✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/03/world-water-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••🔴 *_ जागतिक जल दिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••🔴 *_जागतिक मुकाभिनय दिवस_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९: लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१: ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५: ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७: शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५: अरब लीगची स्थापना**१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली*🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: आदित्य सील -- भारतीय अभिनेता**१९८१: रणजीत नारायण पवार -- लेखक* *१९७६: विशाखा सुभेदार -- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२: अश्विनी एकबोटे -- प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू: २२ ऑक्टोबर २०१६ )**१९५९: सुरेश नावडकर -- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८: देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५२: मंगला शिवदास कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५१: चारुदत्त लक्ष्मण(सी. एल.) कुलकर्णी -- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार, कवी, लेखक* *१९४९: विलास बाबूराव मुत्तेमवार -- माजी खासदार* *१९४८: लक्ष्मण ढवळू टोपले -- लेखक, कवी* *१९४३: नंदा अनंत सुर्वे -- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५ )**१९२४: पंडित अमरनाथ -- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू: ९ मार्च १९९६ )**१९११: देवीसिंह व्यंकटसिंह चौहान -- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक (मृत्यू: डिसेंबर २००४ )**१९०६: भगवंत भिकाजी सामंत -- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७: सदाशिव कृष्ण फडके -- लेखक (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९७१ )**१८५७: शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले -- लेखक (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९०४ )* *१७९७: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू: ९ मार्च १८८८ )*🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: सागर सरहदी -- हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक(जन्म: ११ मे १९३३ )**२०१७: गोविंद श्रीपाद तळवलकर -- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म: २२ जुलै १९२५ )* *२००७: निसार बज्मी -- संगीतकार (जन्म: १ डिसेंबर १९२४ )**२००५: रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म: १७ नोव्हेंबर १९२० )**२००४: बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९ )**१९९१: कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)-- कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म: २५ जून १९०५ )**१९८४: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, साहित्यिक, सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म: ४ जानेवारी १९०९ )**१८३२: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जलदिन त्यानिमित्ताने" पाणी " या विषयावर लेख *" जल है तो कल है "*........... आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताचा कोळसा उत्पादनात ऐतिहासिक कामगिरी, एक अब्ज टणाचा टप्पा पार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रात CBSE अभ्यासक्रम लागू करण्याविषयी आमदारात मतभेद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : वांद्रेमध्ये नवे पुराभिलेख भवन - सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये तब्बल 19 टक्क्यांची वाढ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) टोल वाढीची केली अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे आयपीएल 2025 उद्घाटन समारंभ, अभिनेत्री आणि गायिका करणार लाईव्ह परफॉर्मन्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सनीदेवल जाधव, शिक्षक नेते, उस्मानाबाद👤 रमेश कत्तूरवार, धर्माबाद👤 अमित बडगे 👤 श्रीमंत ढवळे 👤 शंकर वर्ताळे 👤 गणेश मैद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 23*देतो ज्ञान शिकवतो विज्ञान**उंदीर असतो नेहमी मदतीला**क्षणात देतो संपूर्ण माहिती**सलाम याच्या संशोधकाला*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसंग कितीही बाका असू द्या, संयम आणि बुद्धिमत्तेचा निकष या दोहोंच्या जोरावर आपण त्यातून तरतो व उतावीळपणा केला तर डुबतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा *'महाराष्ट्र भूषण'* पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे मूळ गाव कोणते ?३) 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'चे स्वरूप काय आहे ?४) महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?५) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म केव्हा झाला ? *उत्तरे :-* १) राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार २) गोंदूर, धुळे ३) २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल ४) महाराष्ट्र भूषण ५) १९ फेब्रुवारी १९२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ *************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे. आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका । तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥ तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी । तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥ तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी । तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥ तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी । तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता । तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥ नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला दोन शब्दाने असो वा कोणत्याही साहित्याने किंवा कशानेही साथ द्यायची नसेल तर देऊ नये. पण ज्यांचे आपुलकीचे नाते जुळलेले आहेत त्यांचे नाते तरी तोडू नये. भविष्यात सांगता येत नाही कधी कोणावर, कशी वेळ येईल कारण माणसाचं जीवन हे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "बोलक्या पैशाची थैली" एके दिवशी एका तेल्याचे व एका कसायाचे बाजारात खूप जोरदार भांडण झाले. शेवटी ते भांडण काही केल्या मिटत नाही, असे पाहून दाद मागण्यासाठी ते दोघे बिरबलसमोर आले. भांडण कशावरून सुरू झाले असे बिरबलाने विचारल्यावर कसाई म्हणाला, 'महाराज मी माझ्या दुकानात मांस विकत असताना हा तेली तिथे आला. तेल घेण्यासाठी मी भांडे आणावे म्हणून घरात गेलो. तेवढ्यात याने माझी पैशाची थैली उचलून घेतली व आता ही थैली त्याची आहे, असे म्हणतो.' तेली म्हणाला, 'महाराज, हा कसाई साफ खोटे बोलतो. त्याने तेल घेतले व पैसे दिलेच नाहीत. पण उलट माझी पैश्याची थैलीसुद्धा त्याचीच असल्याचे सांगत आहे. " सारा प्रकार आपल्या डोळ्याने पाहणारा कुणीच साक्षीदार नव्हता. कुणाची बाजू सत्य काही स्पष्टपणे कळतच नव्हते. बिरबलाने नोकराला सांगून पाणी किंचित कोमट करुन आणण्यास सांगितले. त्या कोमट पाण्यात त्याने थैलीतली सर्व नाणी ओतली. नाणी पाण्यात पडताच त्यांना लागलेले तेल सुटे होऊन पाण्यावर तरंग लागले. त्यावरून ते पैसे तेल्याचेच होते हे सिद्ध झाले. बिरबलाने पैसे बाहेर काढून ताब्यात घेण्यास तेल्याला सांगितले व कसायाला लबाडी केल्याबद्दल महिनाभर तुरुंगात पाठविले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment