✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16JdEBrPR6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.• १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.• १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.• १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.• २०२२: आर्टेमिस १ रॉकेट - इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.🎂 जन्म :- • १८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री • १८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल • १८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या• १९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसन• १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज • १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल • १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे• १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार • १९३१: नाटककार श्याम फडके• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी• १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा• १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता • १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन• १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई • १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी • १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय • १९४८: झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी लेवी मवानवासा • १९४२: भारतीय अभिनेते निपॉन गोस्वामी • १९३५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी • १९२८: लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी गेस्टन थॉर्न• १७२८: इंग्लिश व्यापारी आणि अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक मॅथ्यू बोल्टन 🌹 मृत्यू :- १६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल • १९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस • १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर • १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे • १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद • १९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा • २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर • २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन • २००७: अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती स्टीव्ह फॉसेट • २००५: अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश विल्यम रेहनक्विस्ट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फुकट वाचण्याची वृत्ती......*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यावर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी सोडलं उपोषण, हैदराबाद गॅझेटचा 'शासन निर्णय' जसाच्या तसा निर्गमित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमधील लाखो जीविका दीदींना पंतप्रधान मोदींची मोठी भेट, व्हर्च्युअल माध्यमातून सहकारी संस्थेचा शुभारंभ, 105 कोटी रुपये हस्तांतरित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अहिल्यानगर - विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून भारताला आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वसईतील धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणरायाच्या निरोपावेळी गडचिरोली, चंद्रपूर, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *T-20 विश्वचषका आधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशीद खान T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकांता व्ही. बिज्जेवार, सिडको, नांदेड 👤 महेंद्र सोनेवणे, शिक्षक व्ही साहित्यिक, गोंदिया 👤 प्रदीप पंदीलवाड👤 आशिष हातोडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 65*एक खोली आहे, ज्यात न खिडकी, न दरवाजा. तरीही मी बाहेर पडते, मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - स्पंज ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मातृभूमीशी एकनिष्ठ राहणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) SCO चा विस्तारित रूप काय आहे ?२) SCO ची स्थापना केव्हा झाली ?३) SCO या संघटनेचा भारत कोणत्या वर्षी सदस्य झाला ?४) SCO या संघटनेत सध्या किती सदस्य देश आहेत ?५) SCO चे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) Shanghai Cooperation Organisation २) १५ जून २००१ ३) जून २०१७ ४) १० देश ५) बीजिंग, चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛕 श्री चिंतामणी गणपती, थेऊरस्थान : पुणे जिल्हा, हवेली तालुका, थेऊर गाव (पुणे शहरापासून साधारण २५ किमी अंतरावर).अष्टविनायक यात्रेत थेऊरचा श्री चिंतामणी गणपती पाचवे गणपतीस्थान मानले जाते.📖 पौराणिक कथापूर्वी येथे ऋषी कपिलांचा आश्रम होता. त्यांच्याकडे चिंतामणी नावाचा अद्भुत मणि होता. त्याच्या तेजाने सर्व इच्छा पूर्ण होत. राजा गणराज कपिल ऋषींकडे आला व मणिच्या प्रभावाने सर्व ऐश्‍वर्य उपभोगला. लोभामुळे त्याने तो मणि कपिल ऋषींकडून हिसकावून घेतला. कपिल ऋषींनी श्री गणेशाची उपासना केली. गणपतीने गणराजाचा पराभव करून मणि ऋषींना परत दिला. पण ऋषींना त्याच्या शक्तीचा मोह वाटू नये म्हणून गणपतीने तो मणि आपल्या कंठात (गलेमध्ये) ठेवून घेतला. तेव्हापासून गणपतीला श्री चिंतामणी गणपती म्हणू लागले.🌸 मंदिराची वैशिष्ट्येमंदिर कृष्णा, मूळा व म्हाळसाखडी या नद्यांच्या संगमाजवळ आहे. मूर्ती सुमुखी व उजव्या सोंडेची आहे. मूर्तीला रत्नजडित डोळे आहेत. गणपतीसमोर मोरेश्वर महाराजांच्या मठाचे छत्रछाया स्वरूप जाणवते. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे आलेल्या भक्तांची संकटे, चिंता दूर होतात, म्हणून नाव "चिंतामणी".🙏 श्रद्धा आणि महत्त्वयेथे येऊन भक्त आपली चिंता, दुःख, संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव येथे विशेष मोठ्या थाटामाटात साजरा होतो. अष्टविनायक यात्रा करणाऱ्यांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र व आवश्यक आहे.👉 थोडक्यात : थेऊरचा श्री चिंतामणी गणपती हा चिंता व संकटे दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा अष्टविनायकांतील पाचवा गणपती आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले.                  ✍  *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment