✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14FkunXXC3p/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्वपूर्ण घटना -• २०१८: अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.• २००७: अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.• १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.• १९८९: ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.• १९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.• १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.• १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.• १९६६: शिवसेना - पक्षाची स्थापना.• १९६१: कुवेत - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.• १९४९: नासकार - चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.• १९१२: अमेरिका - देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.• १९१०: जागतिक वडील दिन पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.• १८६५: अमेरिका - गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.• १८६२: अमेरिका - देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा🚩 जन्म - • १९७६: डेनिस क्रॉवले- फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक• १९७०: खा. राहुल गांधी - भारतीय राजकारणी• १९६४: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान• १९६२: आशिष विद्यार्थी - भारतीय अभिनते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार• १९५५: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (निधनः ३१ जुलै २०२२)• १९४७: सलमान रश्दी भारतात जन्मलेले ब्रिटिश-अमेरिकन लेखक - बुकर पुरस्कार• १९४७: सलमान रश्दी - एंग्लो-इंडियन लेखक - बुकर पुरस्कार• १९४५: आँगसान सू की - म्यानमारची राजकारणी• १९४१: वाक्लाव क्लाउस - चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष• १९३३: व्हिक्टर पटसायेव - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधनः २९ जून १९७१)• १९०६: अर्स्ट बोरिस चेन जर्मन-आयरिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधनः १२ ऑगस्ट १९७९)• १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य🌹 मृत्यू - • २०२०: विद्याबेन शाह भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)• २००८: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)• २०००: माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री• १९९८: रमेश मंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्मः ६ जानेवारी १९२५)• १९९६: कमलाबाई पाध्ये - समाजसेविका• १९९३: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)• १९८१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९३१)• १९६५: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे ससंशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)• १९५६ः थॉमस वॉटसन अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)• १९४९: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)• १९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड - मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक• १९२२: हिताचियाम टॅनियमों - १९वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: १९ जानेवारी १८७४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .........!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आषाढी एकादशी 2025 - संत तुकाराम महाराज पालखी देहूतून पंढरपूरकडे रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड :- बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे - संतपीठाचे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; पंढरपूर, आळंदीच्या संतपीठाला मदत करण्याची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार, पक्षाकडून सर्वाधिकार बहाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते त्यांच्या आवडीची कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात' - शिक्षणमंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सचे पुनरामगन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रताप भिसे, शिक्षक 👤 नारायण शिंगारे👤 नागेश कोसकेवार👤 खुशाल बोकडे👤 शंकर बेल्लूरवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *असं काय आहे ? ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते, पण कोणीही ते वाचू शकत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वाढदिवसाचा केक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य लहान आहे; पण त्याच्याजवळ असणारी माणुसकी मोठी आहे. - बॉर्न*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या साली संविधानात दुरुस्ती करून 'शिक्षण' या विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आला ?२) साइप्रस या देशाचा सर्वोच्च सन्मान कोणता ?३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण किती देशांचे सर्वोच्च सन्मान प्राप्त झाले आहेत ?४) 'नदीतील खोलगट भागातील खोल पाणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) आंतरराष्ट्रीय संपर्क भाषा म्हणून कोणत्या भाषेला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) सन १९७६ २) ग्रँड क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मंकीरिओस ३) २३ देश ४) डोह ५) इंग्रजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्तीनामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाईसुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या मानसिकतेत आणि विचारात बदल येतो तेव्हा, त्याला चांगले कधीच दिसत नाही. आणि समजून घेण्याची क्षमता नसते.अशा वागणूकीमुळे स्वतः ही तणावात जगणे व,समोरच्या व्यक्तीचेही जगणे कठीण होऊन जाते. म्हणून समोरची व्यक्ती जर काहीतरी चांगले करत असेल तर आधी त्या, व्यक्तीमधील चांगले,वाईट गुण बघण्याचा प्रयत्न करावा. व्यर्थ विचाराने एखाद्या व्यक्तीचा मार्ग अडवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment