✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CS6dP2Eo6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना :• १९०२ – विल्हेल्म रूंटजेन यांनी पहिल्यांदा एक्स-रे चा वापर वैद्यकीय तपासणीत केला.• १९५५ – डिज्नीलँड (Disneyland) चे अमेरिकेतील कॅलिफोर्नियात उद्घाटन झाले.• १९७६ – मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे २१व्या ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या.• १९९६ – भारतातील पहिला 'इंटरनेट बँकिंग' सेवा सुरू झाली (ICICI बँकेद्वारे).🎂 जन्मदिवस :• १९१७ – बी. के. सावरकर, प्रसिद्ध समाजसुधारक आणि विनायक सावरकर यांचे बंधू.• १९१८ – नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते.• १९२० – डॉ. वसंतराव गोविंद सप्रे, मराठी भाषेतील लेखक व संपादक.🕯️ मृत्यू : • १७९० – अॅडम स्मिथ, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व "The Wealth of Nations" चे लेखक.• २०१४ – एलेन हंट, नोबेल विजेते पदार्थविज्ञानतज्ज्ञ.📜 इतर उल्लेखनीय :• १७ जुलै हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला आहे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोबाईल बंदी असायला हवी ......?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत अनधिकृत शाळा सुरु असल्याची शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सातारा - बोगस प्रमाणपत्राचे कारण देत 25 दिव्यांग शिक्षक अपात्र; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जयंत पाटील पायउतार होताच रोहित पवारांना राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीसची मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांचा निरोप समारंभ संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लियाम डॉसनचे 8 वर्षांनंतर कसोटी इंग्लंडच्या संघात पुनरागमन, चौथ्या सामन्यासाठी संघ जाहीर; दुखापतग्रस्त शोएब बशीर मालिकेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पुरुषोत्तम केसरे 👤 आनंद पा. पंगेवाड, धर्माबाद👤 मधुकर फुलारी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 28*माझे पांढरे पांढरे पातेले**त्यात ठेवला पिवळा भात**ओळखेल मला जो कोणी**त्याला असेल माझी साथ*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नारळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या योगाने माणूस जगण्याच्या लायक होतो ते म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालेल्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांची नावे सांगा.२) भारतीय चलन '₹' हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले आहे ?३) जगातील सर्वात लहान महासागर कोणता ?४) 'मूर्तीची तोडफोड करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मुंबईमधील कर्नाल या पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी २) डी. उदयकुमार ३) आर्टिक महासागर ४) मूर्तिभंजक ५) सिंदूर पूल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⛈ *गार किती मोठी असते ?* ⛈ ************************'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ही कवीकल्पना जरूर आहे; पण प्रत्यक्षात असे परस्परविरोधी गुणधर्म असणारा कोणताही पदार्थ नाही, असं मानण्याचं कारण नाही. आपल्या अतिशय परिचयाच्या, ज्याचं दुसरं नावच मुळी जीवन आहे अशा, पाण्याकडे पाहा ना ! अधिक नेमकेपणाने बोलायचं तर या पाण्याच्या घनरुपाकडे लक्ष केंद्रित करा ना ! हिवाळ्याच्या ऐन भरात जेव्हा हिमपाताच्या रूपात हे घन पाणी सामोर येतं, तेव्हा अतिशय हलक्या वाऱ्याच्या मंद झुळकीनंही इतस्तत: फेकल्या जाणाऱ्या हिमाच्या त्या पात्यांनी मन मोहरून येतं. अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा सुखद काटा उभा राहतो; पण सरत्या हिवाळ्यात किंवा त्यानंतरही जेव्हा हेच घन पाणी गारांच्या रुपात वर्षाव करतं तेव्हा अक्षरश: ब्रह्मांड आठवतं. उघड्यावर जर गारपीटीच्या मारत सापडला तर हेच 'जीवन' अक्षरश: जीवावर उठतं. हिमाची हलकी पाती अाणि गारांचे वजनदार गोळे यात एक साम्य जरूर आहे. त्यांचा नेमका आकार कोणता आणि तो त्यांना कसा मिळतो, हे एक न सुटलेलं कोडं आहे. साधारण गारा आपण पाहतो त्या सामान्य गोलाकार किंवा फार फार तर अंड्याच्या आकाराच्या असतात. वाटाण्यापेक्षा त्यांचं आकारमान सहसा मोठं नसतं. म्हणजेच साधारणत: दीड ते दोन सेंटिमीटर व्यासाच्या या गारांचं वजन असतं दहा बारा ग्रॅम. वरून ओबडधोबड दिसणाऱ्या या गाराची अंतर्गत रचना तशी आतल्या गाठीची नसते. हळुवारपणे एखादी गार उभी कापली तर आता एखाद्या कांद्याप्रमाणे एकाआड एक पापुद्र्यांचे थर दिसतील. एक पापुद्रा स्वच्छ, नितळ बर्फाचा, त्यावर एक पापुद्रा धुसर दुधी बर्फाचा, परत एक स्वच्छ नितळ पापुद्रा. असे एकावर एक थर. तरीही ९ जून १८६७ साली ४५०० मीटर उंचीवरच्या बेलाईक्लिच गावात झालेल्या गारांच्या वर्षावात प्रा. अाबिच यांना एक गार मिळाली होती. तिचा आकार चक्क एखाद्या तार्यासारखा किंवा हिऱ्यामाणकांच्या हारातलं मध्यवर्ती पदकच जणू असा होता. ज्यांनी या गारांचा साग्रसंगीत अभ्यास केला आहे, त्यांना शंकूच्या, लाटण्याच्या, इतरही अनेक आकारांच्या गारा पाहावयास मिळाल्या आहेत. आकारमानही चक्क पंधरा सेंटिमीटर व्यासपर्यंत आढळलं आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या मध्यवर्ती राज्यातील वॉटर या समर्पक नावाच्या गावात ६ जुलै १९२८ रोजी गारपीट झाली. त्यातल्या एका गारेचं वजन तब्बल साडेसहाशे ग्रॅम होतं. त्या गोलाकार गारेचा व्यास होता १५ सेंटीमीटर; पण उच्चांक वगैरेच्या गोष्टी करायच्या तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक नोंद आढळते. अमेरिकेतील तिथल्या कॉफव्हील नामक गावात तीन सप्टेंबर १९७० या दिवशी एक गार पडली होती. एकोणीस सेंटिमीटर व्यास आणि ४५ सेंटीमीटर परीघ असलेल्या या गारेचं वजन होतं साडेसातशे ग्रॅम. पाऊण किलो !*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहोप्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||तुटला हा संदेहभव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ ||म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरीसंसार तरावया संसार तरावया,प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ ||नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही,नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल,प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकता किंवा ऐक्य ही एखाद्याचे किंवा समाजाचे हीत ठेवून चांगले करण्यासाठी असेल तर त्याला सत्कर्म म्हणता येईल. पण, हीच एकता वाईट कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येत असतील तर ते दुष्कृत्य ठरत असते. आजपर्यंत ज्यांनी, ज्यांनी असे दुष्कर्म केले आहेत ते वंदनीय झाले नाही. म्हणून कोणाचे चांगले व्हावे किंवा चांगले झालेले बघून आनंद होत नसेल तर त्या आनंदात सहभागी होऊ नये.पण,त्याचे वाईट करण्याआधी एकदा विचार करून बघावा. कारण जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून घडत असते ती व्यक्ती, स्वंयम प्रकाशित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालहट्ट*एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ?’बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा.बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑंबादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होत ना ? मग आता माराची धमकी का देता ?बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?तात्पर्य - राजहट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट यापुढे भले भले माथा टेकतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment