✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा https://www.facebook.com/share/v/1Ge7GHBFAP/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.〉 १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.〉 १७९२: होप हिरा चोरला गेला.〉 १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.〉 १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.〉 १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.〉 १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.〉 १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.〉 १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.〉 १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.〉 १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.〉 १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.〉 १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.〉 २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.〉 २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.🎂 जन्म :- १८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.〉 १८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.〉 १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)〉 १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)〉 १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)〉 १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)〉 १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)〉 १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)〉 १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)〉 १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.〉 १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.〉 १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.〉 १९१२: भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी - पद्मश्री अप्पासाहेब पंत यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर १९९२)〉 १८६४: अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचा जन्म (मृत्यू : ११ जून १९०३)🌹 मृत्यू :- १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.〉 १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)〉 १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)〉 १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)〉 १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)〉 १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.〉 १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.〉 १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.〉 १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)〉 १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.〉 १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)〉 २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.〉 २०२२: भारतीय अभिनेते आणि खासदार कृष्णम राजू यांचे निधन (जन्म: २० जानेवारी १९४०)〉 २०२२: भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १९२४)〉 २०२०: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचे निधन (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)〉 २०२०: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९३९)〉 २०१५: भारतीय कवी आणि अभ्यासक जसवंत सिंग नेकी यांचे निधन (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)〉 १९६६: अमेरिकन उद्योजक, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक कॉलेट ई. वूलमन यांचे निधन (जन्म: ८ ऑक्टोबर १८८९)〉 १९५७: भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते इमानुवेल देवेन्द्रर यांचे निधन (जन्म: ९ ऑक्टोबर १९२४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिकांचा *भाग तिसरा - कर्मयोगी साहेबराव बारडकर*यांची माहिती वरील link द्वारे जरूर ऐका आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवावे. धन्यवाद .......!~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप २३ दिवसांनंतर मागे, १३ मागण्यांना आरोग्यमंत्र्यांनी दिली तत्वतः मान्यता ; कामकाज रुळावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी, पक्षाची नवी मुख्य कार्यकारी समिती जाहीर, शिंदेंच्या नेतृत्त्वात 21 शिलेदारांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीयूसी नसल्यास पेट्रोल–डिझेल मिळणार नाही, राज्यात 'नो पीयूसी नो फ्युएल' नियम लागू होणार, परिवहन मंत्री सरनाईकांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार, दसरा मेळावा घेण्यास महापालिकेची परवानगी, मेळाव्यासाठी घातल्या 25 अटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुण्यात, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवनात होणार आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; आज सकाळी आष्टी ता. हदगाव येथे अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - दुसऱ्या सामन्यात भारताने यु ए ई चा 9 विकेटने केला पराभव, कुलदीप पवारने घेतले चार विकेट *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड 👤 दिगंबर वंगरवार, नांदेड 👤 अमोल वसंतराव पाटील 👤 गणेश यादव 👤 भगवान वाघमारे 👤 सुनील महामुनी 👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 71*सांग सांग बघू, मी हातात येतो,**बोलणे, लिहिणे, खेळणे करतो.**जगभरातील बातम्या दाखवतो,**पाय नाहीत तरी ही फिरवतो.**मी कोण?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पुस्तक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्य ज्याप्रमाणे आतून बाहेरून निर्मळ व तेजस्वी असतो, त्याप्रमाणे सज्जनांचे अंत:करण अंतर्बाह्य निर्मळ व तेजोमय असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?२) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला ?३) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?४) भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडणूक जिंकून आले आहेत ?५) 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' या ग्रंथाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) स्वामी विवेकानंद २) ११ सप्टेंबर २००१ ३) उपराष्ट्रपती ४) सी. पी. राधाकृष्णन ५) न्या. महादेव रानडे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ?* 📕थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरिला पंढरीचा चोर - संत जनाबाई धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रम केल्याने एकदाचे शरीर थकते पण मन कधीच थकत नाही. आणि मन कुठे,कधी घेऊन जाईल त्याचेही कधीच सांगता येत नाही. म्हणून बरेचदा आपल्यासोबत नको ते घडत असते. आणि अनेकदा अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. म्हणून परिस्थिती कशीही असेल तरी हिंमत हारू नये म्हणतात ना की, हिंमत आपल्यात असल्यावर बरंच काही चांगले होत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦋 ❒ घोडा आणि नदी ❒ 🦋*_एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.* *मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".* *मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.* *कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment