✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bku8jBJ6D/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना:• १७९९ – फ्रान्समध्ये Rosetta Stone मिळाली. याच्या मदतीने प्राचीन इजिप्शियन लिपीचे भाषांतर करणे शक्य झाले.• १९४८ – भारताचे पहिले विमानतळ – मुंबई येथे सांताक्रूझ विमानतळाचे उद्घाटन झाले.• २००६ – मुंबईतील लोकल ट्रेन बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींवर खटला सुरू झाला.🎂 जन्म:•;१६०६ – रेम्ब्रांट व्हॅन रिन, प्रसिद्ध डच चित्रकार.• १८५६ – जोसिया स्टँप, इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ.• १९०३ – कुमार गंधर्व, महान भारतीय शास्त्रीय गायक.• १९७६ – दीया मिर्झा, हिंदी चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका.🕯️ मृत्यू:• १९५७ – मनुबाई गांधी, महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची सून.• २०१२ – राजेश खन्ना, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार.🌍 महत्त्वाचे दिन 🌐 जागतिक युवा कौशल्य दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माझ्या स्वप्नातील गाव*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महात्मा फुले वाडा-भिडे वाडा स्मारक प्रकल्पाला वेग:15 दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वप्नातील घराची वाट खुलेल ! गृहनिर्माण स्वयं-पुनर्विकासासाठी ऐतिहासिक शिफारशी"*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *"आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 : सहकारात 'हरित' क्रांतीची सुरुवात !"*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया-राहुल यांना समन्स ? कोर्टाचा निर्णय राखून, पुढील सुनावणी २९ जुलैला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणात पुन्हा विलंब, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राला बळ ! ५० खाटांचं क्रिटिकल केअर युनिट उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स वरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा विजय, रवींद्र जडेजाची एकाकी झुंज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख, नायगाव 👤 विठ्ठल हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद 👤 गंगाधर v. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड 👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार, बिलोली 👤 संतोष इबितवार, येवती 👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 विष्णूराज कदम, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*मुकुट माझ्या डोक्यावर आहे**जांभळा झगा माझ्या अंगावर आहे**आहेत मला काटे जरा सांभाळून**चविष्ट आहे मी खातात मला भाजून**सांगा पाहू मी आहे तरी कोण…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पतंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिणामक कार्य हे नेहमीच पूर्वनियोजित ध्येयाच्या दिशेने जाणारे असावे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यातील पहिले अंगणवाडी केंद्र कोणते ?२) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?३) नायलॉनचा शोध कोणी लावला ?४) 'मूर्ती बनवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'क्रिकेटची पंढरी' असे कोणत्या क्रिकेट मैदानाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) धारणी, अमरावती व धारावी, मुंबई ( ०२ ऑक्टो. १९७५ ) २) इगा स्वियातेक, पोलंड ३) वॉलेस ह्युम कॅरोथर्स ४) मूर्तिकार ५) लॉर्ड्स, इंग्लंड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाकूड* 📙 अभ्यासाच्या पाटीपासून देवाच्या देव्हार्‍यापर्यंत, घराच्या वाशापासून ते दारापर्यंत, बसायच्या पाटापासून ते जेवणाच्या टेबलापर्यंत सर्वत्र लाकूड लागते. घरात लाकडी फर्निचरच असावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. सर्व लाकूड वनस्पतींपासून मिळवले जाते. सागवान, देवदार, शिसम ही चांगल्या प्रतीची जगभर गाजलेली लाकडे. त्यानंतरचा क्रम ओक, पाइनचा. साध्या साध्या कामासाठी निलगिरी, आंबा, कडूनिंब यांचे लाकूड वापरले जाते. काही वनस्पती झपाट्याने वाढतात; पण उत्तम प्रतीचे लाकूड देणाऱ्या वनस्पती मात्र फार सावकाश वाढतात. चांगले लाकूड मिळण्यासाठी किमान पंधरा ते पन्नास वर्षे वाट पहावी लागते. सुबाभूळ, निलगिरी, आंबा, कडुनिंब ही झाडे जेमतेम चार पाच वर्षांत दहा फुटांपेक्षा जास्त उंच वाढतात; पण त्यांचे लाकूड वासे या स्वरूपातच वापरले जाते. सागवान, शिसम, देवदार, ओक यांची वाढ खूपच सावकाश असते. पण त्यांचे मिळणारे लाकूड घरातील सामान बनवण्यासाठी वापरता येते. ते टिकाऊ असते. त्याला पाहिजे तो आकार छिनून, कातून दिला की, कित्येक वर्षे ते तसेच राहते.लाकूड ओले असताना वापरले, तर ते जसजसे वाळत जाईल, तसतसा त्याचा आकार बदलू शकतो, त्याला चिरा पडू शकतात, बाक येऊ शकतो. यासाठी तोडलेले लाकूड पूर्ण वाळेपर्यंत तसेच ठेवण्याची पद्धत आहे. ही साठवणूक करताना नेहमीच अडचणी असतात. बंदिस्त जागा, पाऊस पाणी नको, वाळवीपासून दूर असे वाळवावे लागते. काही ठिकाणी सतत गरम हवेचे झोत सोडूनही ते वाळवले जाते. पण ही पद्धत भारतात वापरली जात नाही. या सार्‍या प्रकाराला म्हणजे लाकूड वाळवण्याला 'सिझनिंग' वा लाकूड जुने होऊ देणे म्हटले जाते.लाकडाची साल नेहमीच काढली जाते. आतल्या बाजूला झाडाच्या बुंध्यावर मध्ये थेट मुळापासून वर जाणाऱ्या गोलाकार असंख्य केशवाहिन्या वाहत असतात. लाकडावर दिसणारे लांबुडके छाप (ग्रेन्स) म्हणजे याच रेषा. त्यामुळेच लाकडांचे सौंदर्य वाढते. या रेषा जितक्या सलग, समान तितके लाकूड चांगले मानले जाते. जेथे या रेषा तुटून गोलाकार गाठ बनते वा त्यांचा सलगपणा तुटतो, तेथे लाकूड तुटण्याची शक्यता असते. असा भाग सहसा जास्त वजन पडेल, अशा भागी ठेवला जात नाही. लाकूड कापायला यांत्रिक करवत वापरली जाते. त्यामुळे सलग एकाच पातळीत लाकूड कापले जाते.पूर्वीच्या काळी जंगलात लाकूड तोडल्यावर त्यांचे ओंडके हत्तीकडून वाहून गावापर्यंत आणले जात. अलीकडे त्या जागीच सॅा मिलची म्हणजे लाकडाचे योग्य मापाचे ओंडके करण्याची व्यवस्था केली जाते. नंतरची वाहतूक ट्रकद्वारे होऊ शकते. हल्ली जंगलतोड कमी करण्यासाठी घर बांधणीत लाकूड वापरू नये, असा सरकारी फतवा निघत आहे. लाकडाच्या ओंडक्यांना पाहिजे त्या आकारात कापून त्यांच्या वस्तू बनवणे हे क्लिष्ट असते, महाग पडते व पाहिजे त्या मापाचे ओंडके व फळ्या मिळणे हे शक्यही होत नाही. यावर उपाय म्हणून प्लायवूड, विनियर, चिपवुड, ब्लॉकबोर्ड, मायका बोर्ड असे प्रकार वापरत आले. आज आपण सर्व प्रकारचे लाकडी सामान त्यातूनच बनवतो. दुय्यम प्रतीचे लाकूड, लाकडाचा भुस्सा, उत्तम प्रतीचे लाकूड, पण त्याच्या अत्यंत पातळ चकत्या या सर्वांचा वापर करून वरील प्रकार बनतात.लाकडाच्या विविध आकारांच्या चकत्या एकमेकांना अत्यंत घट्ट बसवणाऱ्या डिंकासारख्या रेझिन्सचा वापर करून सलग पृष्ठभाग बनवला जातो. गरजेप्रमाणे याचे आकार कापून चौरस बनवतात. प्रचंड दाबाखाली अन्य प्रक्रियाही केल्या जातात. पाण्याचा, वाफेचा, वाळवीचा, क्षारांचा परिणाम होऊ नये, अशी रसायने वापरून तयार केलेले हे कृत्रिम बोर्ड्स आज जगभर वापरले जातात.या बोर्डचा उपयोग म्हणजे उपयुक्त, गरजेचा आकार उपलब्ध असतो. उत्पन्न होणारे सर्व लाकूड त्यांच्या निर्मितीला वापरले जाते. वस्तू बनवणे फार सोपे असल्याने कामाचा वेग खूपच वाढतो. शिवाय थोडाफार बाक देणे (उदाहरणार्थ, खुर्चीची पाठ) पॉलिश करणे, रंग देणे यांसाठी या बोर्डाचा वापर सोयीचा ठरतो.झाडांचे वय हे कापलेल्या बुंध्यातील गोलाकार वर्तुळावरून सांगता येते. दरवर्षी एक वर्तुळ वाढत जाते, असा सर्वसाधारण संकेत आहे. फार मोठ्या वृक्षाच्या वर्तुळातील अंतरावरून या वर्षीचा पावसाळा वा दुष्काळ यांचाही वनस्पतीशास्त्रज्ञांना बोध होऊ शकतो. लाकूड वापरण्यासाठी मात्र बुंधा नेहमीच लांबीमध्ये वापरला जातो.स्वयंपाकघरातील हत्यारे म्हणजे सुरी, विळा नेहमीच लाकडी पृष्ठभागावर वापरली जाते. एवढेच काय, खाटीकही लाकडाचा मोठा बुंधाच त्याच्या कामाला वापरतो व मटण छाटतो. सर्वात गमतीचा भाग म्हणजे तंबाखू ओडायचा पाईप लाकडी असतो. जळती तंबाखू या लाकडी पाइपमध्ये ठेवूनच तिचा धूर ओढला जातो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||नरहरी सोनार हरीचा दासभजन करितो रात्रंदिवस || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुख्य गोष्टीकडे लक्ष द्यावं*राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहरामोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment