✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1APLdwFWFH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना :• १८७० – व्हॅटिकन कौन्सिलने पोपी इन्फॅलिबिलिटी (Papal Infallibility) या सिद्धांतास मान्यता दिली.• १९४७ – ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्य अधिनियम १९४७ (Indian Independence Act) संमत.• १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना• १९७६ – नाडाल (स्पेन) या प्रसिद्ध टेनिसपटूचा जन्म.• १९९२ – इंटरनॅशनल रेड क्रॉस ने नागरी युद्धातील अत्याचार थांबवण्याचे आवाहन केले.जन्म :-• १५५२ - रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.• १८११ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.• १८४८ - डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८९० - फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.• १९०९ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.• १९०९ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.• १९१८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.• १९२१ - जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.• १९४९ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.• १९५० - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.• १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.• १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री🌹मृत्यू :- • १६२३ - पोप ग्रेगोरी पंधरावा.• १८६३ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.• १८७२ - बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.• १८९२ - थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.• १९६९ - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.• १९९० - यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.• २०१२ - राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माझा (अ) प्रिय चष्मा 😎....?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा; 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या 25 एसटी बसमधून दर्यापूर आगारला 15 लाखांचे उत्पन्न, 4 हजार 708 भाविकांना घडवले पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निधी न मिळाल्याने कृषी विभागाची कामे रखडली, माणिकराव कोकाटेंची विधान परिषदेत कबुली; म्हणाले, 2023 च्या अधिवेशनात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मान्सूनची मराठवाड्यात विश्रांती, 10-12 दिवसांपासून पावसाचा खंड, पुढील 4 दिवसात हलक्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत घेतली आघाडी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड, साहित्यिक जळगाव 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 29*माझे शरीर आहे गोल-गोल**प्रत्येक स्त्रीचे रूप मी निखारते**मी बनले आहे काचेची**प्रत्येक रंगात मी भेटते**ओळखा पाहू मी आहे कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - अंडा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन तेथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ?२) 'राणीगंज' ही प्रसिद्ध दगडी कोळशाची खाण कोणत्या खोऱ्यात वसली आहे ?३) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा - २०२५ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?४) 'मोजता येणार नाही असे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'ग्लायकोमा' हा आजार शरीरामधील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) दामोदर खोरे ३) यानिक सिन्नर, इटली ४) असंख्य, अगणित ५) डोळा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 *************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला चिखलातून वर काढणारा असते त्या व्यक्तीचे नाव एक ना एक दिवस आदराने घेतले जाते.पण,त्यातच एखादी व्यक्ती, चिखलात गाडण्याचा प्रयत्न करते त्याला वरती काढणारा जवळ असेल तरी पण, त्याची मदत करू शकत नाही. म्हणून कधी, कधी आपण केलेले चांगले कार्यच आपली मदत करत असतात.शक्य झाले तर एखाद्याचे चांगले करण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीला याची जाणीव जरी नसली तरी आपण केलेल्या कार्याचा आपल्याला व्यक्तिगत समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपदेश*एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्हा त्याला माहिती झाले की, बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहे तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्या व्यक्तिच्या स्वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्हा त्याचे घर आले तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती नाराज झाला आणि म्हणू लागला,’’ तुम्ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते. त्याचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्यानंतरही तो ते न स्वीकारताच निघून गेला तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्यक्ती म्हणाली,’’ मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्हा बुद्ध म्हणाले,’’ त्या दशेनुसार आपले सामान आपल्याजवळच राहिले ना? त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपशब्द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्द आम्ही अस्वीकार केले. त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले.’’ मुख्य व्यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्याने क्षमा मागितली. तो त्यांचा शिष्य बनला. तात्पर्य - उग्रपणाने वागल्यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment