✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/161GTyM5Et/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☸️ *_जागतिक संगीतोपचार दिन_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील ८५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना**२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* ☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८५: केदार महादेव जाधव -- भारतीय माजी क्रिकेटपटू**१९८५: प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९८२: डॉ. क्षितिज कुलकर्णी -- नाट्य लेखक**१९६५: प्रकाश राज -- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७: सुनील शिवाजी माने -- कवी* *१९५७: हृदय बलवंत चक्रधर -- प्रसिद्ध कवी**१९५६: उमेश कदम -- कादंबरीकार**१९५५: जयराज मोरेश्वर फाटक -- प्रशासकीय सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी**१९५४: अॅड. विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी, लेखक* *१९४७: अजित सिंग वर्मन -- भारतीय चित्रपट संगीतकार (मृत्यू: १५ डिसेंबर २०१६ )**१९४३: प्रा. डॉ. यशवंत मनोहर -- सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक, विचारवंत**१९३९: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०२० )**१९०९: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००० )**१९०७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७ )**१८७५: सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५ )**१८७४: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू: २९ जानेवारी १९६३ )* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. विमलताई गाडेकर -- विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म: २ फेब्रुवारी १९५१)**२०२०: सतीश गुजराल -- भारतीय चित्रकार, भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे धाकटे बंधू (मृत्यू: २५ डिसेंबर १९२५ )* *२०१२: माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४० )**२०१०: अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म: २२ डिसेंबर १९४१ )**२००८: बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३० )**२००३: हरेन पंड्या -- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२ )**१९९७: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर १९१० )**१९९६: के. के. हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११ )**१९९६: डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२ )**१८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म: १६ डिसेंबर १७७० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे असंच का घडतं .......?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर, नियोजन सुरु, संघ कार्यालयासह दीक्षाभूमीला भेट देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परिवहन विभागाचा मोठा निर्णय! आता सर्व व्यावसायिक वाहनांवर 'मराठी भाषेत' सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ * 1 एप्रिल 2025 पासून भारतात लागू होणाऱ्या नवीन बँकिंग नियमांमुळे क्रेडिट कार्डवरील भत्ते, एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यातील नियमांवर परिणाम होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : बचतगटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करावे, महिला बालविकासचेविभागीय उपायुक्तपगारे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण पावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - पंजाब किंगचा गुजरात टायटनवर 11 धावानी विजय, कर्णधार श्रेयस अय्यर ची तुफानी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद👤 राजेश जेठेवाड, साहित्यिक, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 26*याचे दुसरे नाव रवी**देतो चोहीकडे प्रकाश**उर्जा व उष्णतेचा स्त्रोत**त्याचे घर आहे आकाश*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - इंद्रधनुष्य Rainbow••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचे उद्दिष्ट संवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री-पुरुष निर्माण करणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'संविधानाचे यश, पावित्र्य, ते संविधान राबविणाऱ्यांच्या निती आणि नियतीवर अवलंबून असते', असे कोण म्हणाले होते ?२) 'शुद्धबीजा पोटी, फळे रसाळ गोमटी', असे कोणी म्हटले होते ?३) अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म कोठे झाला ?४) 'आपल्या लहरीप्रमाणे वागणारा' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा ?५) वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सनुसार जगातील सर्वात दुःखी देश कोणता ?*उत्तरे :-* १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) संत तुकाराम महाराज ३) कर्नाल, हरियाणा ४) स्वच्छंदी ५) अफगाणिस्तान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बॅटरीसेल / घट* 📙 टॉर्च किंवा बॅटरीचे नावीन्य सध्यातरी कोणालाच वाटत नाही, किंबहुना प्रत्येक घरातून दिवे गेले, तर रात्रीच्या वेळी वापरासाठी एक बॅटरी हजर असतेच. याच कारणाने बॅटरी तयार करणारी मोठी कंपनी स्वतःला 'एव्हरेडी' म्हणवून घेते. पण याखेरीजही बॅटरीसेल्सचा किंवा ड्रायसेल्सचा उपयोग आपल्या जीवनात नेहमीच होत असतो. ट्रान्झिस्टर रेडिओ असो, टेपरेकॉर्डर असो वा कोणतेही पोर्टेबल म्हणजे इकडून तिकडे सहज नेता येण्यायोगे मशीन असो, ते सहसा या ड्रायसेल्सवरच चालते. एखादा छोटासा पेन सेल असेल वा चार ते सहा मोठे सेल्स असतील; पण आपल्या जीवनातील काही जरुरीच्या क्षणी तेच उपयोगी पडतात. विद्युतऊर्जा विविध प्रकारे तयार केली जाते व साठवली जाते. विद्युतघट हा प्रकार मुख्यत: रासायनिक ऊर्जेच्या निर्मितीतुन तयार केला गेला. व्होल्टानी तयार केलेला विद्युतघट हा अवजड, हलवण्यास कठीण होता. त्याच्याच पुढील आवृत्त्या डॅनियल, लेक्लांशे यांनी काढल्या. याचाच सुटसुटीत अवतार म्हणजे ड्राय बॅटरीसेल किंवा निर्द्रव विद्युतघट.या घटात जस्ताचे बाह्यावरण ऋण ध्रुवाचे काम करते. यात मध्यभागी जस्ताशी संपर्क न येता कार्बनची कांडी ठेवलेली असते. ही घन ध्रुवाचे काम करते. सर्व घट अमोनियम व झिंक क्लोराइडच्या विशिष्ट मिश्रणाने भरला जातो. कार्बनकांडीच्या जवळचा भाग ग्राफाईट व मॅगनीज डायऑक्साइडच्या मिश्रणाने झाकला जातो. तोंड सील केल्यावर घटत्या तयार होतो. हे झाले प्राथमिक वर्णन. अलीकडच्या घटात यापेक्षा अधिक विविध परिणामकारी संयुगेही वापरली जातात. पण त्याबद्दल प्रत्येक कंपनी गुप्तता पाळते. या प्रकारचे घट वापरायला सुरुवात झाली, तेव्हा ते पावसाळ्यात चिघळत असत. हल्लीचे घट संपूर्णपणे पॉलिमर कोटेड असतात. फक्त ऋण व घन भाराच्या जागा मोकळ्या सोडलेल्या असतात. बॅटरीच्या वापरासाठी, ट्रान्झिस्टरसाठी, एखाद्या यांत्रिक मोटारच्या वापरासाठी विविध प्रकारचे ड्रायसेल्स तयार करण्यातही काही कंपन्यांनी आघाडी मिळविली आहे. काही कंपन्यांनी तर काही फेरबदल सेलमध्ये करून हेच ड्रायसेल्स पुन्हा सक्षम करण्याची (Recharge) यंत्रणाही सज्ज केली आहे. सध्या विजेवर वापरल्या जाणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींचा वापर आपण करतो. लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, डिजिटल कॅमेरा, कॅल्क्युलेटर यांसाठी पुन्हा पुन्हा चार्ज करता येणारे विविध आकारांचे, प्रकारांचे व क्षमतांचे सेल वापरात आले आहेत. आपल्या देशात सध्या उत्तम प्रकारचे बॅटरीसेल्स सहज उपलब्ध आहेत. वापरून झाल्यावर ड्रायबॅटरीसेल निरुपयोगी होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥ तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥ मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥ करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥ नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment