✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 मार्च 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/XHcodnP6pdn4xQJ5/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_जागतिक रंगभूमी दिन_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर**१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार' प्रदान**१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के.एल.एम.या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली.**१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.**१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली* 🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६: संतोष कुळे --- लेखक**१९६८: डॉ. वसु भारद्वाज -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक* *१९६६: अलका श्याम माईणकर -- कवयित्री* *१९५६: श्याम बळीराम आस्करकर -- लेखक, नाट्य कलावंत* *१९५२: सुरेश चुनीलाल थोरात -- कवी, लेखक* *१९५१: अरूण गंगाधर कोर्डे -- कथा लेखक**१९५१: भारत जगन्नाथ सासणे -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, नाटककार व ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष**१९४८: विनया खडपेकर-- 'राजहंस प्रकाशन'च्या संपादिका, प्रसिद्ध लेखिका* *१९४५: ॲड.शिवाजीराव मोघे -- माजी मंत्री* *१९४२: सीमा देव -- मराठी अभिनेत्री**१९४१: ऑस्कर फर्नांडिस -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: १३ सप्टेंबर २०२१)* *१९३९: डॉ. मीना सुधाकर प्रभू -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: १ मार्च २०२५)**१९३२: सुधाकर काशिनाथ भालेराव -- प्रसिद्ध लेखक(मृत्यू: १४ जून २०१४)**१९२९: पंडित मनोहर चिमोटे -- ख्यातनाम संवादिनी वादक (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ )**१९२७: अब्दुल लतीफ खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि वादक(मृत्यू: २३ एप्रिल २००३ )* *१९२७: डॉ. नारायण कृष्णराव शनवारे -- नाट्यलेखन,संवेदनशील मनाचे लेखक (मृत्यू: ८ जून २००६ )**१९२३: धर्मपाल गुलाटी -- मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक(मृत्यू: ३ डिसेंबर २०२० )**१९२३: मंगेश भगवंत पदकी -- कवी, कथाकार(मृत्यू: १८ ऑक्टोबर १९९९ )**१९०५: जनार्दन लक्ष्मण रानडे -- भावगीत गायक(मृत्यू: १९ डिसेंबर १९९८ )**१९०१: कार्ल बार्क्स- हास्यचित्रकार (मृत्यू: २५ ऑगस्ट २००० )**१८४५: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३ )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे-- मराठीतील लेखक, हेसंशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत(जन्म: २८ जून १९३७ )* *२०१८: डॉ. मधुकर केशव ढवळीकर -- पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ (जन्म:१६ मे १९३० )**२००८: पंढरीनाथ गंगाधर नागेशकर -- प्रसिद्ध तबलावादक (जन्म: १६ मार्च १९१३ )**२०००: प्रिया राजवंश -- भारतीय अभिनेत्री (जन्म: ३० डिसेंबर १९३६ )**१९९७: भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक( जन्म: १० जुलै १९१० )**१९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक,गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य (जन्म: १५ जानेवारी १९३१ )**१९६८: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (जन्म: ९ मार्च १९३४ )**१९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ,’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.(जन्म: २० डिसेंबर १८९० )**१९५२: काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ११ जून १८९४ )**१८९८: सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात घेऊ या काळजी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवैध वृक्षतोड करणाऱ्याकडून एक लाख रुपयाचा दंड वसुल करावा - सर्वोच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उद्योगनगरीत २६ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, १८ मुन्ना भाईंवर गुन्हे दाखल, उल्हासनगर पालिकेची धडक मोहिम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे : तुळशीबागेत श्रीरामनवमी उत्सवाचे २६४ वे वर्ष, ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साईभक्तांसाठी एक मोठी बातमी ! आता साक्षात साईबाबांच्या मूळ चरण पादुका देशभरातील विविध राज्यांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - तमिळ चित्रपट दिग्दर्शक भारतीराजा यांचा मुलगा अभिनेता मनोज यांचं वयाच्या ४८व्या वर्षी मंगळवारी चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्युझिलंने 60 चेंडूत संपवला सामना, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, 4-1 ने गमाविली मालिका.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गायत्री यनगंदलवार, शिक्षिका, धर्माबाद👤 सुनील खंडेलवाल, संपादक👤 धनंजय मांजरमकर👤 जगदीश्वर भूमन्ना जंगलोड👤 प्रमोद मोहिते👤 साईनाथ कल्याणकर, धर्माबाद👤 वैदेही चिलका*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*वर फेेकलेली वस्तू नेहमी येते खाली**जगप्रसिद्ध आहे हा न्यूटनचा शोध**काय म्हणतात सांगा मुलांनो**झाला का तुम्हाला बोध ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - सूर्य ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना अन्यायाकडे डोळेझाक करायची सवय असते त्यांना प्रकाशाची कूस कुरवाळता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात ट्युलिप उद्यान कोठे आहे ?२) अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कोण ?३) महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध म्हणून कोणाची निवड झाली ?४) 'आग विझवणारे यंत्र' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगात सर्वाधिक सैन्यबळ कोणत्या देशाकडे आहे ? *उत्तरे :-* १) श्रीनगर २) कल्पना चावला ३) अण्णा बनसोडे ४) अग्निशामक यंत्र ५) व्हिएतनाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बधिरीकरण, भूलशास्त्र*📙 मज्जातंतूंद्वारे वेदना मेंदूपर्यंत पोचवणे जेव्हा थांबवले जाते, तेव्हा त्या प्रक्रियेला बधिरीकरण म्हणतात. एखादे ऑपरेशन करायचे असेल की, रुग्णाला डॉक्टर भूल देतात. त्यामुळे त्याला वेदना समजेनासा होतात. मग ऑपरेशन सहज शक्य होते. या भूल देण्याच्या विविध पद्धतींना भूलशास्त्र (Anesthesiology) असे म्हटले जाते. आपल्याला नेहमीच्या बघण्यातून, ऐकण्यातून दोनच प्रकार माहित असतात. ज्या जागी कापायचे ती जागा इंजेक्शन देऊन बधिर करणे हा पहिला, तर दुसऱ्यामध्ये रुग्णाला पूर्ण गुंगी आणून बेशुद्ध केले जाते. या पूर्ण गुंगी आणण्याच्या प्रकाराला १८४० मध्ये सुरुवात झाली. त्याआधी शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णांचे व डॉक्टरांचे दोघांचेही हालच असत. दारू पाजून वा अफूचा डोस देऊन रुग्णाला बांधून घालून शस्त्रक्रिया उरकल्या जात. वेदना असह्य झाल्याने त्याचा चाललेला आरडाओरडा ऐकत डॉक्टरांना शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागत.पण जेव्हा क्लोरोफॉर्मचा प्रथम शोध लागला, तेव्हा हा प्रकार कमी झाला. त्यानंतर इथर आला. हल्ली नायट्रस ऑक्साईड हा वायूही वापरला जातो. याहीपुढे जाऊन आता सोडियम पेंटाथॉल हा द्रवपदार्थ शिरेतून टोचून भूल देण्याची पद्धत वापरली जाते. शिवाय ट्रायलिनचाही वापर केला जातो. पूर्वीच्या या हल्लीच्या पद्धतीमध्ये भूल दिल्यावर रुग्णाच्या वेदनांच्या संवेदना मेंदूकडे पाठवणे थांबते. याच जोडीला मेंदूला ग्लानी येते. त्यामुळे पाहिजे तितका वेळ घेऊन व्यवस्थित शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. संपूर्ण भूल देण्याखेरीज पाठीच्या मणक्यांमध्ये विविध पातळ्यांवर औषध टोचून त्याखालील भाग बधीर करता येतो. रुग्ण शुद्धीवर राहून त्याला टोचलेल्या भागाखालील भागांना वेदना समजत नाहीत. यालाच 'स्पायनल अॅनेस्थेशिया' म्हणतात. या प्रकारात वेदनांचे संवहन थांबवले जाते.एखाद्याच्या पायावर हातावर शस्त्रकर्म करायचे असेल तर त्या दिशेला जाणारी प्रमुख नस (Nerve) उगमाच्या जागी बधीर करायचे औषध टोचून पूर्ण हात वा पाय बधिर करण्याचीही पद्धत आहे. याला वा या अनुषंगाने वापरल्या जाणाऱ्या भुलेला 'ब्लॉक अनास्थेशिया' असे नाव दिले जाते. दात काढण्यासाठी दातांचे डॉक्टर अशा प्रकारे दातांच्या मुळांशी असलेल्या नसा बधिर करतात. डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी आणखीनच वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे, त्यापूरतीच जागा इंजेक्शन देऊन बधिर केली जाते. गंमतीने म्हणावयाचे तर अगदी उघड्या डोळ्याने रुग्ण ऑपरेशन सहन करतो. भूलशास्त्र जस जसे प्रगत होत गेले तसतशी शस्त्रक्रियेच्या शास्त्रातही प्रगती होत गेली. आजकाल हृदय वा मेंदूवरही शस्त्रक्रिया शक्य होत आहे, ती केवळ त्यामुळेच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥ भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥ नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा*एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment