✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - https://www.facebook.com/share/p/199ugunDb4/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 255 वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :- १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.〉 १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.〉 १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.〉 १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.〉 १९३०: विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.〉 १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.〉 १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.〉 १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.〉 १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.〉 २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.〉 २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.〉 २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.〉 २०२२: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप - ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.〉 २०१३: व्हॉयेजर १ प्रोब - नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.〉 १९९२: स्पेस शटल एंडेव्हर - प्रक्षेपित केले. नासाचे हे ५०वे शटल मिशन चिन्हांकित आहे.〉 १९९२: में कॅरोल जेमिसन - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला बनल्या〉 १९९२: मामोरू मोहरी हे अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले〉 १९९२: स्पेस शटल एंडेव्हर - मार्क ली आणि जॅन डेव्हिस हे अंतराळात जाणारे पहिली विवाहित जोडी बनले.〉 १९६६: मिथुन ११ - नासाच्या जेमिनी कार्यक्रमाचे अंतिम मिशन〉 १९६२: जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, यांनी 'आम्ही चंद्रावर जाणे निवडले' (We choose to go to the Moon) भाषण दिले.〉 १९६१: आफ्रिकन आणि मालागासी युनियन (AMU) - स्थापना झाली.〉 १९५८: जॅक किल्बी - यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करताना प्रथम कार्यरत इंटिग्रेटेड सर्किटचे प्रात्यक्षिक केले.〉 १९४५: पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया - कोरियावरील जपानी राजवट संपवून कोरियाचे पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया घोषित करण्यात आले.〉 १९४३: दुसरे महायुद्ध - बेनिटो मुसोलिनी यांची जर्मन कमांडो सैन्याने नजरकैदेतून सुटका केली.〉 १९४२: दुसरे महायुद्ध - एडसन रिजची लढाई: ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान लढाईचा पहिला दिवस.〉 १९४८: स्वित्झर्लंड - देशाची फेडरल राज्य म्हणून स्थापना🎂 जन्म :-〉 १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.〉 १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.〉 १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.〉 १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)〉 १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)〉 १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)〉 १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)〉 १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.〉 १९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.〉 १९०२: ब्राझील देशाचे २१वे राष्ट्राध्यक्ष, चिकित्सक आणि राजकारणी ज्युसेलिनो कुबित्शेक यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९७६)〉 १८९२: अमेरिकन प्रकाशक, अल्फ्रेड ए. नॉफ, इंक. आल्फ्रेड ए. नॉफ सीनियर यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १९८४)〉 १८१२: रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक रिचर्ड मार्च हो यांचा जन्म (मृत्यू : ७ जून १८८६)🌹 मृत्यू :- 〉 १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.〉 १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.〉 १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)〉 १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)〉 १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)〉 १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)〉 १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)〉 १९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.〉 १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.〉 १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)〉 १९९६: ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी अर्नेस्टो गिझेल यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०७)〉 १९६२: भारतीय लेखक आणि नाटककार रंगेया राघव यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९२३)〉 १९४२: मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)〉 १८७४: फ्रेंच इतिहासकार आणि राजकारणी, फ्रान्स देशाचे २२वे पंतप्रधान फ्रँकोइस गुइझोट यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १७८७)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई : संस्काराची खाण*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवर सेवा मिळणार, आपले सरकारचे आता दुसरे व्हर्जन येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खोटी प्रमाणपत्रे जात बदलू शकत नाहीत, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेटीयर कशासाठी ? भुजबळांचा सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा 14 वा हप्ता बँकेत जमा; मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंबाबाई मंदिरात यंदा शारदीय नवरात्रात AI तंत्रज्ञानाचा वापर, मानवी चुका टळतील, सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळकटी; IIT भोपाळची तज्ज्ञ टीम कोल्हापुरात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवा, कुटुंब, समाज आणि पक्षांनी सहकार्य करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गेल्या 24 तासापासून सोलापुरात ढगफुटी सदृश पाऊस, रात्रभरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद;मोठे नुकसान झाल्याचे समोर, राष्ट्रीय महामार्ग ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी, पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड 👤 साहील सुगूरवाड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर 👤 शिवा शिवशेट्टे 👤 पुंडलिक बिरगले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 72*डोक्यावर बसते, पण पाय नसते**सूर्यापासून वाचवते, पण घर नसते**पाहिलं तर छान दिसते**सांगा बघू मी कोण असते ? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मोबाईल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाण्यात दगड टाकला, म्हणजे एका वलयातून दुसरे मोठे वलय निघते यशाचे तसेच आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा हॉकी आशिया चषक २०२५ चा किताब पटकावला ?२) ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा भरविण्यात येणार आहे ?३) घटनात्मकदृष्ट्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठेचे पद कोणते ?४) 'एज्युकेट गर्ल्स' या संस्थेची स्थापना २००७ साली कोणी केली ?५) मानवी शरीराचे तापमान कोणत्या ग्रंथीवर समतोल राखले जाते ? *उत्तरे :-* १) चौथ्यांदा २) १ व २ नोव्हेंबर २०२५ ३) उपराष्ट्रपती ४) सफिना हुसेन ५) हायपोथलमस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ? 📕गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी उकलिते वेणी - संत जनाबाई तुळशीचे बनीं । जनी उकलिते वेणी ॥१॥हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणि ॥२॥माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आकाशी झेप घेतल्यानंतर मागेएकदा अवश्य वळून बघावा. कारण त्यातील काहीजण आपले खरे मार्गदर्शक असतात, कोणी माणुसकीच्या नात्याने साथ देणारे व प्रत्येक सुख, दुःखात पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे असतात. असे नि:स्वार्थी लोक कधीच दिखाऊपणा करत नाही तर फक्त, आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशा देवमाणसांना विसरणे म्हणजेच आपल्या जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती गमावणे होय.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कावळा आणि मैना*📗 ━━━━━━━━━━*पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही, नाही, हि आमची बसायची जागा आहे तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्वराने सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्हणाले,'' आम्हाला तुझ्यासारखी बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्या ईश्वराकडे आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्ही तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल. मात्र दुस-या कोणत्या पक्ष्याविरूद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्याबाबतीतही तसेच झाले. मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्याच्याबरोबरच गाराही पडू लागल्या. गारा देखील मोठमोठया पडू लागल्या. गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कळेना की कोठे जावे. कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्या गोळीसारखा गारांचा मार त्यांना बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा (खोपा) तयार झाला. छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित व दु:खद होते. रात्रीच्या गारांच्या माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते. तिला त्याचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख असणा-या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले. दु:खात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो.**तात्पर्य :- ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment