✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 मार्च 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BMsTyNy3G/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟪 *_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७: मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ**१९७०: शहर व औद्योगिक विकासासाठी 'सिडको' ची स्थापना**१९६९: गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.**१९६७: चौथी लोकसभा अस्तित्वात**१९५८: ’व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण**१७६९: ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल मधील कापड आणि मलमल उद्योगावर कडक निर्बंध लादले**१६७२: इंग्लंडने नेदरलँड विरुद्ध युद्धाची घोषणा केली* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस :_*🟪 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: श्वेता सुधीर चंदनकर -- कवयित्री**१९९०: सायना नेहवाल -- भारतीय सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू* *१९८१: सुनील पुंडलिक बडक -- कवी**१९७९: उज्ज्वला यशवंत सामंत -- लेखिका* *१९७९: शर्मन जोशी – अभिनेता**१९७७: डॉ.कविता मुरुमकर -- कवयित्री, कादंबरीकार**१९७५: पुनीत राजकुमार -- भारतीय अभिनेता, पार्श्वगायक, चित्रपट निर्माता, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता (मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२१ )**१९७४: श्वेता बच्चन-नंदा -- भारतीय स्तंभलेखिका**१९७२: सीमा भारंबे -- कवयित्री, लेखिका* *१९६८: अरुण इंगवले -- कवी, समीक्षक**१९६५: प्रदीप बाबुराव देशमुख -- कवी* *१९६४: दमयंती मोहन भोईर -- कवयित्री, लेखिका* *१९६३: ज्योती हेगडे -- खंदरबनी घराण्यातील रुद्र वीणा आणि सतार कलाकार* *१९६२: कल्पना चावला --- अमेरिकन अंतराळवीर,भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला(मृत्यू: १ फेब्रुवारी २००३ )**१९५४: प्रकाश गोपाळाव पोहरे -- दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा लेखक* *१९५३: डॉ. राजा धर्माधिकारी-- प्रसिद्ध हास्य कवी, कलाकार* *१९५२: सावळीराम गोपाळ तिदमे -- ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार**१९५१: सुनील शंकर इनामदार -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार**१९४६: पृथ्वीराज चव्हाण -- भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९३९: बंगारू लक्ष्मण -- भारतीय जनता पक्षाचे पूर्व अध्यक्ष, माजी केन्दीय मंत्री (मृत्यू: १ मार्च २०१४ )* *१९३८: बाळ भागवत -- दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे लेखक* *१९२०: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५ )**१९१०: अनुताई बालकृष्ण वाघ -- आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९९२ )**१९०९: रामचंद्र नारायण दांडेकर –भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (मृत्यू: ११ डिसेंबर २००१ )**१९०३: वामन नारायण देशपांडे -- लेखक व कवी (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९७५ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: जयराम कुलकर्णी -- मराठी भाषेतील चित्रपट अभिनेते (जन्म: १७ ऑक्टोबर १९३२ )**२०१९: मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर --- भारतीय जनता पक्षाचे राजकारणी, गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १३ डिसेंबर १९५५ )**२०१८: प्रा. जैमिनी भाऊराव कडू -- लेखक, विचारवंत पत्रकार व साहित्यिक(जन्म: २ नोव्हेंबर १९५२ )* *२०००: ’राजकुमारी’ दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: १९२४ )**१९९९: कुमुदिनी रांगणेकर -- कादंबरीकार, कथाकार, अनुवादक(जन्म: २५ मार्च १९०६ )**१९८५: दत्तात्रय गजानन "दत्तू" फडकर -- कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू खेळाडू(जन्म: १२ डिसेंबर १९२५ )**१९५७: रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७ )**१९५६: आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८९७ )**१९५२: सदाशिव नारायण ठोसर -- कवी, नाट्यसमीक्षक व नाटककार (जन्म: १८८२ )**१९३७: ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्हे – बडोद्याचे राजकवी,’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (जन्म: २६ जानेवारी १८९१ )**१९२७: काशिनाथ नारायण साने -- इतिहास अभ्यासक व पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष(जन्म: २५ सप्टेंबर १८५१ )**१८८२: विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार (जन्म: २० मे १८५० )**१७८२: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १७०० )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली कृतज्ञता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *घर बांधणाऱ्यासाठी खुशखबर ! घरकुलातील घर बांधण्यासाठी मिळणार पाच ब्रास मोफत वाळू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत तुकाराम बीज निमित्ताने देहूत पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुनिता विल्यम्स व बुच विलमोर या अंतराळवीरांची सुटकेची चिन्हे दिसू लागली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोठी वाढ, नागरिक त्रस्त, नागपूरमध्ये तब्बल ४५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, संदीप जोशी, दादाराव केचेंसह छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकरांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई : मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी केला पराभव, महिला प्रीमियर लीग २०२५ वर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाराम गुरुपवार, आरोग्य विभाग, नांदेड 👤 अमरसिंग चौहान, भंडारा 👤 माधव कांबळे, शिक्षक, कंधार👤 प्रतिक जाधव, नांदेड 👤 अंगद कांडले, नायगाव👤 जयानंद मठपती 👤 विलास पाटील, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 18*शरीरातील हा शूर शिपाई**करतो रोगापासून संरक्षण**उभी करूनी फौज त्याची**करतो आपले सदैव रक्षण**कमी झाली यांची संख्या**सारेच होती मग परेशान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - वटवृक्ष••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणावा , पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) काटे सावर या झाडाचे शास्त्रीय नाव काय आहे ?२) काटे सावर या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?३) भारतातील कोणत्या शहराचे भौगोलिक उपनाव 'वननगर' आहे ?४) 'अरण्याची शोभा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) काटे सावर ही वनस्पतीला संस्कृतमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते ? *उत्तरे :-* १) Bombax Ceiba २) Silk Cotton Tree ३) डेहराडून ४) वनश्री ५) शाल्मली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिसे* 📙 ***************शिसे म्हणजे जडशीळ स्वरूपाचा धातू. यालाच लेड असे इंग्रजीत नाव आहे. पुरातन काळापासून ज्ञात असला तरी त्याचे दुर्गुण मात्र याच शतकात कळु लागले. पण गम्मत कशी असते बघा, दुर्गुण कळले म्हणून वापराची पद्धत बदलली व त्याच वेळी त्याचे नवीन उपयोग कळुन त्या दृष्टीने वापर सुरू झाला.अत्यल्प शिशाचे प्रमाण मानवी शरीरात कायमचे दोष निर्माण करू शकते. मेंदू व मज्जातंतूंच्या कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींची सुरुवात होऊन बधिरता, जडत्व येऊन हळूहळू हालचालीच बंद होत जातात. तसेच रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या शिशामुळे कमी होत जाते. भूक मंदावते व प्रतिकारशक्तीही कमी होते. या बाबी कळल्या, त्यांचे नेमकेपण ज्ञात झाले आणि शिशाचा अनेक वर्ष चालू असलेला पाण्याचे नळ, घराचे पत्रे, मासेमारीचा हुक यातील वापर थांबत गेला. आज तर हा उपयोग जवळपास होतच नाही. मग शिशाचा नवीन वापर कुठे सुरू झाला ? तर क्ष - किरणांचा वापर जगभर सुरू झाला व शिशाचे झगे (अॅप्रन) या प्रत्येक ठिकाणी दिसु लागले. सर्व प्रकारची रेडिओअॅक्टिव्ह किरणे फक्त शिशाचा पत्रा सहजरित्या अडवतो. अर्थातच हा गुण कळल्यानंतर अणुभट्ट्या, आण्विक साधने, क्ष किरणांशी संबंधित काम करणारे त्यांच्यासाठी हातमोजे, झगे, बूट, गरजेनुसार भिंतीच्या विटांना लावलेले जाड पत्रे या ठिकाणी आज शिशाचा वापर होतो. शिशाचा अॅप्रन घालून काम करणे खरे त्रासदायकच असते. कारण मुळात हा धातू जड. पण त्याची ही शक्ती लक्षात आल्यावर त्याला पर्याय नव्हता. एखाद्या धातूच्या वापरातील बदलाचे स्वरूप शिशाएवढे अन्य दुसरे क्वचितच सापडेल. शिशाचे अन्य वापर म्हणजे मोटारच्या बॅटरीत आजही शिसे वापरतात. धातूंच्या वस्तू सांधण्यासाठी शिशाचेच डाग दिले जातात. विशेषत: मोठ्या आकाराचे हवाबंद लोखंडी पाइप सांधायला याचा वापर होतो. शिशाला लॅटिनमध्ये प्लंबम असे नाव आहे. आपल्या घरातील नळाचे काम करणारा प्लंबर हा शब्द यावरूनच आला. आज पाण्याचे नळ शिष्याचे नसले, तरी प्लंबरच घेऊन ते दुरुस्त करत असतो. शिशाचा धोकादायक वापर आजही केला जातो, तो म्हणजे पेट्रोलमध्ये ज्वलन चांगले व्हावे म्हणून शिसाचे अत्यल्प प्रमाणात घातलेले असते. काही देशांत हा वापर बंद केला गेला आहे. पण आपल्याकडे व जगात बव्हंशी ठिकाणी आज अजून हा वापर होतोच. या पेट्रोलच्या वापरातून निघणारा धूर हा श्वसनाद्वारे आसपासच्या लोकांच्या रक्तात मिसळला जातो. त्याचे दुष्परिणाम दिसायला कित्येक वर्षे जावी लागतात. पण मोठ्या शहरांतून वाढत असलेले वाहनांचे प्रमाण लक्षात घेता ही वेळ फार दूरवरची नव्हे. या बाबतीतील जागरूकता अद्याप पेट्रोल निर्माण व वितरण करणाऱ्या कंपन्यांनी दाखविलेली नाही. शेवटचे पण महत्त्वाचे, शिसपेन्सिलीत असते ते शिसे नव्हे; तो असतो कार्बनचा प्रकार, ग्राफाईट.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥ भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥ नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की, वयाने, अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते. अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुख नि दु:ख*एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले, " गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का ...?" त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले, "पाण्याची चव कशी वाटली ? " तेव्हा शिष्य म्हणाला, "अतिशय खारट".त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परिणाम होत नाही."*विशाल मनाने जगा... मनाची संकुचित अवस्था टाकून द्या...*जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही जण पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परिणाम होत नाही... !!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment