✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15yNHuHVbh/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.• १९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.• १९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.• १९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.• १९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.• १९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.• २०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.• २००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.• २०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.🎂 जन्म :-• १८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)• १८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)• १९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)• १९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)• १९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)• १९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)• १९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.• १९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)• १९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.• १९५०: भारतीय लेखक राजीव मल्होत्रा यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.• २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)• २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)• २०२०: भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन (जन्म: १० ऑक्टोबर १९३३)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार असे मरत नाहीत*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांची निवड, यंदा हे साहित्य संमेलन होणार साताऱ्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार, सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानं राज्याचं राज्यपालपद रिक्त होतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्राचा वक्फ कायदा योग्य की अयोग्य ? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शहागड परिसरात अतिवृष्टी ! जायकवाडी धरण 100 टक्के भरले, आपत्कालीन गेट ही उघडले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिलीप प्रभावळकर अभिनित दशावतार सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 2.2 कोटींची केली कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला सात विकेटने धूळ चारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. हंसराज वैद्य, नांदेड 👤 राजेंद्र होले 👤 माधव पांगरीकर 👤 एकनाथ जिंकले 👤 मनोज साळवे 👤 शीतल वाघमारे 👤 अभिमन्यू चव्हाण, बिलोली 👤 श्रीनाथ येवतीकर 👤 श्रीकांत येवतीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 75*पाटीवरती धूळ माजे**क्षणात मी ती सारे बाजे**ना पेन, ना खडू**तरीही शिकवणीचा मी खरा भिडू**ओळखा पाहू – कोण? 🧐*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - काळा फळा••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला हजारो मित्र आहेत, त्याला ते अपुरे वाटतात परंतु ज्याला एकच शत्रू आहे, त्याला तो सगळीकडे दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेपाळच्या पहिल्या हंगामी महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होती ?३) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ?५) 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते कोण आहेत ? *उत्तरे :-* १) सुशीला कार्की २) सुशीला कार्की ३) वैनगंगा ४) मिताली राज ५) श्री श्री रविशंकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *डासांमुळे कोणते रोग होतात ?* 📙जेथे माणूस तेथे डास, हे अगदी खरे आहे. डास हे माणसाच्या विकासाचेच एक फळ आहे. भारतात अनेक प्रकारचे डास आढळतात. यात मुख्यतः ॲनोफिलस, क्युलेक्स, एडिस व मान्सोनिया इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सगळे डास सारखे दिसले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात खूप फरक असतो. डासांचे जीवनचक्र, विश्रांतीच्या व पोषणाच्या सवयी, भिंतीवर बसण्याची पद्धत, पैदास होण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण, शारीरिक वैशिष्टय़े, इत्यादींवरून वेगवेगळ्या डासांची ओळख पटवता येते.डासांमुळे हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, पीतज्वर, डेंग्यू इत्यादी रोगांचे संक्रमण होते. यांपैकी हिवताप व हत्तीरोग हे भारतातील महत्त्वाचे आरोग्यविषयक प्रश्न आहेत.ॲनोफिलस डासांच्या मादीमुळे हिवताप, तर क्युलेक्समुळे हत्तीरोग हे आजार रुग्णापासून निरोगी माणसांपर्यंत संक्रमित होतात. डासांचा नायनाट करण्यासाठी अनेक उपाय अवलंबावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे घरात व घराभोवती पाण्याची डबकी जमा होऊ न देणे. त्यात भर घालून ती बुजवावी, कारण त्यात डासांची पैदास होते. हे शक्य नसल्यास डबक्यांमध्ये रॉकेल व इंजिन ऑईल टाकावे. डीडीटीच्या नियमित फवारणीमुळे (वर्षांतून दोनदा) प्रौढ डासांवर नियंत्रण मिळवता येते. एवढे करूनही डासांची समस्या न सुटल्यास स्वतःचे डासांच्या चाव्यांपासुन संरक्षण तरी करावे. यासाठी डासांना पळवून लावणारे मलम, तेल व अगरबत्ती इत्यादींचा वापर करता येतो. पण सगळ्यात उत्तम म्हणजे मच्छरदाणी.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रामकृष्ण गोविंद नारायण हरीकेशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग ||धृ||लक्ष्मी निवासा पाहे दिन बंधूतुझे लागे छदु सदा मज || १ ||तुझे नाम प्रेमी देई अखंडितनेणे जप तप दान काही || २ ||तुका म्हणे माझे हेची गा मागणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या मनात काय चालू आहे या विषयी कोणालाही पूर्णपणे माहित नसते. पण कोणाची का असेना परिस्थिती गंभीर असेल तर ती परिस्थिती लपल्याने कधीच लपत नाही. अशा लोकांविषयी माहिती असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही माणुसकी नाही. म्हणून कोणाला हसवता येत नसेल किंवा मदत करता येत नसेल तर निदान त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करून गंमत बघू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📕 *लाडूची चोरी*📕 ━━━━━━━━━━━━━*पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,''तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,'' यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,''देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.'' ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,'' देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.'' दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.**तात्पर्य :- भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment