✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा audiohttps://www.facebook.com/share/v/16B5DdRts6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.〉१८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.〉१९३६: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.〉१९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.〉१९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.〉१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.〉१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.〉१९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.〉१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.〉२००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.〉२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.〉२०२२: चार्ल्स (तिसरा) - चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) म्हणून घोषित करण्यात आले आहे🎂 जन्म :- १८७२: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)〉१८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)〉१८९२: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.〉१८९५: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.〉१९१२: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)〉१९४८: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)〉१९८९: भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.〉१९४१: जपानी गेम डिझायनर, गेम बॉयचे निर्माते गुंपेई योकोई यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर १९९७)〉१९४०: १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू जिम हाइन्स यांचा जन्म〉१९३२: भारतीय लेखक शेखर जोशी यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०२२)〉१९२३: सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती ग्लेन पी. रॉबिन्सन यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी २०१३)〉१८३९: फंक आणि वॅगनाल्सचे सह-संस्थापक आयझॅक के फंक यांचा जन्म (मृत्यू : ४ एप्रिल १९१२)〉१४२३: अस्तुरिया देशाची राजकुमारी एलेनॉर यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १४२५)🌹 मृत्यू :- १९००: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.〉१९२३: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)〉१९४८: बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.〉१९६४: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.〉१९७५: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.〉१९८३: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.〉२०००: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२१)〉२००६: टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.〉२०२२: भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण बी. बी. लाल यांचे निधन (जन्म: २ मे १९९१)〉२०१९: इटालियन कार्यकर्ता, नॅशनल व्हॅनगार्डचे संस्थापक स्टेफानो देल्ले चिआई यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १९३६)〉१९७९: अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचे निधन (जन्म: १७ सप्टेंबर १९२२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी श्री गोविंदभाई श्रॉफभाग - दुसरा ..... पूर्ण माहिती ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींच्या पंजाब-हिमाचल दौरा, हेलिकॉप्टरमधून तुटलेले पर्वत, पूल आणि बुडालेली शेती पाहिली; 1 वर्षीय मुलीला मांडीवर घेतले; पीडित कुटुंबांना भेटले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्राचे खासदार सीपी राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड, निवडणूक 152 मतांच्या फरकाने जिंकली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडचे विमानतळ उद्यापासून पुन्हा सुरू होणार, सर्व विमानसेवा पूर्ववत राहणार; जिल्हाधिकारी कर्डिले यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील कृषी विभागाच्या 13 हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव - संत मुक्ताई संस्थान कडून दुर्गाताई मराठे यांना आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात, आजभारत विरुद्ध यूएई यांच्यात होणार दुसरा सामना, Sony Liv वर रात्री 08 वाजता पाहता येणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ईश्वर येमूल, मा. नगरसेवक, नांदेड👤 संतोष पांडागळे, नांदेड जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ 👤 नागनाथ शिंदे, शिक्षक, धर्माबाद 👤 विजय गड्डम👤 प्रवीण भिसे पाटील 👤 साईनाथ लोसरे👤 विश्वबर पुपलवाड, धर्माबाद 👤 प्रसाद पुदेवाड👤 राजेश बाबुराव चिटकुलवार 👤 ज्ञानेश्वर इरलोड 👤 संभाजी साळुंके 👤 रोहित मुडेवार 👤 आकाश गाडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 70*"शब्दांच्या रांगा, पण आवाज नाही**ज्ञानाच्या खजिन्याचा मला अंत नाही.**उघडलं की जग नवं दिसतं**सांग बरं मी कोण आहे?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचं अज्ञान हे अपराधापासून मुक्त होण्याचं निमित्त होऊ शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे भरविण्यात येत आहे ?२) अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२५ चे जेतेपद कोणी पटकावले ?३) भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी विद्यापीठ उभारल्या जात आहे ?४) 'मौसिनराम' हे सर्वाधिक पर्जन्यासाठी ज्ञात असलेले गाव कोणत्या राज्यात आहे ?५) '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाचे लेखन कोणी केले ? *उत्तरे :-* १) अमरावती २) आर्यना सबालेंका, बेलारूस ( सलग दुसऱ्यांदा ) ३) अमरकंटक, मध्यप्रदेश ४) मेघालय ५) वि. दा. सावरकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 अश्रू व घाम खारट का लागतात ?📕घाम वा अश्रू खारट लागतात, याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यांतून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात. खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यांत येईल. उन्हाळ्यांत खूप घाम येतो. घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो.शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो. डोळ्यांतील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे, यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात. अश्रु व घाम या दोहोंमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम क्लोराईडच) ते खारट लागतात. हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात. या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आमुची माळीयाची जात l शेत लावू बागाईत llआम्हा हाती मोट नाडा l पाणी जाते फुलझाडा llशांति शेवंती फुलली l प्रेम जाई जुई व्याली llसांवत्याने केला मळा l विठ्ठल देखियेला डोळा ll ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काहीतरी करण्यासाठी मनावर घेतले तर सर्वच काही व्यवस्थितपणे पार पडत असते. त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. आणि त्या वेळेमुळेच आपली ओळख तर होतेच सोबतच ते कार्य करताना मनाला विशेष समाधान मिळते. म्हणून कोणतेही कार्य करताना सर्वजण साथ देतील असेही नाही.त्यातील काहीजण साथ देतील ते हजार लोकांपेक्षा महत्वाचे असतात.बाकींना त्याचे महत्व फारसे कळत नाही. म्हणून वेळेला महत्व देऊन वेळेतच कार्य करण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 कष्टाची कमाई श्रेष्ठ 📗 ━━━━━━━━━━━━*एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.**तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment