✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1HQD9WdgLw/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अन्न दिन_* *_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_* •••••••••••••••••••••••••••••••• 🚩 महत्त्वाच्या घटना :-*१९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स, स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९२३: वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी ’द वॉल्ट डिस्ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८४६: डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी अॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.*🎂 जन्म :- *१९९१: शार्दुल ठाकूर -- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी, लेखक* *१९६८: किसन दत्तात्रय उगले -- लेखक, कवी**१९६५:भवानी शंकर -- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१: जयश्री सुधीर देसाई -- लेखिका, अनुवादक**१९६०: डॉ. रमा मराठे -- लेखिका, कवयित्री* *१९६०: मकरंद विनायक सापटणेकर -- लेखक**१९५९: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जून २०१०)**१९५४: दिलीप गंगाधर कल्याणी -- कवी, लेखक**१९५४: मंजुषा मनोहर शिनखेडे -- कवयित्री, लेखिका**१९५०: अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८: हेमा मालिनी – प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०: नरेंद्र चंचल -- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त (मृत्यू: २२ जानेवारी २०२१ )**१९३८: डॉ. शामला वनारसे -- मानसोपचारतज्ज्ञ, लेखिका**१९३६: वसंत दामोदर भट -- लेखक, व्याख्याते**१९१७: इंदुमती रामकृष्ण शेवडे -- कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू: १४ मार्च १९९२ )**१९१६: शकुंतला ना. दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर -- लेखक (मृत्यू: १२ एप्रिल १९७७ )**१९०७: सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू: ४ आक्टोबर १९८२ )**१८९६: सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू: १८ जून १९७४ )**१८९०: अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७ )**१८८६: गिरिजाबाई महादेव केळकर -- कादंबरीकार, नाटककार (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९८०)**१६७०: बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू: ९ जून १७१६ )* 🛟 मृत्यू :-*२०१७: लेख टंडन -- भारतीय निर्माता आणि अभिनेता ( जन्म: १३ फेब्रुवारी १९२९ )**२०१६: केर्सी लॉर्ड -- भारतीय संगीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९३५ )**२०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो. पु.) -- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक (जन्म: २ ऑगस्ट, १९३८ )**२००२: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३ )**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९५०: वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: १८८५ )**१९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: १८८७ )*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान मिळविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. याविषयी पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बिहार निवडणूक: भाजपची 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 1 दिवस आधी पक्षात आलेल्या मैथिली ठाकूरला तिकीट, माजी IPS आनंद मिश्रांना बक्सरमधून उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली - नसात मध्ये काही अटींसह ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी, 17 ते 21 ऑक्टोबरपर्यंत परवानगी; CJI म्हणाले- पर्यावरणाशी तडजोड नाही, संतुलित दृष्टिकोन हवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *2040 पर्यंत भारताची मानवी चांद्र मोहीम- इस्रो प्रमुख, स्वदेशी मानवी अंतराळ मोहीम गगनयान 2027 मध्ये सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती, शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नाशिकसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उद्यापासून राज्यातील शाळा महाविद्यालयांना दिवाळी सुट्टी प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷 🄳🄰🅈 *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तप्रसाद यंगुलदास, नांदेड 👤 राम पाटील भांगे, मुगटकर 👤 साईकुमार पाटील शिंदे 👤 संदीप अकोलकर 👤 साईनाथ कळसे पाटील 👤 दिगंबर शिंदे पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 101*असं काय आहे, ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही वाचू शकत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कॅरम बोर्ड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अविरत उद्योग हा शांती समाधानाचा अखंड पाया होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो ?३) पृथ्वीवर सर्वप्रथम सूर्यकिरण कोणत्या राज्यात पडतात ?४) सर्वात कमी सामन्यात ( ११२ सामने ) आणि सर्वात कमी चेंडूत पाच हजार धावांचा पल्ला गाठणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ?५) 'गुरुवार'चे जुने नाव काय होते ? *उत्तरे :-* १) जोएल मोकिर, पिटर हाविट, फिलिप एगियोन २) १६ ऑक्टोबर ३) अरुणाचल प्रदेश ( डोंगा गाव ) ४) स्मृति मानधना, भारत ५) बृहस्पतवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात.अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखाचे हे नाम आवडीने गावेवाचे आळवावे विठोबासी || धृ ||संसार सुखाचा होईल निर्धारनामाचा गजर सर्व काळ || १ ||कामक्रोधाचे चलेची काहीआशा मनशा पाही दूर होती || २ ||आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरीम्हणतसे महारी चोखियाची || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याला तेल, तिखट मीठ लावून गोड शब्दात कोणाच्या विषयी सांगत असतील तर त्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.कारण सांगितलेले प्रत्येक शब्द खरे असतीलच असे नाही. कारण त्या सांगण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ सुद्धा कुटून भरलेला असतो.म्हणून स्वतः त्या व्यक्तीला ही वाचावे व ज्या व्यक्तीविषयी ऐकायला मिळाले असेल त्या व्यक्तीला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करून बघावा. बरेचदा सांगण्यावर विश्वास ठेवल्याने शेवटी पश्चातापात पडण्याची वेळ आपल्यावर येत असते आणि त्यावेळी कायमची वेळ निघून गेलेली असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजा आणि संतएका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment