✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7UfZaw8K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🏛️ इतिहासातील घटना : • १८७९: इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विद्युत प्रकाश वापरून रस्त्यावर दिवे लावण्यात आले.• १९६३: अमेरिकन पोस्टल सर्व्हिसने ‘झिप कोड’ प्रणाली लागू केली.👤 जन्म :• १८८२: बिडी महाजन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १८८२: डॉ. बिधान चंद्र रॉय – भारताचे प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री.• १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोज गार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री• १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.• १९४७ - शरद यादव खासदार• १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते• १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर• १९६१: डायना स्पेन्सर – वेल्सची राजकुमारी, समाजसेविका आणि जागतिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व.⚰️ मृत्यू :-• १९७२: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – मराठी नाटककार व विनोदी लेखक.• १९९९: माधवराव सिंधिया – भारतीय राजकारणी व केंद्रीय मंत्री.🌍 जागतिक/राष्ट्रीय दिन• महाराष्ट्र कृषी दिन • राष्ट्रीय डॉक्टर दिन• जागतिक युएफओ दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलग दुसऱ्या वर्षी अमूल बनले भारतातील नंबर 1 फूड ब्रँड तर मदर डेअरीला दुसरे स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, केंद्रीय निरीक्षकांकडे भरला अर्ज, आज होणार घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सूट मिळणार, परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, भाजपकडून संविधानाची गळचेपी, समृद्धी महामार्गावरून नदी वाहते आहे, टाळ कुटत विरोधक सरकारविरोधात आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोलीत आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प, ​​​​​​​समायोजनाच्या मागणीसाठी आरोग्य अभियानाच्या ५५० कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'शब्दांचीच शस्त्रे' पुस्तकाचे प्रकाशन, महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये सामाजिक सुधारणावादाची बीजे - डॉ. राजन हर्षे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *​​​​​​​पाऊले चालती पंढरीची वाट, हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; मंत्री गोरेंनी धर्मपुरीत केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशिल शिक्षिका, हदगाव 👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड 👤 बाबासाहेब डोळे 👤 अशोक कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद 👤 व्यंकटेश बत्तूलवार, शिक्षक धर्माबाद 👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी 👤 विजय निलंगेकर, पत्रकार नांदेड 👤 सय्यद इलियास जुक्कलकर 👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद 👤 संजीव वाठोरे, शिक्षक, हदगांव 👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद 👤 भाग्यश्री चलाख, साहित्यिक 👤 गणेश गोंटलेवार 👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा 👤 बालाजी डाके पाटील 👤 नागोराव रायखोड 👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक धर्माबाद 👤 लक्ष्मण पाटील मुपडे, शिक्षक, धर्माबाद 👤 भूमन्ना आबूलकोड, LIC, धर्माबाद 👤 विशाल कान्हेरकर, साहित्यिक 👤 मारोती कांडले, शिक्षक, बिलोली 👤 डॉ. प्रा. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड 👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड 👤 मारोती आर भुसेवार 👤 विलास नंदुरकर 👤 दिगंबर नागलवाड 👤 बालाजी भगनुरे, शिक्षक, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 14*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पेन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचे उद्दिष्ट संवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री- पुरुष निर्माण करणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ?२) मधुमेह ( डायबेटीस ) हा कोणत्या कारणामुळे होतो ?३) भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?४) 'पाण्यात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) स्मृती मानधना २) इन्सुलिनची कमतरता ३) कमाल नफा मिळवणे ( उदा. जर्मनी, जपान, अमेरिका ) ४) जलचर ५) ॲडम स्मिथ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिंका का येतात ?* 📙हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||त्याने उपदेश केला, केला … स्वानंदाचा बोध दिला || १ ||पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुका माणसाच्याच हातून न कळत सुद्धा होत असतात. पण, त्या चुकांविषयी समजावून सांगण्याच्या काही पद्धती असतात. म्हणून कोणालाही का असेना त्याची चूक जर लक्षात आणून द्यायची असेल तर आपणही तेवढेच प्रामाणिक असले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या विषयी विचार केला जातो.पण, बोलणे वेगळे, वागणे वेगळे आणि विचार वेगळे असतील तर मात्र आपल्याकडे ही बघणारे अनेकजण असतात. म्हणून एकाकी कोणालाही चुकीचे ठरवू नये.बरेचदा असं होतं की एखाद्याला न वाचता चुकीचे ठरविल्याने त्याच्या स्वाभिमानाला किंवा त्याच्या चरित्राला डाग लागत असते. त्या वेळी भलेही तो माणूस बोलत नसेल पण, त्याचे मन जेव्हा दुखते तेच दुखावलेले मन अनेक पिढ्यांना सुखाने जगू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment