✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 मार्च 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/166agnM8xo/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_जागतिक क्षयरोग निवारण दिन_*🧿•••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक क्षयरोग निवारण दिन: इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निवारण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो._**२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.**१९९८: ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.**१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.**१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.**१९२४: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेची पुण्यात स्थापना**१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन**१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.**१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.**१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला*🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: मुग्धा चाफेकर -- भारतीय अभिनेत्री**१९८७: शाकिब अल हसन -- बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू* *१९८२: प्रा. डॉ. देविदास साधू गेजगे -- लेखक, संपादक* *१९८२: प्रा. महादेव श्रीराम लुले (देवबाबू) -- प्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक, निवेदक* *१९७९: इमरान अनवर हाशमी -- भारतीय अभिनेता**१९७४: सुजाता चंद्रकांत नगराळे -- लेखिका* *१९७०: श्रीकांत कवळे -- लेखक* *१९६७: प्रा. बापू मल्हारराव घोक्षे -- नाटककार, समीक्षक* *१९६७: डॉ. ज्योती मिलिंद रामपूरकर -- लेखिका**१९६५: कालीदास नारायण चवडेकर -- कवी, गझलकार* *१९६१: वंदन राम नगरकर -- प्रसिद्ध एकपात्री कलाकार, लेखक, व्यक्तिमत्व विकास तज्ञ (मृत्यू: २१ मार्च २०२३ )**१९५४: हसन मुश्रीफ -- मंत्री, वैद्यकीय शिक्षण म.रा.**१९५२: सुरेश भगवानजी रेवतकर -- कवी, लेखक**१९५१: टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर**१९५०: प्रल्हाद कक्कर -- भारतीय जाहिरात चित्रपट दिग्दर्शक**१९४७: प्रा. डॉ. आरती मदन कुलकर्णी -- ज्येष्ठ मराठी लेखिका, भाषाशास्त्राच्या अभ्यासक* *१९३०: स्टीव्ह मॅकक्वीन – हॉलिवूड अभिनेता (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८० )**१९२९: शंकरराव गेणूजी कोल्हे -- माजी मंत्री म.रा.(मृत्यू: १६ मार्च २०२२ )**१९२३: प्रा. उषा लिमये -- कवयित्री, कादंबरीकार (मृत्यू: २००७ )**१७७५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५ )**१६०८: समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर) -- महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक (१३ जानेवारी १६८१ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: प्रदीप सरकार -- भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ३० एप्रिल १९५५ )**२०१४: कुलदीप पवार -- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते(जन्म: २४ डिसेंबर १९४९ )* *२०१०: मोहन वाघ -- छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार तसेच नेपथ्यकार (जन्म: ७ डिसेंबर १९२९ )* *२००७: श्रीपाद नारायण पेंडसे – प्रसिद्ध मराठी कथालेखक व कादंबरीकार (जन्म: ५ जानेवारी १९१३ )**२००५: व्ही.बलसारा -- भारतीय संगीतकार (जन्म: २२ जून १९२२ )**१९५७: पुरुषोत्तम मंगेश लाड -- संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक (जन्म: २९ मार्च १९०५ )**१९०५: ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८ )**१८८२: एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७ )**१८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन सुंदर आहे .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गट शेती द्वारे परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन धोरणाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे भोवले, एसटीने ई-शिवनेरीच्या चालकाला केले बडतर्फ, खासगी कंपनीला ठोठावला 5 हजारांचा दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय विद्वान गायत्री चक्रवर्ती यांना हॉलबर्ग पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठातील पहिल्या कृष्णवर्णीय प्राध्यापक, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ट्विटरच्या ब्लू बर्डचा झाला लिलाव; 35 हजार डॉलर्सला विकला गेला लोगो*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार - राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - इशान किशनच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आपल्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष गुंडेटवाड, शिक्षक, नांदेड👤 राम मठवाले, शिक्षक, धर्माबाद👤 सोमनाथ वाळके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, बीड👤 कोंडबा पाटील 👤 महेश्वर काळे👤 प्रदीप जोंधळे👤 गणेश कदम, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 24*रात्रीचा दिवा आकाशात**चमचम चमकतो नभात**म्हणतात मला रजनीनाथ**रात्रभर देतो तुम्हाला साथ*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - संगणक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने प्रत्येक विषयाचा विचार करावा, त्यावर प्रयोग करावा व नंतर निर्णय घ्यावा. दुसरा म्हणतो म्हणून मान्य करू नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) यंदाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?२) छत्तीसगड राज्यात प्रथमच 'ज्ञानपीठ' सन्मान मिळविणारे कवी कोण ?३) साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? ४) सर्वाधिक 'ज्ञानपीठ सन्मान' कोणत्या भाषेतील कवी/लेखकाला मिळाले आहे ?५) मराठी भाषेतून किती व कोणत्या लेखकांना ज्ञानपीठ सन्मान प्राप्त झाला आहे ? *उत्तरे :-* १) विनोद शुक्ल, हिंदी कवी व लेखक २) विनोद शुक्ल ३) ज्ञानपीठ पुरस्कार ४) हिंदी, १२ ज्ञानपीठ ५) चार - वि. स. खांडेकर (१९७४), वि. वा. शिरवाडकर (१९८४), विंदा करंदीकर (२००३), भालचंद्र नेमाडे (२०१४)*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✂ *बायाॅप्सी म्हणजे काय ?* ✂ ************************रोगाचं किंवा व्याधीचं निश्चित निदान करण्यासाठी अनेक परीक्षांचा वापर केला जातो. स्टेथोस्कोपने फुप्फुसाची परीक्षा करणं, तापमापकानं शरीराचं तापमान मोजणे, रक्तदाब मोजणे यासारख्या परीक्षा सहज करता येतात. त्यावरून निदान होत नसेल तर मग रक्त, मूत्र, विष्ठा, थुंकी यासारख्या शरीरद्रवांची परीक्षा केली जाते. त्याही पुढे जाऊन क्ष-किरण परीक्षा, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या परीक्षाही केल्या जातात. त्याच्या मदतीनं शरीरातील काही अवयवांमध्ये बिघाड झाला आहे अशी शंका आल्यास मग त्या अवयवाचा एक छोटासा तुकडा काढून त्यातील पेशींची सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं परीक्षा केली जाते. पॅथालॉजिस्ट ही परीक्षा करतात. त्याच्या साहाय्यानं मग त्या पेशी निरोगी अवस्थेत आहेत की त्यांच्यात काही बदल झाले आहेत हे ठरवलं जातं; आणि बदल झाले असेलच तर ते भद्र आहेत की अभद्र आहेत याचा निर्णय केला जातो. अवयवाचा नमुना परीक्षेसाठी काढून घेण्याच्या या पद्धतीलाच बायाॅप्सी असं म्हणतात. एखाद्या अवयवाची असामान्य वाढ झालेली असली किंवा तिथे एखादी गाठ आलेली असली तर ती कर्करोगाची आहे की नाही हे ठरवण्यासाठी सहसा बायाॅप्सीचाच वापर केला जातो; परंतु काही वेळा कर्करोगाव्यतिरिक्त इतर व्याधींच्या निदानासाठीही बायाॅप्सी केली जाते.बायाॅप्सी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीला इन्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. पण काही वेळा त्या गाठीचा किंवा वाढलेल्या भागाचा तुकडाच न घेता संपूर्ण गाठच काढून टाकली जाते. त्याला एक्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीसाठीही निरनिराळय़ा पद्धती वापरल्या जातात. अतिशय मऊ अवयव असले तर केवळ घर्षणाचा वापर करून नमुना मिळवला जातो. यासाठी कापूस गुंडाळलेल्या काठीचा, कॉटन बडचा वापर होतो. तोंडाच्या आतल्या भागात तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची भीती असते. त्या रोगाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही पूर्वलक्षणं दिसतात. ती पाहण्यासाठी कॉटन बड तिथं जोरानं घासून तिथल्या पेशी मिळवता येतात. त्यांचं निरीक्षण करून कर्करोग होण्याच्या शक्यतेचं निदान केलं जाऊ शकतं. काही अवयवांच्या पेशी मिळवण्यासाठी बारीक सुई त्याच्यात घुसवून तेथील पेशी खेचून बाहेर काढल्या जातात. काही वेळा मोठ्या परिघाची सुई वापरून त्या अवयवाच्या गाभ्यातला भाग कोरून काढला जातो, तर काही वेळा सरळ सरळ चाकू लावून लहानशी शस्त्रक्रिया करून तो तुकडा कापून काढला जातो. *बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥ तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥ तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मत्र पांडुरंगे ॥४॥ कासवीची दृष्टी सदा बाळावरी । तैसी दया करीं पांडुरंगे ॥५॥ नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळिसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते. ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो, तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment