✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15wS3UnUYH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_जागतिक चिमणी दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील ७९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६: ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७: महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६: अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟠 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७७: गायत्री जोशी -- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९७४: डॉ. शील बागडे -- कवयित्री**१९७२: संजय दयाराम तिजारे -- कवी* *१९६६: प्रवीण दशरथ बांदेकर -- मराठी साहित्यिक**१९६६: अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८: अशोक लोटणकर -- प्रसिद्ध ललित कथाकार, कवी, समीक्षक**१९५५: दया मित्रगोत्री -- प्रसिद्ध कवयित्री**१९५२: आनंद अमृतराज -- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१: मदनलाल उधौराम शर्मा -- माजी क्रिकेटपटू**१९५१: प्रा. विजय जनार्दन कविमंडन -- प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक**१९५०: डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७: प्रा. वसंत केशव पाटील -- ललित लेखक, कथाकार, कवी, गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९: सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक (मृत्यू: ९ जानेवारी २००९ )**१९२४: ईश्‍वर बगाजी देशमुख -- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ६ फेब्रुवारी २००६ )**१९२१: पी. सी. अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू: १० ऑगस्ट २०११ )**१९२०: वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू: ३१ जानेवारी २००० )**१९११: माधव मनोहर -- समीक्षक, नाटककार, लेखक (मृत्यू: १६ मे, १९९४ )**१९०८: सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू: २१ मार्च १९८५ )**१८२८: हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू: २३ मे १९०६ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🟠••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे -- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध (जन्म: ३ सप्टेंबर १९२३ )**२०१४: खुशवंत सिंग -- भारतीय लेखक, वकील, पत्रकार (जन्म: २ फेब्रुवारी १९१५ )**१९५६: बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म: १ डिसेंबर १९०९ )**१९२५: लॉर्ड कर्झन– ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म: ११ जानेवारी १८५९ )**१७२७: सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म: २५ डिसेंबर १६४२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक चिमणी दिवस* त्यानिमित्ताने एक रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले ; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, बहुपर्यायीऐवजी विस्तृत उत्तरं लिहावी लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमेझॉनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 14000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर हिंसाचार प्रकरणाचा म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या आवळल्या, 500 जणांचा जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप; महिला पोलिसांवरही हात टाकण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *व्युमो ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो पुण्यातील हिंजवडीत जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधीमंडळातील कामकाज चुकीच्या पद्धतीनं! सभापती राम शिंदेंसह तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएलच्या मोक्याच्या क्षणी बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती आता समोर येत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश चिंतावार, शिक्षक नेते, नांदेड 👤 गंगाधर अडकीने, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, नांदेड 👤 रामदयाल राऊत 👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड 👤 गणेश गुरुपवार, नांदेड 👤 रमेश कोंडेकर 👤 सर्जेराव ढगे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 21*एका बाटलीत रंग दोन**बाहेरून कडक आतून मऊ**संडे असो वा असो मंडे**प्रत्येकाला आवडतो हा खाऊ**याचे उत्तर सांगा पाहू ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - गवती चहा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील यश तिने आज काय प्राप्त केले यावर नव्हे , तर त्यासाठी किती प्रमाणात अडथळे ओलांडले, यावरून ठरते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक चिमणी दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?३) जगात चिमण्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत ?४) चिमणी या पक्ष्याला इंग्रजी व हिंदीमध्ये काय म्हणतात ?५) आपण जागतिक चिमणी दिवस का साजरा करतो ? *उत्तरे :-* १) २० मार्च २) २० मार्च २०१० ३) ४३ जाती ४) House Sparrow व गौरैया ५) चिमण्यांचे संवर्धन व संरक्षण करणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *साखर* 📙****************साखर शुद्ध स्वरुपात पांढर्‍या दाणेदार रुपात वापरली जाणे बरेच अलिकडचे. साखरेचे विविध रासायनिक प्रकार असतात. त्यांचे फ्रुक्टोज फळात, ग्लुकोज पिष्टमय पदार्थात, लॅक्टोज दुधात, माल्टोज बार्लीत असते. आपण वापरतो त्या साखरेत शंभर टक्के सुक्रोज असते. साखर ऊस (sugarcane), बीट (sugarbeet) यापासुन तयार केली जाते. भारतात मात्र ऊसापासुनच साखर बनते. साखरेचे स्वरुप दृश्य स्वरुपात थोडेफार बदलते असु शकते. पिठी साखर, साखरेचे चौकोनी ठोकळे, आयसिंगसाठीची साखर, ब्राऊन रंगाची साखर असे प्रकार वापरले जातात. पण मुलत: ही सारी साखरच असते. साखर खाऊन तात्काळ कॅलरीज मिळतात. पण त्यातुन शरीराची पोषण करणारी द्रव्ये म्हणजे प्रथिने आजिबात मिळत नाहीत. यामुळे जास्त साखर खाल्ली तर अनुत्पादक व निरुपयोगी कॅलरी पोटात जात राहतात. जास्त साखर खाऊन वजन वाढत जाण्याची शक्यता यातुनच उद्भवते. गोड सारेच चांगले लागते, तरीही ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.साखर बनवणे दिसायला सोपे. पण प्रत्यक्षात कटकटीचे आहे. कारण व्यापारी तत्वावर साखर बनवायला लागणारी यंत्रसामग्री फार मोठी असते व त्यासाठी भांडवलही भरपुर लागते. या उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याच प्रमाणात उपलब्ध असणेही महत्वाचे. म्हणजे कारखान्याच्या क्षेत्रातच उसाची पुरेशी लागवड झालेली असणे आवश्यक ठरते. तसेच येथुन उत्पादन होणारा ऊसाचा पुरवठा एकाचवेळी न होता सलग काही महिने होणेही महत्वाचे राहते. साखर तयार करताना ऊस छाटुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले जातात. बीट वापरले तर त्यांचे काप केले जावुन पाण्यात भिजवुन मग त्यांचा लगदा बनतो. ऊसाचा रस वा बीटाचा लगदा हा नंतर उकळला जातो. त्यात अन्य रसायने मिसळुन त्याचे ब्लिचिंग केले जाते. त्याच वेळी तपकिरी काळपट मळी एका बाजुला व साखरेचा पाक दुसर्‍या बाजुला काढला जातो. विशिष्ट आकाराच्या जाळीतुन हा पाक गाळला जातानाच वाळतो व साखरेचे दाणे बनतात. यांत्रिक पद्धतीने लगेच पोती भरुन हवाबंद केली जातात. भारत, माॅरिशस, क्युबा हे साखर उत्पादनातील प्रमुख देश आहेत. ब्राझिलचाही नंबर खुपच वर येतो. युरोप व ब्रिटनमध्ये बीटापासुन साखर बनवली जाते. पण बरिचशी साखर आयात करणेच सोयीची मानली जाते. मळीपासुन अल्कोहोल बनवता येतो. शिवाय काही रसायनेही त्यापासुन बनु शकतात. केवळ मळी जर तशीच नष्ट करायचे ठरवले ते कठीण असते. झपाट्याने बुरशी धरणारा व अत्यंत वाईट वास येणारा असा हा पदार्थ असल्याने त्याची विल्हेवाट लावणे हा अनेक साखर कारखान्यांपुढे मोठाच प्रश्न असतो. पण ही पुरक उत्पादने निर्माण केली तर खुप प्रश्न व नफाही वाढतो. साखरेचा भारतातील घरगुती दरडोई वापर आजही अन्य उत्पादनांच्या मानाने कमीच आहे. सारे भारतीय घरी वापरतात ती साखर व बिस्किटे, केक्स, आईस्क्रीम, मिठाई, पेढे यांसाठी वापरली जाणारी साखर यात जवळपास दुपटीचा फरक पडतो. एक चमचाभर साखरेतुन किती कॅलरीज आपल्या पोटात जातात माहित आहे ? पस्तिस ते चाळीस कॅलरीज आपण त्यावेळी खातो. म्हणजे तीन चमचे साखर सहज तोंडात टाकणारी व्यक्ती एका पोळीचा ऐवज खाऊन बसते. अशा साखर खाण्यानेच हल्ली लोकांचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते. असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत‌ ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *..... ट्रेन.......*पिंकी खूप गोड मुलगी आहे. पिंकी इयत्ता दुसरीत शिकते. एके दिवशी त्याला त्याच्या पुस्तकात ट्रेन दिसली. त्याला त्याचा रेल्वे प्रवास आठवला, जो त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पालकांसोबत केला होता. पिंकीने चौक वाढवला आणि मग काय, भिंतीवर ट्रेनचं इंजिन लावलं . त्यात पहिला बॉक्स जोडला गेला, दुसरा बॉक्स जोडला गेला, जोडलेले असताना अनेक बॉक्स जोडले गेले. चौक संपल्यावर पिंकी उठली आणि पाहिली की वर्गाच्या अर्ध्या भिंतीवर ट्रेन उभी होती. मग काय झालं – ट्रेन दिल्लीला गेली, मुंबईला गेली, अमेरिकेला गेली, आजीच्या घरी गेली आणि आजोबांच्या घरीही गेली.नैतिक शिक्षण – मुलांचे मनोबल वाढवा उद्याचे भविष्य आजपासून घडवूया.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment