✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cCQLzepG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 185 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १७७६ – अमेरिकेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य जाहीर केले. हा दिवस "अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन" म्हणून साजरा केला जातो.• १९७५ – पोर्तुगालने केप व्हर्डे या देशाला स्वातंत्र्य दिले.• २००५ – नासाच्या Deep Impact यानाने टेम्पेल-१ धूमकेतूपर्यंत पोहोचून त्यावर संशोधनासाठी यंत्र पाठवले.🎂 जन्म:• १८०७ – ज्यूसेपे गारिबाल्दी, इटालियन क्रांतीकारक.• १९०१ – विल्यम स्टीनबर्ग, जर्मन-अमेरिकन संगीत संचालक.• १९२७ – गिना लोब्रीजिदा, इटालियन अभिनेत्री.• १९५९ – काल्विन फिश, ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर व समालोचक.🕯️ मृत्यू:•|१९३४ – मेरी क्युरी, नोबेल पुरस्कार विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ.• १९६९ – अल्फ्रेड क्रेन्स, नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक.• २००३ – बेरी वाईट, प्रसिद्ध अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचं पत्र हरवलं*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ठोस प्रयत्न होणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एनक्रूमा मेमोरीयल पार्कला दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय, एचपीएलसी चाचणी सक्तीची करण्यासाठी नवी नियमावली येणार; विवाहपूर्व चाचणीचाही विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *​​​​​​​गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडली:​​​​​​, भंडारा जिल्ह्यात संततधार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एक वृक्ष आईच्या नावे, हिंगोलीत अखिल भारतीय अग्रवाल महासभेचा उपक्रम, १ हजार वृक्षलागवडीचा केला संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून, संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलचे धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा, भारत सर्वबाद 587*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, नांदेड 👤 प्रभाकर शेळके👤 श्याम उपरे 👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड 👤 बंडू आंबटकर, सामाजिक कार्यकर्ता, चांदुर 👤 कमलाकर जमदाडे, पत्रकार, बिलोली 👤 श्रीपाद वसंतराव जोशी, धर्माबाद👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक, मुंबई 👤 राजकुमार बिरादार 👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मंडलेकर 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 अविनाश खोकले 👤 प्रदीप यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 17*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हरतो,ओळखा पाहू मी कोण ....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बसचा वाहक / कंडक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशु कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या गुरुचे नाव काय ?२) रशियातील माउंट एल्ब्रस जिंकणारा जगातील सर्वात लहान गिर्यारोहक कोण बनला आहे ?३) महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली ?४) 'प्रेरणा देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणते उपकरण दाब मोजण्यासाठी वापरला जाते ? *उत्तरे :-* १) राजकुमार शर्मा २) तेगबीर सिंग, पंजाब ( ६ वर्षे ९ महिने ) ३) रवींद्र चव्हाण ४) प्रेरक ५) बॅरोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦖 *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?* 🦖 ************************** पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्‍यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ये हंसावरती बसून शारदे मायुरावरती बसून || धृ ||नेसून शुभ्र पातळ | गळा घालून मुक्ताफळकटी कंबरपट्टा कसून | शारदे मायुरावरती || १ ||हाती घेवूनीया वीणा | करी मंजुळ गयानाये सभेमध्ये बसून शारदे मायुरावरती || २ ||तुका म्हणे ब्रम्हानंदिनी | मम हृदयी विराजुनीदे अंतजीत बसून शारदे मायुरावरती || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपण कोणाचाही सल्ला न घेता मेहनतीने सर्व काही मिळविलेले असते. हे सर्व बघून, स्वतःहून कोणी आपल्याला तू असं कर, तसं कर मी म्हणतो त्या प्रमाणे वाग असे जर कोणी लाडीगोडी लावून म्हणत असतील तर आधी त्या माणसाला वाचायला शिकले पाहिजे. या प्रकारचे बोलणे तेव्हाच येते जेव्हा, आपला मार्ग सत्याच्या वाटेवर असतो. एकदा माणूस या प्रकारच्या बोलण्यात आला की, एवढ्या वर्षांची केलेली तपस्या, प्रामाणिकपणा, मेहनत, संघर्ष आणि स्वाभिमान नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून कोणावर विश्वास ठेवण्याआधी स्वतः वर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घुबड आणि टोळ*एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment