✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18qXRqsk7A/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟥 *_जागतिक ग्राहक दिन_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५: symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९: महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९: हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन**१९०६: रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१: मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक, संपादक* *१९९३: आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८४: डॉ. दत्ता घोलप -- लेखक, संपादक**१९८३: धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३: हनी सिंग -- गायक, गीतकार आणि अभिनेता**१९८२: ऋतुजा देशमुख -- अभिनेत्री* *१९८१: स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०: प्रा. डॉ सारीपुत्र तुपेरे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७९: डॉ. पोर्णिमा शिरिष कोल्हे -- लेखिका* *१९७९: प्रा. प्रज्ञा मनिष पंडित --लेखिका, कवयित्री, समुपदेशक**१९७८: बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९७५: संगिता धनराज बोरसे -- कवयित्री**१९७५: उदल हंजारी राठोड -- कवी**१९७२: विलास भीमराव कोळी - लेखक**१९७०: डॉ. मच्छिंद्र चोरमारे --कवी, समीक्षक* *१९६५: डॉ. अंजुषा अनिल पाटील -- लेखिका* *१९६५: पोपटराव काळे -- प्रसिद्ध काजवाकार तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१: गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०: दशरथपंत नारायणराव अतकरी -- कवी* *१९५४: ईला अरुण -- अभिनेत्री, टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५१: सुरेखा प्रकाश हरसुलकर -- लेखिका, अनुवादक**१९५१: प्रा. डॉ. प्रकाश पांडुरंग गोसावी -- प्रसिद्ध बालसाहित्यिक**१९५०: डॉ. अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विरभद्र धोंगडे -- लेखक, कवी**१९४४: पुंडलिक भाऊराव गवांदे -- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५: लक्ष्मण त्र्य. जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ संपादक, लेखक* *१९३४: कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००६ )**१९३४: गजमल माळी -- लेखक,कवी व नाटककार (मृत्यू: २८ फेब्रुवारी २०१७ )**१९२३: दत्ता खानविलकर -- ज्येष्ठ फौजदारी वकील, लेखक तथा माजी मंत्री (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०१४ )**१९२३: मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००७ )**१९१५: त्र्यंबक गोविंद माईणकर -- भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू: १७ सप्टेंबर १९८१ )**१९१५: ह. वि. पळणीटकर -- विदर्भातील एक नाटककार, कवी व लघुकथालेखक (मृत्यू: २८ जानेवारी १९९४ )**१९०१: विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू: २४ मे १९९९ )**१८६८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू: २० फेब्रुवारी १९५८ )**१८६०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)**१७६७: अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जून १८४५ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: इम्तियाज खान -- भारतीय अभिनेता(जन्म: १५ ऑक्टोबर १९४२ )**२०१९: श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर -- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म: २७ मार्च)* *२०१६: नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक (जन्म: १६ एप्रिल १९२२ )**२०१६: शंकर भाऊ साठे -- कादंबरीकार आणि शाहीर(जन्म: १६ ऑक्टोबर १९२५ )**२०१५: नारायणभाई महादेवभाई देसाई -- गांधी कथाकार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)**२०१५: मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९५२ )**२०१४: सुधीर मोघे -- मराठी कवी, गीतकार व संगीतकार (जन्म: ८ फेब्रुवारी १९३९ )**२०१३: कल्लम अंजी रेड्डी- फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९३९ )**२००९: वर्मा मलिक -- चित्रपट गीतकार (जन्म: १३ एप्रिल १९२५ )* *१९९२: डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म: १९२५)**१९३७: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म: १० डिसेंबर १८९२ )**१८६५: गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक (जन्म: १८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मृत्यू : एक अटळ सत्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केली चर्चा, मुंबईत आयआयसीटी उभारणार - फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डिजिटल परिवर्तन पुरस्कार 2025 साठी भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत आयुष्मान योजना लागू होईल, 18 मार्चला लाँचिंग शक्य, जेपी नड्डा उद्घाटन करतील; 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोने - चांदीचा दर वाढला असून सोनं ९० पार झालं असून चांदीचा दर लाख रुपयांवर गेला आहे. मागील दोन महिन्यात सोन्याचा दर १० हजारांनी वाढला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : पुणे जिल्ह्यात आजपासून दोन रुपयांनी महागणार दूध, गायीचे ५८ ₹ तर म्हशीचे दूध ७४ ₹ लिटर दराने मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे काल पहाटे झाले निधन, मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रायपूरमध्ये युवराज सिंगने मारले 7 षटकार, सचिनच्या बॅटनेही केली चांगली कामगिरी, इंडिया मास्टर्स संघ ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत पोहोचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 विठ्ठल पावडे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 वैभव खांडेकर 👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 17*स्त्रिया पुजती पौणिर्मेला**प्राणवायूचा अखंड झरा**साधूसमान लांब दाढी**बहुपयोगी आहे हा खरा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - लहान आतडे••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यश म्हणजे दहा टक्के गुणवत्ता व नव्वद टक्के कष्ट यांचा सुंदर मिलाफ आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता ?२) 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोणी साकारली ?३) EMI चा full form काय आहे ?४) 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते ? *उत्तरे :-* १) जमसांडे, सिंधुदुर्ग २) अक्षय खन्ना ३) Equated Monthly Installment ४) १५ मार्च ५) थायमिन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥ तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥ मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥ करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥ नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण, पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो  तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?”  त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment