✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 मार्च 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15AGvxog1L/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟦 *_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.**२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला.कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.**१९७२: भारत आणि बांगलादेश यांच्यात२५ वर्षासाठी शांतता व मैत्री करार**१९३२: ’सिडनी हार्बर ब्रिज’ सुरू झाला**१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.**१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.**१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन* 🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: तनुश्री दत्ता -- भारतीय सिने-अभिनेत्री**१९८३: सत्य प्रयागबाई कुटे -- कवी, लेखक, संपादक* *१९८२: प्रा. डॉ. व्‍यंकटी रावसाहेब पावडे -- लेखक**१९७५: वर्षा वेलणकर -- लेखिका, अनुवादक* *१९६५: लक्ष्मण पुंडलिकराव उगिले -- प्रसिद्ध लेखक**१९६३: समता रविराज गंधे -- कथाकार, कवियत्री**१९५६: बाळकृष्ण भास्करराव सोनवणे -- कवी, लेखक**१९५२: मोहन बाबू (डॉ.एम.मोहन बाबू), आंध्र प्रदेशातील अभिनेता, निर्माता, राजकारणी* *१९४८: विमल यशवंत बागडे -- कवयित्री* *१९४५: माया परांजपे -- स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ, लेखिका (मृत्यू: २३ सप्टेंबर, २०१९ )**१९४३: योगेश गौर(योगेश) -- हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे गीतकार (मृत्यू: २९ मे २०२० )* *१९४३: मारियो जोस मोलिना-पास्केल हेन्रिकेझ -- मेक्सिकन भौतिक रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑक्टोबर २०२०)**१९३९: अब्बास अली बेग -- भारतीय क्रिकेटपटू**१९३८: सई परांजपे – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका**१९३८: गणेश पंढरीनाथ ओतूरकर -- बहुभाषिक शब्दकोश निर्मिती,वाड्मय निर्मिती पुरस्कारप्राप्त लेखक (मृत्यू: १७ ऑक्टोबर २०२२ )**१९३८: रामचंद्र गोविंद परांजपे (बाबासाहेब) -- संस्थापक, माजी खासदार (मृत्यू: २६ एप्रिल १९९१ )**१९३६: सत्यदेव दुबे -- भारतीय पटकथाकार, संवादलेखक,नाट्य-अभिनेते,चित्रपट -अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते ( मृत्यू: २५ डिसेंबर २०११)**१९३३: वसुधा दिवाकर दुनाखे -- कवयित्री, लेखिका* *१९२३: शांता आपटे-- अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९६४ )**१९२१: प्रभाकर बाळकृष्ण जोग -- पुण्यातील एक प्रसिद्ध वकील, लेखक* *१९००: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१४ ऑगस्ट १९५८)**१८९७: शंकर विष्णू तथा ’दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार**१८८४: नारायण भास्कर खरे -- भारतीय राजकारणी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष (मृत्यू: १९७० )**१८२१: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)* 🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: डॉ.मुरलीधर गोडे -- अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांवर अधिराज्य गाजविणारे कवी, गीतकार(जन्म: १८ जून १९३७ )**२०११: नवीन निश्चल -- भारतीय अभिनेता (जन्म: १८ मार्च १९४६ )**२००८: सरआर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७ )**२००२: नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (जन्म: ४ ऑगस्ट १९३१ )**१९९८: इ. एम. एस.नंबूद्रीपाद – केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १३ जून १९०९ )**१८९२: जनार्दन बाळाजी मोडक -- मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक(जन्म: ३१ डिसेंबर १८४५ )**१९८२: जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी,गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१८८४: केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य (जन्म: १६ मे १८२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाणी म्हणजे जीवन आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी, नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, विरोधकांकडून एकही अर्ज नाही; 5 नवीन आमदारांची यादी समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी कवली मेघना यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती, तर मीनल करनवाल यांची जळगाव येथे बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NEET PG परीक्षा 15 जूनला ; मात्र अनेकांकडून 2 ऐवजी एकाच सत्रात परीक्षा घेण्याचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; लवकरच तंज्ज्ञांसोबत सल्लामसलत, निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T -20 सामन्यात न्युझिलंडने पाकिस्तानला पाच विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक सोनवणे, उपक्रमशील शिक्षक, धुळे👤 विजय अतकूरकर, धर्माबाद👤 प्रकाश गताडे, उमेद फाउंडेशन, कोल्हापूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली 👤 व्यंकटी पावडे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 20*गवतासारखी पाने आहेत मात्र**चहात औषध म्हणून टाकतात**ताप खोकला आणि सर्दीला**लगेच पळवून लावतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - प्रथिने Protins••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंपादनेचा प्रारंभ साक्षरतेपासून होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कार २०२४ ची सर्वोत्तम महिला हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) हरियाणातील गुडगाव येथे असलेल्या सैफ अली खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या राजवाड्याचे नाव काय ?३) मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ! हा संदेश कोणी दिला ?४) 'अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) सविता पूनिया २) पतौडी पॅलेस ३) रामदास स्वामी ४) अष्टावधानी ५) खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 *अणुबॉम्बचे काय दुष्परिणाम होतात ?* 💥************************दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले. या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांचे अतोनात नुकसान झाले. लाखो लोक मरण पावले. त्याहून कित्येकपट जखमी झाले. नंतर कित्येक वर्ष अनेक लोकांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. अनेकांना कर्करोग झाले. नंतर जन्मलेल्या बालकांमध्ये जन्मजात वैगुण्ये निर्माण झाली. मानसिक परिणाम झाले ते वेगळेच. सध्याच्या अणुबॉम्बची शक्ती जपानवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे यदाकदाचित जर अणुयुद्ध झालेच तर पूर्ण जगाचा विध्वंस होईल.अणुबॉम्बचे दुष्परिणाम अनेक गोष्टींमुळे आहेत. एक म्हणजे प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे सर्व काही जळून खाक होते. स्फोटांच्या हादऱ्यामुळे घरे इमारती पडून होणार्‍या अपघातात अनेक लोक मरतात. थोड्या दूरच्या ठिकाणी असलेले लोक भाजून निघतात. स्फोटाचा हादरा व उष्णता यांच्या परिणामांशिवाय प्रचंड प्रमाणात होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे व स्फोटानंतर तयार होणार्‍या विनाशक पदार्थांमुळेही अनेक दुष्परिणाम होतात. आपल्या शरीरावर किरणोत्सर्गाचे अनेक परिणाम होतात. तात्कालिक परिणामांमध्ये मळमळ, उलट्या, जुलाब, थकवा व रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात. १ ते २ आठवड्यात व्यक्ती मरण पावते. काही लोक जिवंत राहतात पण त्यांच्या शरीरात विकृती निर्माण होतात. किरणोत्सर्गाच्या दूरगामी परिणामांमध्ये त्वचेचे, रक्ताचे कर्करोग यांचा समावेश होतो. गरोदरपणात जर किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागले तर होणारे मूलही जन्मजात वैगुण्य असलेले निपजू शकते.एकूण अणुबॉम्ब म्हणजे जणू मानवाचा आणि माणुसकीचा शत्रूच होय. आपल्या सुंदर जगाचा नाश होऊ द्यायचा नसेल तर यासाठीच जगात संपूर्ण अण्वस्त्रबंदी व्हायला हवी. नाहीतर एक ना एक दिवस "पूर्वी पृथ्वीवर माणूस नावाचा प्राणी राहत असे. . ." असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥ नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ प्रसंगी एखादी वस्तू किंवा सामान गहाण ठेवणे वाईट नाही कारण ती, परिस्थिती त्या, प्रकारची असते काही दिवसांनी ते गहाण ठेवलेले सामान सुद्धा सोडवले जाऊ शकते.पण, आपला मेंदू जर गहाण ठेऊन असेल तर मात्र आपल्या स्वभावात किंवा व्यवहारात खूप काही फरक पडू शकतो. म्हणून कितीही काही झाले तरी अशी चूक करू नये ही छोटीशी चूक खुप महागात पडू शकते.म्हणून शक्य तेवढे स्वतंत्र निर्णय घेण्याचा व स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.*तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment