✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♻️ *_ या वर्षातील ७७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०: अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.*♻️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: प्रा. डॉ. उद्धव भाले -- लेखक**१९७०: देवेंद्र गावंडे -- निवासी संपादक लोकसत्ता तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८: प्रा. डॉ. शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९: मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९५८: सुनील केशवराव बर्दापूरकर -- गायक, संगीतकार, लेखक**१९५७: रत्ना पाठक शाह -- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६: वासंती वर्तक -- दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५: संजय श्रीकृष्ण पाठक -- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५: रावसाहेब दादाराव दानवे -- भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री**१९५५: अरुण बुधाजी सोनवणे -- गझलकार* *१९५१: डॉ. श्रीकांत कार्लेकर -- प्रसिद्ध लेखक**१९४८: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू: २६ जून २००५ )**१९४६: नवीन निश्चल -- भारतीय अभिनेता (मृत्यू: १९ मार्च २०११ )**१९४५: प्रा. अनिल सोनार -- प्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी (मृत्यू: २३ जानेवारी २०२५)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे -- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू: २५ डिसेंबर २०२० )**१९३८: बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता (मृत्यू: ४ डिसेंबर २०१७ )**१९३४: दशरथ तोंडवळकर -- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू: ७ ऑगस्ट २०१० )**१९३२: तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१८ )* *१९२६: अक्कितम अच्युथन नंबूथिरी -- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: १५ ऑक्टोबर, २०२० )**१९२१: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू: १ एप्रिल २०१२ )**१९१९: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१ )**१९०५: मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू: ७ मे २००१ )**१९०४: लक्ष्मणराव सरदेसाई -- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८६ )**१९०१: कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१: वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू: ३ जून १९५६ )**१८६९: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४० )**१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू: १ जून १९४४ )**१८५८: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३ )* ♻️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: भालचंद्र कुलकर्णी -- ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते (जन्म: २९ जुलै १९३५ )**२०२०: अशोक शेवडे -- प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म: २४ जानेवारी १९४४ )* *२०१६: आशा अनंत जोगळेकर -- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म: १० सप्टेंबर १९३६ )**२०११: दिनकर निलकंठराव देशपांडे -- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म: १७ जुलै १९३३ )**२००४: वसंत केशव दावतर -- समीक्षक (जन्म: २७ ऑगस्ट १९२५ )**२००१: विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१० )**१९७५: हरी रामचंद्र दिवेकर -- स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म: ५ नोव्हेंबर १८८५ )**१९०८: सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म: २५ मे १८३१ )**१८९४: रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म: १ जानेवारी १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दीर्घकथा - लक्ष्मी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्युझिलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या मागणी साठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *माधव नेत्रपेढीच्या नव्या प्रकल्पासाठी PM मोदी 30 मार्च रोजी नागपुरात, 11 वर्षांनंतर पंतप्रधान-सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्पेसएक्स 10 क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल होताच सुनिता विल्यम्स व बूच विल्मोर यांचा आनंद गगनात मावेना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच NPS पेन्शन प्रकरणे चालविण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून केला पराभव आणि ट्रॉफीवर कोरलंय नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास भंडारे 👤 बालाजी अगोड👤 लक्ष्मण नरवाडे👤 इरफान शेख *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 19*डाळींमध्ये याचे अस्तित्व**दुधामध्येही असते सत्त्व**मजबूत करण्या शरीर ठेवण**याचे करावे दररोज सेवन*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - पांढऱ्या पेशी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••' वाचन ' हा मनोरंजनाचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. पण त्यातून मिळणारा आनंद हा इतर करमणुकीच्या मिळणाऱ्या आनंदापेक्षा दीर्घकाळ टिकणारा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतीच प्रकाशित झालेली पोवारी बोलीभाषेतील *मायबोली* या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?२) हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कार २०२४ चा सर्वोत्तम पुरूष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले ?३) भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामाच्या पत्नीचे नाव काय होते ?४) 'अरण्याचा राजा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) काटे सावर या झाडाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) हेमंत पटले, गोंदिया २) हरमनप्रीत सिंह ३) वसुंधरा ४) वनराज ५) सावर, सेमल, शाल्मली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥ तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥ त्रिविद्या तूं पारु दोहींचा वृत्तांतु । सत्त्व राहे तीतूं जयालागीं ॥३॥ निर्गुण निराकार केशव उदार । नामा म्हणे पार उतरतील ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात. पण तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात. बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो. म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. *एक सुंदर कथा* ... 🐪एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला !घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत ..!सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!"व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.व्यापारी म्हणाले, "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!" नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!"तो म्हणाला, "मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते!आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!व्यापारी म्हणाला, "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!" जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता!शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला, " खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते." या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले ! पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ? व्यापारी म्हणाले: ... *"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."*विक्रेता मूक होता!यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे. *ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment