) फुटबॉल ३) भास्करराव जाधव ४) वीरमरण ५) ८०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?*📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्‍याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे । कवडी मोल धन हे सारे, कमविले तु लाख रे ॥धृ॥कुणाची ही शेतीवाडी, बंगलामाडी कुणाची । कुणाची ही मोटारगाडी, बॆलगाडी कोणाची ।राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ॥१॥माय–बापाला छळणारा पुत्र तो नसावा । मेल्यामागे तुप–रोटी देणारा नसावा ।भुकेल्याची भुक जाण. लोभ सारा टाक रे ॥२॥थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तु । झाकावया नाही गेला दुर राहिला तु ।मायेचा उबारा दे तु, लाज त्याची राख रे ॥३॥आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे । दत्त नामाविणा जाई, जन्म सारा वाया रे ।श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं जगणं आपल्याला चांगल्याप्रकारे माहित असते.आपल्या अडचणी आपल्यालाच माहित असतात. आपले व्यवहार कसे आहेत हेही आपल्यालाच माहित असते. ज्या काही समस्या, अडचणी असतात त्या आपल्याच असतात.म्हणून उगाचच कोणाला नाव ठेवून त्या अडचणींचा अपमान करू नये.कारण समस्या आणि अडचणीतूनच आपण शिकत असतो.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी येत असतातच. यामुळे आपल्याला त्रास जरी होत असेल तरी अडचणी ,समस्या या प्रेरक असतात.त्यांचा सामना आपण केलाच पाहिजे.हिंमतवान व्यक्ती हिंमतीने त्याचा सामना करून जगण्याची तयारी ठेवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा सूर्यसेन*राजा सूर्यसेनचे राज्‍य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्‍ये त्‍याच्‍या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्‍नाच्‍या वयाची झाल्‍यावर राजाने तिच्‍यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्‍याची इच्‍छा अशी होती की, आपल्‍या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्‍हायला पाहिजे. जो आपल्‍यानंतर या राज्‍याचा योग्‍यप्रकारे सांभाळ करू शकेल. राजकुमारी आणि राज्‍यावर अनेक राजकुमारांची नजर होती. मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जेव्‍हा जो कोणी विवाहाचा प्रस्‍ताव ठेवित असे तेव्‍हा राजा त्‍याला संसारातील सर्वात मौल्‍यवान वस्‍तू घेऊन ये असे सांगत असे व लोभी व्‍यक्तींना धडा बसविण्‍यासाठी त्‍याने पुढे अट ठेवली होती की ती वस्‍तू मला आवडली नाही तर मी त्‍याला कारागृहात टाकणार.अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्‍तू घेऊन आले परंतु राजाने त्‍या वस्‍तूंना असहमती दर्शवत त्‍यांना कारागृहात टाकले. राजाला विश्वास होता की, एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धीमान वीर पुरुष आपल्‍या राजकन्‍येसाठी ही अट पूर्ण करेल. एके दिवशी त्‍याच्‍याच राज्‍यातील एका छोट्या खेडयातील एका शेतक-याचा तरूण मुलगा रघु तीन वस्‍तू घेऊन राजाकडे आला व अट मान्‍य करण्‍याची इच्‍छा व्‍यक्त करू लागला. राजाने अनुमती दिली. रघु म्‍हणाला,’’मी जगातील तीन अनमोल वस्‍तु आणल्‍या त्‍यापैकी पहिली म्‍हणजे माती, जी आपल्‍याला अन्न देते, दुसरे म्‍हणजे पाणी जे भेदाभेद न पाहता सर्वांची तृषा शांत करते, आयुष्‍य वाचवते आणि तिसरी वस्‍तू म्‍हणजे पुस्‍तक जे सर्वांना समान न्‍यायाने ज्ञानदान करते, ज्ञानाचा आधार म्‍हणजे पुस्‍तक. ज्ञानाची गरज भागविण्‍याचे काम याच्‍याकडून केले जाते.’’ राजा या तीनही वस्‍तू व त्‍याचे त्‍यामागचे विचार पाहून ऐकून भारावून गेला. त्‍याने त्‍याच्‍या मुलीचा विवाह रघुशी केला व राज्‍याचा उत्तराधिकारी म्‍हणून नियुक्त केले. तात्‍पर्य - बुद्धिमान लोकांकडूनच जगातील कठिणातील कठीण प्रश्र्नांची उत्तरे प्राप्त केली जाऊ शकतात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment