✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Z2YQw5YVx/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 महत्वाच्या घटना -• १८९७ – गुघर फोर्टच्या लढाईत रणगडावर वीर बाजीप्रभु देशपांडे यांनी घातकी वाट अडवून शौर्य गाजवले.• इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे पहिले उड्डाण• १९३७ – अमेरिकन वैमानिक अमेलिया एअरहार्ट विमानासह बेपत्ता.• १९७२ – भारत सरकारने बँका राष्ट्रीयीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.• इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.🌹 जन्म :• १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.• १९०८ – थोर बंगाली वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस (Bose-Einstein statistics प्रसिद्ध).• १९५२ – विष्णुवर्धन, प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता.• १९८६ – लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री व गायक.🌹 मृत्यू :• १९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.• १९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.• १९९७ – जेम्स स्टुवर्ट, प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता.• २०१५ – मनोज कुमार पांडे, कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्यध्यापकास पत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांना दिली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले, महाराष्ट्राच्या 200 भाविकांसह 600 जण अडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशन - विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने, काँग्रेस नेते नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अहिल्यानगर : शिक्षकांनी आता अधिक समृद्ध होण्याची गरज, शिक्षणाधिकारी पाटील यांचे मत, नवोदय परीक्षा पूर्वतयारीबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु होणार दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद चौगुले, पुणे 👤 वसंत घोगरे पाटील 👤 जेजेराव सोनकांबळे👤 मारोती जाधव 👤 गोपाल पामसकर 👤 श्रीनिवास पुल्लावार 👤 शैलेश तरले👤 सतिश अवधूतवार 👤 विक्रांत दलाल, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*नेहमीच असतो मी तुमच्या घरी, तरी काहींनाच मी आवडतो, एकावर एक कपडे मी घालतो, तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते, सांगा पाहू मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती / पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी कोणत्या चार रंगाच्या कोडचा वापर करतात ?२) समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?३) मलेरिया तपासणीसाठी कोणती रक्त चाचणी केली जाते ?४) 'पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील पहिली महिला तबलजी कोण आहे ? *उत्तरे :-* १) रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन २) सामाजिक कल्याण साधणे ( चीन, रशिया ) ३) R.D.T. ४) पूरग्रस्त ५) अनुराधा पाल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नमन माझे गुरुराया |महाराजा दत्तात्रया || धृ ||तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती || १ ||माझ्या जीवीचे साकडेकोण निवारील कोडे कोडे || २ ||माझ्या अनुसूया सुतातुका म्हणे पाव आता || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि उन्ह जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान हेच सुख*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment