✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bk4qSZ4VJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील ८४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना**२०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना**२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.**१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.**१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे ’काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.**१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.*🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: आणि वसंत दीक्षित-- हास्य ,विडंबन कवी**१९६९: डॉ. भगतसिंग पाटील -- लेखक, कवी**१९६९:श्रीपाद विनायक अपराजित --- 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक, कवी, लेखक* *१९६०: प्रसाद कृष्णराव नातु -- कथाकार**१९५६: मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक**१९५२: माधव गंगाराम फुलारी -- कवी, लेखक* *१९४८: फारुख शेख -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २८ डिसेंबर २०१३ )**१९४७: सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक**१९४५: सत्वशीला विठ्ठल सावंत -- भाषातज्ज्ञ, कोशकार अनुवादक म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: १ मे २०१३ )**१९४५: कुमुदिनी काटदारे -- जयपूर घराण्यातील गायिका**१९३३: कृष्णाजी रामचंद्र सावंत -- नाट्य अभ्यासक**१९३३: वसंत गोवारीकर – भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ (मृत्यू: २ जानेवारी २०१५ )**१९३२: वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – सुप्रसिद्ध लेखक व कथाकथनकार (मृत्यू: २६ जून २००१ )**१९३१: सुशीला केशव जोशी -- कथा, कादंबरीकारी लेखिका**१९३१: उषा परांडे -- कादंबरीकार, कथाकार* *१९२४: मधुसूदन पांडुरंग भावे -- प्रसिद्ध कवी, गीतकार (मृत्यू: १९ मे २००३ )**१९१६:संबानंद मोनप्पा पंडित -- प्रसिद्ध भारतीय चित्रकार (मृत्यू: ३० मार्च १९९३ )**१९०६: कुमुदिनी रांगणेकर -- कादंबरीकार, कथाकार,अनुवादक(मृत्यू: १७ मार्च १९९९ )**१८९६: रघुनाथ वामन दिघे -- मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार (मृत्यू: ४ जुलै १९८० )**१८५०: विठ्ठल भगवंत लेंभे -- मराठी कवी (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: संजय दिनकर कुलकर्णी -- मराठी पत्रकार आणि लेखक (जन्म: १९५० )* *२०१४: नंदिनी कर्नाटकी(बेबी नंदा)- हिंदी आणि मराठी चित्रपटामधील भारतीय अभिनेत्री (जन्म: ८ जानेवारी १९३९ )**१९९८: आशा पोसले -- या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साबिरा बेगम या पाकिस्तानी चित्रपटांच्या पहिल्या नायिका(जन्म: १९२७ )* *१९९३: मधुकर केचे – प्रसिद्ध साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२ )**१९९१: वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७ )**१९४०: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (जन्म: ११ डिसेंबर १८६७ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्र सरकारनं खासदारांच्या पेन्शनसह डीएमध्ये केली वाढ; दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरुन 2,500 रुपये तर मूळ वेतनही 1 लाखांवरुन 1,24,000 रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *3 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने केला मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू - पालकमंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजस्थानात तापमान 40 अंशांवर, मध्यप्रदेशात 39 अंशांवर, ओडिशामध्ये पावसाचा इशारा, पंजाबमध्ये तापमान 4 अंशांनी वाढेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *100 दिवसात पुढच्या 25 वर्षांची सोय; महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाची अव्वल कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - दिल्ली कॅपिटलचा लखनऊवर एक विकेटने विजय, आशुतोष शर्माचे धडाकेबाज फटके*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पिराजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 सचिन पेटेकर 👤 अनिल पेंटावार 👤 जगदीश उरडे👤 अभिनंदन एडके, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 25*सप्तरंग घेऊन हा**आकाशात अवतरतो**पृथ्वीवरील लोकांना**खूप खूप आवडतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - चंद्र ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सज्जनतेचा बुरखा पांघरून मनाची दृष्टता जात नाही. मनाच्या दृष्टतेचे मूळच नष्ट केले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फेसबुकची स्थापना कोणी केली ?२) वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्सनुसार सलग आठव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?३) नुकतीच सुनीता विल्यम्स आपला सहकारी बुच विल्मोरसोबत पृथ्वीवर कोणत्या यानातून सुखरुप परतल्या ?४) 'अस्वलाचा खेळ करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) फिनलंड ३) स्पेसएक्सच्या ड्रॅगन यान ४) दरवेशी ५) ख्रिस गेल ( ३५७ षटकार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *भिजलेल्या कपड्याचा रंग गडद का दिसतो ?* 📒धुतलेला कपडा पिळून त्यातलं पाणी काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही पाणी उरतंच. असा ओला कपडा मग दोरीवर घालून आपण सुकवत ठेवतो. त्या वेळी जरा बारकाईनं लक्ष दिलंत तर दिसून येईल, की तो कपडा रंगीत असेल तर ओला असताना त्याचा रंग गडद दिसतो; पण सुकला की पुन्हा आपला मूळचा हलका रंगच तो परिधान करतो. पावसात भिजल्यामुळं ओल्या झालेल्या कपड्यांचा रंगही गडद झालेला दिसतो. ही किमया कशी घडते ?सुती कपडा कापसाच्या धाग्यांपासून तयार केलेला असतो. कापसाचा धागा हा एक नैसर्गिक धागा असून जेव्हा ते धागे उभे-आडवे धरून गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्यांची ही गुंफण तशी सैलसरच असते. त्या धाग्यांमध्ये भरपूर पोकळी असते. त्या पोकळीत हवा भरून राहते. शिवाय हे धागे तेवढे गुळगुळीत नसतात. त्यांचा पृष्ठभाग तसा ओबडधोबडच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांच्यावर प्रकाशकिरण पडतात तेव्हा त्यांचा बराचसा अंश त्या पृष्ठभागावरून विखुरला जातो. तुलनेनं कमी अंश परावर्तित होतो. असा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचा रंग फिकट असल्याचं आपल्याला दिसतं.जेव्हा हाच कपडा ओला होतो तेव्हा पाणी त्याच्यात शिरतं. ते धाग्यांमधल्या पोकळीतल्या हवेची हकालपट्टी तिथं साचून राहतं. त्यामुळं मग त्या धाग्याच्या पृष्ठभागावरून विखुरणाऱ्या प्रकाशकिरणांचं प्रमाण कमी होतं. आता जास्त किरण धाग्यावरून परावर्तित होतात. अधिक प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. रंग गडद झाल्याचा आभास निर्माण करतो. तेच पाणी निघून गेलं, की पूर्वीसारखी हवा धाग्यांमधल्या पोकळीतली आपली जागा पटकावते. परत एकदा जास्त प्रकाश विखुरला जातो.रेशीम किंवा पॉलिएस्टरसारखेकृत्रिम धागे वेगळे असतात. त्यांचा पृष्ठभाग ओबडधोबड नसतो. तो अधिक गुळगुळीत असतो. ते जेव्हा गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्या उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये पोकळी राहत नाही. गुळगुळीत पृष्ठभागामुळं अधिक प्रकाश परावर्तित होतो. असा कपडा भिजला तरी पाणी फारसं पोकळीत भरत नाही. प्रकाशाच्या परावर्तित प्रमाणात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तशा कपड्याचा रंग गडद झाल्याचं जाणवत नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥ स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे तुज भक्तिचिये पैं पिसें । पुरविसी आस दुर्बळाची ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकार स्मरावे*अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.*तात्पर्य : उपकाराची जाण ठेवावी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment