✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_••••• नूतन वर्षाभिनंदन २०२४ •••••_**_धूम्रपान विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२:डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९:गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९:क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३:पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०:विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२:इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८:महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२:बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८:यू.एस.ए.मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६:निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:गणेश प्रल्हादराव आघाव-- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९७६:वि.दा.पिंगळे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७६:शेख बिस्मिल्ला शेख कासिम-- कवी**१९७४:आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी,गायक**१९७३:प्रा.युवराज तानाजीराव खरात-- कवी,कथाकार,कादंबरीकार**१९७२:भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१:सीमा गजानन भसारकर-- कवयित्री**१९७०:हरिश्चंद्र रामचंद्र धीवार-- कवी**१९७०:प्रा.डॉ.सुनील रामटेके--- कवी,लेखक* *१९६९:डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६८:प्रा.डॉ चंद्रकांत वाघमारे-- प्रसिद्ध लेखक* *१९६८:राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव)-- कवी* *१९६६:प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार-- प्रसिद्ध लेखक**१९६२:संजय आर्वीकर- प्रसिद्ध लेखक,कवी, समीक्षक* *१९६०:डॉ.सुरेश गोविंदराव सावंत-- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक,विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९:नंदन नांगरे -- लेखक, तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५५:शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील-- शाहीर,लेखक**१९५२:यशवंत राजाराम निकम-- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१:नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१:शंकर गोविंदराव पांडे-- लेखक**१९५२:शाजी नीलकांतन करुण-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०:तुकाराम सीताराम ढिकले--कवी**१९५०:दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०:राहत इंदोरी -राहत कुरेशी-- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी(मृत्यू:११ऑगस्ट २०२०)**१९४८:नानासाहेब चिमणराव बोरस्ते-- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८:नामदेव चंद्रभान कांबळे-- मराठी साहित्यिक,पत्रकार,साहित्य अकादमी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू नहिरे-- कवी* *१९४६:डॉ.निवास पांडुरंग पाटील-- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ-- सुप्रसिद्ध कवी आणि लेखक* *१९४५:मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४३:रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक,पद्मश्री,पद्मभूषण**१९४३:मधुकर रूपराव वाकोडे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२:उत्तम बंडू तुपे--- मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ एप्रिल २०२०)**१९४१:गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६:राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू:२१ जुलै १९९७)**१९२८:डॉ.मधुकर आष्टीकर – लेखक,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)**१९२३:उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००३)**१९१८:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू:९ ऑगस्ट २००२)**१९०२:कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू:६ डिसेंबर १९७१)**१९००:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू:१४ फेब्रुवारी १९७४)**१८९४:सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:४ फेब्रुवारी १९७४)**१८९२:महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू:१५ ऑगस्ट १९४२)**१८७९:इ.एम.फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू:७ जून १९७०)**१८७८:हसरत मोहानी-- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू:१३ मे १९५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**१९८९:दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५:शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक,साहित्यिक व चित्रकार.(जन्म:८ आक्टोबर १८९१)**१९५५:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म:२१ फेब्रुवारी १८९४)**१९४४:सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म:२९ मार्च १८६९)**१८९४:हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२२ फेब्रुवारी १८५७)**१७४८:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म:२७ जुलै १६६७)**_ २०२४ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवीन वर्ष सुखाचे जावो*मित्रांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ, राज्यभर राबवणार ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश:गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार':पुण्यातील 'स्व'-रूपवर्धिनीच्या पुष्पा नडे आणि आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिल्या टप्याचं समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तामिळनाडूमधील पूरग्रस्तांना भारतीय हवाई दलाने केली मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उदगीर : क्रीडा विभागाच्या वाढीव तरतुदीने क्रीडा चळवळ प्रगल्भ होणार - क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो. साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात. मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम. जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राहूल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूर ते महाराष्ट्र दरम्यान कोणती यात्रा होणार आहे ?२) अयोध्या येथील विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?३) जगातील पहिला 'एआय' नियमन कायदा कोणता देश करणार आहे ?४) गुजरातचा पहिला केरोसीनमुक्त जिल्हा कोणता ?५) फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे ? *उत्तरे :-* १) भारत न्याय यात्रा, ६२०० किमी. ( १४ जाने. २०२४ ते २० मार्च २०२४ ) २) महर्षी वाल्मिकी विमानतळ ३) युरोपीय महासंघ ४) गांधीनगर ५) जपान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, ASP, मालेगाव, नाशिक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका👤 अशोक गायकवाड, साहित्यिक👤 अमरसिंग चौहान👤 सौ. छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी, साहित्यिक👤 धोंडीबा गायकवाड, शिक्षक व कवी👤 मुकुंद जोशी, शिक्षक👤 मधुकर गिरमे👤 पांडुरंग कोकुलवार, शिक्षक व कवी👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 सतीश शिंदे, पत्रकार, धर्माबाद👤 राजेंद्र जैस्वाल, कुपटी ता. माहूर👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, गुरुकुल विद्यालय धर्माबाद👤 सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 दिलीप धामणे, शिक्षक व कवी, हिंगोली👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरें शोधितां शोधितां शोधिताहे। मना बोधिता बोधिता बोधिताहे॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगे। बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥सरळ अर्थ:सत्याचा शोध हा शोधता शोधता लागतो तसेच त्याचा बोधदेखील त्याला समजून घेता घेताच लागतो. पण यासाठी संतसज्जनांचा संग आवश्यक आहे आणि शिवाय मनात त्या सत्याचा शोध आणि बोध घेण्याविषयीची आस्था आणि दृढ भावना असणे देखील आवश्यक आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ब। क्षी। स* एका राजाची गोष्ट आहे. या राजाला आपल्या मंत्र्याच्या बुद्धीचीच नव्हे तर जनतेच्या ज्ञानीपणाची परीक्षा पहाण्याची लहर यायची. एके दिवशी दरबार भरल्यावर त्याने एक प्रश्न विचारला *" ईश्वर काय करू शकतो ? "*मंत्री व इतर दरबारी लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे ईश्वराच्या शक्तीबद्दलची उत्तरे दिली, पण राजाचं समाधान झालं नाही, राजाचा प्रधान अतिशय नाराज झाला व तशाच अवस्थेत घरी आला.बापाची नाराजी मुलीच्या लक्षात येताच तीने त्या बद्दल विचारले. प्रधानाच्या खुलाशानंतर ती त्याला म्हणाली, 'मी उद्या दरबारात येते आणि या प्रश्नाचं उत्तर देते?." दुसऱ्या दिवशी ती दरबारात आली, "मी तुमच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे" असं तिनं राजाला सांगितलं.राजा आश्चर्यचकित झाला आणि तिला उत्तर सांगण्याची आज्ञा केली. "पण त्या साठी माझी एक अट आहे," ती म्हणाली.'कसली अट ?' राजाने विचारले . 'तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हवं असेल तर सिंहासना वरून खाली उतरावं लागेल आणि मी जिथे बसलेय तिथे येऊन बसावं लागेल."लागलीच राजा खाली उतरला तशी प्रधानाची मुलगी सिंहासनावर जाऊन बसली. सारा दरबार स्तब्ध झाला. राजा शांतपणे ती काय म्हणते याची प्रतिक्षा करत राहिला.राजाची नजर पाहून ती म्हणाली, "महाराज! मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर केव्हाच दिले आहे !"'पण मला समजलं नाही, काय उत्तर आहे ते ?''ईश्वर काय करू शकतो, हाच तुमचा प्रश्न आहे ना ?''होय.''मग पहा, काही क्षणापूर्वी तुम्ही या सिंहासनावर विराजमान होतात आणि मी जमिनीवर होते. आता तुम्ही जमिनीवर आहात आणि मी सिंहासनावर आहे..! ईश्वर असंच करीत असतो.सिंहासनावर बसलेल्याला मुदत पूर्ण झाली की, जमिनीवर बसवतो, तसंच जमिनीवरच्याला क्षणांत सिंहासनावर बसवितो.' उत्तर ऐकून दरबार चकीत झाला. राजा अंत:करणापासून खुश झाला व म्हणाला, "मुली, मी खुश झालोय व तूला वीस हजार सुवर्ण मोहरा बक्षीस देतोय!"मुलगी निर्विकार चेहरा करून ती राजाला म्हणाली, 'बक्षीस देत्याइतकं सामर्थ्य तुमच्यात नाही, महाराज!''कां बर, मी राजा आहे ना इथला ?' 'या क्षणी मी सिंहासनावर बसली आहे, ज्याचं सिंहासन त्याचं राज्य ! आज राज्य माझेकडे आहे आणि तुमच्याकडे काहीचं नाही.व बक्षीस देण्याचे सामर्थ्य आज माझेकडे आहे !''तुमची नम्रता पाहून मीच प्रसन्न झाले आहेतुम्ही मला वीस हजार सुवर्ण मुद्रा देण्याची गोष्ट करताय, पण मी तुम्हाला हे राज्य बक्षिसा दाखल देत आहे आणि पुन्हा सिंहासनावर विराजमान होण्याची विनंती करीत आहे,,!'ती लगबग सिंहासनावरून उतरली व राजाला सन्मानाने सिंहासनावर बसविले..!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
निरोप सरत्या वर्षाला गोड,कडू आठवणीत वर्ष हे संपते सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर मन सतत झुलतेजुळत गेले नाते मैत्रीचे अन् आपुलकीचे मनाचा गाभाऱ्यात जपुयाक्षण क्षण आनंदाचेवर्षे संपता आठवणी त्या भुतकाळात जमा होतात, प्रारंभीपासून राहुयाआनंदी नववर्षाचा आगमनातप्रार्थना करते मनापासून नुतन वर्षे सर्वांना यशाचे, आनंदाचे आणि सुख समृद्धी,निरोगी आरोग्याचे जावेपूर्ण व्हावे तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना आनंदाचे क्षण नववर्षात भरभरून लाभावे तुम्हा सर्वांना देऊन निरोप सरत्या वर्षाला संकल्प नव नवे करूयाएकमेकांप्रती राग ,द्वेष विसरून सकारात्मकतेने राहूयासर्वांना नववर्षाचा शुभकामना 💐💐💐💐💐💐💐 (२०२४)➖➖➖➖➖➖➖✍️श्रीमती प्रमिला सेनकुडेता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/12/welcome-2024.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३:सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९२४:एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६:ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:वैशाली बाबुराव कोटंबे-- कवयित्री**१९६९:रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०:मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९:तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१:श्रीरात झिटूजी केदार-- कवी* *१९४६:डॉ.श्रीनिवास टोणपे-- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१:जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध मराठी इतिहास संशोधक**१९३८:स्नेहलता देशमुख-- प्रसिद्ध लेखिका**१९२६:दीनानाथ लाड-- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू:१२ ऑगस्ट २०१९)**१९२२:गोपाळ मोरेश्वर कोलते-- लेखक,कवी(मृत्यू:४ जानेवारी २००४)**१९०१:अनंत जनार्दन करंदीकर-- मराठी पत्रकार आणि राजकारण,इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक(मृत्यू:१ नोव्हेंबर १९७७)**१९०२:डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य-- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू:१७ जुलै १९५०)**१८७९:वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू:१४ एप्रिल १९५०)**१८८७:डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७१)**१८६५:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू:१८ जानेवारी १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मंगेश केशव पाडगांवकर-- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार(जन्म:१० मार्च१९२९)**२०१३:लक्ष्मी शंकर शास्त्री-- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका(जन्म:१६ जून १९२६)**२००६ :इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म:२८ एप्रिल १९३७)**१९९२:पिराजीराव रामजी सरनाईक-- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर(जन्म:२८ जुलै १९०९)**१९८७:दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन.दत्ता – संगीतकार* *१९८२:दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म:२ डिसेंबर १९१३)**१९८१:डॉ.अप्पासाहेब गणपतराव पवार-- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू(जन्म:५ मे १९१७)**१९७४:आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१:डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १९१९)**१९४४:रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म:२९ जानेवारी १८६६)**१६९१:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:२५ जानेवारी १६२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Good Bye 2023 - Welcome 2024*2023 या वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा ........!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राजस्थान, पंजाब, हरयाणा व उत्तरप्रदेशमध्ये धुक्याची चादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुष्काळसदृश्य तालुक्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येणार, गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, मनोज जरांगेंचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाजही आक्रमक, राज्यातील सर्व नेते पंढरपुरात जमले, 75 वर्षात न झालेला निर्णय होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, आवेश खानचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙***************************अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.~ वपु काळे | काही खरं काही खोटं*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली ?२) घुमर हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?३) कोणाच्या संकल्पनेतून हेमलकसा ( गडचिरोली ) येथे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ला सुरूवात केली ?४) वैयक्तिक युट्यूब चॅनेलला दोन कोटीहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारे पहिले जागतिक तसेच भारतीय नेते कोण ठरले आहेत ?५) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच कोणता उत्सव साजरा केला ? *उत्तरे :-* १) कोयासन विद्यापीठ, जपान २) राजस्थान ३) बाबा आमटे ४) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ५) शिवजयंती उत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद👤 निवृत्ती लोखंडे👤 राजेश्वर रामपुरे👤 साहेबराव कांबळे👤 आनंद यडपलवार, शिक्षक👤 संजय भोसीकर👤 भारत पाटील सावळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले होण्यासाठी विचार करणे अजिबात वाईट नाही. ही एक प्रकारची चांगली सवय आहे. पण,नको त्या गोष्टींच्या मोहात पडून विचार करत बसणे कुठेतरी आपलीच वेळ वाया घालवणे होय. म्हणून त्या गोष्टीचा नाद सोडून द्यावे व जिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल किंवा नवी दिशा मिळत असेल तर त्याच विषयी विचार करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले विचार आपले आधार होत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.*रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.*तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९३०:सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला* *१९५९:नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.**१९५९:पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:रुपाली भोसले -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९७९:डॉ.संदीप तपासे -- लेखक* *१९७३:ट्विंकल खन्ना--भारतीय लेखिका, स्तंभलेखक,इंटिरियर डिझायनर,चित्रपट निर्माता आणि माजी अभिनेत्री**१९६०:डेव्हिड क्लेरेन्स बून-- ऑस्ट्रेलियन क्रिकेट सामनाधिकारी,माजी क्रिकेट समालोचक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९५५:प्रा.डॉ.जयंत वेलणकर-- लेखक* *१९५५:डॉ.गुरुप्रसाद गोविंदराव पाखमोडे-- लेखक* *१९४७:अशोक वसंत नायगावकर-- सुप्रसिद्ध, ज्येष्ठ विनोदी कवी**१९४२:राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,निर्माते (मृत्यू:१८ जुलै २०१२)**१९३३:दत्तात्रय नारायण दीक्षित-- लेखक**१९१७:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू:१२ डिसेंबर २००५)**१९१४:गोविंद मल्हार कुलकर्णी-- मराठी साहित्यातील समन्वयशील वृत्तीचे समीक्षक.(मृत्यू:४ एप्रिल २००१)**१९०८:वासुदेव(भाऊसाहेब) वामन पाटणकर -- मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी (मृत्यू:२० जून १९९७)* *१९०४:कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू:११ नोव्हेंबर १९९४)**१९००:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू:२४ एप्रिल १९४२)**१८०८:अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:३१ जुलै १८७५)**१८००:चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू:१ जुलै १८६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:सुबीर सेन-- भारतीय पार्श्वगायक, ज्याने बंगाली आणि हिंदीमध्ये आधुनिक गाणी गायली(जन्म:२४ जुलै १९३४)**२०१२:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म:६ ऑक्टोबर १९४६)**१९८६:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:१० फेब्रुवारी १८९४)**१९८०:नानुभाई वकील-- हिंदी आणि गुजराती चित्रपट दिग्दर्शक(जन्म :२३ मे १९०२)**१९७९: राजाराम विनायक ओतुरकर-- भारतीय इतिहास संशोधक व इतिहासकार(जन्म:२४ऑक्टोबर १८९८)**१९७१:भाऊराव कृष्णाजी गायकवाड--ज्यांना दादासाहेब गायकवाड म्हणूनही ओळखले जाते,भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(जन्म:१५ऑक्टोबर१९०२)**१९६७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक,१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:२४ जून १८९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनी शिकवावे की .....*केंद्र शासनाच्या शैक्षणिक अहवालानुसार महाराष्ट्रातील शिक्षणाची स्थिती खूपच चिंताजनक आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहे. मुळात ज्या बालकाचे प्राथमिक शिक्षण पक्के असते ते भविष्यात प्रत्येक संकटावर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करते आणि एक यशस्वी नागरिक म्हणून जीवन जगते. म्हणूनच भारताने राईट टू एज्युकेशन कायदा अंमलात आणून देशातील प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचे मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ठरविले. तरी देखील राज्यातील शिक्षणाची स्थिती का सुधारली नाही ? यावर राज्यस्तरावर चिंतन होणे आवश्यक आहे .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *३० डिसेंबरला अयोध्येत पंतप्रधान मोदी एअरपोर्ट-रेल्वे स्टेशनचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘कोविड’ उपाययोजनांसाठी राज्यात नविन ‘टास्क फोर्स’ची स्थापना, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वंदे भारत एक्सप्रेस संभाजीनगरमध्ये दाखल, आजपासून होणार मुंबई जाण्यासाठी बुकींग सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गो-ग्रीन’द्वारे वीज ग्राहकांची 25 लाख रुपयांची वार्षिक बचत:20 हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील बिलांना 'टा-टा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉ. विजय माहेश्वरी अमरावती विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु, आज घेणार पदभार, डॉ. प्रमोद येवलेंकडे होते अतिरिक्त सूत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक विजयकांत यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. द. आफ्रिकेचा 1 डाव व 32 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेल्या *'लोक बिरादरी प्रकल्पा'* ला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाली ?२) गाडगेबाबांना 'खराट्याचा बादशहा' कोणी म्हटले आहे ?३) संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी किती देशांच्या सहप्रतिनिधींनी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' २१ जूनला साजरा करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता ?४) डॉ. प्रकाश आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ची स्थापना केव्हा केली ?५) हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार कोणत्या खेळात दिले जाते ? *उत्तरे :-* १) ५० वर्षे २) आचार्य अत्रे ३) १७५ देश ४) २३ डिसेंबर १९७३ ५) कुस्ती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष कंदेवार, लेखाधिकारी👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥जनीं पाहता पाहणे जात आहे।मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत: च्या विषयी विचार न करता समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांनाच वारंवार अपमान सहन करावा लागतो. आणि तेही सहन करण्यासाठी खूप मोठे काळीज असावे लागते. त्या प्रकारचे काळीज व सहनशीलता प्रत्येकांपाशी असेलच असे नाही. म्हणून कोणाचाही अपमान करू नये. आजपर्यंत अपमान सहन करणाऱ्यांचाच गजर करताना बघायला मिळत आहे व समोरही करताना बघायला मिळेल... पण, जे दुसऱ्यांचा अपमान करून स्वतः चा समाधान करतात त्यांचा गजर तर नाहीच पण, साध्या लहान मुलाच्या मुखातून आदराने त्यांचे नाव घेताना ऐकायला मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.*तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१८९५:ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५:मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६:आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६:स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२:गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:कुंदा बच्छाव -शिंदे-- लेखिका* *१९७९:प्रशांत मंगरु भंडारे-- कवी* *१९७५:राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६२:प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०:दयानंद घोटकर-- पाश्वगायक, संगीतकार,लेखक,कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०:प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९५२:अरुण जेटली –माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू:२४ ऑगस्ट,२०१९)**१९४८:वि.ग.सातपुते-- भावकवी,व्याख्याते, लेखक* *१९४६:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(मृत्यू:२६ जानेवारी २०१८)**१९४५:वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू:१ जून २००१)**१९३७:रतन टाटा – उद्योगपती**१९३६:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार(मृत्यू:१९ एप्रिल २००३)**१९३४:बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले-- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(मृत्यू:३० जुलै २०१२)**१९३२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू:६ जुलै २००२)**१९३१:देवीदास तुकाराम बागूल-- लेखक, छायाचित्रकार,कथाकार**१९२६:हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू:१० ऑगस्ट १९४२)**१९११:फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:१६ मे १९९४)**१९०३:पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर-- मराठी पोवाडेकार**१८९९:उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक(मृत्यू:३१ जुलै १९४०)**१८९९:गजानन त्र्यंबक तथा ग.त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार,समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९७६)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे-- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू:२३ आॅगस्ट १९७४)**१८५६:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:३ फेब्रुवारी १९२४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म:३० सप्टेंबर १९३३)**२००३: चिंतामण गणेश काशीकर--वेदशास्त्र अभ्यासक,लेखक(जन्म:१७ ऑगस्ट १९१०)**२०००:मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म:२४ जानेवारी १९२४)**१९८१:हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म:१९०९)**१९७७:सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म:२० मे १९००)**१९३१:आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६०)**१६६३:फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२ एप्रिल १६१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुदक्षिणा*मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * ‘साने गुरूजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार, 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर रोडवर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोलण्याच्या जादूने अनेकांचं आयुष्य बदलणारा वक्ता हरपला, मोटिवेशनल स्पीकर वैभव कथारेचा अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत के एल राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'महाराष्ट्राचे शिल्पकार'* कोणाला म्हणतात ?२) जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?३) 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव कोणत्या वर्षी मांडला होता ?४) भारतातील अक्षरधाम मंदिर कोणत्या शहरात आहे ?५) माती व चुनखडक योग्य प्रमाणात मिसळून कोणते सिमेंट तयार केले जाते ? *उत्तरे :-* १) यशवंतराव चव्हाण २) मेघालय ३) सन २०१४ ४) दिल्ली ५) पोर्टलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक👤 श्रीधर सुंकरवार, पद्मशाली नेते, नांदेड👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 अजय तुम्मे👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती👤 नंदकिशोर सोवनी, पुणे👤 ओमसाई सितावार, येवती👤 ओमकार ईबीतवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निराकार आधार ब्रह्मादिकांचा। जया सांगतां शीणली वेदवाचा॥ विवेके तदाकार होऊनि राहें। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात असे अनेक क्षण येतात आणि क्षणात निघूनही जातात. पण ज्या क्षणातून आपल्याला काही शिकायला मिळाले असेल किंवा अनुभव आले असतील तसेच मार्गदर्शन मिळाले असतील तर त्यांना क्षणांना कधीही विसरू नये. जीवनात आपल्याला बरेच काही मिळवता येते पण,गेलेले क्षण कधीच परत पुन्हा मिळवता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!*तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७५:बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.**१९४९:इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५:२९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.**१९११:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:खेमचंद गणेश पाटील -- लेखक**१९७९:हबीब भंडारे--प्रसिद्ध लेखक व कवी**१९६९:आश्लेषा महाजन-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६७:संध्या विजय दानव-- लेखिका**१९६६:किरण अग्रवाल-- अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक**१९६५:सलमान खान -- प्रसिद्ध चित्रपट अभिनेता,चित्रपट निर्माता* *१९५४:जगदीश छोटू देवपूरकर -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४४:विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू:२ फेब्रुवारी २००७)**१९३८:आशा भालचंद्र पांडे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,मराठी,हिंदी,संस्कृत,इंग्रजी भाषेत लेखन,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९३६:सुधीर देव-- कवी,माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक (मृत्यू:२३ आक्टोबर २०२०)**१९२८:निर्मला गोपाळ किराणे-- जुन्या पिढीतील लेखिका(मृत्यू:२३ सप्टेंबर २०२२)**१९२७:सुमती देवस्थळे-- चरित्रकार(मृत्यू:२२ जानेवारी १९८२)**१९२७:बाळ गंगाधर देव-- लेखक* *१९२३:श्री.पु.भागवत -- संपादक आणि प्रकाशक (मृत्यू:२१ ऑगष्ट २००७)**१९१७:निर्मला वसंत देशपांडे--कवयित्री, कादंबरीकार(मृत्यु:१ मे २००८)**१९०४:वसंत शांताराम देसाई --नाटककार, समीक्षक,कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यु:२३ जून १९९४)**१८९२:रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन-- ज्योतिष्याभ्यासक,ग्रंथकार (मृत्यू:१९ डिसेंबर १९६८)* *_१८९८:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(मृत्यू:१० एप्रिल १९६५)_**१८२२:लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२८ सप्टेंबर १८९५)**१७९७:मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू:१५ फेब्रुवारी १८६९)**१६५४:जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१६ ऑगस्ट १७०५)**१५७१:योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१५ नोव्हेंबर १६३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:विकास सबनीस --प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार (जन्म:१२ जुलै १९५०)**२००७:पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म:२१ जून १९५३)**१९७२:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२३ एप्रिल १८९७)**१९२३:गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म:१५ डिसेंबर १८३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे*जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस इंफाळ नौदलात झाली दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यूट्यूबवरही PM मोदींचा डंका, सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळवणारे बनले पहिले राजकारणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राखीव आसन व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून एक जानेवारीपासून राखीव आसन क्रमांकामध्ये बदल करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात बोलावणार बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; भारताची आक्रमक भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेन जे मेंटेनन्स यार्डमध्ये उभी होती, त्यास भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦈🐟 *मासे* 🐟🦈 ********************मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक👤 विठ्ठलभाई श्रीगांधी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुटेना तुटेना चळेना ढळेना।सदा संचले मीपणे ते कळेना॥ तया एकरूपासि दूजे न साहे। मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जुने, पुराने किंवा फाटके कपडे घालून दिसणारी व्यक्ती भिकारी व लाचार असेलच असे नाही. समाजात राहणाऱ्या प्रत्येकांची राहणीमान, तसंच स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणून कोणाच्याही विषयी पूर्ण माहीती न घेता त्यांनी घातलेल्या कपड्याकडे बघून त्याला लाचार समजू नये किंवा त्याची लायकी काढू नये. सांगता येत नाही कधी कोणाचे दिवसं निघतील.. आणि आपल्याला पश्चातापात पडण्याची वेळ येईल कारण प्रत्येकांकडेच त्या प्रकारची अजरामर संपत्ती नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *यशाचे बिजगणित*आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली.या लाटेने भारत,श्रीलंका,इंडोनेशिया,थायलँड, मलेशिया,मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.**१९९७:विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार**१९८२:टाइम (TIME) मासिकातर्फे* दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला**१९७६:कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.**१८९८:मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:सुनिता संदीप तांबे-- कवयित्री, लेखिका**१९६१:वृषाली विक्रम पाटील-- कवयित्री, लेखिका**१९६१:मिलिंद सुधाकर जोशी -- कवी, व्याख्याते* *१९५४:सुरेश पाचकवडे -- प्रसिद्ध कवी, कथाकार* *१९५१:प्रा.नीला विनायक कोंडोलीकर-- लेखिका**१९४९:सुरेखा भगत-- कवयित्री* *१९४८:डॉ.प्रकाश आमटे-- प्रसिद्ध समाजसेवक,लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९४१:लालन सारंग – मराठी नाट्यअभिनेत्री,लेखिका (मृत्यू:९ नोव्हेंबर २०१८)* *१९३५:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू:२७ डिसेंबर १९९९)**१९३८:दत्तात्रय दिनकर पुंडे-- मराठीतील ख्यातनाम समीक्षक,भाषाभ्यासक आणि संपादक* *१९२८:मार्टिन कूपर--- अमेरिकन अभियंता, मोबाईल फोनचे जन्मदाते* *१९२५:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी’ गिंडे – शास्त्रीय गायक,संगीतकार व शिक्षक (मृत्यू:१३ जुलै १९९४)**१९१७:डॉ.प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.(मृत्यू:१७ जून १९९१)**१९१४:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (मृत्यू:९ फेब्रुवारी २००८)**१९१४:डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री,महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर,गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू:३ जानेवारी २०००)**१८९३:माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू:९ सप्टॆंबर १९७६)**१७९१:चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू:१८ आक्टोबर १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म:१५ सप्टेंबर १९२१)**२०००:प्रा.शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक(जन्म:११मार्च १९१२)* *१९९९:शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म:१९ ऑगस्ट १९१८)**१९८९:केशवा तथा के.शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक,भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,पद्मविभूषण (१९७६) (जन्म:३१ जुलै १९०२)**१९७२:हॅरी एस.ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ मे १८८४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दत्त जयंती*मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ' हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. *संकलन*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाच्या निर्मितीपासून ते समाजाच्या निर्मितीपर्यंत ख्रिस्ती समुदायाचं मोठं योगदान - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 24 तासात 656 नवे रुग्ण; 3742 सक्रिय कोरोनाबाधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच महेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या:रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली; मरणापूर्वी लिहिली होती सुसाईट नोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *लस म्हणजे काय ?* 💉*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.**बर्याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.**शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.**आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ ) २) मुरलीधर देवीदास आमटे ३) बाबा आमटे ४) आनंदवन ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर👤 नागराज राजेश्वर डोमशेर👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद👤 कपिल जोंधळे👤 अशोक लंघे👤 शादूल शेख👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी। अकस्मात आकारले काळ मोडी॥ पुढे सर्व जाईल कांही न राहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद व चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर त्यातून जे समाधान मिळत असते तो,समाधान जगावेगळा असतो. पण, एखाद्या व्यक्तीकडून आपण करत असलेल्या कार्याला वारंवार विरोध होत असेल, वाट अडवणे होत असेल किंवा निंदा होत असतील तर जास्त मनावर घेऊ नये.कारण मेंदू तर प्रत्येकांपाशी असतो फरक एवढाच की, प्रत्येकांची विचारसरणी मात्र एकसारखी नसते म्हणून त्यांना त्यांचे काम करू द्या आपण आपले काम करत रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय गणित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:प्रसिद्ध रंगकर्मी के.एन.पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१८५१:जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.**१८८५:सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:ईशा तलवार-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८४:भूषण वर्धेकर-- कवी* *१९७५:आशा खरतडे-डांगे -- कवयित्री* *१९७३:प्रा.डॉ.संदीप रंगनाथ तापकीर -- लेखक**१९६८:अरुणा गजानन कडू -- कवयित्री* *१९६२:प्रा.प्रकाश जनार्दन कस्तुरे-- प्रसिद्ध लेखक**१९५८:डाॅ.आनंद नाडकर्णी-- मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ**१९५७:धनंजय वसंतराव मुजुमदार-- प्रसिद्ध लेखक* *१९५५:अभय वसंत मराठे -- लेखक* *१९५४:वासुदेव नामदेवराव राघोते -- कवी, लेखक तथा पूर्व प्राचार्य**१९४९:डॉ.सुभाष कृष्णराव पाटील-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४१:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (मृत्यू:२६ मार्च२०१०)**१९०१:वामन श्रीधर पुरोहित -- लेखक,शिक्षण तज्ज्ञ(मृत्यु:१९ सप्टेंबर १९७५)**१८८७:श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती.'पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.(मृत्यू:२६ एप्रिल १९२०)**१८८२:डॉ.बाळकृष्ण -- नामवंत शिक्षणतज्ज्ञ, थोर इतिहासकार आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाराम महाविद्यालयाचे पूर्व प्राचार्य( मृत्यू:२१ ऑक्टोबर १९४०)**१८५३:भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू:२१ जुलै १९२०)* *१६६६:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू:७ आक्टोबर १७०८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म:२२ जुलै १९३७)**२००२:दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते* *१९९६:रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे-- संगीत समीक्षक व पत्रकार**१९८९:सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार,कवी आणि दिग्दर्शक (जन्म:१३ एप्रिल १९०६)**१९७५:वसंत देसाई-- मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार(जन्म:९ जून १९१२)**१९४५:श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ -- रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म:११ नोव्हेंबर १८६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर कॅलेंडर कुछ कहता है ।31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतावरील कर्जाचा बोझा वाढला, 205 लाख कोटींवर पोहचला आकडा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिओ ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लष्कराच्या 2 वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद; पाकिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, नगरमध्ये उपचार सुरु असताना घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावा ने पराभव करत 2-1 ने मालिकाही जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माळेगाव यात्रा*माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती. खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्नांची पाऊले पडले की, यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून सर्वात जास्त बोली कोणावर लागली ?२) भारतात दयेचा अधिकार कोणाला आहे ?३) 'लिटल मास्टर' असे कोणाला म्हणतात ?४) 'मिठागराचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) १९२० मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषविले ? *उत्तरे :-* १) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( २४ कोटी ७५ लाख, केकेआर ) २) राष्ट्रपती ३) सुनील गावस्कर, भारत ४) रायगड ५) राजर्षी शाहू महाराज *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल पाटील👤 अजय गवळी👤 दिलीप डोम्पलवार👤 अनिल यादव👤 सौ. राजश्री शिवराज भुसेवार, मा. शिक्षिका, नांदेड👤 अजय डाकोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझं तू जरा ऐक मी तुझे सर्व काम करून देतो. असं जर कोणी आपल्याला म्हणत असेल तर होकार देण्याआधी त्या व्यक्तीला वाचणे गरजेचे आहे सोबत त्यावर खोलवर जाऊन विचार करणे आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की, त्या विषयावर विचार न करता होकार देल्याने केसानी गळा कापल्या जाते म्हणून जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. तेही आपल्यावरच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रुपयांची गोष्ट*एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली. तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई असते. त्याची किंमत ही कष्ट घेतले की मगच कळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८६:रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.**१९१३:ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:डॉ.वैजंतीमाला जाधव-भोसले-- लेखिका,संपादिका* *१९८०:रमेश सुरेश पडवळ-- ज्येष्ठ पत्रकार,लेखक**१९७६:डॉ.हेमलता विजय काटे-- कवयित्री, लेखिका**१९७३:विवेक रंजन अग्निहोत्री-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६८:माणिक क.नागावे-- कवयित्री, लेखिका**१९६८:वीरधवल परब-- प्रसिद्ध कवी**१९६३:सुरेंद्र रावसाहेब पाटील-- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९६३:गोविंदा – हिन्दी चित्रपट सुप्रसिद्ध कलाकार**१९५९:कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज,क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष**१९५९:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू(मृत्य़ू:२१ सप्टेंबर १९९८)**१९५४:ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५१:सुभाषचंद्र जाधव-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९४२:शुभांगी भरभडे-- प्रसिद्ध राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार,कथाकार,नाटककार संस्थापक अध्यक्ष पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान**१९३५:दत्ता टोळ-- मराठी लेखक,त्यांचे काही लिखाण 'अमरेंद्र दत्त' या नावाने केलेले आहे.**१९२१:पी.एन.भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश(मृत्यू:१५ जून २०१७)**१९१८:कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू:१४ जून २००७)**१९१४: गोविंद मल्हार कुलकर्णी-- जेष्ठ समीक्षक(मृत्यु:१ एप्रिल २००१)**१९०३:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि.लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक (मृत्य़ू:२ नोव्हेंबर १९९०)**१८४९:हरि माधव पंडित-- चरित्रलेखक (मृत्यू:१५ मार्च १८९९)**१८०४:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू:१९ एप्रिल १८८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:उषादेवी विजय कोल्हटकर-- लेखिका (जन्म:२४ मार्च १९४६)**१९९७:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.१९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(जन्म:४ जुलै १९१४)**१९९७:पं.प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक**१९९३:मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार* *१९७९:नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म:१५ एप्रिल १८९३)**१९६३:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म:१६ डिसेंबर १८८२)**१८२४:जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म:११ एप्रिल १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषण : एक समस्या*मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखी देखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. नुकतेच एक बातमी वाचण्यात आली की सध्या आठ मृत्यूपैकी एक मृत्यू या प्रदूषणामुळे होत आहे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साहित्य अकादमीकडून यंदाचे पुरस्कार जाहीर, मराठी कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किंमतीत 11.82 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 8.94 टक्के घट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भाचा जलद गतीने विकास करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘26 फेब्रुवारी’ रोजी होणार सुरू!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा मोठा सन्मान! अर्जुन पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?२) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) सूर्याची व ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?४) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'कैसर - ए - हिंद' पदवी कोणी परत केली ?५) मुंगी चावल्यानंतर कोणता Acid सोडते ? *उत्तरे :-* १) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) २) रायगड ३) Sextent ४) महात्मा गांधी ५) Formic Acid *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे दास सायास त्याचे करावे। जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥ गुरू अंजनेवीण तें आकळेना। जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनसंपत्ती असो किंवा इतर काही कोणी कशाप्रकारे कमावले व किती कमावले त्यांच्यापाशी कितीही असेल तरी ते आपले कधीच होत नाही. म्हणून त्याकडे लक्ष देऊ नये. आपल्यापाशी जे, काही आहे त्यातच समाधान मानावे कारण कष्टाने व संघर्ष करून कमावलेले जे काही असते ते, कधीच संपत नाही. मग ते आपल्या विचारसरणीतून कमावलेले असोत किंवा माणुसकी धर्म निभावून कमावलेले असोत ते कायम पर्यंत अजरामर राहतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.*तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_24.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर**१९९९:पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.**१९९४:राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान**१९७१:झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.**१९४५:मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.**१९२४:हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:डॉ.माधव सैनाजीराव कुद्रे-कंधारकर-- कवी**१९६९:तानाजी आसबे -- लेखक* *१९६८:प्रतिभा रवींद्र कुलकर्णी-- कवयित्री, लेखिका* *१९६८:प्रा.भारत काळे -- लेखक* *१९६६:प्रा.डॉ.राजेंद्र नाईकवाडे-- प्रसिद्ध लेखक,समीक्षक* *१९६०:रश्मी आनंद देवगडे-- कवयित्री* *१९५७:नंदिनी आत्मसिद्ध-- कवयित्री लेखिका**१९५२:शिरीष गोपाळ देशपांडे-- प्रसिद्ध लेखक,कवी,कादंबरीकार,* *१९५०:श्रीकांत रघुनाथ कोराभे-- लेखक, कवी* *१९४२:राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)**१९४०:नृसिंह दांडगे -- कवी,लेखक* *१९४०:यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका,पद्मश्री (१९६७)**१९३८:प्रा.मधुकर धोंडबा उपलेंचवार-- लेखक,सामाजिक कार्य**१९२८:मोतीलाल व्होरा-- माजी मुख्यमंत्री, राज्यपाल (मृत्यू:२१ डिसेंबर २०२०)**१९०६:चंदकांत विष्णू बावडेकर-- मराठी मुंबई साहित्य संघाचे १५ वर्ष कार्यवाह असणारे लेखक(मृत्यू:१९ जानेवारी १९७६)**१९०१:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१६ जानेवारी १९६७)**१८९०:जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.(मृत्यू:२७ मार्च १९६७)**१८६८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म:१८ फेब्रुवारी १९२६)**२०१०:सुभाष भेंडे – प्रसिद्ध लेखक (जन्म:१४ आक्टोबर १९३६)**१९९८:बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म:८ ऑगस्ट १९१२)**१९९६:कार्ल सगन –अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक.(जन्म:९ नोव्हेंबर १९३४)**१९९३:वामन नारायण तथा डब्ल्यू.एन.भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार* *_१९५६ : डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.(जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)_**१९३३:विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक,शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.(जन्म:२२ मे १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नामकरण ते अंतीम संस्कार*माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची .....पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एका महिलेचा समावेश, सावित्री जिंदाल या 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता प्रत्येक ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, राज्य कृषिमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; दक्षिणेतील राज्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात पॅट कमिन्सला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्कटिक टर्न हा पक्षी एका वर्षात किती किमीचा प्रवास करतो ?२) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) वैनगंगा व पैनगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?४) मानवी शरीराच्या वाढीसाठी किती खनिजे आवश्यक असतात ?५) भारतात टीव्हीवर रंगीत प्रसारणाची सुरूवात कोणत्या महान व्यक्तीच्या भाषणापासून सुरू झाली ? *उत्तरे :-* १) ३० हजार २) उस्मानाबाद ३) गोदावरी ४) २४ खनिजे ५) इंदिरा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी👤 विलास राऊत, मु.अ. रेणापूर, भोकर👤 देगावे एस टी👤 माधव कुद्रे, साहित्यिक, नांदेड👤 संदीप खंडागळे👤 रामेश्वर आत्राम👤 अश्फाक मोमीन*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध त्याचाच केला जातो जो नेहमीच सत्य बोलतो.विरोध त्याचाच केला जातो जो, व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडत नाही व आपला स्वाभिमान कुठेही विकत नाही, स्वतः च्या विषयी विचार न करता इतरांच्या भल्यासाठी कार्य करत असतो. त्यावेळी विरोध करणारे दुरचेच लोक असतात असेही नाही तर घरून तसेच जवळच्याच लोकांपासून सुरूवात होत असते. म्हणून सत्याच्या वाटेवर चालत असताना कितीही विरोध करणारे मिळाले तरी चालेल पण, आपण मात्र कोणाचा विरोध करू नये. जमेल तेवढे कार्य करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले करणाऱ्यांचेच विरोधक वाढत असतात व जो काहीच करत नाही त्याचे जीवन शुन्यासमान असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_गोवा मुक्ती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:व्ही.एन.खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८३:ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.**१९६३:झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.**१९६१:पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.**१९४१:दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.**१९२७:राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:संस्कृती संजय बालगुडे-- भारतीय अभिनेत्री**१९८४:अंकिता लोखंडे जैन-- भारतीय अभिनेत्री**१९७८:मनीषा कुलकर्णी अपशिंगकर-- कवयित्री**१९७६:मानव कौल-- भारतीय थिएटर दिग्दर्शक,नाटककार,लेखक,अभिनेता आणि चित्रपट निर्माता* *१९७४:रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट माजी कर्णधार व फलंदाज**१९६९:नयन रामलाल मोंगिया-- माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक**१९५६:प्रमोद मारुती उर्फ भाऊ मांडे-- इतिहासकार,कादंबरीकार (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१७)**१९५५:प्रदीप म्हैसेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९५४:प्रमोद मारुती मांडे-- प्रसिद्धभारतीय इतिहासकार आणि लेखक**१९५२:प्रकाश अकोलकर-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक* *१९४८:कमल शामराव कुरळे-- लेखिका* *१९४७:गजानन भास्कर मेहेंदळे-- मराठी इतिहास अभ्यासक**१९४३:प्रा.डॉ.लीला पाटील--शिक्षण तज्ञ, लेखिका* *१९४२:प्रा.कुंदबाला खांडेकर -- लेखिका* *१९४०:गोविंद निहलानी-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,सिनेमॅटोग्राफर,पटकथा लेखक आणि निर्माता**१९३४:यादवराव गोविंदराव कंदकूर्तीकर-- जेष्ठ इतिहास संशोधक* *१९३४:प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती**१९२८:प्रा.चंपा मधू लिमये-- लेखिका**१९२७:डॉ.वसंत कृष्ण वर्हाडपांडे-- प्रसिद्ध कथाकार,कवी,कादंबरीकार,नाटककार, समीक्षक,संपादक(मृत्यु:२९ जून १९९२)**१९२३:शालिनी अनंत जावडेकर--लेखिका**१९१९:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू:२१ फेब्रुवारी १९१९)**१९०६:लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू:१० नोव्हेंबर १९८२)**१८९९:मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू:११ नोव्हेंबर १९८४)**१८९४:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण,अरविंद मिल्स,अशोक मिल्स,अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले(मृत्यू:२० जानेवारी १९८०)**१८५२:अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (मृत्यू: ९ मे १९३१)**१८४९:नारायण हरी भागवत--निंबधलेखक, पत्रकार,चरीत्रकार (मृत्यू: एप्रिल १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चित्रा बेडेकर-- मराठी लेखिका (जन्म:७ ऑगस्ट १९४६)**१९९९:हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू,कुशल क्रीडा संघटक (जन्म:२४ मे १९३३)**१९९७:डॉ.सुरेन्द्र शिवदास बारलिंगे – कथाकार,कादंबरीकार,तत्त्वचिंतक,ललितलेखक,स्वातंत्र्यसैनिक,तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, (जन्म:२० जुलै १९१९)**१९५६:पांडुरंग श्रीधर आपटे-- गांधिवादी लेखक (जन्म:६ एप्रिल १८८७)**१९२७:राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म:११ जून १८९७)**१९१५:अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म:१४ जून १८६४)**१८६०:लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (जन्म:२२ एप्रिल १८१२)**१८४८:एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म:३० जुलै १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे स्वातंत्र्य .....?*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वीची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. ...........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घुसखोरीच्या मुद्यावर सोमवारी एका दिवसात राज्यसभेतून ४५ तर लोकसभेतून 33 खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *६ लाख ५६ हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने दुसरा अहवाल स्वीकारला, आता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कारवाई करावी ; मनोज जरांगे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केल ५.५ इतकी होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्यास शिक्षक भारती संघटनेचा विरोध, रस्त्यावर उतरणार, राज्य सचिव सुनील गाडगे यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल, गकेबरहाच्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर दुपारी साडे चार वाजता होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले.अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत. "त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग .संदर्भ : The Habit of Winning*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३३ व्या *'व्यास सन्मान'* या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते ?३) भारतीय राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण ?४) ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२३ साठी 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे ?५) जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते ? *उत्तरे :-* १) पुष्पा भारती ( यादी, यादें और यादें ) २) भुसावळ ३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ४) Rizz ५) गोड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर👤 शंकर जाजेवार, येताळा👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद👤 रविकुमार राऊत👤 सूर्यकांत स्वामी👤 पवन कल्याण धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुढें पाहता सर्वही कोंदलेसें। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥ अभावे कदा पुण्य गांठी पडेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी चांगले सांगणे अजिबात वाईट नाही. एखाद्या व्यक्तीत वाईट गुण आढळून आले असतील किंवा वाईट सवयी लागलेल्या दिसून येत असतील तर, त्यावेळी त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करायलाच पाहिजे.पण, त्यावेळी ती व्यक्ती जर सांगून ऐकत नसेल तर ..तो त्याचा प्रश्न आहे. त्यात आपला काहीही दोष नाही. कदाचित त्यावेळी एक तर त्याचे मेंदू दुसरीकडे गहाण ठेऊन असेल.. नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कारणे असू शकतात. म्हणून जास्त मनावर घेऊ नये आपले कार्य चालूच ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कर्म पूजा*एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.**'कर्मे ईशू भजावा.'*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अल्पसंख्याक हक्क दिन_**_आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००६:संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.**१९९५:अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.**१९८९:सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७८:डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३५:श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:स्वालिया नजरुद्दीन सिखलगार -- पत्रकार,लेखिका* *१९८६:ऋचा चढ्ढा-- भारतीय अभिनेत्री, निर्माती* *१९७६:राजेश काटोले --वऱ्हाडी स्तंभलेखक, कवी**१९७६:संदीप देशमुख गणोजेकर -- कवी* *१९७५:दादाराव डोल्हारकर -- कवी,लेखक तथा मुख्याधिकारी**१९६९:डॉ.चिंदानंद आप्पासाहेब फाळके-- कवी,लेखक* *१९६३:ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता**१९६२:हेमंत नारायण जोशी-- कवी* *१९६२:संजय नार्वेकर-- भारतीय अभिनेता**१९६१:लालचंद सीताराम राजपूत- भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५९:रमेश पांडुरंग पुंडलिक-- लेखक,कवी**१९५७: संजीवनी जयंत तोफखाने -- कवयित्री,लेखिका* *१९५४:विजय वसंत तरवडे-- लेखक संपादक**१९४०:कृष्णा कल्ले-- मराठी,हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील भारतीय पार्श्वगायिका (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९३५:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३)**१९३१:सदाशिव शिवराम भावे-- समीक्षक(मृत्यु:३ऑक्टोबर १९८६)**१९३०:रमेश अच्युत तेंडुलकर--कवी,लेखक आणि समीक्षक (मृत्यू:१९ मे १९९९)**१९२७:पंडित किसनराव पाडळकर-- लेखक, संपादक(मृत्यू:१६ जुलै १९९८)* *१९२६:सुरेश हळदणकर --भारतीय शास्त्रीय गायक,अभिनेता(मृत्यू:१८ जानेवारी २०००)**१९२६:प्रा.डॉ.वसंत अनंत शहाणे-- लेखक**१९२३:भास्करराव आनंदराव पांढरीपांडे-- कवी (मृत्यू:३ मे १९९३)**१९२२:सदानंद भटकळ -- लेखक,कवी* *१९२०:माधव कृष्ण पारधी -- जेष्ठ पत्रकार, कवी,लेखक,संपादक* *१९१८:वासुदेव यशवंत गाडगीळ-- नाट्य चित्र समीक्षक लेखक (मृत्यू:१७ जुलै २००१)**१८९०:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम.रेडिओचे संशोधक (मृत्यू:३१ जानेवारी १९५४)**१८८७:भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’ (मृत्यू:१० जुलै १९७१)**१८७८:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:५ मार्च १९५३)**१८५६:सर जे.जे.थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:३० ऑगस्ट १९४०)**१६२०:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू:२० जून १६६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म:११ मार्च १९१५)**२०००:मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी – इतिहास संशोधक,वैदिक संस्कृतीचे अभ्यासक(जन्म:६ फेब्रुवारी १९२५)* *१९९५:कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार**१९९३:राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.* *१९८०:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म:२० फेब्रुवारी १९०४)**१८२९:जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म:१ ऑगस्ट १७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऑफरचा भुलभुलैय्या*कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची .........!पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सूरतमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येसाठी 19 जानेवारी 2024 पासून 1000 हून अधिक रेल्वेगाड्या धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक आक्रमक, तीन दिवस कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लिबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडून युरोपला जाणाऱ्या 60 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरच्या सोलार कंपनीतील स्फोटात ९ जणांचा मृत्यू, कामगारांची प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, अखेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात सर्वाधिक लांबीचे महामार्ग कोणत्या राज्यात आहेत ?२) २०२३ चा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला ?४) जगातील कोणत्या विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या आहे ?५) मंगळ ग्रहाच्या दोन्ही चंद्राची नावे सांगा ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) डॅनियल बरेनबोईम - अर्जेंटिना व अली अबू अव्वाद - पॅलेस्टाइन ३) १० लक्ष ४) इंदिरा गांधी मुक्त राष्ट्रीय विद्यापीठ, भारत ५) फोबॉस व डिमॉस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नितीन वंजे👤 महेश जोगदंड👤 जनार्दन नेउंगरे👤 रवी यमेवार, धर्माबाद👤 उदयराज कोकरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले। जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ प्रसंगी एखादी वस्तू किंवा सामान गहाण ठेवणे वाईट नाही कारण ती, परिस्थिती त्या, प्रकारची असते काही दिवसांनी ते गहाण ठेवलेले सामान सुद्धा सोडवले जाऊ शकते.पण, आपला मेंदू जर गहाण ठेऊन असेल तर मात्र आपल्या स्वभावात किंवा व्यवहारात खूप काही फरक पडू शकतो. म्हणून कितीही काही झाले तरी अशी चूक करू नये ही छोटीशी चूक खुप महागात पडू शकते.म्हणून शक्य तेवढे स्वतंत्र निर्णय घेण्याचा व स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यः कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ विजय दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.**१९८५:कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित**१९७१:भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती,बांगलादेशची निर्मिती**१९४६:थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३२:’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.**१९०३:मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.**१७७३:अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सोमनाथ जाधव-काशीकर-- कवयित्री* *१९८६:हर्षदीप कौर-- भारतीय पार्श्वगायिका* *१९७२:डॉ.अस्मिता संजय हवालदार -- लेखिका**१९६९:वनिता अरुण गावंडे-- ज्येष्ठ लेखिका**१९६९:सुवर्णा गोरख पवार - जेष्ठ लेखिका* *१९५९:प्रा.हेमंत पंढरीनाथ जुन्नरकर-- लेखक* *१९५८:डॉ.लता प्रकाश महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९४९:डॉ.वसंत काळपांडे -- जेष्ठशिक्षण तज्ज्ञ,लेखक,मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई.तथा निवृत्त शिक्षण संचालक**१९४४:उल्हास भगवान सुतावणे-- लेखक* *१९४२:सुरेश दत्तात्रय साठे-- लेखक**१९४०:दिगंबर गोविंदराव मुंढे -- कादंबरीकार**१९३८:प्रा.डॉ.योगेंद्र लक्ष्मण मेश्राम -- लेखक**१९३७:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक(मृत्यू:१७ जानेवारी२०२१)**१९३३:प्रभाकर भानुदास मांडे -- प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक,लेखक**१९२६:साजाबा विनायक (बबन) प्रभू -- लेखक (मृत्यू:२७ आगस्ट १९८१)* *१९२१:प्रा.कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री,संपादिका (मृत्यू:३ फेब्रुवारी १९९१)**१९१७:सर आर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू:१९ मार्च २००८)**१८८२:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२१ डिसेंबर १९६३)**१७७५:जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू:१८ जुलै १८१७)**१७७०:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन,हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू:२६ मार्च १८२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म:३ नोव्हेंबर १९५४)**२०००:सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.(जन्म: १८९९)**१९८०:कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म:९ सप्टेंबर १८९०)**१९६५:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार(जन्म:२५ जानेवारी १८७४)**१९६०:चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक,महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश,शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म:४ फेब्रुवारी १८९३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक देश, एक ओळखपत्र*राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की ............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचा अनोखा उपक्रम : छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या नव्हे जिल्हा परिषदेने आयोजित केल्या चक्क पालकांच्या क्रीडा स्पर्धा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तर भारत गारठला ! शिमल्यापेक्षा दिल्लीत कमी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांची मुदत वाढवली, 10 जानेवारीपर्यंत निर्णय द्या, सुप्रिम कोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विरोधी पक्षातील मोजक्याच नेत्यांना निधी, बाकींच्यांना काहीच नाही, निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाडांची नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काशी बनतयं पर्यटन केंद्र, वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे; अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे गारठणार! 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशा* 🐝*****************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिंपी पक्षी कशापासून घरटे बनवतात ?२) राज्यघटनेत कलम ३७० चा समावेश कोणत्या दिवशी झाला होता ?३) भारतात सध्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळल्या जात आहे ?४) महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर कोणते ?५) 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा' हे उद्गार कोणाचे आहेत ? *उत्तरे :-* १) झाडांच्या पानांना शिवून २) १७ ऑक्टोबर १९४९ ३) १० टक्के ४) चंद्रपूर ५) सेनापती बापट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत तें संत आनंत पाहे॥ जया पाहतां द्वैत कांही दिसेना। भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः चा समाधान करून घेण्यात स्वतःला धन्य समजणारे. समाजात अनेक दिसतील खऱ्या अर्थाने तेच रिकामे असतात, त्यांच्याकडे खूप वेळ असतो. इतरांचे भले कशाप्रकारे केले जाते याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. पण, आजही याच समाजात असे काही व्यक्तीमत्व आहेत की, स्वतः साठी जगायला त्यांना वेळ मिळत नाही ते व्यक्तीमत्व अभिमानाचे दुसरे नाव असतात. समाजात माणसं तर भरपूर आहेत पण, विचारसरणी मात्र एकसारखी दिसून येत नाही. जर इतरांसाठी चांगले करता येत नसेल तर चांगले करणाऱ्यांच्या वाटेत काटे पेरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक**१९९१:चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर**१९७६:सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश**१९७०:व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रमोदकुमार रहांगडाले -- लेखक**१९७८:बाबासाहेब तुकाराम बारजकर -- कवी* *१९७६:हरिदास भीमरावजी वानखडे -- कवी* *१९७२:संतोष पद्माकर पवार -- कवी,संगीतकार,अभिनेता,नाटककार,नाट्य दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६२:प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे -- प्रसिद्ध लेखक, अभ्यासक**१९६०:अजीज हसन मुक्री- कवी* *१९५६:माया धुप्पड-- बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री,गीतकार,लेखिका आणि समीक्षक**१९५४:रमेश नागेश सावंत-- कवी,लेखक अनुवादक* *१९४३:अरुण गणेश कुलकर्णी -- लेखक* *१९४०:रविंदर कपूर उर्फ गोगा कपूर -- भारतीय अभिनेता(मृत्यू:३ मार्च २०११)**१९४०:गजानन द्वारकानाथ रेळेकर-- लेखक* *१९३५:उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार**१९३२:टी.एन.शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१० नोव्हेंबर २०१९)**१९३१:पंडित रनाथ सेठ-- ज्येष्ठ बासरी वादक (मृत्यू:१५ फेब्रुवारी २०१४)**१९३०:वसुधा पद्माकर पाटील--कथाकार, कादंबरीकार**१९२७:डॉ.अनुराधा पोतदार--मराठीतील जेष्ठ कवयित्री (मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)**१९२४:कृष्ण मुकुंद उजळंबकर--**कादंबरीकार, ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ**१९२३:शीलावती चिंतामण बाबकर -- बाल कथा लेखिका* *१९०५:इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू:११ ऑगस्ट १९७०)**१९०३:रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरुपानंद -- भारतीय आध्यात्मिक गुरू,संत वाड:मयावर लेखन(मृत्यू:१५ ऑगस्ट १९७४)**१८९२:जे.पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक,अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू:६ जून १९७६)**१८६२:विष्णू गणेश नेने--कवी (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८५२:हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२५ ऑगस्ट १९०८)**१८३२:गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू:२७ डिसेंबर १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९००)**१९६६:वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९५०:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (जन्म:३१ आक्टोबर १८७५)**१७४९:छत्रपती शाहू महाराज-- पहिले मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती(जन्म:१८ मे१६८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी घेतला संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मार्च ते मे अखेर होतील 19 अभ्यासक्रमांच्या सीईटी:सीईटी सेलने घोषित केले अभियांत्रिकीसह सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा झटका! तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोटक महिंद्रा बँकेची रोकड नेणारे वाहन दातीफाट्या जवळ उलटले:5 जण जखमी, आखाडा बाळापूर पोलिसांच्या सतर्कतेने 5 कोटींची रक्कम सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावानी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) राजस्थान राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला 'विशेष दर्जा' बहाल करण्यात आले होते ?३) जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ म्हणून कोणत्या देशाला मानले जाते ?४) 'सायक्लोन मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?५) कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ? *उत्तरे :-* १) भजनलाल शर्मा २) कलम ३७० ३) भारत ४) मृत्युंजय महापात्रा ५) ८ राज्य *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे। महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून वेळेला महत्व देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्व समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात. कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात,तर कोणी पाठीशी उभे राहतात. पण,वेळ मात्र तशी नसते संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते म्हणून अनमोल अशा वेळेकडे दुर्लक्ष न करता तिचे महत्व जाणावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६१:टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.**१९२९:’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९०३:किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.**१८१९:अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:कुलदीप यादव-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९०:विनय पाटील-- कवी**१९८६:संवाद सतीश तराळ-- लेखक,कवी* *१९८०:आनंदराव नागनाथराव पाटील-- लेखक**१९७८:समीरा रेड्डी-- भारतीय अभिनेत्री**१९७२:विजय यशवंत सातपुते -- कवी,लेखक संपादक* *१९५७:शीतल श्याम दामले -- कवयित्री* *१९५३:विजय अमृतराज –भारतीय लॉनटेनिसपटू**१९५२:सुषमा रमेशचंद्र म्हैसेकर-इर्लेकर-- कवयित्री* *१९५१:विजय श्री.केळकर-- लेखक**१९५०:प्रल्हाद श्रीराम गावत्रे -- कवी* *१९४९:श्रीकांत शंकर बहुलकर-- संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक,बौद्धविद्या व वेदविद्या अभ्यासक**१९४९:डॉ.अनुपमा निरंजन उजगरे-- जेष्ठ लेखिका आणि प्रसिद्ध कवयित्री, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९४६:संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू:२३ जून १९८०)**१९४४:अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी -- जेष्ठ लेखक तथा निवृत्त सहा.पोलिस आयुक्त* *१९४३:विजय शंकर जोशी-- लेखक**१९४०:लक्ष्मण मोतीराम बांदेकर-- मराठीतील नामवंत नाटककार (मृत्यू:१२ फेब्रुवारी २०१५)**१९३९:सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९३८:प्रभाकर वामनराव ढगे-- कवी लेखक**१९३४:श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक**१९२८:प्रसाद सावकार – गायक व नट**१९२४:राज कपूर – अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू:२ जून १९८८)**१८२२:रेव्ह सॅम्युएल केअरबॅंक -- धर्मगुरू,दूरदर्शी शिक्षक,लेखक,संपादक (मृत्यू:३१ मे१९८८)**१९१८:योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.(मृत्यू:२० ऑगस्ट, २०१४)**१९०५:विश्वनाथ पांडुरंग दांडेकर --मराठी लेखक,कादंबरीकार,लघुनिबंधकार आणि समीक्षक (जन्म:१ जानेवारी १९७४)* *१८९५:जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू:६ फेब्रुवारी १९५२)**१८९२:विठ्ठल कृष्ण नेरूरकर-- मराठी कथाकार,कवी आणि नाटककार(मृत्यू:१९ मार्च १९४९)* *१५४६:टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (मृत्यू:२४ आक्टोबर १६०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:श्रीराम ताम्रकर --चित्रपट विषयक विपुल लेखन (जन्म: ९ नोव्हेंबर १९३८)**२००५:सुधीर जोशी--विनोदी मराठी अभिनेते (जन्म:१९४८)**१९७९:गोविंद घाणेकर-- लेखक (जन्म:१५ जून १९११)**१९७७:गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार,कवी,लेखक, पटकथाकार,अभिनेते.गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म:१ आक्टोबर १९१९)**१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म:३० ऑगस्ट १९२३)**१७९९:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:२२ फेब्रुवारी १७३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपली कामे आपणच करावीत*एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी .........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये महिनाभरात अॅलिकॉट मशिन उपलब्ध करून देणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *10 ते 12 जानेवारीला एमआयटीमध्ये भारतीय छात्र संसद:10 ते 12 हजार विद्यार्थ्यांचा असणार सहभाग ; राहुल कराड यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी ; 23 हजार 628 पोलिस शिपायांची होणार भरती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारचं ओबीसी कार्ड, ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सख्खा भाऊ विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक अन् रिंकू सिंहची टी-20 रँकिंगमध्ये थेट हनुमान उडी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गॅसेस का होतात ?* 📙खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया'* असे कोणाला म्हटले जाते ?२) मध्यप्रदेश या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार स्त्री व पुरूष यांना समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे ?४) 'सिटी ऑफ गोल्डन गेट' कोणत्या शहराला म्हणतात ?५) गुणात्मकदृष्ट्या आहाराचे कोणते प्रकार आहेत ? *उत्तरे :-* १) जादव पायेंग २) मोहन यादव ३) कलम ३९ ४) सन फ्रान्सिस्को ५) सात्त्विक, राजस, तामस आहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे, येवती👤 विजय सातपुते, पुणे👤 राज काकडे,वसमत👤 पवन धावनी, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे गर्व आंगी सदा वीतरागी। क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥ नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा। इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचे ऋण फेडावे, ज्यांच्यामुळे जग बघायला मिळाले मग ते कसेही असोत त्यांची आठवण काढावे,ज्यांनी स्वतः साठी न जगता योगदान दिले त्यांचे विचार अंगिकारावे,ज्या समाजाचे आपण आहोत त्या समाजाला काहीतरी देणं लागतं. जीवनात कितीही कमावले तरी सोबत कोणी काहीच घेऊन जात नाही. देण्याऱ्याचे नाव मोठे आहे घेण्याऱ्याचे नाही असे अनेकजण म्हणतात. घेण्यासाठी तर..संपूर्ण आयुष्य पडले आहे पण,देण्यासाठी वेळ, सोबतच आपले काळीज मोठे असावे लागते त्यासाठी सर्वाप्रती आपल्यात आपुलकी व माणुसकी असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरीब आणि श्रीमंत माणूस*एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे.शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे.एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला.दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल."*तात्पर्य :- सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.**१९९१:मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१:दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३:मेघना गुलजार-- भारतीय लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माती**१९६६:डॉ.अनिल तानाजी सपकाळ-- मराठी नाटककार,चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक**१९६५:माधुरी साकुळकर -- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६०:दग्गुबाती वेंकटेश -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९५८:हेमंत दत्तात्रेय सावंत-- लेखक* *१९५७:डॉ.विद्यासागर जनार्दन पाटंगणकर-- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक* *१९५६:प्रभाकर दुपारे -- आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक, नाटककार,जेष्ठ पत्रकार**१९५५:मनोहर पर्रीकर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:१७ मार्च, २०१९)**१९४९:सुप्रिया मधुकर अत्रे-- लेखिका**१९४७:विद्युत रवींद्र भागवत-- स्त्रीवादी लेखिका,साहित्यिका**१९४५:अस्मिता इनामदार -- कवयित्री**१९४२:रमाकांत यशवंत देशपांडे -- खगोल अभ्यासक,लेखक,कवी* *१९४०:शरद केशव साठे-- मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:१ आक्टोबर २०१५)**१९३२:डॉ.निला जोशीराव-- लेखिका* *१९३०:मधुसूदन कृष्णाची आगाशे-- लेखक* *१९२८:धनश्री हळबे-- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९२८:सरिता मंगेश पदकी-- कवयित्री, कथालेखिका,बालसाहित्यकार,नाटककार आणि अनुवादिका(मृत्यु:३ जानेवारी २०१५)**१९२६:प्रमिला मदन भागवत: कवयित्री लेखिका (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१३)**१९२४:डॉ.विद्याधर गंगाधर पुंडलिक -- प्रसिद्ध कथाकार,नाटककार,समीक्षक (मृत्यु:९ ऑक्टोबर १९८९)**१९२४:मंगला दि.साठे-- लेखिका* *१९२३:रामभाऊ जोशी -- जेष्ठ पत्रकार, लेखक* *१९२०:प्रा.श्रीनिवास हरि दीक्षित-- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,मराठी लेखक(मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)* *१९०२:इलचंद्र जोशी-- प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार(मृत्यू:१९८२)**१८९९:पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता,कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७६)**१८०४:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ,मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली,इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १८७७)**१७८०:योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मार्च १८४९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:मोरेश्वर दिनकर पराडकर-- प्रकांड पंडित,अभ्यासक,संशोधक(जन्म:१७ नोव्हेंबर १९२५)**१९९६:श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक,क्रांतिकारक,कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार**१९९४:विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक(जन्म:१७ आक्टोबर १९१७)**१९८६:स्मिता पाटील – अभिनेत्री.पद्मश्री (१९८५),दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म:१७ आक्टोबर १९५५)**१९६१:अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.(जन्म: १८६०)**१९३०:फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म:३ सप्टेंबर १८६९)**१७८४:सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक,टीकाकार,पत्रकार व विचारवंत (जन्म:१८ सप्टेंबर १७०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, विधानसभेवर धडकताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्तेही आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला, सुनील शुक्रे बनले नवे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र, साखर कारखान्यांची 35 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा:दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBSE कडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी २०२४ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, उदय सहारणकडं संघाचं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्तीसगड राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'अग्नी मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) नुकतेच कोणत्या राज्याने 'सर्वोत्तम श्वास्वत वन्यजीव पर्यटन राज्य' पुरस्कार जिंकला आहे ?४) बहुजन समाज पक्षाच्या ( BSP ) अध्यक्षा मायावती यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला घोषित केले ?५) नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला ? *उत्तरे :-* १) विष्णू देव साय, आदिवासी नेता २) अविनाश चंदर ३) मध्यप्रदेश ४) आकाश आनंद, मायावतीचा भाचा ५) NASA *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी। जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥ तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे। तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने त्या व्यक्तीला आपण कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी संज्जन लोक असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य लोक असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असते. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९११:दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.**१९०१:जी.मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.**१७५५:डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रमेश मच्छिंद्रनाथ वाघ -- लेखक* *१९८१:युवराजसिंग – प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९७७:डॉ.योगिता श्याम पिंजरकर -- लेखिका* *१९६९:बंडोपंत राजेश्वरजी बोढेकर -- प्रसिद्ध लेखक* *१९६६:भरत जाधव-- मराठी चित्रपट,थिएटर आणि टीव्ही शोमधील भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९६४:दीपक तांबोळी -- कथाकार* *१९५९:डॉ.चंद्रकांत लेनगुरे --कवी,कथाकार* *१९५६:प्रभू राजगडकर-- कवी, लेखक**१९५०:रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते**१९५०:संध्या प्रकाश देशपांडे-- कवयित्री* *१९४९:गोपीनाथ पांडुरंग मुंडे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री(मृत्यू:३ जुन १९१४)**१९४७:शिवाजी धर्माजी साळुंके --कवी**१९४२:प्रा.मंदा विजय टेंबे-- लेखिका* *१९४०:शरद पवार – माजी केंद्रीय कृषी मंत्री, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९२२:कमल बाळकृष्ण आपटे-- लेखिका*@*१९२१:यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्ज्ञ ,पूर्व भाषासंचालक (मृत्यू:२२ जुलै २०१५)**१९१६:पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर-- स्वतंत्रता सेनानी,गोवा विधानसभेचे अध्यक्ष, लेखक (मृत्यू:५ सप्टेंबर २०००)* *१९१५:फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू:१४ मे १९९८)**१९१२:यशवंत भीमराव आंबेडकर (भैय्यासाहेब)-- भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते (मृत्यू:१७ सप्टेंबर १९७७)**१९०७:खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू:१०ऑगस्ट १९५०)**१९०५:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००४)**१८९२:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (मृत्यू:११ मार्च १९६५)**१८९३:गोविंद सदाशिव घुर्ये--मानववंश समाज,लेखक,अभ्यासक (मृत्यु:२८ डिसेंबर १९८३)**१८७२:डॉ.बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते,नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू:३ मार्च १९४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:पण्डित रवी शंकर – सतार वादक, *'भारतरत्न’ (जन्म:७ एप्रिल १९२०)**२००५:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म:२९ डिसेंबर १९१७)**२००५:त्र्यंबक विनायक सरदेशमुख-- कादंबरीकार,समीक्षक (जन्म:२२ नोव्हेंबर १९१९)**२००४:निरंजन हरिश्चंद्र उजगरे--कवी, संपादक (जन्म:६ ऑक्टोबर १९४९)**२०००:जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच.पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म:१ आक्टोबर १९३०)**१९९२:पं.महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म:१२ जानेवारी १९०६)**१९६४:मैथिलिशरण गुप्त –हिन्दी कवी. ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.(जन्म:३ ऑगस्ट १८८६)**१९३०:परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: १९०८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - साहस*सातव्या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ......ही लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक कोटी हुन अधिक निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड, शिवराजसिंह चौहानानंतर पदभार सांभाळणार, दोन उपमुख्यमंत्रीही मोहन यादवांच्या दिमतीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जम्मू काश्मीर स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग, कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्याचे आश्वासन, तर इथेनॉल बंदीविरोधात अमित शाहांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, नाशिकच्या चांदवडमध्ये निर्यातबंदीविरोधात आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतमाता ज्ञानपीठातर्फे 42 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यात होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 **********************विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या समाजसुधारकास *'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस'* म्हणून ओळखले जाते ?२) भारताच्या पहिल्या महिला आमदार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?३) 'Why didn't you come sooner ?' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ? *उत्तरे :-* १) म.गो. रानडे २) डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ३) कैलास सत्यार्थी ४) कोपर्निकस ५) पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर👤 शुभानन गांगल, पुणे👤 अशोक पाटील कदम👤 समीर मुल्ला👤 वतनदार पवनकुमार नारायण👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 महेश शिवशेट्टी👤 माधव पाटील शिंदे👤 राजकुमार इंगळे👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर👤 विपीन कासलीवाल👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त तेही निवाले॥ बरें शोधल्यावीण बोलो नको हो। जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने त्या व्यक्तीला कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असतात. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय पर्वत दिवस (International Mountain Day)_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश**१९९४:अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.**१९७२:अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.**१९६७:कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.**१९४६:युनिसेफ (UNICEF) ची स्थापना**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:सी.व्ही.रमण यांना नोबेल पारितोषिक**१८१६:इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:दीपराज दत्ताराम माने-- लेखक**१९६९:संगीता अनंत थोरात -- कवयित्री* *१९६९:विश्वनाथन आनंद –भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर**१९६९:दयानंद चंद्रशेक शेट्टी-- भारतीय चित्रपट अभिनेता**१९६५:किमी काटकर-- अभिनेत्री आणि मॉडेल**१९६३:प्रा.डॉ.माधव सरकुंडे -- प्रसिद्ध कवी,लेखक विचारवंत* *१९५७:डॉ.विकास हरिभाऊ महात्मे -- नेत्र शल्यचिकित्सक,राज्यसभेचे खासदार**१९५२:वेणू श्रीनिवासन-- भारतीय उद्योगपती, TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष**१९५०:अविनाश शंकर डोळस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(मृत्यू:११ नोव्हेंबर २०१८)**१९३८:प्रा.डॉ.बा.धो.रामपुरे -- कवी,लेखक* *१९३६:डॉ.उमेश अच्युत तेंडुलकर-- लेखक**१९३५:प्रा.जयश्री दिगंबर खिरे -- लेखिका**१९३५:प्रणव मुखर्जी-- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(मृत्यू:३१ ऑगस्ट २०२०)**१९३४:सलीम अझीझ दुरानी-- भारतीय क्रिकेटपटू,अष्टपैलू खेळाडू,(मृत्यू:२ एप्रिल २०२३)**१९३१:त्र्यंबक लक्ष्मण कुलकर्णी-- लेखक**१९२९:सुभाष गुप्ते – लेगस्पिनर क्रिकेटर (मृत्यू:३१ मे २००२)**१९२५:राजा मंगळवेढेकर – प्रसिद्ध बालसाहित्यकार (मृत्यू:१ एप्रिल २००६)**१९२४:मधुसूदन/मधुकर सदाशिव घोलप-- लेखक* *१९२४:दत्ताराम कृष्ण सुकथनकर -- सुप्रसिद्घ गोमंतकीय कोकणी साहित्यिक.(मृत्यू:२९ ऑगस्ट २००५)**१९२२:मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता,पद्मभूषण (१९९१),दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४)(मृत्यू:७ जुलै २०२१)**१९२१:रा.व्य.जोशी -- लेखक* *१९१५:मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू:१७ जून १९९६)**१९०९:नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ( मृत्यू:३ मार्च १९८९)* *१९०९: गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये--**संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक (मृत्यु:१८ ऑक्टोबर २००२)**१८९९:पुरुषोत्तम यशवंत देशपांडे – कादंबरीकार,तत्त्वचिंतक विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे संपादक(मृत्यू:२६ जुलै १९८५)* *१८९२:अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते,पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष,पद्मभूषण (१९५४), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६),पद्मविभूषण (१९७७)(मृत्यू:१९८४)**१८८२:सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू:११ सप्टेंबर १९२१)**१८६७:’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार,आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू:२५ मार्च १९४०)**१८४३:रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू:२७ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:गोविंदराव कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक(जन्म:१९२९)**२००४:एम.एस.सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म:१६ सप्टेंबर १९१६)**२००२:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म:१६ जानेवारी १९२०)**२००१:रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म:१७ मार्च १९०९)**१९९८:रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म:६ फेब्रुवारी १९१५)**१९९१:रघुनाथ गोविंद सरदेसाई--पत्रकार, संपादक,नाटय-चित्रपट समीक्षक (जन्म:७ सप्टेंबर १९०५)**१९८७:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए.कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गूढकथालेखक (जन्म:१० जुलै १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मानवी हक्क दिन*लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना...........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणमध्ये महिलांना मोफत बसप्रवास; गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा, सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आता यापुढे सरकारच्या पनवानगी शिवाय भंडारा किंवा भोजनदान करता येणार नाही. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ नांदेडला महामेळावा घेणार, प्रकाश आंबेडकर, सिद्धरामय्या, तेजस्वी यादव यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विविध मोर्च्यामुळे राजकीय वातावरण तापत असताना सोबतच थंडीसुद्धा तापणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *या वर्षी डास चावल्यामुळे दर तासाला सरासरी २ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामना पावसामुळे रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो.भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *'टाईम ॲथलिट ऑफ द इयर'* हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाहीर झाला आहे ?२) भारताचे नवे कृषिमंत्री म्हणून कोणाची निवड झाली ?३) 'वाटेवरल्या सावल्या' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?४) राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) बँकिंग प्रणालीशी संबंधित असणारा IFSC कोडचा विस्तारित रूप काय आहे ? *उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) अर्जुन मुंडा ३) ग. दि. माडगूळकर ४) अमृत क्रांती ५) Indian Financial System Code*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख सर्पमित्र तथा शिक्षक, देगलूर👤 प्रा. नितीन दारमोड, वक्ते व लेखक, धर्माबाद👤 आकाश सोनटक्के👤 विशाल स्वामी👤 आदर्श मडावी👤 प्रिया बुडे👤 रमेश मेरलवार, व्यापारी, करखेली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजाया जनीं पाहतां राम एकू। करी बाण एकू मुखी शब्द एकू॥ क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू। धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होत की, न केलेल्या कर्माचे फळ दुसऱ्यांच्या कर्मामुळे आपल्याला भोगावे लागत असते पण असं का..? हा एक मोठा प्रश्न आहे. कदाचित हा योगायोग असू शकतो.पण नको ते कर्म कराणारा आनंदाने हसत, हसत जगतो. आपण मात्र स्वतःला चिंतेच्या डोहात बुडवून घेतो. माणसाचा जन्म एकदाच मिळते. मनसोक्त जगून घ्यावे कारण सुखात जरी लाखो लोक असतील तरी शेवटच्या क्षणी मात्र सोबतीला कोणीच येत नाही हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन प्रवास*एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्याआणि तिच्याजवळ बसल्या.जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला"अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे."इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?सोडून द्या, शांत रहा, कारण*जीवन प्रवास खूप छोटा आहे.*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.आपला प्रवास खूप छोटा आहे.आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया.कारण एकच की,*आपला प्रवास खूप छोटा आहे ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ**१९७१:संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६६:बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६१:ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म**१९००:लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:दिया मिर्झा-हेंड्रिच-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती**१९७८:किशोर नामदेव कवठे -- प्रसिद्ध कवी लेखक* *१९७५:डॉ.विशाल गोरखनाथ तायडे-- मराठी, हिंदी,इंग्रजी लेखन करणारे लेखक* *१९७४:अंजली अंबेकर-- लेखिका**१९७१:डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले-- लेखक**१९६८:फराह नाझ हाश्मी--चित्रपट अभिनेत्री**१९६७:मृणाल घाटे-- कवयित्री**१९६५:अभिजीत टोणगावकर -- लेखक* *१९५७:माधुरी वरुडकर --कवयित्री,लेखिका**१९५६:मदन मार्तंडराव बोबडे-- कवी,लेखक**१९५०:प्रतीक्षा प्रकाश वखडेकर-- कवयित्री* *१९४८:विद्या वसंत पराडकर-- कवयित्री* *१९४६:सोनिया गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:खुदराम गोविंद पुरामकर-- लेखक (मृत्यू:१९ डिसेंबर २००४)**१९३९:घन:श्याम धेंडे-- गझलखेरीज एकांकिका,लावनी,विडंबनगीत असे साहित्य प्रकार हाताळणारे (मृत्यू:१४ एप्रिल २०१७)**१९३८:प्रा.भास्कर कुलकर्णी -- लेखक,कथाकार,समीक्षक* *१९२८:प्रा.विजया प्रभाकरराव कुलकर्णी -- लेखिका* *१९२६:रामचंद्र श्रीपाद गोसावी (राम गोसावी)-- प्रसिद्ध कवी* *१९२५:शकुंतला सातपुते-- लेखिका**१९१२:कानू रॉय--हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील भारतीय अभिनेता आणि संगीतकार(मृत्यू:२० डिसेंबर१९८१)* *१८७८:अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू:१६ मे १९५०)**१८६८:फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू:२९ जानेवारी १९३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:के.शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी,चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म:१० आक्टोबर १९०२)**१९९३:स्नेहप्रभा प्रधान --चित्रपट अभिनेत्री, लेखिका (जन्म:२० ऑक्टोबर१९१५)**१९४२:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म:१० आक्टोबर १९१०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणाचे नवे पंतप्रधान रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या खासदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरक्षणासाठी माझी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरु राहणार नांदेड मधील सभेत जरांगे पाटील यांचे व्यक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाबा रामदेव 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रदीर्घ आजारानंतर ज्युनिअर महमूद कालवश; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हा १० डिसेंबरला खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारतीय आरमाराचे जनक'* कोण आहेत ?२) जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारे पहिले तीन देश कोणते ?३) नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?४) केंद्रसरकारच्या NCRB अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात सलग तीन वर्षे सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविण्यात आली ?५) भारतातील पहिले वैद्यकीय ध्यान केंद्र कोठे उभारले जात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) चीन - ४०%, अमेरिका - १४%, भारत - ७% ३) काँग्रेस ( ११९ पैकी ६४ जागा ) ४) महाराष्ट्र ५) झानभूमी, चापर्डा, यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गतीकारणे संगती सज्जनाची। मती पालटे सूमती दुर्जनाची॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खोटेनाटे, रडगाणे करून आणलेले चेहऱ्यावरचे दु:ख साऱ्या जगाला सहजपणे दिसत असते पण, ज्याच्या अंतर्मनात वेदना, दु:ख,व्यथा किती कुटून भरलेले आहे ते कोणीही ओळखू शकत नाही.ज्याचं दुःख त्यालाच कळत असतं कारण चेहरा आणि मुखवटा यात फरक असतो मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो. म्हणून खरे दु:ख जर ओळखायचेच असतील तर अंतर्मनाला ओळखण्याचा प्रयत्न करावे त्यासाठी आपली दृष्टी सुद्धा तशीच असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_40.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय सेना ध्वज दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड**१९९५:फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण**१९९४:कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर**१९८८:यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.**१९७५:इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.**१८२५:बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:धनंजय शंकर पाटील-- लेखक,कवी**१९८७:सोनी प्रभाकर कानडे-- कवयित्री* *१९७३:ललित एकनाथ बोरसे -- कवी* *१९७१:अनिसा सिकंदर शेख-- कवयित्री, लेखिका* *१९६२:शेखर सुमन--भारतीय अभिनेता,अँकर,निर्माता,दिग्दर्शक आणि गायक**१९६१:प्रशांत दळवी-- मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक**१९५७:जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:डॉ.विठ्ठल ठाकूर -- लेखक* *१९५५:पांडुरंग सोमाजी भेलावे-- लेखक,कवी* *१९४८:प्रा.डॉ.भीमराव वाघचौरे--ज्येष्ठ साहित्यिक**१९४६:प्रा.माधवी कवी -- जेष्ठ लेखिका, तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासक* *१९४०:जीवन चंद्रभान पाटील -- लेखक**१९३१:संगमेश्वर गुरव-- किराणा घराणा चळवळीशी संबंधित गायक(मृत्यू:७ मे २०१४)**१९२५:शोभना जयंत चांदूरकर -- कवयित्री**१९२२:जयरामदास धर्माजी सरकाटे-- लेखक (मृत्यू:११ डिसेंबर १९९९)**१९२०:बाबुराव सरनाईक-- ज्येष्ठ कवी लेखक (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१७)**१९१३:डॉ.दत्तात्रेय गंगाधर कोपरकर -- महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक* *१९०२:जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.जी.‘नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू:७ सप्टेंबर १९७९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म:१६ जुलै १९१३)**१९८२:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (जन्म:१७ जून १९०३)**१९७६:डॉ.गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ**१९५७:नरहर शंकर रहाळकर-- मराठी कवी (जन्म:१८८२)**१९४१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म:२७ आक्टोबर १८७४)**१८९४:सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.(जन्म:१९ नोव्हेंबर १८०५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आणि उपक्रम*देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी ..........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील Link वर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ हिवाळी अधिवेशनास आज होणार सुरुवात, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईनंतर आता नागपूरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, शिंदे गटाची होणार उलट तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवी बिश्नोई ठरला टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ! राशिद खानला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 *****************जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'सशस्त्र सेना ध्वज दिन'* केव्हा साजरा केला जातो ?२) नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?३) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देश सहभागी झाले होते ?४) भारतातील सर्वात मोठा २८७ किमीचा वर्तुळाकार रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे ?५) पेट्रोलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे इंजिन कोणी तयार केले ? *उत्तरे :-* १) ७ डिसेंबर २) भाजपा ( २३० पैकी १६४ जागा ) ३) १३० देश ४) बंगळुरू ५) कार्ल बेंज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 भीमाशंकर बच्चेवार👤 डॉ. मनोज मनूरकर👤 बाळासाहेब तांबे👤 आश्विन जैस्वाल👤 संतोष अनालदास*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥ देहेभावना रामबोधे उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यश मिळविण्याची व यश प्राप्त करण्याची प्रत्येकांची तऱ्हा वेगवेगळी असते. कोणी धनसंपत्तीच्या आधाराने जिंकतात तर ,कोणी रूपाने जिंकतात, कोणी कटकारस्थान करून जिंकत असतात. आपण मात्र तसं जिंकण्याचा कधीही प्रयत्न करू नये. जे, सत्य व अजरामर होऊन गेलेले थोर संत महात्मे, महापुरुष आहेत त्यांच्या विचारांना आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे कारण त्यांच्या विचारातच एवढी ताकद आहे की, आपल्याला नुसते जिंकायलाच नव्हे तर जगायला ही शिकवतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/12/dr-babasaheb-ambedkar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महापरिनिर्वाण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९९:जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला 'ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.* *१९९२:अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.**१९८१:डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.**१९७८:स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.**१९७१:भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.**१९१७:फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१८७७:द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:श्रेयस संतोष अय्यर-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९३:जसप्रीत जसबीरसिंग बुमराह-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९८८:रवींद्र जडेजा-- प्रसिद्ध भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू**१९८६:मिलिंद तेजराव जाधव-- लेखक**१९७६:उमेश विनायक कुलकर्णी-- मराठी चित्रपट दिग्दर्शक,लेखक* *१९७४:लवकुमार बलभीम मुळे-- कवी, लेखक**१९७२:सुरेश जिजाबा नरवाडे-- लेखक**१९६५:प्रसाद माधव कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक,संपादक,व्याख्याते* *१९५०:विजया ब्राम्हणकर-- प्रसिद्ध कवयित्री जेष्ठ लेखिका* *१९५०:प्रदीप भाऊराव विश्वेश्वर-- कवी* *१९४५: सुभाष बब्बर -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक**१९४५:शेखर कुलभूषण कपूर-- भारतीय चित्रपट निर्माता व अभिनेता**१९४४:श्रीकृष्ण बेडेकर -- जेष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक संपादक(मृत्यू:१० मार्च २०२३)**१९४२:प्रा.किसन धोंडिराम चोपडे -- लेखक संपादक* *१९४२:मेघा माधव किराणे-- लेखिका**१९४२:विनायक हरिभाऊ मुरकुटे-- लेखक* *१९४२:शशिकला शरदचंद्र उपाध्ये -- लेखिका,प्रकाशक* *१९४१:विजय नारायण कापडी--प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३७:प्रा.डॉ.रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर -- पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक**१९३२:कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,पटकथालेखक,दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू:२७ जानेवारी २००७)**१९२३:वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू:१५ आक्टोबर २००२)**१९१६:’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार-- मराठी गायक,नाट्य-चित्रपट अभिनेते,लेखक (मृत्यू:६ नोव्हेंबर १९९२)**१८६१:रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – प्रसिद्ध कवी व लेखक (मृत्यू:९ मे १९१९)**१८५३:हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ,इतिहासकार (मृत्यू:१७ नोव्हेंबर १९३१)**१८२३:मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू:२८ आक्टोबर १९००)**१७३२:वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू:२२ ऑगस्ट १८१८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:मोहनदास श्रीपाद सुखटणकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते(जन्म:२१ नोव्हेंबर १९३०)**२०१४:पद्मजा शशिकांत फाटक -- कथाकार, चरित्रकार,ललित लेखिका,बालसाहित्यकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९४३)**२०१३:नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१८ जुलै १९१८)**१९८४:अनिल सदाशिव बर्वे-- नाटककार, कादंबरीकार (जन्म:१७ जुलै १९४८)**१९७६:क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक,समाजसुधारक,’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म:३ ऑगस्ट १९००)**१९७१:कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक(जन्म:१ जानेवारी १९०२)**_१९५६:डॉ.बाबासाहेब आंबेडकर – विश्वभूषण भारतरत्न,बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,पहिले कायदेमंत्री,व मानवी हक्कांचे कैवारी (जन्म:१४ एप्रिल १८९१)_* *_महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*न भूतो न भविष्यति व्यक्तिमत्त्व - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी दिला. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महावीर दिगंबर जैन मंदिराचा पुढाकार:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाला एक लाखाची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मेट्रोचे काम करताना जलवाहिनी फोडली; मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला ठोठावला एक कोटींचा दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण दिलं नाही तर...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; भुजबळांवरही साधला निशाणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तचा उपक्रम:विश्वविक्रमासाठी 1,11,111 विद्यार्थ्यांना 'डिजिटल प्रॉडक्टव्हीटी' वर प्रशिक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'महापरिनिर्वाण दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?३) नुकतीच झालेली भारत - ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय टी - २० मालिका भारताने किती फरकाने जिंकली ?४) QR कोडचा विस्तारित रूप काय आहे ?५) भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे ? *उत्तरे :-* १) ६ डिसेंबर २) भाजपा ( १९९ पैकी ११५ जागा ) ३) ४ - १ ने ४) Quick response ५) तेरा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे👤 डी. आर. भोसके, येवती👤 अशोक हिंगणे👤 शंकर बोंबले👤 कैलास सोनकांबळे👤 बालाजी गैनवार, चिकना👤 नवनाथ राजीवाडे👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर👤 माधव हालकुडे👤 प्रा. मंगल सांगळे👤 दत्ता काशेवार👤 विवेक क्षीरसागर👤 देवानंद मुरमुरे👤 नरेश पांचाळ👤 राजेश आंपलवाड👤 कैलास सोनकांबळे👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनांकारणे देव लीलावतारी। बहुतांपरी आदरें वेषधारी॥ तया नेणती ते जन पापरूपी। दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...!अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख, शांती, समाधान, संस्कार, योग्य दिशा, जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत. त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे.पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.📚📕📚📕📚📕📚📕📚••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मनाची एकाग्रता*पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक माती दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६३: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली* *१९५७:इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.**१९३२:जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.**१८४८:अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.हनुमंत वि माने -- कवी* *१९७७:रज्जाक सादिक शेख- कवी* *१९६४:अनिल बाबुराव गव्हाणे-- ग्रामीण साहित्यिक**१९६२:डॉ.शकुंतला काळे -- लेखिका तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९६०:सारिका ठाकूर(सारिका )-- भारतीय अभिनेत्री आणि कॉस्च्युम डिझायनर* *१९५८:बाबाराव निंबाजी मडावी -- प्रसिद्ध कवी,कथालेखक,कादंबरीकार* *१९५६:प्रा.डॉ.बजरंग सुखदेव कोरडे --इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक,संपादक* *१९५५:शरद तळदे - प्रसिद्ध चित्रकार व लेखक* *१९५३:सम्राट नाईक- कवी, व्यंगचित्रकार, गायक,वादक (मृत्यू:१० मे २०२१)**१९४८:शंकर वासुदेव अभ्यंकर-- संत वा्ङ्मयाचे अभ्यासक,लेखक व प्रवचनकार**१९४८:मनीषा हिरालाल शहा-- लेखिका* *१९४४:विलास वसंत खोले-- लेखक,समीक्षक(मृत्यू:१७ आक्टोबर २०२२)**१९४३:लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २००९)**१९४०:उस्ताद गुलाम अली-- पटियाला घराण्याचे पाकिस्तानी गझल गायक**१९३६:प्रा.सुरेश दत्तात्रेय देशपांडे-- लेखक संपादक* *१९३८:मोहन हरी आपटे-- विज्ञानलेखक (मृत्यु:१२ नोव्हेंबर २०१९)**१९३३:डॉ.भास्कर जनार्दन कविमंडन-- लेखक,संपादक* *१९३१:अॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख(मृत्यू:२जुलै २०१८)**१९०१:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ फेब्रुवारी १९७६)**१९०१:वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू:१५ डिसेंबर १९६६)**१८९४:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (मृत्यू:२२ फेब्रुवारी १९८२)**१८६३:पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू:२९ आक्टोबर १९३३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:जयललिता जयरामन-- तमिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्रीअनेक तमिळ,तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय (जन्म:२४ फेब्रुवारी १९४८)* *२०१३:नेल्सन मंडेला-- दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष(जन्म:१८ जुलै १९१८)**२००८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक(जन्म:२८ ओगस्ट १९४८)**२००७:म.वा.धोंड – टीकाकार (जन्म:३ आक्टोबर १९१४)**१९९९:वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक,समाजवादी नेते,आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक* *१९९१:डॉ.वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक* *१९७३:राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म:८ जानेवारी १९२५)**१९५९:कुमार श्री दुलीपसिंहजी – क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म:१३ जून १९०५)**१९५५:असरार-उल-हक (मजाझ लखनवी) -- भारतीय उर्दू कवी(जन्म:१९ ऑक्टोबर१९११)**१९५१:अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म:७ ऑगस्ट १८७१)**१९५०:योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी (जन्म:१५ ऑगस्ट १८७२)**१७९१:वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म:२७ जानेवारी १७५६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मृत्यू : एक अटळ सत्य*मृत्यूच्या दारात उभा राहून तो परत आला, मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी त्याला वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एवढ्या मोठ्या अपघातातून एक वर्षाचे लहान बाळ वाचले अश्या मथळ्याची बातमी वाचतो त्यावेळी त्या त्या नशीबवान व्यक्तीविषयी मनात उत्कंठेची भावना निर्माण होते. नशीब चांगला होता म्हणून तो वाचला असे ही सहज बोलून जातो. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, रस्ताच्या अपघातात एकाचा मृत्यू, उपचार चालू असताना एकाचा मृत्यू अश्या बातम्या जेंव्हा कानावर येतात त्यावेळी त्याच्या विषयी मनात दुःखाची भावना मनात तयार होते. मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, त्यांच्या काळातलं समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचं आहे, नरेंद्र मोदींचे आवाहन, पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा दाखल, राजारामबापू कारखान्यावरील आंदोलनादरम्यान लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण भारतात 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅशमध्ये 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चिंता वाढवणारी बातमी! 50 हून अधिक कफ सिरप कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एडन मार्करामकडे भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख लपलेले आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुद्धिबळाच्या इतिहासातील *पहिली ग्रँडमास्टर बहिणभावाची जोडी* कोणती ?२) भारतीय अणुचाचणी केंद्र पोखरण कोणत्या राज्यात आहे ?३) क्यूआर कोडचा सर्वप्रथम वापर कोणी केला ?४) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या संघाने केला ?५) आरोग्य सेवेत ड्रोनचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ? *उत्तरे :-* १) प्रज्ञानंद व वैशाली रमेशबाबू, भारत २) राजस्थान ३) मसाहेरो हारा, तंत्रज्ञ, 'डेन्सो वेव' ऑटो मोबाईल कंपनी ४) भारत ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शिवाजी कऱ्हाळे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, मुखेड👤 साईनाथ कल्याणकर👤 अरुण सूर्यवंशी👤 मनोजकुमार गटलावार👤 माधव जंगलेकर👤 सुनील पांचाळ👤 शंकर भंडारे👤 अविनाश सुभेदार👤 कृष्णकांत पाटील सावरगावकर👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे👤 राज डाकोरे👤 अशोक चिंचलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनाथां दिनांकारणे जन्मताहे। कलंकी पुढे देव होणार आहे॥ तया वर्णिता शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••*चतुर बिरबलाची चतुर उत्तरे*एकदा एका पाठोपाठ पाच प्रश्न बादशहाने दरबारातील मंडळींना विचारले. बिरबल वगळता सर्व मंडळींनी गुळमुळीत उत्तर दिली, पण बिरबलाने मात्र अगदी चतुर उत्तर दिले.प्रश्न पहिला बादशाह : सर्वात श्रेष्ठ फुल कोणत्या झाडाचे आहे?इतर मंडळी : गुलाबाचे.बिरबल : कपाशीचे, कारण त्या फुलावरील बोंडातून कापूस तयार होतो. त्या कापसापासून आपल्याला कपडे चोपडे मिळून, आपल्या शरीराचे उन व थंडीपासून रक्षण होते.प्रश्न दूसराबादशाह : सर्वश्रेष्ठ दात कोणाचा?इतर मंडळी : हत्तीचाबिरबल : नांगराचा, कारण त्याच्यामुळे शेतीची नांगरणी होते. त्यातूनच धान्य पिकते.प्रश्न तिसरा बादशाह : सर्वश्रेष्ठ पुत्र कोणाचा?इतर मंडळी : राजाचाबिरबल : गाईचा, कारण तो शेत नांगरतो, बैलगाडी ओढतो, जळण आणि खत देतो, एवढेच नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चामड्या पासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.प्रश्न चौथा बादशहा : सर्वश्रेष्ठ राजा कोणता?इतर मंडळी : सार्वभौम राजा व अकबर बादशाहबिरबल : मेघ राजा, कारण तो आपणास पाणी देतो. शेती फेकून आपणास अन्न मिळते.प्रश्न पाचवाबादशाह : सर्वश्रेष्ठ गुण कोणता?इतर मंडळी : विद्येची आवडबिरबल : धैर्य, कारण धैर्यामुळेच माणसाला त्याच्या अंगातील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून जीवनाचे सार्थक करता येते.बिरबलाची अशी सर्वश्रेष्ठ उत्तरे ऐकून बादशहा खुश झाला व त्याने दरबारातील सर्व मंडळी समोर चतुर बिरबलची पाठ थोपटली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय नौदल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान**१९९३:उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९१:पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९७५:सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७१:भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.**१९४८:भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१९६७:थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण**१९२४:मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घाटन झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:माधवी दीपक जोशी-- लेखिका**१९७१:सुनील संपतराव हुसे -- कवी* *१९६९:प्रा.डॉ.पुरुषोत्तम माळोदे-- लेखक संपादक* *१९६८: डॉ.वसुधा वैद्य-- लेखिका* *१९६७:उमेश मोघे -- प्रख्यात तबलावादक, लेखक* *१९६७:मनीष लक्ष्मण पाटील-- लेखक* *१९६४:स्मिता प्रवीण खानझोडे -- कवयित्री* *१९६२:सय्यद जावेद अहमद जाफरी-- भारतीय विनोदी अभिनेता**१९६२:डॉ.सुलभा कोरे -- मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व अनुवादक* *१९५७:प्रसाद सावंत -- लेखक,कवी* *१९५४:पंडित हिंदराज दिवेकर-- रुद्र वीणा आणि सतार वादक(मृत्यू:१९ एप्रिल २०१९)**१९५१:डॉ.अलका देव मारुलकर-- गायिका आणि संगीतकार**१९५०:पार्थ पोकळे-- लेखक* *१९४९:नारायण दत्तात्रेय कुडलीकर -- लेखक* *१९४२:निशिकांत धोंडोपंत मिरजकर-- समीक्षक,तौलनिक साहित्याचे अभ्यासक**१९४२:फादर फ्रान्सिस दिब्रिटो --ज्येष्ठ साहित्यिक,९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू:२० जुलै १९९५)**१९३२:कमलाकर धारप-- जेष्ठ साहित्यिक* *१९३१:लीला श्रीवास्तव-- लेखिका* *१९१९:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१२)**१९१६:बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक,कादंबरीकार व लघुकथाकार (मृत्यू:२२ एप्रिल २००३)**१९१०:आर.वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू:२७ जानेवारी २००९)**१९१०:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू:१७ जून १९६५)**१९०९:रंगनाथ नरहर होनप -- कवी**१८९८:काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशिनाथ चांदुरकर--मराठी कवी,कादंबरीकार आणि लेखक**१८३५:सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू:१८ जून १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:विनोद दुआ-- दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये काम करणारे भारतीय पत्रकार(जन्म:११ मार्च १९५४)**२०१८:डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९३५)**२०१७:शशी कपूर-- हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक(जन्म:१८ मार्च १९३८)* *२००७:पुरुषोत्तम नागेश ओक -- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले आहे.(जन्म:२ मार्च १९१७)**१९७४:शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (जन्म:२८ आक्टोबर १८९३)**१९०२:डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म:६ नोव्हेंबर १८५१)* *१८५०:विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म:२२ मे १७८३)* *११३१:ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ,खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म:१८ मे १०४८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांना स्वातंत्र्य हवे ....*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये भाजप तर तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तेलंगणात काँग्रेसचे रेवंथ रेड्डी होणार सीएम - सुत्राची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, सरकारवर हल्लाबोल अन् राजीनामे देण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धनगर समाजाकडून आरक्षणासाठी पुण्यात रास्तारोको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विज्ञान धारा यात्रा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल, 12 जिल्ह्यातून यात्रा जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी एकूण 4 कोटी 77 लाखांचे दान आले असून मागील वर्षीच्या तुलनेत या दानाच्या रकमेत वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या T20 I सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावाने हरवून 4-1 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय नौदल दिन*भारतीय नौदलातर्फे दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ४ डिसेंबर याच दिवशी नौदलदिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया. १९७१ सालच्या सुरवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधून पाकिस्तानी हवाईदल सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही पाकिस्तान आपली खोड मोडायला तयार नव्हते. १९७१ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या पार्श्वभूमीवर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी या बैठकीत स्पष्ट सांगितले की सध्याची परिस्थिती आणि ऋतू हे आपल्यासाठी अनुकूल नसल्याने सध्यस्थितीत युद्ध आपल्याला परवडणारे नाही. युद्धासाठी नोव्हेंबर पर्यंत थांबावे लागेल. नोव्हेंबर पर्यंत सैन्याची जुळवाजुळव व्यवस्थित करता येईल याची खात्री देण्यासही ते विसरले नाही. खरंतर एप्रिलमध्येच युद्ध व्हावे या मताच्या इंदिरा गांधी होत्या पण लष्करप्रमुखांनी परिस्थिती विषद केल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत थांबण्याचा निर्णय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आपण काहीही केले तरी भारत आपल्याला उलट उत्तर देऊ शकणार नाही अशा आविर्भावात पाकिस्तान वावरू लागला. त्यांनी ३ डिसेंबर रोजी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याचवेळी भारतीय विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतला सागरतळात बुडवण्याची योजना पाकिस्तानने आखली. पाकिस्तानची ही योजना भारतीय नौदलाच्या लक्षात आल्याने भारतीय नौदलाने चुकीचा संदेश पाठवून पीएनएस गाझी ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्यात गाझी या पाकिस्तानच्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. भारताच्या आयएनएस विक्रांतला सागर तळाशी पाठवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानी नौदलाची सर्वात शक्तिशाली असलेली गाझी ही पाणबुडीच सागर तळाशी पोहचल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. गाझी पाणबुडीला जलसमाधी मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरात आयएनएस विक्रांतने आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. आयएनएस विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करुन लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरुन गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तानी नौदलाने केली नव्हती. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय नौदलाचा जगभरात दबदबा निर्माण झाला. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण महासागरात भारतीय नौदलाचे सामर्थ्य निर्माण झाले. आज भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदल म्हणून ओळखले जाते. आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलाकडे एकूण ५५ युद्धनौका आणि ५८ हजार ३५० सैनिक आहेत. भारताकडे ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपरिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्रे आहेत म्हणूनच जगातील सर्वात शक्तिशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाची गणना होते. भारतीय नौदलाला नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राजर्षी शाहू महाराजांना *'राजर्षी'* ही पदवी कोणत्या समाजाने दिली ?२) क्यूआर कोडचा शोध कोणत्या देशात लागला ?३) जन्मतः ज्या बाळाच्या हृदयात दोष असतो त्या बाळाला काय म्हणतात ?४) जगात सर्वात जास्त सिनेमाची तिकीट कोणत्या देशात आहे ?५) दिवस व रात्र कोठे समान असतात ? *उत्तरे :-* १) कुर्मी समाज २) जपान ३) ब्लू बेबी ४) स्वित्झरलँड ५) विषुववृत्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत शिंदे, नांदेड👤 शेख आलिम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तये द्रौपदीकारणे लागवेगे। त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥ कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे''छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार______________________Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_60.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक एडस प्रतिबंध दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.**१९९९:भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.**१९९३:प्राच्यविद्या विशारद डॉ.रा.ना.दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ.चिं.ग.काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी.लिट. पदवी’ जाहीर**१९९२:कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९८१:AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.**१९७६:अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७३:पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६५:भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना**१९६४:मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६३:नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.**१९४८:एस.एस.आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.**१९१७:कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे,दामलेमामा,फत्तेलाल, बाबा गजबर,ज्ञानबा मेस्त्री,पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.गणेश जगन्नाथ मोगल- कवी* *१९८२:डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे-- प्रसिद्ध कवी,लेखक तथा सहाय्यक कुलसचिव* *१९८०:मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू**१९७९:गणेश रामदास निकम-- लेखक* *१९६९:पद्मा विलासराव ठाकरे-- कवयित्री, लेखिका* *१९६५:संदीप सावंत-- मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६४:कल्पना अशोक टेंभुर्णीकर-- कवयित्री**१९६३:अर्जुन रानातुंगा-- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू**१९५७:रविकिरण पराडकर -- निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त,लेखक* *१९५५:नारायण भानुदासराव बोरुळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९५५:मोहनदास भामरे उर्फ भामरे बापू-- लेखक,कवी* *१९५५:उदित नारायण – प्रसिद्ध पार्श्वगायक**१९५४:राकेश बेदी-- भारतीय चित्रपट,रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५३:बाजीराव शंकर निकम-- लेखक**१९५२:सूर्यकांत पंडितराव सराफ- प्रसिद्ध बालसाहित्यिक,नाट्यलेखक* *१९४९:प्राचार्य सुरेश प्रल्हाद खेडकर-- कवी, लेखक* *१९४७:विश्वनाथ शिरढोणकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक विविध पुरस्काराने सन्मानित* *१९४६:निळकंठ रामदास पाटील- प्रसिद्ध साहित्यिक* *१९४६:डॉ.वसुधा जयंत आठवले-- लेखिका* *१९४५:नरेंद्र सीताराम मारवाडे -- कवी,लेखक,संपादक* *१९४३:डॉ.शेषराव मारुती हराळे-- कवी* *१९४१:शामराव तुळशीराम बहेकर-- लेखक**१९४०:मोरेश्वर श्रीधर पटवर्धन-- लेखक**१९४०:प्रा.यशवंत भिमाले-- लेखक* *१९१७:सीताराम नानाजी कांबळे-- कादंबरीकार* *१९११:अनंत अंतरकर – 'हंस','मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (मृत्यू:४ आक्टोबर १९६६)**१९०९:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू:२० मार्च १९५६)**१८८५:आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त,शिक्षणतज्ञ,समाजसुधारक,इतिहासकार,गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य(१९५२ - १९५८),अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), (मृत्यू:२१ ऑगस्ट १९८१)**१८६२:परशराम गोविंद चिंचाळकर-- वेदांत विद्याविशारद,लेखक(मृत्यू:८ जानेवारी १९३४)**१७६१:मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू:१६ एप्रिल १८५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:उस्ताद साबरी खां-- सारंगीवादक (जन्म:२१ मे १९२७)**२०१०:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक, अनुवादक, कृषितज्ज्ञ (जन्म:३ नोव्हेंबर १९३४)**१९९०:विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी(जन्म:१८ ऑगस्ट १९००)**१९८८:गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक,पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म:२ आक्टोबर १९०८)**१९८५:शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म:१८ जून १८९९)**१८६६:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म:४ जुलै १७९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा*सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे .......पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे, असे मत केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्र सरकारनं मजुरांसाठी खास ओळखपत्र बनवण्याची केली घोषणा, कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार, आयटी क्षेत्राला मिळणार चालना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून नवीन सीम कार्ड खरेदी करण्याबाबत कठोर नियम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठीचं मतदान पूर्ण झालं असून 3 डिसेंबरला निकाल हाती येईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *साऊथ अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, के. एल. राहुल एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बायोगॅस* 📙 ******************अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे. उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचर्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक एड्स निर्मूलन दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) लोकशिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोने *'संगीताचे शहर'* म्हणून मान्यता दिली आहे ?४) महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात ?५) भारतीय सेनेचे तीन दल कोणते ? *उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) १ डिसेंबर ३) ग्वाल्हेर ४) नाथसागर ५) भूदल, नौदल, वायुदल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला। म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥ न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📿अहंकाराची शिक्षा📿*खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक आंबा आणि पिंपळाचे झाड होते. एकदा मधमाशांचा थवा त्या जंगलात राहायला आला, पण मधमाशांच्या थव्याला राहण्यासाठी दाट झाडाची गरज होती. जेव्हा राणी मधमाशीची नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली तेव्हा राणी मधमाशी पिंपळाच्या झाडाला म्हणाली - हे पिंपळ भाऊ, मी तुझ्या या घनदाट झाडाच्या फांदीवर माझ्या कुटुंबासाठी पोळे बनवू शकते का ?पिंपळाला कोणी त्रास देणे हे पिंपळाला पसंत नव्हते. अहंकार व उद्धटपणामुळे पिंपळ राणी मधमाशीला रागाने म्हणाला, जा इथून जा आणि तुझे पोळे दुसरीकडे कर. मला त्रास देऊ नकोस. पिंपळाचे बोलणे ऐकून शेजारी उभ्या असलेल्या आंब्याचे झाड म्हणाले, पिंपळ भाऊ, बनवू द्या. पोळे करू द्या. हे तुमच्या शाखांमध्ये सुरक्षित राहतील. पिंपळ आंब्याला म्हणाला, तू तुझं काम कर, तुला एवढी काळजी आहे तर तू तुझ्या फांदीवर मधमाशाचे पोळे करायला का सांगत नाहीस ?यामुळे आंब्याचे झाड राणी मधमाशीला म्हणाले, राणी मधमाशी, तुला हवे असल्यास तू माझ्या फांदीवर तुझे पोळे करू शकतेस. यावर राणी मधमाशीने आंब्याच्या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आंब्याच्या झाडावर आपले पोळे बांधले.वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी काही लाकूडतोडे जंगलात आले. त्या लोकांना एक आंब्याचे झाड दिसले आणि ते आपापसात बोलू लागले की हे आंब्याचे झाड तोडून लाकूड घ्यावे. त्यांनी आपली हत्यारे घेतली आणि आंब्याचे झाड तोडायला सुरुवात केली, तेव्हा एकाने वर बघितले आणि दुसर्याला म्हणाला नाही, ते कापू नका. या झाडावर मधमाशांचे पोळे आहे, जर ते उठले तर आपल्याला वाचणे कठीण होईल. त्याचवेळी एक माणूस म्हणाला, आपण हे पिंपळाचे झाड का तोडत नाही. यामध्ये आम्हाला जास्त लाकूड मिळेल आणि आम्हाला कोणताही धोका होणार नाही.त्या सर्व लाकूडतोड्यानी मिळून पिंपळाचे झाड तोडण्यास सुरुवात केली. पिंपळाचे झाड वेदनेने जोरजोरात ओरडू लागले, वाचवा वाचवा. आंब्याच्या झाडाला पिंपळाच्या ओरडण्याचा आवाज आला, काही लोक मिळून ते पिंपळाला कापत असल्याचे पाहिले. आंब्याचे झाड मधमाशीला म्हणाले, आपण पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवले पाहिजे, जेव्हा आंब्याच्या झाडाने मधमाशीला पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवण्याची विनंती केली तेव्हा मधमाशांनी लाकूडतोड्यावर हल्ला केला आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळून गेले. पिंपळाच्या झाडाने मधमाशांचे आभार मानले आणि आपल्या उध्दट वर्तनाबद्दल माफी मागितली. मग मधमाश्या म्हणाल्या, आमचे आभार मानू नका, आंब्याच्या झाडाचे आभार मान त्याने तुमचा जीव वाचवला आहे, कारण त्याने आम्हाला सांगितले होते की जर कोणी वाईट केले तर याचा अर्थ असा नाही की आपणही तेच केले पाहिजे. आता पिंपळाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता आणि त्याचा अहंकारही चक्काचूर झाला होता, पिंपळाच्या झाडालाही त्याच्या अहंकाराची शिक्षा झाली होती.*📍शिक्षण :*आपण कधीही अहंकार बाळगू नये. आपण लोकांना शक्य तितकी मदत केली पाहिजे, जेणे करुन जेव्हा वेळ येईल तेव्हा आपणही मदत मागू शकाल. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हाच कोणीतरी आपल्याला मदत करेल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• _विजयी झाल्यावर दोन बोटांनी ’V' दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून 'V' हे विजयचिन्ह दर्शविले._ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.**१९९६:ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान.**१९९५:’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा**१९६६:बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९१७:कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना**१८७२:हॅमिल्टन क्रिसेंट,ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६७:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१०)**१९६४:अर्चना धनंजय देव-- प्रसिद्ध लेखिका**१९५५:संजीव परळीकर-- प्रसिद्ध लेखक**१९५२:चंद्रकांत भास्कर मेहेर-- लेखक**१९५२:अविनाश खर्शीकर-- ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:८ऑक्टोबर२०२०)**१९४१:प्रभाकर दत्तात्रय मराठे-- कादंबरीकार**१९४०:शुभदा भानुदास कुलकर्णी- लेखिका* *१९३९:डॉ.कल्याण इनामदार- मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि बालकवी(मृत्यू:१९ नोव्हेंबर २०१३)**१९३६:सुधा मल्होत्रा-- भारतीय पार्श्वगायिका* *१९३५:आनंद यादव – मराठी लेखक काव्य, कथा,कादंबरी,समीक्षा,ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१६)**१९३०:गीता बाली तथा हरिकीर्तन कौर-- १९५० आणि १९६० च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:२१ जानेवारी १९६५)**१९१०:कविवर्य बा.भ.बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’--मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते प्रसिद्ध कवी (मृत्यू:९ जुलै १९८४)**१८९८:वासुदेव दामोदर गोखले- कोशकार, चरित्रकार,संपादक (मृत्यू:१२ जून १९६४)**१८७४:विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:२४ जानेवारी १९६५)**१८५८:जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९३७)**१८३५:मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (मृत्यू:२१ एप्रिल १९१०)**१७६१:स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.(मृत्यू:२२ फेब्रुवारी १८१५)**१६०२:ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२१ मे १६८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले-- प्रसिद्ध लेखक,कवी,व समीक्षक आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ (जन्म:२९ मार्च १९४८)**२०१२:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म:४ डिसेंबर १९१९)**२०१०:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (जन्म:३० नोव्हेंबर १९६७)**१९७०:निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (जन्म:१४ जानेवारी १८८३)**१९००:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार (जन्म:१६ आक्टोबर १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक एड्स निर्मूलन दिवस निमित्ताने प्रासंगिक लेख*खबरदारी हाच सर्वोत्तम उपायसंपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळाले की, अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्सला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे ...............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने 500 कोटींच्या निधीला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा, पहिले पारितोषिक ५१ लाख, अभियानासाठी २० कोटी ६३ लाखांच्या खर्चास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत अवकाळी पावसामुळे 500 मेट्रिक टन साखर भिजली; तब्बल दोन कोटींचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! अंतराळात तिरंगा फडकणार! 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात श्रीमंतांची यादी ब्लूमबर्गनं केली जाहीर, यादीत भारतातील सर्वातं श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे 13 व्या क्रमांकावर तर उद्योजक गौतम अदानींचा श्रीमंतांच्या 20 नावांमध्ये समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच; बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *डॉ. जगदीशचंद्र बोस*पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मिरचीचे आगार'* म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?२) नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?३) घटना समितीची शेवटची सभा केव्हा झाली ?४) केवोलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर कोणत्या राज्यात आहे ?५) 'सरोवरांचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नंदूरबार २) बागमती नदी ३) २५ नोव्हेंबर १९४९ ४) राजस्थान ५) फिनलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली👤 राजेश्वर येवतीकर, येवती👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा👤 रवी बुगावार, धर्माबाद👤 देविराज पिंगलवार, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी। जना रक्षणाकारणे नीच योनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध.........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा घराच्या दाराची कडी आतून लावलेली असते तेव्हा माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.पण जेव्हा बाहेरुन दाराला कडी लावलेली असते तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ माणूस समजून घेतो की,कुठेतरी बाहेर गेले असतील.अशा परिस्थितीत माणसाने जे डोळ्यासमोर दिसते ते सत्य आहे हे ठामपणे सांगायला हवे आणि डोळ्यांच्या माघारी जे काही आहे ते ठामपणे कुणालाही सांगता येत नाही.म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे पाहूनच निर्णय घ्यायला शिकले पाहिजे.व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची*लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००:दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६:नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५:युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:नेहा पेंडसे-- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७७:युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९५२:सुनिती मंगल धारवाडकर-- कवयित्री, लेखिका* *१९५०:रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०:प्रकाश ज्ञानेश्वर जडे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५:खुशाल डवरे- प्रसिद्ध लेखक**१९४२:नीला भागवत-- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८:माला केकतपुरे-- कवयित्री,लेखिका**१९३३:श्रीराम आत्माराम खुणे-- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर-- लेखक* *१९२६:प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये-- मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते (मृत्यू:३० ऑक्टोबर १९९६)**१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७:गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू:७ जून २०००)**१८९६:विनायक लक्ष्मण बर्वे-- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू:२६ जानेवारी १९४८)**१८६९;अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू:२० जानेवारी १९५१)**१८६२:विष्णू गणेश नेने-- लेखक (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८३५:महादेव मोरेश्वर कुंटे-- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू:८ ऑक्टोबर १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार-- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म:२७ फेब्रुवारी १९३१)**२०११:इंदिरा गोस्वामी--आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका(जन्म:१४ नोव्हेंबर १९४३)**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म:२४ नोव्हेंबर १९३७)**२००१:जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक,संगीतकार,गायक आणि गीतलेखक (जन्म:२५ फेब्रुवारी १९४३)**१९९३:जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म:२९ जुलै १९०४)**१९९४:मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार(जन्म:७ ऑक्टोबर १९२७)**१९५९:वाजू कोटक-- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म:३० जानेवारी १९१५)**१९५९:’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म:२५ जानेवारी १८६३)**१९३९:माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म:२१ जानेवारी १८९४)**१९२६:कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म:३ जानेवारी १८५२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका; 47 हजार 109 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार महापालिकेने मंगळवारी १७६ दुकानांवर कारवाई केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संपूर्ण भारतात सिलेंडरचा दर 400 रुपये करा; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तराखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून 41 कामगारांची सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील अवकाळीग्रस्त 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे तातडीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अजित पवारांनी मंत्रालयात घेतला खेड-आळंदीतील कामांचा आढावा:तीर्थक्षेत्र व बसस्थानकांच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा पाच विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या खेळाचे साहित्य *टोक, दांडी व मूठ* या तीन भागांचे बनलेले असते ?२) ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?३) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा 'ICC हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे ?४) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे ?५) कलिंगड या फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ? *उत्तरे :-* १) भालाफेक ( साहित्य - भाला ) २) गुजरात ३) वीरेंद्र सेहवाग, भारत ४) जपान ५) अलिबाग *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले👤 किशोरी चौगुले, सहशिक्षिका*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी तया अंत आला।कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥अनाथासि आधार हा चक्रपाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध..........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्ही भविष्याचे ओझे डोक्यावर घेऊन जगत असाल तर वर्तमानात दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही.कारण भविष्याच्या सुखासाठी आजच्या वर्तमानातील सुखाला हरवत हातातले सुख दूर करुन जगायला लागले तर दुःख च भोगणार ना ...! म्हणून आजचे सुख भोगत असताना उद्याच्या भविष्याची काळजी करण्याचे कारण नाही.वर्तमान सुखाचा असेल तर भविष्यही सुखात जाणार .आजचे सातत्य उद्याही चालू ठेवले तर काळजी करण्याचे कारणच नाही.व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५:पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७:जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४:नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०:मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१:पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:यामी गौतम-- हिंदी चित्रपट आणि मालिकांची अभिनेत्री**१९७८:मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७:प्रा.डॉ.प्रेमा लेकुरवाळे - लेखिका, कवयित्री* *१९६७:डॉ.धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५:प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख-- लेखक* *१९५९:विश्वास महिपती पाटील-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार,निवृत्त सनदी अधिकारी**१९५५:प्रा.अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१:डॉ.शुभदा दीपक शेळके-- लेखिका* *१९५०:गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४४:मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली(मृत्यू:८ ऑक्टोबर २०२०)**१९४०:रमेश महिपतराम दवे-- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८:मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू(मृत्यू:३० ऑगस्ट २०१५)**१९३७:प्रतिभा कुलकर्णी - प्रसिद्ध लेखिका* *१९३६:संभाजीराव सखाराम पाटणे-- लेखक* *१८७२:रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू:५ मे १९४३)**१८५७:अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू:२५ नोव्हेंबर १८८५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९२६)**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(१ नोव्हेंबर १९२१)**२००३:शंकर पांडुरंग रामाणी-- आधुनिक मराठी कवी (जन्म:२६ जून १९२२)**१९९९:हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म:१९१३)**१९८०:बिरेंद्रनाथ(बी.एन.सरकार) सिरकार-- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक(जन्म:५ जुलै १९०१)**१९७८:लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर)-- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका(जन्म:६ जुलै १९०५)**१९६८:एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म:११ ऑगस्ट १८९७)**१९६७:पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म:१२ नोव्हेंबर १८८०)**१९६३:त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म:२५ मे १८९५)**१९६२:कृष्ण चंद्र तथा’के.सी.’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म:ऑगस्ट १८९३)**१९५४:एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२९ सप्टेंबर १९०१)**१८९३:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म:२३ जानेवारी १८१४)**_१८९०:जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक ,क्रांतिकारक (जन्म:११ एप्रिल १८२७)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळी सुट्ट्यानंतर आजपासून शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील १५ लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पावसाने पुन्हा फुटला शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध; विदर्भासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा; सदाभाऊ खोत यांची वादग्रस्त मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL - कॅप्टन गिल! शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार, हार्दीक पांड्या मुंबई संघात परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थंड हवेचे ठिकाण - चिखलदरा*चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे ?२) घटना समितीची पहिली सभा केव्हा झाली ?३) कर्नाटक राज्यात 'म्हशींच्या शर्यत' हा खेळ कोणत्या नावाने ओळखला जातो ?४) दिवाळीच्या दिवशी २२ लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे ?५) जगात हॉकीचे एकूण प्रकार किती आहेत ? *उत्तरे :-* १) अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक २) ९ डिसेंबर १९४६ ३) कंबाला ४) अयोध्या ५) पाच - मैदानी, आईस, रोलर, स्लेज, स्ट्रीट हॉकी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राम चव्हाण, नांदेड👤 भैय्या कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजेंदु महासंकटी वास पाहे।तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥ उडी घातली जाहला जीवदानी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट*एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची खुराक दाखवणे तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी देवीला सांग.आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची खुराक घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी. देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव.*तात्पर्य:- नेहमी खरे बोलावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 नोव्हेंबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले**१९५७:रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली 'लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव प्राणी ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.**१९१८:पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१९१३:अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.**१९०३:पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.**१८३८:’द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:सुभाषश्री गांगुली-- भारतीय अभिनेत्री,मॉडेल,पटकथा लेखिका* *१९७७:विद्या रामभाऊ भडके -- कवयित्री* *१९७७:संतोष जयराम वाटपाडे-- कवी* *१९७४:सोनाली कुलकर्णी-- मराठी चित्रपट अभिनेत्री,लेखिका* *१९७२:प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे -- कवी,लेखक* *१९६५:संतोष शरदराव हुदलीकर-- कवी,गीतकार**१९५३:अनिल शेंडे -- कवी,लेखक* *१९३७:लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू:२५ मे १९९८)**१९३६:प्रा.डॉ.लीला नारायण गोविलकर-- लेखिका* *१९३४:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक,अनुवादक,कृषितज्ज्ञ (मृत्यू:१ डिसेंबर २०१०)**१९३३:अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ**१९३३:प्रा.म.श.वाबगावकर-- प्रसिद्ध लेखक (मृत्यू:१२ मार्च २०२०)**१९२८:बंधुमाधव मोडक-- कथा व कादंबरी लेखक**१९२६:माधव भास्कर आचवल-समीक्षक, ललित लेखक(मृत्यू:२१ जानेवारी १९८०)**१९२५:पंडित विजय राघव राव--भारतीय बासरीवादक,नृत्यदिग्दर्शक,संगीतकार,कवी आणि कथा लेखक(मृत्यू:३० नोव्हेंबर २०११)**१९२५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(मृत्यू:२३ जून २००५)**१९२१:चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:३० ऑगस्ट २००३)**१९०१:पृथ्वीराज कपूर – अभिनेते,निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२९ मे १९७२)**१६८८:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू:२१ सप्टेंबर १७४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:गुरुनाथ विष्णू नाईक -- रहस्यकथा लेखक व पत्रकार (जन्म:२ जून १९३८)**२०१४:नारायण वासुदेव गोखले -- चित्रकार, लेखक (जन्म:३ जून १९११)**२०१४:गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर-- मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी,मराठी,ओरिया,हरियाणी,भोजपुरी, बंगाली व गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते(जन्म११ मे १९५०)**२०१२:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (जन्म:५ आक्टोबर १९२३)**२०००:प्रा.गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक* *१९९८:डॉआरसी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१५ जानेवारी १९२०)**१९९२:प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म:२१ नोव्हेंबर १९२६)**१९९०:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म:२६ फेब्रुवारी १९२२)**१८१९:अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म:१७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत चोखामेळा .....संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणाजिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी RBI समोर रांगा, अचानक लोकांची गर्दी झाल्यानं तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची महाराष्ट्र सरकारकडून मदत, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत गेल्या 10 महिन्यात एक लाखांहून अधिक घरांची विक्री, राज्य सरकारच्या तिजोरीत 9,221 कोटींचा महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना 35 ते 40 कोटी रुपयांचा फटका, दरात 800 ते 900 रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावानी केला पराभव, सलग सातवा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले. 31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा अभावहेच अपयशाचे खरे कारण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत्रीमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) संत गाडगेबाबा यांचे जन्म नाव काय होते ?३) राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो ?४) पहिला जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) विश्वचषक सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय खेळाडू कोण ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) डेबू ३) सहा ४) मनकोम्बू सांबशिवन उर्फ एम. एस. स्वामीनाथन ५) मोहंमद शम्मी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप पगारे👤 मयूर मधुकरराव महाजन👤 अंजली देशमुख घंटेवार, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणतात ना की, आपली जर..एखाद्या वेळी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफी मागितले पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगले दडलेले असेल. पण, एका अर्थाने चूक मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मोठे काळीज असावे लागते व माफ करणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच अनुभवी व समजदार असायला पाहिजे. कारण, माफी मागणारा तर निघून जातो पण, खूप काही शिकायला भाग पाडत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मुर्ख डोमकावळा*📗 *एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''**तात्पर्य :- काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:दाक्षिणात्य पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.**१९४०:दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.**१९१४:रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:ईशा देओल-- भारतीय अभिनेत्री**१९७८:डॉ.विशाल इंगोले-- प्रसिद्ध कवी* *१९७५:दिपाली मुकुंद दातार-- कवयित्री, लेखिका**१९७४:डॉ.ज्योती कदम-- कवयित्री,लेखिका**१९६५:अरुण कदम-- मराठी अभिनेता**१९६५:शाहरुख खान – प्रसिद्ध अभिनेता व निर्माता**१९६२:मोहन मु. कुलकर्णी -- कवी* *१९६०:अनु मलिक – प्रसिद्ध संगीतकार**१९६०:प्रा.डॉ.अलका अविनाश बडगे -- लेखिका* *१९५८:विद्या भालचंद्र साताळकर-- कवयित्री,लेखिका**१९५८:कविता अरुण भालेराव-- प्रसिद्ध लेखिका**१९५८:डॉ.विद्याधर सीताराम करंदीकर -- कवी,बालनाटककार,मराठी आणि संस्कृत भाषेचे ते जाणकार(मृत्यू:१ आक्टोबर २०१६)**१९५२:प्रा.जैमिनी भाऊराव कडू-- पत्रकार व साहित्यिक (मृत्यू:१७ मार्च २०१८)**१९४६:जयश्री रमेश कुलकर्णी(देशमुख ) -- लेखिका**१९४१:सुभाष भालचंद्र देशपांडे--कथा व नाट्य लेखन**१९४१:अरुण शौरी –माजी केन्द्रीय मंत्री,पत्रकार व लेखक**१९३५:शशिकला चंद्रकांत मेहता-- लेखिका**१९२१:रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ,हिन्दी, मराठी,गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.* *१९१९:आशा श्रीराम परचुरे -- कथा,नाटक, एकांकिकेचे लेखन* *१८९७:सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते,दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), (मृत्यू:२८ जानेवारी १९८४)**१८८६:धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (मृत्यू:२९ मार्च १९७१)**१८८२:डॉ.के.बी.लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (मृत्यू: २ मे १९६३)**१८७३:अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर--आद्य संस्कृत वृत्तपत्रकार(मृत्यू:२५ ऑक्टोबर १९१३)**१८७१:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)-- मराठी लेखक,बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक (मृत्यू: १९२०)**१८३३:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:टॉमी ओव्हरस्ट्रीट-- अमेरिकन गायक-गीतकार आणि गिटार वादक (जन्म:१९३७)**२०१२:येरेन नायडू –तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते(जन्म:२३ फेब्रुवारी १९५७)**१९९०:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि. लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक(जन्म:२१ डिसेंबर १९०३)* *१९५०:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (जन्म:२६ जुलै १८५६)**१८८५:बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर–नाटककार (जन्म:३१ मार्च १८४३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत गोरा कुंभार ....संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.“तेर" नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर" येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिलेसंत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही :जरांगे पाटलांचा एल्गार, म्हणाले, सरकारविरोधात जनतेत रोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1 नोव्हेंबर 2023 पासून अधिकृतपणे 19 किलेग्राम वजनाच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरांत 101.50 रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशाच्या तिजोरीत जीएसटी करातून 1.72 लाख कोटींची भर; महाराष्ट्रातून सर्वाधिक कर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले.31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शुन्यालाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिताफळमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्या कलेमध्ये पारंगत होते ?३) विधानसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?४) २०२३ चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) जगातील पहिल्या सिट्रस काँग्रेसच्या आयोजनाचा मान कोणत्या देशाला मिळाला आहे ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) पोहणे, अश्वरोहन, कुस्त्या इत्यादी ३) उपसभापती ४) हेडी कुहन, अमेरिका ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकरराव कामीनवार, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 गोविंद देशमुख👤 छाया पुयड👤 महेश दुधाळकर👤 प्रवीण शिंदे👤 प्रणित जैस्वाल👤 मल्लेश धुलेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सांगतां ऐकता जन्म गेला। परी वादवेवाद तैसाचि ठेला॥ उठे संशयो वाद हा दंभधारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाची जागा घेण्यासाठी नको त्या वाटेने जाऊन स्वतः मधील गुणांना कमी लेखू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची योग्यता वेगळी असते. ज्या व्यक्तीविषयी आपण कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करतो किंवा कमी लेखतो आधी त्या व्यक्तीने आपल्या जीवनात किती वादळ, वारे, आपत्ती,सहन करून किती संघर्ष केला आहे ते,आधी जाणून घेतले पाहिजे. असे झाले तर कोणाची जागा घेण्याची किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *माणसातील देव*📗 *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक शाकाहार दिन_**_ या वर्षातील ३०५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९९९:कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर**१९९४:मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड**१९८२:अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.होंडा मोटार कंपनीने मेरिज्व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.**१९७३:‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.**१९७३:लखदीप,मिनिकॉय,अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप' असे ठेवण्यात आले.**१९६६:पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.**१९५६:भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.**१९५६:दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.**१९५६:केरळ राज्य स्थापना दिन**१९५६:कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.**१९५३:आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.**१९४५:ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१८४८:महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.**१८४५:’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा,मुंबई येथे सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:वी.वी.एस.लक्ष्मण – भारतीय क्रिकेटपटू**१९७३:धनाजी जनार्दन बुटेरे-- कवी,लेखक* *१९७३:ऐश्वर्या राय – अभिनेत्री**१९६५:पद्मिनी कोल्हापुरे-- भारतीय अभिनेत्री आणि गायिका**१९६४:डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी-- प्रसिद्ध कवी,सुप्रसिद्ध विनोदी लेखक* *१९५८:डॉ. कमलेश सोमण -- लेखक,समीक्षक,अनुवादक* *१९५८:शंकर वाडेवाले -- कवी,लेखक* *१९५७:डॉ.जिजा दौलतराव सोनवणे-- लेखिका* *१९५४:चारुदत्त दुखंडे -- मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक(मृत्यू:२७ मार्च २०१९)**१९४५:खलिल गुलामभाई मोमीन -- प्रसिद्ध कवी,गझलकार* *१९४५:नरेंद्र अच्युत दाभोलकर-- सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार (मृत्यू:२०ऑगस्ट २०१३)**१९४०:रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश**१९३८:प्रा.सुहास हरी जोशी--ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक* *१९३६:किशोर अमृतराव प्रधान-- भारतीय मराठी चित्रपट आणि थिएटर अभिनेते, मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक (मृत्यू:१२ जानेवारी १९१९)**१९३२:रघुनाथ पांडुरंग जोशी-- लेखक**१९३२:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू:२५ सप्टेंबर २००४)**१९२६:यशवंत देव – संगीतकार,गीतकार व लेखक (मृत्यू:३० ऑक्टोबर, २०१८)**१९२१:गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००५)**१९२१:शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू:२१ ऑगस्ट २००१)**१९१५:श्रीकृष्ण विठ्ठल गंधे (मामासाहेब)-- क्रीडा,साहित्य,प्रशासन,प्रकाशन,संपादन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य (मृत्यू:१३ ऑक्टोबर २००१)* *१८९३:इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू:१३ नोव्हेंबर १९५६)**१८८८:पुरुषोत्तम श्रीपद काळे -- चित्रकार, रंगभूमिविषयकग्रंथाचे लेखन(मृत्यू:२८ सप्टेंबर १९७६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५:योगिनी जोगळेकर –मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका(जन्म:६ ऑगस्ट १९२५)**१९९६:ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१७ सप्टेंबर १९०६)**१९९४:कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ,कामगार नेते (जन्म:१९१८)**१९९३:नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका* *१९९१:अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक(जन्म:२७ ऑक्टोबर,१९५४)**१९७८:हरिहर गुरुनाथ कुलकर्णी (कुंजविहारी) कवी (जन्म:१० नोव्हेंबर १८९६)**१९५०:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक(जन्म:१२ सप्टेंबर १८९४)**१८७३:दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म:१८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... संत जनाबाई ......संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्याखेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण - शाहू महाराज छत्रपतींनी मनोज जरांगेंची घेतली भेट. सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, शाहू महाराजांचं जरांगेंशी संभाषण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांना पुष्पांजली, गुजरातसाठी 5950 कोटींची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धाराशिवमध्ये पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची 53 दिवसांनी तुरुंगातून झाली सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने बांगलादेशवर 7 विकेटनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमलादेवी चटोपाध्याय* कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 साली मंगलोर येथे झाला.मद्रास येथे कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांचा विवाह इंग्रजीतील नामवंत कवी श्री हरींद्रनाथ चटोपाध्याय यांचे बरोबर झाला.पति बरोबर त्या इंग्लंड ला गेल्या.तेथे त्यांनी समाजशास्त्र व इंग्लिश रंगभूमी चा अभ्यास सुरू केला.त्याच दिवसात महात्मा गांधीजी च्या असहकार चळवळीने जोर पकडला होता.भारतातील बातम्या एकून, इंग्लंड मधील अभ्यासक्रम मधेच सोडून त्या भारतात परतल्या. भारतात परत आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला , त्यांना तुरुंगवास ही झाला.काही दिवसांनी त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पक्षात प्रवेश केला. कमला देवींनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.भारतीय स्त्री परिषद ही संघटना स्थापन केली.स्त्रियांच्या जागृती साठी आणि उन्नती साठी त्यांनी प्रयत्न केले.स्त्रियांच्या साठी करीत असलेल्या कार्या ची जाण ठेवत भारत सरकार ने त्यांना भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधी म्हणून बर्लिन,जीनेव्हा,प्राग इत्यादी ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांना पाठविले.परदेशातही त्यांनी आपल्या विचारांची आपल्या लिखाणा द्वारे छाप पाडली.त्यांनी केलेल्या स्त्री उन्नती साठी च्या कार्या बद्दल त्यांना 1962 मध्ये " बाबूमल" पुरस्कार तर 1966 साली त्यांना " मॅगसेस"पुरस्कार देण्यात आला.29 ऑक्टोबर 1988 साली त्यांचे निधन झाले. स्त्री अधिकारा विषयी जागृत असलेल्या व ते स्त्री ला मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या कमलादेवी यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शाती आणि आनंद विनामूल्य मिळवण्यासाठी सर्वांना नेहमी मदत करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला जागतिक अन्न पुरस्कार १९८७ मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला ?२) पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?३) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणकोणते बालछंद होते ?४) भारताचे लष्करप्रमुख कोण आहेत ?५) जगातील कोणत्या ठिकाणाला 'विमानांची स्मशानभूमी' म्हणून ओळखली जाते ? *उत्तरे :-* १) डॉ. एम. एस. स्वामिनाथन, भारत २) राष्ट्रपती ३) एकांती ध्यान, लोकांती कविता कीर्तन ४) जनरल मनोज पांडे ५) डेव्हिस मांथन एअरबेस, अरिझोना ( ४५०० विमाने एकत्र ठेवलेली आहेत. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मीकांत बामणीकर, शिक्षक, नांदेड👤 संजय कांबळे खडकीकर, गटसमन्वयक, माहूर जि. नांदेड👤 प्रशांत सुरवसे👤 राहुल संत👤 ऋषिकेश मंदेवाड👤 संतोष डिके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांकडून वारंवार मदत घ्यायची आपल्याला सवय झाली की, मग तिचे रूपांतर सवयीत होते. अशा प्रकारची, सवय लावून घेण्याऐवजी थोडेतरी इतरांना मदत करण्याची परोपकार वृत्ती ठेवावी व ते कार्य करण्यासाठी आपले मन मोठे असावे लागते. आजच्या घडीला संतोषी वृत्तीची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कवी व श्रीमंत माणूस* *एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या. कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतू तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मीही तुम्हाला खुश करून टाकेन. बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला.दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना,अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला,कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केलं, प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही, मीही तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला.या आता परत केव्हातरी.बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगीतली.बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत ही घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतू बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला, जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो, उद्या माझ्या घरी जेवायला या,कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्टीय एकता दिन_**_ या वर्षातील ३०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या**१९८४:भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६६:दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना**१९४१:’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.**१९२०:नारायण मल्हार जोशी,लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली.लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.**१८८०:धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८७६:भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार**१८६४:नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:आनंद घोडके -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७७:प्रा.डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर -- लेखिका* *१९७५:निलेश नामदेव मालवणकर -- लेखक**१९७४:दीपा परब--मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७३:मंगेश शिवलाल बरई-- कवी* *१९५१:चंद्रकांत काळे -- रंगभूमीवरील गायक,अभिनेते,निर्माते**१९४६:रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू:११ ऑगस्ट १९९९)**१९३७:डाॅ.मुरलीधर बन्सीधर शहा-- गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक(मृत्यू:९ ऑक्टोबर २०१७)**१९३०:शकुंतला फडणीस-- मराठी लेखिका आणि बालसाहित्यिक(मृत्यू:१६ एप्रिल २०२१)* *१९२६:कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतचे,संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक,व संशोधक(मृत्यू:३० जुलै २०१३)**१९२२:नॉरदॉम सिहानोक --कंबोडिया देशाचे पंतप्रधान (मृत्यू:१५ ऑक्टोबर २०१२)**१९१६:माधव प्रल्हाद काळे -- कवी**२९१३:लक्ष्मण रामचंद्र गोडबोले--लेखक**१८९५:सी.के.नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९६७)**_१८७५:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (मृत्यू:१५ डिसेंबर १९५०)_**१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म.(मृत्यू: ५ एप्रिल १९७५)**१३९१:एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू:९ सप्टेंबर १४३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:गिरिजा कीर-- मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार(जन्म:५ फेब्रुवारी १९३३)**२००९:सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.(जन्म: १९१९)**२००५:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला.(जन्म:३१ ऑगस्ट १९१९)**१९८६:आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म:३ जून १८९२)**१९८४:शरच्चंद्र माधव मुक्तिबोध-- प्रसिद्ध मराठी कवी,कादंबरीकार आणि समीक्षक(जन्म:२१ जानेवारी १९२१)**_१९८४:भारताच्या ३ र्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली.(जन्म:१९ नोव्हेंबर १९१७)_**१९७५:सचिन देव बर्मन – प्रसिद्ध संगीतकार व गायक (जन्म:१ आक्टोबर १९०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय एकता दिवस*आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day)' साजरा केला जातो. अनेक भारतीय संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामध्ये हैदराबादसह इतर संस्थानांचाही समावेश आहे.भारतासारख्या वैविध्यतेने परिपूर्ण अशा देशात, तेथील लोकांमधील एकता अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळी अनेक संस्थानांचे तुकडे झाले होते, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यामुळे हा दिवस वल्लभभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांनी देशाला जोडण्यासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. "विविधतेत एकता" च्या भावनेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याला महत्त्व देणारा हा दिवस आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये अधिकृतपणे 'राष्ट्रीय एकात्मता दिवसा'ची घोषणा केली. अखंड आणि सशक्त भारताचे कट्टर समर्थक असणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस त्यांचा वाढदिवसाचे अवचित्य साधून 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून भारत सरकारने जाहिर केला आहे. २०१८ मध्ये, सरदार वल्लभभाई पटेल (वल्लभभाई झावेरभाई पटेल) यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नर्मदा नदीजवळ स्थित भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन केले. "एक भारत, श्रेष्ठ भारत" ही पटेल यांची प्रसिद्ध घोषणा आजही राष्ट्राला प्रेरणा देते.आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून विनम्र अभिवादनसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरची मुदत!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग आजपासून 02 नोव्हेंबर असे तीन दिवसांसाठी बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहत त्यांचा पाठिंबा केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार पाच रुपयात लीटरभर पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गॅसवर 500 रु. अनुदान व बचत गटाचे कर्ज माफ करू छत्तीसगड निवडणुकीत प्रियंका गांधीचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य नरेंद्र देव* नरेंद्र बलदेव देव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सितापूर या गावी 30 ऑक्टोबर 1889 साली झाला. त्यांच्या वडिलांनचे नाव बलदेव प्रसाद व आईचे नाव जवाहर देवी होते. वडील वकील होते. नरेन्द्रचे प्राथमिक शिक्षण सितापूर या ठिकाणी झाले. ते बनारस ह्या ठिकाणी एल एल बी झाले. अलाहाबाद येथे शिक्षण घेत असताना देव यांना लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बीपीनचंद्र पाल, पंडित मदन मोहन मालवीय या सारख्या देश भक्तांची भाषणे ऐकावयास मिळाली. त्यामुळे त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. लोकमान्य टिळकांनी भेट झाल्यावर टिळकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी फैजाबाद ह्या ठिकाणी होमरुल लीग या पक्षाची शाखा सुरू केली.1921 साली जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून त्यांनी वकिली व्यवसाय सोडून काशी विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी धरली. तेथे ते विना वेतन काम करीत. मात्र पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे ते आवश्यक तेव्हढाच पगार घेऊ लागले. 1926 साली नरेंद्र देव त्या विद्यापीठाचे प्राचार्य झाले. तेंव्हापासून लोक त्यांना आचार्य म्हणून संबोधू लागले. 1930 व 1942 मध्ये स्वतंत्र चळवळीत भाग घेतल्या मुळे आचार्यांना कारावास भोगावा लागला. 1946 मध्ये ते उत्तर प्रदेश विधिमंडळ वर निवडून आले. पण मंत्रिपद न स्वीकारता ते जनसेवेत राहिले.1947 ते 1951 या काळात आचार्यांनी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. कुलगुरू पदावर असतांना त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात आमूलाग्र बदल केले. भारतात समाजवादी पक्षाचे स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. अश्या ह्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यागी पुरुषाचे 19 फेब्रुवारी 1956 मध्ये निधन झाले . आचार्य नरेंद्र देव यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ?२) राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?४) राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?५) जगातला सगळ्यात शांत, निवांत देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) ३१ ऑक्टोबर २) ३१ ऑक्टोबर ३) हैदराबाद ४) राष्ट्रपती ५) आइसलँड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आप्पासाहेब सुरवसे, शिक्षक तथा स्तंभलेखक, उस्मानाबाद👤 नजमा शेख,क्रियाशील शिक्षक, बीड👤 आनंद घोडके, संयोजक, काव्यप्रेमी शिक्षक मंच👤 जागृती निखारे, जेष्ठ साहित्यिक, मुंबई👤 निलंजन यडपलवार, धर्माबाद👤 शीतल गांधी, बार्शी👤 सुनीता शिंदे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें। विवेके अहंभाव यातें जिणावें॥ अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सोबतीला अवतीभोवती कितीही जण असले तरी प्रवास शेवटी एकट्यालाच करावा लागतो. म्हणून नको त्या, गोष्टींकडे लक्ष देऊ नये व जे, आपल्यासाठी योग्य आहे त्याकडेच काळजीपूर्वक लक्ष देऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *गाणारा पोपट*📗*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन ...समजलं ! ".* *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीरभोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा पाहावं. बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक काटकसर दिन_**_ या वर्षातील ३०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.**१९९५:कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.**१९७३:इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.**१९६६:शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.**१९४५:भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.**१९२८:लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.**१९२०सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६४:रोहिणी अमोल पराडकर-- कवयित्री, लेखिका**१९६२:कोर्टनी अँड्र्यू वॉल्श-- वेस्टइंडीज चा माजी क्रिकेटपटू* *१९६०:ॲड.गोविंद भेंडारकर-- लेखक* *१९६०:डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू**१९५४:धनराज गोविंदराव गोंडाणे -- लेखक* *१९५२:दलीप ताहिल-- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि थिएटर अभिनेता* *१९४९:प्रमोद महाजन – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू:३ मे २००६)**१९४८:हेमंत गोविंद जोगळेकर -- सुप्रसिद्ध कवी**१९४८:निर्मला उत्तरेश्वर मठपती-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका (मृत्यू:१० ऑक्टोबर२०२०)**१९४७:विक्रम गोखले-- मराठी नाट्य-चित्र अभिनेते* *१९४६:अशोक सुमितराव हिवाळे -- प्रसिद्ध लेखक,चरित्रकार* *१९४१:डॉ.सुधीर वसंत राशिंगकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३८:डॉ.रवींद्रनाथ वामन रामदास-- लेखक* *१९३४:भुजंगराव दत्तराव वाडीकर-- लेखक**१९३०:गंगाधर नारायण मोरजे-- लोकवाङ्मयाचे अभ्यासक व मराठी ख्रिस्ती साहित्याचे संशोधक(मृत्यू:९ जुलै २००५)**१९२९:माधव गोठोस्कर-- माजी भारतीय क्रिकेट पंच* *१९०९:डॉ.होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ जानेवारी १९६६)**१८९८:दिनकर विनायक काळे-- लेखक, इतिहास संशोधक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८८७:सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक,चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू:१० सप्टेंबर १९२३)**१७३५:जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू:४ जुलै १८२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:यशवंत देव-- प्रसिद्ध मराठी कवी आणि संगीतकार(जन्म:१ नोव्हेंबर १९२६)**२०११:अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म:२७ आक्टोबर १९२३)**१९९८:विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १९०६)**१९९६:प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक,पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म:२९ नोव्हेंबर १९२६)**१९९४:सरदार स्वर्ण सिंग –माजी केन्द्रीय मंत्री (जन्म:१९ ऑगस्ट १९०७)**१९९०:व्ही.शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते,पद्मश्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते(जन्म:१८ नोव्हेंबर १९०१)**१९९०:विनोद मेहरा – प्रसिद्ध अभिनेता(जन्म:१३ फेब्रुवारी १९४५)**१९७४:बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(जन्म:७ आक्टोबर १९१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... समर्थ रामदास स्वामी .....समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च१६०८, जांब - १३ जानेवारी, १६८१, सज्जनगड) हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे. दासबोध व मनाचे श्लोक याचे लेखन त्यांनी केले आहे.समर्थ रामदासस्वामी (नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते. या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचेदर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अॅम्बॅसेडर, 'कॅप्टन कूल'वर मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये भारताने इंग्लडला 100 धावांनी हरविले, विश्वचषक मध्ये सलग सहावा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्ही. शांताराम चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे. यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापूर येथे झाला. मॅट्रिकला असतांना त्यांना काही कारणाने शाळा सोडावी लागली. शाळेत असताना, शाळेच्या नाटकात ते नेहमी काम करीत असत. वयाच्या 19 व्या वर्षी1920 साली व्ही. शांताराम, बाबुराव पेंटर यांच्या फिल्म कंपनीत दाखल झाले. या कंपनीत त्यांनी सुभद्रा हरण, नेताजी पालकर, सिंहगड वगैरे सिनेमात त्यांनी कामे केली. 1929 साली त्यांनी दामले व फत्तेलाल यांच्या सहकार्याने प्रभात फिल्मची स्थापना केली.1932साली या कंपनीने मराठी भाषेतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात कंपनी मध्ये व्ही शांताराम यांनी सिंहगड, संत तुकाराम, माणूस, दुनिया न माने, कुंकू, ज्ञानेश्वर, शेजारी असे अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण केले. ते सर्व लोकप्रिय झाले. 1941 साली व्ही शांताराम यांनी "राजकमल" ह्या नावाची संस्था काढली. या संस्थेने शाहीर, रामजोशी, अमर भूपाळी, पिंजरा अश्या एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी चित्रपट सृष्टीत ही या मराठी कलावंताने, दिगदर्शकाने सुंदर चित्रपट निर्माण केले. डॉ कोटणीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शकुंतला हा व्ही शांताराम यांनी तयार केलेला व अमेरिकेत प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. 1985 साली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार"दादा साहेब फाळके पुरस्कार" त्यांना देण्यात आला. भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. अश्या या थोर मराठी कलावंताचे 28 ऑक्टोबर 1990 रोजी निधन झाले. व्ही शांताराम यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?२) डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे ?३) जागतिक काटकसर दिन केव्हा साजरा केला जातो ?४) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम कोणत्या देशाला भेट दिली ? *उत्तरे :-* १) ३० ऑक्टोबर १९०९ २) ट्रॉम्बे, मुंबई ३) ३० ऑक्टोबर ४) ३० ऑक्टोबर ५) भूतान ( १५ ते १६ जून २०१४ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शैलेंद्र सुरकुटवार👤 बसवराज पाटील, शिक्षक नेते, नांदेड👤 विजय जोशी, साहित्यिक👤 संग्राम टेकाळे👤 पंकज गादेवार, धर्माबाद👤 श्याम स्वामी, शिक्षक, हिंगोली👤 सोहम कवडे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा। जनीं वादसंवाद सूखे करावा॥ जगीं तोचि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रत्येकांचे आचार, विचार, रंग, रूप वेगवेगळे असतात. पुन्हा त्यात बरेच काही. तसेच त्यांचे जगणे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणून कोणाच्या आचार, विचाराला किंवा रंग, रूपाला कमी लेखू नये. किंवा त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात आणू नये असे केल्याने किंवा वागल्याने आपल्यात असलेल्या सदगुणाचाच अपमान होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि लांडगा**एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,'' महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले. त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला,'' महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.**तात्पर्य :-आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक दृकश्राव्य वारसा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९८६:युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.**१९७१:डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.**१९६१:मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू**१९७८:प्रा.अश्विन सुरेश खांडेकर-- कवी लेखक**१९७७:कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७६:सना पंडित --लेखिका**१९६८:सुदेश लहरी-- चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६५:संजय पाटील-- कवी**१९६५:मोहन कपूर-- भारतीय अभिनेता आणि टेलिव्हिजन होस्ट**१९६४:मार्क टेलर - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:चंद्रशेखर पंडित -- लेखक* *१९५४:अरुणा पवार-चवरे -- कवयित्री (मृत्यू:२५ ऑक्टोबर २०१२)**१९५४:अनुराधा पौडवाल – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:रेखा भिवगडे-- कवयित्री**१९५२:डाॅ.आशा प्रभाकर कुलकर्णी-- कवयित्री,लेखिका* *१९५०:सीमा सुरेश गरसोळे -- गायिका, कवयित्री,लेखिका**१९४९:प्राचार्य पांडुरंग केशवराव गाडीलकर-- लेखक,संपादक* *१९४७:डॉ.विकास आमटे – महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.नसीम महमद खान पठाण-- प्रसिद्ध लेखिका,विविध पुरस्काराने सन्मानित**१९४४:उषा प्रकाश ठाकरे-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९२८:माधव हरी पिटके -- लेखक**१९२३:अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू:३०आक्टोबर २०११)**१९२०:के.आर.नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू:९ नोव्हेंबर २००५)**१९०४:जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२९)**१८७४:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – सुप्रसिद्ध कवी (मृत्यू:७ डिसेंबर १९४१)**१८५८:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:६ जानेवारी १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:मदनलाल खुराना -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१५ऑक्टोबर१९३६)**२०१३:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- मराठी कवी(जन्म:५ऑक्टोबर १९३५)**२००७:सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म:१९३१)**२००१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार,विज्ञानकथाकार, (जन्म:३१ मे १९१०)**२००१:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म:४ जानेवारी १९२५)**१९८७:विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म:१२ आक्टोबर १९११)**१९७४:चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म:९ जानेवारी १९३८)**१९६४:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १८९१)**१९३७:’संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म:११ नोव्हेंबर १८७२)**१७९५:सवाई माधवराव पेशवा (जन्म:१८ एप्रिल १७७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*श्री संत नामदेव महाराज श्री संत नामदेव महाराज यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या नरसिबामणी या खेड्यात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव दामासेठ व आईचे नाव गोणाबाई होते.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी सर्वांना लावला.भागवत धर्माचे पहिले प्रचारक म्हणून नामदेवांचे नांव घ्यावे लागेल.ज्ञानेश्वरा बरोबर नामदेवांनी तीर्थयात्रा केल्या.उत्तर भारतात पंजाब पर्यंत जाऊन तेथे विठ्ठल भक्ती पोहोचविली.त्यांची हिंदी भाषेतील कवने,शिखांच्या ग्रंथ साहेबात संग्रहित आहेत.नामदेवांची अनेक मंदिरे पंजाबात आहेत.नामदेवांचे म्हणता येतील असे सुमारे पाच सहाशे अभंगच आज उपलब्ध आहेत.त्यांच्या कोमल आणि भावमधुर काव्या मुळे मराठी साहित्यात भाव कवितेचे नवीन दालन उघडले.आज सहाशे वर्षां नंतर ही घराघरातून नामदेवांचे अभंग भक्तीने गायिले जात आहेत.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी साऱ्या महाराष्ट्राला लावला.त्यांच्या घरातील दासी जनाबाई सुद्धा नामदेवांच्या सानिध्या मुळे अभंग रचू लागली आणि संत जनाबाई झाली.महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना धार्मिक आणि सदाचारी बनवून पंढरपूर ची वारी दरवर्षी करणारा प्रचंड वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. वारकरी संप्रदायातील स्रेष्ट संत श्री नामदेव महाराज यांनी 3 जुलै 1350 या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महा द्वारात समाधी घेतली.विठ्ठल दर्शना साठी येणाऱ्या सर्व संत जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वारा च्या पहिल्या पायरी खालीच हे समाधी स्थांन तयार करण्यात आले आहे. अश्या थोर संताचे पुण्य स्मरण आणि त्यांना दंडवत।शब्दांकन :- सुरेखा खोत ( फेसबुक वरून साभार )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'बारा सुसज्ज वातानुकूलित हॉल, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात दर्शन रांगेचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना 'गावबंदी'*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मैदानात, 1 नोव्हेंबरपासून काढणार 'एल्गार यात्रा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयांचा दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक ! पुढील 12 तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या 89 व्या वर्षी निधन, आज नवी मुंबईत होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांदोबा मासिक*चंदामामा, चांदोबा, जन्हामामू, अंबुलीमामा अशा विविध नावाने भारतातील सुमारे 13 भाषांत प्रकाशित होणार्या चंदामामा या लहान मुलांच्या मासिकाला जुलै महिन्यात सुमारे 70 वर्षे पूर्ण झाली. या मासिकाचा पहिला अंक जुलै 1947 रोजी प्रकाशित झाला. या मासिकाचे संस्थापक संपादक होते बी. नागिरेड्डी तर कार्यकारी संपादक होते चक्रपाणी.प्रथम तेलुगू व तमिळ भाषेत ’अंबुलीमामा‘ या नावाने प्रकाशित झालेल्या या मासिकाने केवळ लहान मुलांतच नव्हे ते मोठ्या लोकांतही अमाप लोकप्रियता मिळवली. पौराणिक कथानके, मनोरंजक गोष्टी, आकर्षक चित्रे याने सजलेला चंदामामा पाहता पाहता प्रथम क्रमांकाचे लहान मुलांसाठीचे मासिक बनले. इंग्रजी, कन्नड, मराठी, मल्याळम, गुजराती, उडीया, सिंधी, बेंगाली, पंजाबी, आसामी, सिंहली, संस्कृत, व संथाली या भाषांतही हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले.1947 ते 2006 म्हणजे सुमारे साठ वर्षे हे मासिक सुरू राहिले. मात्र, त्यानंतर या मासिकाचे हक्क दुसर्या कंपनीला विकण्यात आले. या मासिकाचा शेवटचा अंक 2013 साली प्रसिद्ध झाला. आता सुमारे सत्तर वर्षे उलटून गेली असली तरी या मासिकांची आबालवृद्धांमध्ये असलेली लोकप्रियता इतर कोणत्याही मासिकाने मिळवलेली नाही.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानपदी असताना बॉयफ्रेंडपासून ब्रेकअप अशी जाहीर घोषणा करणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?२) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मनाव काय होते ?३) भारतीय पायदळ दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ( RRTP ) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण कोणत्या नावाने करण्यात आले आहे ?५) वैनगंगा नदीचा उगम कुठे झाला आहे ? *उत्तरे :-* १) जॉर्जिया मेलोनी, इटली २) माणिक ३) २७ ऑक्टोबर ४) नमो भारत ५) दरेकसा टेकड्या, सिवनी, मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गीता विश्वास केदारे, साहित्यिक, मुंबई👤 नीता आरसुले, क्रियाशील शिक्षिका, जालना👤 मोहिनी रावजीवार👤 शिव गंगूलवार👤 ओम माळवतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कोपआरोपणा ते नसावी। मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं। मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलताना तोलून मोलूनच बोलले पाहिजे. इतरांचे मन दुखेल असे बोलू नये. बोलण्यातून अर्वाच्य शब्द प्रयोग करु नये. आपल्या बोलण्यातून जेव्हा इतरांसाठी अर्वाच्य शब्द निघतात तेव्हा, त्या जिभेचा किंवा मुखाचा काहीही दोष नसतो. आपल्यात असलेल्या नको त्या दुर्गुणांचा दोष असतो. म्हणून म्हणतात ना की, बोलताना जरा विचार करूनच बोलावे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अपमानित करून बोलतो त्याचा आनंद जरी आपल्या बाह्य मनाला होत असेल पण, अंतर्मनाला होईलच असे नाही. कारण आपले अंतर्मन हे अनुभवी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *तीन माशांची गोष्ट*📗 *स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.**तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २९९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर**१९९४:जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.**१९६२:वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.**१९०५:नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:आतिश सुरेश सोसे -- कवी,लेखक,संपादक विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७४:रवीना टंडन – अभिनेत्री**१९६७: हरिश्चंद्र लाडे--कवी लेखक विचारवंत* *१९६६:डॉ.रमेश रामजी राठोड -- लेखक* *१९६६:मंजुषा अभिजित आमडेकर-- लेखिका* *१९५५:मनिषा चिंतामणी आवेकर -- लेखिका,कवयित्री* *१९५४:शब्बीर कुमार-- भारतीय पार्श्वगायक**१९५४:लक्ष्मीकांत बेर्डे-- मराठी व हिंदी चित्रपट प्रसिद्ध विनोदी अभिनेता(मृत्यू:१६ डिसेंबर२००४)**१९४९:पंडित सुहास व्यास- शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान* *१९४४:प्रा.विद्या गंगाधर सप्रे-चौधरी-- लेखिका**१९३७:हृदयनाथ मंगेशकर – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९३०:दत्तात्रेय भास्कर धामणस्कर-- मराठी कवी**१९२५:शंकर भाऊ साठे-- कादंबरीकार आणि शाहीर(मृत्यू:१५ मार्च १९९६)* *१९१९:मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू:२७ जुलै १९८०)**१९००:कौतिक नारखेडे-- कवी कथाकार (मृत्यू:२१ सप्टेंबर १९८०)**१९००:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू:७ मार्च १९९३)**१८९१:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू:२७ आक्टोबर १९६४)**१८८८:हरी कृष्ण मोहनी-- लेखक,राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते (मृत्यू:२९आक्टोबर १९६१)**१८३८:केशव सदाशिव रिसवूड -- लेखक (मृत्यू:४ नोव्हेंबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक,लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक,हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म:१४ नोव्हेंबर १९१९)**१९८१:दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे--- कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक (जन्म:३१ जानेवारी १८९६)**१९७९:चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ(जन्म:२२ ऑगस्ट १८९५)* *१९३०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:१५ मार्च १८६०)**१९०९:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म:१६ आक्टोबर १८४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*..... संत तुकाराम महाराज ....तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. पंढरपूरचे पांडुरंग हे तुकाराम महाराज यांचे आराध्यदैवत होते.माहिती नाही आणि त्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती इतिहासात उपलब्ध नाही पण शोधकर्त्यांच्या मते, त्याचा जन्म १५९८ किंवा १६०८ मध्ये महाराष्ट्रातील पुण्याच्या देहू गावात झाला आहे.त्यांच्या घरात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा पहिल्यापासून होती. तुकाराम महाराज यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई. तसेच त्यांना दोन भाऊ होते. मोठा भाऊ सावजी आणि लहान कान्होबा. संत तुकाराम महाराज यांचे पाहिले लग्न पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची मुलगी आवली सोबत झाले.त्यांचे कुटुंब कुणबी समाजातील होते. तुकाराम महाराज यांच्या कुटुंबाचा किरकोळ विक्री आणि पैसे उधारीवर देने असा व्यवसाय होता., तसेच त्यांचे कुटुंब शेती व व्यापार करत होते. त्यांचे वडील विठोबाचे भक्त होते. विठोबा हा हिंदू धर्मात भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. तुकाराम महाराजांच्या बालपणातच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.आणि त्यांना एक मुलगा संतू देखील होता. १६३० – १९३२ च्या दुष्काळात मुलगा आणि बायको दोन्ही मरण पावले.त्यांच्या मृत्यूचा आणि वाढणाऱ्या गरिबीमुळे सर्वात ज्यात प्रभाव संत तुकाराम महाराज यांच्यावर पडला. त्यानंतर त्यांनी भंडारा डोंगरावर जाऊन मौन धारणा करण्याचा निर्णय घेतला.यानंतर तुकाराम महाराज यांनी पुन्हा लग्न केले आणि त्यांच्या दुसर्या पत्नीचे नाव नवलाई (जीजा बाई) असे होते. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. परंतु त्यानंतर त्यांनी आपला बहुतेक वेळ पूजा, भक्ती, समाज कीर्तन आणि अखंड कवितांमध्ये घालविला.तुकाराम महाराज यांचे अध्यात्मिक गुरु बाबाजी चैतन्यहोतेहोते. ते स्वत: ते 13 व्या शतकातील विद्वान जननादेवाचे चौथ्या पिढीचे शिष्य होते.एका माहितीनुसार तुकारामांचा मृत्यू १६४९ किंवा १६५० मध्ये झाला.तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्रामधील भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते सर्ववादी, वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. तुकाराम त्यांच्या अखंड आणि भक्तिमय कवितांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कविता विठ्ठल आणि विठोबाला समर्पित होत्या.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 22 हजार 300 कोटींचं गिफ्ट, रब्बी हंगामासाठीही खतांवर सबसिडी कायम राहणार, युरियाच्या किमतीत वाढ नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा! धाराशिवमध्ये 109 गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी, लातूरमध्येही गावबंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आज गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 -सर्वात जलद शतक आता ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 पक्ष्यांची माळ बाणाच्या टोकासारखी का असते? 📒'बगळ्यांची माळ उडे अजून अंबरात' वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातल्या या गीताची मोहिनी अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. जेव्हा त्यांच्याच आवाजात त्यांचा नातू राहुल हे गीत गातो तेव्हा स्मरणरंजनाचा आनंद तर मिळतोच; पण नेहमीचा एक अनुभवही जागा होतो. तिन्हीसांजा झाल्यावर आपापल्या घरट्याकडे परतणाऱ्या बगळ्यांची, खरं तर इतर पक्ष्यांचीही आकाशातली माळ बाणाच्या टोकासारखी किंवा इंग्रजीतल्या 'व्ही' या अक्षरासारखी रचना करून उडताना दिसते. दिवसाकाठी चाऱ्याच्या शोधात आपल्या घरट्यापासून हे पक्षी दूरवर जात असले तरी त्यांना परतताना फार मोठं अंतर पार करावं लागत नाही; पण निरनिराळ्या ऋतूंमध्ये स्थलांतर करणारे पक्षी शेकडो, हजारो किलोमीटर दूरवरच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी जात असतात. हिवाळ्यात हे पक्षी उबदार प्रदेशाकडे कूच करतात. उन्हाळ्याची चाहूल लागली की परत उलट दिशेनं झेप घेतात.अशा दूरवरच्या उड्डाणातही या पक्ष्यांची माळ अशीच बाणाच्या टोकासारख्या रचनेचा अवलंब करताना दिसते. साहजिकच तो पक्ष्यांचा कळप असं का करतो, हा सवाल त्या बाणासारखाच टोचत राहतो.त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, तसं केल्यानं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. हवेतून उडताना त्यांना हवेच्या किंवा खरं तर वाऱ्याच्या विरोधाला तोंड द्यावं लागतं. त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांना काही ऊर्जा खर्च करावी लागते. एकापाठोपाठ सरळ रेषेत जर हे पक्षी उडत राहिले तर पुढच्याच्या उडण्यापायी हवेत उठलेल्या आवर्तनांचाही सामना त्यांना करावा लागतो. तो टाळण्यासाठी मग हे पक्षी पुढ्यातल्या पक्ष्याच्या जरा वर आणि बाजूला असे उडत राहतात. त्यामुळं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. तसंच आपल्या जागा बदलत जरा थकलेल्या, पुढ्यात राहून मार्गदर्शन करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीही देता येते. तसं केल्यानं एका दमात ते दूरवरचा पल्ला गाठू शकतात. हजारो किलोमीटरची मजल मारताना अधेमधे कमी मुक्काम करावा लागतो आणि आपलं गंतव्य स्थान लवकर गाठता येतं.दुसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अशा बाणाच्या टोकासारख्या रचनेत कळपातल्या प्रत्येक पक्ष्याकडे लक्ष ठेवणं सोपं जातं. त्यामुळं कोणीही वाट चुकून भरकटणार नाही, याची खात्री करून घेता येते. तसंच जर कोणाला काही कारणानं मदत लागलीच तर इतरांना सावध करून सर्वच कळप एका ठिकाणी उतरू शकतो. या कारणांमुळंच असावं; पण लढाऊ विमानांचा काफिला जेव्हा एकमेकांच्या साथीनं उडत असतो तेव्हा तोही याच प्रकारच्या रचनाबंधाचा अवलंब करतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले महाराष्ट्रातील पहिले अग्निवीर कोणते ?२) संत नामदेव महाराजांचा जन्म केव्हा झाला ?३) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?४) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे ?५) इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) अक्षय लक्ष्मण गवते, बुलढाणा २) २६ ऑक्टोबर १२७० ३) डावीकडून उजवीकडे ४) महाभारत ५) जॉर्जिया मेलोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव गव्हाणे, क्रियाशील शिक्षक👤 अविनाश थोरात👤 नवनाथ शिंदे👤 सौ. संगीता नामेवार-कंदेवार👤 गणेश पालदेवाड, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू शापिता कष्टला अंबऋषी। तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥ दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावाला औषध नसते, स्वभाव बदलत नसतो असं म्हटल्या जाते. कदाचित हे सुद्धा खरं असू शकते. असा स्वभाव व्यक्तीला दुराग्रही व हट्टी बनवू शकतो. यातून स्वतःचेच नुकसान होण्याची भीती असते. अशी व्यक्ती इतरांपासून दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेळ, प्रसंग पाहून थोडे तरी आपल्या स्वभावात बदल आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण चांगल्या कामासाठी व त्यातून इतरांचे भले होत असेल तर...तो स्वभाव कल्याणकारी ठरू शकतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*📗 *एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.**तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.**१९९९:दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे.एम.कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.**१९९४:ए.एम.अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२:युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५१:स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:प्रणिता सुभाष-- भारतीय अभिनेत्री**१९६०:माधव गरड-- ज्येष्ठ कवी ललित लेखक (मृत्यू:१२ ऑगस्ट२०२२)**१९५४:अजित वसंत राऊळ-- कवी**१९५४:अरुण म्हात्रे-- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी,गीतकार आणि निवेदक**१९५०:अरुण हरिभाऊ पुराणिक-- ज्येष्ठ सिने पत्रकार**१९४८:अनंत नरहर जोशी -- लेखक* *१९४५:अपर्णा सेन – अभिनेत्री,चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका**१९४२:सूर्यकांत गरुड -- कवी* *१९३८:आदिनाथ कल्लापा कुरुंदवाडे-- ग्रामीण कथाकार* *१९३८:मृदुला गर्ग-- हिंदी लेखिका* *१९३७:डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू:३० जुलै २०११)**१९२६:डॉ.केशव रंगनाथ शिरवाडकर --साहित्यसमीक्षक,मराठीत वैचारिक लेखन करणारे लेखक(मृत्यू:२५ मार्च २०१८)* *१९२२:पांडुरंग नारायण कुळकर्णी -- प्राचीन मराठी वाड्:मयाचे संशोधक**१८८१:पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू:८ एप्रिल १९७३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.डॉ.रुस्तुम अचलखांब-- मराठी लेखक व नाटककार(जन्म:१९४४)* *२०१२:जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म:३ मार्च १९५५)**२००९:कान्होपात्रा किणीकर-- विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री (जन्म:२ ऑक्टोबर१९३४)**२००९:चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म:१४ जानेवारी १९२३)**२००३:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(जन्म:१९ऑक्टोबर १९२०)**१९९९:सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक,कोशकार,लेखक(जन्म:२३ ऑगस्ट १९२२)**१९८०:अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – प्रसिद्ध शायर व गीतकार (जन्म:८ मार्च १९२१)**१९५५:पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, (जन्म:२८ मे १९२१)**१६४७:इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म:१५ आक्टोबर १६०८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संताची माहिती*..... संत ज्ञानेश्वर .....संत ज्ञानेश्वर हे भारतीय संत आणि प्रसिद्ध मराठी कवी होते ज्यांचा जन्म १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण अष्टमीला आपेगाव पैठण येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुमध्ये जमिनीवर कोसळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका व बांगलादेश सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 149 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फिरकीचा जादूगार हरपला* भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज अशी ज्यांची ओळख आहे ते भारताचे माजी कर्णधार, फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज हरपला आहे. २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले बिशन सिंग बेदी यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या पंधराव्या वर्षीच बिशन सिंग बेदी यांनी पंजाबच्या रणजी संघात पदार्पण केले. १९६८ पासून ते दिल्ली संघाकडून रणजी स्पर्धेत खेळू लागले. १९७४ - ७५ च्या रणजी हंगामात त्यांनी ६४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला. हा त्यावेळी एका हंगामात रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम होता. आपल्या फिरकीच्या बळावर त्यांनी दिल्लीला रणजी चषकही मिळवून दिला होता. भारतीय संघात निवड झाल्यावर त्यांनी आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले. १९७० च्या दशकात बेदी, प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट या भारताच्या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीने क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. हा त्या काळातीलच नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी मारा समजला जातो. बिशनसिंग बेदी यांची डावखुरी गोलंदाजी खेळणे अनेकांना जड जायचे. ते चेंडूला भरपूर उंची द्यायचे. वेगातील बदल, टप्पा बाक ( लूप ) यांचा खुबीने वापर करून बेदी यांनी अनेक सामने गाजवले. त्यांनी ६७ कसोटीत २६६ विकेट्स घेतल्या. त्यांची सरासरीही २८.७१ इतकी चांगली होती. बिशन सिंग बेदी यांनी ६० षटकांच्या विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्यांनी १२ षटकात ८ धावा देत केवळ ०.५० च्या इकॉनॉमी रेटने १ विकेट घेतली होती. काउंटी स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली. नोर्थम्पटनशायर संघाकडून खेळताना त्यांनी ३७० विकेट्स घेतल्या तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५६० विकेट्स घेतल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सुनील गावसकर यांच्या जागी त्यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली. बिशनसिंग बेदी हे निडर आणि स्पषटवक्ते होते त्यामुळेच काहीवेळा ते वादातही सापडले. १९७५ - ७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैका येथील कसोटीत त्यांनी दोन्ही वेळा भारताचा डाव लवकर घोषित केला, वेस्ट इंडिजच्या दहशतवादी गोलंदाजीचा निषेध म्हणून! एकदा न्युझीलंड दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षक म्हणून गेले असता, आपल्या संघाच्या सुमार कामगिरीने वैतागले नि 'साऱ्या भारतीय संघाला हिंद महासागरात बुडवले पाहिजे ' असे बोलून गेले! त्यांच्या फिरकी गोलंदाजीप्रमाणेच बेदी यांचे रंगीबेरंगी फेटे ( पटके ) ही लक्षवेधी ठरायचे. आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम गोलंदाज ठरलेले बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!शब्दांकन :- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस हे बुद्धविहार कोठे आहे ?२) ड्रॅगन पॅलेसला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?३) ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?४) प्रसिद्ध बुद्धविहार ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणी केली ?५) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसचे बांधकाम कोणत्या शैलीत केले आहे ? *उत्तरे :-* १) कामठी, नागपूर २) लोटस टेम्पल ३) सन १९९९ ४) नोरिको ओगावा, जपान व सुलेखा कुंभारे, नागपूर ५) जपानी स्थापत्य शैली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास नक्का, लातूर👤 नितीन गुजराथी, धर्माबाद 👤 गोविंद येळगे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 विजय वाठोरे सरसमकर👤 प्रथमेश मच्छरलावार👤 मारोती गुरलोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद तेथें करावा। विविके अहंभाव हा पालटावा॥ जनीं बोलण्यासारिखे आचरावें। क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कसं वागल्याने काय होतं, विचार न करता बोलल्याने त्याचे परिणाम कशा प्रकारे भोगायला मिळतात, कोणाला धोका दिल्याने संकटाचा किती सामना करावा लागतो आणि बरंच काही या सर्वाविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती असताना सुद्धा आपण का म्हणून नको त्या रीतीने जगत असतो...? या विषयी एकदा तरी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. एक वेळचे इतरांचे उत्तर वेगवेगळे असू शकतात पण, आपले अंतर्मन कधीच चुकीचे उत्तर देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*📗 राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान**१९७३:संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.**१९४४:दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.**१८९०:हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आशिष आत्माराम वरघणे -- लेखक* *१९८३:जोगिंदर शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९८१:सिद्धार्थ रामचंद्र जाधव- प्रसिद्ध मराठी चित्रपटांतील अभिनेता* *१९७९:उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू -- भारतीय अभिनेता**१९७२:एकनाथ नरहरी आव्हाड -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक**१९६७:प्रा.डॉ उल्हास सुधाकर मोगलेवार -- लेखक,संपादक**१९६३:गणेश विसपुते-- कवी,लेखक* *१९६०:नीरजा -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५५:विलास माणिकराव रणभुसे -- लेखक,संपादक* *१९४५:शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ मार्च १९९६)**१९४०:डॉ.श्रीकांत व्यंकटेश मुंदरगी-- लेखक* *१९३९:रमेश भिकाजी तांबे-- लेखक (मृत्यू:१० जून १९९७)**१९३७:देवेन वर्मा-- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२९:मनोहर महादेव देशपांडे -- वैदर्भीय कवी(मृत्यू:२५ डिसेंबर २००५)**१९२९:डॉ.नरेंद्रनाथ बळीरामजी पाटील-- लेखक**१९२४:’संगीतभूषण’ पं.राम मराठे – संगीतकार,गायक व नट (मृत्यू:४ आक्टोबर १९८९)**१९२३:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २०००)**१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे-- लेखिका**१८७९:शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म:७ सप्टेंबर १९३४)**२००१:आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९१७)**१९२१:जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म:५ फेब्रुवारी १८४०)**१९१५:डब्ल्यू.जी.ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:१८ जुलै १८४८)**१९१०:चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म:२० सप्टेंबर १८५३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*..... अमरावतीची अंबादेवी .....विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा परिचित आहे. विदर्भाची कुलस्वामिनी कुलदैवत म्हणून आई अंबाबाई आणि एकविरा देवी यांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र उत्सवात येथे देशभरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात. अंबादेवी संस्थान व एकविरा देवी संस्थान हे आध्यात्मिक कामासोबतच कला, संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचं दिसून येते.विदर्भाचा राजा भिष्मक त्यांची मुलगी रुख्मिणी श्रीकृष्णाच्या धैर्य आणि सहसाच्या गोष्टी होऊन प्रेरित झाली होती. ती कृष्णावर प्रेम करत होती. तिचा भाऊ रूख्मीय याने त्याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्याशी तिचा विवाह ठरवला. रुख्मिणीने कृष्णाला गुप्त निरोप पाठविला, त्या दोघांनी मिळून योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्यापूर्वी तिने अमरावती (महाराष्ट्र) येथील एकविरादेवीच्या मंदिरास भेट दिली. काही यादवाच्या मदतीने येथून कृष्णाने रुख्मिणीला पळवून नेले. कृष्णा रुख्मिणीचा भाऊ रूख्मीय याच्याशी लढला. नंतर राजा भिष्मकाने त्या दोघांचा विवाह ठरवून दिल्याची माहिती अंबादेवी संस्थांचे सचिव रविंद्र कर्वे यांनी दिली.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराची रचनादेखील तितकीच महत्त्वाची आहे. मंदिरात प्रवेश करताना दिसणाऱ्या दोन शिखरांवरील कळस तांब्याचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडपाचं काचेनं मढवलेलं नयनरम्य छत उत्कृष्ट कलेची प्रचिती देतं. काळ्या रंगाची, वालुका पाषाणाची श्रीअंबादेवीची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्णाकृती आसनस्थ मूतीर्चे दोन्ही हात मांडीवर विसावलेले असून डोळे अधोर्न्मिलीत आणि मुद्रा धीरगंभीर आहे. ही मूर्ती अतिप्राचीन असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.देवीचा मुखवटा सोन्याने मढवलेला असून मागे किरीट आहे. कपाळावर बिंदी, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा अनेक दागिन्यांसह देवीला नऊवारी साडी नेसवली जाते.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं, एकनाथ शिंदेंचं मराठा बांधवांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेडीगड्डा धरणावरील पुलाचे खांब खचल्याने सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने २० गावातील शेतकऱ्यांना बसला फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा ; 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास आमरण उपोषण, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी; अजित पवारांवरील आरोपाने गाजलंय प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात ! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धूळ आणि प्रदूषणाने मुंबईकर त्रस्त; अखेर महापालिकेकडून उपाययोजना सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - धरमशाला येथे खेळलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताचा 4 विकेटनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दसरा - विजयादशमी*विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दसरा, दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विनच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्धप्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी ही केली जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र ठेवणे प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'कविता आणि रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी कोणती ?३) सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?४) भारताची प्रथम महिला शासक कोण होती ?५) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरूवात कोणी केली ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) यावली, अमरावती ३) पंचायत समिती सभापती ४) रझिया सुलतान ५) लॉर्ड मेकॉले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ आव्हाड, कवी व साहित्यिक, मुंबई👤 प्रविण राखेवार, नांदेड👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 अभिषेक नागुल, नांदेड👤 ईश्वर डहाळे, नांदेड👤 व्यंकटेश येमेवार, धर्माबाद👤 स्वरदा खेडेकर गावडे👤 पंकज बदाने, शिक्षक, नंदुरबार👤 नरेंद्र रेड्डी चाकरोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो वा मोठे शेवटी कामच असते. त्यात कमीपणा वाटून घेऊ नये व काम मोठे असेल तर.. गर्वाच्या भोवऱ्यात अडकून पडू नये. प्रामाणिकपणे आपले काम करावे त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल कदाचित तो समाधान जगावेगळा असू शकते म्हणून आपल्या कामाला पूजा समजावे कारण तेच काम दोन वेळचे अन्न देते व जगायला शिकवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❒ ❒ कृतघ्नता ❒ ❒* *_एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे._* *_अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला._* *_रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले._* *_हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...,_* *_‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’_**तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर**१९९२:अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.**१९८९:जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.**१९८७:भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.**१९५१:डॉ.शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.**१९४५:फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१९४३:सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना**१९३४:जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.**१८५४:फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:शुभांगी सुनील सरोदे-- कवयित्री* *१९७४:राजेंद्र प्रल्हाद दिघे -- कवी,लेखक**१९६८:प्रतिभा जगदाळे--कवयित्री,लेखिका**१९६०:डॉ.रत्नाकर देवरावजी भेलकर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५५:बाबू फिलिप डिसोझा ( कुमठेकर)-- प्रसिद्ध कवी* *१९५३:प्रा.डॉ.दाणा सदाशिव गजघाटे -- लेखिका**१९५२:डॉ.विश्वेश्वर भालचंद्र सावदेकर -- ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९४९:बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान**१९४६:मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर-- कवी, कादंबरीकार,कथाकार* *१९४४:कुलभूषण खरबंदा--हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते**१९४०:एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू**१९३९:माधव वझे-- आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट**१९३१:शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:१४ ऑगस्ट २०११)**१९२३:श्री वामनराव पै-- महान समाजसुधारक,तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक (मृत्यू:२९मे २०१२)**१९२०:धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म,संस्कृती,तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले.(मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९१७:राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू:२६ सप्टेंबर २००२)**१८३३:अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू:१० डिसेंबर १८९६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म:२७ सप्टेंबर १९३२)**१९९५:लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म:९ एप्रिल १९२५)**१९८२:नरेंद्र बेदी-- बॉलीवूड दिग्दर्शक आणि लेखक(जन्म:१९३७)**१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म:३१ जानेवारी १८९६ )**१९३९:दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी-- मराठी कवी(जन्म:१६ सप्टेंबर,१८८७)**१८३५:मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म:२४ मार्च १७७५)**१४२२:चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म:१६ सप्टेंबर १३८०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... ज्ञानदेवी माता सरस्वती ....बासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - धर्माबाद रस्त्यावर धर्माबादपासून १५ km नांदेडपासून १०२ km अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बासर हे गाव सरस्वती देवीचे जन्मस्थान समजले जाते. नवरात्रीच्या दिवसांत येथे तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक दर्शनासाठी जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी याठिकाणी अक्षराभ्यास करण्यासाठी खूप गर्दी होते. श्री सरस्वतींची मंदिरे भारतात तीनच ठिकाणी आढळून येतात. काश्मिरातील श्री वैष्णोदेवी, दुसरे शृंगेरी येथील शारदादेवी व तिसरे बासर येथील श्री ज्ञान सरस्वतींचे मंदिर आहे . श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदापीठात गुप्तरूपाने वास करते म्हणून त्यालाच अर्धे पीठ म्हटले जाते.महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे. त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात. श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते.नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन् फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ, 34 याचिका 6 गटात विभागल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'अमर रहे' च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुषमा अंधारेंना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली, शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई ! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्व बहालीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने लाखाचा दंड ठोठावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - अहमदाबाद येथे खेळलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 62 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माँ वैष्णोदेवी .......वैष्णोदेवी (उत्तरेकडील प्रचलित नाव म्हणजे मातारानी. हिंदू धर्मामधील दुर्गा ह्या देवीचा एक अवतार समजला जातो. भारताच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर हिंदू धर्मामधील एक लोकप्रिय मंदिर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगेमधील ह्या मंदिराला दरवर्षी १ कोटी भाविक भेट देतात.वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा ह्या गावापासून १२ किमी अंतराचा घाट पायी चढावा लागतो. कटरा गाव जम्मूपासून ४५ किमी अंतरावर असून ते काश्मीर रेल्वेमार्गाद्वारे जम्मू तावीसोबत जोडले गेले आहे.वैष्णोदेवीची यात्रा वर्षभर सुरु असते, परंतु उन्हाळ्यात मे ते जून आणि नवरात्रीच्या काळात येथे जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी पोहोचतात.माता वैष्णो देवी मंदिर हे देशातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार, वैष्णो मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की, जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इ्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला, त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी कोणत्या पक्ष्यावर संशोधन करून पीएचडी मिळविली ?२) हॉर्नबील पक्ष्याच्या ( धनेश ) जगात एकूण किती प्रजाती आहेत ?३) आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?४) कोणत्या वर्षी लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत टी-२० क्रिकेटचा समावेश होणार आहे ?५) भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक व्हावे असा ठराव पुणे महापालिकेने कोणत्या वर्षी मंजूर केला ? *उत्तरे :-* १) ग्रे हॉर्नबील २) ६२ प्रजाती ३) विराट कोहली, भारत ४) सन २०२८ ५) सन २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू फिलिप डिसूझा, साहित्यिक, निगडी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥ हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगणारे बरेचजण चांगलेही सांगत असतात आणि वाईटही सांगत असतात. त्या प्रत्येकांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे व काळजीपूर्वक लक्ष द्यावे. कारण त्यावेळी कानही आपलेच असतात, आपले मन आपल्यापाशी असते आणि मेंदू सुद्धा आपलाच असतो. त्या सांगणाऱ्याकडून काय घ्यायचे, काय नाही, काय पेरायचे काय नाही तेही आपणच ठरवावे. ती कला आपल्याला जमली तर आपल्यासाठी तसेच इतरांसाठी सुद्धा भल्याचेच आहे आणि तेही आपल्यावरतीच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗**एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.**२००१:रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर**१९९५:’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर**१९९१:उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.**१९७१:मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.**१९७०:हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर**१९६९:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना**१९६२:चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.**१९५२:केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली.जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.**१९५०:कृ.भा.बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.**१९४७:अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९०४:चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज**१९७७:प्रा.डॉ.अनमोल तुळशीराम शेंडे -- लेखक,संपादक**१९६३:नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व राजकारणी**१९६२:क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह-- मराठी कवयित्री व लेखिका**१९५८:डॉ.संजय प्रभाकर हर्षे-- कवी* *१९५४:अरुण खोरे-- वरिष्ठ पत्रकार,संपादक व लेखक**१९५३:किरण कुमार -- चित्रपट अभिनेता**१९५२:श्रीकांत नारायण कुलकर्णी-- ज्येष्ठ मुक्तपत्रकार,संपादक तथा प्रसिद्ध लेखक**१९५०:प्रा.विजय दत्तात्रय काचरे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४७:अशोक नामदेव व्हटकर-- संशोधक, कथाकार,कादंबरीकार**१९४२:उद्धवराव पुंडलिकराव वाझुळकर -- कादंबरीकार,कवी**१९३९:निशिकांत माधव उर्फ नानासाहेब जोशी-- स्तंभलेखक संशोधक**१९३९:वसंत महादेवराव चिंचाळकर-- प्रसिद्ध लेखक(मृत्यू:२१ फेब्रुवारी २०२३)**१९३९:प्राचार्य सूर्यकांत वैद्य- प्रसिद्ध कवी लेखक* *१९२९:बाळकृष्ण केशव बन्नोरे -- मराठी, हिंदी,इंग्रजी,संस्कृत भाषेमध्ये काव्यलेखन (मृत्यू:२५ ऑगस्ट २०११)* *१९१६:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’–लोकशाहीर (मृत्यू:२९ ऑगस्ट १९६९)**१९१५:सय्यद अमीन ---मराठी लेखक मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन.. (मृत्यू:१७ डिसेंबर १९७३)**१९०५:स.के.नेऊरगावकर -- वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार,संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक (मृत्यू:३१ मे १९७८ )**१८९३:जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ ऑगस्ट १९७८)**१८९१:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२४ जुलै १९७४)**१८५५:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक,'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.(मृत्यू:४ जानेवारी १९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म:७ जून १९४२)**२०१०:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म:५ जानेवारी १९४८)**२००९:वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म:४ मे १९२९)**१९९९:माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार (जन्म:१९१५)**१९९६:दि.वि.तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार,युद्धशास्त्राचे अभ्यासक* *१९८४:पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:८ ऑगस्ट १९०२)**१९७४:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’–प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (जन्म:२० जानेवारी १८९८)**१९६८:जगन्नाथबुवा पुरोहित-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक(जन्म:१२ मार्च१९०४)* *१९६४:हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१० ऑगस्ट १८७४)**१९६१:व्ही.एस.गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली.* *१८९०:सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी,संशोधक,मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म:१९ मार्च १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*कार्ल्याची श्री एकवीरा आईमहाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी! लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्राकाळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक स्वतः न लढण्याचा शरद पवारांचा पुनरूच्चार, पक्ष बळकटीसाठी पवार देशाचा दौरा करणार, इंडिया आघाडीत समन्वयाची भूमिका पार पाडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्धाटन, राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये योजनेचा शुभारंभ.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत केली आत्महत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नव्या संसदेनंतर आता नवीन विधानसभा आणि विधानपरिषद बांधण्याचा विचार सुरू; राहुल नार्वेकराचं मोठं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना पुण्यातील एमआयटी कॉलेजने जाहीर केलेला पुरस्कार राजकीय दबावापोटी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर - दूध उत्पादकांसाठी खुशखबर: गोकुळकडून १०१ कोटी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात बांगलादेशचा सात विकेटने पराभव करीत टीम इंडियाचा विजयी चौकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाराणसी ....वाराणसीमध्ये नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, लोक गंगेच्या घाटांवर (नदीकडे जाणाऱ्या पायऱ्या) पारंपारिक दांडिया आणि गरबा नृत्य करतात. या वेळी शहरातील मंदिरे देखील सुंदरपणे सजविली जातात, ज्यामुळे उत्सवाच्या अध्यात्मिक पैलूचा अनुभव घेण्यासाठी हे एक परिपूर्ण गंतव्यस्थान बनते. वाराणसीतील नवरात्रीच्या खऱ्या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी येथे काही पंडाल आहेत:हथुआ मार्केट पंडाल, सनातन धर्म पंडाल, शिवपूर पुर पंडाल, माचोदरी पंडाल, पांडेपूर पंडाल*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांगली येथे होणाऱ्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा मुख्य विषय काय आहे ?२) राष्ट्रीय एकात्मता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील मुलींची पहिली शाळा कोठे भरली ?४) २०२३ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे ?५) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ? *उत्तरे :-* १) पक्ष्यांची पिसे आणि पिसारा २) २० ऑक्टोबर ३) भिडेवाडा, पुणे ४) डॉ रवी कन्नन ५) एडियन माक्रम, दक्षिण आफ्रिका ( ४९ चेंडू )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 राजेश्वर वावधाने, पदवीधर शिक्षक, मुखेड👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 आनंद बलकेवाड, येवती👤 अतुल जाधव👤 इम्तियाज शेख👤 ओम धुळशेट्टे👤 दत्ता सूर्यवंशी👤 गजानन वडजे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।विवेके अहंभाव यातें जिणावें॥अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेली एखादी कला किंवा एखादा छंद मग ते कोणतेही असोत पूर्ण निष्ठेने, श्रध्देने, नि:स्वार्थपणे समर्पित होऊन सादर केल्याने व ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. हीच भावना आपल्यात ठेवून जर त्या कलेची किंवा छंदाची पूजा केल्याने ती अजरामर होऊन जाते. पण त्याच कलेचा किंवा छंदाचा दुरूपयोग केल्याने त्याचा व्यापार होऊन जातो. व्यापार किंवा व्यवसाय हा मालाचा केला जातो. कलेचा किंवा छंदाचा नाही म्हणून निसर्गाने दिलेल्या ह्या अनमोल देणगीला अपेक्षा ठेवून किंवा प्रसिद्धीच्या परड्यात कधीही तोलू नये त्यांना कायमस्वरुपी जपावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *मातेचा उपदेश*📗 *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मनुष्य गौरव दिन*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.**२०००:पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान**१९९४:रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.**१९९३:पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी.व्ही.रामन पदक जाहीर**१९७०:भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द**१९४४:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.**१९३५:इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.**१८१२:नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:कुंजीराम जनार्दन गोंधळे -- लेखक**१९८७:सुनील शिवाजी खवरे-- कवी* *१९७१:प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर- कोरडे -- कवयित्री* *१९६८:शामला पंडित दीक्षित-कवयित्री, लेखिका**१९६७: लतिका चौधरी -- कवयित्री,लेखिका* *१९६१:अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता**१९६०:प्रा.डॉ.पुरुषोत्तम मारोतराव कालभुत-- लेखक**१९५६:जयंत शंकर कुलकर्णी-- लेखक**१९५४:प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.(मृत्यू:१९ सप्टेंबर २००२)**१९५२:गिरीश प्रभुणे-- सामाजिक कार्येकर्ते, लेखक,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९५१:प्रा.व्यंकटेश वळसंगकर-- गुलबर्ग येथील मराठी कवी,लेखक**१९५०:अशोक अर्धापुरकर-- प्रसिद्ध लेखक**१९४९:आशा कर्दळे-- मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक**१९४१:डॉ.सुरेश विश्वनाथराव उपगन्लावार -- कवी* *१९३९:शशिकांत शामराव पवार -- विधिज्ज्ञ, लेखक**१९३६:शांताराम नांदगावकर – प्रसिद्ध गीतकार (मृत्यू:११ जुलै २००९)**१९३४:मधुकर विष्णू कोल्हटकर -- विनोदी कथालेखक,तत्वज्ञानाचे अभ्यासक* *१९२९:निर्मला देशपांडे -- सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या(मृत्यू:१मे २००८)**१९२५:डॉ.वामन दत्तात्रय तथा ’वा.द.’वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू:१७ एप्रिल २००१)**१९२०:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू:२५ आक्टोबर २००३)**१९११:असरार-उल-हक -मजाझ लखनवी म्हणून ओळखले जाणारे,भारतीय उर्दू कवी(मृत्यू:५ डिसेंबर १९५५)**१९१०:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(मृत्यू:२१ ऑगस्ट १९९५)**१९०२:दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक,नाट्य लेखक(मृत्यू: ३१ मे १९७३)**१८९३:मोरेश्वर वासुदेव जोशी -- कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१६ सप्टेंबर १९८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मनोहर सदाशिव नाईक-- लेखक, व्याख्याते (जन्म:१० मार्च १९४९)**२००५:मोहन सहगल-- निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता(जन्म:१ डिसेंबर १९२१)**१९९५:बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन.(जन्म:२० ऑगस्ट१९४४)* *१९५०:विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:९ एप्रिल १८८७)**१९३७:अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ(जन्म:३० ऑगस्ट १८७१)**१९३४:विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.१८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.(जन्म:२४ डिसेंबर १८६४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*.... वणीची सप्तशृंगी देवी ....नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या : पुणे जिल्ह्यात युवा लोकसंख्या 26 लाख मात्र, प्रत्यक्ष मतदार यादीत 13 लाख - जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटरराज्यभर बसविण्याची तयारी सुरू : महावितरणच्या 2 कोटी 41लाख ग्राहकांचे पारंपारिक मीटर बदलणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली दसरा महोत्सव:पोलिस अधीक्षकांसह साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनी फिरून घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिल्ली .....राजधानी शहर आपल्या चैतन्यशील नवरात्री उत्सवांसाठी देखील ओळखले जाते, विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्री लोकांसाठी एक विशेष भावना असते आणि ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी विविध पंडाल, दांडिया कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल तयार केले जातात. येथे तपासण्यासाठी काही ठिकाणे आहेत.चित्तरंजन पार्क (सीआर पार्क), कालीबारी, मिंटो रोड पूजा समिती, दिल्ली हाट , पाच इंद्रियांची बाग *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) Greater Flamingo चे मराठी नाव काय आहे ?२) जगात रोहित पक्ष्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत ?३) मोठा रोहित पक्षी कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?४) फ्लेमिंगो हे नियतकालिक कोणत्या संस्थेकडून प्रकाशित होते ?५) जागतिक फ्लेमिंगो दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) मोठा रोहित २) सहा ३) गुजरात ४) बर्ड काँन्झरवेसन सोसायटी गुजरात ५) २६ एप्रिल संदर्भ:- पक्षिमित्र त्रैमासिक, महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिरुद्ध कोल्हटकर👤 विशाल शेपाळकर👤 लतिका चौधरी, साहित्यिक👤 योगेश्वर कंदुरके👤 श्रीनिवास बेंकट, करखेली👤 डॉ. साई रामोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।जनीं वादसंवाद सूखे करावा॥जगीं तोचि तो शोकसंतापहारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य बोलणाऱ्याला कोणी साथ देत नाही, सत्य लिहिणाऱ्याला सर्वच सहमत असतीलच असेही नाही, सत्य बघणाऱ्याला आंधळा म्हटल्याशिवाय राहणार नाही. पण इथेच मात्र खोट्याला व फसवणूक करणाऱ्या सोबत अतूट विश्वासाचे नाते जोडले जातात. या पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य निसर्गाला ओळखत असतो. फरक एवढाच की, निसर्ग नियमाचे पालन करण्याचे काम प्रत्येकाला जमत नाही. पण,जो पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व संघर्ष करून जगत असतो उशिरा का होईना त्याचे जीवन इतरांपेक्षा वेगळे होऊन जाते. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्यानी निसर्गाच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे. भलेही गती उशिरा मिळेल पण निसर्ग त्यालाच साथ देत असतो जो त्याच्या नियमाचे पूर्णपणे पालन करत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले. ✍ *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*सौजन्य :- http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.**१९६७:सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.**१९२२:ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना**१९१९:राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.**१९०६:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.**१८७९:थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना**१८६७:सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अजय ताराचंद पटले-- नाट्यलेखक**१९८०:प्रा.आशिष रमेश बोरकर-- लेखक**१९७६:प्रा.डॉ.विजया जितेंद्र राऊत-- लेखिका,समीक्षक,संपादिका* *१९७४:आमिश त्रिपाठी-- इंग्रजीतून लिहीणारा भारतीय लेखक त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये भाषांतरित* *१९७०:रवींद्र मुकुंदराव मालुंजकर -- कवी**१९६८:मनोज अंबिके-- प्रसिद्ध लेखक**१९६७:प्रा.डॉ.माधुरी सुटे -- लेखिका* *१९६६:प्रा.नंदकुमार दिगंबरराव बालुरे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९५८:अंजली कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५६:मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू* *१९५०:ओम पुरी – प्रसिद्ध अभिनेता (मृत्यू:६जानेवारी २०१७)**१९४५:अरुंधती अरविंद बापट-- लेखिका**१९४५:मनोहर नामदेवराव पाटेकर-- कवी, लेखक**१९४३:सुनेत्रा पंडित-- लेखिका**१९३९:ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडीचा मारेकरी (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९६३)**१९३७:मंगला जगन्नाथराव आवलगांवकर -- लेखिका,कवयित्री**१९३३:राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:२२ ऑक्टोबर २०१७)**१९२५:इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक(मृत्यू:४ ऑगस्ट २०२०)**१८९३:हरी दामोदर वेलणकर--संस्कृत पंडित व ग्रंथकार(मृत्यू:१३ जानेवारी १९६७)**१८६१:’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश,कायदेपंडित,लेखक,आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (मृत्यू:२० एप्रिल १९३८)**१८०४:मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा (मृत्यू:१आक्टोबर १८६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:शांताराम काशिनाथ राऊत-- कल्पक बोधचिन्ह करण्यासाठी प्रसिद्ध* *२००२:गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये --संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक(जन्म:११ डिसेंबर १९०९)**१९९९:मंगेश भगवंत पदकी--कवी, कथाकार (जन्म:२७ मार्च १९२३)**१९९४:शंकर पाटील -- मराठी कथाकार.(जन्म:८ऑगस्ट१९२६)**१९९३:मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.त्यांनी फाळके यांच्या 'कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते.* *१९८७:वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते.कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.(जन्म:२०मे १९१३)**१९८३:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (जन्म:२६ सप्टेंबर १९३१)**१९५१:हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार,गायिका,संगीतकार (जन्म:२२ नोव्हेंबर १८८५)**१९३१:थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (जन्म:११ फेब्रुवारी १८४७)**१९०९:लालमोहन घोष –देशभक्त,काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.(जन्म:१७ डिसेंबर १८४९)**१८७१:चार्ल्स बॅबेज –इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म:२६ डिसेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... कोल्हापूरची अंबाबाई ....महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *100 युनिट वीज फ्री, महिलांना दरमहा 1500 रुपये, 500 रुपयांमध्ये सिलेंडर; मध्यप्रदेशात काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदांचं वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिका व नेदरलँड सामन्यात नेदरलँडचा 38 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोलकाता ....कोलकातामध्ये, नवरात्री दुर्गा पूजा म्हणून पाळली जाते, जो दहा दिवसांचा उत्सव आहे. कोलकातामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, संपूर्ण शहरात, भव्य पँडल, सर्वत्र दुर्गा देवतेची कलात्मक शिल्पे प्रदर्शित केली जातात. बंगाली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. नवरात्रीच्या काळात कोलकात्याला भेट द्यायलाच हवी आणि सणाची सत्यता पाहण्याची संधी मिळते. सणासुदीसाठी तुम्ही कोलकातामध्ये असताना चुकवू नये असे काही रोमांचक कार्यक्रम:घूमर दांडिया उत्सव , जलसा-अंतिम दांडियाउत्सव, जश्न-ए-दांडिया, टाळ दांडिया*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जुलै २०२३ मध्ये वैदिक संकल्पनेवर आधारित उद्यान कोठे उभारण्यात आले आहे ?२) भारतात दरवर्षी एका बॅचमध्ये किती IAS अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते ?३) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या पदकतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले ?४) लोकायुक्तची नेमणूक कोण करतो ?५) भारतातील सर्वात पहिले भूअंतर्गत ट्रान्सफॉर्मर कुठे निर्माण करण्यात आले ? *उत्तरे :-* १) वाराणसी, उत्तरप्रदेश २) १८० ३) चौथे ४) राज्यपाल ५) बंगळुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास जाकापूरे, शिक्षक, धर्माबाद👤 शुभम पतंगे👤 श्रेणीक रणभीरकर, धर्माबाद👤 शशिकांत संगम, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश कावळे👤 विक्की टेकाळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥क्रियेवीण वाचाळता ते निवारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः विषयी काहीच न सांगता दुसऱ्यांच्या विषयी वारंवार कोणी आपल्याला नको त्या शब्दात बोलून सांगत असतील तर त्यावर कधीही डोळे झाकून विश्वास करू नये. कारण आज दुसऱ्या विषयी सांगायला ते कशाचाही विचार करत नाही कदाचित आपल्या विषयीही सांगायला ते एकही संधी सोडणार नाही. म्हणून ऐकताना आपल्या कानाला एवढेही गुलाम बनवू नये की, आयुष्यभर त्याचीच सवय लागून जगण्याची वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••... सकारात्मक दृष्टिकोन ... गरीब आदमी बड़ी मेहनत से एक-एक रूपया जोड़ कर मकान बनवाता है। उस मकान को बनवाने के लिए वह पिछले २० वर्षों से एक-एक पैसा बचत करता है, ताकि उसका परिवार छोटे से झोपड़े से निकलकर पक्के मकान में सुखी से रह सके।आखिरकार एक दिन मकान बन कर तैयार हो जाता है। तत्पश्चात पंडित से पूछ कर गृह प्रवेश के लिए शुभ तिथि निश्चित की जाती है लेकिन गृहप्रवेश के २ दिन पहले ही भूकंप आता है, और उसका मकान पूरी तरह ध्वस्त हो जाता है।यह खबर जब उस आदमी को पता चलती है तो वह दौड़ा दौड़ा बाजार जाता है और मिठाई खरीद कर ले आता है। मिठाई लेकर वह घटनास्थल पर पहुंचता है, जहां पर काफी लोग इकट्ठे होकर उसके मकान गिरने पर अफसोस जाहिर कर रहे थे।ओह! बेचारे के साथ बहुत बुरा हुआ, कितनी मुश्किल से एक – एक पैसा जोड़कर मकान बनवाया था। इसी प्रकार लोग आपस में तरह तरह की बातें कर रहे थे।वह आदमी वहाँ पहुंचता है और झोले से मिठाई निकाल कर सबको बाँटने लगता है। यह देखकर सभी लोग हैरान हो जाते हैं। तभी उसका एक मित्र उससे कहता है, कहीं तुम पागल तो नहीं हो गए हो, घर गिर गया, तुम्हारी जीवन भर की कमाई बर्बाद हो गई और तुम खुश होकर मिठाई बांट रहे हो।वह आदमी मुस्कुराते हुए कहता है, _तुम इस घटना का सिर्फ नकारात्मक पक्ष देख रहे हो इसलिए इसका सकारात्मक पक्ष तुम्हें दिखाई नहीं दे रहा है। ये तो बहुत अच्छा हुआ कि मकान आज ही गिर गया वरना तुम्हीं सोचो अगर यह मकान २ दिनों के बाद गिरता तो मैं मेरी पत्नी और बच्चे सभी मारे जा सकते थे, तब कितना बड़ा नुकसान होता।नकारात्मक दृष्टिकोण को त्याग दीजिये,अपने घर मे बच्चों तथा बुजुर्गो को कहिये- _”आप स्वस्थ रहिये, खुश हम आपको रख लेंगे”।•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक गरिबी निर्मूलन दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान**१९९६:अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१९९४:पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ.टी.जेकब जॉन यांना 'डॉ.शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर**१९७९:मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित**१९६६:बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४३:बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.**१९३४:’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.**१९३३:अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.**१९३१:माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.**१९१७:पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.**१८३१:मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर-- लेखक संपादक* *१९७७:संदीप बोडके-- पत्रकार,कवी, गझलकार**१९७४:धारा भांड-मालुंजकर-- लेखिका* *१९७३:सुनील वामन कुमरे -कवी,लेखक**१९७०:अनिल कुंबळे – भारतीय माजी क्रिकेटर,लेग स्पिनर गोलंदाज* *१९६५:अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेटसंघाचा माजी कप्तान**१९५५:प्रा.डॉ.व्यंकटेश रा.जंबगी-- कवी, लेखक* *१९५५:स्मिता पाटील – सुप्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (मृत्यू:१३ डिसेंबर १९८६)**१९५३:शैला दिगंबर गिरनारकर-- कवयित्री* *१९५२:पुरुषोत्तम रोहणकर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९५१:प्र.द.जोशी -- कवी,बालसाहित्यिक* *१९४७:डॉ.बा.ह.कल्याणकर -- कवी,लेखक, संपादक,विचारवंत* *१९४७:सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका**१९४६:अरुणा राजे पाटील--भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक**१९३२:प्राचार्य प.सी.काणे -- लेखक, विचारवंत* *१९३२:जयराम कुलकर्णी-- भारतीय मराठी -भाषेतील चित्रपट अभिनेते(मृत्यू:१७ मार्च २०२०)**१९३१:डॉ.शरद कोलारकर-- विदर्भातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ,विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष(मृत्यू:७ फेब्रुवारी २०१४)* *१९१७:विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू:१३ डिसेंबर १९९४)**१८९२:नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी,पहिले मराठी साखर कारखानदार,(मृत्यू:१६ फेब्रुवारी १९६८)**१८९०:अनंत हरी गद्रे -- नाटककार,संपादन (मृत्यू:४ सप्टेंबर १९६७)* *१८६९:’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू:८ एप्रिल १९२२)**१८१७:सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू:२७ मार्च १८९८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२प्रा.डॉ.विलास वसंत खोले --ज्येष्ठ लेखक-समीक्षक व संपादक(जन्म:५ डिसेंबर १९४४)**२०१७:केशव जगन्नाथ पुरोहित(शांताराम)-- सुप्रसिद्ध साहित्यिक,सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले(जन्म:१५ जून १९२३)* *२००८:रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म:१३ मार्च १९२६)**१९९३:विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व पटकथालेखक,(जन्म:१२ मे १९०७)**१९०६:जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म:२२ आक्टोबर १८७३)**१८८७:गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ मार्च १८२४)**१८८२:दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार,ग्रंथकार व धर्मसुधारक,संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म:९ मे १८१४)**१७७२:अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*... तुळजापूरची तुळजाभवानी ...तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात . या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक-भक्त तुळजापूरला येतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *काँग्रेसने मिझोराम निवडणुकीसाठी पहिली यादी केली जाहीर, 39 उमेदवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंबाबाई मंदिरात दुसऱ्या दिवशी 1 लाख 36 हजारांवर भाविकांचे दर्शन; देवीची दुसऱ्या माळेला महागौरीच्या रुपात पूजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कंत्राटी नोकर भरतीने आरक्षणाचा प्रश्न बाजूला, कंत्राटी भरतीसाठी 9 एजन्सी नियुक्त; जयंत पाटलांची जोरदार टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचा मार्ग मोकळा, 13 वर्षांनंतर गाळेधारकांची याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ..... मुंबई .....नवरात्री विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया कार्यक्रमांनी शहराला चैतन्य आणते. लोक जमतात आणि या कार्यक्रमांसाठी पूर्व-नियोजन करतात आणि त्यांच्या दांडिया प्रदर्शनासाठी आगाऊ सराव सुरू करतात. असे काही दांडिया क्लब आहेत जिथे या कार्यक्रमांप्रमाणेच रोषणाई केली जाते.1. फाल्गुनी पाठक सह नवरात्र उत्सव2. कोरकेंद्र नवरात्री नायडू क्लब3. सहारा स्टारचा तेजस्वी दांडिया 4. रंगीलो रे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक गरिबी निर्मूलन दिन केव्हा साजरा केला जातो ?२) भारत सरकारने इजरायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे ?३) न्युझीलंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूचे नाव सचिन तेंडूलकर व राहुल द्रविड यांच्या नावावरून आहे ?४) सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेतून मिळाले आहेत ?५) १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली ? *उत्तरे :-* १) १७ ऑक्टोबर २) ऑपरेशन अजय ३) रचिन रविंद्र ४) हिंदी भाषा ( १० वेळा ) ५) १०७ पदके ( २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ कांस्य )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चेतन भैराम, भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक देशोन्नती 👤 निंबा पाटील👤 गजानन बापूराव भोसकर👤 धनराज भुमरे👤 अनिकेत कदम👤 विकास गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कोपआरोपणा ते नसावी।मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।होइ रे मोक्षभागी विभागी ॥१०७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली प्रशंसा किंवा आपली स्तुती कोणी करत असतील तर..ऐकून आपला आनंद गगणात मावत नाही. तसंच आपली कोणी निंदा, चुगली करत असतील तर ती सुद्धा ऐकून सहन करण्याची ताकद ठेवावी. कारण, बरेचदा प्रशंसा किंवा स्तुतीमुळे आनंद होत असला तरी नकळत गर्वाचे किंवा घमंडी पणाचे भागीदार बणवतात पण निंदा, चुगली मात्र पुढची वाट दाखवत असतात. म्हणूनच आमच्या थोर संतांनी 'निंदकाचे घर असावे शेजारी' म्हटले आहे त्यांच्या विचारांचा सदैव स्मरण करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇ मूर्ख डोमकावळा ◇◇एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''तात्पर्य - काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अन्न दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स, स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४:आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५:बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३:हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८:हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.**१९२३:वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी ’द वॉल्ट डिस्ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५:भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८६८:डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्क ब्रिटिशांना विकले.**१८४६:डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३:फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी अॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.**१७७५:ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी,लेखक* *१९६५:भवानी शंकर-- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१:जयश्री सुधीर देसाई-- लेखिका, अनुवादक**१९६०:डॉ.रमा मराठे-- लेखिका,कवयित्री* *१९५९:अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष(मृत्यू:३ जून २०१०)**१९५४:मंजुषा मनोहर शिनखेडे--कवयित्री, लेखिका**१९५०:अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८:हेमा मालिनी –अभिनेत्री,दिग्दर्शिका, निर्माती,भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०:नरेंद्र चंचल-- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त(मृत्यू:२२ जानेवारी २०२१)**१९३६:वसंत दामोदर भट-- लेखक, व्याख्याते**१९१७:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू:१४ मार्च १९९२)**१९१६:शकुंतला ना.दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर-- लेखक(मृत्यू:१२ एप्रिल १९७७)**१९०७:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू:४ आक्टोबर १९८२)**१८९६:सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू:१८ जून १९७४)**१८९०:अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर,संपादक,थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू:३ सप्टेंबर १९६७)**१८८६:गिरिजाबाई महादेव केळकर-- कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:२५ फेब्रुवारी १९८०)**१८५४:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार,(मृत्यू:३० नोव्हेंबर १९००)**१८४१:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:२६ आक्टोबर १९०९)**१६७०:बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू:९ जून १७१६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो.पु.)-- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक(जन्म:२ ऑगस्ट, १९३८)**२००२:नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९२३)**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९८१:मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म:२० मे १९१५)**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म:१ आक्टोबर १८९५)**१९५०:वि.गं.तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म:१८८५)**१९४४:गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म:१८८७)**१७९३:मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म:२ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*... माहूरची रेणुकादेवी ....देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.माता रेणुकाची एक कथा आहे - या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर ' म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.पुढील भागात - तुळजापूरची तुळजाभवानीसंकलन - ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना, नऊ दिवस भाविकांची मंदिरात दर्शनासाठी होणार गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद, नोएडामध्ये 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, संभाजीनगरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यभरात ईडीची मोठी कारवाई, ईडीकडून 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ईडीची झाडाझडती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून पंढरपूरमध्ये भव्य ग्रंथदिंडीचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विजयाचा चौकार मारण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; पुणेकरांमध्ये वर्ल्डकप सामन्याची उत्सुकता शिगेला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्री, देवी दुर्गा देवीच्या उपासनेला समर्पित नऊ दिवसांचा सण, हा भारतातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. हा मोठा आनंद आणि उत्साहाचा काळ आहे आणि देशभरातील लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. जर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान भारताला भेट देण्याचा विचार करत असाल, तर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना भेट देण्याचा विचार करावा. गुजरात .......गुजरात त्याच्या भव्य नवरात्र उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे, विशेषत: अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत. नवरात्री दरम्यान, राज्याचा पारंपारिक नृत्य प्रकार, गरबा, मोठ्या उत्साहात, आपण रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले लोक पाहू शकता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा देखील होतात, ज्यामुळे तो एक्सप्लोर करण्यासाठी एक रोमांचक वेळ बनतो. नवरात्रीच्या उत्सवासाठी गुजरातमध्ये भेट देण्यासाठी ही ठिकाणे पहा - वडोदरा, युनायटेड वे ऑफ बडोदा, बडोदा विद्यापीठ, शिशू सांस्कृतिक गरबा, अहमदाबाद, भद्रा किल्ला*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सोपं आहे, लोकं गुंतागुंतीचं आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष प्रश्नमंजुषा१) रेणुकादेवी मंदीर कोठे आहे ?२) तुळजाभवानी मंदीर कोठे आहे ?३) अंबाबाईचे मंदीर कोठे आहे ?४) सप्तश्रृंगी देवीचे मंदीर कोठे आहे ?५) एकविरा आईचे मंदीर कोठे आहे ? *उत्तरे :- १) माहूर जि. नांदेड २) तुळजापूर जि. उस्मानाबाद ३) कोल्हापूर ४) वणी जि. नाशिक ५) लोणावळा**संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विशाल धनगर👤 राम भांगे मुगटकर👤 दत्तप्रसाद यंगुलदास, विजय स्टेशनरी सप्लायर्स, नांदेड👤 साईकुमार शिंदे पाटील👤 संदीप अकोलकर👤 दिगंबर शिंदे पाटील👤 साईनाथ कळसे पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥दया सर्वभुतीं जया मानवाला।सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सरड्याची धाव जरी कुंपना पर्यत मर्यादित असेल तरी तो सरडा त्या कुपंनाशी कधीच बेईमानी करत नाही. कारण त्याला माहीत असते की, मला वेळोवेळी या तुटक्या, फाटव्या कुंपनानेच साथ दिली. म्हणून तो त्याला क्षणभरासाठी सुद्धा विसरत नाही. म्हणून नुसते त्या सरड्याला नाव न ठेवता त्याकडून शिकले पाहिजे भलाही तो, सरडा बोलत नसेल तरी आजच्या या बोलत्या, चालत्या माणसाला खूप काही शिकायला भाग पाडते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇● धनाचा विनियोग ●◇◇एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.'' नाग म्हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्हा पुन्हा म्हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्हणाला,'' कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,'' मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्पर्य - ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७०:फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४६:फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.**१९४४:दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.**१९२३:मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.**१८८४:लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:कादंबरी कदम-देसाई-- भारतीय अभिनेत्री**१९७२:डॉ.योगेश देविदास वानखेडे -- लेखक,कवी* *१९६६:शरद पोंक्षे--- मराठी चित्रपट,नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते**१९६५:मोहन बा.देशपांडे-- कथा लेखक* *१९६४:प्रा.भुजंग दत्तराव वाडीकर -- लेखक, संपादक* *१९५७:ज्ञानेश्वर जानबाजी वांढरे -- कवी, लेखक* *१९५५:प्रा.डॉ मधुकर गणेश मोकाशी -- लेखक,समीक्षक* *१९४८:नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू:१६ ऑगस्ट १९९७)**१९४५:लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे-- मराठीतले विज्ञानकथा लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट,२०१५)**१९४२:अनुपमा अरविंद क्षीरसागर-- लेखिका,संशोधक* *१९४२:विमल वाणी म्हसावद-- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री* *१९४१:जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू**१९३८:राम देशपांडे-- यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते.त्यांच्याकडे साहित्यिकांची,मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते;तसेच,मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा,विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे,जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे**१९३२:हरी अनंत फडके --संशोधक, अभ्यासक (मृत्यू:३ फेब्रुवारी २००७)**१९२५:मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू:८ एप्रिल २०१३)**१९११:अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी'– चित्रपट अभिनेते,पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९) (मृत्यू:१० डिसेंबर २००१)**१८८२:दत्तात्रेय चिंतामण मुजुमदार-- व्यायामकोशकर्ते(मृत्यू:२२ ऑगस्ट १९६४)**१८७७:भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित,त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते,(मृत्यू:६ मे १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:मनोहर म्हैसाळकर- विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक(जन्म:१ऑगस्ट १९३२)**२०१७:डॉ.लिला गणेश दीक्षित-- बालसाहित्यिक,कवयित्री (जन्म:४ फेब्रुवारी १९३५)* *२००१:डॉ.जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ,नामवंत शल्यचिकित्सक,पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष,पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,**१९९५:डॉ.रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म:१ मे १९१५)**१९८७:आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक,संगीतकार,गीतकार, निर्माता,दिग्दर्शक,आभिनेता व पटकथालेखक(जन्म:४ ऑगस्ट १९२९)**१९६८:वसंत प्रभू-- मराठी चित्रपटातील संगीतकार(जन्म:१९ जानेवारी १९२४)**१९४५:मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक(जन्म:१३ सप्टेंबर १८५७)**१९११:मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या,भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, (जन्म:२८ आक्टोबर १८६७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला* .... झुम्पा लाहिरी ....लेखिका झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७ मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचं गाजलं पुस्तक. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटही साकारण्यात आला होता. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं होतं.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *GST प्राधिकरणाकडून LIC वर कारवाई; तब्बल 36,844 रुपयांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, किरकोळ महागाई दर घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिझर्व्ह बँकेचा Paytm पेमेंट बँकेला सर्वात मोठा झटका, KYC उल्लंघन केल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? सह्याद्रीवरील भेटीत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 134 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या आरोग्यासाठी टिप्स*६. आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. ७. जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. ८. झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.९. मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण आहे. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आतापर्यंत झालेल्या १२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दोनदा सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?२) महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली ?३) स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा कोणी केला होता ?४) जगातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा ( २०२२-२३ ) देश कोणता ?५) D. N. A. चे विस्तारित रूप काय ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत ( १९९६ मध्ये ५२३ धावा व २००३ मध्ये ६७३ धावा ) २) सन १९६२ ३) ग. वा. जोशी ४) भारत ( ७५ % उत्पादन भारतात ) ५) Deoxyribose Nucleic Acid*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव कमलाकर, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 नरेश पत्राळे👤 अजय त्रिभुवन, साहित्यिक, औरंगाबाद👤 योगेश चंबोले, धर्माबाद👤 किशोर येमेवार, धर्माबाद👤 शैलेश शाह, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥परद्रव्य आणीक कांता परावी।यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट व संघर्ष करून सुद्धा ज्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात ते दुसऱ्यांदा कोणाच्याही मागे धावण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. कारण हे सर्व करण्या आधी ते,स्वतः मध्येच सर्व काही शोधून बघितलेले असतात. म्हणून इतर गोष्टींविषयी त्यांना आकर्षन नसते. आपणही आधी स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करून बघावे इकडे, तिकडे शोधण्याची किंवा कोणाच्याही मागे धावण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ●○ .. विजय असो .. ○●एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''तात्पर्य - ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संधिवात निवारण दिन_* *_ या वर्षातील २८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.**२००१:संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर**२०००:भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर**१९९८:तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून 'इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.**१९८८:जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.**१९८३:लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.**१९६८:मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१८७१:भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.**१८५०:अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अक्षरा हासन- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९७८:कल्पना दुधाळ--कवयित्री**१९७२:सुरेश पुंडलिक गेडाम -- कवी* *१९६७:चित्रा सुधीर कहाते -- कवयित्री, लेखिका* *१९६५:लता सुरेश पाटील-- कवयित्री* *१९५५:अंजली माधव देशपांडे-- कवयित्री, लेखिका* *१९५५:सुहास कामत-- ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५५:श्रीराम रावसाहेब गुंदेकर-- ग्रामीण साहित्यिक,समीक्षक,सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक,संशोधक व भाष्यकार(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९५४:प्रा.राजाराम बनसकर - बालकांसाठी लेखन करणारे कवी* *१९४६:अशोक मांकड – क्रिकेटपटू (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९४६ डॉ.प्रल्हाद कुलकर्णी -- कादंबरीकार**१९४५: भीमराव सीताराम विठ्ठले--कवी* *१९४५:टिनू आनंद (वीरेंद्र राज आनंद) -- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक,लेखक आणि निर्माता**१९३९:रामदास लिंगुसा दुमाने-- कवी,लेखक* *१९३९:रमेश शामराव मेंदूले-- लेखक**१९३८:मुक्तिदा हसन निदा फाजली --भारतीय हिंदी आणि उर्दू कवी गीतकार आणि संवाद लेखक,साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले(मृत्यू:८ फेब्रुवारी २०१६)**१९३५:शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर--लेखक, पूर्व केंद्रिय गृहमंत्री,पूर्व राज्यपाल पंजाब**१९३४:दीपा गोवारीकर-- बालसाहित्यिक, ज्येष्ठ लेखिका* *१९२२:शांता शेळके – समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका.त्यांनी कथा,कादंबरी,कविता, चित्रपटगीते,भावगीते,नाट्यगीते,बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले.(मृत्यू:६ जून २००२)**१९२१:जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते,गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार सेनापती,लोकमान्य टिळकांचेनातू,साहित्य,पत्रकारिता,तत्त्वज्ञान,विज्ञान,इ.विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९२१:शरद खंडेराव मंत्री (सुमतीसुत)-कवी, लेखक* *१९१८:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, (मृत्यू:१९ जानेवारी २०००)**१९११:विजय मर्चंट – क्रिकेटपटू,क्रिकेट समालोचक,उद्योगपती व समाजसेवक (मृत्यू:२७ आक्टोबर १९८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:मुरलीधर कापडी--चित्रपट दिग्दर्शक (जन्म:६ मार्च १९३४)**१९९६:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (जन्म:२ जुलै १९०४)**१९६७:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक(जन्म:२३ मार्च १९१०)**१९६५:पॉल हर्मन म्युलर – डी.डी.टी.या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१२ जानेवारी १८९९ )**१६०५:बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (जन्म:१५ आक्टोबर १५४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिलांची माहिती*.... बचेंद्री पाल ....बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहणाकरिता सुवर्ण पदक (1984)पद्मश्री(1984) पुरस्काराने सम्मानितउत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे सुवर्ण पदक (1985)अर्जुन पुरस्कार (1986)कोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवार्ड (1986)गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स (1990) मध्ये नोंदभारत सरकार तर्फे एडवेंचर अवार्ड (1994)उत्तर प्रदेश सरकार कडून यशभारती सन्मान(1995)हेमवती नन्दन बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यापीठाकडून मानद पी एच डी उपाधि (1997)संस्कृति मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार कडून पहिला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान (2013-14)पद्मभूषण पुरस्कार(२०१९)संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा FRP पेक्षा 400 रुपये ज्यादा द्या, अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मुर्ती, बघ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, ते दोन्ही विद्यापीठांना भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी ! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना सुनावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्माने मोडला सचिनच्या शतकांचा विक्रम, विश्वचषकात नवा रेकॉर्ड हिटमॅनच्या नावावर, अफगाणिस्तान वर 8 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यासाठी महत्वपूर्ण टिप्स*१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याच्या आधी किंवा जेवणापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.२. घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खास करून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. ३. जेवन बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका. ४. आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा. ५. तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवणाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ?२) चहाचा सर्वात जास्त उत्पादन जगात कोणत्या देशात होते ?३) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश कोणता ?४) भारतातील 'चहाची बाग' म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?५) भारतातील सर्वात मोठे चहाचे मळे कोणते आहे ?*उत्तरे :-* १) चीन २) चीन ३) भारत ४) आसाम ५) गटुंगा टी इस्टेट, आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमित शिंदे👤 माधव धुप्पे👤 संतोष शातलवार👤 जगन कुलवंत👤 संपन्न कुलकर्णी👤 बालाजी लक्ष्मणराव सातपुते👤 सायारेड्डी जरावाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती लीनता सर्वभावे स्वभावें।जना सज्जनालागिं संतोषवावे॥देहे कारणीं सर्व लावीत जावें।सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध............✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात समस्या निर्माण झाल्या की,आपण कंटाळतो आणि जीवन जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणून जीवन जगायला अनुत्स्तुक होतोत.पण असे हतबल होऊन चालणार नाही.त्यापेक्षा परिस्थितीला दोन हात करायला शिकले पाहिजे.कारण या जगात परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय त्यातून मार्ग सापडत नाही.कारणे आणि पर्याय नक्कीच सापडतात आणि जे सापडतात ते आपल्या जीवनासाठी काहीतरी मिळालेले असते.त्यातून जीवनात कंटाळा येण्याऐवजी जगण्याची नवी दिशा आणि नवी प्रेरणा मिळते.त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळालेले असते.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●○ राज ज्योतिषी ○●●अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,''तुम्ही भविष्य कसे सांगता'' ज्योतिषी म्हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,''हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली. विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले,'' तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.'' राजाला विष्णुशर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.तात्पर्य - ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येतेhttps://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.**१८५२:’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३:प्रा.डॉ.सुनंदा मारोतराव चरडे-- लेखिका* *१९७०:डॉ.संजय बोरुडे-- प्रसिद्ध कवी,लेखक,संपादक**१९६८:अलका गोविंद पितृभक्त-- लेखिका* *१९५७:डॉ.अरुण गद्रे-- सुप्रसिद्ध पुरस्कार प्राप्त कादंबरीकार तथा डॉक्टर**१९५३:अनिल कांबळे-- नामवंत मराठी गझलकार,कवी(मृत्यू:१ ऑगस्ट २०१९)**१९५१:मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९४६:विजय भटकर – सुप्रसिद्ध भारतीय संगणक शास्त्रज्ञ,संगणकतज्ञ, संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे**१९४४:डॉ.हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर--- सुप्रसिद्ध साहित्यिक,झाडीबोलीचे अभ्यासक, संशोधक विविध पुरस्काराने सन्मानित,निवृत्त शिक्षणाधिकारी**१९४३:कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू:११ आक्टोबर १९९६)**_१९४२:अमिताभ बच्चन-- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त_**१९३९:शरद गोविंद साटम-- कवी* *१९३८:लिलाधर महादेवराव सोनोने(ललित सोनोने)-- सुप्रसिद्ध गझलकार(मृत्यू:१ फेब्रुवारी २०२१)**१९३२:सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू:१० ऑगस्ट २०१२)**१९३०:बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक(मृत्यू:९ एप्रिल २००१)**१९३०:कमलिनी रघुनाथ देशपांडे -- कवयित्री**१९१६:चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक लोकसभा व राज्यसभा सदस्य,पद्मविभूषण.(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१०)**१९१६:रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (मृत्यू:३ जून १९९७)**१९०२:’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू:८ आक्टोबर १९७९)**१९८९:नारायण गंगाधर लिमये-- बालसाहित्यिक (मृत्यू:१ डिसेंबर १९७३)**१८७६:चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.(मृत्यू:१७ डिसेंबर १९३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:दीना पाठक – अभिनेत्री (जन्म:४ मार्च १९२२)**१९९९:रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक**१९९७:विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य**१९९६:कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म:११ आक्टोबर १९४३)**१९९४:दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९६८:माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर,ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध (जन्म:३० एप्रिल १९०९)**१८८९:जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म:२४ डिसेंबर १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... अवनी चतुर्वेदी ......स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी ही मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक भारतीय वैमानिक आहे. *तिला भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले*, त्यांच्या दोन सहकारी मोहना सिंग जितरवाल आणि भावना कांथ यांच्यासोबत २०१६ मध्ये या तिघांना भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना राष्ट्रसेवेसाठी १८ जून २०१६ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते.ऑक्टोबर २०१५ मध्येच भारत सरकारने महिलांसाठी लढाऊ प्रवाह उघडण्याचा निर्णय घेतला.चतुर्वेदी यांच्या यशामुळे भारताला ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे, जेथे महिलांना लढाऊ विमाने उडविण्याची परवानगी आहे. अवनीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. तिचे वडील दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारच्या जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता आहेत आणि तिची आई घर बनवणारी आहे. तिने शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील देओलंड या छोट्याशा गावातून पूर्ण केले. २०१४ मध्ये बनस्थली युनिव्हर्सिटी, राजस्थानमधून तिची बॅचलर इन टेक्नॉलॉजी पूर्ण करून ती कॉलेजच्या फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली ज्याने तिला उड्डाण करण्यास आकर्षित केले. तिने AFCAT उत्तीर्ण केले आणि पुढे AFSB ने शिफारस केली.चतुर्वेदी यांना बुद्धिबळ, टेबल टेनिस खेळायला आणि स्केचिंग आणि पेंटिंग करायला आवडते.अवनीचा मोठा भाऊ, जो भारतीय लष्करात अधिकारी आहे, त्याने तिला भारतीय वायुसेनेत जाण्यासाठी प्रेरित केले. तिला तिच्या कॉलेज बनस्थली विद्यापीठाच्या फ्लाइंग क्लबमध्ये काही तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे . तिची वायुसेना अकादमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि वयाच्या २५ व्या वर्षी तिने प्रशिक्षण पूर्ण केले. पुढील प्रशिक्षणानंतर चतुर्वेदी जून २०१६ मध्ये फायटर पायलट बनले. २०१८ मध्ये चतुर्वेदी मिग-21 मध्ये एकट्याने उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला वैमानिक ठरली . २०१८ मध्ये अवनीला फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. २०२३ मध्ये, तिने जपानमध्ये केलेल्या हवाई युद्ध गेममध्ये भाग घेणारी ती भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली. चतुर्वेदी हे भारतीय वायुसेना क्रमांक २३ स्क्वॉड्रन पँथर्समध्ये सुरतगड , राजस्थान येथे तैनात आहेत.२०१८ मध्ये, तिला बनस्थली विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले .९ मार्च २०२० रोजी, चतुर्वेदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अवनी चतुर्वेदीने नोव्हेंबर २०१९ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट विनीत चिकारासोबत लग्न केले.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांच्याकडून राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड-दोन लाखांसाठी मुलांची विक्री; सहा जणांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा ओव्हल मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चिनी कंपनी व्हिवो मोबाइल्सवर ईडीची मोठी कारवाई; बड्या अधिकाऱ्यासह चौघे अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार डॉ.मिलिंद बोकील यांना जाहीर, येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चार विकेटच्या जोरावर बांगलादेशचा 137 धावांनी धुव्वा उडवत इंग्लंडने ICC Cricket World Cup 2023मध्ये पहिला विजय नोंदवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रागावर नियंत्रण ठेवण्याचे काही टिप्स*जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना सुरू ठेवा. आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. यामुळे तुमचा राग तर शांत होईलच. पण, त्या बरोबर विचार करण्यास वेळ मिळेल.जर तुम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल, तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जा आणि शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा तसे वाटत नसेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो. प्राणायाममुळे मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रित करण्याचा सराव होतो. त्यामुळे राग कमी होण्यास मदत होते. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चांमुळे तुमचा कमी होऊ शकतो.कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते. त्यामुळे राग लवकर फार लवकर येऊ शकतो. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदू शांत असणे फार जरूरी आहे. त्याकरता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामुळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार सक्षम होतो. किमान 7 ते 8 तासांची झोप मानवी शरीरासाठी आवश्यक असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात भारतीय वायुदल कितव्या स्थानी आहे ?२) भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत ?३) भारताचे पहिले वायुदल प्रमुख कोण होते ?४) भारतीय वायुदलाची स्थापना केव्हा झाली ?५) भारतीय वायुदल स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) चौथ्या २) एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी ३) सुब्रतो मुखर्जी ४) ८ ऑक्टोबर १९३२ ५) ८ ऑक्टोबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवीकुमार सितावार, धर्माबाद👤 संदीप बोंबले👤 विजय केंद्रे👤 अजय वाघमारे👤 प्रवीण वाघमारे, धर्माबाद👤 सुमीत बोधने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया नावडे नाम त्या यम जाची।विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध.......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले मानसिक आरोग्य संतुलित ठेवायचे असेल तर आचार आणि विचार शुध्द असायला हवे.त्याबरोबरच वाईट व्यसन आणि इतरांसोबत करत असलेले खोटे व्यवहार यावरही प्रतिबंध घातले तर मानसिक आरोग्य नक्कीच आपल्या जीवनासाठीयोग्य राहील.व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●● सेवा हाच धर्म ●●●एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली. यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,''स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.''https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मानसिक आरोग्य दिन_* *_ या वर्षातील २८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५:पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६४:जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९५४:आचार्य अत्रे निर्मित 'श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.**१९४२:सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९१३:पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:राहुल देशपांडे-- लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक**१९७९:दीपक शांताराम पवार-- कवी**१९७८: ज्योती मनोज मुळ्ये -- लेखिका* *१९७६:डॉ.केशव खटींग-- कवी* *१९७३:शिवराज किसनराव पारधे-- कवी* *१९७३:कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७१:कमाल अहमद खान-- कवी,लेखक, संपादक**१९६७:प्रा.डॉ.विजय मारोतराव सोरते-- कवी, लेखक* *१९६६:दशरथ यशवंत झनकर-कवी**१९६१:महेश नामदेव कराडकर-- कवी,लेखक,संपादक**१९६१:किरण सीताराम जोशी -- कवी* *१९५४:डॉ.सुहास बहुकार-- प्रसिद्ध चित्रकार आणि कलेचे इतिहासकार व लेखक* *१९५४:रेखा – प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री**१९५४:प्रतिमा इंगोले-- प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार,कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका**१९४८:मोहन यशवंत मदवाण्णा-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४४:निशिकांत देशपांडे-- प्रसिद्ध कवी लेखक,गझलकार (मृत्यू:२९ सप्टेंबर २०२२)* *१९४२:भास्कर आर्वीकर-- ग्रंथप्रेमी,लेखक**१९३७:अनंत दत्तात्रय भावे -- जेष्ठ बालसाहित्यिक* *१९३५:डॉ.कृष्ण माधव घटाटे-- चरित्रकार, संपादक,लेखक* *१९३३:हरी गणपत देशमुख-- लेखक तथा निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९२९:उ.रा.गिरी --- गझलकार,कवी (मृत्यू:५ सप्टेंबर १९८६ )**१९१६:डॉ.लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या,मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू:२० मे १९९२)**१९१०:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (मृत्यू:९ डिसेंबर १९४२)**१९०९:क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन.डी.नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू:११ सप्टेंबर १९९८)**१९०६:रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू:१३ मे २००१)**१९०२:के.शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (मृत्यू:९ डिसेंबर १९९७)**१८९९:कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते. (मृत्यू:२२ मे १९९१)**१८७१:शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक(मृत्यू:२३ एप्रिल १९५८)**१८४४:बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू:१९०६)**१७३१:हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ फेब्रुवारी १८१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:निर्मला उतरेश्वर मठपती--प्रसिद्ध कवयित्री,लेखिका(जन्म:३०ऑक्टोबर १९४८)**२०१८:पंडित दामोदर केशव(डी.के.) दातार-- भारतीय व्हायोलिन वादक(जन्म:१४ ऑक्टोबर १९३२)**२०११:जगजीतसिंग – गझलगायक (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)**२००८:रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (जन्म:१४ नोव्हेंबर १९२४)**२००६:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (जन्म:४ आक्टोबर १९१३)**२०००:सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. (जन्म:१७ एप्रिल १९१६)**१९८३:रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३) (जन्म: १९०७)**१९६४:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,निर्माते आणि अभिनेते.(जन्म:९ जुलै १९२५)**१८९८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक (जन्म:२६ सप्टेंबर १८५८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... दुर्गाबाई कामत ....१९०० च्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना चित्रपट किंवा रंगभूमीवर काम करण्यास मनाई होती. त्या काळात नाटकात काम करणाऱ्या महिलांना हीन दृष्टीने पाहिले जात असे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना आपल्या पहिल्या चित्रपटात म्हणजे 'राजा हरिश्चंद्र' मध्ये महिला कलाकाराच्या भूमिकेसाठी पुरुष कलाकारांचा वापर करावा लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी राणी तारामतीची भूमिका अण्णा हरी साळुंखे या पुरुष अभिनेत्याने साकारली होती. साळुंखे यांनी धार्मिक भावनेपोटी आपली मिशी काढण्यास नकार दिला होता. चित्रपटात त्यांची मिशी दिसून येऊ नये म्हणून दादासाहेब फाळके यांना खूप काळजी घ्यावी लागली होती.इ.स. १९०३ मध्ये दुर्गाबाई कामत या आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी कमला, ज्या लग्नानंतर कमलाबाई रघुनाथराव गोखले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा त्यांच्या बरोबर राहात असत. आपला चरितार्थ भागवण्यासाठी दुर्गाबाई आणि कमला या दोघी मेळा आणि जत्रेत गाणी गाणे व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नाटकात काम करत असत. त्यानंतर दुर्गाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या आणि त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीस योग्य ती सुरुवात झाली.दादासाहेब फाळके यांनी इ.स. १०१३ मध्ये 'मोहिनी भस्मासूर' या आपल्या दुसऱ्या मूकपटाची निर्मिती केली. या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी महिला कलाकारांना घेण्याचे ठरवले. दुर्गाबाई कामत यांनी या चित्रपटात देवी पार्वतीची छोटी भूमिका केली. अशा प्रकारे दुर्गाबाई भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली महिला अभिनेत्री बनल्या. त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी त्याच चित्रपटात बाल कलाकार म्हणून मोहिनीची भूमिका साकारली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले.दुर्गाबाई कामत यांचे नातू (आणि कमलाबाईंचा मुलगा) ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते. चंद्रकांत गोखले तसेच त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीसुद्धा त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळणार, घटस्थापनेनंतर विस्ताराची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, अतुलनीय कामगिरीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक मराठा लाख मराठा! मनोज जरांगेंच्या अंतरवालीतील सभेसाठी संभाजीनगरमधून 700 वाहने जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शारदीय नवरात्रौत्सव! तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 24 ऑक्टोबरला सिमोल्लंघन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला, सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या 81 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताला मोठा धक्का, शुभमन गिल अफगाणिस्तानविरोधातही संघाबाहेर, चेन्नईमध्ये उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर आणि निरोगी केसांसाठी काही टिप्स*● केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. ● प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. ● झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.● तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या.● ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात.● तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.● केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. ● दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.● केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे.● केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.● केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी – नियमितपणे केसांना खालून कट द्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ चे सदिच्छादूत कोण आहेत ?२) रसायनशास्त्र २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे ?४) देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ?५) 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळविणाऱ्या भारतीय सौंदर्यवती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत २) मौंगी बावेंडी, लुई ब्रुस, अलेक्सी एकीमोव्ह ३) फिलिपिन्स ४) दिल्ली ५) रिटा पॉवेल ( १९६६ ), युक्ता मुखी ( १९९९ ), डायना हेडन ( १९९७ ), ऐश्वर्या रॉय ( १९९४ ), प्रियंका चोप्रा ( २००० ), मानुषी छिल्लर ( २०१७ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद👤 राजेश्वर भुरे, टीचर, आर्ट ऑफ लिव्हिंग👤 राजेंद्र वाघमारे👤 श्याम देसाई👤 विशाल अन्नमवार, देगलूर👤 पोतन्ना चंदेवाड👤 सतिश बोधनकर, मुख्याध्यापक, IGP स्कुल धर्माबाद👤 विठ्ठल धुळेकर, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 कैलास सांगवीकर👤 प्रभू पाटील कदम👤 शरद घुबे👤 प्रमोद यादव👤 श्रीकांत पाटील शिंदे👤 तानाजी पाटील👤 शंकर बत्तीनवार👤 तुकाराम डोळे👤 राम गायकवाड👤 वसंत पाटील कदम👤 विनोद लोणे👤 अरुण शंखपाळे👤 रोहित हिवरेकर👤 गंगाधर पापुलवार👤 राज वजीरे👤 सतीश बड्डेवाड👤 रेखा अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यथासांग रे कर्म तेंहि घडेना।घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥दया पाहतां सर्व भुतीं असेना।फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥१००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा पाया मजबूत असेल तर अपयशाच्या कितीही पाय-या असल्यातरी त्या चढून जाऊन शेवटी यशाच्या यशोशिखरावर नक्कीच पोहोचता येते. परंतु यश कितीही जवळ असेल आणि आत्मविश्वास जवळ नसेल तर नक्कीच आपल्या हातून यश निसटून जाईल आणि अपयश पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○● मूर्खांचे निष्कर्ष ●○*एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले. पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बिण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.तात्पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक टपाल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.**१९६२:युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८०६:प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:श्रीरंजन आवटे -- लेखक* *१९९०:लखन माणिक जाधव-- कवी,लेखक**१९६५:मोनिका अभिजित गजेंद्रगडकर-- प्रसिद्ध कथाकार**१९६४:प्रा.डॉ.ईश्वर केशवराव सोमनाथे-- लेखक* *१९५८:गोकुळ धनाजी वाडेकर -- कवी, लेखक* *१९५८:भुजंग मेश्राम-- प्रसिद्ध कवी ( मृत्यू:२७ ऑगस्ट २००७)**१९५६:प्रदीप दाते -- अध्यक्ष,विदर्भ साहित्य संघ,नागपूर* *१९५२:रेखा खराबे -- कवयित्री,लेखिका**१९५०:प्रा.सुबोध वसंतराव बल्लाळ-- लेखक**१९४५:अमजद अली खान-- प्रसिद्ध सरोद वादक,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४५:पंडित माधवराव हिंगे--कवी* *१९४३:प्रा.प्रकाश कामतीकर-- पत्रकार,संपादक,चित्रकार,लेखक* *१९४२:देविदास सखाराम चव्हाण-- लेखक**१९३९:महेश एलकुंचवार-- सुप्रसिद्ध नामवंत नाटककार व प्रतिभावंत लेखक**१९३५:रवी परांजपे-- चित्रकार,बोधचित्रकार, लेखक (मृत्यू:११ जून २०२२)* *१९३०:डॉ.वसंत सखाराम जोशी-- प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक(मृत्यू:१६ नोव्हेंबर २०१७)* *१९११: दत्तात्रय विनायक गुप्ते--लेखक**१८९३:शिवराम श्रीपाद वाशीकर--- कथा-पटकथा-संवादलेखक(मृत्यू:२३ जून १९६१)**१८७७:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते,स्वातंत्र्यसेनानी,कवी व लेखक (मृत्यू:१७ जून १९२८)**१८७६:पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक (मृत्यू:४ जून १९४७)**१८५२:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१५ जुलै १९१९)**१७५७:चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: रवींद्र जैन--हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार(जन्म:२८ फेब्रुवारी १९४४)* *२००८:प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ--मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९१६)**१९९९:अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.(जन्म:१८ सप्टेंबर १९१५)**१९९८:जयवंत पाठारे –गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)* *१९८९:विद्याधर गंगाधर पुंडलिक--मराठीतील एक प्रतिभावान लेखक (जन्म:१३ डिसेंबर १९२४)* *१९८७:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (जन्म:२४ जून १९०८)**१९५५:गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार,नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार(जन्म:५ जून १८८१)**१९१४:विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे,कविता,निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली.(जन्म:२५ फेब्रुवारी १८४०)**१८९२:रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.(जन्म:१८ फेब्रुवारी १८२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*पहिली भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली. 22 मिनिटांत कोलंबिया यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं तो दिवस होता 1 फेब्रुवारी 2003.तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं त्यात कल्पना चावला यांचा ही समावेश होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात केली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढण्याची शक्यता; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईची हवा खराब! मान्सून माघारी फिरल्यानंतर हवेची गुणवत्ता खालवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकमध्ये मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यलो मोझॅकमुळं 60 ते 70 टक्के सोयाबीन वाया, विदर्भातील बळरीजा संकटात; महसूल मंत्री विखे पाटलांनी केली पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी टिप्स .....*कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्याचा २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे ?३) 'मिस वर्ल्ड' या स्पर्धेला कोणत्या वर्षी सुरूवात झाली ?४) हिऱ्याचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) जॉन फॉस, लेखक, नार्वे २) मेरीलँड, वॉशिंग्टन, अमेरिका ( १९ फूट ) ३) सन १९५१ ४) दागिने ५) गुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागनाथ बळीराम शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 नागेश अशोक धावडे👤 हणमंत सावंत👤 पिंटू कटलम👤 कु. स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली👤 कु. पल्लवी मदन ढगे, चिरली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी। तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥ मुखे रामनामावळी नित्य काळीं। जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 विचारवेध............✍🏻🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घन पदार्थ असो किंवा द्रवपदार्थ असो त्यांना एका विशिष्ट परिमाणाने मोजता येते.परंतु मानवी मनाला मात्र कोणतेही परिमाण नाही.अशा मनाला लांबी,रुंदी,उंची आणि वजनही नाही.मग मनाचे जर कोणते परिमाण असेल तर ज्या मनाने माणसे जोडली जातात त्यावरुन मनाचे वजन किती आहे ते कळेल,ज्यांच्याबद्दल प्रेम आहे,आपुलकी आहे जिव्हाळा आहे आणि त्याचा प्रत्येक माणसाच्या हृदयाशी नि सुखदुःखाशी संबंध आहे ते एक मन मोजण्याचे परिमाण आहे.मनाचे परिमाण नसले तरी मनाचा संकुचितपणा आणि मोठेपणा हे मात्र माणूस माणसांमध्ये वावरत असताना नक्कीच कळतो की,माणसाचे वजन किती आहे.मन निर्मळ,पवित्र आणि लाघवी असले की,बाकीच्या परिमाणाची काहीच गरज नाही.व्यंकटेश काटकर नांदेड संवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○○ समुद्रातील मासा ○○*एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला,'देश, जात, कुळ या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'. त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला, 'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस. जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण ते कळेल.कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.तात्पर्य : नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.**१९७१:ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४९:जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना**१९३३:पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.**१९१९:महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.**१९१९:के.एल.एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.**१९१२:हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.**१९०५:पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:जहीर खान – भारतीय जलदगती गोलंदाज**१९७८:प्रिती तडस-वाडीभस्मे--कवयित्री लेखिका**१९७८:नवनाथ एकनाथ ठाकूर-- कवी**१९६७: अमृता संखे -- कवयित्री* *१९६५:डॉ.बळवंत हिरामणजी भोयर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:आश्विनी भिडे-देशपांडे –लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका**१९५५:विश्राम गुप्ते-- मराठीतले आघाडीचे कादंबरीकार,समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध**१९५५:डॉ.लीना सुधाकर जोशी-- लेखिका**१९५५:घनश्याम डोंगरे -- कवी,कथाकार संपादक (मृत्यू:११ नोव्हेंबर २००५)**१९५४:दीपक करंदीकर-- गझलकार**१९५३:डॉ.अनिल नारायणराव कुलकर्णी-- लेखक* *१९५२:व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष**१९४९:-रवींद्र महाजनी: मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक(मृत्यू:११ जुलै २०२३)**१९४८:डॉ.ललिता मोहन कुंभोजकर -- लेखिका* *१९४१:उषा खन्ना-- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय संगीत दिग्दर्शिका**१९३९:प्रा.प्रल्हाद विठ्ठलराव पांढरकर-- लेखक**१९३३:नामदेवराव दिवटे-- माजी खासदार तथा लेखक (मृत्यू:१८ जुलै २०१५)**१९३१:प्रा.त्र्यंबक महाजन-- लेखक, समीक्षक,संपादक* *१९३१:दिनेशचंद्र विश्वनाथ आठल्ये -लेखक**१९२७:मृणालिनी प्रभाकर देसाई --कादंबरीकार(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९९४)**१९२१:जयवंत दत्तात्रेय जोगळेकर--समीक्षक, भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक, युद्धशास्त्र अभ्यासक(मृत्यू:१६ जुलै २०१६)**१९१७:विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू:१३ मे २०१० )**१९१४:बेगम अख्तर – गझल,दादरा आणि ठुमरी गायिका.गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(मृत्यू:३०आक्टोबर १९७४)**१९०७:प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू:२० ऑगस्ट १९९७)**१९००:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू:२९ एप्रिल १९४५)**१८८५:नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९६२)**१८६६:कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५कविता आज उपलब्ध त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही.’केशवसुतांची कविता’हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना.आपटे यांनी प्रकाशित केला.(मृत्यू:७ नोव्हेंबर १९०५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:प्रभाकर पेंढारकर-- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते(जन्म:७ सप्टेंबर १९३३)**१९९९:उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक,अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक,बालसाहित्यकार(जन्म:१५ ऑगस्ट १९२९ )**१९९८:भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री,काँग्रेसचे नेते,पद्मश्री(जन्म:९ फेब्रुवारी १९१४)**१९७५:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९)**१८४९:एडगर अॅलन पो –अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी(जन्म:१९ जानेवारी १८०९)**१७०८:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म:२२ डिसेंबर १६६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... डॉ. आनंदीबाई जोशी ...आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी कळल्यावर लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या.पुढील भागात :- अंतराळवीर कल्पना चावलासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणे हे सरकारचे काम; उच्च न्यायालयाने खडसावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, निर्णय देईपर्यंत चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाचा प्रतियुक्तीवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बांगलादेशचा पराभव करत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने नेदरलँडवर 81 धावांनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्सत्वचेचे उन्हापासून संरक्षण करा. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.म्हणूनच उन्हात जाताना कमीतकमी 15 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व फुलपँट घाला. शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका धूम्रपान टाळा. धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात. धुम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते. धुम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घ काळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा.हार्श साबण वापरू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात. त्याऐवजी, सौम्य प्रकारचा साबण वापरा.आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम, लोशन किंवा जेल लावा. तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा. केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा. आंघोळ केल्यावर किंवा चेहेरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा म्हणतात ?२) २०२३ ची 'मिस वर्ल्ड स्पर्धा' कोणत्या देशात होणार आहे ?३) गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?४) अलीकडेच गुगल या सर्च इंजिनला किती वर्षे पूर्ण झाली आहेत ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी कोणती होती ? *उत्तरे :-* १) गोदावरी नदी २) भारत ( १६ डिसेंबर ) ३) धर्मरावबाबा आत्राम ४) २५ वर्षे ५) महेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिपाली सावंत, क्रियाशील शिक्षिका, वर्धा👤 जादू पतंगे, वसमत👤 साईनाथ औरोड👤 दत्तात्रय देवकत्ते👤 योगेश गाडे👤 साईनाथ सावंत👤 साया रेड्डी चाकरोड, धर्माबाद👤 सुदर्शन कदम👤 रवींद्र शेळके👤 अभिषेक निगम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची। अहंतागुणे यातना ते फुकाची॥ पुढे अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्न करणारी माणसं कधीच आपल्या नशिबाला दोष देत नाहीत. कारण त्यांना माहित असते की, आपले नशीब घडवायचे असेल तर प्रथम आपल्या प्रयत्नांना कधीच कमकुवत करायचे नाही आणि जर का प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात सातत्य अधिक ठेवायला हवे. मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते. परंतु जर का प्रयत्नांना थांबवून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच सफल होणार नाही. मग नशिबालाच दोष देत आपला हात डोक्याला लावून काहीच उपयोग होणार नाही हे तितकेच खरे आहे. नशिबाला नेहमी आपल्या प्रयत्नांची आणि सातत्याची जोड द्यायला हवी.- व्यंकटेश काटकर,नांदेड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○○लहान झाड○○नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वा-याने माझ्यासारखं मोठ झाड पाडलं, त्या वा-याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास? त्यावर लहान झाडाने उत्तर दिले , 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वा-यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'तात्पर्य : समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते ब-याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८७:फिजी प्रजासताक बनले.* *१९८१:इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या**१९७३:इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.**१९६३:पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.**१९४९:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.**१९२७:’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.**१९०८:ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६ : विशाखा समाधान बोरकर-- कवयित्री,लेखिका* *१९८४: प्रा. शिवाजी जोगदंड-- कवी लेखक**१९८१:सतीश कोंडू खरात-- कवी* *१९७८:श्वेता मेहेंदळे-- मराठी अभिनेत्री**१९७२:सलील कुलकर्णी – संगीतकार**१९७०:प्रिया धारुरकर -- कवयित्री,लेखिका* *१९६७:खुशाल दादाराव गुल्हाने--कवी**१९६२:प्रदीप देविदासराव कुलकर्णी-- लेखक संपादक**१९५८:प्रा.डॉ.रमेश अंबादास जलतारे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४९:निरंजन हरिश्चंद्र उजगरे-- कवी, लेखक व अनुवादक(मृत्यू:१२ डिसेंबर २००४)**१९४८:नंदा अरुण कुलकर्णी-- कवयित्री**१९४६:विनोद खन्ना – प्रसिद्ध अभिनेते,चित्रपट निर्माते व माजी खासदार( मृत्यू:२७ एप्रिल २०१७)**१९४६:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (मृत्यू:२९ डिसेंबर २०१२)**१९४५:देविदास रामचंद्र इंदापवार-- प्रसिद्ध कवी,लेखक,गायक* *१९४५:डॉ.सुरेश गरसोळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४३:डॉ.रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (मृत्यू:२० फेब्रुवारी २०१२)**१९३६: गोविंद गोपीनाथ कुलकर्णी -- लेखक, व्याख्याते* *१९३०:वसंत निनावे-- ज्येष्ठ गीतकार(मृत्यू: १० जून १९८८)**१९३०:रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक**१९१४:थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (मृत्यू:१८ एप्रिल २००२)**१९१३:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – सुप्रसिद्ध कवी.तसेच अनेक ललित,स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत.(मृत्यू:८ सप्टेंबर १९९१)**१९१२:डॉ.हरी जीवन तथा एच.जे.अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (मृत्यू:२२ नोव्हेंबर २०००)**१८९३:मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९५६)**१७७९:माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (मृत्यू:२० नोव्हेंबर १८५९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे माजी मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (जन्म:१५ जानेवारी १९२१)**२००७:एल.एम.सिंघवी – माजी लोकसभा सदस्य,कायदेपंडित,विद्वान,मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत(जन्म:९ नोव्हेंबर १९३१)**१९८१:अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२५ डिसेंबर १९१८)**१९७९:महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (जन्म:५ ऑगस्ट १८९०)**१९७४:व्ही.के.कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री(जन्म:३ मे १८९६)**१९५१:विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (जन्म: ७ एप्रिल १८६०)**१८९२:लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (जन्म:६ ऑगस्ट १८०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतातील कर्तृत्ववान महिला.... मदर तेरेसा ......मदर तेरेसा या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.पुढील भागात - डॉ. आनंदी गोपाळ जोशीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, 'मविआ'ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला नऊ विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये. (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात. "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत ?२) 'धाराशिव' या नावाने कोणत्या शहराचे नामकरण झाले आहे ?३) भारतात कोणत्या नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बनवला आहे ?४) जीवनसत्त्व 'ड' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांनी शाहिस्तेखानाची काय छाटले होते ?*उत्तरे :-* १) १०३ राष्ट्रीय उद्याने २) उस्मानाबाद ३) गंगा नदी ४) कॅल्सीफेरॉल ५) बोटे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रकाश नागोराव चरपिलवार👤 श्वेता अंबाडकर👤 योगेश पाटील संगेपवाड👤 दशरथ बोईनवाड👤 माधव हाक्के👤 प्रा. शिवाजी जोगदंड👤 गोविंदराव धुतीवाले👤 मारोती रेड्डी👤 संभाजी मारोतराव हिवराळे👤 सूर्यकांत मोळे👤 रामरेड्डी अरकलवार👤 नागभूषण भालेराव👤 चिं. मेदांश शिवा वसमतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।जपे रामनामावळी नित्यकाळीं॥पिता पापरुपी तया देखवेना।जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने जीवनात वृक्ष बनून प्रत्येकाला सावलीचा आधार देण्याची भूमिका करावी.कारण वृक्ष कधीच स्वार्थी भूमिका करत नाहीत.ते नेहमीच परोपकारी वृत्तीची भूमिका करत असतात.प्रत्येक जीवाला स्वतः अंगावर ऊन झेलून सावली देतात,भूकेल्यांना फळांच्या रुपाने अन्न देतात,एवढेच नाही तर जमीनीची धूप थांबविण्यासाठी प्रयत्न करत प्रत्येक जीवाला शुद्ध हवा देत पर्यावरणाच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण करतात.अर्थात काहीच अपेक्षा न करता ते सतत देण्याचे काम करतात.म्हणून वृक्षासारखे माणसाने देखील अपेक्षा न ठेवता काहीनाकाही इतरांना देण्याचा गुण शिकायला हवा.- व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●○यशप्राप्ती○●एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.*तात्पर्य :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.एका दिवसात यश प्राप्त होत नाही.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शिक्षक दिन _* *_ या वर्षातील २७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर**१९९५:कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर**१९८९:मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.**१९६२:’डॉ.नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.**१९५५:पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.**१९१०:पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.**१८६४:एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:लक्ष्मण मुरलीधर खोब्रागडे-- कवी लेखक* *१९७५:केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री**१९७१:अर्जुमनबानो सु.शेख -- कवयित्री* *१९६९:संजीव अभ्यंकर-- लोकप्रिय हिंदुस्तानी गायक**१९६८:प्रा.डॉ.सुरेश दयाराम खोब्रागडे-- कवी, लेखक,संपादन* *१९६७:सुनील मारोतराव लव्हाळे-- कवी, पत्रलेखक**१९६२:लक्ष्मीकांत रांजणे -- कवी लेखक* *१९६०:डॉ.राजीव उन्हाळे -- लेखक* *१९५८:रामदास घुंगटकर-- कवी/गझलकार**१९५८:डॉ.करुणा गोखले-- अनुवादक**१९५६:सुहास रघुनाथ पंडित-- कवी,लेखक**१९५४:डॉ.अशा सतीश लांजेवार-- लेखिका**१९३५:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- विदर्भातील मराठी कवी(मृत्यू:२७ ऑक्टोबर २०१३)**१९३२:माधव आपटे – क्रिकेटपटू**१९३१:राजाराम शिंदे-- पत्रकार,नाट्यलेखक, नाट्यअभिनेते,नाट्यनिर्माते,दिग्दर्शक, नेपथ्यकार,वक्ते**१९२४:जगत मुरारी-- प्रतिष्ठित भारतीय माहितीपट निर्माते,दिग्दर्शक(मृत्यू:१३ एप्रिल २००७)**१९२३:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (मृत्यू:३ नोव्हेंबर २०१२)**१९२३:विजया साने-- लेखिका, बालसाहित्यिक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०००)* *१९२२:शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार(मृत्यू:२६ एप्रिल १९८७)**१९२२:यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक,लेखक,चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१० मे १९९८)**१८९०:किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते 'हरिजन’चे संपादक होते.(मृत्यू:९ सप्टेंबर १९५२)* *१८८४:हरी रामचंद्र दिवेकर -- वेदविद्याभ्यासक,संशोधक (मृत्यू:१५ आगस्ट १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:यशवंत बाळकृष्ण जोशी--ग्वाल्हेर घराण्याचे गायक (जन्म:१२ सप्टेंबर १९२७)**२०११:स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म:२४ फेब्रुवारी १९५५)**१९९७:चित्त बसू –संसदपटू,'फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस(जन्म:२५ डिसेंबर १९२६)**१९९२:बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त,नॉर्वे,ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत(जन्म:११ सप्टेंबर १९१२)**१९९१:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक,स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म:३ एप्रिल १९०४)**१९९०:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३)(जन्म:१५ सप्टेंबर १९०५)**१९८३:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म:२८ जुलै १९०७)**१९८१:भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,एकांकिकाकार,पटकथाकार व नाटककार,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९०३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.पुढील भागात - मदर तेरेसासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पुण्याचे पालकमंत्री,*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाईचा भार होणार हलका ! उज्ज्वला योजनेत आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील माँगी जी. बॉएंडी, लुईस ई. ब्रुस आणि अॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा याने कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आजपासून विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा... तुमचं आयुष्य बदलू शकते."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ?२) पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे ?३) जॉन रस्किनच्या कोणत्या पुस्तकाचा महात्मा गांधींवर प्रभाव पडला ?४) मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करते ?५) सर्वाधिक ६ वेळा कोणत्या देशातील तरुणींनी 'मिस वर्ल्ड'चा मुकुट मिळवला आहे ? *उत्तरे :-* १) युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, अमेरिका २) सोलापूर विद्यापीठ ३) अन टू धीस लास्ट ४) राज्यपाल ५) भारत, व्हेनेझुएला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुभाष लोखंडे, पांगरी👤 श्रद्धानंद यरमलवाड, धर्माबाद👤 बालाजी घोणशेट्टे👤 किशन पचलिंग👤 काशिनाथ साखरे👤 बोडेला योगेश यादव👤 प्रदीप सोमोसे👤 अमोल सिंगनवाड👤 साईनाथ पवार👤 आकाश जाधव👤 दीपक रामराव कुलकर्णी👤 रविकांत डोळे👤 विशाल फाळके👤 पाशा शेख👤 दीपक पाटील बेळकोणीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥शुकाकारणे कुंटणी राम वाणी।मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 ‼ *विचारवेध*‼✍🏻🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात काही माणसांचा असा एक गोड गैरसमज आहे की,चांगला माणूस रुपाने चांगला असला म्हणजे चांगला आहे,त्याच्या अंगावर भारी वस्त्र घातले आहे म्हणजे चांगला आहे,धनसंपत्तीने श्रीमंत आहे म्हणून चांगला आहे.परंतु हे कधीच शक्य नाही .चांगला माणूस होण्यासाठी त्याच्या अंगी पुढील काही गोष्टी असायला हव्यात.खरा माणूस होण्यासाठी त्याच्याजवळ काही गोष्टी मुळातच असायला हव्यात.जो माणूस इतरांना चांगली वागणूक देतो, इतरांचे सुखदुःख जाणून त्यांच्यासाठी धावून जातो, इतरांना आपले समजून प्रमाणिकपणाची वागणूक देतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांच्या विचारांचा आदर करुन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करुन माणुसकीचे नाते अधिक चांगले दृढ करतो आणि माणसाला माणूस जोडून माणुसकीचे नाते घट्ट करतो तोच माणूस चांगला असतो.अशाच माणसाला समाज चांगला माणूस म्हणून स्वीकारतो हा खरा शुध्द समज आहे .अशीच माणसे इतरांच्या गळ्यातील ताईत बनतात.- व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद :- 9421839590🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••● सुभेदार व त्याचा घोडा ●एका सुभेदाराचा घोडा खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला. एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय ? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!तात्पर्य :- नव्याचे नऊ दिवस !सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अंतराळ सप्ताह_* *_जागतिक प्राणी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.**१९५७:सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.**१९५९:सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.**१९४३:दुसष,रे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.**१९४०:’ब्रेनर पास’ येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.**१९२७:गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.**१८२४:मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:गौतम राजू ढोके--कवी* *१९७५:संगीता उत्तमराव भांडवले--कवयित्री लेखिका**१९६७:शशिकांत शिंदे-- कवी* *१९५२:शैलेंद्र सिंग-- भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता**१९५१:मुकुंद मोरेश्वर टाकसाळे--विनोदी लेखन करणारे लेखक**१९५०:प्रा.डॉ.कल्पना सुरेश व्यवहारे -- लेखिका(मृत्यू:२०१४)**१९४९:छगनलाल फौजी पंचे-- कवी* *१९४८:विजय वसंतराव पाडळकर- समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार**१९४४:गुफी पेंटल वालिया-- भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक (मृत्यू:५ जून २०२३)**१९४२: पुष्पा चंद्रकांत देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१९४०: माधुरी वासुदेव चौकीदार -- लेखिका, कथाकार* *१९३७:सुधाकर विनायक जोशी-- लेखक* *१९३७:जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री**१९३५:अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू:२१ जून १९८४)**१९२८:ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक (मृत्यू:२७ जून २०१६)**१९२२:सदानंद महादेव पेठे--लेखक**१९१६:धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक**१९१४:मधुकर वासुदेव धोंड--मराठी समीक्षक(मृत्यू:५ डिसेंबर २००७)**१९१३:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू:१० आक्टोबर २००६)**१९११:नारायण गजानन जोशी-- कवी, छंदःशास्त्राचे अभ्यासक(मृत्यू:८ सप्टेंबर १९८६)**१८२२:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ जानेवारी १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म:२३ आक्टोबर १९२४)**१९८२:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(जन्म:१६ आक्टोबर १९०७)**१९७६:वासुदेव वामन भोळे--कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक(जन्म:३० सप्टेंबर १८९३)**१९६६:अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (जन्म:१ डिसेंबर १९११)**१९४७:मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९२१:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(जन्म:९ ऑगस्ट १८९०)**१६६९:रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म:१५ जुलै १६०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला**राजमाता जिजाऊ भोसले*भारताच्या वीर माता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याजवळील निजामशाहच्या सिंदखेड येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाईंना लहानपणी जिजाऊ म्हणून संबोधले जायचे.त्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे जिजाबाईंचा विवाहही अगदी लहान वयातच झाला होता. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सेनापती आणि शूर योद्धा होते. जिजाऊ यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील धाडसी व शौर्याच्या गोष्टी सांगून मोठे केले आणि त्यांच्यामध्ये असे गुण निर्माण केले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि निर्भय योद्धा ठरले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भाला चालवण्याची कला, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच पुढे शिवाजी महाराज समाजाचे रक्षक आणि अभिमान बनले. आणि त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांचे नाव तयार झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.पुढील भागात - अहिल्याबाई होळकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळीनिमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा, मैदा आणि पोह्याचा देखील समावेश; मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात येत असलेल्या तीन विभागांच्या भरती प्रक्रियेमधून 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी तोडगा काढत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले निर्णय अनुभवातून येतात आणि अनुभव चुकीच्या निर्णयांमधून येतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक शांततेचे महान दूत' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?२) जागतिक प्राणी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती कोण ?४) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सेनापती म्हणून कोणाची नेमणूक केली ?५) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात जास्त धावा कोणत्या संघाने पटकावल्या ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) ४ ऑक्टोबर ३) लालबहादूर शास्त्री ( १९६६ ) ४) तुकोजीराव होळकर ५) नेपाळ, मंगोलिया विरुद्ध ( ३१४ धावा )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय पळशीकर👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 लक्ष्मण पंदोरे👤 साईनाथ पोरडवार👤 सौ संगिता भांडवले, शिक्षिका, उस्मानाबाद👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर👤 धनराज शेट्टीगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां। निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥ जपे आदरें पार्वती विश्वमाता। म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांशी तुलना करण्यापेक्षास्वकर्तुत्वावर विश्वास ठेवून आपण थोरांचे व ज्यांनी स्वबळावर आपले जीवन जगून जो आदर्श निर्माण केला आहे तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. इतरांशी तुलना करताना त्या व्यक्तींनी आपल्या जीवनात पदोपदी किती त्रास सहन केला असेल..सोबत आपत्ती, वाईट परिस्थिती, अडीअडचणी व संघर्ष कशाप्रकारे करून जगून दाखवले असेल किंवा आजही जगत असेल.. या विषयावर ची संपूर्ण माहीती आधी शोधून काढावी. बरेचदा बोलणं सोपे असते पण, त्याप्रकारचे जीवन जगणे तेवढेच कठीण असते. म्हणून बोलण्याआधी व तसे विचार करण्याआधी त्या सर्वच गोष्टी समजून घेतले पाहिजे.कारण फुले तर. .बरेच फुलत असतात पण,सर्वच फुलांचा जन्म काट्यातून होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मोठ्या भावाचा रुमाल*राजू तिसरीच्या वर्गात शिकतो, त्याचा मोठा भाऊ कार्तिकही त्याच शाळेत पाचवीत शिकतो. दोन्ही भाऊ एकत्र शाळेत जायचे. दोघेही वाटेत खूप मस्ती करायचे. कार्तिककडे रुमाल होता, तो नेहमी डेटॉलने धुवून स्वच्छ ठेवायचा. राजू नेहमी भावाकडे पाहतो, त्याला वाटतं भाऊ रुमाल सोबत ठेवतो का ? थोडी घाण असेल तर साफ करायची आणि मग दुमडून खिशात ठेवायची. रुमालाचा गोंधळ त्याला आवडला नाही. राजूला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या, मोठा भाऊ असं का करतो, असं त्याला वाटायचं, पण त्याला कधीच कळलं नाही. एकदा राजू झुल्यावर डोलत होता, तेव्हा झुल्याचा हात सुटला आणि तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडताच राजूच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागले. कार्तिकने आपल्या भावाला पाहताच तो पटकन धावत आला आणि खिशातून रुमाल काढून जखमेवर बांधला. त्यामुळे रक्तस्त्राव थांबला. कार्तिक ताबडतोब त्याच्या भावाला दवाखान्यात घेऊन गेला तिथे डॉक्टरांनी मलम लावून राजूला बरे केले. राजूने तो रुमाल पाहिला जो भाऊ स्वच्छ करून नेहमी सोबत ठेवत असे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता, तो आता गलिच्छ झाला होता. मोठ्या भावाच्या प्रेमापुढे तो रुमाल फारसा गोंडस नव्हता.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५:जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२:इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१७७८:ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६९:सुखचंद वाघमारे-- कवी* *१९६८:डॉ.शीतल शिवराज मालुसरे-- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६६:सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४:प्रा.डॉ.गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील-- लेखक,विचारवंत* *१९६०:श्रीपाद अनिल गोरे-- लेखक* *१९४९:जे.पी.दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४३:वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२:प्रा.प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर-- कवी,लेखक* *१९२८:प्रा.जनार्दन रा.कस्तुरे-- लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट २००६)**१९२१:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू:२३ जून १९९६)**१९१९:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)**१९१४:म.वा.धोंड –टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी --संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू:१४ मार्च १९९४)**१९०३:स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू:२२ जानेवारी १९७२)**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू:२२ मार्च १९८८)**१९०२:केशव रावजी पुरोहित--पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू:१० फेब्रुवारी १९६१)**१९००:श्रीपाद शंकर नवरे-- लेखक,संपादक(मृत्यू:७ डिसेंबर १९७८)* *१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या,समीक्षक,रंगभूमीच्या भाष्यकार( जन्म:२६ मार्च, १९३९)**२०१२:केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर(जन्म:२४ आक्टोबर १९२६)**१९९९:शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक(जन्म:१० जानेवारी १९०३)**१९९९:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३:साधना बोस--- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म:२० एप्रिल १९७३)**१९५९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म:२२ सप्टेंबर १९०९)**१९४३:विष्णुपंत पागनीस-- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म:१५ नोव्हेंबर १८९२)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**१८६७:एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म:९ जुलै १८१९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना करण्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींचं नमन, 'बापूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध'; देशभरात गांधी जयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाण्यानंतर आता नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधीमंडळ आयोग दोन दिवसांत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी माहिती घेणार, तर सुनावणीआधीच दोन्ही गट आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना ढोल वाजवत इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा उडवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फळांचे महत्व*फळामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने असतात. तसेच फळांमध्ये ८५ ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे फळे खाल्याने आपले शरीर dehydrate राहायला मदत होते.आपल्या दैनंदिन आहारात फळांचा समावेश असणे हे आपल्यासाठीच खूप फायद्याचे आहे वेगवेगळे फळांमधून आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे घटक मिळतात. फळांचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. फळांमधील तंतुमय पदार्थफळांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात फळांमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळत असतात.यांच्या सेवनामुळे आतड्यांचे आकुंचन – प्रसरण चांगले होते तसेच मलावरोध, पोटात दुखणे, बद्घकोष्ठता या आजारापासून आराम मिळतो. अंजीर पेरू, पेर यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. क जीवनसत्त्वक जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ‘ स्कर्व्ही’ हा रोग होते. त्यामुळे क जीवनसत्त्वे आपल्यासाठी गरजेचे आहे.आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांमधुन मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व मिळते. त्याचा आपल्याला फायदा होतो(Fruits Information In Marathi). आजारपणात फळांचे महत्त्वआजारी व्यक्तीला शक्यतो फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने, शरीरासाठी आवश्यक खजिने उपलब्ध असतात. म्हणून आजारी व्यक्ती जर अशक्य झाली असेल तर त्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्यांचे पोषण होण्यास मदत होते. फळांचे इतर उपयोगफळांचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी देखील उपयोग केला जातो. यामध्ये आईस्क्रीम, मिठाई मध्ये फळांचे फ्लेवर वापरले जाते. आमरस, शिकरण यासारखे अन्नपदार्थ हे फळे वापरून तयार केले जातात. सर्व प्रकारची फळे ही आपल्यासाठी उपयोगी आहेत*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःची चूक स्वत:ला कळली की बरेच प्रश्न सुटतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कासवाचे आयुष्य किती वर्षाचे असते ?२) महाराष्ट्रातील नृत्य प्रकार कोणते ?३) जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण आहे ?४) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात वेगवान अर्धशतक कोणी ठोकले ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विमानतळ कोठे आहे ? *उत्तरे :-* १) १५० वर्षे २) लावणी, कोळी नृत्य ३) उसैन बोल्ट ४) दीपेंद्रसिंग ऐरी, नेपाळ ( ९ चेंडू - ६,६,६,६,६,६,२,६,६ ) ५) इंदूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं पाहतां देव हा अन्नदाता। तया लागली तत्त्वता सार चिंता॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे। मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखात असतात कोणाची आठवण येत नाही. आणि दु:खात असताना मात्र आपल्या माणसांची पदोपदी आठवण येत असते. कारण त्यावेळी सुख महत्वाचे वाटत नाही तर आपल्या माणसांच्या साथीची आवश्यकता वाटत असते म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसांना कधीच विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंधारा मदनात आला. या पोतलीचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेबीज दिन_**_ या वर्षातील २७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर**१९९९:महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९६०:माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९३९:दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९२८:सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा भारतीय**१९८२:रणबीर कपूर – प्रसिद्ध अभिनेता**१९८१:प्रा.डॉ.राजाराम अंकुशराव झोडगे-- लेखक* *१९६०:विनिता पिंपळखरे-- लेखिका,कवयित्री,नाटककार**१९५९:हरिहर जनार्दन कुलकर्णी(आनंदहरी)- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५७:नितीन रमेश तेंडुलकर-- कवी, लेखक* *१९५७:महेश कोठारे--- मराठी चित्रपट-अभिनेते, मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता**१९५२:सुरेशकुमार वैराळकर --जेष्ठ गझलकार व शाहीर**१९४९:प्रा.वैजनाथ महाजन-- जेष्ठ लेखक* *१९४९:अजंना उदय कर्णिक -- कवयित्री, लेखिका* *१९४६:माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट माजी कप्तान**१९४०:प्रा.प्रसन्नकुमार पाटील-- कवी, समीक्षक* *१९३६:आशा मुंडले -- लेखिका* *१९३३:डॉ.गजानन रामचंद्र देशमुख -- लेखक* *_१९२९:लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण(मृत्यू:६ फेब्रुवारी २०२२)* *१९२४:प्रभाकर दिगंबर देशपांडे--लेखक माजी शिक्षणाधिकारी**१९०९:पी.जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)**१९०७:भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८९८:शंकर रामचंद्र दाते(मामाराव दाते)--आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे मुद्रणतज्ज्ञ(मृत्यू:१८ जानेवारी १९९२)**१८६५:श्रीनिवास नारायण कर्नाटकी-- चरित्रकार,निबंधकार ( मृत्यू:१७ जुलै १९४८)* *१८०३:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(जन्म:२९ सप्टेंबर १९२८)**२०१२:माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)(जन्म:१९२९)* *२००४:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (जन्म:१२ डिसेंबर १९०५)**१९९३:चंद्रशेखर दुबे( सी.एस. )-- भारतीय अभिनेता(जन्म:४ सप्टेंबर १९२४)**१९८९:फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:११ सप्टेंबर १९१७)**१९५६:विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक(जन्म:१ आक्टोबर १८८१)**१९५३:एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२० नोव्हेंबर १८८९)**१८९५:लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:२७ डिसेंबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*गणपतीपुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रगणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे.गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ईद ए मिलाद ची सुट्टी आजच्या ऐवजी उद्या जाहीर, शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तटस्थ नवाब मलिक यांच्या जागी अजित पवार गटाने अखेर मुंबई अध्यक्ष निवडला, समीर भुजबळ राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी; पंचगंगा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विषाणू* 📙मानवी आजारातील अनेक आजारांवर आजही औषधे सापडलेली नाहीत. हे आजार वाढून त्यातून अन्य उद्भव वाढू नयेत व रुग्णाला तात्पुरता आराम पडावा, एवढेच उपचार या वेळी शक्य होतात. अशा आजारांतील खूप आजार हे विषाणूंमुळे होतात.ज्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांचे स्वरूप प्रगत होत जाऊन अतिप्रगत असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरात आले, तेव्हा विषाणु हा प्रकार प्रथम ज्ञात होऊन डोळ्यांनी बघता आला. एखाद्या मिलिमीटरच्या लक्ष ते दशलक्षांश भागाएवढा हा विषाणु सहसा दंडगोलाकार वा गोलाकार आकारात असतो. आज घटकेस अगणित विषाणू आपल्या आसपास वावरत असतात, पण त्यातील मोजकेच आजारनिर्मितीला कारणीभूत होतात.विषाणू हा सजीव प्राणी आहे की नाही ? नेमके उत्तर आता माहीत नाही. परोपजीवी वाढीमुळे व परोपजीवी अस्तित्वामुळे शास्त्रज्ञ हे मत व्यक्त करतात. विषाणू जेव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हाच त्यांची झपाट्याने वाढ सुरू होते व प्रताप सुरू होतात. साधी नेहमी होणारी सर्दी, काही प्रकारचा खोकला, अनेक प्रकारचे जुलाब, पूर्वीची भयानक अशी देवीची साथ, गोवर, कांजण्या हे सारे विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. या साऱ्यांच्या जोडीला अलीकडे अनेक वेळा ज्या रोगात नक्की कारण सापडत नाही, त्या वेळी डॉक्टर लोक विषाणूंकडे बोट दाखवतात. कॅन्सरकडे या दृष्टीने अलीकडे बघितले जाते.साऱ्या जगभर सध्या चर्चेचा विषय बनलेला आजार एड्स हा विषाणूंमुळेच होतो. विषाणू जंतुनाशके वा प्रतिजैविके यांना अजिबात दाद देत नाहीत. त्यामुळेच प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्सची) प्रचंड फौज मानवी हातात असूनही विषाणूंमुळे झालेल्या आजारांवर ते झाल्यानंतर काडीचाही परिणाम होत नाही. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिगोलके (अँटीबॉडीज) तयार करणारी लस टोचणे एवढाच उपाय आपल्या हातात राहतो. या दृष्टीने अनेक आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लशी आपण तयारी केलेल्या आहेतच. पण विषाणू मोठे तरबेज असल्याने अनेक लसींना दाद न देणारे नवीन विषाणू पुन्हा तयार होतात.सर्दी पडसे, इन्फ्ल्यूएन्झा यांविरूद्ध लस तयार करण्यात यश मिळूनही नवीन प्रकारचे विषाणू तयार होत गेल्याने या लसींचा वापर निरुपयोगी ठरत गेला आहे. एड्ससारख्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात अद्यापही यश आलेले नाही.विषाणूंमुळे काही वेगवेगळी लक्षणे जरूर दिसतात, पण मुख्य लक्षण राहते, ते म्हणजे ताप. विषाणूंच्या आजाराबाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे दहापैकी नऊ रुग्ण आपोआप ठराविक काळाने बरे होऊ शकतात. गोवर, कांजण्या, कावीळ, गालगुंडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. सर्दी हे सुद्धा एक चांगले उदाहरण आहे. आठवडाभरात आपोआप नाहीशी होणारी ही दुखणी आहेत, केवळ म्हणूनच प्राणिजगत त्यांना तोंड देऊ शकत आहे.विषाणूंची कृत्रिम पैदास करण्याची पद्धत मोठी कुतूहलजन्य असते. कोंबडीच्या अंड्यातील एम्ब्रिओ वा सूक्ष्म जीवात हे विषाणु टोचून त्यांची पैदास तेथे घडवली जाते. त्यातून लस निर्माण करायला पुरेसे विषाणू मिळवतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले ?२) राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणाच्या शिफारशीच्या ठरावाची गरज असते ?३) आग्रा येथील प्रसिध्द असलेला पदार्थ कोणता ?४) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?५) गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) उमाजी नाईक २) राज्य मंत्रिमंडळ ३) पेठा ४) कुशाण ५) जातक कथा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामप्रसाद वाघ👤 साईनाथ कानगुलवार, येवती👤 सचिन बावणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाप आणि पुण्य कशाने होते या विषयी आपल्याला पूर्णपणे माहीती असताना सुद्धा आपण नको त्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असतो.निदान या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून सुंदर अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, इतरांचे चांगले केल्याने जरी त्यांना विसर पडत असेल तरी निसर्ग कुठेतरी बघत असतो व नको ते कार्य केल्याने लपवून ठेवल्यानेही ते कधीच लपत नाही असे अनेकदा ऐकण्यात आले आहे. म्हणून व्यर्थ विचार करणे सोडून द्यावे व सत्य काय आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा*गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या.सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा येत होती, कारण त्यामुळे त्याची आर्थिक स्थितीही मजबूत होत होती. काही दिवसांपासून गोपाळला काळजी वाटू लागली होती, कारण त्याच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या मांजरीने त्याचे डोळे गोठवले होते. गोपाळ जेव्हा केव्हा किचनमध्ये दूध ठेवायचा तेव्हा तो निवांत होता. मांजर दूध प्यायचे आणि त्यांना खोटेही ठरवायचे. गोपालने मांजराचा अनेकवेळा पाठलाग करून तिला मारण्यासाठी धाव घेतली, पण मांजर पटकन भिंतीवर चढून पळून गेले. एके दिवशी गोपाल अस्वस्थ झाला आणि त्याने मांजरीला धडा शिकवण्याचा विचार केला. तागाच्या पोत्याचे जाळे टाकले होते, ज्यात मांजर सहज अडकले. आता काय, गोपाळला आधी काठीने मारहाण करण्याचा विचार आला. मांजर इतक्या जोरात म्याव करत होती की गोपाल तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता. पण आज धडा शिकवण्यासाठी गोपाळने माचीसची काठी पेटवली आणि गोणीवर फेकली. गोणी पेटू लागताच मांजर सर्व शक्तीनिशी पळू लागली. मांजर जिकडे तिकडे पळत असे, जळणारी पोती पाठीमागून गेली. काही वेळातच मांजर संपूर्ण गावात पळाली. संपूर्ण गावात आगीचा भडका उडाला…………….. आग लागली, विझवा…….या प्रकाराचा आवाज उठू लागला. मांजराने संपूर्ण गाव जाळले. गोपाळचे घरही वाचले नाही.निष्कर्ष - आवेग आणि स्वतःच्या चुकीचे परिणाम एखाद्याला भोगावे लागतात आणि त्याची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पर्यटन दिन_* *_ या वर्षातील २७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.**१९६१:सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.**१९४०:दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.**१९२५:डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.**१८२१:मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: प्राजक्ता लालासाहेब शिंदे- कवयित्री* *१९९४:विशाल विकासराव कुलट- कवी,लेखक**१९८१:लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू**१९८१:ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू**१९७९:सचित पाटील--भारतीय अभिनेता,दिग्दर्शक,लेखक आणि नाट्य दिग्दर्शक**१९७६:विभा नरेंद्र विंचूरकर -- कवयित्री* *१९६८:राहुल देव-- भारतीय अभिनेता**१९६३:धनंजय सरदेशपांडे-- लेखक* *१९६२: मनोहर शार्दुल विभांडिक -- लेखक कवी* *१९६०:प्रा.अरुण सांगोळे -- कवी,गीतकार* *१९५९:मुकुल बाळकृष्ण वासनिक-- माजी केंद्रीय मंत्री**१९५७ प्रा.जोतीराम कृष्णराव पवार -- लेखक* *१९४७:प्रा.हेमंत जयवंत घोरपडे-- प्रसिद्ध लेखक* *१९४६:रवी चोप्रा-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक (१२ नोव्हेंबर २०१४)**१९४५:अनिल विष्णुपंत कुलकर्णी-- लेखक* *१९४४:निता प्रभाकरराव पुल्लीवार -- लेखिका* *१९३९:विजय हरी वाडेकर-- कादंबरीकार (मृत्यू:३ मार्च २०१४)**१९३५:डॉ.शंकर नागेश नवलगुंदकर--लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू**१९३२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू:२१ आक्टोबर २०१२)**१९०६:सुंदरराव भुजंगराव मानकर-- नाटककार,वृत्तपत्रकार(मृत्यू:१८ एप्रिल १९४६)**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१२ मार्च १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कविता महाजन-- भारतीय लेखिका आणि अनुवादक(जन्म :५ सप्टेंबर १९६७)**२००८:महेन्द्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक (जन्म:९ जानेवारी १९३४ )**२००४:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म:८ फेब्रुवारी १९२५)**१९९९:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म:२६ डिसेंबर १९३५)**१९९२:अनुताई वाघ – समाजसेविका,शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १७ मार्च १९१०)**१९८७:भीमराव बळवंत कुलकर्णी-- मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक,वक्ते,समीक्षक (जन्म:४ नोव्हेंबर १९३२)**१९७५:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)**१९७२:एस.आर.रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)**१९२९:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,विद्वान,वक्ते,लेखक,व पत्रकार (जन्म:२७ जून १८६४)**१८३३:राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक,धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक(जन्म:२२ मे १७७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची**पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती*श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.टीप - उद्या अनंत चतुर्दशी अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे. आपल्या माहितीला येथेच पूर्णविराम देत आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं संकट, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांचा दाव्यामुळे चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, कांदा प्रश्नी अजित पवारांचा बैठकीतूनच मंत्री पियुष गोयलांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत पावसाची दाणादाण, गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये घुसले पाणी; नागरिकांचे प्रचंड हाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण; घोडेस्वार टीमने 41 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज राजकोट मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁*********************** डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात.पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते.माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल.मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'. काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी.रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच.दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते.जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हालाप्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) वनस्पतींचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मूळ ५) o रक्तगट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, नाशिक👤 सद्दाम दावनगीरकर, देगलूर👤 नरेश केशववार, धर्माबाद👤 अनिल आर्य माकने, धर्माबाद👤 अजित कड, साहित्यिक, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाज म्हटलं की, त्यात श्रीमंत गरीब, श्रेष्ठ, कनिष्ठ या प्रकारची रचना नेहमीच बघायला मिळत असते. श्रीमंत माणसं धनधान्यांने संपन्न असतात तर त्यात काही माणसं गरीब सुद्धा असतात. आपण गरीब आहोत म्हणून स्वतःला कमी लेखू नये व श्रीमंत आहोत म्हणून माजू नये.गरीब माणसं देखील आपल्या गुण कर्तुत्वाने श्रीमंत होवू शकतात .असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी स्वबळावर श्रीमंती गाठलेली आहे. म्हणून स्वतःही दु:खी राहू नये व कोणाला कमी लेखू नये सदैव समाधानी रहावे. कारण समाधान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःचे नुकसान*शहरात एक छोटंसं दुकान, त्यात काही चिप्स, पापड, टॉफी, बिस्किटे वगैरे विकायची. हे दुकान अब्दुल मियाँ यांचे होते. त्यांची अवस्था सर्वांना माहीत होती, म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्या इच्छेविरुद्धही अशा गोष्टी घ्यायचे. जेणेकरून अब्दुल मियाँ काही पैसे कमवू शकतील. दुकानात उंदरांनीही आपला तळ ठोकला होता. दुकानात एकापेक्षा एक खोडकर उंदीर घुसले होते. उंदरांनी टॉफी आणि बिस्किटांचे नुकसान करण्यास सुरुवात केली होती. अब्दुल खूप अस्वस्थ झाला होता, त्याला समजत नव्हते की तो या खोडसाळपणापासून कसा वाचेल. एकदा तर अब्दुल बसला होता आणि तीन-चार उंदीर एकमेकांशी भांडत होते. अब्दुलला राग आला आणि त्याने एक काठी त्या उंदरांकडे फेकली. उंदीर उड्या मारून धावले, पण काठी इतक्या वेगाने उडाली की टॉफी असलेली काचेची भांडी फुटली. असे केल्याने आणखी नुकसान झाले.निष्कर्ष – रागाच्या भरात कोणतेही काम करू नये, ते स्वतःसाठी हानिकारक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८४:युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.**१९७३:ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.**१९६०:फिडेल कॅस्ट्रोने यु.एस.एस.आर.ला पाठिंबा जाहीर केला.**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:सेरेना विल्यम्स –अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९७८:समीर धर्माधिकारी-- मराठी चित्रपट अभिनेते**१९७१:प्रा.डॉ.केशव तुपे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा सहसंचालक उच्च शिक्षण, अमरावती* *१९६२:एकनाथ बडवाईक--कवी**१९६२:चंकी पांडे -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९६१:चंद्रकांत महादेव चितळे--कथाकार, कवी**१९६०:विद्यालंकार विनायक घारपुरे-- लेखक* *१९४८:डॉ.माधवी वैद्य -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३:इयान चॅपेल –ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कप्तान**१९४०:योहाना शाहू गायकवाड-- लेखक* *१९३९:दिवाकर दत्तात्रय गंधे-- मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक(मृत्यू:१मार्च २०१९)**१९३६: वैजयंती वामन काळे -- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार**१९३२:डॉ.मनमोहन सिंग – भारताचे १३ वे माजी पंतप्रधान,अर्थतज्ञ**१९३१:श्याम त्रिंबक फडके --प्रसिद्ध नाटककार**१९३१:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)**१९२३:देव आनंद – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:३ डिसेंबर २०११)**१९२०:अनंत दामोदर आठवले(स्वामी वरदानंद भारती)--आयुर्वेदतज्ज्ञ, लेखक, ग्रंथकार,कीर्तनकार(मृत्यू:५ सप्टेंबर २००२)**१८९४:आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू:१० डिसेंबर १९५५)**१८८८:टी.एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी,नाटककार,टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ जानेवारी १९६५)**१८५८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू:१० आक्टोबर १८९८)**१८४९:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९३६)**१८२०:इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू:२९ जुलै १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:डॉ.रामचंद्र देखणे--लोककला,संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार(जन्म:१२ एप्रिल १९५६)**२००८:पॉल न्यूमन –अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म:२६ जानेवारी १९२५)**२००२:राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म:२१ आक्टोबर १९१७)**१९९६:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म:४ जानेवारी १९२४)**१९८९:हेमंतकुमार – गायक,संगीतकार आणि निर्माता (जन्म:१६ जून १९२०)**१९७७:उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)(जन्म:८ डिसेंबर १९००)**१९५६:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक(जन्म:२० जून १८६९)**१९०२:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म:२६ फेब्रुवारी १८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*... पालीचा बल्लाळेश्वर ....पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती.पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.पुढील भागात - दगडूशेठ हलवाई गणपती, पुणेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी, भारतीय वायूदलाचा 'नवा योद्धा'; सी-295 विमान वायू दलात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण भागातील जनतेनं सुद्धा करून दाखवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय मी तरी मान्य करणार, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटमध्ये भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेला नमवत गोल्ड मेडल जिंकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, 1 ते 7 नोव्हेंबरला पुण्यात शड्डूचा आवाज घुमणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्यांनी नियमित सॅलड खावे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा अभंग कोणी म्हटले आहे ?२) भारताने नुकतेच कोणत्या देशातील नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे ?३) जगात सर्वाधिक तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) लोकसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ? *उत्तरे :-* १) संत तुकाराम महाराज २) कॅनडा ३) भारत ४) २५ वर्षे ५) तुळस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड👤 अजय मिसाळे👤 श्री दासरवार👤 सोनाजी बनकर👤 विश्वनाथ होले👤 विक्की खटके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा॥ स्वये नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काजळ आणि काळीज जरी वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. काजळ जरी काळा रंगाचा दिसत असेल तरी आपले सौदर्य खुलून दिसण्यासाठी मदत करत असते. कारण त्याची आपण मोठ्या काळजाने निवड करत असतो. तसंच एखाद्या व्यक्तीला सुद्धा मदत करण्यासाठी आपले काळीज मोठे असावे लागते. म्हणून त्यांच्या रूपाकडे बघून त्यांना तुच्छ न लेखता त्यांच्यात असलेल्या खऱ्या गुणाची कदर करता आली पाहिजे. त्यासाठीही आपले काळीज मोठे असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*..... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले आहे. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्या लोकांनी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले.अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४१:’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.**१९२९:डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण,प्रवास व लँडींग केले.**१९१९:रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.**१९१५:पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७२:राहुल शर्मा-- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि भारतीय शास्त्रीय संतूर वादक**१९६९:हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू:१ जून २००२)**१९६९:प्रा डॉ.संजय पांडुरंग नगरकर-- मराठी साहित्यिक**१९६८:मंगला शिरीष रामपुरे-- कवयित्री* *१९६६:केदार कृष्णाजी गाडगीळ-- लेखक* *१९६१:सरोज संजय अंदनकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६०:अमिता खोपकर-- मराठी भाषेतील रंगमंच,चित्रपट आणि टेलिव्हिजनशी संबंधित असलेली एक भारतीय अभिनेत्री**१९५७:उज्ज्वला सदानंद अंधारे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५३:सुरेंद्रपाल सिंग -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता**१९४६:सुभाष सुठणकर -- प्रसिद्ध विनोदी कथालेखक**१९४६:बिशन सिंग बेदी – भारतीय फिरकी गोलंदाज**१९३९:फिरोज खान-- भारतीय अभिनेता, चित्रपट संपादक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:२७ एप्रिल २००९)* *१९३१:बिंदुमाधव जोशी-- अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक (मृत्यू:१० मे २०१५)**१९२८:माधव गडकरी –पत्रकार (मृत्यू:१ जून २००६)**१९२६:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (मृत्यू:३० जून १९९४)**१९२५:रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार(मृत्यू:२० जुलै १९९४)* *१९२२:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू:१७ जानेवारी १९७१)**१९२०:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू:३ जानेवारी २००२)**१९१६:पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू:११ फेब्रुवारी १९६८)**१९१५:रघुनाथ विनायक हेरवाडकर--बखर वाङ्मयाचे अभ्यासक**१९०८:नरहर शेषराव पोहनेरकर--कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)* *१८९९:नरहर गंगाधर आपटे --ग्रामकोशकार, ग्रामोदार चळवळीचे पुरस्कर्ते,लेखक**१८८१:गोपाळ गंगाधर लिमये-- मराठी कथाकार आणि विनोदकार. ‘ कॅ.गो.गं.लिमये’ ह्या नावाने लेखन.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १९७१)**१८६४:गोपाळ नारायण अक्षीकर--सामाजिक कार्यकर्ते,संस्थापक(मृत्यू:१६ मार्च १९१७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:एस.पी. बालसुब्रमण्यम तमिळ, तेलुगु, कानडी,मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक कोविड मुळे निधन(जन्म:४ जून १९४६)**२०१७:अरुण साधू-- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१७ जून १९४१)**२०१३:शं.ना.नवरे – लेखक (जन्म:२१ नोव्हेंबर १९२७)**२००४:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म:१ नोव्हेंबर १९३२)**१९९८:कमलाकर सारंग – रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक व लेखक (जन्म:२९ जून १९३४)**१९२७:कृष्णाजी केशव गोखले--कथाकार, कादंबरीकार(जन्म:१८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*...महाडचा वरद विनायक ...महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते.या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.पुढील भागात - पालीचा बल्लाळेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2047 पर्यंत भारताचा चेहरा-मोहरा बदलणार, मध्यमवर्गीय लोकसंख्येत होणार मोठी वाढ, बिझनेस टुडे मासिकाच्या अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन, त्यात राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पद गेलं तरी बेहत्तर आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बनावट शिधापत्रिका बनावणाऱ्या तिघांना अटक, ठाणे जिल्ह्यात एटीएसची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गंगापूर धरणातून 3408 क्युसेकने विसर्ग; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नाशिकसह जिल्ह्यात पावसाची पुन्हा विश्रांती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयस-गिलची शतके, भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा 'मॅक्झिम गार्की' असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?२) जगात सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ कोणत्या देशातील लोक घालवतात ?३) संसदेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेने कोणते विधेयक प्रचंड बहुमताने पारित केले ?४) राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून अन्न मिळवणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) फिलिपाईन्स ( ४ तास ६ मिनिटे ) ३) नारीशक्ती वंदन विधेयक ४) ३० वर्षे ५) विघटक ( Decomposers )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग बासरवाड👤 रामकिशन अंगरोड👤 संघरत्न लोखंडे👤 महेंद्रकुमार कुदाळे👤 सय्यद जाफर👤 कमलकिशोर कांबळे👤 शिवशंकर नर्तावार👤 तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड👤 योगेश धनेवार👤 सुयश पेटेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷कु.पिंगला के.मुंगणकरउर्फ सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक बकरी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला ती बकरी समजली. हे लोक तिच्या मुलाला घेऊन जात आहेत. शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम मुलाला घेऊन खूप दूर गेला. मूलही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती बकरी जीव घेऊन सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि बकरीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन अब्दुल परतला. अब्दुल परत आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याला ज्या बकऱ्या विकायच्या होत्या त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८३:’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९०८:कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५:आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३:महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६:अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:रवींद्र सीताराम कानडजे --लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे-- कवी* *१९७१:अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८:रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी लेखक**१९६७:डॉ.सुजाता शेणई-- लेखिका, संपादिका* *१९६५:अलका कुबल(आठल्ये)-- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४:विठ्ठल रामभाऊ कुलट-- प्रसिद्ध कवी, लेखक,संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६:प्रा.डॉ.ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३:विवेक कृष्णाजी घळसासी-- सुप्रसिद्ध विचारवंत,वक्ते,कवी,लेखक,ज्येष्ठ निरुपणकार**१९५२:प्रा.डॉ.रोहिणी केतकर-- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२:अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू**१९५०:डॉ.अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,लेखक**१९४३:तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा - चित्रपट अभिनेत्री**१९४३:रा.सू.बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू:१७ एप्रिल २०२०)**१९४१:प्राचार्य योगानंद वासुदेव काळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३५:प्रेम चोप्रा --हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे-- लेखिका* *१९३४:चिंतामण शंकर जोशी-- कादंबरीकार कथाकार* *१९३३:रघुनाथ माधव पाटील(कवी आरेम)--कवी, लेखक* *१९२०:प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू:६ नोव्हेंबर १९८७)**१९१९:देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)**१९१८:पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक(मृत्यू:१९९९)**१९१५:राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू:२९ जुलै १९६६)**१९०८:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू:२४ एप्रिल १९७४)**१९०३:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)**१९०३:शंकर धोंडो क्षीरसागर(मामा क्षीरसागर)-- संस्थापक,विचारवंत(मृत्यू:६ एप्रिल १९८१)**१८६१:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८कल्पना लाजमी--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता(जन्म:३१ मे १९५४)**२०१४:शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म:१५ जून १९२८)**२०१२:कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म:१९२४)**२००४:डॉ.राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म:२८ जानेवारी १९२५)**१९८७:राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:६ जून १९१९)**१९६४:भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म:२७ एप्रिल १८८३)**१९३९:सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म:६ मे १८५६)**१८८२:फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:३१ जुलै १८००)**१८७०:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार,इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)**१८५८:ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*... लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज ...अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज होय. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नांव मिळाले.कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *1 ऑक्टोबरला जुन्नरमध्ये भव्य आदिवासी मेळाव्याचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात येत असलेल्या तीन विभागांच्या भरती प्रक्रियेमधून 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला; अमेरिकेनं बाजू काढली, भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान; पहिल्या दिवशी 42 लाख रु. दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वचषकाआधीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो. आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिने फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेह मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेपच्यून ग्रहाचा शोध केव्हा लागला ?२) पंतप्रधान होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) अन्नासाठी वनस्पती व प्राणी या दोघांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?४) पंचायतराज व्यवस्थेत ३३टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते ?५) जगात सर्वात कमी घटस्फोट कोणत्या देशात होतात ? *उत्तरे :-* १) २३ सप्टेंबर १८४५ २) २५ वर्षे ३) मिश्रहारी प्राणी ( Omnivorous ) ४) महाराष्ट्र ५) भारत ( १ टक्के )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश येवतीकर, बँक अधिकारी, MGB औरंगाबाद👤 रवींद्र जवादे, साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने, शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर, शिक्षिका, नाशिक👤 विशाल मनवर, यवतमाळ👤 विना खानविलकर, पुणे👤 प्रदीप माळगे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असतात तसेच त्यांचे काम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे,की निंदा करणे,लावालावी करणे, कटकारस्थान रचने व आपण मस्त पैकी मज्जा बघत राहणे ... पण, ते, जसे करतात तसे आपण कधीही करू नये. कारण इतरांचे वाईट केल्याने आपले कधीच भले होत नाही व स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करून मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते त्याची किंमत कोणी मोजू शकत नाही म्हणून आपल्यात चांगले विचार ठेवून चांगलेच कार्य करण्याचा प्रयत्न करत रहावे .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान जाहीर**१९९५:घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय**१९९५:श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.**१९८२:कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९३१:नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.**१८८८:’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१६६०:शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.**१४९९:बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रा.डॉ.रवींद्र बैजनाथराव बेम्बरे-- लेखक* *१९७२:प्रा.दीपककुमार खोब्रागडे -- लेखक, कवी,विचारवंत**१९७१:रवी(रवींद्र) जाधव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९६७:संजय इंगळे तिगावकर-- प्रसिद्ध कवी**१९६६:राजकुमार (राजू)बांते-- पत्रकार,संघटक* *१९५७: चारुदत्त माधव बागुल-- लेखक* *१९५६:रंजिता'रॉबी' कौर-- भारतीय अभिनेत्री**१९५३:अनंत भाऊदेव काळे --- निवेदक, प्रकाशक,साहित्यिक,संकलक व संग्राहक(मृत्यू ३०मे २०२२)* *१९४०:दीनानाथ मनोहर-- मराठी कादंबरी व कथाकार**१९३३:ताराबाई सावंगीकर-- लेखिका ( मृत्यू:१९ फेब्रुवारी २००६)* *१९२५:ललिता सुधीर फडके -- मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपटगीते गाणाऱ्या गायिका(मृत्यू:२५ मे २०१०)**१९१९:डॉ विनायक गो. दुर्गे -- कवी लेखक* *१९१५:अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ९ मे १९९५)**१९१४: गोविंद शंकर उपाख्य बाबुराव हरदास-- लेखक,कवी (मृत्यू:२५ जुलै २०१०)* *१९०९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)**_१८८७:कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ,बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू:९ मे १९५९)_**१८६९:व्ही.एस.श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू:१७ एप्रिल १९४६)**१७९१:मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:डॉ.भाऊ लोखंडे-- सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,आंबेडकरवादी विचारवंत(जन्म:१५ जून १९४२)**२०११:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)**१९९४:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म:६ एप्रिल १९०९)**१९७०:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म:३० मार्च १८९९)**१९९१:दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(जन्म:१४ जानेवारी १९०५)**१९५६:फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)**१५३९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*... ओझरचा विघ्नेश्वर ...अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. सर्व राक्षसानी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले असे बोलले जाते.आख्यायिका - राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घटीची शक्यता; कृषी विभागाचा सरकारला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पिकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणरायाच्या पाठोपाठ सोन्याच्या पावलांनी गौराई आली, आज गौरी पूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरक्षणमिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महिंद्रा ग्रुपचा धक्कादायक निर्णय, कॅनडातील सर्व व्यवसाय बंद केला, शेअर बाजारात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *रेल्वे इंजिन* 🚂माणसाच्या पाहण्यातले, रोज दिसू शकणारे, सर्वात अजस्र असे धूड म्हणजे रेल्वे इंजिन. अन्य इंजिने सहसा त्यापेक्षा लहानच असतात. धडाडत जाणाऱ्या गाडीच्या इंजिनाची कर्कश शिट्टी पहाटेच्या थंडीत कित्येक मैल लांब ऐकु जाते, तर इंजिनाच्या दिव्याचा सर्चलाईट अंधार फाडत सहज अर्धा किलोमीटर लांबपर्यंत पोहोचतो. या धुडाची, त्याच्या आकाराची, ताकदीची कल्पना असावी, म्हणून रेल्वेनेच एक चित्र काढले होते. . . मालाने भरलेला, रेल्वेरूळ ओलांडणारा ट्रक व भलेमोठे इंजिना त्याच्या रोखाने येताना - दोन्हींच्या आकारांतील तफावत बघणाऱ्याला सहज जाणवणारी. मथळा होता -'You are no match with me.' जेम्स वॅट, जॉर्ज स्टीव्हन्सन, गर्नी ट्रेव्हिथीक यांचा रेल्वे इंजिन निर्माण करण्यात मोठाच वाटा आहे. रेल्वे इंजिन म्हणजे वाफेचे, हे समीकरण कित्येक वर्षे भारतीयांच्या मनात कायम होते. १९६० सालच्या दशकापर्यंत तर जवळजवळ सर्वच इंजिने वाफेची होती. जेमतेम पाचएकशे किलोमीटरचा विजेचा मार्ग सोडला, तर वाफेच्या इंजिनांचे राज्य त्या काळात अबाधित होते. कोळशाची राख, धूर खर्च यांमुळे त्यांचा वापर थांबवला गेला.ज्या मार्गावर विजेच्या तारा घातल्या होत्या, तेथे इलेक्ट्रिक इंजिने वापरायला सुरुवात झाली. पुणे मुंबई या मार्गाचे विद्युतीकरण १९२७ साली झाले होते. पण आता अन्य काही मोठ्या मार्गांचेही विद्युतीकरण झाले आहे. संपूर्ण मार्गावर डोक्यावरून जाणाऱ्या तारांतून वीजपुरवठा या इंजिनांना केला जातो. हा वीजपुरवठा डी.सी. वा डायरेक्ट करंट प्रकारचा असतो. एका तारेतुन वीज घेतली जाते व रुळातून तिचे सर्किट पूर्ण होते. या इंजिनांची ताकद भरपूर असते, आकार अवाढव्य नसतो. त्यांना इंधन वाहून न्यावे लागत नाही. त्यांना वेगळे इंजिन लागत नाही तर फक्त विजेच्या मोटर्स यामध्ये काम करतात, वेगही भरपूर असतो. पंचाईत फक्त विद्युतीकरणाची. त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असतो.यातुन मध्यममार्ग काढण्यासाठी डिझेल इंजिनांची निर्मिती व वापर सुरू झाला. डिझेल इंजिन लांबीला खूपच लांब असते. मुख्यतः अवजड डिझेल इंजिन व त्यासाठी लागणारा डिझेल तेलाचा मोठा साठा हा त्याचा महत्त्वाचा भाग. डिझेल इंजिनावर जनरेटरमधून वीज निर्माण केली जाते. या विजेचा पुरवठा मागच्या चाकांमध्ये बसवलेल्या विजेच्या मोटारींना केला जाऊन हे इंजिन गाडी खेचते. या इंजिनांची ताकद अफाट असते. त्यांच्या तेलावर होणारा खर्च व पूर्ण ताकद वापरण्यासाठी लांबलचक गाड्या जोडल्या जातात. तसेच या गाड्या शक्यतो दूर अंतरावरच्या, न थांबता पोहोचणाऱ्या असणे आवश्यक धरले जाते. इंजिनाची पूर्ण कार्यक्षमता वापरण्यासाठी ही काळजी घ्यावी लागते.वाफेचे इंजिन पूर्वी आठ डब्यांची गाडी ओढत असे. विजेचे इंजिन बारा डब्यांची गाडी नेते. तर डिझेल इंजिनाला बावीस डबेसुद्धा जोडले जाऊ शकतात. मालगाड्यांत त्याहून जास्त म्हणजे १०० पर्यंत डबे असतात. यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येईल. त्या इंजिनांचा वेगही सहज ताशी एकशेतीस किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. बिनइंजिनांची लोकल गाडी म्हणजे तीन डब्यांचा एक रेक असलेले इलेक्ट्रिक मॅकेनिकल युनिट (EMU) असे म्हटले जाते. या प्रत्येक रेकमध्ये एक विजेचे इंजिन म्हणजे मोटारचा सेट काम करतो. असे तीन रेक एकत्र करून एक लोकलगाडी बनते व सर्व रेकचे नियंत्रण पुढुन केले जाते. या गाड्यांना छोट्या छोट्या अनेक इंजिनांमुळे झटकन वेग घेता येतो वा कमी करता येतो. त्यामुळे वाहतूक झटपट होते, हे महत्त्वाचे. पूर्ण वेगाने स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दुसऱ्या टोकाला जाऊन थांबू शकते, पण रेल्वे इंजिनाची गाडी पूर्ण वेगात असल्यास थांबायला किमान एक किलोमीटर अंतर लागते. मॅग्नेटिक लेव्हिएशन मोनोरेल हाही एक प्रकार आता वापरात आला आहे.अत्यंत वेगाने धावणारी हायस्पीड इंजिने आपल्या देशात बनत नाहीत, वापरात नाहीत. त्यांना सोयीचे असे रेल्वेरूळ आपल्या इथे घातलेले नाहीत. जगात चीन, फ्रान्स, जपान, स्वीडन या देशात अत्यंत वेगवान गाड्या धावतात. काहींचा वेग साडेतीनशे साडेचारशे किलोमीटरच्या दरम्यान असतो. त्यांच्यासाठी बहुतेक विजेची इंजिनेच वापरली जातात. भुयारी रेल्वेमध्ये विजेची इंजिने वापरतात व त्यांना वीजपुरवठा तिसऱ्या, मध्यभागी टाकलेल्या वेगळ्या रुळांतून करण्याची पद्धत आहे. इंजिनांचे वेग वाढत गेले, तसतसे त्यांचे पारंपरिक आकारही बदलत जाऊन एरोडायनॅमिक आकार अाहेत. वाऱ्याचे कमीत कमी घर्षण कसे होईल, याचा विचार या आकारात केला गेला आहे. भारतातील रेल्वे इंजिने बनवण्याचा एकमेव कारखाना चित्तरंजन येथे आहे.चित्तरंजनच्या कारखान्यात शक्तिशाली असे ५००० अश्वशक्तीचे इंजिन बनवले गेले असून त्याचे नाव 'अशोक' ठेवले गेले आहे. २६ डब्यांची गाडी कमाल १४० किलोमीटर वेगाने हे इंजिन नेऊ शकेल. 'राजधानी एक्स्प्रेस'साठी त्याचा वापर १९९४ सालात सुरू झाला आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोरेश्वर नावाचा गणपती कोठे आहे ? २) थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?३) सिद्धिविनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) दहा हात असलेल्या गणपतीचे नाव काय आहे ?५) अष्टविनायक मध्ये सर्वात श्रीमंत गणपती कोणता ?उत्तरे :- १) मोरगाव २) चिंतामणी ३) अहमदनगर ४) महागणपती ५) ओझरचा विघ्नेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आनंद पा. दुड्डे, चिकनेकर👤 श्याम सुरने, धर्माबाद👤 सुनील फाळके, बिलोली👤 खंडोबा खांडरे, करखेली👤 गंगाधर चिटमलवार, शिक्षक, देगलूर👤 सागर गडमोड, तुळजापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना, काहीतरी तरी लहान, मोठे सुप्त गुण दडलेले असतात काहींच्या सुप्त गुणांना व त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना दिशा मिळत असते तर काही जणांमध्ये कलागुण असताना सुद्धा परिस्थिती, अडचणींमुळे सुप्त गुणांना वाव मिळत नसतो. अशा सुप्त गुणांना व कलागुणांना ओळखून त्यांना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे.जी व्यक्ती इतरांच्या कलागुणांची कदर करून आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन व सहकार्य करते ती व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून आपणही इतरांतील कलागुणांची कदर करावे व त्यांना योग्य दिशा दाखवावे.कारण दिशा दाखवणे हा सुद्धा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धैर्याचा परिचय*सुंदर हरणे जंगलात राहत असत. त्यात सुरिली नावाचा डोई होता. त्यांची मुलगी मृगनैनी अवघ्या पाच महिन्यांची होती. मृगनैनी आईसोबत जंगलात फिरत असे. एके दिवशी मृगनैनी तिच्या आईसोबत चालत असताना दोन कोल्हे आले. त्याला मृग्नैनीला मारून खायचे होते. सुरिली दोन्ही कोल्ह्यांना शिंगांनी मारून थांबवत होती. पण कोल्हे मान्य करायला तयार नव्हते. तेवढ्यात तिथे हरणांचा कळप आला. हरिण कोल्हाच्या मागे धावू लागले. कोल्हा प्राण घेऊन तेथून पळून गेला. सुरिली आणि मृगनाईचे प्राण आज तिच्या कुटुंबीयांनी वाचवले.नैतिक – एकत्र राहून सर्वात मोठ्या आव्हानावर मात करता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_**_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४:ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१:’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६:सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१:बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८:रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५:गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४:माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४:’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२:अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८०:करीना कपूर – अभिनेत्री**१९७९:ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८:डॉ.सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री,लेखिका* *१९५४:डॉ.मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१:अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३:डॉ.शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक,लेखक* *१९३९:लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,कथाकार, कादंबरीकार**१९३९:सुलभा श्रीराम सरदेसाई-- लेखिका**१९३४:अनंत मिराशी-- मराठी नाट्यअभिनेते (मृत्यू:१३ जून २०२०)**१९३१:सिंगीतम श्रीनिवास राव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,निर्माता,संगीतकार आणि अभिनेता**१९२९:पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक,संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)**१९२६:डॉ.सुरेश डोळके--धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक( मृत्यू:२७ जानेवारी २००८)* *१९२६:’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू:२३ डिसेंबर २०००)**१९२५:गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू:३१ जानेवारी १९९६)**१९२१:बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर-- लेखक**१९१२:केशव हरी बोरगावकर-- लेखक संपादक**१९०८:दादासाहेब पोहनेरकर-- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)**१८६६:एच.जी.वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म:१७ डिसेंबर १९२४)**१९९९:पुरुषोत्तम दारव्हेकर-- सुप्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,दिग्दर्शक,कवी (जन्म:१ जून १९२६)**१९९८:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म:२१ डिसेंबर १९५९)**१९९२:ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म:१० मे १९१४)**१९८२:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म:२१ जून १९२३)**१७४३:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*.... रांजणगावचा महागणपती .....अष्टविनायकांपैकी रांजणगावचा महागणपती हा चौथा गणपती. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.उद्याच्या भागात - ओझरचा विघ्नेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, सोनिया गांधी देखील चर्चेत सहभागी, विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, रोहित पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणार अनावरण, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना दिला निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एशियन गेम्स 2023 स्पर्धेला दिमाखात सुरुवात, भारताच्या एकूण 655 खेळाडूंना घेतला सहभाग. यात 328 महिला आणि 325 खेळाडूंचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* 📕खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस* केव्हा साजरा केला जातो ?२) राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?४) स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोणाला संबोधले जाते ?५) गणिताचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) २१ सप्टेंबर २) ३५ वर्षे ३) शाकाहारी प्राणी ( Herbivores ) ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) आर्किमिडीज, युनानी इंजिनियर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलल्या प्रमाणे दिलेला शब्द पाळला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.दिलेला शब्द जर पाळला गेला नाही तर त्या व्यक्तीने विश्वास गमाविला असा अर्थ गृहीत धरून दुसऱ्यांदा त्या व्यक्तीवर ती व्यक्ती विश्वास करणे होत नाही.म्हणून आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे. नाही तर विश्वास आपोआप उडून जातो. कारण विश्वास अशी एक गोष्ट आहे की, तो फक्त एकदाच करता येते म्हणून कोणालाही शब्द देताना पाळण्याची आठवण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची महत्वाची जबाबदारी आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चिंटू पिंटूचा खोडसाळपणा*चिंटू-पिंटू दोघे भाऊ होते, दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असेल. दोघेही खूप खोडसाळपणा करायचे. चिंटू जास्तच खोडकर होता. तो पिंटूची सोंड त्याच्या खोडात गुंडाळून ओढायचा आणि कधी ढकलून टाकायचा. एके काळी दोघेही खेळात मारामारी करत होते. चिंटूचा पाय घसरला, तो खड्ड्यात पडला. पिंटू त्याच्या सोंडेने ते वर काढायचा प्रयत्न करायचा. पण त्याचा प्रयत्न फसला. पिंटू धावतच आईला बोलावतो. त्याची आई चिंटूला तिच्या लांब सोंडेत गुंडाळून जमिनीवर आणते. चिंटूच्या खोडसाळपणाने आज त्याच्या अंगावर काटा आणला होता. तो रडत म्हणाला – मी आतापासून खोडसाळपणा करणार नाही. दोन्ही भाऊ खेळू लागले, हे देऊन आईला खूप आनंद झाला.नैतिक – जास्त खोडकरपणा आणि इतरांना त्रास देण्याची सवय नेहमीच आपत्ती बनते.चिंटू खूप प्रयत्न करतो पण तरीही तो बाहेर पडू शकत नाही. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.**२००२:चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.**१९९९:साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर**१९९७:महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.**१९६२:बुरुंडी, जमैका, र्वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९४८:निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.**१९४७:अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. ए.(CIA) ची स्थापना.**१९२७:महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना**१९२४:गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.**१९१९:हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.**१८८५:कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या**१८१०:चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:मनीषा रायजादे पाटील-- कवयित्री* *१९५६:छगन चौगुले -- मराठी लोकगीत गायक(मृत्यू:२१ मे २०२०)* *१९५३: डॉ.जयश्री रत्नाकर पाटणकर -- कवयित्री,लेखिका* *१९५०:रामचंद्र सडेकर-- मराठी कथालेखक, कादंबरीकार,पटकथा लेखक आणि प्रकाशक**१९४८:अनुराधा महादेव फाटक--बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या लेखिका**१९४७: सुधाकर गायधनी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध महाकवी,लेखक**१९४५:अशोक मनोहर भोले-- लेखक,कवी* *१९२०:भीमराव लक्ष्मीकांत परतूरकर-- जेष्ठ इतिहास संशोधक (मृत्यू:५ जानेवारी १९६८)* *१९१६:वसंतराव बलवंत अरगडे-- शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिणारे लेखक तथा पूर्व उपशिक्षणाधिकारी**१९१२:गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू:२१ फेब्रुवारी १९७५)**१९०६:प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.(मृत्यू:१८ सप्टेंबर १९९५ )**१९०५:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू:१५ एप्रिल १९९०)**१९०२:सदाशिव विनायक देशपांडे-- चरित्रकार प्रवचनकार (मृत्यू:५ मे१९६९)**१९०२:दत्त रघुनाथ कवठेकर--कथाकार कादंबरीकार(मृत्यू:१६ ऑगस्ट १९७९)**१९००:शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू:१५ डिसेंबर १९८५)**१८८३:मदनलाल धिंग्रा-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक(मृत्यू:१७ ऑगस्ट १९०९)**१८५१:डाॅ.विष्णू गोपाळ आपटे-- वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक(मृत्यू:२९ जुलै, १८९९)**१७०९:सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:विद्याधर विष्णू चिपळूणकर-- महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक,जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म :१३ एप्रिल १९२९)* *२००४:डॉ.भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५)**२००२:शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार (जन्म:३१ ऑगस्ट १९४०)**१९९९:अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक(जन्म: ४ ऑक्टोबर, १९३३)**१९९५:प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)**१९९३:असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या**१९९२:मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ )**१७८३:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची : माहिती गणरायाची*थेऊरचा चिंतामणीअष्टविनायक गणपती मधील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी गणपती होय.थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे. येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो.ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहेपुढील भागात - सिद्धटेकचा सिद्धिविनायकसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव्या संसदेच्या वास्तूवर फडकवला तिरंगा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'एक मराठा, लाख मराठा'ने सांगली दुमदुमली; मराठा क्रांती मोर्चाचा लाखोंच्या उपस्थितीत अतिविराट मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊट! पाचव्या दिवशीही चकमक सुरू, दहशतवाद्यांचा होणार खात्मा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोहम्मद सिराजच्या दानशूरपणाला अख्ख्या श्रीलंकेचा सलाम, सामनावीर किताब आणि पुरस्काराचे पैसे ग्राऊंड्समनला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा आठवावा प्रताप, श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत आशिया चषकावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *भोपाळ दुर्घटना का झाली ?* 📕१९८५ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईड या कंपनीत वायूगळती झाली व त्यात ५००० लोक बळी पडले. कित्येक हजार लोक आजारी पडले. या घटनेविषयी, त्यानंतरच्या नुकसानभरपाईसाठीच्या आंदोलनाविषयी, तसेच न्यायालयातील साक्षीपुराव्यांविषयीही तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. भारतातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेविषयी सर्वांचे डोळे उघडणाऱ्या या दुर्घटनेविषयी माहिती घेऊ. भोपाळच्या कारखान्यात वायूगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट हा तो वायू. सामान्यपणे मिथाईल आयसोसायनेट द्रव अवस्थेत असते, पण तापमान ३१° सेंटीग्रेडच्या वर गेले तर मात्र हा द्रव वायूरूप होतो.पाणी व इतर अनेक द्रावणाशी मिथाईल आवसोसायनेट संयोग पावत असल्याने चांगल्या प्रकारे निष्क्रीय अशा परिस्थितीत तो साठवावा लागतो.मिथाईल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. हायड्रोजन सायनाईड व फॉस्जीन या विषारी वायूपेक्षाही तो जास्त विषारी आहे व त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात शरीरात गेला, तरीही गंभीर परिणाम होऊ शकतात.हा वायू त्वचा, डोळे व शरीरातील इतर आवरणांमध्ये दाह निर्माण करतो. वायू शरीरात गेल्यानंतर ४८ तासात मरणाऱ्या व्यक्तीमध्ये घशात जळजळ, असहय अशी डोळ्यांची जळजळ, छातीत वेदना व श्वसनाला खूप त्रास अशी लक्षणे दिसतात. फुफ्फुसाला सूज आल्याने मृत्यू येतो. ५-६ दिवसांत मरणाऱ्या व्यक्तींमध्ये स्नायूमध्ये शक्तिपात, लुळेपणा, झटके, कोमा ही लक्षणे दिसतात व मृत्यू मेंदूच्या सुजेमुळे होतो. गरोदर स्त्रियांमध्ये या वायूमुळे गर्भपात, अपेक्षित तारखेच्या आधी बाळंतपण व मृत बालकाचा जन्म अशा गोष्टी आढळून आल्या.रक्ताची रासायनिक तपासणी केल्यास त्यात मिथाईल आयसोसायनेट, सायनाईड आयन तसेच मोनोमेथीलामीन हे पदार्थ सापडले. यांच्यावरून सहजगत्या निदान होऊ शकते.या विषबाधेवरचे उपचार लक्षणानुरूप करावे लागतात. प्रतिजैविके, स्टेरॉईडस, डोळ्यांत औषधाचे थेंब व श्वसनासाठी प्राणवायू इ. उपायांचा यात समावेश होतो. अशी दुर्घटना होऊ न देणे, हाच उत्तम उपाय होय. त्यासाठी कारखान्यातील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यंत्रसामुग्री, रसायने साठवण्याचे टँकर, रसायने वाहून नेणाऱ्या नळ्या इत्यादींची देखभाल नीट केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन : श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरूडाइतके उडता येत नाही,म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या समुद्रयान मोहिमेसाठी कोणती पाणबुडी तयार करण्यात आली आहे ?२) देशात सर्वाधिक हत्तीचे कॉरिडॉर कोणत्या राज्यात आहेत ?३) जगातील एकूण हत्तीपैकी भारतात हत्ती किती टक्के आहेत ?४) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर कोणते ?५) भारतातील सर्वात पहिले भूअंतर्गत ट्रान्सफॉर्मर कोठे निर्माण करण्यात आले ? *उत्तरे :-* १) मत्स्य - ६००० २) पश्चिम बंगाल ३) ६० टक्के ४) टोकियो, जपान ५) बंगळुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक, पुणे👤 योगेश सुधाकर मुक्कावार👤 साईनाथ वाघमारे👤 सुनील पाटील बोमले👤 योगेश शंकरोड👤 रामकृष्ण काकानी👤 देवेंद्र रेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद👤 सचिन महाजन, ग्राव्हिटी कोचिंग क्लासेस, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठ्यांना तर आपण नेहमीच मान देत असतो. तसच एकदा तरी माणुसकीच्या नात्याने लहान मानसालाही मान देऊन बघावे, त्याचे मनोबल वाढवावे कधी काळी वेळ, प्रसंगी सांगता येत नाही . आपल्यावर आलेल्या परिस्थितीमुळे जर कोणी आपल्याला नाही ओळखले तरी ज्याला आपण मान दिले असाल कदाचित ती व्यक्ती ओळखू शकते व आपली मदत करू शकते.कारण त्या व्यक्तीकडे जरी संपत्ती नसली तरी खरी माणुसकी व कठीण परिस्थिती सहजपणे ओळखता येते त्याविषयी सर्वाना अनुभव असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरी मैत्री*अजनारच्या जंगलात सूर सिंह आणि सिंह राज हे दोन पराक्रमी सिंह राहत होते . सूर सिंग आता म्हातारा होत होता. आता तो जास्त शिकार करू शकत नव्हता. सिंहराज त्याची शिकार करून अन्न आणत असे. सिंहराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा सूर सिंग एकाकी व्हायचे. भीतीपोटी एकही प्राणी त्याच्या जवळ जात नव्हता. आज सुरसिंगला एकटा पाहून कोळ्यांचा कळप फुटला. आज कोल्हाला मोठी शिकार मिळाली होती. कोल्हाळांनी सुरसिंगला चारी बाजूंनी ओरबाडून जखमी केले होते. तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात सिंहराज गर्जना करत तिथे आला. सिंहराजाला तिथे येताना पाहून कोल्हाळांचा जीव गेला. सिंह राजने काही वेळातच सर्व कोल्ह्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्याचा मित्र सुरसिंग याचा जीव वाचला.नैतिक – खरी मैत्री नेहमीच उपयोगी असते, जीवनात खरा मित्र असणे आवश्यक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर**१९९७:आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.**१९७५:पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५:दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली**१९३५:इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.**१९०८:’जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.**१६२०:’मेफ्लॉवर’ जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: स्वप्ना आकाश बेलदार-- कवयित्री* *१९७५:संजय गोळघाटे -- कवी* *१९७३:परविन कौशर--लेखिका**१९७१:प्रसून जोशी ---भारतीय कवी,लेखक, गीतकार**१९६८:अर्चना रमेश कुलकर्णी - लेखिका* *१९६५:रामभाऊ होलाराम कटरे-कवी,लेखक* *१९५६:अरुणचंद्र शंकरराव पाठक--इतिहास अभ्यासक**१९५६:डेव्हिड कॉपरफिल्ड – अमेरिकन जादूगार**१९५४:संजय बंदोपाध्याय – सतारवादक**१९४८:सुबोध प्रभाकर जावडेकर-- मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक**१९४६:ज्योती राम आसटकर -- कवयित्री**१९४३: श्यामराव (श्याम) बजाप्पा कुरळे-- जेष्ठ साहित्यिक* *१९४३: मनराज दुलीचंद पटले -- कवी,लेखक* *१९४२:नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर – सुप्रसिद्ध निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.(मृत्यू:३ऑगस्ट२०२३)**१९४२:विजय पाटील-- रामलक्ष्मण या नावाने ओळखले जाणारे,भारतीय संगीतकार (मृत्यू:२२ मे२०२१)**१९३३:रामभाऊ पांडुरंग गोतमारे --- कवी**१९१६:एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)**१९१५:नागेश रामचंद्र जोशी--- मराठी नाटककार,गीतकार(मृत्यू १८ मे १९५८)**१९१३:कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (मृत्यू:२० एप्रिल १९९९)**१९०७:वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू:२५ मार्च १९९१)**१९०३:श्रीधरशास्त्री वारे-- महाराष्ट्रातील थोर संस्कृत अभ्यासक आणि लेखक (मृत्यू:२४ऑगस्ट १९६४)**१८८७:दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी--मराठी कवी (मृत्यू :२१ऑक्टोबर,१९३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते 'ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)**१९७७:केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १३ जुलै १८९२)**१९७३:गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार-- पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक ,भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.(जन्म:१ फेब्रुवारी १८६८)**१९६५:फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते (जन्म:३१ जुलै १८८६)**१९३२:सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर (जन्म:१३ मे १८५७ )**१८२४:लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)**१७३६:डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (जन्म: २४ मे १६८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणपतीची*पहिला भाग - मोरगावचा मयुरेश्वरमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे. अष्टविनायक गणपती मधील हा पहिला गणपती समजला जातो. मोरगाव हे गाव कऱ्हा नदी किनारी वसलेले आहे. अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश "मोरेश्वर" किंवा "मयुरेश्वर" या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणून गावास मोरगाव म्हणून ओळखले जाते.पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव हे हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे. पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे. येथे जाण्यासाठी महामंडळाची बस किंवा खाजगी वाहनाने देखील जाता येते. मयुरेश्वर मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याचे बांधकाम केले आहे, पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होते.मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.पुढील भागात - थेऊरचा चिंतामणीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर जिल्ह्यात ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, शेतकऱ्यांना वेगाने मदत मिळणं शक्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक जिल्ह्यातील 213 गावांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा, भर पावसाळ्यात टँकरवर तहान भागवण्याची वेळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'निपाह व्हायरसचा मृत्यू दर कोरोनाहून जास्त', ICMR कडून चिंता व्यक्त; केरळमध्ये आणखी एका रुग्णाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फ्रान्समध्ये आयफोन 12 विक्रीवर बंदी, रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धीर सोडू नका! आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : लोकलमधून प्रवास करताना पासधारकांना ओळखपत्र बंधनकारक, रेल्वे प्रशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय, शुभमन गिलचं शतक व्यर्थ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते ?* 📕धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, ॲगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीयनिरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्याखोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमानव आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला ?२) राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) 'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?४) जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात ? *उत्तरे :-* १) न्यूटन २) ३५ वर्षे ३) वि. स. खांडेकर ४) ०८ मार्च ५) ३० दिवस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश सोळुंके, जालना👤 प्रसाद मुतनवाड👤 लक्ष्मणराव भवरे👤 मंगेश यादव👤 संतोष ओझा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही अडचणी मुळे आपल्याला समोर बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून दु:खी होऊ नये. मागे जागा मिळाली असेल तर त्यातच समाधान मानून शांतपणे बसावे. कधी काळी सांगता येत नाही आपल्याला समोरही बसण्याची संधी मिळू शकते. म्हणून धीर सोडू नये आणि आपला स्वाभिमान कायम ठेवून आलेल्या परिस्थितीचा सामना करावे दिवसं प्रत्येकांचे निघत असतात व वेळही बदलत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कालियाला शिक्षा झाली*संपूर्ण गल्ली कालियावर नाराज होती. कधी कधी तो भुंकून रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचा . कधी चावायला धावत असे. भीतीपोटी मुलांनी त्या गल्लीत एकटे जाणे बंद केले होते. त्या रस्त्यावर चुकून एखादं मुल गेलं तर त्याच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळून जायचे. कालियाने तिच्या मित्रांनाही त्रास दिला होता. सगळ्यांना घाबरवून तो स्वत:ला गल्लीचा सेट समजू लागला. त्याच्या कळपात शेरू नावाचा एक छोटा कुत्राही होता. तो कोणालाही त्रास देत नाही, अगदी लहान मुले देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात. एके दिवशी राहुलने शेरूसाठी रोटी आणली. शेरू खूप खुश झाला आणि तो भाकरी घेऊन गाडीखाली धावला. तिथे बसून जेवायला सुरुवात केली. शेरूला भाकरी खाताना पाहून कालियाने जोरात धक्का दिला आणि भाकरी घेऊन पळून गेला. शेरू जोरजोरात रडू लागला. राहुलने वडिलांना सांगितले. कालियाची कृती त्याच्या वडिलांना माहीत होती. त्याने यापूर्वीही पाहिले होते. त्याला खूप राग आला. एक काठी काढून कालिया दुरुस्त केला. कालियाला आता आजीची आठवण झाली. तो इतका सुधारला होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो त्रास देत नाही. लहान मुलाला पाहून तो लपून बसायचा.नैतिक – वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात, वाईट कर्म टाळावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌺वाचन विकास भाषिक उपक्रम🌺✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.शब्दटोपली क्रमांक (१७) http://www.pramilasenkude.blogspot.com *ढ्य - मेंढ्या , पेंढ्या, बलाढ्य, धनाढ्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ण्य - फण्या , गोण्या, पुण्याई लावण्य, अरण्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *त्य - पणत्या , त्याला , त्याच्या ,त्यांनी , त्याच्या ,त्यांच्या , त्यामुळे ,त्यामुळं, त्यामुळेच ,त्या ,त्यांनी, त्यांच्या, आत्या , चकत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *थ्य - तथ्य, पोथ्या पायथ्याशी ,पालथ्या ,काथ्या, मेथ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *द्य - गद्य , पद्य, वाद्य, विद्यार्थी, विद्या, गाद्या , फांद्या , द्या , द्यावे , द्यावा द्यायला द्यायची द्यावे, द्यायचे , द्यायचा , द्यायचं .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ध्य - मध्य , ध्यान , ध्यास, संध्या, संध्याकाळ,ध्यानात , ध्यानी, ध्यानी , ध्यानात ,ध्येय ,ध्येये.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *न्य - न्याय , धान्य, अन्य ,अन्यथा ,वन्य, वन्यजीव, अनन्या, अन्याय, न्यायला, न्यायाधीश ,न्यायालयाने ,न्यायला ,न्या , न्यायमूर्ती, न्यायालयात ,न्यायालय ,न्यायालयाने. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्य - रौप्य ,सोप्या ,प्यायला ,प्यावे , प्याला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *फ्य - चाफ्याची, लिफाफ्यात, वाफ्यात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ब्य - लोंब्या ,तांब्या ,ओंब्या.✍संकलन/ लेखन श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय अभियंता दिन_**_आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २५८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळे काढले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दिवाळखोरी आहे.**२०००:ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९५९:प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.**१९५९:निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.**१९५३:श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड**१९४८:भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत**१९३५:जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.**१९३५:भारताचे पहिले पब्लिक स्कूल ’द डून स्कूल’ (The Doon School) सुरू झाले.**१९१६:पहिले महायुद्ध - लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर सॉमच्या युद्धात केला गेला**१८३५:चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.**१८२१:कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडूरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन**१८१२:नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: संजीवनी सुनील पाटील- लेखिका* *१९७९: छाया तानबाजी बोरकर-- कवयित्री**१९७८:गायत्री प्रकाश शेंडे -- कवयित्री* *१९७८:प्रांजली प्रवीण काळबेंडे -- कवयित्री**१९७३:दीपा मंडलिक -- लेखिका* *१९६१:नितीन केळकर --संशोधक,लेखक, निवेदक,कवी*१९४७:डॉ.हंसराज दादारावजी वैद्य-- लेखक, सामाजिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान* *१९४६:भाऊसाहेब गावंडे-- लेखक, शिक्षणतज्ज्ञ,निवृत्त शिक्षण सहसंचालक* *१९४६:माईक प्रॉक्टर – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच**१९४३:उषा सावंत - कवयित्री* *१९३९:सुब्रम्हण्यम स्वामी – अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, माजी योजना आयोगाचे सदस्य**१९३५:मोरेश्वर सदाशिव गोसावी-- शिक्षणतज्ज्ञ, लेखक**१९३५:दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार सुप्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)**१९३४:पद्माकर सोनुसेठ शिरवाडकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३०:मधुकर जोशी --ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी,मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन(मृत्यू:२१ एप्रिल २०२०)**१९२१:कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)**१९२०:तारा वसंत पंडित- लेखिका* *१९१७:प्रा.भगवंत प्रल्हाद मोहरील-- लेखक* *१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी- लेखिका (मृत्यू:१३ नोव्हेंबर २००१)**१९०९:रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते,पद्मश्री (१९८५),भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)**१९०९:सी.एन.अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:३ फेब्रुवारी १९६९)**१९०५:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३) (मृत्यू: ५ आक्टोबर १९९०)**१८९०:अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)**१८७६:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे 'भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)**१८७२:विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक--आधुनिक ऐतिहासिक व राष्ट्रीय कवितेचे जनक मानले गेलेले मराठी कवी (मृत्यू:३० मार्च १९०९)* *१८६०:भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान,मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा 'भारतीय अभियंता दिन' म्हणून पाळण्यात येतो.(मृत्यू: १४ एप्रिल १९६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:२५ ऑगस्ट १९२३)**२०१२:के.एस.सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (जन्म:१८ जून १९३१)**१९९८:–विश्वनाथ लवंदे-- गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष यांचे मलेरियाच्या आजाराने निधन झाले.(जन्म:२० एप्रिल १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* ✍ *_संकलन_* ✍ *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महाड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महाड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती क्रमशः वाचू या *उद्या - मोरगावचा मयुरेश्वर*संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईत खासगी विमान कोसळलं, लॅंडिंग करताना दोन तुकडे; तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कागदपत्रांची झंझट संपली, आधार ते अडमिशनपर्यंतच्या सर्व सरकारी कामांसाठी आता जन्माचा दाखला पुरेसा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा औरंगाबाद दौरा रद्द, वेळेचं नियोजन होत नसल्याने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघाची घोषणा, सुनील छेत्री 23 वर्षांखालील संघासोबत जाणार, झिंगान आणि गोलकीपर गुरप्रितला स्थान नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट्सने मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *"कार्बन मोनॉक्साइडचे" काय दुष्परिणाम होतात ?* 📕कार्बन मोनॉक्साइड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. या वायूचे अस्तित्व आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जाणवू शकत नाही. कार्बन आणि सेंद्रिय पदार्थाच्या अर्धवट ज्वलनानंतर हा वायू तयार होतो. जुनाट, वापरात नसलेल्या विहिरी, घर जळताना, डायनॅमाईटचा स्फोट झाल्यानंतर अशा विविध ठिकाणी हा वायू तयार होतो. पाश्चिमात्य देशांत घरोघरी वापरल्या जाणाऱ्या 'कोलगेंस'मध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण ७ ते १५ टक्के इतके असते. अशा वायूमुळे २ ते ५ मिनिटांत मृत्यू ओढवू शकतो.कार्बन मोनॉक्साइड रक्तातील हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोक्सीहिमोग्लोबीन तयार होते. साहजिकच त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे रक्तवाहिन्यांची आवरणे दुबळी होतात, हृदयाला प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेतही घट होते. हिमोग्लोबीनला या वायूचे खूप आकर्षण असते. किती हिमोग्लोबीन प्राणवायू वाहण्यासाठी निकामी झाले आहे, यावर कोणती लक्षणे दिसून येतील हे अवलंबून असते. या लक्षणांमध्ये दम लागणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे, कानात आवाज येणे, चक्कर, मळमळ, उलटी, भ्रम, दृष्टी क्षीण होणे, छातीत धडधड होणे, झटके येणे, कोमा इत्यादींचा समावेश होतो. श्वसन बंद पडल्याने मृत्यू ओढवतो.आपल्याकडे या वायूची विषबाधा अपघातानेच पाहायला मिळते. परंतु पाश्चिमात्य देशात मात्र या वायूमुळे खूप आत्महत्या होतात.उपचारात प्रथमतः रुग्णाला वायूचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणापासून दूर न्यावे. या वायूचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्ण परत पूर्वपदावर येतो. ५ ते ६ तासात रक्तातील सर्व कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त द्यावे लागते. मेंदूवर वायूचा झालेला परिणाम जर कायमस्वरूपी नसेल, तर रुग्ण पुन: पूर्ववत होऊ शकतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन:- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खोटे बोलणे हि भित्रेपणाची खूण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुद्धिबळ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा आर. प्रज्ञानंद कोणाविरुद्ध खेळला ?२) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३५० हून अधिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम कोणत्या संघाने केला आहे ?३) व्हॉलीबॉल खेळात विशेष खेळाडूस काय म्हणतात ?४) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?५) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांचा मुंबई विधिमंडळावर मोर्चा काढला ? *उत्तरे :-* १) मॅग्नस कार्लसन २) भारत ( ३४ वेळा ) ३) लिबरो ४) ट्रॅक ५) खोती विधेयक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. हंसराज वैद्य, नांदेड👤 श्रीनाथ संतोष येवतीकर, येवती👤 शीतल वाघमारे👤 विजय भाऊ धडेकर👤 मनोज साळवे👤 माधव पांगरीकर👤 अभिमन्यू चव्हाण, चिरली, बिलोली👤 राजेंद्र होले👤 एकनाथ जिंकले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले खरे हिरो कोण आहेत ? त्यांना ओळखता आले पाहिजे. कारण खरे हिरो स्वतःचा कधीच विचार करत नाही, आपल्या जीवनाची पर्वा न करता सर्वासाठी लढत असतात त्याचप्रमाणे जगाला पोसत असतात त्यांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये. कारण आज ते लढत आहेत, पोसत आहेत म्हणून आपण सुखाने दोन घास खात आहोत एवढे तरी ध्यानात असू द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजूची बुद्धी*जतनपूरमध्ये लोक आजारी पडत होते . डॉक्टरांनी माशीला आजाराचे कारण सांगितले. जतनपूरजवळ एक डस्टबिन आहे. त्यावर अनेक माश्या आहेत. ती सर्व घरांमध्ये उडून जायची, तिथे ठेवलेले अन्न घाण करायची. ते अन्न खाऊन लोक आजारी पडत होते. राजू इयत्ता दुसरीत शिकतो. त्याच्या मॅडमने माश्यांद्वारे पसरणाऱ्या आजाराविषयी सांगितले. राजूने माश्या पळवायचे ठरवले. घरी आल्यानंतर त्याने आईला माशींबाबत सांगितले. ती आमचे अन्न घाण करते. घरात आल्यानंतर घाण पसरते. घरातून हाकलले पाहिजे. राजूने बाजारातून फिनाईल आणले. त्याच्या पाण्याने घर स्वच्छ केले. स्वयंपाकघरातील अन्न झाकून ठेवले. त्यामुळे माशांना अन्न मिळू शकले नाही. दोन दिवसात माश्या घराबाहेर पडल्या. पुन्हा घरात आले नाही.नैतिक – सतर्क राहून मोठे आजार टाळता येतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_हिन्दी भाषा दिन_* *_ या वर्षातील २५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.**१९९९:किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.**१९९५:संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९७८:’व्हेनेरा-२’ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.**१९६०:ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.**१९५९:सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.**१९४८:दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.**१९१७:रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:आयुष्मान खुराणा-- भारतीय अभिनेता,गायक* *१९७९:प्रा.रवी लक्ष्मीकांत कोरडे-- कवी* *१९६६:मोहम्मद आमेर सोहेल अली-- पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९६३:रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४:डॉ.श्रीकांत जिचकार -- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री,खासदार अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध....(मृत्यू:२जुन २००४)**१९५३:प्रा.डॉ.राजन जयस्वाल -- लोकप्रिय कवी,तथा प्रसिद्ध लेखक**१९५२:प्रा.अरुण सुका पाटील--कवी, लेखक* *१९५२:अंजली चंद्रकांत दिवेकर -- कथालेखिका* *१९५०:समाधान गणपत पाचपोळ -- वैदर्भीय कवी (मृत्यू:१९ जून २००५)**१९४८:वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका**१९४६: प्रकाश बुटले- लेखक* *१९३७:सुधाकर विनायक डोईफोडे-- मराठी पत्रकार,लेखक आणि संपादक (मृत्यू:२२ जानेवारी २०१४)**१९३२:डॉ.काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (मृत्यू: २ मार्च १९८६)**१९३०:सुधा मुकुंद नरवणे--मराठी लेखिका(मृत्यू:२३ जुलै, २०१८)**१९२३:राम जेठमलानी – माजी केन्द्रीय कायदामंत्री,कायदेपंडीत(मृत्यू:८ सप्टेंबर, २०१९)**१९३२:मोरेश्वर गणेश तपस्वी-- लेखक* *१९२१:दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, 'मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना उर्दू अकादमीचे पुरस्कार मिळाले.(मृत्यू:३० मे १९८९)**१९१५:गोपालदास परमानंद(जी.पी.) सिप्पी-- भारतीय हिंदी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू:२५ डिसेंबर २००७)**१९०१:प्रा.नारायण गोविंद नांदापूरकर-- मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक(मृत्यू:९ जून १९५९)**१९०१:यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत(मृत्यू:२६ सप्टेंबर १९८५)**१८९७:पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (मृत्यू:२२ नोव्हेंबर १९५७)**१८६७:विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक,कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक (मृत्यू:५ फेब्रुवारी १९२०)**१७१३:योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ जुलै १७८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११:हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म:५ जून १९५०)**१९९८:प्रा.राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू(जन्म:८ जून १९२४)**१९९२:अ.स.राजुरकर-- इतिहास संशोधक ••••(जन्म:२१ जानेवारी १९२४)**१९८९:बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक,पद्मश्री (१९५८),पद्मभूषण (१९६८) (जन्म: २६ मे १९०६)**१९७९:नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ जुलै १९१७)**१९०१:अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांची हत्या (जन्म: २९ जानेवारी १८४३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता ( शेवट )पोया अर्थात पोळाआला आला शेतकऱ्या पोयाचा रे सन मोठाहातीं घेईसन वाट्या आतां शेंदूराले घोटाआतां बांधा रे तोरनं सजवा रे घरदारकरा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदुरलावा शेंदूर शिंगाले शेंव्या घुंगराच्या लावागयामधीं बांधा जीला घंट्या घुंगरू मिरवाबांधा कवड्याचा गेठा आंगावऱ्हे झूल छानमाथां रेसमाचे गोंडे चारी पायांत पैंजनउठा उठा बह्यनाई, चुल्हे पेटवा पेटवाआज बैलाले नीवद पुरनाच्या पोया ठेवावढे नागर वखर नहीं कष्टाले गनतीपीक शेतकऱ्या हातीं याच्या जीवावर शेतींउभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदायाले कहीनाथे झूल दानचाऱ्याचाज मिंधाचुल्हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबायाआज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोयाखाऊं द्या रे पोटभरी होऊं द्यारे मगदूलबशीसनी यायभरी आज करूं या बागूलआतां ऐक मनांतलं माझं येळीचं सांगनआज पोयाच्या सनाले माझं येवढं मांगनकसे बैल कुदाळता आदाबादीची आवडवझं शिंगाले बांधतां बाशिंगाचं डोईजडनका हेंडालूं बैलाले माझं ऐका रे जरासंव्हते आपली हाऊस आन बैलाले तरासआज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देनंबैला, खरा तुझा सन शेतकऱ्या तुझं रीन !- बहिणाबाई चौधरीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नव्या संसद इमारतीवर 17 सप्टेंबरला फडकणार तिरंगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातही 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; सकल मराठा समाजाचा एल्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारात भारतातील दोन शाळांचा समावेश पहिली शाळा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि दुसरी अहमदाबाद गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रामजन्मभूमीवरील उत्खननात सापडले मंदिराचे अवशेष, मुर्त्या आणि स्तंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रवाशांसाठी खुशखबर! IRCTC च्या वेबसाईटवर आता ST बसचं आरक्षण, शिंदे सरकारचा महत्वपूर्ण करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तानला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार बॉलर नसीम शाह आशिया कपमधून ‘बाहेर’*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी?लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो.मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून**संकलन:- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो कर्तव्याला जागतो, तोच कौतुकास पात्र होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची प्रमुख भाषा कोणती ? २) हिंदी भाषा कोणत्या लिपीत आहे ? ३) राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरी केली जाते ?४) जगात हिंदी भाषा कितव्या क्रमांकावर आहे ?५) राष्ट्रीय हिंदी दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?*उत्तरे :- १) हिंदी २) देवनागरी ३) १४ सप्टेंबर ४) चौथ्या ५) १९५३**संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सदाशिव जाधव, पदोन्नत मुख्याध्यापक, नांदेड👤 सतिश कोडगीरे, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी कुदाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 अशोक चव्हाण, शिक्षक, माहूर👤 उषा नळगिरे, शिक्षिका, नांदेड👤 मधुसूदन कुलकर्णी👤 मेधा पुराणिक देसाई👤 अनिल लांडगे, साहित्यिक👤 नितीन भोसले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापने ती धनाची॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या जवळ कितीही धनसंपत्ती असली किंवा गोड बोलणारे माणसे जवळचे कितीही असतील तरी शेवटी सोबतीला कोणीही नसतात तसेच धनसंपत्ती सुध्दा कायम पर्यंत टिकून राहत नाही. हे, सत्य आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण मोहाच्या आधीन होऊन जगत असतो आणि सर्व उशीरा कळल्यानंतर विचार करून खचून जातो त्यापेक्षा जर सत्य काय आहे कळले तर. .. व्यर्थ गोष्टींच्या मागे धावण्याची वेळ येणार नाही त्यासाठी सत्याला ओळखणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पराक्रमी कासवाचा मूर्खपणा*विशाल नावाचे कासव तलावात राहायचे. त्याच्याकडे मजबूत कवच होते. हे चिलखत शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. चिलखतामुळे किती वेळा त्यांचे प्राण वाचले.एकदा एक म्हैस तलावावर पाणी प्यायला आली. म्हशीचा पाय राक्षसावर पडला. तरीही ते विशालच्या लक्षात आले नाही. चिलखतीमुळे त्यांचे प्राण वाचले. तो खूप आनंदी होता कारण त्याचा जीव पुन्हा पुन्हा वाचत होता. विशालला हे चिलखत काही दिवसात जड वाटू लागले. या चिलखतीतून बाहेर पडूनच जीवन जगले पाहिजे, असे त्यांचे मत होते. आता मी बलवान आहे, मला चिलखतांची गरज नाही. विशालने दुसऱ्याच दिवशी चिलखत तलावात सोडले आणि इकडे तिकडे फिरू लागला. अचानक हरणांचा कळप तलावात पाणी पिण्यासाठी आला. अनेक हरणे आपल्या पिलांसह पाणी प्यायला आली. विशालला त्या हरणांच्या पायाने दुखापत झाल्याने तो रडू लागला. आज त्याने आपले चिलखत घातले नव्हते. त्यामुळे खूप दुखापत झाली होती. राक्षस रडत परत तलावाकडे गेला आणि चिलखत घातली. निदान चिलखत जीव वाचवते.नैतिक – निसर्गाकडून मिळालेली गोष्ट आदराने स्वीकारली पाहिजे, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.**१९९६:महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.**१९८९:आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.**१९४८:ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.**१९२२:लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:माधव श्रीकांत किल्लेदार-- नट, लेखक,दिग्दर्शक* *१९७८:डॉ.भारती पवार- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री**१९७३:महिमा चौधरी-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९६९:शेन वॉर्न–ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर (मृत्यू:४ मार्च २०२२)**१९६९:प्रा.डॉ.स्वानंद गजानन पुंड -- सुप्रसिद्ध लेखक,प्रवचनकार,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६७:मायकेल जॉन्सन –अमेरिकन धावपटू**१९६२:सुजाता महाजन --कवयित्री लेखिका* *१९५९:श्रीकृष्ण अडसूळ-- साहित्यिक, समीक्षक,संशोधक,आणि सामाजिक कार्यकर्ते**१९५६:डॉ.रमेश आवलगांवकर-- सुप्रसिद्ध लेखक,महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक* *१९५५:प्रा.चंद्रशेखर डाऊ-- विज्ञान विषयावर लेखन करणारे लेखक**१९५४:महेश सखाराम भावे -- लेखक* *१९५२:सुतेजा सुभाष दांडेकर -- कवयित्री* *१९४६:उषा नाडकर्णी-- मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री**१९४५:शरदचंद्र लक्ष्मण जोशी-- लेखक**१९४३:डाॅ.वासुदेव मुलाटे-- मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक**१९३९:प्रभा अत्रे-- किराणा घराण्याच्या गायिका व लेखिका*@*१९३०:प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक स.प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख(मृत्यू:३१ जानेवारी १९९०)* *१९२६:वसंत श्रीपाद निगवेकर --लेखक**१९०७:लक्ष्मण नीळकंठ छापेकर (आण्णासाहेब) -- कवी लेखक संपादक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९८६)**१८९२:वालचंद रामचंद कोठारी-- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार.(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७४)**१८८६:सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७५)**१८५७:मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म:२५ नोव्हेंबर १९२६)**२०११:गौतम राजाध्यक्ष--मराठी फॅशन प्रकाशचित्रकार . व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत(जन्म:१६ सप्टेंबर १९५०)**१९९७:लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म:२८ आक्टोबर १९३०)**१९९५:डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म:७ सप्टेंबर १९१५)**१९७१:केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म:२४ सप्टेंबर १८८९ )**१९२९: जतिन दास --लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.(जन्म:२७ आक्टोबर १९०४)**१९२६:श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:११ जानेवारी १८५८)**१८९३:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म:३ जुलै १८३८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताबैल पोळा निमित्ताने कविताशिंगे रंगविली, बाशिंगे बांधली,चढविल्या झूली ऐनेदार.राजा, परधान्या, रतन, दिवाण,‘बजीर, पठाण, तुस्त मस्त.वाजंत्री वाजती, लेजीम खेळती,मिरवीत नेती, बैलांलागी.दुलदुलतात कुणाची बशिंडे,काही बांड खोंडे अवखळ.कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे,हिरवे, तांबडे शोभिबंत.वााजती गळ्यांत घुंगरांच्या माळा,सण बैलपोळा ऐसा चाले.झुलींच्या खालती काय नसतीलआसूडांचेव ळ उठलेले ?आणि फुटतील उद्याही कडाडूऐसेच आसूड पाठीवर!जरी मिरविती परि धन्याहातीवेसणी असती घट्ट पाहा.जरी झटकली जराशीही मान,तरी हे वेसण खेचतील.सण एक दिन! बाकी वर्षभरओझे मरमर ओढायाचे |– कवी यशवंतसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विविध खात्यांमधील हजारो सरकारी पदे भरण्यासाठी 9 खासगी कंपन्यांची निवड, खासगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारचं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर; उद्या, 13 सप्टेंबरपासून औरंगाबादमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सन 2014 पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBI ला केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, न्यायालयाचा निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"डिझेल गाड्यांवर 10 % अतिरिक्त GST लावण्याचा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही"; डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन परिवहनमंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदा बैलपोळ्यावर महागाई, दुष्काळ आणि 'लम्पी'चे सावट; बाजारात दुकाने सजली मात्र साहित्य खरेदीकडे ग्राहकांनी फिरविली पाठ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023- भारताने श्रीलंकेचा 41 धावानी पराभव करत फायनलमध्ये केली एन्ट्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙***************************उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी राहण्यासाठी एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतः कडून ठेवा, इतरांकडून नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०३० पर्यंत देश शंभर टक्के साक्षर करण्यासाठी *नवभारत साक्षरता अभियाना* ची सुरुवात केव्हा झाली ?२) आजच्या घडीला भारतात प्रौढ निरक्षरांची संख्या किती आहे ?३) सन १९४७ साली भारतात प्रौढ निरक्षरांची संख्या किती होती ?४) भारताचा साक्षरतेचा दर किती आहे ?५) प्रथम आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला गेला ? *उत्तरे :-* १) ८ सप्टेंबर २०२३ २) १८ कोटी १२ लाख ३) ३१ कोटी ४) ७४.०४ टक्के ५) ८ सप्टेंबर १९६६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनु देशमुख सरदार, साहित्यिक, ठाणे👤 कबीरदास गंगासागरे, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 दीपश्री वाणी, शिक्षिका, पुणे👤 योगेश रघुनाथ वाघ, नांदगाव👤 नवीन रेड्डी अरकलवार, धर्माबाद👤 जी. राजशेखर, नवीपेट, तेलंगणा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेदंडणेचे महादु:ख आहे। महादु:ख तें नाम घेता न राहे॥ सदाशीव चिंतीतसे देवदेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे योगदान हे एकाचे असते पण,नाव मात्र नेहमी दुसऱ्याचेच होते. जसे, तेल आणि वात दोघेही जळत असतात पण,आपण दिवा जळत आहे असेच म्हणतो. समाजात सुद्धा असे काही लोक असतात की, इतरांसाठी नि:स्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे ,कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता, सत्याच्या वाटेवर चालत जगत असतात पण, त्यांचा मात्र आपणाला विसर पडत असते. म्हणून जीवन जगत असताना खरे सत्य काय आहे याकडे एकदा तरी काळजीपूर्वक लक्ष द्यावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पर्लचा मित्र*मोती तिसरीच्या वर्गात शिकतो. शाळेत जाताना तो दोन रोट्या सोबत घेऊन जायचा. वाटेत मंदिराबाहेर एक छोटी गाय राहायची. दोन्ही भाकरी तो त्या गाईला खायला द्यायचा.मोती गायीला भाकरी खायला विसरत नाही. कधी-कधी त्याला शाळेला जायला उशीर व्हायचा, तरीही भाकरी खाऊ घातल्याशिवाय सोडत नसे.शाळेत उशीर झाल्यामुळे मॅडम मला शिव्या द्यायची.ती गाय खूप गोड होती, मोतीला पाहून खूप आनंद झाला असता.मोतीही त्याला स्वतःच्या हाताने भाकरी खायला घालत असे.दोघे खूप चांगले मित्र बनले.एकदा मोती बाजारातून सामान घेऊन परतत होता.काही मुलांनी त्याला मंदिराबाहेर पकडले.मोतीकडून वस्तू हिसकावून घेण्यास सुरुवात केली. मोतीला अडचणीत पाहून गाय तिला वाचवण्यासाठी धावली. गाय त्यांच्याकडे येताना पाहून सर्व मुलं नऊ-दोन-अकरा झाली.मोतीने गायीला मिठी मारली, तिला वाचवल्याबद्दल धन्यवाद.नैतिक – सखोल मैत्री नेहमीच आनंददायी असते.माणसाने नि:स्वार्थीपणे मैत्री केली पाहिजे. संकटात मित्र कामी येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवारhttps://youtu.be/YwKDuGYr2Z0?si=7oMeq-1B2ApeRnOT🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:हाँगकाँगमधील डिस्नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.**१९९८:डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान**१९८०:तुर्कस्तानमधे लष्करी उठाव**१९५९:’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.**१९४८:भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अॅक्शन’ असे केले जाते.**१६६६:आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:प्राची देसाई -- भारतीय अभिनेत्री**१९८८:प्रशांत दत्तात्रय केंदळे -- कवी**१९७९:प्रा.डॉ.श्रीकृष्ण काकडे -- लेखक, आदिवासी लोक साहित्याचे अभ्यासक* *१९७२:रसिका जोशी-- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री* *१९६४:महेंद्र लक्ष्मण तुपे-- कवी**१९६३:डॉ.नंदकिशोर दामोधरे -- कवी* *१९६२:प्रा.लक्ष्मण मोहनराव महाडिक-- प्रसिद्ध कवी व लेखक* *१९५७:डॉ.हेमंत मोरेश्वर वाघ -- कवी, भाषांतरकार* *१९५६:डॉ.राजीव नाईक -- नाटककार आणि कथाकार**१९५५:सुधीर रामकृष्ण सेवेकर --लेखक, तसेच विविध वृत्तपत्रांतून विपुल लेखन* *१९५४:मारुती सिद्राम कटकधोंड-- प्रसिद्ध कवी**१९५३:चांगदेव काळे-- कादंबरीकार व कथाकार* *१९४८:मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू* *१९४५:प्रा.डॉ.संजीवनी अरविंद देशमुख-- कादंबरीकार,तथा कथा लेखिका**१९३२:विजया श्रीनिवास जहागीरदार-- बालसाहित्यिक,लेखिका व कवयित्री (मृत्यू:१ एप्रिल २०२०)**१९१२:फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू:८ सप्टेंबर १९६०)**१८९७:आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ मार्च १९५६)**१८९४:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.(मृत्यू:१ नोव्हेंबर १९५०)**१८८२:बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकर शास्त्री-- राष्ट्रीय पंडित, तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर –मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.* *१९९६:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री(जन्म: ७ जुलै १९४८)**१९९२:पं.मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म:३१ डिसेंबर १९१०)**१९८०: सतीश दुभाषी --चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म:१४ डिसेंबर १९३९)**१९८०:शांता जोग-चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म:२ मार्च १९२५)**१९७१:जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म:४ नोव्हेंबर १९२९)**१९५२:रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली. (जन्म:१९ जानेवारी १८८६)**१९२६:विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार (जन्म: १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *वादलवारं सुटलं गो !*वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।वादलवारं सुटलं गो !गडगड ढगांत बिजली करी ।फडफड शिडात धडधड उरी ।एकली मी आज घरी बाय ।संगतीला माझ्या कुनी नाय ।सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।वादलवारं सुटलं गो !सरसर चालली होडीची नाळ ।दूरवर उठली फेसाची माळ ।कमरेत जरा वाकूनिया ।पान्यामंदी जालं फेकूनिया ।नाखवा माजा, दर्याचा राजा,लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।वादलवारं सुटलं गो ! – शांता शेळके हे गीत ऐकण्यासाठी लिंकवर क्लीक करावे. *संकलन*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, शासन कोणालाही फसवणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी, दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक, महत्त्वाच्या करारांवर केल्या स्वाक्षऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निफ्टीची ऐतिहासिक उसळण, 20 हजारांचा टप्पा गाठला; गुंतवणूकदारांना 3.3 लाख कोटींचा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - विराट-राहुलची शतके, कुलदीप पवारने घेतलं पाच विकेट, भारताने पाकिस्तानवर 288 धावानी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ? 📕*गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील *'फळांचे गाव'* कोणते ?२) महाराष्ट्रातील *'पुस्तकाचे गाव'* कोणते ?३) महाराष्ट्रातील *'मधाचे गाव'* कोणते ?४) महाराष्ट्रातील *'कवितांचं गाव'* कोणते ?५) महाराष्ट्रातील *'नाचणीचे गाव'* कोणते ?*उत्तरे :-* १) धुमाळवाडी, ता. फलटण, जि.सातारा २) भिलार, ता. महाबळेश्वर, जि.सातारा ३) मांघर, ता. महाबळेश्वर, जि.सातारा ४) जकातवाडी, जि.सातारा ५) कुसुंबी, ता. जावळी, जि. सातारा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पुंडलिक बिरगले, भोकर👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर👤 शिवा शिवशेट्टे, नांदेड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी, पुणे👤 व्यंकटेश व्ही पाटील, येवती👤 साहिल सुगुरवाड👤 ज्ञानेश्वर वाढवणकर👤 पोषट्टी सायन्ना*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाटा तर अनेक असतात. पण, दिसणाऱ्या प्रत्येक वाटा एकसारख्या असतीलच असे, नाही. म्हणून आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आहे ते, आपणच ठरवावे. कारण,कधी, कधी वाट निवडण्यात थोडीशी चूक झाली तरी त्याचा त्रास मात्र आपल्यालाच होत असतो.व अनेक संकटाचा सुद्धा सामना करावा लागतो. म्हणून योग्य तीच वाट निवडावी जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राणी पॉवर*राणी हे एका मुंगीचे नाव आहे जी आपल्या दलापासून भरकटली आहे. घरचा रस्ता न सापडल्याने ती बराच वेळ अस्वस्थ होत होती. राणीच्या घरचे लोक सरळ रेषेत जात होते. मग जोरदार वारा सुटला, सर्वजण बिथरले. राणीही तिच्या कुटुंबापासून दूर गेली. तिला घरचा रस्ता शोधताना त्रास झाला.बराच वेळ भटकल्यावर त्याला खूप भूक आणि तहान लागली.राणी जोरजोरात रडत होती.वाटेत गोलूच्या खिशातून पडलेली टॉफी सापडली. राणीचे नशीब उघडले. त्याला भूक लागली होती आणि त्याला खायला टॉफी मिळाली होती. राणीने मनसोक्त खाल्ले, आता तिचे पोट भरले आहे.राणीने विचार केला की घरी का नेऊ नये, घरातील लोकही खातील.टॉफी मोठी होती, राणी उचलायचा प्रयत्न करायची आणि पडायची. राणीने धीर सोडला नाही. ती टॉफी दोन्ही हातांनी आणि तोंडाने घट्ट पकडते.ओढत ओढत ती तिच्या घरी पोहोचली. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण त्याला पाहताच तेही धावत आले. टॉफी उचलली आणि घरात घेतली.मग काय ?सर्वांची पार्टी सुरू झाली आहे.नैतिक – ध्येय कितीही मोठे असले तरी सतत संघर्षाने ते निश्चितच साध्य होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *_ या वर्षातील २५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.**१९७२:नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.**१९६५:भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.**१९६१:’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.**१९१९:अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.**१८९३:स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:मुरली कार्तिक-- भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९६३:निलिमा क्षत्रिय -- लेखिका**१९६१:राजेंद्र शहा -- गझलकार* *१९५०:डॉ.मोहन मधुकर भागवत-- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक**१९३५:रघुनाथ जगन्नाथ तावरे-- कवी* *१९३१:माधव नारायण आचार्य--मराठी लेखक(मृत्यू:२७ जून २०१४)* *१९१७:फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ सप्टेंबर १९८९)**१९१५:पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू:२९ मार्च १९९७)**१९१४:प्रा.मधुकर विठ्ठल फाटक-- लेखक* *१९१३:वामन गणेश तळवलकर-- लेखक,संपादक* *१९१२:अप्पासाहेब बाळासाहेब पंत-- लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:५ऑक्टोबर१९९२)**१९११:गोपाळ दामोदर देऊसकर-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार (मृत्यू:८ फेब्रुवारी १९९४)**१९११:अपर्णा सदाशिव देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९०१:बाळकृष्ण रघुनाथ देवधर-- भारतीय शास्त्रीय गायक,संगीततज्ज्ञ, संपादक, चरित्रकार (मृत्यू:१० मार्च १९९०)**१९०१:आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – सुप्रसिद्ध कवी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,(मृत्यू:८ मे १९८२)**१८९५:आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न -१९८३ मरणोत्तर,१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.(मृत्यू:१५ नोव्हेंबर १९८२)**१८८५:डी.एच.लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार,कवी,नाटककार,टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३०)**१८६७: श्रीपाद दामोदर सातवळेकर-- भाष्यकार,संपादक(मृत्यू:३१ जुलै १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:माधव कोंडविलकर-- जेष्ठ लेखक, कवी,कादंबरीकार (जन्म:१५ जुलै १९४१)* *२०१३:मधुबाला जव्हेरी-चावला-- मराठी गायिका(जन्म:१९ मे १९३५)**१९९८:क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म:१० आक्टोबर १९०९)**१९८७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.(जन्म:२६ मार्च १९०७)**१९७१:निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१५ एप्रिल १८९४)**१९६४:गजानन माधव मुक्तिबोध – हिंदी कवी,लेखक,टीकाकार व संपादक (जन्म:१३ नोव्हेंबर १९१७)**१९४८:बॅ.मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल(जन्म:२५ डिसेंबर १८७६)**१९२१:सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म:११ डिसेंबर १८८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितारिमझिम पाऊस पडे सारखा,यमुनेलाही पूर चढे,पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।तरुवर भिजले भिजल्या वेली,ओली चिंब राधा झाली,चमकुन लवता वरती बिजली,दचकुन माझा ऊर उडे ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।हाक धावली कृष्णा म्हणुनी,रोखुनी धरली दाही दिशानी,खुणाविता तुज कर उंचावुनी,गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।।जलाशयाच्या लक्ष दर्पणी,तुझेच हसरे बिंब बघुनी,हसता राधा हिरव्या रानी,पावसातही ऊन पडे, ग बाई,गेला मोहन कुणीकडे ।। – ग. दि. माडगूळकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान मोदी, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणार परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *CBSE बोर्डाने 2024 च्या 10 वी व 12वी च्या पेपर पॅटर्नमध्ये केले अनेक मोठे बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती घोटाळा! परीक्षा केंद्रात हाऊसकीपिंग करणारी महिला पुरवायची उत्तरे; मोबदल्यात मिळायचे लाखो रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाकरे गटाला धक्का, उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा; उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअपद्वारे राजीनामा पाठवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणवासीयांना दिलासा! अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ करणार कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गमध्ये, आज होणार प्रकल्पाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना आज होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ? 📕*थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्न, कष्ट, चिकाटी हे यशाचे तीन मार्ग आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आतंकवादी हल्ला कोणत्या दिवशी झाला ?२) 'निसर्गाचे स्वच्छतादूत' म्हणून कोणत्या पक्ष्यांना ओळखले जाते ?३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?४) पृथ्वीपेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे ?५) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ? *उत्तरे :-* १) ११ सप्टेंबर २००१ २) गिधाड, कावळा ३) मुंबई शहर ४) तेरापट ५) एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड👤 प्रशांत करखेलीकर, धर्माबाद👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे👤 सुनील महामुनी👤 भगवान वाघमारे👤 गणेश यादव👤 अमोल वसंतराव पाटील👤 दिगंबर वंगरवार, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणारी एखादी व्यक्ती,भलाही परिस्थितीने जरी मागे असेल तरी ती व्यक्ती स्वत: नेहमीच प्रामाणिक असते तसच आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवून जगत असते. तर..ती इतरांचे काय वाईट करणार. ...? कारण त्या व्यक्तीकडे इतरांच्या विषयी वाईट विचार करण्यासाठी मुळात वेळ नसतो. फरक एवढाच की, खरे सत्य आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण वेगळ्या प्रकारे विचार करत असतो. म्हणून चुकूनही उगाचच कोणाविषयी नको त्या प्रकारचे विचार करू नये. जरी आजचा दिवस आपला असेल तरी कदाचित उद्याचा दिवस दुसऱ्याचा असू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे प्रेम*सुरिली नावाचा पक्षी आंब्याच्या झाडावर राहत होता . त्याने खूप सुंदर घरटे बनवले होते. ज्यात त्याची लहान मुले एकत्र राहत होती. त्या मुलांना अजून कसे उडायचे ते माहित नव्हते, म्हणूनच सुरिली त्यांना खायला आणून खायला घालायची.एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सुरिलीच्या मुलांना खूप भूक लागली होती. मुलं जोरजोरात रडू लागली, सगळी मुलं एवढ्या मोठ्याने रडत होती. मला माझी मुलं सुरेल रडणारी आवडत नव्हती. ती त्यांना शांत करत होती, पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते गप्प बसत नव्हते.सुरली विचारात पडली, एवढ्या मुसळधार पावसात जेवण कुठून आणणार. पण जेवण आणले नाही तर मुलांची भूक कशी भागणार? बराच वेळ विचार केल्यावर सुरिलीने लांब उड्डाण केले आणि पंडितजींच्या घरी पोहोचले.पंडितजींनी प्रसादात सापडलेला तांदूळ, डाळ आणि फळे अंगणात ठेवली होती. पक्ष्याने पाहिले आणि मुलांसाठी तोंडात भरपूर तांदूळ ठेवले. आणि लगेच तिथून उडून गेला.घरट्यात पोहोचल्यानंतर पक्ष्याने सर्व मुलांना तांदळाचे दाणे दिले. मुलांची पोटे भरली होती, सगळे गप्प झाले आणि आपापसात खेळू लागले.नैतिक – आईच्या प्रेमाची जगात बरोबरी नाही, जीव धोक्यात घालूनही ती आपल्या मुलांच्या हितासाठी काम करते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड**२०००:सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.**१९९१:मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६६:’स्टार ट्रेक’ या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.**१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.**१९५४:साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना**१८५७:ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी**१८३१:विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:राज पांडुरंग शेळके-- कवी, व्याख्याते* *१९७८: डॉ.सतीश महादेव दणाणे -- कवी,लेखक, संपादक* *१९६१:मोहन गोपाळराव दाढी-- लेखक, कवी* *१९५९:लीना निरंजन सोहोनी-- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९५८:दत्तात्रय पांडुरंग मानुगडे -- ग्रामीण कथालेखक**१९५१:डॉ.कल्याणी हर्डीकर-- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री* *१९४४:विद्याधर व्यास-- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक* *१९४०:प्राचार्य जीवन नारायणराव देसाई-- जेष्ठ कवी,लेखक* *१९३८:रमेश सहस्रबुद्धे--- मराठी विज्ञानकथा लेखक(मृत्यू:२८ डिसेंबर २०१६)**१९३३:आशा भोसले – गेली पन्नास वर्षेपेक्षा रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्या प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९२६:भूपेन हजारिका – संगीतकार व गायक,आसामी भाषेतील कवी,चित्रपट निर्माते, लेखक(मृत्यू:५ नोव्हेंबर २०११)**१९२५:पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक(मृत्यू:२४ जुलै १९८०)**१८९९:गणेश शिवराम (नाना) जोग-- नाटककार (मृत्यू:१मे १९५८)**१८९८:दत्तात्रय सीताराम पंगू -- प्राचीन मराठी कवितेचे संशोधक, संपादक व टीकाकार (मृत्यू:१९ आगस्ट १९५५)**१८८७:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (मृत्यू:१४ जुलै १९६३)**१८४८:व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:८ ऑगस्ट १८९७)**११५७:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू:६ एप्रिल ११९९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:व्ही. के. नाईक --मराठी चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक(जन्म:१० सप्टेंबर १९३३)**२०१०:मुरली – तामिळ अभिनेता (जन्म:१९ मे १९६४)**१९९७:कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ (जन्म:१८ जून १९११)**१९९१:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – प्रसिद्ध कवी. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.(जन्म:६ आक्टोबर १९१३)**१९८२:शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर (जन्म:५ डिसेंबर १९०५)**१९८१:निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (जन्म:१७ एप्रिल १८९७)**१९६०:फिरोझ गांधी –पत्रकार व राजकारणी (जन्म:१२ सप्टेंबर १९१२)* *_आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताअग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।ढगाला उन्हाची केवढी झळ ।थोडी न् थोडकी लागली फार ।डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।वारा वारा गरागरा सो सो सूम् ।ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।खोलखोल जमिनीचे उघडून दार ।बुडबुड बेडकाची बडबड फार ।डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।। – संदीप खरे संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की...देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पश्चिम बंगालमधील आमदार, मंत्र्यांच्या वेतनात 40 हजारांची वाढ, लाखोत मिळणार मासिक रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जपानच्या SLIM यानाची चंद्रावर स्वारी; इस्रोने देखील दिल्या शुभेच्छा, 'अंतराळ क्षेत्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साखरेचा गोडवा वाढला, दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *यवतमाळ* महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वाधिक स्तनपान कोणत्या देशात होते ?२) जगात सर्वात कमी स्तनपान कोणत्या देशात होते ?३) स्तनपानामुळे बाळाला काय फायदा होते ?४) स्तनपानामुळे मातांना काय फायदा होतो ?५) जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) रवांडा (८७ टक्के ) २) ब्रिटन (०.५ टक्के ) ३) संसर्ग होण्याचा धोका कमी, बौद्धिक क्षमता वाढते, लठ्ठपणा आणि मधुमेहापासून बचाव ४) कर्करोगाचा धोका कमी, रक्तस्त्राव कमी, वजन कमी ५) १ ते ७ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रशांत चौधरी, शिक्षक, नांदेड👤 मिर्जा खालेद बेग👤 कृष्णा हंबर्डे👤 बालाजी वारले👤 योगेश जंगले👤 शंकर सारगोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक पण, आपल्या मताप्रमाणे न होता क्षणातच ते,वेगळे झालेले बघायला मिळते. त्या विषयी आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही. म्हणजेच आपल्या पेक्षा कोणीतरी दुसरा असते हे सर्व घडवून आणणारा व बघत राहणारा ती म्हणजेच नियती होय. ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून असे कोणतेच व्यर्थ काम करू नये की, आपल्याला दु:खात बुडण्याची वेळ येईल शेवटी सत्य हे अंतिम सत्यच असते आपण त्याचाच पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने स्वीकार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मांजर पळून जाते*ढोलू-मोलू हे दोन भाऊ होते. दोघे खूप खेळायचे, अभ्यास करायचे आणि कधी कधी खूप भांडायचे. एके दिवशी दोघेही त्यांच्या घराच्या मागे खेळत होते. एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लू होते. मांजराची आई कुठेतरी गेली होती, दोन्ही मुलं एकटीच होती. त्याला भूक लागली होती म्हणून तो खूप रडत होता. ढोलू-मोलूने दोन्ही मांजरीच्या पिल्लांचा आवाज ऐकला आणि आजोबांना हाक मारली. दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेले असल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी त्या दोन्ही मांजरीच्या पिल्लांना एक वाटी दूध दिले. आता मांजराची भूक शमली आहे. दोघेही एकमेकांशी खेळू लागले. ते पाहून ढोलू-मोलूने मांजर वाचल्याचे सांगितले.आजोबांनी ढोलू-मोलूचे अभिनंदन केले.नैतिक शिक्षण – इतरांचे भले केल्याने आनंद मिळतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००५:इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.**१९७९:दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.**१९७८:मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.**१९३१:दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.**१९०६:’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.**१८२२:ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८१४:दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.**१६७९:सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७३:डॉ.अभय सुभाष जोशी-- लेखक, कथाकार,समीक्षक* *१९५८:जयकृष्ण बावनकुळे-- लेखक, संपादक* *१९५५:विमलसूर्य चिमणकर-- साहित्यिक, वकील,अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते(मृत्यू:३० सप्टेंबर २०२०)**१९५२:नामदेव गणपत कानेकर-- कवी* *१९४८:नंदकुमार रोपळेकर-- लेखक,जेष्ठ समीक्षक* *१९४३:अॅड.भास्करराव आव्हाड-- ज्येष्ठ विधीज्ञ,कायदेतज्ज्ञ,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक (मृत्यू:२४ जुलै २०२०)**१९४०:चंद्रकांत खोत – लेखक,कवी आणि संपादक**१९३५:प्रा.लक्ष्मीकांत प्रामाणिक -- कवी, लेखक चिंतनशील व्याख्याता* *१९३५:डॉ.भालचंद्र रामचंद्रराव अंधारे-- लेखक,संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र,नागपूर.संशोधन महर्षि, जीवन साधना,विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९३४:सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (मृत्यू: २३ आक्टोबर २०१२)**१९३४:बी.आर.इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू:२५ जुलै २०१२)**१९३३:इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका,वकील व ’सेवा’ [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका**१९३२:प्रभाकर पेंढारकर-- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू:७ ऑक्टोबर २०१०)**१९२५:भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री,दिग्दर्शक,निर्माती, गीतकार,संगीतकार,गायिका व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर २००५)**१९१६:माधव पंढरीनाथ शिखरे-- संपादक, पत्रकार,टीकाकार (मृत्यू:३१ जुलै १९८१)**१९१५:डॉ.महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४),(मृत्यू:१३ सप्टेंबर १९९५)**१९१४:माधव गजानन बुद्धीसागर-- अनुवादक (मृत्यू:१६ ऑगस्ट १९६१)**१९०५:रघुनाथ गोविंद सरदेसाई-- लेखक, पत्रकार,संपादक,कथाकार,नाट्यचित्र समीक्षक आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे कर्ते(मृत्यू:११ डिसेंबर १९९१)* *१८४९:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक,ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला(मृत्यू:८ फेब्रुवारी १९२७)**१८२२:रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित,पुरातत्त्वज्ञ,समाजसेवक (मृत्यू:३१ मे १८७४)**१७९१उमाजी नाईक – पहिले क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:३ फेब्रुवारी १८३२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:अनंत रामचंद्र तोरो-- लेखक, अनुवादक,अध्यापक( जन्म:५ मे १९३०)**१९९७:मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:११ आक्टोबर १९५१)**१९९४:टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म:२० जून १९१५)**१९९१:रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक (जन्म:५ जून १९०८)**१९७९:जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.जी. नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक(जन्म: ७ डिसेंबर १९०२)**१९७८:पी.एल.संतोषी -- गीतकार दिग्दर्शक (जन्म:७ ऑगस्ट १९१६)**१९५३:भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’फुलारी’ ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी (जन्म:१५ ऑगस्ट १८१३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितागोपाळकालाबोल बजरंग बली की जयबोलो हनुमान की जयगोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळाखिडकीतल्या ताई अक्का वाकू नकापुढं वाकू नकादोन पैसे देतो मला भिजवून टाकागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळालाल लाल पागोटे गुलाबी शेलाचिंट्या दादा गेलाजीव झालाय वेडा गोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळातुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळातुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळाएक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशारएक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशारगोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीला मुंबई आणि उपनगरात शासकीय सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दहीहंडी पथकात किती गोविंदा असावेत, याचा नियम का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज, पुढील बैठक मराठवाड्यात, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक : सुपर 4 स्टेजमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *वाशिम* महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) श्रीकृष्णाच्या आई-वडिलांचे नाव काय होते ? २) श्रीकृष्णाच्या मामाचे नाव काय होते ?३) श्रीकृष्णाचा सांभाळ कोणी केला ?४) श्रीकृष्णाच्या परम मित्राचे नाव काय होते ?५) श्रीकृष्ण हा विष्णूचा कितवा अवतार समजला जातो ?*उत्तरे :- १)देवकी-वसुदेव २) कंस मामा ३) माता यशोदा ४) सुदामा ५) आठवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन जाधव, शिक्षक, रायगड👤 सुमित बालाजी पेटेकर, धर्माबाद👤 भास्कर चटलोड, सगरोळी👤 दशरथ याटलवार, धर्माबाद👤 प्रवीण कुमार👤 गोविंद पटेल👤 भारत विठ्ठल पाटील, शिक्षक, पाचोरा👤 हणमंत धोंडीराम गायकवाड, कीर्तनकार, संगमनेर👤 प्र. श्री. जाधव, साहित्यिक, नांदेड👤 त्र्यंबक स्वामी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खोडकरमाऊसगोलूच्या घरात एक खोडकर उंदीर शिरला . तो खूप लहान होता पण घरभर धावपळ करत असे. त्याने गोलूचे पुस्तकही चावले होते. काही कपड्यांनाही चावा घेतला. गोलूची आई जे अन्न शिजवायची आणि झाकण न ठेवता ठेवायची, तो उंदीरही चाटायचा . उंदीर खाऊन-पिऊन मोठा झाला होता. एके दिवशी गोलूच्या आईने एका बाटलीत सरबत बनवले. खोडकर उंदराची नजर बाटलीवर पडली. उंदीर अनेक युक्त्या करून थकला होता, त्याला सरबत प्यायचे होते.बाटलीवर बसवलेला उंदीर कसा तरी कॅप उघडण्यात यशस्वी होतो. आता उंदीर त्यात घुसण्याचा प्रयत्न करतो. बाटलीचे तोंड लहान होते, आत जाऊ शकत नव्हते. मग उंदराला कल्पना सुचली, त्याने आपली शेपटी बाटलीत टाकली. शेपूट सरबत ओले होते, ते चाटणे – उंदराचे पोट भरले आहे. आता तो गोलूच्या उशीखाली केलेल्या त्याच्या पलंगावर गेला आणि आरामात करू लागला.नैतिक शिक्षण – कष्ट करून कोणतेही काम अशक्य नसते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚🌺शब्दटोपली क्रमांक (१६)🌺 'जोडक्षरयुक्त शब्द' वाचूया. लिहूया.✍️ 🔸क्य - वाक्य,वाक्यात, शक्य,शक्यता , शक्यतो , मोजक्यात, मोजक्या, मोडक्या ,पडक्या, वाक्ये, चाणाक्य, परक्या.🔹ख्य - नवख्या , चरख्यात , सख्या, राख्या.🔸ग्य - भाग्य, योग्य , योग्यच , ,योग्यता , अयोग्य , भाग्योदय, भाग्य , भाग्यवान , वैराग्य.🔹घ्य - घ्यावे, घ्या, घ्यावी , घ्यावा , घ्यायची , घ्यावेत , घ्यायचा , घ्याव्यात , घ्यायचं , घ्यावयास , घ्यावयाची , घ्यावयाचे , घ्याव्यात , घ्याव्या , घ्यावं ,घ्यायला , घ्यायचा.🔸च्य - तुमच्या , त्यांच्या, पुढच्या,राज्याच्या , तुमच्यावर, तुमच्याशी , तुमच्यासाठी, तुमच्याकडे , तुमच्याकडून , दाराच्या , घराच्या ,सर्वाच्या , खोलीच्या, वरच्या, आमच्या यांच्या, कोणाच्या , खालच्या, घराच्या, समोरच्या .🔹ज्य - राज्य ,राज्यात , राज्यात, राज्यातील, राज्याची , राज्याला, राज्यकारभार , स्वराज्य , पूज्य , ताज्या , भाज्या.🔸झ्य - माझ्या, तुझ्याशी , तुझ्यावर , तुझ्यासाठी , तुझ्याकडे तुझ्यावर , तुझ्या,माझ्याशी ,माझ्यावर , माझ्याजवळ , माझ्यासाठी , माझ्यासारख्या, माझ्यापेक्षा , माझ्याबरोबर,🔸ट्य - सोंगट्या, पेट्या, गोट्या , रोट्या, वाट्या, वाट्याला , काट्यात, करवंट्या. 🔹ठ्य - अंगठ्या , काठ्या, मोठ्या,लाठ्या.🔸ड्य - कुंड्या,धोंड्या, मांड्या , गुंड्या ,साड्या , बांगड्या, खोड्या,घोंगड्या, वड्या ,पाड्यावर,गोड्या.〰️〰️〰️〰️〰️〰️〰️✍संकलन/ लेखन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड**१९९३:ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड**१९६८:स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.**१९६६:दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच हत्या.**१९६५:पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.**१९५२:कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.**१९३९:दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६८:प्रा.डॉ.सुनंदा शेळके-- प्रसिद्ध कवयित्री,गझलकार* *१९६८:पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर -- लेखक* *१९६८:सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज**१९६५:प्रदीप त्र्यंबकराव चौधरी-- कवी, लेखक* *१९५९:सय्यद जबाब स.रहेमान पटेल- कवी* *१९५८:श्रीकृष्ण उर्फ आबासाहेब कडू-- प्रसिद्ध कथाकार**१९४९:राकेश रोशन-- चित्रपट निर्माता,निर्देशक व अभिनेता**१९४६:डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी--ज्येष्ठ लेखिका**१९३७:डॉ.पी.व्ही.काटे-- इतिहास संशोधक**१९३७:वसंत गोविंद पोतदार-- लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार(मृत्यू:३० एप्रिल २००३)**१९३६:डॉ.सुहास बाळ देव-- कवयित्री, लेखिका* *१९३६:प्रा.रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर-- कवी**१९३२:शकुंतला बाळकृष्ण फाटक-- लेखिका* *१९३१:शांताराम काशिनाथ राऊत--बोधचिन्ह संकल्पनकार(मृत्यू:१८ ऑक्टोबर २०१५)**१९२९:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू:२६ जून २००४)**१९०१:कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. (मृत्यू:१८ मे १९९७)**१८८९:बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू:२० फेब्रुवारी १९५०)**१७६६:जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:बक्षी मोहिंदर सिंग सरना- व्यावसायिकरित्या एस.मोहिंदर म्हणून ओळखले जाणारे ,भारतीय संगीतकार(जन्म :२४ फेब्रुवारी १९२५)**१९९०:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:२३ जून १९१६)**१९७२:अल्लाउद्दीन खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार,सरोदवादक(जन्म:१८६२)**१९६३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक,त्यांना कन्नड,कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू, तामिळ,मराठी,कन्नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक,जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *राधा ही बावरी*- गीतकार अशोक पत्कीरंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीहिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलतानाचिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरतानाहा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाईहा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाईत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीआज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावतीतुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळतीहे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाईहा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाहीत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत; मनोज जरांगे उपोषणावर ठाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या जी-20 परिषदेसाठी भारत दौऱ्याबाबत अनिश्चितता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करुन देण्यास शिक्षण विभाग आग्रही; सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकं मराठीत करण्याच्या विद्यापीठांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट; भारतीय हवामान विभागाचा अंदाज, राज्यातील धरणे पावसाविना कोरडीठाक, सप्टेंबर उजाडला उजनी धरणात 16 टक्के तर जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबाद जिल्ह्यात जनावरांचा बाजार भरवण्यास बंदी, लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उस्मानाबाद : जून 2024 पर्यंत उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी येणार; मंत्री सावंत यांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ * 5 फलंदाज, 4 अष्टपैलू, 3 वेगवान गोलंदाज विश्वचषकासाठी टीम इंडियाचे कॉम्बिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *वर्धा* महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य - एल१ कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले होते ?२) सूर्याचा अभ्यासासाठी पाठविण्यात आलेला आदित्य - एल१ लॅग्रेज पॉईंटवर केव्हा पोहोचणार ?३) आदित्य - एल१ कोणत्या बाबींचा अभ्यास करणार आहे ?४) लॅग्रेज पॉईंट कशाला म्हणतात ?५) सूर्याच्या पृष्ठभागावरील थंड भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश २) ६ जानेवारी २०२४ ३) सूर्याचा किरणोत्सर्ग, सूर्याचा कोरोना, सौरवायू तसेच सौर वादळे ४) अवकाशातील दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती प्रभावशून्य असलेल्या ठिकाणाला ५) सनस्पॉट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठाणेकर, शिक्षक, देगलूर👤 जयेश वाणी👤 सचिन पाटील👤 आनंद गायकवाड👤 विठ्ठल तुकडेकर👤 अनिल सोनकांबळे👤 विकास डुमणे👤 रितेश पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥ जनीं वीष खातां पुढे सूख कैचे। करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते.असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ट्रेन पिंकी खूप गोड मुलगी आहे. पिंकी इयत्ता दुसरीत शिकते. एके दिवशी त्याला त्याच्या पुस्तकात ट्रेन दिसली. त्याला त्याचा रेल्वे प्रवास आठवला, जो त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पालकांसोबत केला होता. पिंकीने चौक वाढवला आणि मग काय, भिंतीवर ट्रेनचं इंजिन लावलं . त्यात पहिला बॉक्स जोडला गेला, दुसरा बॉक्स जोडला गेला, जोडलेले असताना अनेक बॉक्स जोडले गेले. चौक संपल्यावर पिंकी उठली आणि पाहिली की वर्गाच्या अर्ध्या भिंतीवर ट्रेन उभी होती. मग काय झालं – ट्रेन दिल्लीला गेली, मुंबईला गेली, अमेरिकेला गेली, आजीच्या घरी गेली आणि आजोबांच्या घरीही गेली.नैतिक शिक्षण – मुलांचे मनोबल वाढवा उद्याचे भविष्य आजपासून घडवूया.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_भारतीय शिक्षक दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२००५:इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.**२०००:ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर**१९६७:ह.वि.पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.**१९४१:इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.**१९३२:फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७७:डॉ.रामकिशन दहिफळे-- लेखक, संपादक* *१९७३:प्रमोद बाबुराव चोबीतकर-- लेखक**१९६९:धोंडोपंत शंकरराव मानवतकर--कवी लेखक**१९६७:कविता महाजन-- मराठी लेखिका, कवयित्री (मृत्यू:२७ सप्टेंबर २०१८)**१९६४:ग्यानचंद ताराचंद जांभुळकर- लेखक**१९६३:सुनंदन लेले-- क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक**१९५५:स्मिता तळवलकर-- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक(मृत्यू:६ ऑगस्ट २०१४)**१९५५:पुष्पा देवीदास कांबळे-- कवयित्री* *१९५४: लक्ष्मीकांत देशमुख-- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी,सुप्रसिद्ध साहित्यिक व बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५२:विधू विनोद चोप्रा-- लेखक,निर्माता, दिग्दर्शक,संपादक,गीतकार,अभिनेता**१९४७:महादेव श्रीराम इलामे -- लेखक व कवी* *१९४४:देविदास श्रीगिरीवार -- निवृत्त शिक्षण सहसंचालक तथा लेखक* *१९४२:डॉ.पं.केशव गिंडे--भारतीय शास्त्रीय बासरीवादक**१९३०:अण्णा शिरगावकर -- लेखक व नामवंत इतिहास संशोधक(मृत्यू:११ ऑक्टोबर २०२२)**१९२८:दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू:१९ सप्टेंबर २००४)**१९२०:लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये...(मृत्यू:२५ नोव्हेंबर २०१३)**१९०७:जयंत पांडुरंग तथा ’जे.पी.’नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक,’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक,(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)**१९०४: भालचंद्र पंढरीनाथ बहिरट-- संत साहित्याचे अभ्यासक,तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ(मृत्यू:१४ आक्टोबर १९९८)**१८९५:अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (मृत्यू:१३ एप्रिल १९७३)**_१८८८:डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती,पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू:१७ एप्रिल १९७५)_**१८७७: कृष्णाजी पांडुरंग लिमये-- जुन्या पंडिती वळणाचे कवी (मृत्यू:१ नोव्हेंबर १९२२)**१८७२:त्रिंबक नारायण आत्रे-- महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक(मृत्यू :फेब्रुवारी १९३३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:किरण नगरकर-- मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक,नाटककार, समीक्षक(जन्म:२ एप्रिल १९४२)* *२०००:रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म:११ नोव्हेंबर १९४२)**१९९७:मदर तेरेसा – भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म:२६ ऑगस्ट १९१०)**१९९५:सलील चौधरी-- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार(जन्म:१९ नोव्हेंबर १९२३)**१९९२:अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति* *१९९१:शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म:२१ मे १९३१)**१९७८:रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी,संवादलेखक, नाटककार व पत्रकार. (जन्म:१ जानेवारी १९०८)**१९१८:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म:२० जानेवारी १८७१)**१९०६:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२० फेब्रुवारी १८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षक दिनानिमित्त कविताओळखलंत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून , गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून... माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली, मोक्ल्याहती जाईल कशी बायको मात्र वाचली ... भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे... खिशाकडे हात जाताच हासत हासत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला... मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. - कुसुमाग्रजसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चांद्रयान-3 चं मोठं यश, इस्रो आता चंद्रावर माणूसही पाठवण्यास सक्षम; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जालन्यातील लाठीमारप्रकरणी फडणवीसांनी मागितली माफी तर राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी, शिंदेंची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"काहीही झालं तरी खचणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही"; पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पोहचली कोपरगावमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतात घुसखोरी करुन 50 हून बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत, बनावट दस्तऐवजांचा वापर; नागपुरातून एका मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलगा जखमी; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - नेपाळचे भारतासमोर 231 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *ठाणे* महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुक्या प्राण्यावर सदैव प्रेम करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"शिक्षक दिवस"* केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला वयाने सर्वात लहान खेळाडू कोण ?३) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे ?४) जगातील सर्वात जुने शहर कोणते ?५) सफरचंदात कोणते आम्ल आढळते ?*उत्तरे :-* १) ५ सप्टेंबर २) प्रज्ञानंद ( १८ वर्ष ), भारत ३) आर्द्र प्रदेशांचे संवर्धन ४) वाराणसी, भारत ५) Malic acid*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजकुमार काळे, सहशिक्षक, बिलोली👤 रत्नाकर चिखले, मुंबई👤 धोंडोपंत मानवतकर, औरंगाबाद👤 लक्ष्मीनारायण येरकलवार, सहशिक्षक, चंद्रपूर👤 नितीन शिंदे, सहशिक्षक, पुणे👤 नरेश रेड्डी, धर्माबाद👤 सौरभ सावंत, नांदेड👤 बालाजी आरेवार, येवती👤 गंगाधर मरकंटवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ धरीं रे मना आदरें प्रीति रामी। नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते.असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिंहाचे आसन*सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो सगळ्यांना घाबरवून त्याच्या जंगलात राहतो. सिंह उग्र आणि बलवान आहे . एके दिवशी नगरचा राजा जंगलात फिरायला गेला. सिंहाने पाहिले की राजा हत्तीवर बसला आहे . सिंहाच्या मनातही हत्तीवर बसण्याचा मार्ग सुचवा. सिंहाने जंगलातील सर्व प्राण्यांना सांगितले आणि हत्तीवर बसण्याची आज्ञा दिली. बस काय, मला पटकन आराम मिळाला. सिंह उडी मारून हत्तीच्या आसनावर बसला. हत्ती पुढे सरकताच आसन हलतो आणि सिंह जोरात खाली पडतो. सिंहाचा पाय मोडला, सिंह उभा राहिला आणि म्हणाला – ‘चालणे चांगले. ,नैतिक शिक्षण –सिंहाने त्या माणसाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ज्याचे काम त्याला अनुकूल होते आणि त्याचा परिणाम चुकीचा ठरला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚➖➖➖➖➖➖➖शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍🌺शब्दटोपली क्र.(१५) पिवळ्या, सावल्या, कोणत्या,कोणत्याही, डोक्यात,खोक्यात, मोकळ्या, साहित्य, लागल्या, नव्या, नव्याने, नव्हते ,टोप्या,चांगल्या, रंगाच्या,सोडल्यास, मोठ्या,पाकळ्या, चकल्या,चिमण्या, आत्या, अभ्यास, टेकड्या, सौख्य ,लाह्या, कल्याण, इवल्याशा, शिष्य, माझ्या, व्यवहार, जोड्या,पोळ्या, कळ्या, चिमुकल्या, गोजिर्या, सावळ्या, पहिल्या ,पाट्या,संख्या ,मुख्य ,नवख्या, वाक्य,वाक्यात, अशक्य, बोक्याला, इतक्यात ,एखाद्या ,चांगल्या, अरण्य, पणत्या, चकत्या,लावण्या ,गोण्या, साड्या , विद्या ,ध्यास, अभ्यासिका, सावल्या, बादल्या, व्यापारी, टोपल्या, बैलांच्या, सानुल्या, गावाजवळच्या,हिरव्यागार, उभ्या ,डब्यात,मोजक्या,पुढच्या ,शक्य ,भाज्या, राज्य ,तुमच्या,वाद्य, ओढ्याला, गळ्यातील, मोठ्या, आपापल्या, अवतीभोवतीच्या, रानभाज्या, सूर्योदयाबरोबर. --------------------------- ✍संकलन /लेखनप्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.**१९४६:भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.**१९४५:व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.**१९२०:कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.**१९१६:पाटणा उच्च न्यायालयाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:उत्तम शंकर सावंत -- कवी**१९७१:सरोज प्रभाकर आल्हाट-- कवयित्री लेखिका* *१९७०:प्राचार्य डॉ.पवन भाऊ मांडवकर-- कवी,कथाकार,कादंबरीकार* *१९६०:नितीन विनायक देशमुख-- कवी* *१९५२:जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५२:डॉ.अनिल कुमार मेहंदळे-- लेखक, गीतकार,समीक्षक* *१९४९:वामन हरी पांडे-- लेखक* *१९४७:प्रा.मोतीराम राठोड-- विचारवंत, लेखक,सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:१९ आगस्ट २०१९)**१९४३:शुभदा शरद गोगटे-- मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका**१९४३:मुकुंद रघुनाथ दातार-- समीक्षक, संपादक,कवी,संतसाहित्याचे अभ्यासक**१९४१:साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री**१९२८:कुसुम देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१८८६:प्रा.श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक,विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक.(मृत्यू:२५ डिसेंबर १९५७)**१८७७:फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)**१८४५:डॉ.अण्णा मोरेश्वर कुंटे -- लेखक, वैद्यकशास्त्राचे अभ्यासक(मृत्यू:१५ जुलै१८९६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:शिरीष व्यंकटेश पै-- मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार(जन्म:१५ नोव्हेंबर १९१९)* *२०११:श्रीनिवास खळे – जेष्ठ प्रसिद्ध संगीतकार (जन्म:३० एप्रिल १९२६)**२००९ :आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म:८ जुलै १९४९)**१९९९:डी.डी.रेगे – चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म:१७ डिसेंबर १९११)**१९९०:नरहर शेषराव पोहनेरकर – कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म:३ आक्टोबर १९०७)**१९७६:विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – सुप्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) (जन्म: १९ जानेवारी १८९८)**१९६९:हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९०)**१९६०:डॉ.शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक**१९३७:वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री पणशीकर -- संपादक, प्रकांड पंडित(जन्म:३० मे १८६०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता...... पाऊस मनीचा ......पाऊस मनीचा कधी सरणार आहेकाठोकाठ प्याला आता भरणार आहेबंध मनाचे सारे तुटले आता हेदुःख आसवांत सजणार आहेअडखळले जे गीत निःशब्द भावनांचेशब्दातून ओठावर ते फुलणार आहेयातना हृदयातल्या डोळ्यांत साचलेल्यासांग कधी दुःखात भिजणार आहेसावली आता मज सोडून जाणारअंधारच तिचे अस्तित्व पुसणार आहेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह13 जणांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा, तर मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजातील 'त्या' 1553 उमेदवारांना मोठा दिलासा; शासकीय सेवेत नियुक्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; आजपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, आजपासून व्यावसायिक सिलिंडर 150 रुपयांनी स्वस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक - आज होणाऱ्या भारत-पाक क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सिंधुदुर्ग* महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत बरी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची गुप्तचर संस्था *रॉ* चे घोषवाक्य काय आहे ?२) भारताची गुप्तचर संस्था *रॉ* चा संपूर्ण कारभार कोणाच्या देखरेखीत चालतो ?३) आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तचर घडामोडींची माहिती हाताळण्यासाठी भारतात *रॉ* ची स्थापना केव्हा झाली ?४) तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६८ साली *रॉ* चे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ?५) एखाद्या देशाच्या सुरक्षेसाठी शत्रू राष्ट्रांकडील गुप्त माहिती हुडकून काढण्याचे काम करणारे जगातील प्रमुख तीन गुप्तचर संस्था कोणत्या ?*उत्तरे :-* १) धर्मो रक्षति रक्षित २) पंतप्रधान कार्यालय ३) सन १९६८ ४) रामेश्वरनाथ काव ५) सेंट्रल इंटिलिजन्स एजेन्सी CIA - अमेरिका, सीक्रेट इंटिलिजन्स सर्व्हिस MI6 - इंग्लंड, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस FSB - रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजाराम राठोड, विषय शिक्षक, नांदेड👤 प्रवीण इंगळे👤 शरद शेळकांडे👤 किशोर तळोकार, साहित्यिक, यवतमाळ👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, अमरावती👤 विठ्ठल पाटील👤 रवी भलगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• _*📜 सत्य 📜*_ *एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक,मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७२:आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.**१९६९:लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.**१९५६:भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.**१९५१:अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळाले.**१९३९:जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.**१९१४:रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.**१९११:पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: राजेंद्र बाबूराव उगले-- कवी,लेखक**१९७०:गणपती कळमकर-- लेखक* *१९६७:मोहन यशवंत सिरसाठ- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४९:अवधूत यशवंत कुडतरकर-- कवी, कथाकार कादंबरीकार* *१९४९:तुळशीराम बोबडे-- कवी,लेखक* *१९४९:पी.ए.संगमा– माजी लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री( मृत्यू:४ मार्च २०१६)**१९४८:प्रा.डॉ.ईश्वर तुकारामजी नंदापुरे-- कवी,लेखक समीक्षक* *१९४७:प्रा.डॉ.विनायक नारायण गंधे-- लेखक, संपादक* *१९४६:पंढरीनाथ तामोरे--लेखक, संशोधक* *१९४४:प्रा. तानसेन जगताप-- लेखक* *१९४४:अनिल वसंत बळेल-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१९)* *१९४०:यशवंत हरी पाध्ये--ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक(मृत्यू:४आक्टोबर २०१४)* *१९३६:डॉ.वसुधा भिडे-- कवयित्री* *१९३५:दयाराम आत्माराम बारस्कर-- प्रसिद्ध लेखक* *१९३३:सी.अर्जुन-- प्रतिभावान चित्रपट संगीतकार (मृत्यू:३० एप्रिल १९९२)**१९३२:कवळू बळीराम पेंदे-- कवी* *१९३२:नारायण जनार्दन जाईल-- प्रसिद्ध कादंबरीकार कथाकार**१९२३:हबीब तन्वीर-- हिंदी व उर्दू नाटककार,नाट्य दिग्दर्शक,कवी आणि अभिनेते (मृत्यू:८जून २००९)**१९२१:माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज(मृत्यू:२३ मे, २०१४)**१९१५:राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२).(मृत्यू: १९८४)**१९०८:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)**१८६७:बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर-- कवी, अनुवादक (मृत्यू:४ डिसेंबर १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)**१८९३:काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती,कायदेपंडीत, समाजसुधारक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म:३० ऑगस्ट १८५०)**१७१५ :सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.(जन्म:५ सप्टेंबर १६३८)**१५८१:गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)**१५७४:गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (जन्म: ५ मे १४७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताटप टप टप काय बाहेर वाजतंय् ते पाहू ।चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ ।।भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?गडड्गुडुम गडड्गुडुम ऐकत ते राहू ।।ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ? - कवी श्रीनिवास खारकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन; 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; पूनावाला यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोराडी विद्युत प्रकल्पात कोळशाचा वापर नको - आदित्य ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषिमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या मायदेशातील सामन्याचे अधिकार रिलायन्स जिओ आणि वायकॉम 18 कडे, 5966 कोटींची बोली, हॉटस्टारचा पत्ता कट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सातारा* महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या राज्यात फाईव्ह स्टार हॉटेल्स ( पंच तारांकित हॉटेल्स ) सर्वाधिक आहेत ?२) भारतात सर्वाधिक पंच तारांकित हॉटेल्स असलेले पहिले तीन राज्य कोणते ?३) सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?४) आर्थिक विषमता म्हणजे काय ?५) पांढऱ्या छातीचा ढीवर या पक्ष्याचे मुख्य अन्न कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ ( ४५ हॉटेल्स ) २) केरळ ( ४५ ), महाराष्ट्र ( ३७ ), गोवा ( २७ ) ३) कृष्णा ४) उत्पन्न, संपत्तीचे लोकसंख्येमधील असमान वितरण होय. ५) मासे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 विजय भगत, शिक्षक, वाशीम👤 शिवाजी पाटील येडे👤 प्रल्हाद जाधव, देगलूर👤 कोंडीबा मुत्तलेवाड👤 संभाजी कोंडलवाडे👤 नागनाथ कौडगावे👤 दिनेश सारंगे👤 आर. डी. चिंतलवाड👤 नवनाथ पिसे👤 आर. के. उन्हाळे👤 सुनीता गायकवाड, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" प्रसंगांचे गांभीर्य "*एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलंडुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि 🐱 आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".( तात्पर्य ) - तत्त्वचिंतक म्हणाला, दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*१९९१:किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७१:अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.**१९७०:राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.**१९९६:पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९६२:त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५७:मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४७:भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:आनंदा हिरालाल जाधव-- कवी, लेखक**१९७७:नारायण दादासाहेब गडाख-- कवी, गीतकार, लेखक* *१९७१:मंगेश मधुकर कवटीकवार -- कवी* *१९६९:जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज**१९६७:मुक्ता संजीव कुलकर्णी-- कवयित्री* *१९५६:ज्योती चांदेकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री**१९५४:अलकनंदा साने -- कवयित्री, लेखिका**१९५०:पंडित उल्हास यशवंत बापट-- प्रसिद्ध संतूरवादक(मृत्यू:४ जानेवारी २०१८)**१९४४:वामन अच्युत देशपांडे -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक,संत वांड:मयांचे गाढे अभ्यासक* *१९४४:क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४०:शिवाजी सावंत – ख्यातनाम मराठी कादंबरीकार.त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी,कन्नड,गुजराती,मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१८ सप्टेंबर २००२)**१९३१:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू:१० जुलै २००५)**१९१९:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू:३१ आक्टोबर २००५)**१९१३:प्रा.सदाशिव नारायण दीक्षित-- कवी, लेखक**१९०७:रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ मार्च १९५७)**१८९३:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक(मृत्यू:५ जानेवारी १९६१)**१८७०:मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.(मृत्यू:६ मे १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रणव मुखर्जी- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(जन्म:११ डिसेंबर १९३५)* *२०१२:काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)**२०००:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता(जन्म:५ एप्रिल १९६०)**१९९५:सरदार बियंत सिंग-‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या(जन्म:१९ फेब्रुवारी १९२२)**१९७६:देविदास गोविंद लांडगे -- इतिहास संशोधक,लेखक (जन्म:१८८९)* *१९७३:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(जन्म:१९ एप्रिल १८९२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *नभं उतरू आलं....*नभं उतरू आलं, चिंब थरथर वलंअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरातअशा वलंस राती, गळा शपथा येतीसाता जल्मांची प्रीती, सरंल दिनरातवल्या पान्यात पारा, एक गगन धरातसा तुझा उबारा, सोडून रीतभातनगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलूगाठ बांधला शालू, तुझ्याच पदरागायक / गायिका : आशा भोसलेसंगीतकार : हृदयनाथ मंगेशकरगीतकार : ना.धो.महानोरचित्रपट : जैत रे जैतसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची झाली निवड, त्यामध्ये रविंद्र बिष्णोई पहिल्या 10 जणांच्या यादीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दोन दिवसांनंतर गोंदिया मधील शेतकऱ्याचं आंदोलन स्थगित, चार सप्टेंबरपर्यंत तांदळाचे पैसे मिळणार; आमदार विनोद अग्रवालांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक, हॉटेलबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा; 280 खोल्या आरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही; अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करुन ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता.. सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शासकीय भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा, परीक्षेसाठी 100 रुपयांचं शुल्क घ्या; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पालघर जिल्ह्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार बाबरचे झंझावती दीडशतक, इफ्तिखारचे वादळी शतक, पाकिस्तानचा नेपाळसमोर 342 धावांचा डोंगर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सांगली* महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिती कोणतीही असो हार न मानता लढायला शिका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दरवर्षी 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' केव्हा साजरा केला जाणार आहे ?२) चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे ?३) चंद्रयान - २ कोसळले त्या ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जाईल ?४) भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत एल - १ कक्षेत कोण भ्रमण करणार आहे ?५) जागतिक महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) २३ ऑगस्ट २) शिवशक्ती पॉईंट ३) तिरंगा ४) आदित्य - एल १ ५) २६ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नांदेड👤 रत्नाकर पा. कदम चोळखेकर, धर्माबाद👤 संतोष पाटील साखरे, बिलोली👤 सुभाष जाधव, शिक्षक, देगलूर👤 सचिन वाघ, शिक्षक, बुलढाणा👤 उदय मोहिते, शिक्षक, कोल्हापूर👤 प्रकाश कल्याणकार👤 अशोक मुदलोड, येवती👤 अशोक जायेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु।निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांची रहाणीमान वेगवेगळी असते. प्रत्येकांचा स्वभाव सुध्दा वेगळा असतो. कारण, हे जग खूप मोठे आहे. आपण त्यांच्यासारखे वागायचे किंवा रहायचे ठरवले तर. .कदाचित ते, जमणार नाही. म्हणून आपण ज्या परिस्थितीत जगत आहात त्याच परिस्थितीला आपलेसे करून समाधानी राहून जगून बघावे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद नक्कीच मिळेल... फक्त, त्या,परिस्थितीला आपलेसे करता आले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी*एका राज्यात मूर्ख राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले,’’ या कुणाच्या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्या उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.तात्पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚 --------------------------- शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍ 🌺शब्दटोपली क्र. (१४)🌺' त्र ' असणारे शब्द. चित्र ,छञी,मित्र ,मात्र ,पत्र ,पाञ, यात्रा ,कुत्रा ,जञा, रात्र ,चिञा,चैत्र ,तंत्र ,तंत्रे ,खात्री ,चरित्र ,पत्रा , सत्र ,गोत्र ,सूत्र ,संञी, नेत्र ,विचित्र ,सन्मित्र ,शस्त्र ,पित्र ,पुत्र ,स्तोत्र ,गोमूत्र ,पवित्र ,पात्र ,छत्र ,क्षेत्र ,शास्त्र , माञा, पाञ, सत्र, सञात,पवित्र ,पवित्रा , धरिञी, सन्मिञ,सुमिञा, सचिञ, मैत्री ,मैत्रीण,मंत्री ,मंञ,ञुटी,मांञीक, ञयस्थ,चित्रे ,नेञा, भिञा,पञास ,पञातील,पञावर, पञपेटी,चिञांचा,चिञातील,चिञावरुन,चिञकार,पञकार,वृत्तपत्र,वृत्तपत्रे,वृत्तपत्रांनी ,सूञधार, सर्पमिञ,कवयिञी,ञिवार,ञिवेणी,मंञीमंडळ,ञिकालबाधीत, घोषणापञ, तांत्रिक , तंत्रज्ञान,तंत्रस्नेही,तंत्रज्ञानात्मक,लिळाचरिञ. ---------------------------✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* *_ या वर्षातील २४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९७४:चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७:डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८:लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३:युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१:मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५:पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८:वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४:नेताजी रामदास सोयाम-- कवी* *१९७०:डॉ.श्रीराम यशवंत गडेकर-- लेखक, समीक्षक* *१९६९:कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनंत वासुदेव माळवे-- लेखक,कवी* *१९६०:संजय वासुदेव कठाळे-- लेखक* *१९५८:मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक,संगीतकार,निर्माता, अभिनेता (मृत्यू:२५ जून २००९)**१९५७:मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५०:लीना चन्दावरकर- हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७:शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४:डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक-- कथाकार,कवयित्री,लेखिका**१९२९:गो.मा. पुरंदरे-- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५:इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट १९८२)**१९०५:मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू:३ डिसेंबर १९७९)**१९०१:पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू:२७ एप्रिल १९८०)**१८८०:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक,राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू:२६ जानेवारी १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)**२००७:बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म:५ नोव्हेंबर १९१७)**२०००:विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म:५ आक्टोबर १९२३)* *१९८६:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:१५ जून १८९८)**१९७६:काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. (जन्म:२५ मे १८९९)**१९७५:इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२)**१९६९:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म:२० आक्टोबर १९१६)**१९०६:बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक,ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *रक्षाबंधन*भाऊ बहिणीचा सणत्याचे नाव रक्षाबंधनओवाळते भाऊरायाबहिणीचे करतो रक्षणधागा नाही हा कच्चात्यात प्रेमाचे आहे बंधनवर्षानुवर्षे टिकविण्यासाठीकरू या ऋणानुबंध मंथनबहीण नाही ज्या भावालाप्रेमासाठी पहा तळमळतोराखी बांधून घेण्यासाठीतो एका बहिणीला शोधतोदेशातल्या आया बहिणीवरपहा अत्याचार किती वाढलेएक भाऊ येईना चालून पुढेबहिणीला जे त्याने वचन दिलेप्रत्येक स्त्री बहिणीसमान मानावेप्रत्येक भाऊला हे कळले पाहिजेतोच दिवस रक्षाबंधनाचा खरा आपण साजरा केला पाहिजे.- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी आज जाहिरात येणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोयना धरणातील पाणी वीज निर्मितीऐवजी पिण्यासह शेतीसाठी वापरा, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोर्डाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी; निकालाची टक्केवारी 32.13 टक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास! सात वर्षात सात सुवर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *रायगड* महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशाजवळ आहे ?२) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?३) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?४) राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो ?५) भारतीय हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जिंकली ?*उत्तरे :-* १) अमेरिका ( ८१३३ टन ) २) पंतप्रधान ३) राष्ट्रपती ४) सन १९९२ ५) चौथ्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रामचंद्र गणपत वास्ते, शिक्षक गव्हाणे बागल वस्ती पंढरपूर 👤 रवी शिंदे, साहित्यिक, बिलोली👤 रवींद्र केंचे, साहित्यिक👤 शिवराज पाटील चोळखेकर, धर्माबाद👤 ईश्वर सेठीये👤 विनायक कुंटेवाड, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 गणेश राऊत👤 अनिरुद्ध खांडरे👤 गणेश येडमे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥ मनीं कामना राम नाही जयाला। अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल जेव्हा, आपल्याला माहिती मिळते त्यावेळी मात्र आपला आनंद गगणात मावेनासा होतो कारण, तो आनंद विशेष गोष्टीबद्दल असतो. आपल्या कर्तृवाचा असतो. अशा वेळी, आपण स्वतःही आनंदीत रहावे व इतरांना सुद्धा त्या आनंदात सहभागी करून घ्यावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃❝ अहंकार ❞❃* ━━═•●◆●◆●•═━━ उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला. *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* अहंकार आणि अहंकार्याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९०:इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.**१९३७:’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.**१९३१:फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.**१९१६:पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९१६:पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४५:’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:आनंदराव रामचंद्र पवार-- लेखक**१९६८: सुधाकर वासुदेव इनामदार-- कवी,गदिमा व गाडगेबाबा यांचे वरील पोवाडे लेखन व सादरीकरण* *१९६५:संजय नारायण चौधरी -- कवी* *१९५७:अनंत जोग--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५२:गौरी सुभाष गाडेकर-- प्रसिद्ध लेखिका* *१९५१:स्वाती शशिकांत सुरंगळीकर -- कवयित्री,लेखिका**१९४८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी-- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (मृत्यू:५ डिसेंबर २००८ )**१९४१:डॉ.श्रावण किसनजी उके--लेखक**१९३४:सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा**१९२८:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४)**१९१८:राम कदम – संगीतकार (मृत्यू:१९ फेब्रुवारी १९९७)**१९०८:विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार**१९०६:नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू:१९९१)**१९०३:उमाकांत केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व लेखक (मृत्यू:२६ जुलै १९७२)**१८९६:रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी– ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२)**१८९३:रघुनाथ दामोदर करमरकर--लेखक, व्याख्याते,संशोधक(मृत्यू:२८ नोव्हेंबर १९६५)**१८७१:श्रीधर विष्णू परांजपे -- टीकाकार, चरित्रकार व समीक्षक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९५४)**१७४९:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी,लेखक,कलाकार आणि राजकारणी (मृत्यू:२२ मार्च १८३२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ लेखिका (जन्म:१२ मार्च १९३३)* *२०१०:डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर -- कवयित्री,लेखिका,संत साहित्याच्या अभ्यासक(जन्म:१७ फेब्रुवारी १९३२)* *२००१:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – सुप्रसिद्ध लेखक,चित्रकार,पटकथाकार,शिकारी (जन्म:६ जुलै १९२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *पाऊस गाणे*पाऊस आला, पाऊस आलाआला संगे वारापाऊस येता भारूनी जाईआसमंतही सारागडगड करूनी मेघ सावळानाद अंबरी भरतोसौदामिनीचा प्रकाश पसरूनीअवनीवरती येतोपाऊस येता हर्ष होऊनीरिमझिम गाणे गातोस्वैर होऊनी मयूर कसा हानृत्य काननी करतोतरू-वेलींवर कळय़ा फुलेहीडुलती आनंदातभिजता-भिजता वा-यासंगेपाऊस गाणे गातपाऊस येता भिजलेल्यामातीचा पसरे गंधसुचते मजला नकळत तेव्हागीत असे स्वच्छंदअमेय गुप्ते, दादरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईच्या सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू; पाच जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अनेक भागात पाण्याची परिस्थिती गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कपसाठी बीसीसीआयचा ऐतिहासिक पुढाकार; अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *परभणी* महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे. *पुणे* महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्सुलिनचा वापर कोणत्या आजारात केला जातो ?२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?३) बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे ?४) पंजाब केसरी असे कोणास म्हटले जाते ?५) हवामहल कोठे आहे ?उत्तरे :- १) मधुमेह ( शुगर ) २) स्वामी दयानंद सरस्वती ३) आसाम ४) लाला लजपतराय ५) जयपूर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय बंटी पाटील, बाळापूर👤 अशोक मामीडवार👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली👤 तिरुपती अंगरोड, धर्माबाद👤 आनंद आवरे, धर्माबाद👤 कवी गणेश घुले, औरंगाबाद👤 कामशेट्टी लक्ष्मण, 👤 साईनाथ गोणारकर, धर्माबाद👤 सुनीता महाडिक, मुंबई👤 विजय दिंडे, धर्माबाद👤 डी. एस. पाटील, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले स्वतःचे दु:ख इतरांना सांगत फिरणे व तेच दु:ख स्वतः सहन करणे यात खूप फरक आहे. कारण कधी, कधी असं होतं की, आपण मनमोकळेपणाने आपले दु:ख एखाद्या व्यक्तीला सांगताना त्या,व्यक्तीला पूर्णपणे वाचत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी न सांगता येत असतात. दु:ख कमी होण्या ऐवजी वाढत जातात.शेवटी आपले दु:ख आपल्यालाच सहन करून त्यातून मार्ग काढावे लागते. त्यासाठी इतरांना सांगत फिरण्यापेक्षा जीवनात आलेल्या दु:खाचे स्वागत करावे कारण, दु:खातूनच शेवटी सुखाची प्राप्ती होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *"पवित्र जल"*कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्लामसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास उपक्रम📚 -------------------------विषय - मराठी शब्द वाचूया, शब्द लिहूया✍🌺शब्दटोपली क्र. (१३)🌺बाॕल, काॕल , साॕल, माॕल, डाॕग, डाॕन, जाॕन,जाॕनी, काॕट, हाॕकी, फाॕर्म, लाॕर्ड, बाॕक्स, साॕक्स, नाॕट, डॉल ,टाॕल,शाॕक, शाॕर्ट,साॕस, साॕरी,हाॕर्न,हाॕट, गाॕट ,लाॕन,चाॕक,थाॕट,साॕफ्ट, डाॕट,लाँग,आॕफ,आॕन,फाॕल,टाॕप,लाॕजीक,टॉवर, डॉक्टर ,रॉकेट,लाॕकेट, टॉवेल, सॉकेट, पॉकेट,माॕडेल, शाॕवर,आॕफर, काॕर्नर,काॕलम,काॕपर,टाॕपर, काॕलनी,काॕसली,पाॕवर,पाॕलीश,पाॕईंट,जाॕईंट,माॕर्निंग, लाॕकर,नाॕमिनी,नाॕलेज,काॕलेज,वाॕकर, वाॕटर, वाॕशर,हाॕटेल,बाॕटल,लाॕगीन, वाॕकर, शाॕक, थाॕट, नाॕट, वाॕलपेपर, काॕपर, टाॕपर, काॕर्नर, काॕलर , काॕलरा, काॕटन,पाॕलीस्टर,बाॕलपेन,हाॕटस्पाॕट,चाॕकलेट,लाॕगआऊट,पाॕवरपाॕईंट. ➖➖➖➖➖➖➖✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६:रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०:एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१:थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्याचे पेटंट घेतले.**१६०८:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७७:नागराज पोपटराव मंजुळे-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,आणि मराठी कवी**१९७६:हंसराज मधुकर देसाई-- बालकवी* *१९७४:बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे-- लेखक, पत्रकार* *१९६२:सुरेश मारोतराव चोपणे- लेखक,कवी* *१९५४:सतीश कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते**१९५१:अनुराधा अरुण नेरुरकर-- कवयित्री लेखिका* *१९४७:प्रा.डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर-- प्रसिद्ध कवी,लेखक,शिक्षणतज्ज्ञ,अनुवादक, संपादक* *१९४७:पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७:प्रा.डॉ.अनिल नागेश सहस्रबुद्धे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४:संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू:२४ जून १९९७)**१९३२:रावसाहेब गणपराव जाधव –मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी,माजी संमेलनाध्यक्ष(मृत्यू:२७ मे २०१६)**१९२९:यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)**१९२४:जनार्दन अमृत जोशी-- कवी,लेखक**१९२१:नामदेव लक्ष्मण व्हटकर- प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:२३ फेब्रुवारी २००४)**१९१७:पं. बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(मृत्यू:२१ जुलै १९९१)**१९०८:शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८८८:बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (मृत्यू:८ मार्च १९५७)**१८८०:बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू:३ डिसेंबर १९५१)**१८७२:साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर –श्रेष्ठ मराठी साहित्यिक,संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू:१४ आक्टोबर १९४७)**१८३३:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक(जन्म:२१ नोव्हेंबर१९३५)**२०१९:अरुण जेटली-- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री(जन्म:२८ डिसेंबर १९५२)**२०१८:विजय चव्हाण-- मराठी रंगभूमीवरचे कलाकार(जन्म:२ मे१९५५)**२०१६:अनुराधा शशिकांत वैद्य--कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले(जन्म:९ जुलै १९४४)**२००६:यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री)--वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म:३ मार्च १९०८)* *२०००:कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)**१९९३:शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)**१९२५:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता - पाऊसढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची ……सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची …….अशोक पत्कीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्या पेन्शनचा संभ्रम दूर करा; केंद्रासारखा जीआर काढा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरात डेंग्यूच्या चाचणीसाठी सहाशे रुपयांचा दर निश्चित केला असून, यापेक्षा अधिकचा दर घेतल्यास रुग्णालये तसेच खासगी लॅबचालकावर कारवाईचा इशारा दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तलाठी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या गणेश गुसिंगेकडून मोबाईल अटकेपूर्वीच रिसेट, गोपनीय माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारत दौऱ्यावर; G-20 परिषदेत सहभागी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *नंदुरबार* महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?२) कॉफीचे मूळ स्थान कोणते ?३) संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात सापडते ?४) पोक्सो ( POCSO ) कायदा केव्हा लागू झाला ?५) तोंडाने भरलेल्या फुग्यातील हवेत कोणते घटक असतात ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) सौदी अरेबिया ३) राजस्थान ४) १४ नोव्हेंबर २०१२ ५) नायट्रोजन, ऑक्सीजन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सावित्री कांबळे, साहित्यिक👤 मारोती बोमले, चिरली👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 सुनील बावसकर👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 ऋषिकेश शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसापासून प्रेम मिळते,माणसापासून धोका असते,माणसापासून आधार मिळते तर.. माणसापासूनच जीवनाची राखरांगोळी होते,माणसापासून सन्मान मिळतोआणि माणसाकडून होणारे अपमान,तिरस्कार, छळ सुद्धा सहन करावे लागतात हे, सर्व माणसांकडून होत असते.माणूस एकसारखा दिसते खरा पण, त्याच्याच असलेली वागणूक अनेक प्रकारची बघायला मिळत असते. म्हणून आज कोणत्याही माणसांवर विश्वास करतेवेळी विचार करावा लागतो हि एक प्रकारची चितांजनक बाब आहे म्हणून कोणत्याही माणसाने जीवन जगत असतांना माणसारखेच जगावे व माणसासाठी जगावे कारण, हा जन्म अनेकदा मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📚 ज्ञानवर्धक बोधकथा 📚 "एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला." तात्पर्यः "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही. " 🌹🌹🌹🌹🌹🌹*नेहमी आनंदी रहा*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*📚वाचन विकास उपक्रम📚* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com --------------------------शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍शब्दटोपली क्र. (१२) *बॅट ,सॕक,हॕट, कॕप, कॕट, टॕग, रॕली, लॕब,टॕब,रॕक ,कॕच,कॕरी, चॕट ,टॕप, टॕली ,कॕरी, बॕग, गॕप ,टॕटू ,डॕम, मॕड, बॕड ,डॕनी,फॕन,मॕन,रॕट,मॕट,कॕन,दॕट,डॕडी,डॕम,फॕट,गॕस,टॕली,मॕच,कॕग,जॕकी,टॕग,डॕश,नॕनो,मॕगी,पॕट,कॕन,डॕनी,कॕडल,कॕरम,बॕरल,गॕमर, पॕरट,कॕमेरा,फॕशन, बॕटरी , गॕलरी, गॕरेज,मॕरेज,मॕरीड, जॕकेट,चॕनल,पॕरीस,हॕकर,सॕलरी,रॕडीश,कॕरट,कॕमल,कॕनल ,बॕनर,हॕमर,टॕबलेट,चॕरीटेबल,पॕसीफीक.*http://www.pramilasenkude.blogspot.com--------------------------✍संकलन / लेखनप्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २३४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९७२:वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.**१९६२:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.**१९४४:दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.**१९४२:दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.**१९०२:कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना**१८४८:अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९६६:विजयकुमार मेश्राम -- लेखक,कवी* *१९६६:प्रा.डॉ.प्रल्हाद वावरे-- लेखक, समीक्षक,संपादक* *१९६५:महेंद्र सीतारामजी गायकवाड-- लेखक,कवी* *१९६४:मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू**१९६२:सुनील महादेव सावंत--कवी लेखक**१९५८:मानसी मागीकर-- मराठी अभिनेत्री* *१९५५:सुरेश मारोतराव आकोटकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९५५:चिरंजीवी – सुप्रसिद्ध अभिनेते* *१९५४:खुशालदास तुकारामजी कामडी-- कवी,गीतकार* *१९५४:माणिकराव गोविंदराव ठाकरे-- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी राज्यमंत्री* *१९४७:उज्ज्वल वामनराव कुलकर्णी-- कथाकार**१९४६:मा.विकास शिरपूरकर--सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती**१९३५:पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)**१९३४:अच्युत पोतदार-- भारतीय अभिनेते, ज्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे**१९२६:एन.सी सिप्पी-- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:२५ नोव्हेंबर २००१)**१९२५:गणपत दत्तोबा बारवाडे-- कथा कादंबरी व नाट्य लेखक**१९२२:इंदुमती श्रीपाद केळकर-- कादंबरी व चरित्र लेखिका**१९२०:नारायण यशवंत देऊळगावकर (अण्णासाहेब) --पटकथालेखक(मृत्यू:३जून २००८)**१९२०:डॉ.डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद**१९१९:गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४)**१९१८:डॉ.बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (मृत्यू: १५ जुलै २००४)**१९१६:मधुकर रामराव यार्दी-- पूर्व केंद्रिय वित्त सचिव,संस्कृत अभ्यासक(मृत्यू:२० ऑगस्ट २००१)**१९१५:शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००१:शरद तळवलकर-- चित्रपटांतील अभिनेते(जन्म:१ नोव्हेंबर १९१८)* *१९९९:सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३).(जन्म:२ जून १९२६)**१९९५:पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.* *१९८९:पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(जन्म:२६ जुलै १८९३)**१९८२:एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. (जन्म:१९ नोव्हेंबर १९१४)**१९८०:किशोर साहू--चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म:२२ नोव्हेंबर १९१५)**१९७८:जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० आक्टोबर १८९३)**१९७०:विठ्ठल गोपाळ खोबरेकर-- लेखक, पुराभिलेख संशोधक, संपादक(जन्म:२० जुलै१९२३)**१८१८:वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितारिमझिम पाऊस पडे सारखा- कवी पी. सावळारामरिमझिम पाऊस पडे सारखायमुनेलाही पूर चढेपाणीच पाणी चहूकडेगं बाई गेला मोहन कुणीकडेतरुवर भिजले भिजल्या वेलीओलीचिंब राधा झालीचमकून लवता वरती बिजलीदचकुन माझा ऊर उडेहाक धावली कृष्णा म्हणुनीरोखुनी धरली दाही दिशांनीखुणाविता तुज कर उंचावुनीगुंजत मंजुळ मुग्ध चुडेजलाशयाच्या लक्ष दर्पणीतुझेच हसरे बिंब बघुनीहसता राधा हिरव्या रानीपावसातही ऊन पडेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा, उरले फक्त काही तास; इस्रोकडून लँडिंगसाठी तयारी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला बैठक; इंडिया आघाडी बैठकीच्या तयारीचा घेणार आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काल पहिल्या श्रावणी सोमवारी; भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, कालपासून 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, व्यापारी असोसिएशनचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तेलंगणाच्या निवडणुकीसाठी BRS पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर दोन मतदारसंघातून लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *मुंबई* महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत गर्व करू नये. कारण बहुरूपी आकाश प्रत्येक क्षणी आपले रंग बदलत असते.➖ हाफिज*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अविश्वास प्रस्तावाला सर्वाधिक ( १५ वेळा ) सामोरे जाणारे पंतप्रधान कोण ?२) नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला ?३) किमान किती खासदारांच्या पाठिंब्याने कोणताही खासदार मंत्रिपरिषदेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतो ?४) अविश्वास प्रस्ताव कोणत्या एकाच सभागृहात आणता येतो ?५) जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता ?*उत्तरे :-* १) इंदिरा गांधी २) काँग्रेस खासदार गौरव गोगोई ३) ५० खासदार ४) लोकसभा ५) भारतीय जनता पक्ष ( BJP )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हमंद, बिलोली👤 शंकर गंगूलवार, धर्माबाद👤 आशिष देशपांडे, नांदेड👤 नागराज येम्बरवार👤 शिवा गैनवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण बरेचदा म्हणत असतो की,जे माझ्या नशिबात होते ते,झाले म्हणून वारंवार तिथेच आपण गुरफटून पडत असतो व स्वतः ला दोष देत दु:खी होऊन जगायचेच विसरून जातो. असे करण्या आधी जरा एक दृष्टी आजूबाजूलाही टाकून बघावे या जगात पूर्णपणे सुखी असलेला एकही व्यक्ती दिसणार नाही. दु:ख, वेदना,उपासमार, कशा असतात ते,एकदा जवळून बघावे.व व्यर्थ विचार डोक्यातून काढून टाकावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करून बघावे कारण इतर गोष्टींपेक्षा जीवन जगणे महत्वाचे आहे. कारण जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो तेव्हाच जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एक सुंदर कथा* ...जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला ! घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..! काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत ..! सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!" व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते. व्यापारी म्हणाले: "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!" नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!" तो म्हणाला: "मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते! आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा! व्यापारी म्हणाला, "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!" जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता! शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले ! पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ? व्यापारी म्हणाले: ... *"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."* विक्रेता मूक होता! यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे. *ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*१९९३:मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या 'मार्स ऑब्झर्व्हर' या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.**१९९१:लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९११:पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.**१८८८:विल्यम बरोज याने बेरजा मारणार्या यंत्राचे पेटंट घेतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:दिलीप अधिकराव शिंदे -- लेखक, कवी* *१९६५:प्रा.डॉ.बाळकृष्ण रामचंद्र लळीत-- प्रसिद्ध लेखक,व्याख्याते* *१९६१:व्ही.बी.चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज(१५:ऑगस्ट २०१९)**१९५६:विद्याधर माधव ताठे-- संतवाङ्गमयाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक**१९४८:मेघा जोशी -- कथालेखिका* *१९४८:दया घोंगे - कवयित्री लेखिका* *१९४२:विजय खाडिलकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९४१:कुमार गणेश सप्तर्षी -- प्रसिद्ध लेखक संपादक* *१९३५:कृष्णाजी जनार्धन दिवेकर-- मराठी साहित्यिक* *_१९३४:सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (मृत्यू:१० मे २००१)_**१९३१:डॉ.शंकर केशव मोडक -- लेखक**१९२४:श्रीपाद अच्युत दाभोळकर ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू:३०एप्रिल २००१)**१९१०:नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)**१९०९:नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी (मृत्यू: १० मे२०००)**१९०२:चिंतामणी आत्माराम मुंडले -- नाटयलेखक* *१८९४:शाहूराव दगडोबा उजगरे-- कवी (मृत्यू:२३ डिसेंबर १९६७)**१८७१:गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (मृत्यू:१७ नोव्हेंबर १९३५)**१८५७:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक(मृत्यू:२४ एप्रिल १९३५)**१७८९:ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ (मृत्यू: २३ मे १८५७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: कल्याण सिंग-- राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री उ.प्र (जन्म:५ जानेवारी १९३२)* *२००७:हैदर, कुर्रतुल ऐन-- भारतीय उर्दू लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी(जन्म:२०जानेवारी १९२७)* *२००६:बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (जन्म:२१ मार्च १९१६)**२००१:शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म:१ नोव्हेंबर १९२१)**२००१:मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर* *१९९५:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(जन्म:१९ आक्टोबर १९१०)**१९९१:गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (जन्म:२० एप्रिल १९१४)**१९८१:आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१ डिसेंबर १८८५)**१९७८:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज(जन्म:१२ एप्रिल१९१७)**१९७७:प्रेमलीला ठाकरसी – एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू(जन्म:१८९४)**१९७६:पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (जन्म:१३ डिसेंबर १८९९)**१९४०:लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक(जन्म:७ नोव्हेंबर १८७९)**१९३१:’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (जन्म:१८ ऑगस्ट १८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताश्रावणात घन निळा बरसला- कवी मंगेश पाडगावकरश्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधाराउलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरिपसाराजागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारीजिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारीमाझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारारंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षीनिळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षीगतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारापाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आलेमाझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झालेमातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारापानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषाअशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषाअंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरोग्य विभागातील नोकर भरती लवकरच सुरू होणार, जवळपास 12 हजार पदांची जाहिरात पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बफर स्टॉकमधील कांदा बाहेर काढणार, अनुदानित कांद्याची 25 रुपये किलो दराने विक्री, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांची वर्णी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने आयर्लंड वर 33 धावांनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *लातूर* महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'ज्ञानरचनावाद - समजपूर्वक शिक्षण'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) वीर - विरांगणांच्या सन्मानार्थ कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?३) जगप्रसिद्ध एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंगचे बालपणीचे नाव काय होते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय होते ?५) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे ?*उत्तरे :-* १) अशोक चेपटे व युवराज माने ( दोन्ही प्राथ. शिक्षक ) २) मेरी माटी, मेरा देश ३) नामग्याल वांगडी ४) सुभाषचंद्र जानकीनाथ बोस ५) राजस्थान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भूषण परळकर, नांदेड👤 दत्ता नरवाडे, सहशिक्षक, बिलोली👤 भीमाशंकर जुजगार, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 विश्वास बदापूरकर, येताळा👤 साईनाथ राचेवाड, सहशिक्षक, बिलोली👤 साईनाथ हवालदार, येवती👤 रघुनाथ सोनटक्के, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं सर्वच चांगलं आहे आणि इतरांचं सर्वच वाईट असते या प्रकारची जर...आपली विचारसरणी असेल तर ते, व्यर्थ आहे कारण, आपल्या परीने जर..आपले चांगलेच असेल तर...इतरांचेही त्यांच्या परीने थोडं तरी चांगले असू शकते प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात. म्हणून उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुख दु:ख*एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?" त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,"पाण्याची चव कशी वाटली ? तेव्हा शिष्य म्हणाला, "अतिशय खारट".त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."*विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!*संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक छायाचित्रण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २३१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.**१९४५:हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.**१९१९:अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९०९:इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.**१८५६:गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:जगदीशचंद्र शरदचंद्र पाटील-- लेखक,निर्माता,व्याख्याते**१९८०:सुनील प्रभाकर पांडे -- मराठी साहित्यिक* *१९७२:मोहन कुंभार -- लेखक कवी* *१९७१:उत्तम निवृत्ती सदाकाळ-- लेखक कवी**१९६५:हेमंत बिर्जे -- भारतीय अभिनेता**१९५९:प्रा.रेखा अशोक कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका संपादिका* *१९५५:डॉ.अशोक नरहरराव देव-- लेखक, संपादक* *१९५०:सुधा कुळकर्णी-मूर्ती-- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका* *१९४६:बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष**१९४६:प्रा.मधुकर गोपाळ देशपांडे -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक**१९४३:शरद सांभराव देऊळगावकर-- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक* *१९२२:बबनराव नावडीकर(मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार(मृत्यू:२८ मार्च २००६)**१९१८:शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)**१९०७:सरदार स्वर्ण सिंग – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर१९९४)**१९०६:प्राचार्य गणेश हरि पाटील-- मराठी कवी,शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यिक (मृत्यू:१ जुलै १९८९)**१९०५:वामन भार्गव पाठक-- कवी, कादंबरीकार,समीक्षक (मृत्यू:२७ जानेवारी १९८९)**१९०३:गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)**१८८६:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे नेते,वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:खय्याम(मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी)-- भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक(जन्म:१८ फेब्रुवारी १९२७)**२०१९:प्रा.मोतीराज राठोड-- विमुक्त भटक्या चळवळीचे लढवय्ये नेतृत्व,अभ्यासक, साहित्यिक,संशोधक( जन्म:२ सप्टेंबर १९४७)* *१९९४:लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म:२८ फेब्रुवारी १९०१)**१९९३:उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)**१९९०:रा.के.लेले – पत्रकार,संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक* *१९७५:डॉ.विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)**१९४७:विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(जन्म:१९ जानेवारी१९०६)**१६६२:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रावणातल्या कविता*हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आलातांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आलामेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आलालपत छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आलाइंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आलालपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आलासृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला- कुसुमाग्रजसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गौरी गणपती तसेच दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा! भाज्या, खाद्यतेल, इंधन स्वस्त होणार, मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जळगाव : मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ! फक्त 30 किमी अंतरावर, लँडिंगसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठलाची तिजोरी भरली, अधिक मासात भक्तांकडून 7 कोटी 19 लाखांचे दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. आयर्लंड पहिल्या T20 सामन्यात भारताचा दोन धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *कोल्हापूर* महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.➖रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'ज्ञानरचनावाद - समजपूर्वक शिक्षण'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) वीर - विरांगणांच्या सन्मानार्थ कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?३) जगप्रसिद्ध एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंगचे बालपणीचे नाव काय होते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय होते ?५) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे ?*उत्तरे :-* १) अशोक चेपटे व युवराज माने ( दोन्ही प्राथ. शिक्षक ) २) मेरी माटी, मेरा देश ३) नामग्याल वांगडी ४) सुभाषचंद्र जानकीनाथ बोस ५) राजस्थान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. शिवा टाले, नांदेड👤 उत्तम सदाकाळ, साहित्यिक, जुन्नर👤 संभाजी पा. वैराळे👤 महेश हातजाडे👤 संतोष कडवाईकर👤 संदीपराजे गायकवाड, मुख्याध्यापक, बिलोली👤 प्रिती माडेकर-दरेकर, वणी, यवतमाळ👤 योगेश मठपती👤 कवयित्री अंतरा👤 मोहन शिंदे👤 मन्मथ चपळे👤 विलास वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥तया अंतरी क्रोध संताप कैंचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाणी गढूळ दिसत असले तरी तो सदैव निर्मळ असते कारण उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात गरम,थंड या प्रकारे पाण्यात थोडे बदल करून आपण आंघोळीसाठी पाण्याचा वापर करत असतो . पण,शेवटी पाण्याशिवाय आपले काम होत नाही. तसंच आपल्यावर आलेल्या परिस्थितीतून शिकून घ्यावे, हीच जाणीव ठेवून आपण देखील स्वत:त बदल करून घेण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. आपले विचार नेहमीच सकारात्मक असू द्यावे. निर्मळ पाण्यासारखे!🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गवळण आणि तिच्या घागरी* राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरीं मध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार ती करू लागली." जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबड्या विकत घेईन." तिने विचार केला, "कोंबड्या अंडी घालतील आणि मला अजून कोंबड्या मिळतील, त्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन, गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील. ते मला विचारतील, "तुला पोल्ट्री फार्म विकायचे आहे का?" पण मी डोकं असं हलवून नकार देईन असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली. तात्पर्य: पेरल्याशिवाय उगवणार नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.**२००५:ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात**१९९९:कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.**१९४२:शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.**१९२०:अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१८४१:जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:सोमनाथ विश्वनाथ गायकवाड-- कवी* *१९८०:प्रीती जंघियानी – अभिनेत्री**१९७९:सावनी शेंडे-साठ्ये-- आघाडीची शास्त्रीय संगीत गायिका**१९७६:प्रा.डॉ.वीरा पवन मांडवकर-- लेखिका, संपादिका* *१९७२:राजश्री विठ्ठल सुतार-- कवयित्री लेखिका* *१९६७:दलेर मेहंदी – भांगडा गायक**१९६५:मुरलीकुमार सोळंके-- लेखक* *१९५९:कामिल पारेख-- लेखक* *१९५९:पूर्णिमा प्रदीप हुंडीवाले-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५६:संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज**१९५५: डॉ.मधुसूदन एकनाथ घाणेकर-- विश्वविख्यात हस्ताक्षर मनोविष्लेशण तज्ञ, संपादक, सुप्रसिद्ध कलाकार* *१९५२:विलास गिते-- लेखक, अनुवादक* *१९४४:शैलजा भालचंद्र काळे -- बालसाहित्यिक (कथा, कादंबरी कविता चरित्र इ.)(मृत्यू:८ एप्रिल २०१०)**१९३६:रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर**१९३४:संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक**१९२३:सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)**१९००:विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू:१ डिसेंबर १९९०)**१८८६:सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)**१८७२:’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)**१७३४:रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)**१७००:थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:प्रभाकर लक्ष्मण मयेकर-- मराठी नाटककार, मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध(जन्म :४ एप्रिल १९४६)* *२००८:नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)**_१९७९:महानायक वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:१ जुलै १९१३)_**१९९८:पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)**१९४५:नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म:२३ जानेवारी १८९७ )**१९४०:वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रावणातल्या कविता*आला आषाढ-श्रावण– बा.सी.मर्ढेकरआला आषाढ-श्रावणआल्या पावसाच्या सरी;किती चातकचोचीनेप्यावा वर्षाऋतू तरी!काळ्या ढेकळांच्या गेलागंध भरून कळ्यांत;काळ्या डांबरी रस्त्याचाझाला निर्मळ निवांत.चाळीचाळीतून चिंबओंली चिरगुटें झाली;ओल्या कौलारकौलारींमेघ हुंगतात लाली.ओल्या पानांतल्या रेषावाचतात ओले पक्षी;आणि पोपटी रंगाचीरान दाखवितें नक्षी.ओशाळला येथे यम,वीज ओशाळली थोडी,धावणाऱ्या क्षणालाहीआली ओलसर गोडी.मनी तापलेल्या ताराजरा निवतात संथ;येतां आषाढ-श्रावणनिवतात दिशा-पंथ.आला आषाढ-श्रावणआल्या पावसाच्या सरी;किती चातकचोचीनेप्यावा वर्षाऋतू तरी!संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर खंडपीठाचं सुटीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , शिर्डीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंहला पदार्पणाची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *जालना* महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा व कुठे झाले ?२) 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' असे कोणी म्हटले होते ?३) सुभाषचंद्र बोस यांना 'देशनायक' कोणी म्हटले होते ?४) फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली ?५) नेताजी हे टोपणनाव कोणाचे आहे ?*उत्तरे :-* १) १८ ऑगस्ट १९४५ ( तैवान, विमान अपघात ) २) सुभाषचंद्र बोस ३) रवींद्रनाथ टागोर ४) सुभाषचंद्र बोस ( ३ मे १९४० ) ५) सुभाषचंद्र बोस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेखर हेमके👤 शेख समदानी, शिक्षक, बिलोली👤 गजानन देवकर👤 अगस्त्या तावरे👤 कल्याण आळंदी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुके प्राणी असोत किंवा झाडे,फुले तसेच इतर अनेक वस्तू न बोलता,सांगता निसर्ग नियमांचे पालन करतात .निसर्गापासून मनुष्याला शिकण्यासारखं बरच काही आहै. पण, ज्याला बोलता,चालता येते,सर्व काही समजते तरीही सत्य काय आहे याकडे मात्र मनुष्य कायमच दुर्लक्ष करत.आला आहे .म्हणून बोलत्या, चालत्या मनुष्याची वागणूक पशुलाही लाजवेल अशी असते.मानव प्राणी समाजशील असूनही अशी वर्तणूक का.? याचा शोध प्रत्येक मनुष्य प्राण्याने घेण्याची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१०:जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.**१९९४:बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर**१९६०:सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४६:कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.**१९१३:स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५:प्रा.सुरेश आडके -- कथा व कादंबरीकार लेखक**१९७८:संजय नाना गोरडे-- कवी,लेखक* *१९७२:संदीप बाळासाहेब वाकचौरे-- लेखक* *१९७०:मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री**१९७०:सैफ अली खान – अभिनेता**१९६७:नरेंद्र भगवंतराव नाईक-- प्रसिद्ध कादंबरीकार,कवी* *१९५९:मंगेश विश्वासराव-- जेष्ठ पत्रकार, मराठी साहित्यिक* *१९५८:मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका**१९५७:रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर.आर.पाटील- माजी उपमुख्यमंत्री म.रा( मृत्यू: १६ फेबुवारी २०१५)**१९५४:हेमलता – पार्श्वगायिका**१९५२:कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री**१९५०:जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९४९:अच्युत वझे-- रंगकर्मी, लेखक* *१९४४:प्रा.तुकाराम पाटील-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३७:प्रा.आर.व्ही.मुदलियार -- लेखक**१९३४:विष्णुपंत गोपाळराव ब्रह्मनाथकर -- लेखक**१९३४:वसंत पेंढारकर-- जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या कविता करणारे कवी (मृत्यू:३१ जुलै २००८)* *१९३२:नारायण आठवले-- मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार(मृत्यू:२८ एप्रिल २०११)**१९२६: वसंत रामराव रत्नपारखी-- लेखक* *१९१३:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू:९ मार्च १९९२)**१९०४:सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू:१५ फेब्रुवारी १९४८)**१८७९:जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:चेतन चौहान-- माजी क्रिकेटर(जन्म:२१ जुलै १९४७)* *२०१८:अटलबिहारी वाजपेयी- माजी भारतीय पंतप्रधान आणि प्रसिद्ध हिंदी कवी, भारतरत्न(२०१४) (जन्म:२५ डिसेंबर १९२४)**२०१०:नारायण गंगाराम सुर्वे – प्रसिद्ध कवी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:१५ आक्टोबर १९२६)**२०००:रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म:५ जुलै १९५२)**१९९७:अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन**१९९७:नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी गायक (जन्म:१३ आक्टोबर १९४८)**१९७७:एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म:८ जानेवारी १९३५)**१७०५:जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म:२७ डिसेंबर १६५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातील कविताश्रावणमासश्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे. उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमतीसुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांतवदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या घोषणाची कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब; विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरपासून लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोली आणि गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना, 71 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत डीटीएच कनेक्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारची मोठी भेट, पीएम ई-बस सेवेला मंजुरी; 10,000 बस चालवण्याची योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 16 ऑगस्टपासून महिनाभर पर्यटकांसाठी राहणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रेयस अय्यर तंदुरुस्त, सराव सामन्यात घेतला भाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *जळगाव* महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.➖ रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात जास्त अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत ?२) भारताकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत ?३) पाकिस्तानकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत ?४) मानवी शरीरातील लाल रक्तकनिकांची निर्मिती कोठे होते ?५) राष्ट्रीय कन्या दिवस केव्हा साजरे केले जाते ?*उत्तरे :-* १) रशिया - ५८८९, अमेरिका - ५२४४, चीन - ४१० २) १६४ अण्वस्त्रे ३) १७० अण्वस्त्रे ४) अस्थिमज्जा ५) २४ जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी मदन इंगळे, साहित्यिक👤 मीना खोंड, साहित्यिक, हैद्राबाद👤 अरुणा राजीव भोसले, शिक्षिका, कोल्हापूर👤 राजेश कुंटुरकर, संचालक, नां.जि.म.बँक👤 रवींद्र धुप्पे, धर्माबाद👤 बालाजी बरडे, धर्माबाद👤 सचिन येडके, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फायद्याची गोष्ट असेल तर तेथे मात्र अफाट गर्दी बघायला मिळत असते.पण,आपल्या सभोवती अडचणी असून सुद्धा त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण वेळ काढत नाही व त्यातील एखादी व्यक्ती जेव्हा, पुढाकार घेऊन विचार मांडत असते त्यालाही आपण साथ देत नाही,उलट त्याला विरोध करणारे अनेक हाथ पुढे येतात. हे सत्य आहे सत्य काय यावर मात्र विचार करणारे फार कमी लोक असतात. मग अडचणी कमी होण्याऐवजी वाढत जातात अशा परिस्थितीत अडचणी दूर होतील.का..? म्हणून स्वतःचाच विचार करण्यापेक्षा इतरांच्या अडचणी जाणून त्यातून कशाप्रकारे मार्ग काढता येईल याचा विचार करायला पाहिजे.सकारात्मक कार्यासाठी थोडातरी वेळ काढायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अकबर व बिरबल*अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले. जेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले "हे काय प्रकरण आहे?" तेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,"शहरात किती कावळे आहेत?" बिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,"एकवीस हजार पाचशे तेवीस" अकबराने बिरबलाला विचारले,"तुला उत्तर कसे ठाऊक?" बिरबलाने उत्तर दिले, "तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील." बिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली. तात्पर्य : आपल्या उत्तरासाठी स्पष्टीकरण असणे हे उत्तराइतकंच महत्वाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वाचन विकास भाषिक उपक्रम 📚शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍🌺शब्दटोपली क्र. (११) अंत,आंबा ,आंतर ,आंबट ,आंघोळ ,आंतरिक ,आंदोलन ,आंनद ,इंच ,इंडिया ,इंग्रजी ,उंच ,उंची ,उंदीर, उंचीची ,उंट ,उंचवटा, उंचीवर, उंचीचा,अंश,अंदाज अंतीम, कंपनी,कंटाळा,कुंपण,कुंकू ,कोंबडा ,कोंडा ,कोंब, कोंडून ,कोंडमारा ,खंड ,खंत ,खंडात ,खंडातील, संत, रिंग, सोंड, अंगण,अंतर,अनंत,पतंग, नंदी, सांग, लांब,वंदन, कुंडी, थंडी, भेंडी,रिंग ,पिंपळ ,पिंगट, वसंत, जंगल, मुंगी, लांडगा, तंबोरा, संतूर,थांबला ,चांदणे, सुंदर, चांगला, रंग, संकट ,पसंत ,मुंगी, संत्री ,आंबे, अंधार, अंजीर, अंगठी, अंक, चांदणी, गंगा,भिंत ,वंदन, मंदिर ,संदेश, पितांबर, तांबडा ,तोंडली, थंडी ,चिंट्या ,संक्रांत ,मंत्र चंद्र ,स्वतंत्र ,सोंगट्या, बांगड्या ,संध्याकाळ ,संतुष्ट, केंद्र ,वृंदावन ,हेमंत , संत्री ,पांढरा, मकरंद ,चंदन , अंगरखा,अभिनंदन, रघुनंदन,नंदादिप, सफरचंद.➖➖➖➖➖➖➖✍संकलन / लेखनप्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣🇮🇳 ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🇮🇳🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१०:पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.**२००६:श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.**१९७१:बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५८:’एअर इंडिया’ची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.**१९४७:भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.**१९४७:पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८९३:मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.**१८६२:मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना**१८६२:कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना**१६६०:मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८०: ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी(ज्ञानेश)-- कवी* *१९७३:प्रा.डॉ.गिरीश नारायणराव सपाटे-- कवी,समीक्षक* *१९६८:प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू**१९६४:संजय सोनवणी-- मराठी साहित्यिक, कथा,कादंबरी,कविता,तत्वज्ञान,इतिहास संशोधन असे चौफेर लेखन**१९५७:डॉ.श्याम हिराचंद मोहरकर-- लेखक* *१९५७:जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’– विनोदी अभिनेता**१९५३: डॉ.सर्जु काटकर -- अनुवादक* *१९४८:यशवंत बाबुराव कदम-- लेखक, कवी**१९३९:शांता गोखले-- लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक,साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित**१९३५: वीणा चिटको--- लेखिका,कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक(मृत्यू:१९ सप्टेंबर २०१५)**१९२५:जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.कथा,कादंबरी,नाटक, प्रवासवर्णन,विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. (मृत्यू:१६ सप्टेंबर १९९४)**१९१५:सिंधू गाडगीळ-- कादंबरीकार कथाकार* *१९१०:डॉ.गणेश त्र्यंबक देशपांडे-- मराठी व संस्कृत लेखक(मृत्यू:१६ नोव्हेंबर १९८९)* *१९०७:गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(मृत्यू:८ आक्टोबर १९९६)**१७७७:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:विनायक तुकाराम मेटे-- पूर्व विधान परिषद सदस्य शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख(जन्म:३० जून १९६३)**२०२०:पंडित सुधीर माईणकर -- ज्येष्ठ तबलावादक,संशोधक,लेखक,संगीततज्ज्ञ (जन्म:१६ मे १९३७)**२०१२:विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म:२६ मे १९४५)**२०११:शम्मी कपूर – सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१)**१९८८:एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)**१९८४:कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म:१५ जानेवारी १९२६)**१९५८:जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म:१९ मार्च १९००)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कनकलता बरुवा*कनकलता बरुवा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरबाला म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण भारतभर त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू होतं. अगदी ईशान्य कडील राज्य ही त्याबाबत मागे नव्हती.कनकलता बरुवा या आसाममधल्या. आसाममधून त्यांनी १९४२ च्या आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी बारंगबारी येथून केलं. त्यावेळेस त्यांना ‘भारत छोडो’ च्या घोषणा देत गोहपुर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायचे होते.आणि तिथे त्यांना तिरंगा फडकवायचा होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांना मध्येच अडवले. त्या ब्रिटिशांना सांगत होत्या की आमच आंदोलन हिंसक नाही, तरीदेखील ब्रिटिशांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.त्यांच्यावर जोरदार लाठीमार करण्यात आला आणि त्यातच वयाच्या केवळ १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात स्वातंत्र्यदिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देश सज्ज, देशातील 1 हजार 800 जणांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीक विम्यानंतर आता सरकार मेंढ्यांचा 1 रुपयांत विमा काढणार ? अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच रस्त्यावर धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फुटबॉलप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरही आता लाल कार्ड दिसणार, चुका केल्यावर मैदानाबाहेर जावे लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *हिंगोली* महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वातंत्र्य आणि मुक्तता पेक्षा अधिक काहीही मौल्यवान नाही. – हो ची मिन्ह*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "मी इथे तुमच्यासमोर उभा आहे, भले तुम्ही माझ्यावर गोळ्या झाडा, पण माझ्या तिरंग्याचा अपमान होऊ देणार नाही" हे वाक्य कोणाचे आहे ?२) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा लोकमान्य टिळक यांनी कोठे केली ?३) D. N. A. चा शोध कोणी लावला ?४) जागतिक पाणथळ भूमी दिन कधीपासून साजरा केला जातो ?५) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?*उत्तरे :-* १) शहीद शिरीषकुमार ( १५ वर्ष ), नंदूरबार २) बेळगाव, कर्नाटक ३) फ्रेड्रिक मिशर ४) सन १९९७ ५) देवनागरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर👤 पवन लिंगायत वळंकी👤 गजानन पाटील👤 राम दिगंबर होले👤 मुनेश्वर सुतार👤 गणेश शंकर ईबीतवार, येवती👤 गजानन गंगाधरराव रामोड, जारीकोट*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥ करी सुखसंवाद जो उगमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले स्वतःचे दु:ख इतरांना सांगत फिरणे व तेच दु:ख स्वतः सहन करणे यात खूप फरक आहे. कारण कधी, कधी असं होतं की, आपण मनमोकळेपणाने आपले दु:ख एखाद्या व्यक्तीला सांगताना त्या,व्यक्तीला पूर्णपणे वाचत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी न सांगता येत असतात. दु:ख कमी होण्या ऐवजी वाढत जातात.शेवटी आपले दु:ख आपल्यालाच सहन करून त्यातून मार्ग काढावे लागते. त्यासाठी इतरांना सांगत फिरण्यापेक्षा जीवनात आलेल्या दु:खाचे स्वागत करावे कारण, दु:खातूनच शेवटी सुखाची प्राप्ती होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नंदुरबारच्या शिरीष कुमारचे स्वातंत्र्यासाठी बलिदान- लेखक मुकुंद बाविस्कर(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्याच वेळी महात्मा गांधी यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘चलेजाव’, ‘भारत छोडो’ आणि ‘करेंगे या मरेंगे’. तो दिवस होता ८ ऑगस्ट १९४२. महात्मा गांधी यांच्या मुखातून बाहेर पडलेले हे निर्वाणीचे शब्द जणू काही धगधगत्या निखाऱ्यासारखे होते.संपूर्ण देशात स्वातंत्र्य आंदोलनाला वेग आला होता. हजारो तरुण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले होते. त्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबारचा पंधरा वर्षांचा, आठवीत शिकणारा एक कुमारवयीन मुलगा शिरीष कुमार मेहता देखील होता. त्याची आई सविता आणि वडील पुष्पेंद्र मेहता हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले होते.शिरीष कुमारला लहानपणापासून स्वातंत्र्य, देशाभिमान आदींचे बाळकडू मिळाले होते. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचे आदर्श होते. शिरीष कुमारचे घर म्हणजे कार्यकर्ते व क्रांतिकारकांचे मंदिर होते. भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. महात्मा गांधी यांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चे निघाले. शिरीषकुमार यांनी देखील आपल्या मित्रांसमवेत नंदुरबार शहरात मोर्चा काढण्याचा निश्चय केला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी नंदुरबार शहरात भव्य प्रभात फेरी निघाली.‘नही नमेगी, नही नमेगी, निशाण भूमी भारत’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला. पोलीस चौकीसमोर मुलांनी घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अटक केली आणि सायंकाळी सोडून दिले. परंतु त्यानंतर पुन्हा रोजच मोर्चे निघू लागले. कधी मशाल मोर्चा, तर कधी हात फलक घेऊन मोर्चा असा प्रकार महिनाभर सुरू होता. हळूहळू सारा गाव शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या मागे जमू लागला.शिरीष कुमारने शाळेतही घोषणाबाजी सुरू केल्याने मुख्याध्यापकांनी त्याला समज दिली. परंतु मुलांचा जोर आणखीनच वाढला. महिनाभराचा कालावधी उलटला तरी महात्मा गांधी आणि सहकार्यांची सुटका झाली नव्हती, त्यामुळे आंदोलन आणखीनच तीव्र होऊ लागेल. ९ सप्टेंबरचा दिवस उजाडला. नंदुरबार शहरातून प्रभात फेरी निघाली. त्यात शिरीष कुमार आणि त्याचे सवंगडी अग्रभागी होते. त्यांनी शाळेत तिरंगा फडकला आणि मिरवणुक पोलीस कचेरी जवळ आली. शिरीष कुमारच्या हातात तिरंगी झेंडा होता.पोलिसांनी मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. तसेच मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला. शिरीष कुमार आणि साथीदार माणिक चौकात शांततेत तिरंगा फडकवून माघारी फिरणार होते. परंतु पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलीस संतप्त झाले. त्यांनी तिरंगा झेंडा जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरीषकुमार याने हातातून झेंडा देण्यास नकार दिला. ‘प्राण घ्या पण झेंडा मिळणार नाही’, असे बाणेदार उत्तर शिरीष कुमार याने दिले.पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार करण्यासाठी नेम धरला. शिरीषकुमार म्हणाला, ‘गोळी मारायची तर मला मारा, हा मी इथे उभा आहे’, पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या तीन गोळ्या शिरीषकुमारच्या छातीवर बसल्या. तो जागीच कोसळला. या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे चौघे देखील शहीद झाले. मोठा गोंधळ उडून पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांनी तेरा कार्यकर्त्यांना अटक केली. शिरीष कुमार आदि हुतात्म्यांचे बलिदान सार्थ ठरले. देश स्वतंत्र झाला. नंदुरबार शहरात बाल क्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक आहे. हे स्मारक नेहमीच बलिदानांची साक्ष देते.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय युवा दिन_**_आंतरराष्ट्रीय हत्ती दिन_**_भारतीय ग्रंथपाल दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २२४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००५:श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.**२००२:१२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.**२०००:प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड**१९९८:सचिन तेंडुलकर यांना ‘राजीव गांधी खेल रत्न‘ पुरस्कार जाहीर**१९९५:जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.**१९८९:कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.**१९८२:परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.**१९८१:आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.**१९७७:श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.**१९६४:वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.**१९५०:अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.**१९४८:लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.**१९४२:चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी**१९२२:राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९२०:शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.**१८५१:आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:सुरेश वांदिले-- एक बहुआयामी, पथदर्शी,भविष्यवेधी लेखक पूर्व संचालक माहिती व जनसंपर्क विभाग* *१९५९: गुरुनाथ तेंडुलकर-- कथाकार* *१९५९:प्रवीण महादेव ठिपसे-- 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू**१९५६: चित्रा जगदीश शर्मा-- लेखिका, कथाकार* *१९५३:कांताराम गंगाराम सोनवणे-- कवी, लेखक,पत्रकार* *१९५२:अनंत सामंत-- सुप्रसिद्ध मराठी लेखक**१९४८:फकिरा मुंजाजी तथा ’फ. मुं.’ शिंदे – प्रसिद्ध कवी, समीक्षक व अनुवादक**१९४४:मिलिंद श्रीपती येरमाळकर-- कवी लेखक**१९२६:बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार* *१९२४:मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)**१९१९:डॉ.विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (मृत्यू:३१ डिसेंबर १९७१)**१९०६:लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात-- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)**१८९२:एस.आर.रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)**१८८७:आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)**१८८१:सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)**१८८०:बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार,वाड्मयविवेचक( मृत्यू:१९६८)**१८०१:जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:माधव गरड --ज्येष्ठ कवी,ललित लेखक (जन्म:२५ ऑक्टोबर १९६०)* *२००५:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म: १२ एप्रिल १९३२)**१९८२:हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५)**१९७३:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म:१२ मार्च १९११)**१९६४:इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *अरुणा असफ अली*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे देखील एक मोठं नाव. ’द ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून त्या ओळखल्या जातात. भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस त्यांनी मुंबईत झालेल्या आंदोलनात भारताचा ध्वज हातात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले होते.आंदोलनात सहभाग घेतला, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगात असतानाही कैद्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलही त्यांनी तुरुंगात देखील आंदोलन केले होते.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतीय दंड संहितेतील ब्रिटिशकालीन राजद्रोहाचं कलम रद्द करणार; CrPC दुरुस्ती विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारची तिजोरी भरली, 10 ऑगस्टपर्यंत 6.53 लाख कोटी प्रत्यक्ष कर जमा, 15.7 टक्क्यांची भरघोस वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट ही वगळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील आठवडाही मान्सूनची विश्रांती, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्टइंडिज मधील पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळला जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *गोंदिया* महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य कसा मरतो ते महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्त्वाचे आहे.➖ जाॕन्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अविश्वास प्रस्तावाला सर्वाधिक ( १५ वेळा ) सामोरे जाणारे पंतप्रधान कोण ?२) नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला ?३) किमान किती खासदारांच्या पाठिंब्याने कोणताही खासदार मंत्रिपरिषदेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतो ?४) अविश्वास प्रस्ताव कोणत्या एकाच सभागृहात आणता येतो ?५) जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता ?*उत्तरे :-* १) इंदिरा गांधी २) काँग्रेस खासदार गौरव गोगोई ३) ५० खासदार ४) लोकसभा ५) भारतीय जनता पक्ष ( BJP )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 वसंत हंकारे, प्रसिद्ध वक्ते व प्रबोधनकार👤 पी. टी. लखमावाड, माजी गटशिक्षणाधिकारी, नांदेड👤 दीपक कोकरे👤 भीमा भंडारी👤 आशिष अग्रवाल👤 बालाजी घायाळ👤 पांडुरंग गायकवाड👤 रवीकुमार येळवीकर, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काट्यांमधून फुले कसे फुलत असतात आणि फुलायचे कसे ते सर्वांना सांगून जातात त्या फुलांकडून शिकावे, खळखळून हसायचे कसे तान्ह्या बाळाकडून शिकावे, स्वतः तिन्ही कडक ऋतूत राहून सर्वांना प्राणवायू कशा प्रकारे दिल्या जाते त्या झाडांकडून शिकावे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यांना बोलता येत नाही तरीही जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे ते प्रत्येक बोलत्या, चालत्या माणसाला सांगून जातात. आपण एकदा तरी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करून बघितले पाहिजे. आपले जीवन देखील त्या काट्यांनी भरलेल्या गुलाबा समान आहे.आपल्याला देखील काटेरी वाटेवरून जीवन जगायचे आहे.पण हे आपल्याला कधी समजणार आहे..?🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला !•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१३:डॉ.सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.**१९९९:बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.**१९९९:शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.**१९९४:अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ.फातिमा मीर यांना ’विश्वगुर्जरी पुरस्कार’ जाहीर**१९८७:'युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह’ च्या अध्यक्षपदी अॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.**१९७९: गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**१९६१:दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.**१९६०:चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५२:हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.**१९४३:सी.डी.देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.**१८७७:अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:माणिक उत्तमराव सोनवणे -- कवी* *१९८२:सारंग साठ्ये --अभिनेता,दिग्दर्शक, निर्माता,'भाडिपा'चा संस्थापक**१९८१:शितल कृष्णानंद राऊत-- कवयित्री**१९७४:अंजू जैन --महिला क्रिकेटपटू**१९६७:अशोक लक्ष्मण कुमावत-- कवी* *१९५८:गीता हरिभाऊ गद्रे-- कवयित्री, लेखिका* *१९५४:यशपाल शर्मा – क्रिकेटपटू(मृत्यू:१३ जुलै २०२१)**१९५२:बंडा जोशी-- सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार,आकाशवाणी निवेदकआणि ख्यातनाम हास्यकवी**१९४८:डॉ.प्रभा देशपांडे --कवयित्री,लेखिका* *१९३५:सदाशिव जनार्धन कोडोलीकर-- लेखक* *१९२८:विनायक सदाशिव तथा वि.स. वाळिंबे –विचारवंत पत्रकार,अभ्यासू संपादक, सुप्रसिद्ध कादंबरीकार(मृत्यू:२२ फेब्रुवारी २०००)**१९२८:मीरJा निमकर-- कादंबरी लेखिका**१९२८:रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान(मृत्यू:१ जानेवारी २००९)**१९२२:शंकर विनायक कुलकर्णी-- लेखक* *१९२०:नागेश शिवलिंगआप्पा मोगलाईकर-- कवी,लेखक* *१९११:प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (मृत्यू: ८ मे १९९५)**१९१०:वासुदेव बळवंत गोगटे --लेखक आत्मचरित्रकार (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९७४)**१८९७:एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर -- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते,दिग्दर्शक,नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार(जन्म:२५ नोव्हेंबर १९२१)**२०११:विनायक रामचंद्र आठवले-- हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक(जन्म:२० डिसेंबर १९१८)**२००४:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार(जन्म:२० फेब्रुवारी १९२८)* *२००३:अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)**२०००:पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)**१९९९:रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (जन्म:३१ आक्टोबर १९४६)**१९७०:इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (जन्म:१५ डिसेंबर १९०५)**१९६७:म.म.बाळशास्त्री हरदास-- ज्ञानक्षेत्रातील भाष्यकार (जन्म:३०ऑगस्ट१९१८)* *१९०८:खुदिराम बोस – क्रांतिकारक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कॅप्टन लक्ष्मी सहगल*नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यातील स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी केलं.आझाद हिंद सेनेबरोबर काम करताना लक्ष्मी सहगल यांनी हेच दाखवून दिलं की, अहिंसक मार्गाने होणारे आंदोलन असो किंवा लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत.आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता, त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवासही भोगावा लागला होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत बदल, सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश, तीन सदस्यांच्या समितीत सत्ताधाऱ्याचं बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संसदेत IIM Mumbai बिल पास, या वर्षीच्या NITIE च्या सर्व मुलांना आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा; प्रलंबित आर्थिक मुद्द्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक, 11 सप्टेंबरला उपोषणाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गृहिणींचे बजेट कोलमडणार! सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट, डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *धुळे* महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो तर, बुद्धीचा विकास एकांतात होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूप कोठे लावण्यात येणार आहे ?२) जगातील सर्वाधिक वजनाच्या कुलुपाची लांबी, रुंदी, जाडी किती ?३) जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूप बनविणारे कारागीर कोण ?४) अयोध्या येथील राम मंदिराला किती वजनाचे कुलूप लागणार आहे ?५) ४०० किलो वजनाच्या कुलूपाची चाबीचा वजन किती आहे ?*उत्तरे :-* १) राम मंदिर, अयोध्या २) १० फूट उंच, ४.५ फूट रूंद, ९.५ इंच जाडी ३) प्रकाश शर्मा, अलिगड ४) ४०० किलो ५) अर्धा किलो ( ४ फूट उंच )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सतीश सोनवणे, संपादक, नांदेड👤 निळकंठ चोंडे, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश खोसे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, उस्मानाबाद👤 दत्ताहरी पाटील पवार👤 ओमप्रकाश कहाळेकर👤 साईप्रसाद मठपती👤 भास्कर कुमारे, पांगरी👤 विशाल ढगे👤 आशिष देशपांडे, पत्रकार, नांदेड👤 लोकडोबा कौठवाड👤 याहीया खान पठाण, संपादक, धर्माबाद👤 शरद सूत्रावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे अंतरी काम नानाविकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥ निवाला मनीं लेश नाही तमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखे घडून येतील असेही नाही. कारण, काही गोष्टी शिकण्यासाठी खूप काही सहन करावा लागतो एवढेच नाही तर..त्याग सुद्धा करावा लागतो. म्हणून जीवन जगत असतांना दु:खी न होता सदैव प्रयत्न करत रहावे व प्रसन्न मनाने रहावे.योग्य वेळ आल्यावर आपोआप सर्व गोष्टी बघायला मिळत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुयाचे झाड*एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली. तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ऑगस्ट क्रांतिदिन_**_जागतिक आदिवासी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२०००:भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३:छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५:पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५:मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५:अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२:’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५:भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९८३:व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर-- कवी लेखक* *१९७०:अजय बाळकृष्ण कांडर--प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९६९:विवेक मुशरन-- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८:गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार* *१९६७:डॉ.वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६:गोविंद पाटील-- कवी**१९६६:अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४:प्रा.बाबुराव दत्तात्रय गायकवाड-- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९४९:प्रा.रवीचंद्र माधवराव हडसनकर-- कवी,गीतकार,लेखक**१९४७:रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६:सावनकुमार टाक-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि गीतकार (मृत्यू:२५ऑगस्ट२०२२)**१९२०:कृ.ब.निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(३० जून १९९९)**१९०९:डॉ.विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)**१८९०:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू:४ आक्टोबर १९२१)**१८१९:विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू:९ऑगस्ट१९०१)**१७७६:अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६)**१७५४:पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू:१४ जून १८२५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:प्रदीप पटवर्धन--लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म:१ जानेवारी १९५८)**२०१७:प्रा.शांताराम पवार -- चित्रकार,कवी(जन्म:१७ ऑगस्ट१९३६)**२००२:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म:१ जानेवारी १९१८)**१८९२:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(जन्म:१ जानेवारी १८५८)**१९७६:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म:१४ फेब्रुवारी १९१४)**१९०१:विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कित्तूर राणी चन्नम्मा*कित्तूर राणी चन्नम्मा ( जन्म २३ ऑक्टोबर १७७८ - मृत्यू २१ फेब्रुवारी १८९२) ही धारवाड आणि बेळगावच्या दरम्यान असलेल्या कित्तूर या राज्याची राणी होती.कर्नाटकातील कित्तूर मधील राणी चन्नम्मा हिनेदेखील ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला. सैन्याने केलेल्या उठावाचे नेतृत्व तिने केले वयाच्या ३३ व्या वर्षी तिने ब्रिटिश सैन्याविरुद्ध शूरपणे लढा दिला.१८२४ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध सशस्त्र विद्रोह सुरू झाला. या क्षेत्रावर भारतीय नियंत्रण होते परंतु त्यास योग्य प्रकारे ठेवण्यात ती राणी कमी पडली असे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणणे होते. सशस्त्र विद्रोहात ती पराभूत झाली तुरुंगातच तिचा मृत्यू झाला. पराभूत झाला व त्याला ठार मारण्यात आला. ब्रिटीश शासनाविरुद्ध बंड करणाऱ्या पहिल्या महिला शासकांपैकी ती एक होती.तिचा पराक्रम कर्नाटकातील महिलांसाठी त्यावेळेस प्रेरणादायी ठरला होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने कहर केलाय. राज्यभरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तब्बत अडीच लाखांपर्यंत पोहोचलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वैद्यकीय प्रवेशासाठी 10 लाखांची लाच; पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा डिन रंगेहात जाळ्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगारांच्या मुख्य समस्या आणि मागण्या मान्य झाल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री झालेली चर्चा यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित, कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नियंत्रणात आणणारं, सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, सुमोटो याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात शपथपत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *बुलडाणा* हा जिल्हा अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ज्ञात होते.भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा अर्थ रुपांतर आहे. जे थांबेल ते मृत्यू व जे पुढे जात राहील ते जीवन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे ?२) महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?३) जगात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ?४) महाराष्ट्रातील पुणे विभागात किती जिल्हे आहेत ?५) कोणत्या देशात सर्वाधिक प्रमाणवेळा आहेत ?उत्तरे :- १) कर्कवृत्त २) सिंधुदुर्ग ३) मॉरिसरॅम व चेरापुंजी ४) पाच ५) फ्रान्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनूरकर, साहित्यिक, उमरी👤 बुद्धभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 ऋषिकेश जाधव👤 सुशीलकुमार भालके👤 विलास पानसरे👤 बालाजी तेलंग👤 गणेश पांचाळ👤 विलास पाटील करखेलीकर👤 विनायक कुंटेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य साचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे. आणि तो, सर्वांनाच करावा लागतो. हेही तेवढेच सत्य आहे. संघर्ष केल्याशिवाय जीवनाचे महती कळत नाही. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवून जगले पाहिजे. आपल्या वरती कशीही परिस्थिती आली तरी कधीही चुकीचे पाऊल उचलू नये. कारण, माणसाचे जीवन एकदाच येते दुसऱ्यांदा नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वटवृक्ष आणि गवत*एक वडाचे झाड होते. त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते. ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे, इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला येतात.”काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची सुद्धा तीच गत झाली. वादळ ओसरल्यावर गवत मात्र शाबुत होते. कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_भारत छोडो दिन_* *_ या वर्षातील २२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२०००:महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर**१९९८:संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.**१९९४:पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.**१९८५:भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९७४:वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.**१९६७:इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.**१९६३:इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.**१९४२:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू**१९७९:जास्मिन रमजान शेख -- कवयित्री, लेखिका,समुपदेशक* *१९७०:शिवाजी निवृत्ती राव घुगे-- कवी लेखक* *१९६९:डॉ.आशुतोष राराविकर -- अर्थशास्त्रज्ञ व प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६७:डॉ मोना मिलिंद चिमोटे-- समीक्षक, संशोधक आणि लेखिका* *१९६४:विवेक दत्तात्रय जोशी-- प्रसिद्ध कवी* *१९५८:अशालता अशोक गायकवाड-- कवयित्री,लेखिका**१९५५:श्याम खांबेकर--गीतकार व कवी* *१९५१:अरुण वि. देशपांडे--लेखक,कवी,बाल साहित्यिक,समीक्षक**१९४८:प्रा.डॉ.रमेश जाधव-- इतिहास संशोधक**१९४७: सुरेशचंद्र वारघडे-- लेखक* *१९४०:दिलीप सरदेसाई–क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७)**१९३९:डॉ.रंगनाथ नाथराव जोशी-- गीतकार, लेखक* *१९३५:डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:४ डिसेंबर २०१८)**१९३४:डाॅ. माधव आत्माराम चितळे-- जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ**१९३२:दादा कोंडके – सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक(मृत्यू:१४मार्च १९९८)**१९२६:शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(मृत्यू:३० जुलै १९९४)**१९२५:डॉ.वि.ग.भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार,पद्मश्री (मृत्यू: जून २००६)**१९२०:उषा श्रीपाद पंडित-- कथालेखिका* *१९१६:सदाशिव रामचंद्र गाडगीळ--संशोधक, समीक्षक(मृत्यू:९ ऑक्टोबर २००८)* *१९१२:बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू:२० डिसेंबर १९९८)**१९१२:तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)**१९०८:सिद्धेश्वरी देवी-- हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या,वाराणसी येथील गायिका(मृत्यू:१८ मार्च १९७७)**१९०६:परशुराम महादेव बर्वे--विज्ञान विषय लेखन करणारे लेखक* *१९०२:पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४)**१८९८:गजानन विश्वनाथ केतकर--निबंधकार, विचारवंत,गीतेचे अभ्यासक( मृत्यू:१५ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१:अनुपम श्याम ओझा-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(जन्म:२० सप्टेंबर १९५७)**२०२१:मखराम पवार-- बहुजन महासंघाचे संस्थापक,सह आयुक्त तथा माजी मंत्री म.रा.(जन्म:१ मार्च१९३९)**२०१७:डॉ.भीमराव गस्ती-- देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक(जन्म:१०मे १९५०)* *२०१३:जयमाला शिलेदार-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्य अभिनेत्री(जन्म :२१ऑगस्ट १९२६)**१९९९:गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक(२३ एप्रिल १९४०)**१९९८:डॉ.सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्या लेखिका व कादंबरीकार.(जन्म:७ मार्च १९१३)**१८९७:व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:८ सप्टेंबर १८४८)**१८२७:जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदानभिकाजी कामा :भारतातल्या सर्वच धर्मियांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यात पारशी धर्मीय लोक ही मागे नव्हते. त्यातलंच एक नाव म्हणजे मदाम कामा. भिकाजी कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे एका श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. 1885 मध्ये तिला इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले आणि नंतर पॅरिसला गेले, जिथे ती भारतीय राष्ट्रवादी चळवळीत सामील झाली. कामा एक उग्र राष्ट्रवादी होत्या ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. लाला लजपत राय आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक प्रमुख भारतीय राष्ट्रवादीच्या त्या जवळच्या सहकारी होत्या. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे प्रथमच परदेशात भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासह तिच्या धगधगत्या भाषणांसाठी आणि धाडसी कृतींसाठी त्या प्रसिद्ध होत्या.एका सधन पारशी घरातून आलेल्या या स्त्रीने आपली सगळी संपत्ती अनाथ मुलींच्या आश्रमासाठी देऊ केली. समाजात स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी चळवळ सुरू केली.कामा यांचे 1936 मध्ये मुंबईत निधन झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि महिलांच्या हक्कांमधील त्यांचे योगदान मरणोत्तर ओळखले गेले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. 1962 मध्ये तिला मरणोत्तर पद्मभूषण, भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक, सन्मानित करण्यात आले आणि 1997 मध्ये तिच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ स्टॅम्प जारी करण्यात आला.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक रुपयात चहा मिळत नाही, पण सरकारने पीक विमा योजना आणली : अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दुष्काळाची चाहूल ! मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात केवळ 42 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईच्या संकटाची भीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेत अमित शहांकडून दिल्ली अध्यादेश विधेयक सादर; विधेयक असंवैधानिक असल्याचं म्हणत काँग्रेसचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही: मंत्री मंगलप्रभात लोढा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023: या स्पर्धेच्या पार्श्नभूमीवर क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने १८ खेळाडू्ंच्या संघाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *भंडारा* हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो तर, बुद्धीचा विकास एकांतात होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ?२) चहाचा सर्वात जास्त उत्पादन जगात कोणत्या देशात होते ?३) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश कोणता ?४) भारतातील 'चहाची बाग' म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?५) भारतातील सर्वात मोठे चहाचे मळे कोणते आहे ?*उत्तरे :-* १) चीन २) चीन ३) भारत ४) आसाम ५) गटुंगा टी इस्टेट, आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, साहित्यिक, परभणी ( पुणे )👤 अवधूत पाटील सालेगावकर, धर्माबाद👤 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर👤 अतुल उदाडे👤 योगेश पा. ढगे👤 ऋषिकेश सोनकांबळे👤 लक्ष्मण कामशेट्टी👤 नागेश कानगुलवार👤 रावजी मारोती बोडके👤 संतोष वाढवे👤 संतोष हसगुंडे👤 रवी वाघमारे👤 गजानन सावंत👤 चंदू नागुल*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला दु:ख झाले की, मग आपण लगेच खचून जातो. अन् सुखात असताना गर्वाच्या संगतीत राहून नको त्या वाटेला जाऊन जीवनाची माती करून घेतो. अशा प्रकारचे जीवन न जगता सुखात असताना कोणालाही कमी लेखू नये. व दु:खात असताना कधीही रडत बसू नये. आपली परिस्थिती कशीही असली तरी सदैव समाधानी रहावे. व इतरांना सुद्धा समाधानी रहाण्याचा सल्ला द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एकदा एक पाळीव कुत्रा गावाबाहेर फिरत होता. त्याला एक लांडगा भेटला. लांडग्याने कुत्र्याला पाहुन त्याच्या गुटगुटीत तब्येतीचं कौतुक केलं. त्यामानाने लांडगा बराच बारीक होता. कुत्र्याने सांगितले कि त्याचा मालक त्याला किती चांगला ठेवतो, चांगलं चांगलं खायला घालतो, त्यामुळेच त्याची तब्येत इतकी छान राहते. त्याने लांडग्याला त्याच्या घरी राहायला यायचे आमंत्रण दिले. लांडगा त्याच्यासोबत निघाला. पण त्याला कुत्र्याच्या गळ्याभोवतीच्या त्वचेवर इतर अंगाच्या मानाने केस कमी आहेत हे जाणवले. त्याने कुत्र्याला विचारले. कुत्रा म्हणाला “अरे घरी असताना मला मालक पट्ट्याने बांधुन ठेवतो. त्यामुळे तिथले केस कमी झालेत, त्यात एवढं काही विशेष नाही.”आता मात्र लांडग्याचा विचार बदलला, तो म्हणाला “मित्रा, चांगलं खायला मिळावं म्हणुन आपलं स्वातंत्र्य गमवावं मला वाटत नाही. हि तर फारच मोठी किंमत झाली.” असं म्हणुन लांडगा परत गेला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚 --------------------------- विषय - मराठी *शब्द वाचूया, शब्द लिहूया.*✍ 🌺शब्दटोपली क्र.(१०)🌺 औपचार,औपचारिक ,औद्योगिक, औद्योगीकरण ,औरंगाबाद,औषधपाणी,औषधोपचार,फौजदार ,फौजदारी , फौजफाटा ,दौलताबाद ,दौलतपूर , कौतुकाने ,कौतुकानं,चौकीवर , चौकीदार, चौकीदारी,दौडादौड ,नौकादल, पौराणिक, सौदागर, शौचालय, भौगोलिक,भौमितिक लौकिकवान,चौकटीत, डौलदार,तौलनिक ,गौरवगाथा, कौटुंबिक ,कौलारावर,सौदामिनी,सौम्यदार, चौकटीवर, गौरीगणपती,सौदीअरेबिया, औत,कौल ,गौरी,गौण,चौदा ,चौथा ,चौथी, चौथा,चौघी,डौल ,दौरा,दौत,दौड,नौका,पौर,फौज,फौजी,मौज,मौन,सौर,सौदा ,सौदे ,हौद,चौक,चौकी,हौस ,हौशी, औषध, औषधी ,औषधे,औजार,औक्षण,कौतुक ,कौशिक,कौरव ,गौतम,गौतमी, गौरव, चौरस, चौकशी ,चौकोनी ,चौकोन, चौकट, चौकात ,चौफेर,चौफुली,दौलत,मौलिक, मौखिक,भौतिक,लौकिक ,नौदल,यौवन,रौनक,लौकिक, लौकर ,शौचास,शौकीन,सौरभ,हौशीने. --------------------------➖➖➖➖➖➖➖✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २१९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.**१९९८:अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.**१९९७:चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा 'व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर**१९९१:जमिनीवरुन हवेत मारा करणार्या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी**१९८१:सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.**१९४७:मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.**१९४७:थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.**१९४२:दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:शेखर खंडेराव फराटे-- लेखक* *१९७२:प्रा.डॉ.शैलेंद्र धर्मदास लेंडे-- लेखक* *१९६४: मनीषा निवास कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६२:मिलिंद मधुकर दिवाकर -- लेखक तथा संचालक पालवी फाउंडेशन* *१९५९:प्रा.डॉ.दत्ता नागोराव डांगे-- कवी, लेखक,संपादक* *१९५५:चेतन दळवी-- मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता**१९५५:सुरेश ईश्वर वाडकर --मराठी गायक**१९५४:कलीम खान- कवी,गझलकार, लेखक (मृत्यू:१ मे २०२१)**१९५३:डॉ.प्रतिभा गुरुदत्त देशपांडे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५१:सरोज चंद्रकांत देशपांडे-- प्रसिद्ध कथालेखिका* *१९४८:ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९४७: डॉ. यशवंतराव शंकरराव पाटील-- वैचारिक लेखन करणारे लेखक* *१९४३:रवींद्र घवी -- लेखक,संपादक (५ ऑगस्ट२०१६)**१९४२:सूर्यनारायण माणिकराव रणसूभे-- हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक* *१९४०:शामसुंदर दत्तात्रय मुळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३९: प्रभाकर मुरलीधर बागले -- समीक्षक, संपादक* *१९३४:दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर-- मराठीतले एक कवी,समीक्षक, संपादक (मृत्यू:९ जून २०१२)* *१९२५:डॉ.मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन –भारतातील कृषी शास्त्रज्ञ, भारतीय शेतीतज्ञ, आणि केन्द्रीय कृषी मंत्री**१९१२:केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ(मृत्यू:२२ एप्रिल, १९८३)**१९११: प्राचार्य नारायण वासुदेव कोगेकर-- प्रसिद्ध विज्ञानलेखक**१८९०: काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर -- संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित(मृत्यू:१ डिसेंबर १९७६)**१८७१:अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:जे.ओमप्रकाश-- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(जन्म:२४ जानेवारी १९२६)**२००९:गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा-- प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते(जन्म:१२ एप्रिल १९३७)**२००८:मधुसूदन नरहर देशपांडे--- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार(जन्म:११ नोव्हेंबर १९२०)**१९७४:अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका(मृत्यू:२२ एप्रिल १८८३)**१९४१:रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)**१८४८:जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान*बेगम हजरत महल तथा मुहम्मदी खानुम*( यांचा जन्म फैजाबाद येथे झाला तर ७ एप्रिल १८७९ नेपाळमधील काठमांडू येथे निधन झाले. )बेगम हजरत ह्या अवधच्या नवाब वाजीद अलीची पत्नी होत्या.फैजाबाद या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली मुहम्मदी खानुम ही अत्यंत सुंदर होती. नवाब वाजीद अली याने मुहम्मदी खानुमच्या सौंदर्यावर मोहीत होवून तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर नवाब अली यांनी मुहम्मदी खानुम हिचे नाव बदलून बेगम हजरत महल असे ठेवले.बेगम हजरत महल अत्यंत स्वाभिमानी आणि महत्वकांक्षी होती. नवाब वाजीद अलीचे राज्यकारभारात लक्ष नसल्याने ती राज्यकारभारात लक्ष घालू लागली. १३ फेब्रुवारी १८५६ रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वाजीद अलीला कलकत्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. बेगम हजरत महलने इंग्रजांच्या अरेरावीला विराध करण्याचे ठरवून आपल्या १४ वर्षाच्या मुलासह लखनौमध्येच राहण्याचे ठरविले.बेगम हजरत महल स्त्री असूनही युद्धनिपुण होती. शस्त्रास्त्रे चालविण्यात ती तरबेज होती. तिने महिलांचे सैनिक दल उभारून इंग्रजांच्या सैन्याचा कडवा प्रतिकार केला होता.राणी लक्ष्मीबाईचा लढा पुढे जर कोणी चालू ठेवला असेल तर अवधच्या बेगम हजरत महलने.तिचा लढा केवळ स्वतःचे राज्य वाचावे याकरिताच नव्हता तर ब्रिटिशांनी जे मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबलं होतं त्याला देखील बेगमने विरोध केला.अखेर १८ मार्च १८५८ रोजी बेगम हजरत महलचा इंग्रजांनी पराभव केला. त्यानंतर तिने नेपाळमधल्या तराईच्या जंगलात आश्रय घेतला.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इस्रोच्या कामगिरीला 'चंद्र' साक्षीला! चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल; चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान-3 चा इस्रोला मिळालं पहिला संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या टी20 सामन्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *बीड* हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरती आणि आकाश यांना जोडणारा चैतन्यदायी दुवा म्हणजे वृक्ष होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील 'हळद शहर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?२) तलाठी शाळांची स्थापना कोणी केली ?३) १९२३ साली अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली ?४) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय ?५) भात संशोधन केंद्र कोठे आहे ?*उत्तरे :-* १) सांगली २) शाहू महाराज ३) विठ्ठल रामजी शिंदे ४) तुकाराम भाऊराव साठे ५) कर्जत, रायगड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री दत्ता डांगे, संपादक, इसाप प्रकाशन, नांदेड👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड👤 मंगेश पेटेकर👤 तुकडेदास धुमलवाड👤 रवींद्र चातरमल, धर्माबाद👤 मनोज रापतवार, धर्माबाद👤 मोहन हडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना जे घडी राघवेवीण गेली।जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना सुख, दुःख, अडचणी, संकटे येतील आणि एक दिवस निघूनही जातील. ..पण,एकदा का मन थकले तर.. आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. म्हणून आपल्या जीवनात कितीही संकटे आले तरी मनाने कधीही थकू नये. व चालणे सोडू नये. सदैव प्रयत्न करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेतकरी आणि करकोचा*एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आल्यावर त्या करकोच्याने त्याला विनंती केली कि मी काही तुझं पीक चोरून खायला आलो नव्हतो आणि मी एकही दाना खाल्ला नाही, पण तरी इथे जाळ्यात अडकलो आहे. शेतकरी म्हणाला “तू म्हणतोस तसा तू निर्दोष असशीलही, पण तु इतर चोरांसोबत पकडला गेला आहेस. त्यामुळे त्या चोरांसारखीच तुलाही शिक्षा मिळेलच.”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *_ या वर्षातील २१७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२०१६:ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.**१९९७:रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना**१९९७:फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर**१९९४:इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान**१९६५:पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.**१९६२:नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.**१८६१:अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७५:काजोल – प्रसिद्ध अभिनेत्री**१९६९:डी.के.शेख (दिलावर कादर शेख)-- कवी,संपादक* *१९६९:वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज**१९५८:राजाराम गो.जाधव-- मंत्रालयातील निवृत्त अधिकारी तथा कवी,लेखक**१९५६:प्रा.डॉ.श्रृतिश्री बडगबाळकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९४९:प्रा.ज.रा. गवळीकर -- कवी* *१९३३:विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९३०:नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू:२५ ऑगस्ट २०१३)**१९२८:राघोबाजी वामनराव गाणार-- कथाकार* *१९२२:प्रा.भगवंत गोविंदराव देशमुख -- लेखक,संपादक* *१९२२:नरेश भिकाजी कवडी-- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक(मृत्यू:४ एप्रिल २०००)**१९१०:डॉ. रामचंद्र ज.जोशी-- लेखक* *१८९०:महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी अभ्यासक (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)**१८६९:नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर-- ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार(मृत्यू:५ मार्च १९६८)**१८५८:वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:शांता दत्तात्रेय गणोरकर-- कवयित्री, लेखिका (जन्म:२४ मे १९२५)**२०२०:शिवाजीराव पाटील निलंगेकर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री(जन्म :९ फेब्रुवारी १९३१)* *२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)**२००१:ज्योत्स्ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.(जन्म:११ मे १९१४)**२०००:लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर(मृत्यू:११ सप्टेंबर १९११)**१९९२:अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म:५ फेब्रुवारी १९०५)**१९८४:रिचर्ड बर्टन – अभिनेता (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)**१९६२:अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली. (जन्म:१ जून १९२६)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दहावा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2911033175690104&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणार, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड : नासाचा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी, पण सोबत जाणार अधिकाऱ्यांचे कुटुंब ?; शासकीय पैशांची उधळपट्टी कशासाठी ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केली जाणार, शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांचा भर कोर्टरूमध्ये राजीनामा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात भाज्यांपाठोपाठ मसालेही महागले, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंडचा संघ जाहीर, जगविख्यात खेळाडूला कर्णधारपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला केले पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *औरंगाबाद* हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *निसर्गकवी, रानकवी* म्हणून कोणत्या कवीला ओळखले जाते ?२) कवी ना. धो. महानोर यांचे जन्मठिकाण कोणते ?३) कवी ना.धो. महानोर यांना पद्मश्री पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले ?४) पहिले जलसाहित्य संमेलन नागपूरचे संमेलनाध्यक्ष कोण होते ?५) अजिंठा, रानातल्या कविता, जगाला प्रेम अर्पावे, वही, पावसाळी कविता, गंगा वाहू दे निर्मळ या कविता संग्रहाचे कवी कोण ?*उत्तरे :-* १) ना. धो. महानोर २) पळसखेड, ता. सोयगाव, जि.छत्रपती संभाजीनगर ३) सन १९९१ ४) कवी ना.धो. महानोर ५) कवी ना. धो. महानोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पा. जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 किरण सोनकांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 सय्यद जाफर👤 दत्तात्रय सितावार, कराटे टीचर, धर्माबाद👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 विकी दिलीपराव जोंधळे👤 देवराव कोळवाड👤 शेख वाजीद👤 विकास कांबळे👤 साई राजू येळवी, तेलंगणा👤 चिं. प्रणव नागेंद्र येंबरवार👤 सौ. शिवराणी नागेंद्र येंबरवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्माला येणे व एक दिवस हे, जग सोडून जाणे हा निसर्गाचा नियम आहे.या नैसर्गिक नियमात, कोणीही बदल करू शकत नाही. या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला पाहिजे. आपण जगलो पाहिजे व इतरांनाही जगू दिले पाहिजे उगाचच कोणालाही बोलून कोणाचेही मन दुखावून त्यांना जिवंतपणी मारू नये.तसच इतरांचे बोलणे ऐकून जिवंतपणी आपणही आत्महत्या नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला. तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला. एका कोल्ह्याने हे पाहिले. कोल्हा उपाशी होता, कावळ्याच्या चोचीत तो चीजचा तुकडा पाहुन त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचं प्रयत्न करू लागला. त्याचे फार कौतुक करू लागला. तो म्हणाला “लोक उगीच त्या कोकिळेचं फारच कौतुक करतात बाबा. खरं तर तुझा आवाज सुद्धा किती मस्त आहे. पण लोकांना तुझी किंमतच नाही. मला मात्र तुझा आवाज फारच आवडतो. जरा गाऊन दाखव कि.” अशी मखलाशी ऐकुन कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले. त्याने काव काव करताच तो तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला. कावळ्याची पुरती फजिती झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २१६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी,भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.**१९९८:फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९३:राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या दिव्यांग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.**१९८४:'अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ’बुर्किना फासो’ असे करण्यात आले.**१९५६:भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९४७:जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.**१९२४:सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९१४:पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९६५:विशाल भारद्वाज-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीत संयोजक आणि पार्श्वगायक* *१९६१:बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते**१९५९:लीना आनंद दामले-- लेखिका* *१९५८:राजीव तांबे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९५६:श्रद्धा बेलसरे-खारकर-- कवयित्री लेखिका* *१९४८:अनिल निगुडकर-- भोपाळ येथील सुप्रसिध्द कवी* *१९४४:दिलिप प्रभावळकर- मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते**१९३२:शशिकला(शशिकला सैगल)-- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री(मृत्यू :४ एप्रिल २०२१)**१९३१:नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (मृत्यू: १९ मार्च २००२)**१९२९:आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक(मृत्यू:१३ आक्टोबर १९८७)**१९१६:कमला फडके-- मराठी लेखिका (मृत्यू:६ जुलै १९८०)**१९०४:विश्वेश्वरराव अंबादासराव कानोले-- इतिहास संशोधक(मृत्यू :२ फेब्रुवारी १९८४)**१९०४:शंकर बाळाजी शास्त्री-- प्रतिभावंत कवी 'युगवाणी'चे संपादक (मृत्यू:२८ जुलै १९७३)* *१८९४:नारायण सीताराम तथा ना.सी.फडके – सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते (मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)**१८६३:महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान (मृत्यू:१४ऑक्टोबर,१९४२)**१८४५:सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक(मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)**१८३४:जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:पद्मा सचदेव-- कादंबरीकार,डोंगरी भाषेतील त्या पहिल्या आधुनिक महिला कवयित्री(जन्म:१७ एप्रिल १९४०)* *२०२०:इब्राहिम अल्काझी-- भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि नाटक शिक्षक(जन्म :१८ ऑक्टोबर १९२५)* *१९९७:जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (जन्म:२१ फेब्रुवारी १८७५)**१९४३:केशव लक्ष्मण टेंभुर्णीकर -- कवी (जन्म:१८९१)**१९३७:डॉ.काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)**१८७५:हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (जन्म: २ एप्रिल१८०५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!नववा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2901874326605989&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकची काठेगल्ली शाळा 'स्मार्ट स्कूल'मध्ये देशात दुसरी, गोव्यात होणार पुरस्कार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सायकल चालवायला घाबरायची, पण वडिलांच्या पाठिंब्याने शर्मिन शेखने थेट मेट्रोचं स्टेअरींग घेतलं हाती, मोदींनी दाखविला हिरवा झेंडा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारकडून लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध; 'मेक इन इंडिया'चा आग्रह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार, मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *अमरावती* एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात *पॉवरफुल चलन* कोणत्या देशाचे आहे ?२) कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य हे कशावर आधारित असते ?३) संयुक्त राष्ट्रांद्वारे अधिकृतपणे जगभरातील किती देशांच्या चलनांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे ?४) भारताचे चलन कोणते ?५) अमेरिकेचे चलन कोणते ?*उत्तरे :-* १) कुवैत ( आखाती देश ) २) अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा ३) १८० देश ४) रुपया ५) डॉलर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश अमृतवार👤 शिलानंद बुद्धेवार, बिलोली👤 गणेश गं. उदावंत👤 निवेदक विठ्ठल पवार👤 अमित सूर्यवंशी, नागपूर👤 प्रतिभा येवतीकर, मुखेड👤 आनंदराव आवरे👤 प्रभाकर रेब्बावार, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल जेव्हा, आपल्याला आशा दाखवतात तेव्हा, मात्र आपल्याला खूप आनंद होत असतो. पण, त्याच दाखविलेल्या आशेची जेव्हा निराशामध्ये रूपांतर होते तेव्हा मात्र आपल्याला खूप दु:ख होत असतो. मग ती व्यक्ती कोणीही असो कितीही नावाजलेली असो, त्या,व्यक्तीवरचा पूर्णपणे विश्वास उडून जातो. म्हणून चुकूनही कोणाला अशा प्रकारची आशा दाखवू नये. व समोरच्या व्यक्तीला दु:ख होईल असे वागू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कबुतर आणि घार*एकदा कबुतरांनी गरुडाला घाबरून आपले संरक्षण करण्यासाठी एका घारीला आपल्या कळपाचे प्रमुख म्हणुन नेमले. घारीने याचा फायदा घेतला. एक एक कबुतराला आपल्याला भेटण्याचा आदेश देऊन ती त्यांना मारून खात असे. गरुडापेक्षा जास्त कबुतरांना त्या घारीने मारले. कबुतराला हे लक्षात आले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला, पण आता फार उशीर झाला होता. “रोगापेक्षा इलाज भयंकर”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम.📚http://www.pramilasenkude.blogspot.com --------------------------विषय - मराठीशब्द वाचूया,✍️शब्द लिहूया.🌺शब्दटोपली क्र.(९)🌺 ओळ ,ओळी ,ओठ, ओठात,ओढून,सोयरा, सोयीचे ,सोडत, पोलीस, पोषक ,पोशाख ,पोटात, पोरगा, पोटाला ,पोटाशी, फोडणी ,फोडून, बोलत, बोलणे ,बोलता ,बोलला ,बोलून, भोजन ,भोवती ,भोसले ,मोकळे, मोजून, मोजता ,मोजणी , मोजली ,योजना, योगाने ,लोकर ,शोषण ,शोधून ,शोषून, शोधत ,शोधात ,सोडून ,सोडला ,सोडत, होकार ,होणार, होणारे, होणारी ,होणारा, होऊन, टोपली, टोपले, भुगोल, ओळख ,ओळखू ,ओळखले, ओळखला, ओळखून , सोमवार, टोमॅटो, ओरडला, लोठेबाबा, गोगलगाय, राहतो, ठेवतो, चालतो,तोरण,थोरला ,थोरले, थोरली, ओजस, मनोज, रोहन, समोर, मोती, कोपरगाव, किलो,किलोमीटर, फोनवर,फोनवरून,पोराला, पोचला, वाघोबा,ससोबा,वाडगो,धावतो, भोपळा ,भोपळी ,पोचणार ,बोलताना ,बोलावून ,बोलायला, बोलावले, भोवताली ,मोठमोठी, मोठमोठे, योगायोग ,योगासने ,रोगराई ,रोजगार, लोकशाही ,शोधायला,सोयीसाठी,सोयरीक,सोडायला, सोडिअम, होमरुलु ,होकारात, वाजवतो,जागोजाग,करटोली, डोलावली ,ढोलकी,मोसमात,सोसायटी , कोकणात, कोकणातील.* --------------------------- ✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.http://www.pramilasenkude.blogspot.com➖➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००४:राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.**२०००;मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.**१९९४:संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९४:सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.**१९६०:नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४८:भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.**१९३६:आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.**१९१४:बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.**१९००:’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.**१७८३:जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:सुनील छेत्री-- भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू* *१९७७:सुनील ग्रोव्हर--- भारतीय विनोदी अभिनेता* *१९६७: बिपिन मयेकर -- लेखक**१९६५:प्रा.डॉ.शुभांगी रामचंद्र परांजपे (डोरले)-- कवयित्री,लेखिका* *१९५९:अजय बिरारी -- अहिराणी व मराठी कवी,गझलकार व कलाकार* *१९५६: विजया सुकाळे-- लेखिका* *१९५६:बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू**१९५६:प्रकाश शंकरराव जंजाळ-- लेखक* *१९४९:रमेश भाटकर -- मराठी चित्रपट, रंगमंच आणि टीव्ही अभिनेता(मृत्यू:४ फेब्रुवारी २०१९)**१९४२:अनु आगा-- भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या**१९३३:माणिक कामिनी कदम-- कामिनी कदम या नावाने प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री(मृत्यू: १८ जून २०००)**१९३२:भा.ल.महाबळ-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक**१९२४:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)**१९१६:शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू:२० एप्रिल१९७०)**१९००:क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू:६ डिसेंबर १९७६)**१८९८:उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९६६)**१८८७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर-- कवी, जुन्या पिढीतील महत्वाचे समीक्षक (मृत्यू:१७ डिसेंबर १९४२)* *१८८६:मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)**१८६३:सालोमन शालोम आपटेकर: नाटककार व किर्तनसंहिता- लेखक (मृत्यू:२१ हे १९५७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:मिथिलेश चतुर्वेदी--भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता(जन्म :१५ऑक्टोबर१९५४)**२०२०:जॉन ह्यूम - आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी (जन्म: १८ जानेवारी १९३७)* *२००७:सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)**१९९३:स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म:८ मे १९१६)**१९५७:देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म:१९००)**१९३०:व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2892952320831523&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात एक लाखाहून अधिक जणांना 'डोळे आले', महाराष्ट्राला जडलाय डोळ्याचा आजार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या 'आंबोली'त 4500 मिमी पावसाची नोंद, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या तरी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅसिना आणि ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्क्यांचा जीएसटी कर लागू, 1 ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुंबईतील कॉलेज कडून बुरखा बंदीचा निर्णय मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे दुःखद निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टी-२० सामना गुलुराव येथे होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नितीन चंद्रकांत देसाई*नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. तसेच अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कल दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवलं आहे. 🌹 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🌹*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे पार पडणार आहे ?३) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोणत्या संस्थेच्या यजमानपदाखाली आयोजन करण्यात आले आहे ?४) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?५) महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन किती वर्षांनी भरविले जातात ?*उत्तरे :-* १) अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक २) सांगली, महाराष्ट्र ३) बर्ड साँग ४) २३ व २४ डिसेंबर २०२३ ५) वर्षातून एकदा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पोतन्ना चिंचलोड, सामाजिक कार्यकर्ता, धर्माबाद👤 अजय बिरारी, साहित्यिक, नाशिक👤 शिवराज धोंडापुरे, चिरली, बिलोली👤 प्रदीप कारले👤 भवर सिंग, राजस्थान*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मागे गेलेले दिवस किंवा सर्वासोबत मिळून, मिसळून घालवलेले आनंदाचे क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. त्या सर्व आठवणी मात्र सदैव स्मरणात राहत असतात. म्हणून आजचा दिवस सुद्धा आपलाच आहे. आपल्यासाठी आहे या दिवसाचे महत्व जाणून त्या पद्धतीने आपण जगावे व त्याच जगण्यातून इतरांनाही जगायला लावावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंगी आणि टोळ*मुंगी फार मेहनती असते. त्या अतिशय मेहनतीने कण कण वाळु गोळा करून आपल्यासाठी वारूळ बनवतात. दूर दूर फिरून शिस्तीत कण कण अन्न गोळा करून वारुळात सुरक्षित ठेवतात. ही वारुळे आणि अंतरे त्यांच्या आकाराच्या मानाने प्रचंड असतात. हिवाळ्यात जेव्हा त्यांना अन्न मिळणे दुरापास्त होते त्यासाठी त्या आधीच उन्हाळ्यात राब राब राबुन अन्न साठवुन ठेवतात जेणेकरून पुढे उपासमार होऊ नये. त्यामानाने टोळ उनाड असतो. गुणगुणत नाचत रमत गमत इकडेतिकडे भटकत वेळ घालवत असतो. असंच एका टोळाची हिवाळ्यात उपासमार व्हायला लागली तेव्हा त्याने मुंगीकडे मदत मागितली. मुंगीने त्याला सुनावले “आम्ही जेव्हा राबत होतो तेव्हा तु नाचत उनाडक्या करत होतास. आता अन्न मिळत नाही म्हटल्यावर तु आमच्याकडे मदत मागतो आहेस. आम्ही का आमची मेहनत तुझ्यासारख्या आळश्यावर वाया घालवु? आता हा हिवाळाही असंच नाचत नाचतच घालव.”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २१४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.**१९९६:अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०:इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९:नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४:दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३:काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०:अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रशांत देशमुख-- लेखक,सुप्रसिद्ध व्याख्याते**१९७४:सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७:गजानन यशवंत देसाई-- कादंबरीकार* *१९६७:प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे-- कवी,लेखक,संपादक* *१९५८:अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत,लेखक**१९५८:अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७:मा.रमेश बैस-- महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल**१९४१:ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८:गोविंद पुरुषोत्तम देशपांडे-- नाटककार,कवी आणि निबंधलेखक( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९२८:दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी)-- लेखक* *१९२३:विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक,संपादक* *१९१८:दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८)**१९१०:पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार,नाटककार,कवी आणि समीक्षक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर --कवी आणि समीक्षक(मृत्यू:१७ डिसेंबर १९४२)**१८७६:पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३)**१८६१:आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४)**१८३५:अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)**१८२० जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१:प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म:२० जून १९२४)**२०१०:कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**२००८:चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी(जन्म:१९६४)**१९७९:करण दिवाण-- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता(जन्म:६ नोव्हेंबर १९१७)**१९३४:पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७)**१९२२:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म:३ मार्च १८४७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारीनागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2886944718098950&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टला लोकसभेत चर्चा, PM मोदीही देणार उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे कॉरिडोरचा मार्ग मोकळा, नालासोपा-यातील भूसंपादनाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं उठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी अखेरचे 60 दिवस शिल्लक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील टप्पा आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु, 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील चार-पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज मधील अखेरचा सामना भारताने 200 धावाने जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चंद्राला ज्याप्रमाणे ढगातून जावे लागते, त्याप्रमाणे माणसाला संकटातून जावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचा पहिलाच 'उद्योगरत्न पुरस्कार' नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?२) 'फकिरा' ही कादंबरी कोणी लिहिली ?३) जगात राजकिय नेत्यांवर सर्वाधिक विश्वास करणारा देश कोणता ?४) पॉक्सो कायद्याने परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची वय किती वर्ष आहे ?५) AS - ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे ?*उत्तरे :-* १) रतन टाटा २) अण्णाभाऊ साठे ३) भारत ४) १८ वर्षे ५) रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, जेष्ठ पत्रकार, धर्माबाद👤 रवींद्र डी. वाघमारे, सहशिक्षक👤 दिगंबर वाघमारे, सहशिक्षक, कंधार👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ता, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ता, येताळा👤 दुर्गा डांगे, साहित्यिक👤 प्रतिक गाढे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिलानंद कैवारे, चिरली, बिलोली👤 दयानंद भुत्ते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, इतरांसाठी जगता, जगता आपलं स्वत:कडे दुर्लक्ष होऊन जातं. आणि मग जगायचचं राहून जातं. म्हणून असं समोर व्हायला नको यासाठी स्वत:साठीही थोडं वेळ काढायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला. "तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात....', अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला. स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग 5-7 मिनिटे बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले. काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला. आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो बुद्धांना म्हणाला, "मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला? तुम्ही शांत कसे?' त्यावर बुद्ध म्हणाले, "मला एक सांग तू एखाद्याला भेट देण्यासाठी भेटवस्तू खरेदी केली आणि ती भेटवस्तू एखाद्याने स्वीकारलीच नाही. तर ती वस्तू कोणाची असेल?' तो व्यक्ती म्हणाला, "अर्थातच. मी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू माझीच असेल. पण त्याचा इथं काय संबंध?' बुद्ध शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, "वत्सा, तू दिलेल्या शिव्या आणि तू दिलेले वाईट शब्द आम्ही स्वीकारलेच नाहीत. त्यामुळे ते कोणाचे झाले?' त्यावर त्या व्यक्तीला आपली चूक उमगली आणि त्याने बुद्धांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून तो व्यक्ती बुद्धांचा शिष्य बनला. बुद्ध म्हणाले, "आयुष्यात बऱ्याच गोष्टी नाकारणे शक्य असतानाही आपण नको त्या गोष्टी स्वीकारतो त्यामुळे आपण बऱ्याचदा संकटात सापडतो. त्यामुळे चराचरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच स्वीकारा आणि आनंदी, उत्साही, शांत राहा.'संकलक - श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जुलै 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय काविळ दिन_* *_ या वर्षातील २०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९९:भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड**१९९८:सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन**१९८४:अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७९:भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.**१९३४:पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.**१९३३:अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३३:सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१८२१:पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:धनुष्य -- चित्रपट अभिनेता**१९७९:प्रा.डॉ सावन गिरीधर धर्मपुरीवार-- कथाकार**१९७२:आयशा झुल्का-- भारतीय अभिनेत्री* *१९७२:डॉ.प्रसन्न शेंबेकर-- कवी* *१९६५:प्रा.डॉ.सुहासकुमार वामनराव बोबडे -- प्रसिद्ध लेखक समीक्षक संपादक* *१९५४:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)**१९४९:बाबा साळूबा भांड-- कादंबरीकार, बालवाङ्मयकार, प्रकाशक**१९३९:दलपत सावजी बोरकर-- कवी, लेखक* *१९३६:सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक**१९३५:डॉ.अरविंद दत्तात्रेय लेले -- माजी आमदार तथा कवी,लेखक(मृत्यू:१३ मे २००६)**१९२९:लतामाई जीवनराव बोधनकर -- कवयित्री* *१९२७:बाबासाहेब उर्फ पांडुरंग ज्ञानदेव पाटील(बाबा पाटील)-- लेखक,संपादक* *१९२५:बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग-- हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक (मृत्यू: ५ एप्रिल २०११)**१९२५:डॉ.क्षमा लिमये -- कादंबरी, कथा, बालसाहित्य,चरीत्र इत्यादी क्षेत्रात लेखन (मृत्यू:१२ जानेवारी २००९)* *१९११:गणेश वासुदेव तगारे-- पर्यावरण रक्षक, संस्कृत पंडित, अनुवादक(मृत्यू:१९ नोव्हेंबर २००७)**१९०७:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (मृत्यू:५ आक्टोबर १९८३)**१९०३:कृष्णाबाई हरी मोटे --कथालेखिका, कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:१७ फेब्रुवारी १९९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कुमकुम -- हिंदी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेत्री (जन्म:२२ एप्रिल १९३४)* *१९८८:राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: १९६२)**१९८१:बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)**१९७७:गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक(जन्म:२६ डिसेंबर १९१०)**१९७५:राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २६ नोव्हेंबर१९२३)**१९७३:शंकर बाळाजी शास्त्री -- गीतकार (जन्म:४ आगस्ट १९०४)**१९६८:ऑटो हान – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2870250936434995&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांची घोषणा, सर्वसामान्य जनता मात्र अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 रातांधळेपणा म्हणजे काय ? 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयाचा ध्यास लागला, म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा *राष्ट्रीय पक्षी* कोणता ?२) 'मोर' हा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) 'मोर' हा पक्षी कशाचे प्रतिक आहे ?४) मोराच्या आवाजाला काय म्हणतात ?५) भारतातील/महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य कोठे आहे ?*उत्तरे :-* १) मोर २) २६ जानेवारी १९६३ ३) शांतता व सौंदर्य ४) केका / केकारव ५) नायगाव, जि. बीड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिगंबर जैर मोड, समराळा, धर्माबाद👤 बालू उपलेंचवार, धर्माबाद👤 बालाजी गुट्टे, किनवट👤 अंकुश व्ही. शिंदे, धर्माबाद👤 चंद्रकांत पिलाजी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती जर वरवर कितीही चांगली दिसत असली तरी त्यासारखी असतीलच असे नाही. म्हणून कधी, कधी त्यांच्या विषयी सर्व कळल्यानंतर आपोआप दृष्टीतून उतरून जातात व पुन्हा त्यांच्यावर विश्वास करणे होत नाही. यालाच म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून पुढे दिसणाऱ्या वस्तूला असो, किंवा व्यक्तीला चांगल्याप्रकारे निरखून बघावे व वेळात, वेळ काढून त्यांना वाचायला शिकावे. त्यांच्यात जे, काही चांगले वाईट गुण असतील ते, कळायला जास्त वेळ लागणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला. तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.' तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जुलै 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१२:लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२००१:सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९९:द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.**१९८३:कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.**१९५५:दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.**१९२१:रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.**१८९०:डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.**१७६१:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:प्रा.गंगाधर चेपूरवार -- कवी लेखक**१९७९:प्रसाद पुरुषोत्तम कुमठेकर -- लेखक, निर्माता,दिग्दर्शक**१९७३:गौरी एकनाथ शिरसाठ-- कवयित्री* *१९७२:संतोष श्रीधर महाडेश्वर-- कवी लेखक* *१९७२:छाया अजबराव वाढेकर-- लेखिका* *१९६९:जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स- निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू ,सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक व कोच* *१९६९:हणमंत पडवळ -- कवी* *१९६२:सुनीलकुमार वसंतराव सरनाईक-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६०: श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री**१९५६:प्रा.राज यावलीकर -- सुप्रसिद्ध साहित्यिक,'खडू शिल्प' कलेकरिता राष्ट्रीय पुरस्कार* *१९५५:अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५३:डॉ.अक्षयकुमार मल्हारराव काळे-- सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५०:विश्व मोहन भट्ट-- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक* *१९३९:आशा अरविंद बगे-- मराठीतील जेष्ठ सुप्रसिद्ध लेखिका* *१९३०:चंद्रकांत रामचंद्र वर्तक--कथाकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार(मृत्यू:११ जुलै २०१०)**१९२८:कृष्ण राघव घरोटे -- कवी, कथाकार**१९२८:उत्तमराव बळीराम राठोड-- माजी खासदार,संस्थापक(मृत्यू:७ मार्च १९९७)**१९११:डॉ.पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)**१९०७:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक(मृत्यू:७ फेब्रुवारी १९९०)**१८९२:नारायण विनायक कुलकर्णी-- मराठी नाटककार(मृत्यू:१८जानेवारी १९४८)* *१६६७:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १७४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *-२०१५: डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम-- भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७)'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रियता.(जन्म:१५ऑक्टोबर १९३१)-**२०१०:रवी बसवानी-- भारतीय चित्रपट अभिनेता(जन्म:२९ सप्टेंबर १९४६)**२००७:वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७)**२००२:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)**१९९२:अमजद खान–हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म:१२ नोव्हेंबर १९४०)**१९८०:मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९)**१९७५:त्र्यं.र.ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.* *१८४४:जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2864596340333788&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटरचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *PM Kisan Yojana: प्रतीक्षा संपली ! 27 तारखेला 14व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोयना धरणाची पाणीपातळी वाढली; कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलीसभरतीमध्ये कंत्राटीकरण होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मलेशिया विरुद्ध चीन यांच्यादरम्यान झालेल्या T-20 सामन्यात सयाजरुल इद्रसने घेतले सात बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात.""आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले...."कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.*शिकवण* - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतंच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता ?२) भाषेच्या आधारावर सर्वात प्रथम कोणत्या राज्याची निर्मिती झाली ?३) जगात सर्वाधिक विश्वासार्ह कोण ?४) पहिला जागतिक इमोजी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणी लिहिले ?*उत्तरे :-* १) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २) आंध्रप्रदेश ३) डॉक्टर ४) १७ जुलै २०१४ ५) गीतकार राजेन्द्र कृष्ण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हणमंत पडवळ, साहित्यिक, लातूर👤 शशिकला बनकर, साहित्यिक, पुणे👤 स्वाती राधाकिशन बोधगमवार👤 कु. जयश्री विठ्ठल कोंदापुरे, भोसी👤 उत्कर्ष मादसवार, हिमायतनगर👤 श्रीकांत क्यादरवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे,कोणी आपल्याला काही सांगत असतील तर त्यांचे बोलणे किंवा त्यांचे विचार आपण शांतपणे ऐकून घ्यावे.पण, आपल्या मनाला काय वाटते ते, आपणच ठरवावे कारण बरेचदा असं होतं की,आपल्या मनाचे ऐकून,न घेता जेव्हा आपण दुसऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जे, चांगले करायचे राहते तेही राहून जाते अन् बऱ्याच अडचणींचा सामना सुद्धा आपल्यालाच करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*टोपीवाला आणि माकडे*एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो. तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_कारगिल विजय दिवस_* *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५:मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९:भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८:१९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४:सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५:मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६:जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१:फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७:लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५:इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८:न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२:जुगल हंसराज--भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२:प्रा.मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक संपादक,वक्ते* *१९६७:संजय अप्पाराव घाटगे-- कवी* *१९५५:असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४:व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)**१९४८:सुमन लाघवे-- लेखिका* *१९४३:डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, सुप्रसिद्ध कवी,लेखक* *१९४३:डॉ.नीला चंदकांत पांढरे-- प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:२६सप्टेंबर २०२१)**१९४०:प्रा.डॉ.प्रकाश केजकर देशपांडे-- कादंबरीकार,कवी,समीक्षक,प्रभावी वक्ते* *१९३४:दत्तात्रय पंढरीनाथ जोशी-- संपादक* *१९११:यशवंत दत्तात्रय भावे-- कवी (मृत्यू:७ नोव्हेंबर १९८७)**१९०२:यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू:१९८८)**१८९४:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू:३० मार्च १९६९)**१८९४:अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)**१८९३:पं.कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू:२२ ऑगस्ट १९८९)**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता-- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू:२१ जानेवारी १९८२)**१८७५:कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू:६ जून १९६१)**१८७०:गोविंद सदाशिव आपटे-- ज्योतिर्गणितज्ज्ञ(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९३६)**१८६५:रजनीकांत सेन-- भारतीय कवी आणि संगीतकार(मृत्यू:१३ सप्टेंबर १९१०)**१८५६:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू:२ नोव्हेंबर १९५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५:बिजॉय कृष्णा हांडिक--भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:१ डिसेंबर १९३४)**२००९:भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)**१९७२:उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म:२८ आगस्ट १९०३)**१९४४:प्रभाकर वासुदेव बापट-- वाड:मय इतिहासकार (जन्म:१७ फेब्रुवारी १९०२)**१८९१:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2858875857572503&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये चार ते पाच फ्लॅटवर डोंगराचा ढिगारा; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलन; सुदर्शन नच्चिअप्पन समितीच्या शिफारशींनुसार आरक्षण देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका, चंद्रपूरमध्ये गावांना पुराचा विळखा, तर वाशिममध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जगातला सर्वात मोठा रामाचा पुतळा आंध्र प्रदेशात ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली पायाभरणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या दिवशी पावसाचा ख्वाडा, दुसरा कसोटी सामना अनिर्णित, भारतीय संघाने 1-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ? 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे'* ही घोषणा कोणी केली ?२) 'मून मॅन ऑफ इंडिया' ही पदवी कोणाला देण्यात आली ?३) मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?४) 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे प्रेरणादायी गीत कोणी लिहिले ?५) चांद्रयान - ३ कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले ?*उत्तरे :-* १) आचार्य विनोबा भावे २) मायलसामी अण्णादुराई ३) इरिस ४) साने गुरूजी ५) सतीश धवन अंतराळ केंद्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल मदनुरकर👤 वैभव भोसले👤 रमेश मस्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर संतांनी तसेच महापुरुषांनी आपल्या संदेशातून समानतेचा व जीवन जगण्याची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणुकीतून जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. पण, खरंच आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालतो का..? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून जीवन जगत असतांना निदान एकदातरी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहावे तरच जीवनाचे सार्थक होईल..त्यासाठी आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते कळत असतात नुसते फोटोला वंदन केल्याने ते,महाविभूती कळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली, 'चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.तात्पर्य :- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचन विकास भाषिक उपक्रम http://www.pramilasenkude.blogspot.com विषय - मराठीशब्द वाचूया, शब्द लिहूया.✍🌺शब्दटोपली क्र. (७)🌺शेत, रेषा, पेढा,भेळ,मेघ, नवे, वेड, फळे,पाने, फुले देश,पिके , वेळ,असे , कसे, दिसे, नसे,रेघ,पेटी, चिञे,आहे, बेडूक, शेवटी,घेऊन, रेडकू,शेपटी, रूपेरी,रुपये, माणसे, करणे,पहाटे,दिलेले,दिलेली,दिलेला, असते, नसते, नसेल, साजरे,वेगाने , पिवळे,माकडे ,भेटला ,भेटले ,भेटून ,विशेष,केवळ ,खेकडा,घेतले,चेहरा ,जेवण ,टेबल ,ठेवला ,ठेवले ,ठेवणे,तेथील ,तेथून ,देणार,नेहमी ,पेपर,लेखक ,लेखन ,लेखात ,बेरीज ,वेगळे ,वेगाने ,वेगळा ,शेजारी ,शेअर ,शेतात ,शेतावर , शेतातील,दिसणारे, भातशेती, पलीकडे , अलीकडे, मदतीने, शेतकरी,बसलेले,तेलकट , सगळीकडे, विरघळलेले , विरघळणारे, चिकटलेले, आतबाहेर,देखभाल,देखरेख, नातेवाईक,ज्ञानदेव. ---------------------------✍संकलन लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2023💠 वार - मंगळवार•••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०६ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००७:भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९:लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७:के.आर.नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७:इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४:इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२:स्पेनि,मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४:सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८:जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७:कॅनडात आयकर लागू झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९९२:सचिन जगन नांगरे -- कवी* *१९८३:संतोष ग्यानिदास गेडाम-- कथाकार, कवी* *१९६९:राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- कवी,लेखक* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक,लेखक आणि प्रकाशक* *१९५४:दिनेश केसकर-- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९४९:बकुळ पंडित-- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९३४:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललितनिबंधकार.(मृत्यू:२७ जानेवारी, २०१६)* *१९३१:निळू फुले(निळकंठ कृष्णाजी फुले)-- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:१३ जुलै २००९)**१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते(मृत्यू:१३ आगस्ट२०१८)**१९२२:विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)**१९१९:सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)**१९१७:सदाशिव शंकर देसाई-- विख्यात साहित्यिक,पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू:३१ मे १९९६)**१८८७:नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे-- कवी**१८७५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)**१८३२:करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार(मृत्यू:२८ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई-- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते,बिहार,सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म:३० ऑक्टोबर १९२९)* *२०१२:बी.आर.इशारा–चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म:७सप्टेंबर१९३४)**१९७७:कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक(जन्म:२५ एप्रिल १९००)**१८८०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मो: 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2854662371327185&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत; अर्थमंत्री अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज, चालू आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदराला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 21 हजार कोटी बुडाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशातील दरडोई उत्पन्नाची राज्यनिहाय यादी केंद्र सरकारने केली जारी, तेलंगणा प्रथम तर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, महाराष्ट्र चौदाव्या स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कारगिल विजय दिवस*कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे. श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.लढाई आधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.कारगील युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे स्मारक श्रीनगर-लेह मार्गावर (`राष्ट्रीय महामार्ग क्र. १ डी'वर)आहे. स्मारकातील भिंतीवर कारगील युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात २६ जुलै हा दिवस कारगील हुतात्म्यांचा स्मरणदिवस म्हणून पाळला जातो.कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉंंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!'*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्याच्या किरणांनी कमळे फुलतात, त्याप्रमाणे आईच्या मायेनं जीवन कळ्या फुलतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारताची रॉकेट वूमन'* म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणत्या चित्रपटातील आहे ?३) विम्बल्डन चॅम्पियनशिप - २०२३ पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला ?४) UPI चा full form काय आहे ?५) 'जागतिक इमोजी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) रितू करिधाल, ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ २) सिकंदर - ए - आजम ३) कार्लोस अल्काराज ४) Unified Payments Interface ५) १७ जुलै*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ कामीनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 प्रा. संगीता भालसिंग, साहित्यिक, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर👤 ऋचाली चंदेल बयास, संगमनेर👤 गंगाधर मंगरूळे👤 गोविंद मानेमोड, तळणी, बिलोली👤 गजानन महाजन, बिलोली👤 संतोष श्रीखंडी👤 नरेंद्र राठोड, सुरत, गुजरात👤 साईनाथ भोरे, कुंडलवाडी👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस बोलता, चालता, समजदार,सुशिक्षित प्राणी असताना सुध्दा एक,एक सेंकदाला कितीतरी पाप करत असते.तरीही त्याची थोडीही त्याला कल्पना नसते तरीपण स्वत:ला मोठा समजत असते हे, किती विचित्र आहे...? त्यापेक्षा मुके प्राणी एकवेळचे बरे म्हणायला काहीच हरकत नाही. निदान माणसानी एवढेही पाप करू नये की, माणसाचे जीवनच व्यर्थ होऊन जाईल...आपण माणूस प्राणी आहोत आपला जन्म कशासाठी झालेला आहे याची थोडीतरी जाणीव ठेवावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलवायला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण बदल्यात तु मला तुझे डोळे दे.' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस का?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. शेवटी व्यापारी म्हणाला, 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस? कष्ट कर पैसे मिळव'.तात्पर्य :- आपल्या शरीराची किंमत आपण स्वतः जाणून घ्यावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.**२०००:विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.**१९९८:परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९७:माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान**१९९७:ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९१:अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.**१९६९:सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.**१९४३:दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.**१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.**१८२३:चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:पंकज अडवाणी-- भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू* *१९७६: सप्तर्षी अ.माळी-- लेखक* *१९६९:जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका**१९६४:विष्णू सूर्या वाघ -- कवी लेखक तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती* *१९४९:माधव अनंत विद्वांस-- लेखक* *१९४७:जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज**१९४५:अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन**१९३७:मनोज कुमार( हरिकृष्ण गोस्वामी )-- भारतीय अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,गीतकार आणि संपादक**१९३२:प्रा.मधुकर तोरडमल-- मराठी अभिनेते,लेखक(मृत्यू:२ जुलै २०१७)**१९२९:बाळ जगन्नाथ पंडित-- क्रिकेट समालोचक, लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१५)**१९२८:केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:२९ ऑक्टोबर, २०२०)**१९१७:दि.य.देशपांडे-- महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ व प्राध्यापक(मृत्यू:३१ डिसेंबर २००५)**१९११:अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)**१९११:गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी(मृत्यू:२१ नोव्हेंबर २००२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०२१:सतीश काळसेकर-- लोकप्रिय कवी, संपादक, अनुवादक(जन्म:१२ फेब्रुवारी १९४३)* *२०१४:वसंत विठ्ठल गाडे-- संघटक, संस्थापक(जन्म:२७ जानेवारी १९२७)* *१९८०:अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म:३ सप्टेंबर १९२७)**१९८०:पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)**१९७४:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)**११२९:शिराकावा – जपानी सम्राट *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7344359092247109/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी.. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश .. संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला..*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे ; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क, कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिराजने अर्धा संघ तंबूत पाठवला, कॅरेबिअन आर्मीची 255 पर्यंत मजल, भारताकडे 183 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *दातांवरून माणसाचे वय काढता येते का ?* 📙 काही वेळेस मृत्यूनंतर विशेषतः गुन्ह्याच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे हे सांगावे लागते. त्यासाठी मृत व्यक्तीचे हाडे, दात यांचा उपयोग होतो. दातांचे दोन प्रकार आहेत. दुधाचे दात आणि कायमचे दात यांच्यामध्ये फरक असतो. दुधाचे दात येऊन ते पडून कायमचे दात येण्याच्या पद्धतीला एक विशिष्ट क्रम असतो. विशिष्ट वयात हे दात येत असतात आणि पडत असतात. जसे ३ वर्षांपर्यंतच दुधाचे सर्व दात येतात. कायमच्या व दुधाच्या दातांच्या रंगांमध्ये, आकारांमध्ये फरक असतो, त्यामुळे यावरून वय सांगता येते. २५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचे वय यावरून काढता येते. या वयापर्यंत कायमचे सगळे दात आलेले असतात. वय काढण्यासाठी दातांच्या एक्सरेचाही उपयोग होतो. क्ष- किरण तपासणीने दातांच्या मुळाचे कॅल्सिफिकेशन झालेले आहे की नाही ते समजते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस अक्कलदाढ आलेली नाही पण हिरड्यात त्याच्या मुळाचे कॅल्सिफिशन झालेले क्ष-किरण परीक्षेत दिसल्यास त्या व्यक्तीचे वय सत्तरच्या पुढे आहे, हे नक्कीच ठरते. काही वेळेस एकदम अचूक वय काढावे लागते. अशा वेळेस सूक्ष्मदर्शकाखाली दातांचा छेद घेऊन तपासणी केली जाते. दातावरील निर्माण झालेल्या आडव्या रेषांवरून वय काढले जाते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत, गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोंबडीच्या अंड्यातील *पिवळ्या भागाला* काय म्हणतात ?२) कोंबडीच्या एका अंड्यात किती प्रोटीन ( प्रथिने ) असते ?३) अंड्यामध्ये सर्वात जास्त कोणता घटक असतो ?४) कोणत्या प्राण्याच्या अंड्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात ?५) चिकन अंड्याचे कवच कशाचे बनले असते ?*उत्तरे :-* १) बलक २) ६ ग्रॅम प्रथिने ३) प्रथिने ४) हंस ( १९.९७ ग्रॅम ) ५) CaCo3 ( कॅल्शियम कार्बोनेट )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 विठ्ठल सटवाजी कोंदापुरे, भोसी. ता.बिलोली👤 संतोष मुलकोड, LBS कॉलेज, धर्माबाद👤 संतोष लवांडे, सहशिक्षक, कर्जत👤 राजेश पाटील मनुरकर👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 सचिन टेकाळे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक पण, आपल्या मताप्रमाणे न होता क्षणातच ते,वेगळे झालेले बघायला मिळते. त्या विषयी आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही. म्हणजेच आपल्या पेक्षा कोणीतरी दुसरा असते हे सर्व घडवून आणणारा व बघत राहणारा ती म्हणजेच नियती होय. ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून असे कोणतेच व्यर्थ काम करू नये की, आपल्याला दु:खात बुडण्याची वेळ येईल शेवटी सत्य हे अंतिम सत्यच असते आपण त्याचाच पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने स्वीकार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकाराचे स्मरण*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.' तात्पर्य : माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.**१९७७:चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.**१९४४:पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.**१९४२:वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.**१९३३:विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.**१९३१:फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.**१९०८:’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७०:देवेंद्र गंगाधर फडणवीस-- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* *१९६९:संजय सुक्रीतदास बर्वे-- प्रसिद्ध लेखक* *१९६६:डॉ.नानासाहेब सूयवंशी-- लेखक, संपादक* *१९६६:विद्या शिशशेखर शिंदे-- लेखिका* *१९६५:सारंग शंतनू दर्शने-- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक* *१९५९:अजित अनंतराव पवार-- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री**१९५०:प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* *१९३७:वसंत रांजणे–मध्यमगती गोलंदाज(मृत्यू: २२ डिसेंबर २०११)**१९३१: शकुंतला विष्णू गोगटे-- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू:५ नोव्हेंबर १९९१)**१९२५:गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक(मृत्यू:२१ मार्च २०१७)**१९२३:मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६)**१९१८:गोपाळराव बळवंतराव कांबळे(जी. कांबळे)-- नावाजलेले मराठी चित्रकार(मृत्यू :२१ जुलै २००२)**१९०८:भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* *१८९८:पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म:२आक्टोबर१९४६)* *२०१८:सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म:१४ सप्टेंबर १९३०)**२०१५:यशवंत कानिटकर-- मराठी भाषातज्ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१)* *१९९५:हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४)**१९८४:गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९)**१९१८:इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7335079603175058/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईसह राज्यात सर्वदूर पावसाचं थैमान. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी शाळेला सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीतील गरीब कुटुंबांना केजरीवाल सरकार देणार मोफत साखर; 2.80 लाखांहून अधिक लोकांना मिळणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 7480 मेगावॉटवरुन 22840 मेगावॉट होईल : मंत्री जितेंद्र सिंह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य शासनाने क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा; सत्यजीत तांबेची विधान परिषदेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *500 व्या सामन्यात कोहलीची विराट कामगिरी, कसोटीतील 29 वे शतक ठोकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?* 📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चिपको आंदोलनाचे जनक कोण ?२) निसर्गऋषी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोणत्या आंदोलनातून वृक्ष संवर्धनासाठी चळवळ उभी केली ?३) भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशाच्या घटनेच्या प्रस्तावनेने प्रेरित केली होती ?४) सध्या भारताबाहेर कोणत्या देशात UPI प्रणालीचा वापर सुरू आहे ?५) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?*उत्तरे :-* १) सुंदरलाल बहुगुणा, निसर्गऋषी २) चिपको आंदोलन ३) अमेरिका ४) सिंगापूर ५) मुख्य सचिव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय कदम, पत्रकार, धर्माबाद👤 महेश जाधव बिजापूर👤 अनुराधा हवेलीकर पदमे👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोषकुमार दुरगुडे👤 संतोष जाधव👤 पद्माकर गोपाळराव मुळे👤 अमोल बबनराव गायकवाड👤 धनराज वाघ👤 विश्वनाथ चित्रलवार👤 दामोदर साळुंके👤 सुमंत भांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी👤 प्रल्हाद तुमेदवार, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण बघितलेले एखादे स्वप्न योगायोगाने पूर्ण झाले की,आपला आनंद गगणात मावेनासा होतो व आपल्याला तसेच स्वप्न बघण्याची वारंवार सवय लागत असते.एखादेवेळी ते,स्वप्न एखाद्या वेळात पूर्ण झाले नाही तर , दु:ख होत असते. म्हणून नको त्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. वारंवार स्वप्न बघणे वाईट नाही. ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ मोठे असते*"वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खडयात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठया खडयात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वाचन विकास भाषिक उपक्रम* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚 विषय - मराठी* शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (५)🌺* *कुणी,गुण ,गुरू ,चुल,जुना, सुई, रुई, जुडी,तुर, पुल,बुध,मुग,युती,रूप ,रूढ,शुभ ,सुरू , पुरी, दुपारी , फुगा, युग,हुशार ,हुशारी ,गुलाम,जुनाट ,जुळणी ,कोकरू, चुकल, बाहुली, फुल, सुटला, मुलगा, तुला, दुसरी, सुरई , बुटका, दुपार, हुरडा, दुकान, झुरळ, गुलाब, खुशाल, घुबड, रुपया, भुवई, भुवन, उजवा, डुलकी, तुळस, सुकी, खुराडा, कुत्रा, खाऊन, येऊन, घेऊन जाऊन, धुऊन,खुलासा,घुमत ,घुसला ,चुकीची,जुलमी ,तुमची ,दुसरा ,नुसता,पुढील, फुकट ,भुकटी,मुलगा,मुळीच,मुलाला,शुगर, टुणुक टुणुक , सुगावा,भुरभुर,सुरूवात,हुकुमशाही ,सुगरण, मुसळधार, खुदकन, नुकसान, कुरकुरीत, चुरचुरीत, खुळखुळा,टुणटुणीत, बुधवार, गुरुवार, सुरळीत, युवराज.* --------------------------- --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००२:जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.**१९८३:अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.**१९७६:आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या**१९६०:सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.**१९४४:२० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.**१८३१:बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: सचिन रघुनाथ गांगुर्डे -- कवी, लेखक**१९७१:गणेश रत्नाकर मतकरी -- प्रसिद्ध लेखक,समीक्षक,चित्रपट पटकथा लेखक* *१९६६:श्रीधर नांदेडकर --लेखक,कवी* *१९५७:राजेंद्र यशवंत वैद्य -- लेखक* *१९५४:सुचित्रा मधुकर कातरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४९:सुधा मधुसूदन जोशी-- कवयित्री, गायिका* *१९४८:डॉ जयश्री तोटे-- लेखिका,कवयित्री**१९४८:प्रा. केशवराव वसेकर -- लेखक, कवी, समीक्षक**१९४७:चेतन चौहान –माजी सलामीचे फलंदाज, आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:१६ आॅगस्ट २०२०)**१९४४:अँड.शालिनी पुरी -- कवयित्री**१९३९:प्रा.विनता गद्रे-- कवयित्री* *१९३४:चंदू बोर्डे – माजी क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष**१९३३:माधवी रणजित देसाई--कवयित्री, कथा,कादंबरीकार(मृत्यू:१५ जुलै २०१३)**१९३२:डॉ.उषा जोशी (भोसेकर)-- लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासक* *१९३०:डॉ.रा.चिं.ढेरे – सांस्कृतिक संशोधक(मृत्यू:१ जुलै २०१६)**१९२०:आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)**१९१०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)**१८९९:अर्नेस्ट हेमिंग्वे–नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक(मृत्यू:२ जुलै १९६१)**१८५३:शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००९:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)**२००१:विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)**१९९५:सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ )**१९९७:राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६)**१९९४:डॉ.र.वि.हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक(२५ सप्टेंबर १९१५)**१९९१:पं.बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(जन्म :२४आगस्ट १९१७)**१९७२:जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7333252366691115/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यातच अनुचित काही घडू नये म्हणून पुण्यातील दुर्गम भागातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुजित पाटकर आणि डॉ किशोर बसुरेंना कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रायगड :- इर्शाळवाडीत दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; 19 जणांचा मृत्यू, 98 जणांना वाचवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, राख आणि चिखल शेतात पसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाड्यातील 1023 गावांना बसू शकतो पुराचा फटका ; सर्वाधिक पूरप्रवण गावे नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज 100 व्या ऐतिहासिक कसोटी सामना 20 जून पासून सुरुवात, किंग विराटचा 500वा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाय डिटेक्टर* 📙नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो.या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो.श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो.लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फ्रान्सचा कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले ?२) विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला ?३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात 'वंदे मातरम्' हे गीत प्रथम गायले गेले ?५) महाराष्ट्राचे कृषीमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑनर २) मार्केटा वोंड्रोसोव्हा, चेक प्रजासत्ताक ३) सुरवंट ४) सन १८९६ ५) धनंजय*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजीव गंजगुडे, अध्यक्ष, शिक्षक परिषद, बिलोली👤 वृषाली शिंदे, साहित्यिक, ठाणे👤 चिंतामणी जाधव, साहित्यिक, मुंबई👤 श्रीकांत कांता विनायकराव👤 शशी खंडाळकर, पुणे👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे👤 शिवराज मोरडे, नांदेड👤 विजय वाठोरे, साहित्यिक, सरसम हिमायतनगर👤 रविकांत कुलकर्णी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी सर्वांना एकच मुख्य रस्ता असतो आणि त्याच रस्त्याने एक दिवस प्रत्येकाला जावे लागते व त्या,मुख्य रस्त्याने जाणाऱ्याला शेवटी कोणीही अडवू शकत नाही. हे सत्य आहे याची जाणीव असू द्यावे. निदान माणुसकीच्या नात्याने तरी कोणाच्याही वाटेत काटे, कंकर पेरू नये व आपल्या जीवनाला नको ते वळण देऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाल्याचा वाल्मीकी झाला*पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो, रानात एक मार्गातून येणार्या-जाणार्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.'' तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.'' हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.'' तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.'' याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते. तात्पर्य : संगतीमुळे आपण चांगले बनतो; त्यामुळे नेहमी आपण चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 *जागर श्यामच्या कथांचा* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शालेय मुलांसाठी संस्करक्षम मालिका भाग - चौथा पुण्यात्मा यशवंतAudio Link ........https://drive.google.com/file/d/16FnXL-lMSiaFUe9r8FAM38ItKzTUKTs4/view?usp=drivesdkअभिवाचन निर्मिती :- श्री राजेंद्र जोशी, छ. संभाजीनगरअभिवाचन :- सौ. अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी, छ. संभाजीनगर••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६:मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३:केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९:अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०:सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२:फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९:इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४:दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६:मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८:बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१:ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८:'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे-- कवयित्री,लेखिका**१९८०:ग्रेसी सिंग-- भारतीय अभिनेत्री* *१९७९:रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९६७:मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३:प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२:प्रा.गणेश निवृत्ती आवटे-- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०:नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०:रंगनाथ गबाजी पठारे-- कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४७:प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९३८:कर्नल डॉ.नारायण जयरामराव देशमुख -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९२९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९)**१९२३:विठ्ठल गोपाळ खोबरेकर-- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार(मृत्यू:२००७)**१९१९:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)**१९२१:पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४)**१९१९:सुरेंद्र शिवदास बारलिंगे--कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक(मृत्यू:१९ डिसेंबर १९९७)**१८३६:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५)**१८२२:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)**१९७३:ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)**१९७२:गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)**१९६५:बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)**१९५१:अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२)**१९४३:वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)**१९३७:गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पाचवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7327232550626430/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी, 'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकच्या भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून नवी टीम जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर ; भारत-पाकिस्तान 02 सप्टेंबर रोजी येणार समोरासमोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक, रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia Cup 2023 : भारता ए संघाचा पाकिस्तान ए संघावर 8 विकेटने विजय; हंगरगेकरचा भेदक मारा, साई सुदर्शनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वाधिक लोकप्रिय *इमोजी* कोणता ?२) इमोजी पेडियाचे संस्थापक कोण आहेत ?३) 'इमोजी' या शब्दाचा अर्थ काय आहे ?४) 'इमोजी' शब्दाचे मूळ कोणत्या भाषेत आहे ?५) ऑक्सफर्ड डिक्शनरीत इमोजीचा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डोळ्यांतून अश्रू काढत हसणारा चेहरा २) जेरेमी बर्ज ३) चित्र वर्ण अक्षर ४) जपानी ५) इलेक्ट्रॉनिक संवादात वापरण्यात येणारे, भावना दर्शविणारे छोटे डिजिटल चित्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक, नांदेड👤 साईनाथ माळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीराम भंडारे, परभणी👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 लक्ष्मण दावणकर, सहशिक्षक, लातूर👤 सचिन राजेंद्र पिसाळ, सहशिक्षक, बीड👤 दिनेश राठोड, जिजाईसुत👤 बजरंग अरगेलू, धर्माबाद👤 ज्ञानेश्वर कोकरे, करखेली👤 करुणा खंडेलोटे, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 मोहन कुलकर्णी, हदगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाचा जन्म संकटातून होतो, संपूर्ण आयुष्य संकटाचा सामना करत जगावे लागते व मृत्यू सुद्धा असंख्य संकटाचा सामना करुनच येतो.आपण ऐकले असणार. . माणसाचा जीवन हा, वेगळा असतो. सोबत सुख आणि दु:ख येतच असतात. म्हणून जगणे सोडायचं का. .? माणसाचा जीवन एकदाच येतो. प्रत्येक संकटाचा सामना करुन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे .व इतरांच्या जीवनात संकटे बणून न जाता त्यांच्या जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी एकदातरी प्रयत्न करून बघायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदराची टोपी*एक उंदीर होता. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा 'तुकडा' सापडला. तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, ""शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुकडयाची टोपी शिवून द्या"". तर शिंपी म्हणाला, ""चल हट, मी नाही देत जा"". तसा उंदराला आला राग. तो म्हणाला ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". शिंपी घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुकडा, मी टोपी शिवून देतो"". म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , ""परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या"". परीट खूप कामात होता. तो म्हणाला, ""नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा"". तसा तो उंदीर म्हणाला, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". परीट घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो"". म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्याकडे व म्हणला, ""रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या"". रंगारी म्हटला, ""जा जा, मी नाही देत जा."" तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणला, ""गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?"" गोंडेवाला बोलला, ""मी नाही देत. ज्जा"" तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो"". मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई. राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला, ""घ्या रे त्याची टोपी हिसकावून"". तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, ""राजा भिकारी, राजा भिकारी! माझी टोपी घेतली, घेतली"". आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली. तशी ती टोपी उंदराने उचलली, झटकली आणि पुन्हा डोक्यात घातली आणि म्हणायला लागला , ""राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम http://www.pramilasenkude.blogspot.com विषय - मराठी *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* शब्दटोपली क्र. (४) *छत्री , मुली, मीना, सीता, सीमा, भाजी ,भाजीपाला ,घरी ,गरीब ,खरीप,जरी, मयुरी, दरी,नशीब ,परीक्षा ,बरीच ,भरीव ,रवी, जमीन, गवळी, कवी, जीवन, वीस,वीज ,वीर ,वीण, भीती,पुरी, आमटी,हरीण,हीच ,सीमा ,शीत,शीळ , बसली, परी, हसली,खीर, पापडी, बारीक, मीठ, भाकरी, वाटली वारली, करामती, सकाळी, सजली, चिमणी, किती, माहिती, बारीक, वाडगिनी , घरी, पाणी, झरीपाडा, शेतकरी, भातशेती, घरातील, छोटी, गाणी, नदी.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- ✍संकलन / लेखन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागर श्यामच्या कथेचा*भाग तिसरा - मुकी फुलेhttps://drive.google.com/file/d/1Cu5V8zhc6FAU-bQSiykPqkGLpnMIV6Iu/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९३:ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९२:ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर**१९८०:सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७६:नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.**१९६९:भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६९:नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.**१९५२:फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४०:दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई**१९३५:जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:अजय आर्थर देसाई-- कवी* *१९६०:देविदास भावराव फुलारी -- प्रसिद्ध कवी लेखक* *१९५५:रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू**१९५४:विष्णू श्रावण भेंडारकर -- कवी,लेखक* *१९५४:स्नेहलता विलास जोशी-- लेखिका**१९४६:इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू**१९३८:डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.**१९३५:प्रा.सु.ग.शेवडे--भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते,प्रवचनकार**१९३५:रमेश मुधोळकर-- बालसाहित्यकार व चित्रकार(मृत्यू:१३ मार्च २०१६)* *१९३१:प्रेमानंद वासुदेव मडकईकर-- लेखक* *१९३१:मधुकर सुदामा पाटील--समीक्षक**१९३०:प्रा.रुपराव पांडुरंग पाजणकर-- समीक्षक, संपादक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९१)* *१९०८:गोपाळ कृष्ण विनायक चिरमुले-- लेखक* *१९०२:यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू:८ फेब्रुवारी १९९४)**१८९६:ए.जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)**१८२७:मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:रजत मुखर्जी--भारतीयचित्रपट दिग्दर्शक**२०१८:गोपालदास नीरज-- गीतकार,कवी व हिंदी लेखक (जन्म :४ जानेवारी १९२५)**१९६८:प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म:२९ जून १९०८)**१९६५:सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५)**१८८२:फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)**१३०९:संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले.* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7323691734313845/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तळकोकणात मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला, पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान; प्रकल्प अदानींना देताना जनतेचे 3 हजार कोटी बुडवले, सौदी अरेबियाची कंपनी 'सेकलिंक'चा राज्य सरकारवर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बुलढाणा अर्बन बँकेत 80 लाखांचा घोटाळा, एका कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल; जमा पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक येणार, धनंजय मुंडेंचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि पत्नी सुधा मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला; सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 घोळाणा फुटल्यास काय करावे ?📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तवावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'पोवारी'* बोलीभाषेतील पहिला बालकथा संग्रह कोणता ?२) महाराष्ट्र राज्यातील 'चला जाणूया नदीला' या उपक्रमाचे प्रणेते कोण आहेत ?३) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश किती व कोणते ?४) कोणती भारतीय लोकचळवळ महात्मा गांधी यांच्या 'दांडीयात्रे'ने सुरू झाली ?५) महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) खोपळीमाकी दिवारी ( लेखक - गुलाब बिसेन, गोंदिया ) २) राजेंद्र सिंग ३) तीन - अमेरिका, रशिया, चीन ४) सविनय कायदेभंग ५) अजित पवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मनोज बडे👤 श्रीनिवास मुरके👤 गजानन एम. शिराळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसणे एक प्रकारचे जीवन आहे. आपण नेहमीच हसत,खेळत रहावे. व दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे. पण, एखाद्यावर आलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यावर कधीही हसू नये.कारण, इतरांवर हसल्याने निसर्ग कधी रडायला लावेल . या विषयी कोणीही सांगू शकत नाही. म्हणून व्यर्थ, गोष्टींच्या नादी लागून वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बुड बुड घागरी*एकदा एका जंगलात उंदीर जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी साखर आणतो'. मांजर म्हणाले 'मी दूध आणतो'. उंदीर म्हणाला 'मी शेवया आणतो'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'.इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. तात्पर्य : कधीही खोटे बोलू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागर श्यामच्या कथांचा*भाग दुसरा - अक्काचे लग्नhttps://drive.google.com/file/d/1PKkK3gfkiy94u7n9yTAf9o1eCQM0i3Mp/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६:’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.**१९८०:भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.**१९७६:मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.**१९६८:सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना**१९२५:अॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.**१८५७:मुंबई विद्यापीठाची स्थापना**१८५२:इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:स्मृती श्रीनिवास मानधना-- भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू**१९८२:प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती**१९७९: राकेश काळू वानखेडे-- लेखक, कवी* *१९७५:डाॅ.कमलाकर कोंडिबा राऊत-- लेखक* *१९७२:सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४)**१९७१:सुखविंदर सिंग-- प्रसिद्ध भारतीय गायक**१९६९:अर्चना मिरजकर -- कथा,कादंबरी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित, अनेक ग्रंथांचे भाषांतर* *१९६०:विश्वास नेरुरकर-- संगीत संशोधक व अभ्यासक* *१९५८:रेणू राजाराम दांडेकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका**१९४८:सुजाता देशपांडे-- मराठी व हिंदी भाषेतील कवयित्री,लेखिका**१९४८:गजेंद्र अनंतरामजी गजभिये -- कवी**१९४८:बाबुलाल माळी -- शैक्षणिक व चरित्रात्मक लेखन करणारे लेखक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९४७: सुभदा मुळे-- लेखिका* *१९४१:निक्षुभा नंदकुमार जोशी -- कवयित्री**१९४०:डॉ.भागवत शिवराम भोयर-- लेखक, कवी* *१९२७:’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२)**१९२७: डॉ.चंद्रशेखर शिवलिंग कपाळे-- कवी लेखक संपादक**१९२४:श्रीधर उर्फ बापूराव दत्तात्रेय आगाशे--चरित्रकार, प्रवचनकार (मृत्यू:२५ एप्रिल १९९६)**१९१८:नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)**१८४८:डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)**१६३५:रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९४२)**२००१:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४)**१९९४:डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक* *१९८९:डॉ.गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक(जन्म: २मे १९१४)**१९६९:’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म:१ ऑगस्ट १९२०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7320107921338893/कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक ; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *710 कोटींचा खर्च ! अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार ऑनलाईन उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लातुरातील वडवळ नागनाथ गावात दरवर्षी 100 कोटींच्यावर उत्पन्न, पण यंदा टमाटेच लावले नसल्याने बसला आर्थिक फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यळकोट यळकोट, जय मल्हार! सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्यात न्हाऊन निघाली जेजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia Cup 2023 : नेपाळचा पराभव करत भारताची उपांत्य फेरीत धडक, बुधवारी पाकिस्तानसोबत सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 ***************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून, कृती होय.➖ हर्बट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) स्वीडन येथील शाळकरी मुलगी *'ग्रेटा थनबर्ग'* ने कोणत्या चळवळीनं वातावरणातील बदलांकडे जगाचं लक्ष वेधून घेतले ?२) 'कॅम्पनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?३) बीबीसी या प्रख्यात वृत्तवाहिनीचे विस्तारित रूप काय आहे ?४) कोणत्या पक्ष्याला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?५) महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) Friday For Future २) पंतप्रधान नरेंद्र मोदी ३) ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन ४) कबुत्तर ५) नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड, औरंगाबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घेणे अजिबात वाईट नाही. पण,तो मिळणारा सल्ला कशाप्रकारे मिळतो तेही जास्त आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, मिळणाऱ्या सल्याकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्याने आपले मेंदू सुध्दा कायमसाठी गुलाम होऊन जाते आणि वेळ आल्यावर सर्वच विकण्याची वेळ येत असते. म्हणून पुन्हा अशी आपल्यावर वेळ येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.शेवटी आपली परिस्थिती, आपले विचार ,आपले मत, आपले मेंदू ,कसेही असले तरी आपलेच असतात ते,स्वतंत्र असायला पाहिजेत.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लौकिक राजा*जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, 'महाराज! राजवाडयाला आग लागली आहे.' जनक म्हणाला, 'मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.' थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, 'महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडया वेळातच पसरेल.' तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढयात रक्षकाने तिसरी बातमी आणली, 'महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्या प्रजेची घरं जळून खाक होतील.' हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला. म्हणाला, 'किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.' म्हणजे राजाला स्वत:चा राजवाडयाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती. तात्पर्य : कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_'जागर श्यामच्या कथांचा'_**_सप्रेम नमस्कार,_*_शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेच्या वतीने_*_पूज्य साने गुरुजींच्या 'श्यामचीआई'_* _पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेल्या ' जागर श्यामच्या कथांचा' हा उपक्रम सोमवार, १७ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.__दररोज एक याप्रमाणे ऑडिओ स्वरूपातील कथा व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल.__उपक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.____________________*_सोमवार, १७ जुलै २०२३_*___________________*_सावित्रीचे व्रत_*___________________https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय न्याय दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००४:तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.**२०००:अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर**१९९४:विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.**१९९३:तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान**१९७६:कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९५५:वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्नेलँड’ सुरू केले.**१९४७:मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.**१९१७:किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.**१८४१:अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८१९:’अॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.**१८०२:मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:प्रा.डाॅ.अश्विनीकुमार पंजाबराव धांडे-- वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिणारे लेखक**१९६४:किरण जुनेजा-- भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री**१९६२:गजानन एकनाथ उल्हामाले -- कादंबरी व नाट्यलेखन**१९६४:प्रमोदकुमार अणेराव-- प्रसिद्ध कवी,कथाकार व चित्रकार**१९६०:प्रमोद प्रभाकर जोगळेकर--संपादक, लेखक**१९५७:डॉ.मिर्झा रफी अहमद बेग--प्रसिद्ध वऱ्हाडी कवी* *१९५६: देविदास मुरलीधरराव कुलकर्णी -- कवी,लेखक,संपादक* *१९५४:अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर**१९४६:अविनाश फणसेकर -- नाटककार, नाट्य दिग्दर्शक, संपादक (मृत्यू:८ आगस्ट २०११)**१९४४:रविंद्र बेर्डे-- मराठी चरित्र अभिनेते* *१९४२:अप्पासाहेब गोपाळ पाटील -- कादंबरीकार* *१९३६:मृणालिनी परशुराम जोगळेकर-- कथाकार,चरित्रकार(मृत्यू:३१ मार्च २००७)**१९३३: दिनकरराव देशपांडे-- बालसाहित्यिक,लेखक (मृत्यू:१८ मार्च २०११)* *१९३०:सचिन भौमिक-- भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:१२ एप्रिल २०११)**१९३०:बाबुराव बागूल – प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ मार्च २००८)**१९१९:स्नेहल भाटकर (वासुदेव गंगाराम भाटकर)-- मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)**१९१७: बिजोन भट्टाचार्य-भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)**१८८९:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)**१८७०: गणेश बलवंत मोडक-- लेखक (मृत्यू:१८ फेब्रुवारी ९५३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सी.शेषाद्री- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक(जन्म: २ फेब्रुवारी १९३२)**२०१२:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)**१९९२:शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)**१९९२:काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)**१७९०:अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7316755375007481/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आजपासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुष्काळाचे सावट ! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध ; परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर 141 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. २६ मार्च २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते, तेच खरे शिक्षण .➖ डॉ. जाॕन.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला *'दादा* असे संबोधले जाते ?२) आधुनिक भारतातील पहिले उल्का खगोलशास्त्रज्ञ कोणाला मानले जाते ?३) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?४) कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो ?५) कोणत्या नदीच्या पुरामुळे दिल्ली येथे महापूर आला आहे ?*उत्तरे :-* १) सौरभ गांगुली २) अश्विन शेखर ३) शट डाऊन ४) सिंह ५) यमुना नदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मधुकर फुलारी👤 आरिफा शेख, सहशिक्षिका, पुणे👤 पुरुषोत्तम केसरे, देगलूर👤 आनंद पंगेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शहाणे तर सर्वजण असतात पण,खऱ्या अर्थाने तोच माणूस शहाणा असतो त्याला उचित, अनउचित, सत्य,असत्य सहजपणे ओळखता येतो. पण, कधी, कधी असं होतं की, जेव्हा,नकारात्मक विचार मनात प्रवेश करतात तेव्हा सर्व कळून सुध्दा वळत नाही असेही शहाणे कोणत्या कामाचे...? म्हणून आपण असे शहाणे बणावे जेथे ह्या साऱ्या गोष्टींना ओळखता येईल. आणि स्वतःसाठी तसेच इतरांनाही जास्त नाही तर थोडा तरी त्यातून फायदा होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६:स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२:शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५:पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५:आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७:समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६:मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२:इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:सुभाष आ.मंडले -- लेखक* *१९८१:प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे-- लेखक,कवी* *१९८०:राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी लेखक* *१९७५:आबा गोविंदा महाजन-- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८:सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६०:प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे-- कवी**१९५६:डॉ.प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१:अनुराधा मराठे-- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट-- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९:प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४३:दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१:माधव गुणाजी कोंडविलकर--ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२०)* *१९३७:विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू:३१ जानेवारी १९८६)**१९३७:प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३)**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)**१९३१:विठ्ठल उमप-- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू:२६ नोव्हेंबर, २०१०)**१९२७:प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)**१९१९:बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:६ नोव्हेंबर २००६)**१९१८:चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१०)**१९०५:चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)**१९०४:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)**१९०३:के.कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)**१८९९:दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११:मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००४:डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)**१९९१:जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म:१९२०)**१९८०:गजानन विश्वनाथ केतकर--निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म:८ ऑगस्ट १८९७)**१९६७:नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म:२६ जून १८८८)**१९१९:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)**१९०४:अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7313550268661325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार, दूध दर निश्चिती समितीचा अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल, भाजपची सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्याच कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालच्या 171 धावा, टीम इंडिया तीन बाद 350 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 किरणोपचार म्हणजे काय ? 📙 अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्था पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक, कोलंबी👤 श्रीकांत जोशी, सहशिक्षक, धर्माबाद👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी हिवराळे, पत्रकार, बिलोली👤 विठ्ठल हिमगिरे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर बीजेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड👤 शंकर हांड्रे, सहशिक्षक, बिलोली👤 संतोष ईबीतवार, येवती👤 पांडुरंग चंदेवाड, येवती👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 उत्तम पाटील चोळाखेकर👤 राजू कदम👤 वसंत सिरसाट👤 नवाज शेख👤 सचिन खांडगावे👤 वसंत बोनगिरे👤 एस के सागर👤 विष्णूराज कदम, पांगरी👤 विजयकुमार पाटील घुलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे अनेकजण म्हणतात की,झोपलेल्या माणसाला उठवता येते पण,झोपेचे सोंग घेऊन झोपला असेल तर त्याला कधीच उठवता येत नाही. म्हणजेच ते, झोपेचे सोंग सुध्दा कदाचित भयानक असू शकते. म्हणून त्या झोपलेल्यांपासून जरा आपणही स्वत: थोडे सावध रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१३:डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.**१९७६:कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.**१९६०:चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.**१८६७:आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.**१७९०:फ्रेन्च राज्यक्रांती – पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. या घटनेने फ्रेन्च राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री राजगोंडा पाटील -- लेखिका, कवयित्री**१९७५: प्रा.रुपाली अवचरे -- प्रत्रकार, लेखिका,संपादक* *१९६८:डॉ.विजयकुमार स.माने-- कवी* *१९६७:हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी**१९६४:अतुल सदाशिव पेठे-- मराठी नाट्यलेखक,नाट्यअभिनेते,नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक**१९५६: रोहिणी अशोक गंधेवार -- कवयित्री**१९५५:अरुण फडके-- प्रसिद्ध मराठी व्याकरणतज्ज्ञ(मृत्यू:१४ मे २०२०)**१९५४:प्रा.डॉ.भगवान लक्ष्मणराव अंजनीकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,विविध साहित्य पुरस्काराने सन्मानित* *१९५१:मिलिंद सखाराम मालशे--समीक्षक, भाषावैज्ञानिक**१९४७:नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान**१९४३:जयराम विठ्ठल पवार(ज.वि.)-- मराठी साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत* *१९२९:कैलाश चंद्र जोशी-- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२४ नोव्हेंबर २०१९)**१९२०:शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)**१९१७:रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)**१८९९: श्रीकृष्ण लक्ष्मण(भैयाजी)पांढरीपांडे -- थोर शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, लेखक (मृत्यू:८ एप्रिल १९९७)* *१८८४:यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधीत्व (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)**१८५६:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ(मृत्यू: १७ जून १८९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)**२००३:प्रो.राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)**२००३:लीला चिटणीस – अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)**१९९३:श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार* *१९७५:मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)**१९६३:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म:८ सप्टेंबर १८८७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!एकोणिसावा शेवटचा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7309356719080680/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जर शिक्षकांनी योग्य पद्धतीने काम नाही केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवाब मलिकांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, ईडीच्या तीव्र विरोधानंतर मनी लाँड्रिगंच्या प्रकरणात वैद्यकीय जामीन नाकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर पुरावे सादर करा; हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युवा धावपटू ज्योती याराजी हिची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी बिनबाद 146 धावांची भागिदारी केली आहे. भारतीय संघ अद्याप 4 धावांनी पिछाडीवर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जगाचा पोशिंदा'* असे कोणाला म्हटले जाते ?२) संविधान सभेची शेवटची बैठक कधी पार पडली ?३) चंद्रावर अंतराळयान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश ठरणार आहे ?४) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?५) सर्वात लहान विषम संख्या कोणती ?*उत्तरे :-* १) शेतकरी /बळीराजा २) २४ जानेवारी १९५० ३) चौथा ४) जळगाव ५) एक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद व्यवहारे, जि. प. नांदेड👤 भागवान अंजनीकर, साहित्यिक, नांदेड👤 धनंजय गुम्मलवार, जि. प. नांदेड👤 नंदकिशोर मोरे👤 नागेश स्वामी👤 डॉ. अमान खान, धर्माबाद👤 नितीन काळे👤 इरवंत जामनोर👤 शंकर कंदेवाड, येवती👤 आकाश यडपलवार, जारीकोट👤 चंद्रकांत वाडगे👤 दीपक बोरगावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे लोक मोठ्या लोकांचे वैरी असतात असं कदाचित कुठेतरी ऐकण्यात आले असेल. पण,त्यात एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजेच योग्यता बघूनही नाते जोडले जातात व साथ दिल्या जाते.पण,कधी, कधी असं होतं की वेळ, प्रसंगी कोणी,कोणाचे होतांना दिसत नाही म्हणून कोणालाही तुच्छ लेखू नये. कारण ऐनवेळी जेव्हा परिस्थिती आपले रूप धारण करते त्यावेळी तिच्याजवळ लहान ,मोठा कोणीही नसते तर..ती सर्वाना एकाच तुतारीने हानत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०११:मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७:रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९:जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८:लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३:सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:उर्वशी शर्मा-- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८२:सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९६१:गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८:प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२:प्रा.माधुरी शानभाग-- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२:डॉ निर्मल सिन्नरकर-- कवयित्री, गीत लेखन**१९४७:डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२:हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९२७:सावळाराम धागोजी म्हात्रे(सावळाराम महाराज)-- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२)**१९१६:रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार(मृत्यू:२२ डिसेंबर १९९६)**१९०३:विमलाबाई देशपांडे-- कवयित्री लेखिका* *१८९२:केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)**२००९:निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म:४ एप्रिल १९३०)**२०००:इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)**१९९४:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७)**१९६९:महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म:१२ जानेवारी १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7308987079117644/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते15 जुलै 2023 दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई ) दौऱ्यावर जाणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *१० दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील, दुष्काळी भागाला पाणी मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रवाशांचा उदंड प्रतिसादमुळे लवकरच विनावाहक 'जन-शिवनेरी' राज्यातील इतर मार्गावर धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्राकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जायस्वाल -ईशान किशन यांचं कसोटी पदार्पण, वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 अँटीबायोटीक्स म्हणजे काय ? 📕अँटीबायेटीक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे.अलेक्झांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत. कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमावसीन, सेफलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी बावडे वा अंतर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्याजाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुराधा पहाडे राजूरकर👤 सुनील जंवजाळ👤 अहमद शेख👤 रवी येलमोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द जर .. वेळ,प्रसंगी किंवा अडचण आल्याने वेळेवर पाळला गेला नाही तर...त्याला खोटे व्हावे लागते. त्या प्रकारचा खोटेपणा सर्वसाधारण व्यक्तीला एक प्रकारची सजाच असते. पण,जो व्यक्ती व्यर्थ गोष्टींसाठी वारंवार खोटे बोलत असते त्याच्यावर मात्र डोळे झाकून विश्वास केला जातो. फरक एवढाच की, माणसं तर..एकसारखे दिसतात पण, त्यांना ओळखणे मात्र फार कठीण जाते.म्हणून खरं कोण बोलत आहे व खोटे बोलून कोण संधी साधत आहे ओळखणे फार आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक 'पेपर बॅग' (Paper Bag Day* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९:’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८:१६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५:अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५:पी.एन.भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२:राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९:किरिबातीला *(इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१:मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५:’प्रभात’चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०:पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९:रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५:संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९५९:प्रा.डॉ.शेषराव नत्थुजी जुडे-- लेखक**१९५२:शंकर किसन तांबे-- लेखक* *१९४७:सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी-- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५:डॉ.अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९२२:मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८)**१९२०:वसंत गोविंद देशमुख-- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१९१३:मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके-- लघु निबंधकार (मृत्यू:१३ जानेवारी १९६३)**१९०९:बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८८९:केशव गणेश आठल्ये(केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४:वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)**१८५४:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२)**१८१७:हेन्री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)**२०१२:दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)**१९९९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९)**१९९४: वसंत साठे --हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार** *१६६०:बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सतरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7305295232820162/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्यूयॉर्कमधील भारतीय वंशाच्या संशोधकांनी बनवलं अनोखं उपकरण; पाच मिनिटांच्या आत ओळखता येणार विषाणू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो नंतर काँग्रेसची बस यात्रा, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून सुरूवात, लोकसभेच्या जागा जिंकण्याचं टार्गेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी बातमी! विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का ; ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर, 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी.. शाह फैसल आणि शेहला रशीद यांच्या याचिका मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेड इन इंडिया आयफोनचा मार्ग मोकळा.. आता टाटा भारतात बनवणार iPhone! ठरणार भारतातील पहिले आयफोन उत्पादक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या लेकींची कमाल.... बांगलादेशचा 87 धावांत खुर्दा, दीप्ती-शेफालीचा भेदक मारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी सचिन तेंडूलकरला कोणत्या पुरस्काराने सन्मान केला ?२) पातळ प्लास्टिक पिशवीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?३) भारताबाहेर प्रदेशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था ( आयआयटी ) कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे ?४) महाराष्ट्र राज्याचा राज्यखेळ कोणता ?५) गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) गार्ड ऑफ ऑनर २) न्युझीलंड ३) झांझिबार - टांझानिया ४) कबड्डी ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक, कन्नड👤 शिल्पा जोशी, मुंबई👤 अविनाश पांडे👤 हरिहर धुतमल, पत्रकार, नांदेड 👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव👤 अभिजित राजपूत👤 नागेश पडकूटलावार👤 नंदकुमार कौठेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो ? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कितीही दिले तरी ते जन्मभर पुरत नाही. व कोणी काहीच दिले नाही तरी कोणाचे, कोणापासून अडत नाही. पण, ज्यांनी वेळ, प्रसंग,अडचण जाणून आपुलकीने मदत केली असते ती,मदत जगापेक्षा वेगळी असते. म्हणून वेळ, प्रसंगी आपल्याला कोणी आपुलकीने मदत केली असेल तर त्यांना कधीही विसरु नये.व ज्यांनी त्या, प्रसंगी पाठ फिरवली असेल...त्यांचाही आदर करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर, कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ""आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही. हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ""वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव."" तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚उपक्रम📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.🌺शब्दटोपली क्र. (२)🌺 *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस ’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._**_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१:आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सु,रू झाली.**१९९४:दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९:अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१:चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०:पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०:ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१:फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:विकास वसंतराव गुजर-- लेखक* *१९६९:प्रणव हळबे -- कवी* *१९६५:अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९५९:डॉ.अचला दि.तांबोळी -- कवयित्री लेखिका* *१९५५:प्रा.सुहास बारटक्के-- लेखक,पत्रकार* *१९५३:सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०:सुप्रिया अनंत अय्यर -- कादंबरीकार, कथाकार**१९४७:शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी* *१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१)**१८९१:परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१)**१८८९:नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१)**१८८७:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक,प्राध्यापक आणि समाजसेवक(२५ जानेवारी १९६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:मधुसूदन नानिवडेकर--प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६०)**२००९:शांताराम नांदगावकर –मराठी गीतकार,कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म:१९ आक्टोबर १९३६)**२००३:सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म:१५ नोव्हेंबर १९४८)**१९९४:रामा राघोबा राणे--- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म:२६ जून, १९१८)* *१९८९:सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सोळावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7302400636442955/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर ; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिपाई आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार? रामदास आठवले यांचे महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर; प्रशासनाकडून रेड अलर्टचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिशन वेस्ट इंडिज ! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अँड कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारताची लोकसंख्या*एप्रिल 2023 मध्ये भारताने चीनला मागे टाकत लोकसंख्येत पहिल्या स्थानी उडी मारलीय.2023 च्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर जाईल. तर चीनची लोकसंख्या ही 142 कोटी 57 लाख असू शकते.2011 नंतर भारतात जनगणना झालेली नाही. त्यामुळे भारताची लोकसंख्या नेमकी किती आहे, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.पण 2020 मध्ये नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशनने लोकसंख्येच्या अंदाजानुसार, एक अहवाल प्रकाशित प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, 2011 ते 2036 दरम्यान 25 वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वाढून 152 कोटी 20 लाखांपर्यंत जाईल, असं सांगण्यात आलं आहे.त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची घनता ही 368 वरून वाढून 463 प्रति वर्ग किलोमीटर इतकी होईल.पण तज्ज्ञांच्या मते, भारतात पूर्वीपेक्षा आयुर्मान वाढलं आहे. शिवाय, जन्मदरही घटलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर खाली आला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) धाराशिव जिल्ह्याचे 'उस्मानाबाद' हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले होते ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मीर उस्मान अली खान असफ जाह, हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम ५) o रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी👤 प्रभाकर देशमुख, सहशिक्षक, बिलोली👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक, देगलूर👤 स्वप्नील शिंदे👤 नरेश गौतम👤 अनुपमा अजय मुंजे👤 संतोष चव्हाण, सहशिक्षक, नांदेड👤 अवधूतवार साई किरण, बोधन👤 प्रमोद मंगनाळे, सहशिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शंभर लोकांमध्ये जर.. आपण उपस्थित असाल..व स्वतः आपला कोणालाही परीचय न देता एका माणसाने जर...आपल्याला ओळखले असेल तर..हि सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण, ते सर्व लोक आपले असतील असेही नाही त्यातील एक माणूस सुद्धा आपला मार्गदर्शक, मित्र,गुरु व प्रेरणास्थान असू शकतो. त्या माणसाचा सन्मान करावे व तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचाही आदर करावे.आणि त्याच क्षणी वेळ वाया न घालवता स्वतः लाही ओळखावे आपली ओळख आपल्यालाच होईल. .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोरावर मोर*रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, 'मी या विहिरीत किती पाणि आहे हे पाहण्य़ासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचक त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, 'बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं, तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, विहिरीच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीसांकडे नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षिस दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पंधरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7301148706568148/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१० जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_मातृसुरक्षा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००:नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५:म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२:संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२:मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८:मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८:मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३:पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३:बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७:ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०:'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३:मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०:वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:एकनाथ विश्वनाथ पवार-- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२:शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०:युवराज भुजंगराव माने-- लेखक* *१९८०:प्रा.डॉ.सखाराम डाखोरे-- कवी* *१९७८:सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस-- लेखक, कवी**१९५९:तुकाराम पुंडलिक खिल्लारे-- कवी**१९५४: रविराज गंधे-- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०:’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७:ल.म.कडू-- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४४:डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३:आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)**१९४१:अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०:लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९:डॉ.विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते(मृत्यू:९ जानेवारी २०२३)**१९२३:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)**१९२१:असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार(मृत्यू:९ जून १९९०)**१९१३:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)**१९०३:रामचंद्र भिकाजी जोशी-- प्रवासवर्णनकार, समीक्षक(मृत्यू:६ नोव्हेंबर १९९१)**१८८३:दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन-- पहिले भारतीय वैमानिक(मृत्यू:१८ ऑक्टोबर १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म:१५ नोव्हेंबर १९३६)**२००५:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)**१९९५:डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९:प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक(जन्म:९ जानेवारी १९१८)* *१९८६:शंकरराव श्रीपाद बोडस-- शास्त्रीय गायक (जन्म:२० एप्रिल १९००)**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७)**१९६९:डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सीएसएमटी स्थानकाचं लवकरच कायापालट होणार, 2400 कोटी खर्च करुन स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करुन 303 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेचा विक्रमी महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ * 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं आजारांचं प्रमाण वाढलं, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावेत : केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मांडवीय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'भारतासारखी मदत आतापर्यंत कोणीही केली नाही'; वाईट आर्थिक संकटातून सावरल्याबद्दल श्रीलंकेने मानले भारताचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने नेदरलँडचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) लंडनमध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) स्वदेशी निर्मित असलेल्या 'सेमी हाय स्पीड ट्रेन - १८' चे नामकरण २०१९ मध्ये कोणत्या नावाने करण्यात आले ?३) 'माय रशिया - वॉर ऑर पीस' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) वनस्पतीचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती ?*उत्तरे :-* १) शक्तिकांत दास २) वंदे भारत एक्सप्रेस ३) मिखाईल शिष्किन ४) मूळ ५) १० जून १९९९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक, मुखेड👤 भागवत गरकल👤 लक्ष्मण मुंडकर, बिलोली👤 मिलिंद चवरे, नांदेड👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 महेश पांडुरंग लबडे, छ. संभाजीनगर👤 शिवाजी वासरे👤 गणेश अंगरवार👤 संतोषकुमार यशवंतकर👤 बालाजी दुसेवार👤 दत्तात्रय धूळशेट्टे, माजी गटशिक्षणाधिकारी👤 प्रियंका घुमडे👤 मन्सूर शेख👤 पिराजी चन्नावार👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक, बिलोली👤 दगडू गारकर, लातूर👤 युवराज माने, बीड👤 लक्ष्मीकांत पडोळे👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद👤 कृष्णा चिंचलोड, येवती👤 अभिजित वऱ्हाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदैव सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तीला लागलेला कलंक हा कोळशा पेक्षा काळा असतो तसच त्याच व्यक्तीला पुन्हा कलंक लावण्यासाठी दहा लोक नेहमीच सज्ज असतात. हे वास्तव सत्य आहे. तरीही ती व्यक्ती सत्याच्या बाजूने उभे राहून प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करते. अशा विचाराची व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून ती, व्यक्ती कोणाचाही विरोध करत नाही व व्यर्थ गोष्टींना साथ देत नाही. आपणही त्याच व्यक्तीकडून थोडं शिकण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याची कला*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणर्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. त्याला त्याची चूक कळून आली. तात्पर्य : ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौदावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7295910263758659/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली*जन्मदिवस*१९१४ - ज्योती बसू, बंगाली राजकारणी.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.*मृत्यू*२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघातातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधींना कोर्टाचा दणका, गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ? राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *HDFC चे कर्ज महागले; ग्राहकांवर EMI चा भार वाढणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यांआधी यशस्वी जयस्वालने त्याच्या दमदार कामगिरीने वेधलं लक्ष.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सौरव गांगुली*सौरव गांगुली डावखुरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत. गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला. याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता. क्रिकेट विश्वात दादा या नावाने प्रसिद्ध होते. काही काळ त्यांनी BCCI चे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.➖जैन विचारदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) *'मुख्य निवडकर्ता '* म्हणून कोणाची निवड केली आहे ?२) महात्मा फुले यांनी कोणत्या ब्राम्हण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त केले ?३) जगातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र कोणते ?४) महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणाला म्हटले जाते ?५) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अजित आगरकर, माजी गोलंदाज २) काशीबाई ३) कच्चे तेल ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) देवेंद्र फडणवीस व अजित पवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेदरे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं सर्वच चांगलं आहे आणि इतरांचं सर्वच वाईट असते या प्रकारची जर...आपली विचारसरणी असेल तर ते, व्यर्थ आहे कारण, आपल्या परीने जर..आपले चांगलेच असेल तर...इतरांचेही त्यांच्या परीने थोडं तरी चांगले असू शकते प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात. म्हणून उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दोघां भावातील खटला*एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚उपक्रम📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.🌺शब्दटोपली क्र. (२)🌺 *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚 उपक्रम 📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍ *🌺शब्दटोपली क्र. (१)🌺* *घर, नळ, कप, ऊस, समई, पपई, मगर , गवत, अहमद, अमर , टपटप , ढग , बघ , हसत, लवकर, उठ,आई, पाऊस, बघ, रमण, उगम, हळद, करण, गरम,फळ, कढई, जखम,वड, खडखड, बडबड, बबन,भरत, सरळ,परत,धरण, पण,थरथर ,दगड,गगन,जल,नग,नगर ,नमन,नऊ,छगन,खत,कसरत,कटकट,गडगड,घड,चरण,छत,जवस, वर, फणस, अननस, परस, वरण, सण, चल, भरभर, सरसर,गरज, पटकन, सरबत.* ---------------------------✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तेरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7291567597526259/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *७ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.**१९८५:विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.**१९७८:सॉलोमन बेटांना (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४१:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.**१९१०:इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.**१८९८:हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.**१८९६:मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.**१८५४:कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:संतोष इमलीबाई पिचा पावरा-- कवी, लेखक* *१९८७: नवनाथ सोपान गोरे -- लेखक* *१९८१: महेंद्रसिंह धोनी – प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार* *१९७७:हनुमंत चांदगुडे -- प्रसिद्ध कवी, गीतकार* *१९७३:कैलाश खेर-- प्रसिद्ध भारतीय पॉप-रॉक गायक**१९७०:छाया बेले -- कवयित्री,लेखिका* *१९६९: ज्योती धर्माधिकारी-- कवयित्री, लेखिका**१९६९: नरेंद्र सा.गुळघाणे-- कवी* *१९६५: प्रज्ञा दत्तात्रय घोडके-- कवयित्री, लेखिका* *१९६२:पद्मजा फेणे-जोगळेकर-- सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका**१९५५:डॉ.दत्तात्रेय तापकीर-- प्रसिद्ध लेखक**१९५०:पांडुरंग गायकवाड -- जेष्ठ लेखक* *१९४८:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)**१९४८:सुभदा साने-- लेखिका, बालसाहित्यिक* *१९४७:राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश**१९३३:श्यामकांत विष्णू कुलकर्णी--कवी, कादंबरीकार, कथाकार, लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२२)* *१९३२:प.झो.उपाख्य अविनाश वरोकर- कवी लेखक* *१९२३:प्रा.लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक(मृत्यू:२५ जून १९८०)* *१९१४:अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार (मृत्यू: ३१ मे २००३)**१९०९: विनायक शामराव काळे-- कवी* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:दिलिप कुमार- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता (जन्म:११ डिसेंबर १९२२)**२०२०:रवी दाते-- ज्येष्ठ संगीतकार, गझलगायक आणि तबलावादक(जन्म:३ डिसेंबर १९३९)* *२०१३:सुधाकर बोकाडे-- भारतीय चित्रपट निर्माता(जन्म:१९५६)**१९३०:सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक (जन्म: २२ मे १८५९)**१३०७:एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:१७ जून १२३९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *MPSC तर्फे घेण्यात आलेल्या PSI व STI परीक्षेचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीएचडी असल्यास नेट-सेट ची गरज नाही, यूजीसीचे स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चांद्रयान - 3 चे 14 जुलै रोजी होणार प्रक्षेपण, इस्रोची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाज्यांचे दर गगनाला, सामान्यांच्या बजेटला मोठी कात्री.. समस्यांमुळे जनता कोमात, राजकारण मात्र जोमात.. पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या, शेतकरी मेटाकुटीला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेदरलँड्सच्या संघाने पात्रता फेरीत स्कॉटलंडला चार विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांनी विश्वचषकात दिमाखात प्रवेश केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी*महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी राजपूत परिवारा मध्ये रांची येथे झाला. 'माही' व 'एम.एस.' या नावाने तो ओळखला जातो. त्या सोबतच तो 'कॅप्टन कूल' या नावाने देखील ओळखल्या जातो. त्याने २००७ पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि २००८ पासून २०१४ पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले आहे. धोनी यांच्या नेतृत्वात २००७ च्या आयसीसी विश्वचषक टी -२०, २०१० आणि २०१६ आशिया कप, २०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपिंग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. धोनीने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये तो प्रभावी "फिनिशर" मानला जातो.*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'परमवीर चक्र - द टायगर्स ऑफ इंडियन वॉर्स'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परिषद केव्हा घेतली ?३) फुटबॉल ची संस्कृती तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कोणत्या राज्याने *'फुटबॉल फॉर ऑल'* हा उपक्रम सुरू केला आहे ?४) विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये लावण्यात येत असलेल्या ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) शिवाजीराव बडे, अहमदनगर २) १ जून १९३६ ३) ओडिसा ४) डेव्हिड वॉरेन, ऑस्ट्रेलिया ५) महात्मा फुले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन काठेवाडे, पीएसआय 👤 ऋषिकेश देशमुख, साहित्यिक, देगलूर👤 साईनाथ हामंद, करखेली👤 लक्ष्मण कांबळे👤 महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद👤 दत्ताहरी पाटील कदम बेलगुजरीकर👤 जगन्नाथ पुलकंठवार, धर्माबाद👤 सय्यद युनूस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक👤 शंकर रामलू बलीकोंडावार👤 बाशेट्टी नागेश👤 बाळासाहेब पेंडलोड👤 श्रीकांत माने, धर्माबाद👤 प्रकाश गोरठकर👤 विजय पाटील रातोळीकर👤 ज्वालासिंह घायाळे👤 दिगंबर पांचाळ👤 हरिओम रामोड👤 व्यंकट ताटेवाड👤 पिराजी कटकमवार👤 पोषट्टी जाजेवार👤 संदीप डोंगरे👤 हणमंत जाधव👤 प्रज्ञा घोडके👤 रमेश चांडक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेली चांगली, वाईट परिस्थिती किंवा नकळत आलेला एखादा भयानक प्रसंग जसा येतो तसाच एक, ना एक दिवस निघूनही जात असतो.पण, त्यावेळी ती,परिस्थिती बघून कोण आपुलकीने आपल्याला साथ देतो व कोण पाठ फिरवतो खरी माणसाची ओळख त्याच वेळी होत असते. म्हणून आपुलकीने साथ देणाऱ्याला कधीच विसरू नये व दिखावूपणाची आपुलकी दाखवून गोड बोलणाऱ्यावर मुळात विश्वास करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लांडगा आला रे आला*एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.' लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, 'कशी गंमत केली.' शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले.दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता. तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!बारावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7289700271046325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *६ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२:पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०:भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२:ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५:लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५:मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९७८:तन्वी अमित-- कवयित्री लेखिका* *१९७२:प्रा.डॉ विशाखा संजय कांबळे-- कवयित्री, लेखिका, संपादिका, संशोधक* *१९६७:ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६१:अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते* *१९५२:रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९४६:जॉर्ज डब्ल्यू. बुश–अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३:कालिदास गणपतराव चिंचोळकर-- लेखक* *१९४१:अरविंद नारखेडे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९:अरविंद प्रभाकर जामखेडकर --पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३२: सिंधूताई मांडवकर-- जेष्ठ लेखिका* *१९३०:डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)**१९२०:डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ,’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)**१९०५:लक्ष्मीबाई केळकर – लेखिका,राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)**१९०१:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी –माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)**१८८१:संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)**१८६२:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)**१८३७:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)**१७८१:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)**१९९९:एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)**१९९७:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)**१९८६:’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)**१८५४:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिकची पाणीकपात टळली! पाणीसाठा वाढला, गंगापूर धरण 31 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील चुनाभट्टी येथे 50 फूट खोलपर्यंत जमीन खचली; जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील आदेश येईपर्यंत धाराशिवचे नाव उस्मानाबादच असणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संभाजीनगर शहरातील हवेची गुणवत्ता मोजायला मनपा बसवणार 30 यंत्र, भुवनेश्वरस्थित 'ऑराशूअर' कंपनीसोबत केला करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संकष्टी चतुर्थी*हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थी दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करतात. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विविधांगी शैक्षणिक उपक्रमावर आधारित *'सृजनशाळा'* या पुस्तकाचे लेखक कोण ?२) हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिलं गाणं कोणतं ?३) UCC चा full form काय आहे ?४) भारताचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?५) एका मानवी किडनीचे वजन किती असते ?*उत्तरे :-* १) गुलाब बिसेन, गोंदिया २) दे दे खुदा के नाम पे प्यारे ( आलमआरा ) ३) Uniform Civil Code ४) स्वामी दयानंद सरस्वती ५) १५० ग्रॅम *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक इमनेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, विषय शिक्षक, धर्माबाद👤 शंकर सोनटक्के, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 बरकत खान👤 अभय कासराळीकर👤 अर्फत इनामदार👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नि:स्वार्थ भावनेने जे इतरांना द्यायला शिकतात त्यांना कोणाकडूनही घेण्याची अपेक्षा मुळातच नसते कारण अपेक्षा ठेवून ते दु:खाचे कारण बनत नाही. आणि होऊ शकेल तर..आपल्या परीने शेवटच्या क्षणापर्यंत ते देण्यासाठी धडपडतच असतात. आपण ही तशाच व्यक्तीकडून थोडं तरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेथे अपेक्षा केली जात नाही तर. .फक्त माणुसकी धर्म निभावून दाखवला जातो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी स्पर्श* ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली. परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला. तो म्हणाला "मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झालं पाहिजे”. त्याची ही इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली. लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी, आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला. सगळा वेळ दगड, गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला. तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली. तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला, मुलीला त्याचा स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य, परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला. तात्पर्य: लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!अकरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7286872121329140/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *५ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००९:अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७:स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६:संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७:पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५:विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५:’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५:’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२:अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९५०:इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४:जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०:फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११:व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:प्रा.डॉ.आनंद अहिरे -- कवी लेखक* *१९८५:राहुल गोविंद निकम-- कवी लेखक**१९८५:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९८०: डॉ. चत्रभूज कदम-- लेखक संपादक* *१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८:मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८:प्रा.डॉ.कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७६:मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३:डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३:गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९६६:प्रा.डॉ.बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३:लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२:डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक,संपादक* *१९५८:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७:अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७:पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:डॉ.कैलास शंकरराव कमोद-- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४:जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२:रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २०००)**१९४९:पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६:राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष(मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२०)**१९४३:बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर-- सूचिकार, संपादक (मृत्यू:१३ जानेवारी १९७९)**१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल(मृत्यू:८ आक्टोबर २०१२)**१९२०:आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)**१९१६:के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)**१९१२:दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे---पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू:६ ऑगस्ट १९८३)**१८८२:हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:तुळशी परब-- कवी (जन्म:३० सप्टेंबर १९४१)**२००५:बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)**१९९६:चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म:९ जून १९०६)* *१८२६:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्य वारी संकल्पनेत 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाने दिली आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाच्या 4082 सदनिकांसाठी आतापर्यंत एक लाख ऑनलाईन अर्ज; 10 जुलै अंतिम मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण मसुदा तयार झाल्याशिवाय निर्णय नाही, महाराष्ट्र दौराही करणार, विदर्भातून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपकडून महत्त्वाचे निर्णय; चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू*पी. व्ही. सिंधू ( पुसारला वेंकट सिंधू ) या भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. सिंधूने 2016 च्या ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी सिंधू ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. ती सध्या भारताची राष्ट्रीय विजेती आहे. 2012 मध्ये तिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या टॉप 20 मध्ये स्थान मिळवले. 10 ऑगस्ट 2013 रोजी, पीव्ही सिंधू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. पीव्ही सिंधू हैदराबादमधील 'गोपीचंद बॅडमिंटन अकादमी'मध्ये प्रशिक्षण घेते आणि 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट' नावाच्या ना-नफा संस्थेद्वारे समर्थित आहे. तिचा जन्म 5 जुलै 1995 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानी मनुष्य हा स्वर्ग बनवू शकतो.➖स्वामी शिवानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. मनोज तानुरकर, धर्माबाद 👤 नरेश शिलारवार, आर्ट लाईफ, धर्माबाद👤 सुधाकर चिलकेवार, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, धर्माबाद👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान, धर्माबाद👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 नागनाथ भत्ते, धर्माबाद👤 गणपत बडूरकर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 राजरेड्डी बोमानवाड👤 मारोती कदम👤 सुभाष कुलकर्णी👤 चक्रधर ढगे पाटील👤 किशन कावडे👤 अनिल गायकांबळे👤 संभाजी कदम👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, कळमनुरी👤 गिरीश कहाळेकर👤 फारुख शेख👤 अजय चव्हाण👤 अशोक पाटील👤 रमेश अबुलकोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रास त्यालाच होतो ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते.ज्याला ह्या साऱ्या गोष्टींविषयी काही वाटत नाही कारण त्याला काहीही फरक पडत नाही . म्हणून आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण, चुकीच्या वाटेवर चालून आपल्या जीवनाची दिशा कधीही बदलवू नये. व नको त्या आहारी जाऊन साथ देऊ नये. कारण त्रास आणि दु:ख भलाही कठोर असले तरी आपले मार्गदर्शक सुध्दा असू शकतात हे विसरता कामा नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थी मांजर*एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.तात्पर्य :- स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दहावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7284168791599473/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *४ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७:’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५:टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७:ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६:सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६:’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६;अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६:अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:गोविंद दत्तराम कवळे -- कवी**१९८०:संजय माणिक राठोड-- कवी,लेखक**१९७३:वृषाली सानप-काळे- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०:शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६६:डॉ.प्रभाकर शेळके-- कवी,कथाकार* *१९६५:रमेश पांडुरंग तांबे-- लेखक,कवी* *१९६०:देवेंद्र भुजबळ-- लेखक,संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५६:डॉ.संजीवनी मुळे- लेखिका,कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे-- लेखिका* *१९४७:गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७:डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक* *१९३३:डॉ.अरविंद वामन कुलकर्णी-- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी(मृत्यू:२९ ऑक्टोबर २००३)**१९२६:विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक(मृत्यू: १७ एप्रिल २०११)**१९१४:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)**१९१२:पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९९४)**१८९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू:१५ जानेवारी १९९८)**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू:१९ जानेवारी १९५८)**१८९०:क्षमादेवी राघवेंद्र राव--संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४)**१८७२:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)**१७९०:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९)**१९८२:भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: १९१८)**१९८०:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म:२४ एप्रिल १८९६)**१९६३:पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६)**१९३४:मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)**१९०२:स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३)**१८३१:जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)**१८२६:थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३)**१८२६:जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कचरा वर्गीकरण न झाल्यास झोन अधिकाऱ्यांचे पगार थांबवले जाणार; संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा; आज दुपारी कॅबिनेटची बैठक, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवघ्या 999 रुपयांत जिओने आणला 4G फोन; महिन्याचा रिचार्ज फक्त 123 रुपयांत, 07 जुलै रोजी होणार चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका; जयंत पाटील यांचे पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अशेस मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 43 धावांनी विजय मिळवला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतकार पी. सावळाराम*निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते.पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती.पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.२०१० साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव, २०१२ साली तो गायक सुरेश वाडकर तर २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना मिळाला होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो.➖रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894Q••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्धा पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद कवळे, साहित्यिक, उमरी👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी मंडलेकर, देगलूर👤 गणेश मंडाळे👤 प्रभाकर शेळके, साहित्यिक👤 प्रदीप यादव👤 श्याम उपरे👤 अविनाश खोकले👤 उदय स्वामी👤 परमेश्वर मेहेत्रे👤 बंडू अंबटकर👤 कमलाकर जमदाडे👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 श्रीपाद वसंत जोशी👤 राजकुमार बिरादार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक अन् होऊन जातं दुसरचं अशा वेळी निराश होऊ नये व खचून जाऊ नये. चांगले होण्यासाठी थोडा उशीर सुद्धा लागू शकतो. एवढेच नाही तर त्यावेळी काही अडी,अडचणी,प्रसंग येत असतात त्यांना पार करण्यासाठी आपल्यात हिंमत असायला पाहिजे सोबत प्रयत्न करणे आवश्यक आहे शेवटी सर्वच चांगले होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य - जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व गुरुवर्य मंडळींना साष्टांग दंडवत *कथा - नवऱ्याचे मी पण*माणसाचे नशीब कसे असते ? क्षणात काय घडणार आहे ? याची जराशी देखील कल्पना नसते. क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. दैव, नशीब, प्रारब्ध, ललाटरेषा आधारित फेसबुकच्या आम्ही साहित्यिक समुहात प्रचंड गाजलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!नववा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7283425418340477/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.**२००१:सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**२०००:विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.**१९९८:’ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९३८:'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.**१८९०:आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.**१८८६:जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.**१८८४:डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.**१८५५:भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.**१८५२:महात्मा फुले यांनी गरीब मुलांसाठी पहिली शाळा काढली.**१६०८:सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: तान्हाजी भगवान खोडे -- कवी* *१९८०:हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू**१९७६:हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू**१९७१:सपना अशोक बन्सोड -- कवयित्री* *१९६७:तिग्मांशु धुलिया-- भारतीय चित्रपट संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक, निर्माता**१९६४: शमसाद मुजावर -- कवयित्री* *१९६३:श्रीकांत साहेबराव देशमुख-- मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक,सनदी अधिकारी* *१९५७:अनिल दाभाडे -- कवी,लेखक* *१९५६: विशाखा बागडे -- लेखिका, शिक्षणतज्ज्ञ* *१९५१:सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू**१९४६:प्रा.फ.म. शहाजिंदे (फकीरपाशा महेबूब शहाजिंदे)-- साहित्यिक,कवी,समीक्षक, समाजसेवक* *१९४२:प्रा.अ.वि.विश्वरूपे _ लेखक संस्कृत,इतिहास विषयाचे अभ्यासक* *१९२६:सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)**१९२१:प्रा.त्र्यंबक हरी लागू-- लेखक* *१९१४:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)**१९१२:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७)**१९०९:बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४)**१९०२:द. ह.अग्निहोत्री -- कोशकार,भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक(मृत्यू:२२ नोव्हेंबर १९९० )**१८८६:रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७)**१८३८:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:सरोज खान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय नृत्यदिग्दर्शिका(जन्म:२२ नोव्हेंबर १९४८)**२००३:स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ(जन्म:७ मार्च १९१८)**१९९६:कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६)**१९६९:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूंकप; राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, अजितदादांना 35 आमदारांचा पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, पेरण्या खोळंबल्यानं बळीराजा चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बम बम भोले... अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात, पहिल्याच दिवशी 7,900 भाविक बाबा बर्फानींच्या चरणी लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी; पावसामुळे वातावरण बहरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या केके एक्सप्रेस इंजिनला आग; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय फुटबॉल संघाने (Team India) शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गुरुपौर्णिमा विशेष*गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे :गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.➖साने गुरुजी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा केव्हा उघडली ?२) 'कॉम्प्युटरचा पितामह' कोणाला म्हटले जाते ?३) नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?४) जगातील सर्वात क्षारयुक्त समुद्र कोणता ?५) टाकसाळ म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) ३ जुलै १८८६ २) चार्ल्स बॅबेज ३) धाराशिव ( जुने नाव उस्मानाबाद ) ४) मृत समुद्र ५) नाणी बनवण्याचा कारखाना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मणराव लंके👤 साहेबराव कांबळे👤 सविता सावंत👤 दिगंबर माने👤 बालाजी मुंडलोड👤 संतोष नलबलवार👤 श्रीराम पाटील👤 उत्तम पाटील नरवाडे, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेल्या परिस्थितीवर जर कोणी खळखळून हसत असेल तर.. त्याचा तो मूळ स्वभाव असू शकतो. त्या प्रकारचा स्वभाव कधीच बदलत नाही. पण, आपला स्वभाव मात्र त्या प्रकारचा नसायला पाहिजे. तर..एकाद्याची अडचण,परिस्थिती जाणून आपुलकीच्या नात्याने दोन शब्द बोलण्याची तसेच समजून घेण्याची आपल्यात थोडीतरी माणुसकी जिवंत असायला पाहिजे. कारण, आजच्या घडीला या प्रकारची माणुसकी जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7281828088500210/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९७९:लीना भुसारी - खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक, संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक, संपादक* *१९७५:दादाराव डोल्हारकर-- कवी लेखक तथा मुख्याधिकारी* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९: सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६९:ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक कवी* *१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६३: रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३: अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक, समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२: गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:सुदेश भोसले-- भारतीय पार्श्वगायक**१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०: युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक* *१९५७: प्रा डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५७:प्रा.यशवंत माळी -- प्रसिद्ध लेखक कवी* *१९५४: सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०: डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध साहित्यिक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – मा.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४६: हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि आता ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: १९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार(जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म: १ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मायानगरीत मुसळधार, तर ठाणे पालघरमध्येही दमदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉक्टर्स डे कधी साजरा केला जातो ?*दरवर्षी 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक, ज्यांचे आयुष्य एका किंवा दुसर्या डॉक्टरांशी जोडलेले आहे, ते डॉक्टरांचे आभार मानतात. त्याला या जगात आणण्यासाठी आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याचे आभार मानले जातात.इतिहास आणि महत्व - 1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्पण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, भारतात प्रथमच 1991 साली राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी केंद्र सरकारने प्रथमच डॉक्टर्स डे साजरा केला. डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात.कोण होते डॉ बिधान चंद्र रॉय?डॉ. बिधानचंद्र रॉय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. ते एक वैद्य देखील होते, ज्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. ते भारताच्या उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.*1 जुलैलाच डॉक्टर्स डे का साजरा करतात ?*1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करण्यामागे एक खास कारणही आहे. थोर वैद्य डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधानचंद्र यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात.➖डॉ. हेडगेवार*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरी ( ओरिसा ) येथे कोणाचे मंदिर आहे ?२) पुरी येथील जगन्नाथ मंदिराची उभारणी कोणी केली ?३) प्रसिद्ध नंदनकानन पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) ओरिसामध्ये लिंगराज मंदिर कोठे आहे ?५) पुरी येथील बीचची ( समुद्रकिनारा ) नावे सांगा.*उत्तरे :-* १) भगवान जगन्नाथ २) कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंग देव ३) ओरिसा ४) भुवनेश्वर ५) पुरी, चंद्रभागा, बालगई, गोल्डन, स्वर्गद्वार, अस्तरांगा बीच*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रमिलाताई सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 साक्षी बळीराम वारकड👤 मारोती भुसेवार👤 व्यंकटेश बतूलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत चरलेवार, पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मधुसूदन पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 हनुमंत भोपाळे, साहित्यिक, नांदेड👤 गणेश शेलेकर👤 गुंडप्पा डावरे👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 नागोराव रायकोड👤 पंढरी गड्डपवार👤 बालाजी भाऊराव डाके👤 गजानन कवळे, सहशिक्षक, उमरी👤 मारोती कांडले, मुख्याध्यापक, करखेली👤 त्रिरत्नकुमार भवरे👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 निळकंठ पाटील👤 शेषेराव पाटील आवरे👤 बाबासाहेब डोले👤 शहादेव पा. सुरासे👤 विलास नंदूरकर👤 बालाजी भगनूरे, सहशिक्षक, देगलूर👤 भूमन्ना अबुलकोड, LIC प्रतिनिधी, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, साहित्यिक, नांदेड👤 लक्ष्मणराव मुपडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार, नांदेड👤 पंढरीनाथ खांडरे, करखेली👤 सय्यद इलियास जुक्कलकर👤 तुकाराम मुंगरे👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त, माध्यमिक शिक्षक👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, सहशिक्षक, भंडारा👤 दिगंबर नागलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला। परी शेवटीं काळमूखीं निमाला॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा आपल्या मनात नव, नवीन कल्पना येत असतात. आणि चांगल्या कल्पना सुचने चांगलेच आहे पण, कल्पना सुचल्याने काही फायदा होणार नाही. कल्पनेने कल्पनिकरण झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सोबत चांगले विचार असणे गरजेचे आहे. कधी काळी सांगता येत नाही आपल्याला सुचलेल्या कल्पनांमुळे कदाचित इतरांनाही फायदा होऊ शकतो. यासारखे दुसरे पुन्हा काय मोठे होऊ शकते...? म्हणून सदैव चांगल्याच गोष्टींवर विचार करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बळी तो कान पिळी*एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले.तात्पर्य - बळी तो कान पिळी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279747092041643/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३० जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.**१९८६:केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.**१९७८:अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.**१९७१:सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.**१९६६:कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.**१९६०:काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ.निलेश साबळे-- मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते**१९७४: विठ्ठल मारोती जाधव -- कवी, कथाकार,लेखक**१९७०: भारती अनील भाईक -- लेखिका, कवयित्री* *१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९६६: डॉ.संजीवकुमार अभिमन्यू सोनवणे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६२:प्रफुल्ल शिलेदार-- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५७:जनाबाई कचरु गि-हे-- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९५६:विजय सुरवाडे-- लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक,अभ्यासक व संग्राहक**१९४३:सुधा विनायक नरवाडकर -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९४३:सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक**१९४१:प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे-- लेखक कवी* *१९४१:श्रीधर रघुनाथ दिक्षीत -- कादंबरीकार**१९३७:दिनकर जोशी-- गुजराती भाषेचे प्रसिद्ध लेखक* *१९३२:दत्ता केशव कुलकर्णी-- मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक(मृत्यू: १८ जानेवारी २०१९)**१९२८:कल्याणजी वीरजी शाह – 'कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)**१९२३: निवृत्ती पवार -- प्रसिद्ध शाहीर (मृत्यू:१० जून २००२)**१९१२:मो.रा.वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(मृत्यू:२१ मार्च १९९२)* *१८९५:वासुदेव वामन फडणवीस -- समीक्षक, पत्रकार (मृत्यू:२० मे १९४६)**१४७०:चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी(जन्म:९ आगस्ट १९२०)**१९९७:राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक**१९९४:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)**१९१७:पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापुरात 4 जुलैपासून ईव्हीएम तपासणी; जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे ; राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद दिल्यामुळे सौरव गांगुली हैराण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पितामह दादाभाई नौरोजी*भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - मृत्यू ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता.➖कन्फूशियस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करतांना शवाबरोबर काय पुरत असत ?४) टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?५) राज्यात एकमेव हत्ती कॅम्प कोठे आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) इजिप्त ३) मातीची भांडी ४) इलान मस्क ५) कमलापुर, ता. अहेरी, जि. नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्नेहल आयरे, सामाजिक कार्यकर्ती, मुंबई👤 विठ्ठल जाधव, साहित्यिक, बीड👤 सतिश गादेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सुरेश पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 नागोराव तिप्पलवाड, बरबडा👤 विष्णू भाऊराव सोरते, सहशिक्षक👤 ज्ञानेश्वर पाटील कऱ्हाळे👤 नामदेव आव्हाड👤 शिवाजी नाईकवाडे👤 शिवकुमार छपरे👤 पांडुरंग सलगरे👤 विठ्ठल होंडे👤 शेख शाहरुख, पांगरी👤 आगंद तरसे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात श्रध्दा असणं, सोबत चांगले विचार असणं, सदैव प्रयत्न असणे, प्रामाणिकपणा, नि:स्वार्थ पणाची भावना असणं, कोणाच्याही विषयी तिरस्कार नसणं व आपुलकी असणं हे सर्व आपल्यात ठेवून जर.. आपण कार्य करत राहिले किंवा इतरांना हसवत ठेवले तर...त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल.. कदाचित तो जगापेक्षा वेगळा ही असू शकतो असे अनेकदा आपण ऐकले असणार. .. म्हणून असेच आपले जगणे असायला पाहिजे ज्यातून आंनद ही मिळेल आणि इतरांनाही आपल्याला जास्त नाही पण,थोडं तरी वाटता येईल कारण,वाटल्याने आपले धन कमी होत नाही तर...वाढतच जाते म्हणून आपण त्याच प्रकारची विचारसरणी व माणुसकी ठेवून जगावे ज्यातून जगण्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मित्र*विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सहावा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279105912105761/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२८ जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.**१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.**१९७२:दुसर्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ**१८४६:अॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.**१८३८:इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:प्रा.डॉ.नवनाथ अंगद शिंदे -- लोकसाहित्य,आदिवासी,साहित्याचे अभ्यासक, समीक्षक,लेखक* *१९७२:मंगेश देेेेसाई-- मराठी चित्रपट कलाकार* *१९७०:डॉ.माधव शोभणे -- कवी,लेखक* *१९७०:मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९६३:वासवदत्ता अग्निहोत्री -- कवयित्री* *१९६२:डॉ.चंद्रकांत वि. जोशी -- कवी,कथाकार,कादंबरीकार,समीक्षक* *१९५६:अंतोन चांगदेव त्रिभुवन -- लेखक**१९५६:डॉ.गिरीश दाबके -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९५१:डॉ.एस.एम.कानडजे-- प्रसिद्ध समीक्षक* *१९३७:डॉ.गंगाधर पानतावणे – प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक(मृत्यू:२७ मार्च, २०१८)**१९३४:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (मृत्यू:१८ जुलै २००१)**१९२८:बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)**१९२२: भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार,कवी (मृत्यू:२८ जून १९९०)**१९२१:नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)**१७१२:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: चंद्रकांत कामत -- बनारस तबला घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तबला वादक(जन्म:२६ नोव्हेंबर १९३३)* *२०००:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग –उद्योजक(जन्म:६ एप्रिल १९२७)**१९९९:रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार* *१९९०:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार, कवी(जन्म:२८ जून १९२२)* *१९८७:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म:३० जानेवारी १९११)**१९७२:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)**१८३६:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात शिकवायला पाठवू; शिक्षक संघटनांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्ती; न्यायालयाकडून 'त्या' योजनेसंबंधी सहकार्याची विचारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ऑरेंज अलर्ट, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.. ४ ते ६ जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या कोराडी, वर्धा आणि सेवाग्रामला भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *झिम्बाब्वेनं विक्रम रचला, 400 धावांचा पल्ला केला पार, फक्त 5 धावांनी भारताचा रेकॉर्ड कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पी. व्ही. नरसिंहराव*पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. नारसिंहाराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी 28 जून 1921 रोजी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचा मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट ही एक अशी चावी आहेजे नशीबात नसलेल्या गोष्टींचेसुध्दा दरवाजे उघडते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाच्या सौर मोहिमेचे नाव काय आहे ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत ?३) संयुक्त अरब अमिरातीचे ( युएई ) चलन कोणते ?४) गोरखपूरमध्ये १९२३ साली स्थापन झालेल्या 'गीता प्रेस' प्रकाशनाला २०२१ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला ?५) जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत ?*उत्तरे :-* १) आदित्य एल-१ २) कलम १४ ३) दिऱ्हम ४) गांधी शांतता पुरस्कार ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री मार्तंड भुताळे, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 रामदास कदम👤 रवी जयंते👤 शुभम डी. पाटील👤 अभिषेक लाकडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथं जाऊ, तिथं खाऊ अन् तिथेच एखाद्या व्यक्ती विषयी आपले मन तृप्त होईपर्यंत गाठोडं सोडण्याची काही लोकांना फार सवय असते. पण, ते गाठोडं सोडण्याआधी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे आपण कोणाविषयी कितीही तिखट, मीठ लावून सांगितले आणि गाठोडं सोडलं तरी ऐकणारा समोरचा व्यक्ती आपल्या सारखा असेलच असे नाही अनुभवी व हुशार सुद्धा असू शकते. म्हणून उगाचच कोणाचे नको ते गाठोडे सोडण्यात वेळ वाया घालवू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुंगी व कोशातील किडा*एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.तात्पर्य - संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पाचवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7276558762360476/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२७ जून २०२३* 🚥 🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर**१९९१:युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.**१९७७:जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.**१९५०:अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:डॉ. विजयालक्ष्मी रवि वानखेडे -- कवयित्री, कथाकार,कादंबरीकार* *१९६९: अनुपमा रामेश्वर जाधव -- कवयित्री लेखिका* *१९६८:डॉ.रमाकांत विठ्ठलराव कराड-- लेखक**१९६७:बाबुराव चौरपगार -- कवी* *१९६४:अभय भंडारी --लेखक, वक्ते* *१९६३:डॉ.विजयकुमार पंढरीनाथ फड-- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक तथा सनदी अधिकारी* *१९५५:डॉ.प्रमोद हरी महाजन-- आरोग्य शिक्षण विषयावर विपुल प्रमाणात लेखन* *१९५३:रवींद्र पांढरे -- कवी, कादंबरीकार कथाकार**१९५०:नितीन मुकेश माथूर-- भारतीय पार्श्वगायक* *१९३९:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)**१९२८: राम प्रधान-- माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव, लेखक (मृत्यू:३१ जुलै २०२०)* *१९१७:खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)**१८८०:हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)**१८७५:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)**१८६४:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)**१८३८:बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:माधव नारायण आचार्य-- मराठी लेखक(जन्म:१९३०)* *२००८:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)**२०००: दत्तात्रेय नरसिंह गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार(जन्म:२० सप्टेंबर १९२२)**१९९८:होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)**१९९६:अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)**१८३९:महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)**१७०८:धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: १६५०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *600 वाहनांचा ताफा, सोबत अख्खं मंत्रिमंडळ; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापुरात होणार सिंघम स्टाईल एन्ट्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर जिल्ह्यात मँगनीज खाणीसाठीच्या वृक्षतोडीला विरोध, पर्यावरण वाद्यांचं चिपको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेर कुस्तीपटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. हेलन ॲडम्स केलर या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या. हेलन केलरचा जन्म २७ जून १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले शिक्षक होते.हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या. लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटिस) नंतर ती अंध आणि बधिर झाली. मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये त्यांनी आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यू यॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.➖ दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषेतील लेखकांना दिला जातो ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत ?३) एक सजीव त्याच्यासारख्याच दुसऱ्या सजीवास जन्म देतो त्यास काय म्हणतात ?४) रिसर्च अँड अनालीसिस विंग ( रॉ ) चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?५) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) २४ भाषा २) कलम १५ ३) पुनरुत्पादन / प्रजनन ४) रवी सिन्हा ५) वर्धा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर देशमुख👤 सुशील कापसे, सहशिक्षक👤 पोषट्टी चिपेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत रहाणे व सदैव हसतच जगणे हे प्रत्येकांसाठी भल्याचेच आहे कारण हसणे एक प्रकारचे जीवन आहे आपण कुठेतरी ऐकले असणार. . पण,कोणाला रडवून आपण खळखळून हसत जगणे ही माणुसकी नव्हे. तर...रडणाऱ्याचे अश्रू पुसून त्याला पुन्हा एकदा नव्याने जगायला लावणे हा खरा माणुसकी धर्म आहे आणि तोच माणुसकी धर्म एक चांगला माणूस बनून प्रत्येकांसाठी निभावून दाखवणे आजच्या घडीला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अरण्य व लाकूडतोड्या*एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’तात्पर्य – शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7274677382548614/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_सामाजिक न्याय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.**१९९९:पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.**१९९९:नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.**१९७४:नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ**१९७४:ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.**१९६८:पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.**१९६०:मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१७२३:रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: सुजित शिवाजी कदम -- कवी* *१९८७:प्रणव सखदेव-- मराठी लेखक, कवी, युवासाहित्यिक अनुवादक* *१९७८:डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे-- वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यासक* *१९७६:वर्षा पतके-थोटे-- लेखिका,कवयित्री* *१९७६:डॉ सतीश नारायण कामत-- प्रसिद्ध लेखक संपादक* *१९६९:धर्मेंद्र प्रधान--भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री**१९६८:संजय विठ्ठल कळमकर-- विनोदी लेखक,वक्ते आणि कथाकथनकार* *१९६५:राजेंद्र बलभीम भोसले-- कवी, कादंबरीकार, कथाकार, समीक्षक, लेखक* *१९५१:गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८:चंद्रशेखर गाडगीळ-- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय पार्श्वगायक (मृत्यू:२ ऑक्टोबर, २०१५)**१९४२:प्रा.डॉ.मदन पांडुरंग कुलकर्णी- ज्येष्ठ सुप्रसिद्ध समीक्षक,पूर्वअध्यक्ष विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर**१९४१:शरद पिदडी-- कवी**१९३४:इंद्रायणी प्रभाकर सावकार --मराठी लेखिका**१९२५:शांता मधुकर रानडे-- लेखिका, अनुवादक (मृत्यू:५ डिसेंबर २०१८)* *१९२२:शंकर पांडुरंग रामाणी -- प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी.(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००३)**१९१४:शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)**१९०५:कमलाबाई विष्णू टिळक-- कथाकार(मृत्यु:१० जून १९८९)**१८९२:पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू: ६ मार्च १९७३)**१८८८:नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)**_१८७४:छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)_**१८७३:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)**१८२४:लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)**१७३०:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००५:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म:१८ मार्च १९४८)**२००४:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म:६ सप्टेंबर १९२९)**२००१:वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)**१९४३:कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)* *_सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केळी संशोधन केंद्रासाठी 100 कोटींची तरतूद, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार : गुलाबराव पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतात पावसाची जोरदार हजेरी, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात यावर्षी मुबलक पाऊस; प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कालच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सामाजिक न्याय दिवस*राज्य शासनाकडून २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर झालेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा हा जन्म दिवस. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी त्यांचं कार्य खूप महत्त्वाचे आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्क. स्त्री-पुरुष समानता, समाजातील सर्वच थरातील व्यक्तींना विकासाची, शिक्षणाची संधी, ही सामाजिक न्यायाची उद्दिष्टे आहेत.सामाजिक न्याय म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेप्रमाणे विकासाच्या संधी देणे, अथवा मिळवून देणे. कोणाचेही शोषण होणार नाही. किमान प्राथमिक गरजा पूर्ण होतील हे बघणे. आर्थिक सत्ता केंद्रित होणार नाही, ही दक्षता घेणे. समाजातील, आर्थिक, दुर्बल घटकांना सुरक्षितता वाटेल, असे वातावरण असणे, हीच सामाजिक न्यायाची संकल्पना आहे.छत्रपती रा. शाहू महाराजांनी समाजातील तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ते रयतेचे राजे म्हणूनच ओळखले जातात. महाराजांनी पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली. कोणत्याही वर्गासाठी ते कोणतेही द्वेष मनात नव्हते. माणसाला माणूस समजण्यात येणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे मत त्यांचे होते. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिष्यवृत्ती घेऊन परदेशात शिक्षणासाठी गेले होते, पण शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना परत यावे लागले. महाराजांना ही गोष्ट समजल्यावर ते स्वतः मुंबईत गेले आणि त्यांनी आंबेडकर यांना पुढील अभ्यास सुरू ठेवायला मदत केली. शोषित, मागासवर्गीयांना आंबेडकर यांच्या रूपात नेता मिळाल्याचे शाहू महाराजांनी जाहीर केले होते.राज्य शासनाच्या वतीने २६ जून हा त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.➖फ्रँकलीन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश इटलोड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 गणेश आरटवार, फोटोग्राफर, धर्माबाद👤 नवीन कॅरमकोंडा, नांदेड👤 कृष्णा भोरे👤 बालाजी पाटील सावंत👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड👤 संतोष रेड्डी, धर्माबाद👤 अंकुश कामगोंडे, धर्माबाद👤 राजेश उमरेकर, नांदेड👤 नारायण ईबीतवार👤 सुरेश यादव👤 मनीष अग्रवाल👤 शेख बाशु👤 अनिल पाटील भुसारे, माहूर👤 कैलास स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी। दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ देहेदु:ख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांवर चिखल फेकण्या आधी जरा स्वतः विषयी अशा सर्वच गोष्टींची शेवटपर्यंत आपण गॅरंटी द्यावी.तेव्हाच इतरांवर चिखल फेकण्याचा प्रयत्न करावे.कारण इतरांवर चिखल फेकणे तर.. फार सोपे काम असते .पण,आपल्यावर जेव्हा कोणी चिखल फेकतात त्याचे डाग काढणे मात्र तेवढेच कठीण असते. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *फुशारकी*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7268695053146847/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.**१९९८:अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर**१९८२:कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.**१९३९:सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रा.डॉ.वृंदा देशपांडे-जोशी-- कवयित्री, लेखिका* *१९७४:संदीप गायकवाड-- कवी, लेखक**१९६९:प्रशांत विजय दांडेकर-- लेखक* *१९६७:योगीनी राऊळ -- कवयित्री,लेखिका* *१९६५:पांडुरंग शंकरराव आडबलवाड -- कवी* *१९६४:नागनाथ विठ्ठलराव कलवले-- कवी, लेखक* *१९६२:गौतम शांतीलाल अदानी-- एक भारतीय उद्योजक,अदानी समूहाचे अध्यक्ष**१९६१:डॉ.महेंद्र मारोतराव भवरे-- कवी, समीक्षक, संशोधक**१९४९:विनय हर्डीकर -- लेखक* *१९३९:दिगंबर विठ्ठल पाध्ये-- समीक्षक(मृत्यु:१९ ऑगस्ट २०१६)* *१९३७:अनिता देसाई-- प्रख्यात लेखिका, जगातील इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव* *१९२८:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य(मृत्यू:१७ जुलै २०१२)**१९०८:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)**१८९९:नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक-- केंद्राने सर्व श्रेष्ठ नट म्हणून गौरविण्यात आले.(मृत्यू: ८ एप्रिल १९७४)**१८९७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)**१८९२:श्रीधर बाळकृष्ण रानडे -- मराठी कवी,रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते(मृत्यू:२१ मार्च १९८४)* *१८६९:दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)**१८६२:श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक (मृत्यू: २१ मार्च १९७४)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:वसंत विठ्ठल गाडे(गाडेगरुजी)-- लेखक,विनोबा विचार केंद्राचे विचारवंत,संघटक (जन्म:२७ जानेवारी १९२७)* *२०१३:एमिलियो कोलंबो--इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १९२०)**१९९७:संजुक्ता पाणिग्रही-- भारतातील एक नृत्यांगना(जन्म:२४ ऑगस्ट १९४४)**१९७१:डॉ माधव गोपाळ देशमुख-- प्रसिद्ध समीक्षक,साहित्यशास्त्रज्ञ( जन्म:१० मार्च १९१३)* *१९१४:वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)**१९०८:ग्रोव्हर क्लीव्हलँड--अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष(जन्म: १८ मार्च १८३७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारचा मोठा निर्णय ! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आणि मुंबईत मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं, 25 जून नंतर पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT; मुंबई पोलीस आयुक्तांकडे नेतृत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू करावा - चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा आऊट, तर वनडे संघात मोठे फेरबदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुगुणी आवळा*आवळा हे असे अन्न आहे ज्यामध्ये पोषक तत्वांचा साठा आहे. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.आवळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आवळा खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करू शकता.आवळा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. याशिवाय त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे चयापचय वाढवतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी जाळण्यास मदत होते.आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. भिजवलेला आवळा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि गोळा येणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.आवळा खाणे तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळतात जे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.आवळा हा क्रोमियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय, उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहे."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कल्पना डेव्हिड बनसोड, साहित्यिका तथा सहशिक्षिका, चंद्रपूर 👤 पांडुरंग आडबलवाड, साहित्यिक तथा माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 संदिप शंभरकर👤 रवी गंगाधर भोरे👤 अनिल रेड्डी, लातूर👤 सदानंद कोदळगे👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 सचिन रेनगुंटवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की,दुसऱ्यांच्या विषयी कोणताही विचार न करता एकाचे दोन अन् पायलीचे तीन करून मोठ्या आनंदाने आपण हसून सांगत असतो. तसच आपल्याही विषयी थोडं सांगण्याची हिंमत करावी. पण तसं सांगणं कोणालाही जमत नाही. कारण आपल्या घरात जरी कितीही विजेचा उजेड असेल तरी एक तरी कोपऱ्यात अंधार असतोच. म्हणून दुसऱ्यांचे सांगून नको ते, पाप करण्यापेक्षा आपल्यामागे किती अंधार आहे त्याकडे बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुयांचे झाड**एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली. तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7264610470221972/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.**१९९६:आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्या महिला पंतप्रधान होत.**१९७९:इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.**१८९४:पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.**१७५७:प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:संदीप हरी नाझरे -- कवी* *१९८१:परशुराम गहिनीनाथ नागरगोजे-- लेखक* *१९७८:नेहा राजपाल -- भारतीय संगीत उद्योग,हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी प्रादेशिक संगीत उद्योगातील एक निर्माता, गायिका आणि अँकर**१९७३:डॉ.प्रशांत गायकवाड -- कवी, समीक्षक,संपादक* *१९६५:डॉ.संगीता राजीव बर्वे-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,बालसाहित्यिक,अनुवादक व अनेक चित्रपटांसाठी गीत लेखन* *१९६४:प्रा.डॉ.अल्का बाबुराव झाडे-- लेखिका* *१९६३:डॉ.मीना राजेंद्र शेंडगे - कवयित्री लेखिका* *१९६२:प्रा.बी.एन.चौधरी-- कवी,समीक्षक**१९५८:मुकेश खन्ना-- भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९५२:राज बब्बर-- प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता आणि राजकारणी**१९५२:अशोक शिवदास कुळकर्णी-- कवी, लेखक* *१९१६:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)**१९१२:अॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (मृत्यू: ७ जुन १९५४)**१९०६:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (मृत्यू: १३ मार्च १९५५)**१९०१:राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)**१८७३: बाळकृष्ण रामचंद्र कुळकर्णी-- कथालेखक, कादंबरीकार (मृत्यू:१९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(जन्म:३नोव्हेंबर १९२५)**२००४:प्रल्हाद शिंदे-- मराठी लोकसंगीत गायक, त्यांनी भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत(जन्म १९३३)**१९९६:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ आक्टोबर १९२१)**१९९४:वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार(जन्म २७ डिसेंबर१९०४)* *१९९०:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(जन्म: २ एप्रिल १८९८)**१९८२: हरिभाऊ देशपांडे -- बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार**१९८०:व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (जन्म: १० ऑगस्ट १८९४)**१९८०: इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: १४ डिसेंबर १९४६)**१९५३:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)**१९३९:गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)**१९२०:काशिनाथ रघुनाथ मित्र--मनोरंजन मासिकाचे संपादक, बंगाली-गुजराती कादंबऱ्यांचे अनुवादक.(जन्म:२ नोव्हेंबर १८७१)**१८३६:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)**१७६१:बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (जन्म: ८ डिसेंबर १७२१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही, नाशिकमधील चांदोरी गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुकोबांच्या पालखीचं इंदापूरात दुसरं अश्व रिंगण, ज्ञानोबांचं बरडमध्ये जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर होणार पुष्पवृष्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी, बांगलादेशला हरवून आशिया चषकावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अवयव दान कोण करू शकतो ?* 📙 ************************************अवयव दान कोण करू शकतो ?*खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान करू शकतो. तो जर योग्य त्या अवस्थेत असेल आणि कोणा गरजूला त्याचा उपयोग होणार असेल तर डॉक्टर अशा दानाचा स्वीकार करू शकतात. एवढेच काय विंदा करंदीकरसारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीनं तर मरणोत्तर आपल्या देहाचं मेडिकल कॉलेजला दान केलं होतं. तेव्हा अशा प्रकारच्या दानाची कोणालाही मुभा असते. मात्र ते स्वेच्छेने केलं जायला हवं. त्यासाठी कोणाचंही किंवा कशाचंही दडपण असत कामा नये. शिवाय अशा दानाची इच्छा व्यक्तीनं जिवंतपणी धडधाकट असताना नोंदवलेली असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातले कित्येक अवयव एकांडे आहेत. आपल्याला एकच हृदय असतं, यकृत, स्वादूपिंड, प्लीहा हेही अवयव एकेकच असतात. त्यामुळे त्यांचं दान करणं कोणालाही शक्य नसतं. नाही म्हणायला यकृताचा एक तुकडा दान करता येतो. कारण त्यामुळे झालेली झीज भरून येण्याची शक्यता असते. अर्थात घेता आणि दाता दोघांनाही त्याचा फायदा होतो. तरीही या दोघांच्या शरीरातील पेशी वर असलेले, त्यांची निर्विवाद ओळख पटवणारे आणि रेणूंचे गट व्यवस्थित जुळणे आवश्यक असतं. अशी जुळणी सहसा आई वडील, मुलं, भावंडं किंवा त्यांच्यासारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये शक्य असते. इतरांच्या बाबतीत अशी जुळणी होण्याची शक्यता फार कमी असते. पण काही अवयवांच्या जोड्या शरीरात वास करून असतात. दोन मूत्रपिंड असतात, फुफ्फुसंही दोन असतात. स्त्रियांच्या शरीरात बीजकोशही दोन दोन असतात. त्यांच्यापैकी एकाचं दान केलं तरी उरलेल्या एकाच अवयवाला साऱ्या शरीराचा भार पेलणं अशक्य नसतं. अशा वेळी जिवंतपणीच जोडीपैकी एकाचं दान करणं शक्य असतं. त्यासाठीही पेशीगटांची तंतोतंत जुळणी होणं गरजेचं असतंच. तसं पाहिलं तर कान, डोळे, हात, पाय या बाह्यांगावरच्या अवयवांच्याही जोड्या असतात; पण यापैकी एकाचं दान आपण करू शकत नाही. अपघातामुळे एक डोळा गमवावा लागल्यावर एकाच डोळ्यावर व्यक्ती आपला कारभार चालवू शकते. पण काही बाबतीत तिला अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण दोन डोळ्यांमुळे आपल्याला समोरच्या दृश्यातल्या खोलीची जाणीव होते. एकच डोळा असेल तर त्यात काही प्रमाणात तरी अडचण उद्भवते. तीच बाब इतर अवयवांनाही लागू पडते. शिवाय यामुळे जी विद्रुपता येते तिचा सामना करणंही सोपं नसतं.परंतु एक अवयव असा आहे की ज्याचं दान आपण निःशंक करू शकतो. तो अवयव आहे रक्त. रक्तदान आज आपण जिवंतपणी करू शकतो. एकदा नाही तर अनेकदा. अर्थात त्याचेही काही निकष आहेत; आणि त्यांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. म्हणूनच रक्तदानापुर्वी डॉक्टर आपली तपासणी करून, आपण ते निकष पूर्ण करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतात. त्यानंतरच आपल्या रक्ताचं दान स्वीकारलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) समुद्रात सर्वाधिक प्लास्टिक कोणता देश सोडतो ?२) 'थ्रू द ब्रोकन ग्लास' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?३) तोंडातून किंवा श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात ?४) जगात सर्वाधिक वेतन घेणारा नेता कोण ?५) कोणत्या रक्तगटाला 'दाता रक्तगट' असे म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारत २) टी. एन. शेषन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त ३) हेलिटोसिस ४) ली सियन लूंग, सिंगापूरचे पंतप्रधान ( वार्षिक १३ कोटी ) ५) o- रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय संभाजीराव कदम, सहशिक्षक, भोकर👤 पोषट्टी कोषकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 प्रभाकर माळगे👤 लक्ष्मीकांत इरमलवार👤 महेश अंदस्वार👤 विजय पाटील डांगे, भाजपा तालुकाध्यक्ष धर्माबाद👤 संदीप नजारे👤 राजेश भिसे👤 गोपाळ कौरवार, भूमी अभिलेख अधिकारी, देगलूर👤 देवेंद्र शिरूरकर👤 यश कीर्तीरत्न जाधव, बिलोली👤 गंगाधर सावळे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाटेत पडलेला कचरा जर.. हवेने आपोआप उडून गेला असेल किंवा जात असेल तर. ..ते, आपल्यासाठी चांगलेच आहे. पण,समोर असेच होईल या भ्रमात राहू नका.कारण त्याच वाटेवर कधी, कधी मोठे,मोठे खड्डे सुद्धा असू असतात त्यांना ओलांडून पुढचा प्रवास कशाप्रकारे करता येईल या विषयी एकदातरी विचार करण्याची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली. कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.जात असताना कुर्ल्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक करावी.तात्पर्य : या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळता.एक म्हणजे कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये.दुसरी म्हणजे लालच खूप वाईट सवय आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------http://nasayeotikar.blogspot.com/2023/06/story-navryache-mi-pan.htmlकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९४:महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण**१९७८:जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.**१९७६:कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९४०:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.**१९०८:इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण**१८९७:पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.**१७५७:प्लासीची लढाई सुरू झाली.**१६३३:गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आदित्य दवणे-- नवोदित कवी* *१९८२: प्रा.विजय हरिभाऊ लोंढे -- कवी, लेखक* *१९७९:जयश्री दाणी-- कवयित्री,लेखिका* *१९७३:मकरंद मधुकर अनासपुरे-- मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते* *१९६९: कविता राजन क्षीरसागर -- कवयित्री* *१९६९:डॉ.कमलाकरराव देविदासराव चव्हाण कवी,लेखक,संपादक* *१९६८:स्वाती किशोर पाचपांडे-- लेखिका**१९६७: प्रा.डॉ.सुनंदा बोरकर -जुमले-- कवयित्री लेखिका* *१९६४:भारती बाळ गोसावी-- मराठी नाट्यअभिनेत्री* *१९५८:प्रा.डॉ.अर्जुन व्हटकर -- जेष्ठ साहित्यिक**१९५५:आशाताई पैठणे-- जेष्ठ साहित्यिका, कवयित्री* *१९४६:अनुपमा अशोक आंबर्डेकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९३९:महादेव मोरे-- कादंबरीकार, कथाकार**१९३२:अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (मृत्यू: १२ जानेवारी २००५)**_१९०८:डॉ.विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:९ एप्रिल १९९८)_**१८९६:नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.(मृत्यू:०९ नोव्हेंबर १९६७)* *१८८७:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)**१८०५:जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (मृत्यू: १० मार्च१८७२)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:शोभना लक्ष्मण गोखले -- महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(जन्म:२६ फेब्रुवारी १९२८)**१९९४:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)**१९९३:विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते, रंगभूमीवरील अभिनेते(जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९५५:सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित योग दिनानिमित्त अमेरिकेत विशेष कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- अंजनेरी ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'चीसाठी निविदा निघाली, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष! गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *थरारक सामन्यात कमिन्सने विजयी चौकार लगावला, पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. दे धक्का नावाच्या चित्रपटाने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २१ जून २०२३ ला कितवा 'जागतिक योग दिवस' साजरा करण्यात आला ?२) प्रथम योगगुरू कोणाला मानले जाते ?३) 'योगाचे आधुनिक पिता' असे कोणाला संबोधले जाते ?४) 'योग' या शब्दाचा अर्थ काय आहे ?५) 'योग' या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे ?*उत्तरे :-* १) ९ वा २) शिव ३) पतंजली ऋषी ४) जोडणे, संयोग ५) 'युज्' या संस्कृत शब्दापासून *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर तोटलोड, माजी जि.प. सदस्य, नांदेड👤 प्रा. विनोद बोटलावार, नांदेड👤 माधव बोडके👤 साईनाथ लोसरे, तेलंगणा👤 बालाजी राजापूरकर👤 सुधीर वाघमारे मरवळीकर👤 नंदेश्वर कोरे👤 साईनाथ डिब्बेवाड👤 दिनेश भंगारे👤 अभिषेक बकवाड👤 उमाकांत मोकलीकर👤 गंगाधर बोमलवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 आशा मंकावार👤 भीमराव तायडे👤 श्याम गाढे👤 स्वप्नील पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावें ॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांडण केल्याने किंवा गैरसमज करून वणवा पेटविल्याने आजपर्यंत कोणाचे भलं झाले का. ..? ह्या विषयी आपल्याला माहीत असताना सुद्धा उगाचच आपण त्यात वेळ वाया घालवत असतो. त्या पेक्षा एकदा त्यातून कशाप्रकारे बाहेर पडता येईल त्यावर शांतपणे विचार करून बघण्याचा प्रयत्न केले तर.. अनेक मार्ग निघू शकतात. व कुठेतरी जीवन जगायला आधार होत असतात. म्हणून नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा तिथून कशाप्रकारचे बाहेर पडता येईल त्याकडेच लक्ष देणे गरजेचे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गरुड आणि घुबड*एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीत दिन_**_आंतरराष्ट्रीय योग दिन_* •••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे 'निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.**१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.**१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.**१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.**१९९२:विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर**१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.**१९४९:राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना**१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे**१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.**१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: डॉ.सुजाता बेलखेडे-- लेखिका* *१९८८:शीतल शांताराम पाटील-- कवयित्री* *१९८७:मुक्ती मोहन-- भारतीय हिंदी अभिनेत्री**१९७८:अॅड. देवेंद्र घनश्याम चौधरी- मराठी हिंदी व पोवारी बोलीचे प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक* *१९७४:प्रा.सध्या महाजन-- कवयित्री,लेखिका* *१९७१: मृणाल देव-कुलकर्णी-- ख्यातनाम अभिनेत्री, दिग्दर्शक* *१९७०: संजय धनगव्हाळ-- कवी लेखक व कलावंत* *१९६८:प्रा.वर्षा गगने-- कवयित्री, लेखिका**१९६६:मृण्मयी(मधू) शिरगांवकर- कादंबरी,कथा, विनोदी लेख संग्रह लेखन* *१९६१:स्वाती चांदोरकर -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९५९:रवींद्र इंगळे चावरेकर -- कवी,लेखक, संशोधक* *१९५४:वसंत मार्तंड गायकवाड-- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)**१९४९:सुरेश विठ्ठलराव जाधव-- लेखक* *१९३३: वामन गणपतराव इंगळे-- कवी, कथाकार**१९३३: वसंत गुलाबराव गिरटकर-- कथाकार, कवी, लेखक**१९३१: सुधा दत्तात्रेय सोमण-- कथालेखिका, ललितगद्यलेखिका**१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)**१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू:२१ जानेवारी १९९८)**१९११: परशुराम लक्ष्मण वैद्य-- अनुवादक, संशोधक (२७ फेब्रुवारी १९७८)**१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८५६:रामचंद्र भिकाजी जोशी-- संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक(मृत्यू:७ सप्टेंबर १९२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:कृष्णाबाई नारायण सुर्वे-- लेखिका (जन्म:१९३०)**२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)**२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)**१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)**१९४०:डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)**१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(जन्म: ३ एप्रिल १८८२)* *_ आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चिकनगुनियावर लस मिळाली, लसीच्या तिसऱ्या चाचणीचं सकारात्मक परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 24 जानेवारी नंतर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी भक्तांसाठी आनंदवार्ता! विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; 18 जुलै पासून होणार परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकन काँग्रेसच्या जॉईंट सेशनला (US Congress) म्हणजे तिथल्या संसदेच्या संयुक्त सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जून रोजी संबोधित करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 : केदार जाधव-अंकित बावणे यांची वादळी अर्धशतके, कोल्हापूरचा सोलापूरवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय योग दिवस*https://nasayeotikar.blogspot.com/2021/06/yoga-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली.२१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तसेच योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना या दिवशी प्रसारित केल्या जातात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.➖एमर्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) योगाची उत्पत्ती कोणत्या देशातून झाली आहे ?३) पहिला जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला गेला ?४) जागतिक योग दिवस - २०२३ ची संकल्पना/थीम काय आहे ?५) योगसूत्रे ( योगावरील सूत्र ) हा योगाचा प्राचीन, मूलभूत ग्रंथ कोणी लिहिला ?*उत्तरे :-* १) २१ जून २) भारत ३) २१ जून २०१५ ४) मानवता ( Humanity ) ५) पतंजली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड👤 वीरभद्र बसापुरे, शिक्षक नेते, धर्माबाद👤 आनंद पाटील जाधव👤 शुभम साखरे👤 राहुल पाटील👤 हणमंत जमदाडे👤 संजयकुमार मांजरमकर👤 माधव धोंडापुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना जसे बोलावे वाटते तसेच ते, बोलत असतात. बोलणाऱ्याला आपण रोखू शकत नाही कारण, कोणाच्याही तोडांवर झाकण नसते. म्हणून त्या प्रसंगी जरा आपणच एकदाचे शांत बसावे. एखादे वेळी शांत बसल्याने व प्रसन्न मनाने राहण्याचा फायदा सुद्धा होत असतो .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सो.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रीमंत व्यापारी**एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.""तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शरणार्थी दिन _*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.**१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना**१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना**१८९९:केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.**१८८७:देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस. टी.) सुरू झाले.**१८६३:वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.**१८३७:व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विनायक येवले- समकालीन कवी व समीक्षक* *१९७८:शिल्पा प्रसन्न जैन-- कवयित्री,लेखिका* *१९७२:पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू**१९६९:महेश नागोराव कुडलीकर -- कवी,लेखक* *१९६८:प्रा.शंकर किसनराव येरडे -- समीक्षक, संपादक* *१९६१:वासुदेव महादेवराव खोपडे-- कवी**१९५६:डॉ दिलीप माधवराव धोंडगे-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक, लेखक**१९५५:प्रा.डॉ.शोभा भगवान नाफडे-- लेखिका* *१९५४:अॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५३:भालचंद्र गंभीरराव वाघ-- प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार तथा पूर्व सनदी अधिकारी**१९५२:श्रीधर लक्ष्मणराव सरपे -- कवी,लेखक* *१९५१:निंबाजीराव बागुल-- कवी,लेखक* *१९३९:रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (मृत्यू:२८ एप्रिल १९९८)**१९३६:प्रा.अमृत संभाजीराव देशमुख -- कवी, लेखक* *१९३६:सुषमा सेठ -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९३०:श्रीकृष्ण शंकर(बाळासाहेब) सराफ-- लेखक, संपादक**१९२४: डॉ.प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:२ आगस्ट २०२१)**१९२०:मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)**१९२०:पंडित वसंतराव चांदोरकर --आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक(मृत्यू:८ जुलै २००१)**१९१५:टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)**१८८५:विष्णू महादेव भट-- वैद्यकीय ग्रंथाचे लेखक (मृत्यू:३० एप्रिल १९६१)**१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)**१९९७:वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म:२९ डिसेंबर १९०८)**१९९७:बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १९३४)**१९८७:डॉ.सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी(जन्म:१२ नोव्हेंबर १८९६)**१८३७:विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)**१६६८:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म:१८ डिसेंबर १६२०)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यूपी-बिहारमध्ये जीवघेणी उष्णता; तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे नियोजन केलात का ?* प्रत्येकाच्या जीवनात वेळ अत्यंत महत्वाची आहे. वेळेवर काम करणारी माणसे थकत नाहीत म्हणूनच ते अयशस्वी होत नाहीत..........https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात.याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्याय आणि अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही; परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्याने ध्येय सिद्धी होत असते.➖रामकृष्ण परमहंस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जांभूळमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) जांभूळ खाण्याचे फायदे सांगा.३) जांभूळ या फळाला इंग्रजीत काय म्हणतात ?४) आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन काय होते ?५) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) रक्त शुद्धीकरण, पाचकरस, पचनक्रिया, साखरेचे प्रमाण नियंत्रित etc ३) Java Plum/ Black Berry ४) अंधत्व येते ५) सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण पाटील बेंद्रे, धर्माबाद👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत प्रतिनिधी, धर्माबाद👤 शंकर पाटील कदम, धर्माबाद👤 गणेश यमेवार, धर्माबाद👤 रामचंद्र विश्वब्रम्ह,बिलोली👤 टेककम साईराम, तेलंगणा👤 रमेश मुनेश्वर, साहित्यिक, किनवट👤 विनोद गुम्मलवार, नांदेड👤 निमेश गावीत👤 राजेंद्र पाटील👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 गंगाधर गटूवार, कुंडलवाडी👤 दौलतराव वारले, सहशिक्षक, धर्माबाद👤 शादूल चौधरी, बिलोली👤 साईबाबा बनसोडे, धर्माबाद👤 मन्मथ मोकलीकर, धर्माबाद👤 अजित पिंगळे👤 संभाजी आटोळकर👤 अनिल राठोड👤 शिवा बोधने👤 गणेश अंगरोड, धर्माबाद👤 मैनोद्दीन पटेल*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पर्वत आणि उंदीर**एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घाटन केले.**१९८९:इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.**१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.**१९६१:कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.**१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.*••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:किशोरकुमार बन्सोड -- कवी* *१९७०:राहुल गांधी –भारतीय राजकारणी, खासदार**१९५९:अशोक कुबडे--कवी,लेखक,संपादक* *१९५७:प्रा.डॉ.रविकिरण वसंतराव पंडित -- लेखक* *१९५६:शेख शब्बीर-- नगर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे संकलन* *१९४७:सलमान रश्दी – बहुचर्चित लेखक**१९४१:रमेश गजानन पानसे--शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत**१९४०:शंकर भीमराव ऊफ समुद्रगुप्त पाटील -- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक**१९३१:मधुकर रामदास जोशी-- हस्तलिखितशास्त्र तज्ज्ञ, प्राचीन मराठी साहित्य संशोधक,संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक**१८९८:पुरुषोत्तम बाळकृष्ण साठे--कथाकार अनुवादक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ* *१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)*••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील चित्रपट अभिनेत्री (जन्म: ऑगस्ट १९३३)**१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)**१९९६:कमलाबाई पाध्ये – समाजसेविका(जन्म:८ आक्टोबर १९२०)* *१९९३:विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)**१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)**१७४७:नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'शासन आपल्या दारी' अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच 'रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेईई ॲडवान्सचा निकाल जाहीर; व्हीसी रेड्डी देशात अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प', मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सात्विक-चिराग जोडीनं बॅडमिंटन मध्ये इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फादर्स डे निमित्ताने प्रासंगिक लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2020/06/fathers-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सिकल सेल हा आजार 'सिकल पेशी रक्तक्षय' किंवा 'ड्रेपॅनोसायटोसिस' (ग्रीकःdrepane- विळा, kytos-पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात. 1994च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे.सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.➖हेली बर्टन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सागरतळाशी होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतात ?२) हडप्पा संस्कृतीमधील लोक कोणती मुख्ये पिके घेत ?३) हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबातील रूपांतर म्हणजे काय होय ?४) संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या असतात ?५) वनस्पतींची वाढ कशाच्या दिशेने होते ?*उत्तरे :-* १) त्सुनामी लाटा २) गहू, सातू ( बार्ली ) ३) दवबिंदू ४) ऋण संख्या ५) प्रकाशाच्या दिशेने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रताप भिसे, सहशिक्षक👤 शंकर बेल्लूरवाड👤 नागेश कोसकेवार👤 खुशाल बोकडे👤 नारायण शिंगारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे, भविष्याचा विचार करत बसायचे कि, आलेला क्षण आनंदाने जगायचे हे आपण ठरवायचे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्ह्याची फजिती*एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.""मलाही येतो." मांजर म्हणाली.कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.""तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले."अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.""अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले."बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळविरोधी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर 'भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९६७:चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.**१९४४:आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.**१९४०:दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९७९:अरविंद सगर-- मराठी गझलकार, कवी,गीतकार**१९७५: द.ल.वारे--- कवी, कथाकार**१९७३:लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू**१९७१: हरिश्चंद्र बबन खेंदाड-- कवी,लेखक**१९६१:प्रा.डॉ. विनायक त्रिपत्तीवार -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५९: स्वाती देशपांडे -- कवयित्री,लेखिका**१९५६: किसन अमृत वराडे-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९५३:प्रा.डॉ.जगदीश माधवराव कदम-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९५१:विनय आपटे-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(मृत्यू:७ डिसेंबर २०१३)**१९४५:प्रा.शारदा तुंगार -- मराठी, हिन्दी मासिकाच्या संपादिका**१९४२:भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री उत्तरांचल**१९४१:अरूण मार्तण्डराव साधू -- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष (मृत्यू:२५ सप्टेंबर २०१७)**१९४०:डाॅ.विनय वाईकर -- भूलतज्ज्ञ,लेखक,प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी (मृत्यू:२ जानेवारी २०१३)**१९०३:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या(जन्म:८मार्च १९१८)**१९९६:मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)**१९९१: प्रभाकर बलवंत माचवे-- हिंदी भाषकांना मराठी भाषेतील पुस्तकांचा परिचय अनुवादकातून करून देणारे भाषांतरकार (जन्म:२६ डिसेंबर १९१७)**१९८३:शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक* *१९६५:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)**१९२८:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)**१८९५:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक, प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)**१६७४:राजमाता जिजाबाई-- मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते(जन्म:१२ जानेवारी १५९८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळेने एकाच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार असल्याचे पत्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसणारा देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोन्याच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबियांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ये तो बस ट्रेलर है*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*1839 : लॉर्ड विल्यम बेंटिकचे निधन*लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारतातील कारकीर्द 1828 - 1835 अशी होती. त्याने भारतात अनेक पुरोगामी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. बेंटिक यांने 1829 चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला. प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला. बेंटिकने लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा 1835 चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत संमत केला. निर्दोष आणि दुर्बल लोकांना लुटणाऱ्या डाकूंचा व हत्यारांचा समूह 'ठगांचा' बंदोबस्त केला. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले. बालहत्त्या आणि नरबळीवर बंदी आणली. लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला. 1835 मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होतो. 📚 लोकमान्य टिळक*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विलायती चिंच अजून कोणत्या नावाने ओळखली जाते ?२) महात्मा फुले यांनी अवतारवादाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली ? ३) तांबे व पितळ या भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ? ४) मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?५) जगातील सर्वात खोल दरी कोणती ?*उत्तरे :-* १) इंग्रजी चिंच, फिरंगी चिंच, गोरटी इमली, चीचबिलाई २) गुलामगिरी ३) कथिल ४) वर्षा गायकवाड ५) मरियाना गर्ता, प्रशांत महासागर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आकाश रेड्डी, युवा नेता, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक तथा शिक्षक, उदगीर👤 गणेश गुंडेवार👤 प्रवीण जावळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 लालू शंकरोड, धर्माबाद👤 जयराम मोरे, साहित्यिक जळगाव👤 दिग्विजय पाटील चव्हाण, चिरली👤 राजा यलकटवार👤 गजानन पाटील, माध्यमिक शिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा ।। सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सत्य को कहने के लिए,**किसी शपथ की जरूरत नहीं होती।**नदियों को बहने के लिए,**किसी पथ की जरूरत नहीं होती।**जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों पर,**उन्हें अपनी मंजिल पाने के लिए,**किसी रथ की जरूरत नहीं होती।*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घोड्याला चांगलीच अद्दल घडली**एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते. वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, "मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे."घोडा म्हणाला, "जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस."घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले. चालता चालता घोडा मनात म्हणाला, "मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल. तात्पर्य: इतरांना सहाय्य करा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्चांक गाठला गेला.**१९६३:व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.**१९४७:नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.**१९१४:सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका**१९११:एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीची स्थापना*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:आर्या आंबेकर – गायिका**१९६७: प्रा.अंजली बर्वे-- लेखिका**१९६३:डॉ.गीता श्रीकांत लाटकर-- कवयित्री, लेखिका**१९५७: सुरेश गोपाळ काळे-- कवी* *१९५२:प्रा.नागोराव कुंभार--लेखक,संपादक**१९५१: संजीवनी बोकील-- कवयित्री**१९५०:मिथुन चक्रवर्ती-- भारतीय चित्रपट अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता , उद्योजक* *१९४८:डॉ.तुषार श्रीधरराव झाडे: कथाकार, कवी**१९४५:रजनी परुळेकर-- मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री(मृत्यू:५ मे २०२२)* *१९४५:मधुकर यादवराव अंबरकर-- कवी लेखक (मृत्यू:२३ नोव्हेंबर २०१५)**१९३७:प्रकाश नारायण संत-- मराठीतील नामवंत कथाकार(मृत्यू:१५ जुलै २००३)* *१९३६:उषा माधव देशमुख-- प्राचीन व अर्वाचीन वाड्:मय आणि संतसाहित्याच्या अभ्यासक**१९३६:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)**१९३५:पंडित यशवंत महाले -- आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक**१९३४: सुरेश दत्तात्रय नाडकर्णी-- वैधकविश्वावर लेखन करणारे लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००३)**१९२०:हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)**१८९८:दिनकर वासुदेव दिवेकर-- ललित लेखक (मृत्यू:२३ जुलै २९५७)**१८९५: देविदास लक्ष्मण महाजन-- कवी अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:जयंत भानुदास परांजपे--समीक्षक, संशोधक, कादंबरीकार, कवी(जन्म:३१ मे १९४५)**१९७७:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (जन्म: ३ जुलै १९१२)**१९४४:आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)**१९२५:देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले.(जन्म:५ नोव्हेंबर १८७०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक, सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'आरे'चे अतिरिक्त कर्मचारी एफडीएकडे वर्ग करणार - राधाकृष्ण विखे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, NDRFची 33 पथकं तैनात, बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम, समुद्र खवळला; पर्यटकांना दूर राहण्याचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नृत्य अदावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालक नव्हे ; मित्र बना*https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती*.बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या मिथून चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस आहे. बॉलिवूडच्या 'दादां'चा जन्म 16 जून 1952 साली झाला होता. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चढउतार पाहणाऱ्या दादांचा आजवरचा प्रवास खडतर होता.मिथून दादांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये अनेक नॅशनल अवॉर्ड्स देखील सामील आहेत. मिथून चक्रवर्तींना दोन चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. त्यापैकी एक 1992 मधील बंगाली फिल्म Tahader Katha साठी मिळाला होता.तर दुसरा अवॉर्ड त्यांना 1998 मध्ये आलेला चित्रपट 'स्वामी विवेकानंद'साठी मिळाला होता. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतात्यांच्या करियरमधील फक्त एवढ्याच बाबी उल्लेखनिय नाहीयेत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, मिथून दादांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये तब्बल आठ भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांनी पंजाबी, बंगाली, हिंदी, उडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यानंतर देखील त्यांच्या अनेक अशा बाबी शिल्लक राहतात, ज्या उल्लेखनिय आहेत. मिथून दादांचा अभिनय इतका सुपरफास्ट आहे की, त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालं आहे. दादांना उगाच दादा म्हटलं जात नाही. मिथून खऱ्या अर्थाने बॉलिवूडचे दादा ठरतात ते या रेकॉर्डमुळेच. एका वर्षामध्ये लीड ऍक्टर म्हणून तब्बल 19 चित्रपटांमध्ये काम करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मिथून चक्रवर्ती यांनी केला होता. हे वर्ष होतं 1989 चं... याच वर्षी मिथून दादांचे एकामागोमाग एक असे तब्बल 19 चित्रपट रिलीज झाले होते. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड अद्यापही कुणी तोडू शकलेलं नाहीये. मिथून दादा आता फार मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करतात. ते सध्या हॉटेल देखील चालवतात. खासकरुन उटीमध्ये त्यांचे अनेक हॉटेल्स आहेत. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके म्हणजे समयरुपी सागरात उभे केलेले दीपस्तंभ होत.➖ इ.पी. विपिल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली ? २) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ?३) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?४) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?५) सर्वात मोठा दिवस कोणता ?उत्तरे :- १) सुभाषचंद्र बोस २) कल्पना चावला ३) आळंदी ४) अमरावती ५) २१ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार , सहशिक्षक, नांदेड👤 सोहेल शेख👤 गोविंद नल्लावाड, सहशिक्षक👤 माधव गैनवार👤 दत्ता रेड्डी सुरकूटवार👤 डॉ. मंगेशकुमार अंबिलवादे, औरंगाबाद👤 अनिल हिस्सल, सहशिक्षक, जळगाव👤 शानिल पाटील👤 तेजिंदर कौर सभेरवाल👤 अब्दुल नासिर शेख👤 हन्मंलू गड्डपवार👤 अशोक चेपटे👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे👤 ज्ञानेश्वर चिखले👤 विजयकुमार भोळे👤 कार्तिक स्वामी👤 ज्योती पाटील👤 ऋषिकेश भंडारे👤 बालाजी शिंदे उंद्रीकर👤 सुदर्शन दरगू👤 गजानन गडपवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात, चेहराच खरा आरसा असतो तो जो ओळखू शकतो तोच मस्त जीवन जगू शकतो…!*संकलन :- मंगेश कोळी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट संगतीचे परिणाम*एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले. *तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेख - *शाळेला चाललो आम्ही*आज शाळेचा पहिला दिवस त्यानिमित्ताने .........https://nasayeotikar.blogspot.com/2016/06/school-chale-hum.htmlवरील लिंकवर क्लीक करून लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥🌐 . *दिनविशेष .* 🌐🚥••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *२००८:’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.**१९९४:इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९९३:संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त**१९७०:बा.पां.आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.**१९१९:कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.**१८६९:महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.**१८४४:चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:बापू सोपान भोंग-- कथा, कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९८०:अनिल दादासाहेब साबळे-- कवी, लेखक* *१९७८: संतोष दिगंबर आळंजकर -- कवी* *१९७५: प्रा.डॉ.सुशिलप्रकाश यादवराव चिमोरे-- कवी,समीक्षक,संपादक* *१९७४:डॉ.सोपान माणिकराव सुरवसे-- लेखक,समीक्षक* *१९७४:डॉ.विनोद पांडुरंग सिनकर-- कवी* *१९७४: कादर राजूमिया शेख-- कवी(पंकज) शिक्षणाधिकारी (गोंदिया)**१९७२:चेतन हंसराज -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९७१:सतीश माणिकराव जामोदकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७०: डॉ.प्रकाश राठोड -- लेखक**१९६६: मनोहर आंधळे-- कवी* *१९६४:मीलन सुरेश येवले- कवयित्री, लेखिका**१९५९:डॉ.सुहास भास्कर जोशी- प्रसिद्ध लेखक**१९५६:हेमंत जगन्नाथ रत्नपारखी-- कवी, लेखक* *१९५५:आनंद वामन उगले-- कथाकार, निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९४८:प्रकाश एदलाबादकर- प्रसिद्ध स्तंभलेखक**१९४७:प्रेमानंद गज्वी – मराठी साहित्यिक व जेष्ठ नाटककार**१९४५:अर्जुन उमाजी डांगळे-- कवी, कथाकार**१९४२:प्रा.भाऊ लोखंडे-- आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक,साहित्यिक (मृत्यू:२२ सप्टेंबर २०२०)**१९३७:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर -- संशोधक, संपादक, अनुवादक, कथासमीक्षक, कथासंकलक**१९३७:किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक**१९३३:सरोजिनी शंकर वैद्य –ललितलेखिका, चरित्रकार, समीक्षक (मृत्यू:३ऑगस्ट २००७)**१९२९:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)**१९२८:शंकर विनायक वैद्य –कवी, समीक्षक वक्ते कथाकार (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१४)**१९२३:केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – कथाकार, कादंबरीकार,१९८९ साली अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८)**१९१७:सज्जाद हुसेन – संगीतकार (मृत्यू: २१ जुलै १९९५)**१९०७:ना.ग.गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)**१९०६:गंगाधर भाऊराव निरंतर-कादंबरीकार, ललित लेखक(मृत्यू:१३ मार्च १९५९)**१८९८:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)* •••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल१९१०)**१९७९:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)**१९३१:अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: १८७९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण नागपूर*📱 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षातील शाळांना आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पत्रकार परिषदेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर देशात सातव्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाची आंबेडकर इंटरनॅशनल मिशन संस्थेकडून दखल, कायदेशीर मदत देण्याची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा इंग्लंड दौरा जाहीर, या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दा शब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?२) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत ?३) चंद्रगुप्त मौर्यचा गुरू चाणक्य यांना अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) 'ग्राम गणराज्य'ची संकल्पना कोणाची होती ?५) स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ?*उत्तरे :-* १) केरळ, सिंगभुम ( झारखंड ) २) अँथनी अल्बानिज ३) कौटिल्य, विष्णुगुप्त ४) महात्मा गांधी ५) कॉर्बन मोनोऑक्साईड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय नोमुलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 हनमंलू शंकरोड, येवती👤 चंद्रकांत जोशी, धर्माबाद👤 गणेश पाटील जगदंबे👤 चंद्रकांत दुडकावार, सहशिक्षक, देगलूर👤 दत्तात्रय राऊतवाड👤 काशिनाथ राऊत👤 साईनाथ शिलेवाड👤 असद बेग👤 जयदीप गावंडे👤 नागेश रासनगीर👤 ज्ञानेश्वर शिरगिरे👤 संतोष गंगूलवार कासराळी👤 आनंद यशवंतराव पाटील, सहशिक्षक, धर्माबाद👤 अनिल कांबळे, सहशिक्षक, नांदेड👤 संजय गैनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 मारोती पाटील👤 दिगंबर मरकंटे, सहशिक्षक, बिलोली👤 शंकर गोसकेवार👤 अनिल बापकर👤 गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 सत्यनारायण पांचाळ जुनीकर👤 साईनाथ शिलेवाड, येवती👤 संगीता संगेवार-दरबस्तेवार👤 शिलवंत डुमणे👤 गिरीधर जाधव👤 माधव उरेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 सचिन पाटील शिंदे👤 सय्यद अक्रम सय्यद जाकीर👤 बालाजी पाटील कदम👤 शेषराव पाटील हिवराळे👤 गंगाधर मावले, शिक्षक नेते, नायगाव👤 नरसिंग गुर्रम, नांदेड👤 धनाजी देशमुख👤 गिरीश जाधव👤 राम मोरे👤 राम लगड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाचा स्वभाव*"पिण्डे-पिण्डे मतिर्भिन्न: कुण्डे-कुण्डे नवं पयःजातो जातो नवाचारा: नवा वाणी मुखे-मुखे।" या नियमाप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकेच भिन्न-भिन्न स्वभाव, वेगवेगळ्या आवडी-निवडी, चित्र-विचित्र सवयी या असणारच. अगदी सख्खे चार भाऊ असले तरी प्रत्येकाच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माणसांचे सज्जन-दुर्जन, सुष्ट-दुष्ट, रागीट-शांत, दयाळू-क्रूर, उदारकंजूष, स्वार्थी-निस्वार्थी, कष्टाळू-आळशी, धाडसी-भित्रे व नम्र-उद्धट असे अनेक प्रकार पडतात.एखाद्या माणसामध्ये एखाद्या गुणाचा अथवा दोषाचा अतिरेक झाला तर त्याची गणना विक्षिप्त अथवा लहरी माणसात केली जाते. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या योग्यतेपेक्षा जास्त मानाचे, उच्च स्थान प्राप्त झाले तर त्याला त्या सत्तेचा उन्माद चढतो. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो मनुष्य तुच्छ समजू लागतो. समोरच्या माणसाचे ज्ञान, बुद्धी, वय, त्याचे विचार, समाजातील स्थान याचा विचार न करता पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. वादासाठी वाद घालण्यात आणि शेवटी आपलेच म्हणणे खरे करण्यात त्यांना धन्यता वाटते. उच्चासनावर बसणे म्हणजे इतरांच्यावर हुकूमत गाजविणे, जमेल तेवढा त्रास देणे, मुद्दाम गैरसोय करणे व स्वत:च्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास आकांड-तांडव करणे. त्यांच्या मते, सौजन्य आणि विनम्रता या गोष्टी वरिष्ठांसाठी नसतातच. समाजात असे मदांध सत्ताधारी काही कमी नसतात.याउलट काही काही अतिशय उदारमतवादी, विद्वान व तरीही विनम्र असतात.नेटवरून संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्विष्ठ मोर*एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं ? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. *तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🌷जीवन विचार🌷*〰〰〰〰〰〰मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते.मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली...*संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो.〰〰〰〰〰〰〰*'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'*〰〰〰〰〰〰〰🌷🌷🌷🌷🌷🌷🌷*🙏शब्दांकन/संकलन*🙏*✍श्रीमती प्रमिला सेनकुडे*जि.प.प्रा.शा.गोजेगावता.हदगाव, जि. नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.● १९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.● १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले💥 जन्म :-● १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.● १८९६: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर● १९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.● १९५० : एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री💥 मृत्यू :-● १९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.● १९७० - शकील बदायूॅंनी, हिंदी आणि उर्दू गीतकार.● १९९९ - कमलाबाई कृष्णाजी ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.● २०१७ - प्रा. रामनाथ चव्हाण, मराठी लेखक आणि संशोधक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषयांचे मूल्यांकन अ, ब, क, ड श्रेणी स्वरुपात, राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगात लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी, भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील जनता उकाड्यामुळं हैराण, अनेक शहरातील उन्हाचा पारा 40 च्यावर, वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ; महाराष्ट्रात 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता दुपारी 12 ते सायंकाळी 5 दरम्यान, मोकळ्या जागेवर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू, राज्य मंत्रीमंडळाचे मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते. पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.*( स्वलिखित )*साहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रा. रामनाथ चव्हाण*प्रा. रामनाथ चव्हाण मराठी लेखक आहेत. दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख होतेे. रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात संशोधनपर लिखाण करून नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'जाती व जमाती' हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.आज त्यांची पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयपीएल ( IPL ) खेळणारी पिता - पुत्राची पहिली जोडी कोणती ?२) हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान आहे ?३) विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?४) देशातील ट्रॅक्टर क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?५) यकृत हा सर्वात महत्त्वाचा अवयव शरीरात कोठे असतो ?*उत्तरे :-* १) सचिन व अर्जुन तेंडूलकर २) नागपूर ते शिर्डी ३) प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार ४) केशुब महिंद्र ५) छातीत उजव्या बरगळ्यात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ मुलकोड, येवती👤 कु. श्रावणी महेंद्र ढगे, नांदेड👤 माजिद सय्यद👤 विनोदकुमार मोकमोड👤 रमेश हातोडे👤 विलास इंगळे👤 दिलीप सहस्त्रबुद्धे👤 विठ्ठल कल्याणपाड👤 स्वप्नील सूर्यवंशी👤 गंगाधर गुरलोड👤 राहुल सोनकांबळे👤 प्रकाश भेरजे👤 एस. के. शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी। जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...**ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन नाते जोडताना जुन्या नात्यांना विसरु नका. असे होऊ नये की, नव्या नात्यात गुरफटून जाऊन आपल्या रक्ताच्या नात्यांना किंवा नातेसंबधांना पार विसरुन जाऊन त्यांच्याकडे सगळ्याच बाबतीत दुर्लक्ष करुन त्यांच्याबद्दलची सहानुभूतीसुद्धा मनात ठेवत नाही. मग अशावेळी नवीन नाते जपण्यात काय अर्थ आहे. नाते असे टिकवा की, त्यात आपल्याही नात्यांना व नवीनही नातेसंबंधानांसही घेऊन चालायला शिकले पाहिजे. त्यातच तुमच्या जीवनाचे खरे कौशल्य आहे. नात्यामध्ये दुरावा न आणता संबंध अधिक दृढ कसे करता येईल याचा विचार नेहमी केला पाहिजे. कारण कुणाचेही मन न दुखवता सा-यांच्या जीवनात आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे वातावरण नेहमीसाठी असायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सचोटी*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला, साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे. साधू म्हणाला, महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.*तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९७५ : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८९२ : ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.● मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती● १९७७ - अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय खेळाडू.● १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.💥 मृत्यू :-● १९१० : अनंत लक्ष्मण कान्हेरे, भारतीय क्रांतिकारक● १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील● १९९८: उद्योगपत्नी सौ. विमलाबाई गरवारे● २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर● २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर● २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष● २०१३-वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई लोकलचा प्रवास होणार सुस्साट, एमयूटीपी ३ अ' प्रकल्पसंचासाठी ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जउभारणीला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं, उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथं 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या लिंगायत-वोक्कलिंग समाजाच्या हाती; 32 टक्के मतांसाठी सर्वच पक्षात चढाओढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भांडुपच्या जलबोगद्याचं काम 18 दिवसांत पूर्ण, मुंबईतली पाणीकपात रद्द होण्याची अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; गुजरात सरकारलाही सुनावले खडे बोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - हैदराबाद : दमदार अष्टपैलू कामगिरी करत कॅमेरून ग्रीन हा मुंबई इंडियन्ससाठी विजयाचा शिल्पकार ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हुश्य .....! संपली परीक्षा*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1497988893661213&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण*दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लाखो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या काही श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातच ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणयासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.....*उष्माघात म्हणजे काय?*उष्माघात म्हणजे नक्की काय तर उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे मानवी शरीराच्या तापमानात ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होऊ लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीच्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. यालाच उष्माघात म्हटलं जातं. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या अशा उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलं आहे. उष्माघाताची लक्षणेचक्कर येणे त्वचा लालसर होणेउलट्या, मळमळ होणेसुस्त वाटणेडोकं दुखणेह्रदयाचे ठोके वाढणे*उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल-*भरपूर पाणी आणि शरबत प्यावेउन्हात जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल आदींचा वापर कराल.उन्हाळ्यात सैल कपडे घालावेआवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.मद्यपान टाळा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दिशादर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर मार्ग चुकण्याचा प्रश्नच येत नाही..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वात कमी वयात नेत्रदान झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो ?३) सागरी संपत्ती असलेल्या थोरियमचा उपयोग कोठे केला जातो ?४) एकपेशीय सजीवांची दोन उदाहरणे सांगा ?५) 'व्हायब्रंट व्हीलेज' या केंद्र सरकारच्या योजनेतील पहिले गाव कोणते ?*उत्तरे :-* १) अर्जुन संदीप चावला, उत्तराखंड, वय - ७ दिवस २) १९ एप्रिल ३) अणुऊर्जा निर्मिती ४) अमिबा, पँरामेशियम ५) किबिथू, अरुणाचल प्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 अझहर शेख👤 मनोज रामोड👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 कृष्णा राय👤 संदीप कातमवाड👤 सचिन कनोजवार👤 बालाजी पोरडवार👤 भक्ती जठार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.**शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.**"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ मूर्तीपूजेचे महत्त्व ❃* स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले. रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'.हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १७२० - शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली● १८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा नियमितपणे सुरू झालीकरण्यात आला.● १९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले● १९३६ - पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला● १९५० - आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली● १९७५ - भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आर्यभट्टचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह पुरस्कर्ते समाजसुधारक● १९१० - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.● १९१६ - ललिता पवार, हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री● १९६२ - पूनम धिल्लन, हिंदी चित्रपट अभिनेत्री💥 मृत्यू :-● १८५९ - रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे, १८५७ च्या युद्धातील सेनापती● १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९७२ - महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,● १९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते, पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक.● २००२ - शरद दिघे, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाटोदा ग्रामपंचायतीनं देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत पटकावला दुसरा क्रमांक, पुरस्कारातून ४ कोटींची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाची जनगणना जातीनिहाय करा, 2011 च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी देखील जाहीर करा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाई विरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात माजी आमदार खेडकर व इतर आंदोलकांचे जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानासाठीची कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, 20 एप्रिलपर्यंत कागदपत्रे जमा करण्याच्या शासनाच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये 01 मे रोजी महाराष्ट्रदिनी 51 सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या घरच्या मैदानात चेन्नईचा विजयी डंका, चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्य सुंदर आहे*https://m.facebook.com/story.php?story_fbid=3649684281824986&id=100003503492582&mibextid=Nif5ozसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे*(जन्म : पेढे परशुराम , तालुका चिपळूण , जिल्हा : रत्नागिरी, ७ मे १८८०, - मृत्यू : १८ एप्रिल १९७२) हे एक उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त सक्रिय शैक्षणिक संशोधन ज्याचा परिणाम धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या ६,५०० पृष्ठांवर झाला. इतिहासकार राम शरण शर्मा म्हणतात: "पांडुरंग वामन काणे, एक महान संस्कृतशास्त्रज्ञ, ज्याने सामाजिक सुधारणेचा विवाह केला, त्यांनी विद्वत्तेची पूर्वीची परंपरा चालू ठेवली. विसाव्या शतकात पाच खंडांमध्ये प्रकाशित "धर्मशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे स्मारक कार्य आहे. प्राचीन सामाजिक कायदे आणि रीतिरिवाजांचा ज्ञानकोश. हे आपल्याला प्राचीन भारतातील सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यास सक्षम करते." त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन महाराष्ट्र इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्एल.बी. झाले. नंतर झाला वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम.ए. झाले. त्यानंतर ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही.एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.काणेंनी १९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'Statue of Liberty'* हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा कोणत्या देशात आहे ?२) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) आधारित 'आभासी भिंत' तयार करणारा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता ?३) इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे पदसिध्द कुलपती कोण असतात ?४) देशातील पहिले खाजगी विमानतळ कोणते ?५) हवामान म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) अमेरिका २) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ३) राष्ट्रपती ४) दुर्गापूर, पश्चिम बंगाल ५) एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरीची स्थिती होय.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गझलकार शेखर गिरी👤 कु. मधुरा हणमंत पडवळ, लातूर👤 सचिन कुलकर्णी, लातूर👤 योगेश मरकंटी👤 मनोज कुंटे👤 देवराव पाटील कदम👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरा-बायकोमध्ये मतभेद असतातच. तसं पाहिलं तर 90% जोडप्यांमध्ये दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी असतात, त्यामुळे वाद होणं, खटके उडणं स्वभाविकच आहे. परंतु एकाने समंजसपणा दाखवला पाहिजे. कारण वाद टोकाला जाऊन नवरा-बायको विभक्त होणार असतील तर त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते.**'लिव्ह-इन' मध्ये नात्याची कमिटमेंट नसते. त्यामुळे त्यात गांभीर्य नसते. एकत्र राहण्यातली नवलाई संपली की त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. कमिटमेंट नसल्यामुळे दोघंही एकमेकांना बांधील नसतात. अंतिमत: अशा नात्याचा शेवट दोघांच्या विभक्त होण्याने होतो. आपल्यावर कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर 'अॅडजस्ट' करण्याचे संस्कार झालेले असतात. वैवाहिक सुखही तसं क्षणिकच असतं, लग्नाची नवलाई संपली की सगळं चाकोरीबद्ध होऊन जातं. पण नवरा-बायको एकमेकांचे मित्र असतील तर त्यांच्या नात्यात सतत एक सकारात्मकता झिरपत असते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर ते नाते अधिक घट्ट बनते. कामापुरते किंवा आपमतलबासाठी निर्माण केलेले नाते कधीच जास्त काळ टिकत नाही.उलट अशा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडलेल्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना उत्पन्न होते.तेव्हा नाते जर टिकवायचे असेल तर निःस्पृह भावनेने व आपुलकीने नाते निर्माण करुन ते शेवटपर्यंत कसे टिकतील यासाठी जपले पाहिजे. हीच ख-या जीवनाची यशोगाथा आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरडी सहानभुती*एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे. त्यावर कोल्हा म्हणाला, मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.*तात्पर्य*एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्या पेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९५२ - पहिली लोकसभा अस्तित्वात आली.● १९७० : चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले💥 जन्म :-● १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त● १८९१ : यशवंत रामकृष्ण दाते, नामवंत मराठी कोशकार.● १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.● १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.💥 मृत्यू :-● १९७५ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती● १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते● २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.● २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.● २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.● २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं, पुरस्काराचं मानधन दिलं मुख्यमंत्री सहायता निधीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अवकाळी काही पाठ सोडेना; नाशिकसह जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा तडाखा, मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर ! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना दरमहा दोन हजार, मोफत वीज; राहुल गांधी यांची कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 एप्रिल रोजी होणार बीआरएस पक्षाची सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Femina Miss India 2023 : राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2023 - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राउंडवर कोलकाताचा पाच विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कथा :- परीक्षा गुरुजींची*http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_3.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.सूरदास यांचा जन्म इ.स. १५४०मध्ये रुणकटा नावाच्या गावात झाला. हे गाव मथुरा-आग्रा मार्गालगत वसलेले आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की सूरचा जन्म सिही नावाच्या खेड्यातल्या एका गरीब सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो खूप विद्वान होता, त्याच्या लोकांची आजही चर्चा आहे. सूरदास यांचे वडील रामदास गायक होते. सूरदासच्या जन्माबद्दल मतभेद आहेत. सुरुवातीला सुरदास आग्राजवळील गौघाट येथे राहत होता. तेथे असताना त्यांनी श्री वल्लभाचार्य यांची भेट घेतली आणि त्यांचे शिष्य झाले. वल्लभाचार्य यांनी पुष्तीमार्गामध्ये त्यांची दीक्षा घेतली आणि कृष्णालीला पद गाण्याचे आदेश दिले. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले. वल्लभाचार्यांनी त्यांना श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.सूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.१५८०मध्ये गोवर्धन जवळच्या परसौली गावात सूरदास यांचा मृत्यू झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसानं मनात काही ठेवू नये,नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्याही एका विषारी वनस्पतीचे नाव सांगा ?२) शुद्ध पाण्याचा सामु ( PH ) किती असतो ?३) PH चा Full Form काय आहे ?४) वैदिक वाङ्मययातील कोणता मूळ ग्रंथ मानला जातो ?५) जपानचे दुसरे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) धोतरा २) सात ३) पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ४) ऋग्वेद ५) निप्पोन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हिंदुजा शिवाजी अन्नमवार, नांदेड👤 शिवकन्या पटवे, उपक्रमशील शिक्षिका, बिलोली👤 सुभाष टेकाळे, कुपटी, माहूर👤 मोईन आर. शेख👤 आनंद बाबासाहेब त्रिभुवन👤 म. सलमान👤 विनायक शिंदे👤 अनुजकुमार मुंडे👤 जया इगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतरांसारखाच मीसुद्धा एका छोट्या खेड्यात लहानाचा मोठा झालो. तिथं मरण येईपर्यंत राबणा-या बाया पाहिल्या. त्यात आई नावाचीही बाई होती. दिवसभर काम एके काम, हिच त्यांची दैनंदिनी. घर आवर, रोज टोपलंभर भाकरी बडव, घर-गोठा स्वच्छ कर, रांजण-घागरी भरून ठेव, गायी वासरांची देखभाल कर..आणि शेतावर जा. लेकरांना जेऊ घाल..न्हाऊ घाल..पुरूषांना ताटं लाव..मग स्वत: उशीरानं जेव. बाई अशी पुरूषप्रधान कर्फ्यूखाली सतत का करपत गेलीयं ?**माती आणि माता काही मागत नाही, पण भरभरून सारं देतात. माया, जिव्हाळा, प्रेम, आधार, सहारा आणि भाकर देणा-या माती आणि माता या श्रेष्ठ विश्वसंस्थाच आहेत, ज्या निर्मोही आहेत. विशाल आणि पवित्र आहेत. पण बाईपणाच्या झिजण्याचं मोल जगात झालं नाही. त्यावर महाकाव्य लिहून झाली असतील, पण 'माय' हा शब्दांपलिकडचा महान ग्रंथ म्हणून शिल्लकच उरणार आहे. " पोलिसांचा कर्फ्यू एक वेळ परवडला, पण परंपरेचा परवडत नाही."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येतात आणिमनाला गोंधळून टाकतात. अशावेळी आपल्याला काय करावे नि काय करु नये अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. काय करावे काही सुचत नाही. मग अशी परिस्थिती असते तेव्हा एकच करायचे.मनाला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी आवडणा-या गोष्टीकडे लक्ष घाला त्यात तुमचे मन रमले की, आपोआपच तुमची द्विधा असलेली मनस्थिती पूर्ववत होण्यास मदत होते आणि तुमच्या मनातला चाललेल्या गोंधळाला विराम मिळतो. दुसरी एक गोष्ट करा की,ज्यातून तुम्हाला काही पर्याय शोधण्यास मदत होते.काही संस्कारक्षम, आदर्श विचार, संतांची, थोर व्यक्तींची व विचारवंताची उपदेशात्मक ग्रंथ, पुस्तके किंवा विचार वाचण्यासाठी हातात घ्या. ज्यातून तुम्हाला काही ना काही पर्याय शोधून काढण्यास मदत मिळेल व गोंधळलेल्या मनाला स्थिर ठेवता येईल.कारण हेच ज्ञान आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी व प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतील. मग पुढील कामासाठी जोमाने लागू शकाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महत्व मानवसेवेचे*एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून शिष्यगण येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील दोन शिष्य त्यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ करण्यात मग्न होते. चार तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा या रूग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत. त्या संतमहात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्यामुळे स्वत पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना निशुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असत. एकेदिवशी त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या दीर्घपूजेत व्यग्र होते. त्याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्यादिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु दोन्ही शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन केले,''वत्सांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते. कारण ती निस्वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्या दोन्ही शिष्यांचे डोळे उघडले. *तात्पर्य*ईश्वराची जिवंत कलाकृती म्हणजे माणूस त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते व त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.💥 जन्म :-● १४५२ : लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार💥 मृत्यू :-● १८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपूरमध्ये सूर्य तळपला, 43.2 अंशसेल्सिअस जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तुकडेबंदीबाबतची पुनर्विलोकन याचिका फेटाळली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर; शाहरुख खान आणि एस. एस. राजमौली यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - सनरायजर्स हैद्राबादने केकेआर ला 23 धावानी केले पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1493759750750794&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोकण विभागकोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.क्षेत्रफळ : ३०,७४६ किमी जिल्हे :मुंबई शहर – मुंबई उपनगर – ठाणे – पालघर – रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्गसाक्षरता: ८१.३६%इतिहासब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते. १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. १९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली. कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोड़ीदार सुंदर नाही तर काळजीकरणारा पाहिजे…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हीस्परर्स' या लघुपटात हत्तीची काळजी घेणारे दाम्पत्याची नावे काय आहेत ?२) आयपीएलमध्ये एका संघाकडून २०० सामने खेळणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे ?३) घानेंद्रियाची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते उपकरण विकसित केले आहे ?४) ज्ञानवापी मज्जिद कोणत्या राज्यात आहे ?५) १९२७ चा वन कायदा बदलून कोणत्या वर्षी वन संवर्धन कायदा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) बेली व बोम्मन २) महेंद्रसिंग धोनी ३) अल्फॅक्टोमीटर ४) वाराणसी, उत्तरप्रदेश ५) १९८०*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुधीर गुट्टे, विस्तार अधिकारी पंचायत समिती माहूर👤 सौ वैशाली क्रांतिकुमार भुक्तरे, नांदेड👤 दत्ताहरी जाधव👤 प्रा. श्रीराम गोविंद गव्हाणे, संपादक👤 मुकुंद एडके👤 रामकिशोर झवर👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद👤 बलकेवाड योगेश👤 संदीप पारने👤 सुनील पलांडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'परमार्थ' साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे.**भगवंताला 'सर्व' देण्यापेक्षा 'स्व' द्यायला शिका. 'स्व' दिल्यावर 'सर्व' नाही दिले तरी चालेल, कारण ते आपले, आपल्या मालकीचे रहातच नाही. उलट 'सर्व' देऊन 'स्व' द्यायचा राहिला, तर 'सर्व' दिल्याचे समाधान मिळत नाही.**"भगवंताला 'स्व' देणे म्हणजे 'मी त्याचा आहे' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याच्या मार्गावर चालणारी माणसे कधीच कुणाला घाबरत नाहीत. कारण सत्य हेच त्यांचे असत्याला दूर करणारे प्रभावी शस्त्र आहे.की ज्यामुळे असत्याचा सत्यापुढे काहीच चालू शकत नाही.म्हणून केव्हाही सत्याच्याच मार्गाने चालावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्ती*सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट धरू लागला.शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली.*तात्पर्य*नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९१९ : जालियानवाला बाग हत्याकांड● १९३९ : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.● १९४८ : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.● २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर💥जन्म :-● १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर● १९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.● १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला● १९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक💥मृत्यू● १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी● १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी● १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर● १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर● १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले● २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार● २००८ : दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील हापूस आंबे समुद्रामार्गे जपान अन् अमेरिकेत रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावणार मेट्रो; कोलकाता मेट्रोकडून लवकरच अंडरवॉटर मेट्रोची चाचणी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार गुण देण्याची नवी पद्धत; नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा आराखडा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारच्या रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क परत करण्याचं काम सुरू, परीक्षार्थींना केवळ 65 टक्के फी परत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवकाळीच्या मुद्द्यावर अजित पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा; अजित पवारांकडून हेक्टरी पन्नास हजारांच्या मदतीची मागणी, सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोनाचा धोका वाढला.. राज्यातील रुग्णसंख्या हजारपार, एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद, नऊ जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 :- चिदंबरम स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईवर पाच धावानी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ. आंबेडकरांसारखे होता येईल काय*खालील लिंक वर लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वरच लिहाhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_12.htmlडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विदर्भ विभाग*विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते. विदर्भ म्हणजे वीर+तर्फ म्हणजेच वीर आणि त्यांचा प्रदेश विदर्भ ही मराठी सातवाहन,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव राजवटीतील वीर पुत्रांची भूमी आहे. विदर्भ शब्दाचा अर्थ वीर आणि तर्फच अपभ्रंश होऊन विदर्भ झाले तर्फ म्हणजे प्रदेश या तरफचा दर्भ झाला आणि वीर मधला र गायब झाला आणि बनला वीरांचा प्रदेश विदर्भ जो महाराष्ट्र आहे त्याचे मूळ विदर्भ आहे.विदर्भ म्हणजेच आजचा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि छत्तीसगड आहे.विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे.विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता. नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसरे इंग्रज-गोंड युद्ध पराभवानंतर गोंड प्रभाव फक्त चंद्रपूर - नागपूर विभागातच मर्यादित झाला. नंतर गोंड राजांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).महाराष्ट्राला विदर्भातून आजवर चार मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक , जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिली वंदेभारत एक्स्प्रेस कोणती ?२) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?३) होमिपॅथीचे संस्थापक कोणाला मानले जाते ?४) मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?५) बाभूळच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नवी दिल्ली - वाराणसी वंदेभारत एक्सप्रेस ( १५ फेब्रु. २०१९ ) २) ७५ टक्के ३) डॉ. हॉनिमन, जर्मन चिकित्सक ४) तामिळनाडू ५) Acacia*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चि.यश राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 विठ्ठल वाघमारे, उमरी👤 अनिल लोकडे, चिकना👤 अक्षय वाघमारे👤 प्रसाद यादव👤 लक्ष्मण पनेवार👤 दर्शन जोशी👤 व्यंकट पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या अध्यायात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवनाचे रहस्य*एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दुखी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वतला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.*तात्पर्य*जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३५ - प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.● १९६१ : सोवियेत संघाचा युरी गागारिनअंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.● १९६७ - कैलाशनाथ वांछू भारताचे १०वे सरन्यायाधीश झाले● १९९७ : भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.● १९९७ पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले.💥जन्म● १८७१ : वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.● १९१० : पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.● १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव● १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड● १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार● १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन● १९८१ : तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.💥मृत्यू● १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा● १९१२: अमेरिकन रेड क्रॉसच्या स्थापक कारा बार्टन● २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ● २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार● २०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचं भाकित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 4 मे ला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रानं सर्व राज्यांशी समन्वय साधून मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू केलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन मोबाईल; अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होणार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिवमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा, तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ * 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर मुद्देसूद पुरावे सादर करा; हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलवर सहा विकेट राखून मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साहित्यिक आसाराम लोमटे*आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.आसाराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घकथा लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीआसाराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या साहित्यावर काही अभ्यासकांनी शोधप्रबंध सादर केले आहेत.आसाराम लोमटे यांचे वैचारिक लेख :-‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा आसाराम लोमटे यांचा लेख २०१९ सालच्या एप्रिलमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे त्यांच्या डोक्यात आले. हा लेख वाचूनच साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दुष्काळावर 'साधना'चा एक पूर्ण अंकच काढला. या अंकात आसाराम लोमटे यांनी सर्वच म्हणजे आठ लेख लिहिले. हे लेख लिहिण्यापूर्वी असाराम लोमटे ह्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणाऱ्या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने ते फिरले.४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या,व दुष्काळ सोसणाऱ्या आणि दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या रयतेशी त्यांना संवाद साधता आला. मराठवाड्यातल्या केज, धारूर, परांडा, मंठा, भूम विदर्भातल्या अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रिसोड, लोणार, वाशीम; माणदेशातल्या आटपाडी, खटाव, जत, माण आणि खानदेशातल्या अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारवा, सांगोला अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन असाराम लोमट्यांनी दुष्काळाची दाहकता समजून घेतली आणि 'साधना'त हे ८ लेख लिहिले.त्यांच्या आलोक या कथासंग्रहाला 2016 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छत्रपती संभाजी नगर विभाग*छत्रपती संभाजीनगर विभाग पूर्वीचे नाव औरंगाबाद विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. मराठवाडा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.प्राचीन काळी हा मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नंतर हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग हा मुख्यत्वेकरून इस्लामिक राजवटीखाली होता. इ.स. सन १७२४ ला निजामाने मराठवाडा, तेलंगण व सध्याच्या कर्नाटक राज्यातील काही भाग मिळून स्वतंत्र हैदराबाद राज्य स्थापन केले. नंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाई केली तेंव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला. १९४८ मध्ये स्वतंत्र हैदराबाद राज्य अस्तित्वात आले. पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनूसार हे राज्य तीन भागात विभागले गेले. ज्यातील मराठवाडा हा भाग तेंव्हाच्या मुंबई राज्याला जोडण्यात आला आणि पुढे १९६० ला प्रामुख्याने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या विभागात एकूण आठ जिल्हे आहेत - जिल्हे - छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते, तो भाग्यवान होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?२) २०२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या किती आहे ?३) प्रसिद्ध चित्रपट RRR यामध्ये असलेल्या एका नायकाचे पात्र कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवन चरित्रावर प्रभावित आहे ?४) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) भारतात सर्वात मोठी बैलगाडी शर्यत कोठे भरते ?*उत्तरे :-* १) राकेश खत्री ( २,५०,००० घरटी बनवली.) २) ३१६७ वाघ ३) कोमाराम भीम ४) सियाल ५) भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आसाराम लोमटे, परभणीसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त👤 अरुणा कलेपवार, सहशिक्षिका, नांदेड👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 गंगाधर पेंडपवार👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुर्रेवाड, चिकना👤 मनोज दातार👤 आकाश वाघमारे👤 कलीम शेख👤 मिनाज सय्यद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी काम निष्काम या राघवाचे। करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥ करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां। हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?**प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही माणसांना स्वतःची काळजी नसते आणि जगाचं आता कसं होईल याची काळजी करत बसतात. अशी माणसे ही दिशाहीन असतात.केवळ काहीच न करता स्वतःचे जीवन सुधारु शकत नाहीत तर मग जगाच्या कल्याणाची काळजी करणे व्यर्थच आहे.अशी माणसे इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा निरर्थकपणे जीवन जगणा-या माणसापासून अलिप्तच राहिलेले बरे.जगासाठी काहीतरी करणारी माणसे बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मूल्य*एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना जीवनाचे मूल्य विचारले. भगवान बुद्धांनी त्याच्या हातात एक चमकदार दगड ठेवला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत विचारून ये. पण हा दगड तू विकायचा नाहीस. तो माणूस दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक फळविक्रेता दिसला, त्याच्याकडे जाऊन त्याने दगडाची किंमत विचारली. फळविक्रेता म्हणाला, मी या दगडाची किंमत म्हणून तुला 12 संत्री देईन. तो माणूस मग एका भाजीविक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याने सांगितले, या दगडाच्या बदल्यात मी एक पोते बटाटे तुला देईन. तो दगड घेऊन तो एका सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, मी तुला याचे पन्नास लाख रूपये देईन. नाहीतर असे कर. मी तुला दोन कोटी रूपये देतो, पण हा दगड मला दे. तो माणूस म्हणाला, माझ्या गुरूने हा दगड विकायचा नाही म्हणून सांगितले आहे. नंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने ओळखले की हा दगड साधासुधा नसून माणिक आहे. त्याने ते माणिक व्यवस्थित एका आच्छादनावर ठेवले. आणि म्हटले, तुला हे माणिक कुठे मिळाले. अख्ख्या ब्रह्मांडात याची किंमत कुणी करू शकणार नाही, इतके ते मूल्यवान आहे. तो माणूस हैराण होऊन भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही मला हा एक दगड दिलात पण त्याची किंमत प्रत्येकाने वेगळी सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले, या दगडाची किंमत फळवाल्याने 12 संत्री सांगितली, तर रत्नपारख्याने त्याला मूल्यवान म्हटले. तुझ्या जीवनाचेही तसेच आहे. तू भलेही हिरा आहेस, पण समोरचा माणूस त्याच्या योग्यतेनुसार तुझे मूल्य, पात्रता ठरवणार हे लक्षात घे.*तात्पर्य* - प्रत्येकाने स्वत:ला ओळखले पाहिजे. आपण कसे आहोत हे इतरांकडून समजून घेण्यापेक्षा स्वत:च जाणले पाहिजे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.● १९९९ - अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १८२७ : महात्मा जोतिबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक● १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक● १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.● १९०८ मासारू इबुका, सोनी कंपनीचे सहसंस्थापक.● १९३७ रामनाथन कृष्णन, भारतीय टेनिस खेळाडू.● १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.● १९६३ - बिली बाउडेन, क्रिकेट पंच.💥 मृत्यू :-● १९७७ - फणीश्वर नाथ रेणू, भारतीय लेखक.● २००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.● २००३ - सेसिल हॉवर्ड ग्रीन, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे स्थापक.● २००९ - विष्णू प्रभाकर, भारतीय साहित्यिक.● २०१५ - हनुतसिंग राठोड, भारतीय सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जूनमध्ये चांगला तर जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य, अजूनही कोरोना संपलेला नाही, नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील,*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय, त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - चेन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळलेल्या आरसीबी विरुद्ध लखनौ च्या सामन्यात लखनौने एक विकेटनी सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागोराव सा. येवतीकर लिखित दैनिक सकाळच्या ई - पेपर वरील*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*या लेखावर आलेल्या 25 प्रतिक्रिया वाचा खालील लिंक वरhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_66.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा ज्योतिबा फुले*जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कार्य करीत रहा, परिणामाचा विचार करू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पिंपळाच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?२) LED चा Full Form काय आहे ?३) 'विदर्भाचे दादा कोंडके' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) पहिला राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) १८८२ साली 'हंटर आयोगा'कडे सर्व मुलामुलींसाठी सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाची मागणी कोणी केली ?*उत्तरे :-* १) Peepal / Bow Tree २) Light Emitting Diode ३) डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ नाट्य कलावंत ४) ५ एप्रिल १९६४ ५) महात्मा ज्योतिराव फुले*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तात्रय दळवी👤 रामदास वाघमारे, संपादक👤 देविदास बस्वदे👤 विनोद चिलकेवार👤 युवराज पाटील👤 परमेश्वर नारवटे👤 माधव गंटोड👤 संजय मदनराव नागरे👤 प्रवीण कोडम, संपादक👤 सिध्देश रेवंतवार, धर्माबाद👤 साईनाथ हवालदार, येवती👤 माधव गंटोड👤 सुरेश दिवदेवार👤 शिवकुमार जाधव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!**पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंहाची गुणज्ञता*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला. *तात्पर्य*लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाचीस्थापना केली.● १९८२ - भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह इन्सॅट १एचे प्रक्षेपण💥जन्म :-● १८८० - सर सी.वाय. चिंतामणी, पत्रकार आणि उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री● १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.● १८९७ - प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकारणी.● १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू● १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.● १९५२ - नारायण राणे, भारतीय राजकारणी💥मृत्यू :- ● १३१७ - संत गोरा कुंभार.● १६७८ - वेणाबाई, रामदास स्वामींची शिष्या● १८१३ - जोसेफ लाग्रांज, इटालियन गणितज्ञ.● १९३१ - खलील जिब्रान, लेबेनॉनी-अमेरिकन साहित्यिक.● १९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.● १९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री.● १९९५ - मोरारजी देसाई, भारताचे ४थे पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *" अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद करताना अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार अशी घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा, वीज पडून चौघांचा मृत्यू ; लहान-मोठी 54 जनावरेही दगावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षणाचाच बाजार मांडला! बंगळूरमध्ये मॅनेजमेंट कोट्यातील काॅम्प्युटर सायन्सच्या एका जागेचा दर तब्बल 64 लाखांच्या घरात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी अमेरिका वारी महागली! व्हिसासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार; 30 मे 2023 पासून नवीन दर लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील सुप्रसिद्ध 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेल्या 5 सिक्समुळे केकेआरने गुजरातला त्यांच्या होम ग्राउंडवरच पराभूत केले असून 3 विकेट्स राखून विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा.. प्रत्येक वर्षी आपल्या जवळपास एकदा तरी ही चर्चा ऐकू येतेच. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा या दोघांचेही काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करता, आपण नेमकं काय निवडायचं ? मराठी की इंग्रजी ? तुम्हाला काय वाटतं ? आपले मत खालील क्रमांकावर जरूर कळवा. चांगल्या प्रतिक्रियाना प्रसिद्धी देण्यात येईल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिखांची काशी - नांदेड शहर*नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह १६ तालुके आहेत त्यांची नावे पुढीप्रमाणे मुखेड,मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, , माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.नांदेड येथून प्रवासासाठी बस, रेल्वेसह विमानाची व्यवस्था देखील आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याला या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?२) पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो ?३) नाटोचे मुख्यालय कोठे आहे ?४) गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष कोण ठरले आहेत ?५) राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?*उत्तरे :-* १) पद्मभूषण २) महसुल विभाग ३) ब्रेसेल्स, बेल्जियमची राजधानी ४) डोनाल्ड ट्रम्प ५) ५ एप्रिल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शेख mwh, माध्यमिक शिक्षक, नांदेड👤 भाऊसाहेब आबा अहिरे👤 शिवराज सिताराम वडजे, सहशिक्षक, उमरी👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक👤 टी. अशोक साईनाथ👤 विलास बोंबले👤 चंद्रकांत पोळ👤 प्रकाश बंडेवार👤 रामदास डुमणे👤 सुभाष बोडके👤 श्यामानंद लिंगमपल्ले👤 भाऊसाहेब अहिरे👤 नागेश तांबोली👤 सचिन पवळे👤 बालाजी मुपडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात दुर्जन अथवा वाईट प्रवृत्ती असणा-या माणसांचे वर्चस्व राहू नये म्हणून सज्जन माणसे जन्माला आलेली असतात.त्यांच्या सद्विचारामुळे दुर्जनवृत्तीची माणसे वर तोंड काढू शकत नाहीत त्यामुळे अनेक होणारे अनर्थ टळू शकतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ लांडगा आणि सिंह ❃* एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही ! *तात्पर्य*जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्व बंजारा दिवस* *अग्निशमन दिन*💥 ठळक घडामोडी● १९५० - भारत आणि पाकिस्तान यांच्यात लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षऱ्या● १९२१ - वर्धा येथे विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना केली💥जन्म● १९२४ - भारतीय शास्त्रीय गायक कुमार गंधर्व● १९२८ - प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई● १९३८ - कोफी अन्नान, संयुक्त राष्ट्राचे सातवे प्रधान सचिव● १९७९ - भारतीय गायक अमित त्रिवेदी💥मृत्यू :-● १८५७ - क्रांतिकारक मंगल पांडे● १८९४ - बंकिमचंद्र चटोपाध्याय, बंगाली साहित्यिक● १९७३ - पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार● १९७४ - नानासाहेब फाटक, नटसम्राट● १९५३ - वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती● १९९९ - वसंत खानोलकर, कामगार नेते● २०१५ - जयकानधन, भारतीय पत्रकार व लेखक● २०१३ - मार्गारेट थँचर, ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार! किरीट पारीख समितीच्या शिफारसी स्विकारल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अनुदान मिळवण्यासाठीच्या जाचक अटींमुळे कांदा उत्पादक अडचणीत, सरसकट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार, एकूण दीड कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेईई मेननंतर प्रवेशासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - लखनौचा हैद्राबादवर पाच विकेट राखून विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••मुलांच्या आरोग्यदायी सवयीमुलांनो, आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे ? याचा कधी आपण विचार केला आहे काय ? सहसा आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काहीच काळजी घेत नाही. त्यामुळे भविष्यात आपणास अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. जसे की, आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते. बरीच मुले सूर्यवंशी घराण्यातील असतात म्हणजे सूर्य उगल्यावर उशिरा उठतात. उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी ही सवय घातक आहे. जी मुले सकाळी लवकर उठून अभ्यास करतात भविष्यात ते उत्तम प्रकारे काम करू शकतात. सकाळी उठल्यानंतर पहिले काम असते स्वच्छ दात घासणे आणि चूळ भरणे. यामुळे आपल्या दातांची योग्य निगा राखल्या जातो. आपल्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी दात हे फार महत्वाचे आहेत. पण आपण त्यास कधी महत्व देत नाही. अनेक मुलाचे दात किडलेले दिसून येतात कारण लहानपणी ते खूप चॉकलेट खाल्लेले असतात. पालकांनी मुलांना शक्यतो चॉकलेट पासून दूर ठेवावे. तसेच रोज नियमित अंग घासून स्वच्छ स्नान करण्याची आपणास सवय असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण स्नान करताना साबण वापरत नाही आणि मारोतीला पाणी टाकल्यासारखे अंगावरून पाणी ओतून घेतो. यामुळे कालांतराने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे जेवण. जेवण्याच्या बाबतीत आपल्या असंख्य तक्रारी असतात. जेवणात आवडीचे खाद्य दिसले की पोट भरून खायचे आणि नावडते खाद्य असले की अर्धवट पोटाने उठून जायाचे. यामुळे आपल्या शरीराला संतुलित आहार मिळत नाही आणि मग आपणास काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होते. फळभाजी आणि पालेभाजी न खाणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आढळून येते. पण याच फळभाजी आणि पालेभाजी खाणारी मुले निरोगी असतात. ज्याचे पोट साफ असते त्यांना सहसा कोणतेच विकार दिसून येत नाही. पोट साफ होण्यासाठी सर्व प्रकारचे जेवण आवश्यक आहे. शक्यतो सायंकाळच्या वेळी एक तास तरी मैदानावरचे खेळ खेळावे. आजकालची मुले आपला वेळ मोबाईलच्या गेममध्ये किंवा टीव्हीवरील कार्टून पाहण्यात घालवितात. त्यामुळे ही मुले दिवसेंदिवस एकलकोंडी होत आहेत. चला तर मग आपले उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयीचा अंगीकार करू या.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उस्मानाबाद जिल्हा* हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६ (इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे .जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोबाईलचा शोध केव्हा लागला ?२) पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?३) नाटो म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटनाची स्थापना केव्हा झाली ?४) आयपीएलचे अध्यक्ष कोण आहेत ?५) आदिवासींच्या विकासासाठी लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ एप्रिल १९७३ २) ३ टक्के ३) ४ एप्रिल १९४९ ४) अरुण धुमल ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर झगरे गुरुजी वाकदकर👤 सौ. जयश्री व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड👤 बालाजी पांचाळ👤 गंगाधर कौडेवार, शिक्षक👤 बद्रीनाथ कुलकर्णी👤 जगन्नाथ लाभशेटवार, शिक्षक👤 निलेश कवडे, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मान इच्छी तो अपमान पावे ।* *अमंगळ सवे अभाग्याची ।।* *एकाचिये अंगीं दुजियाचा वास ।* *आशा पुढें नाश सिद्ध करी ।।**मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.**राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १६५६ - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला● १८९६ - पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन.● १९१९ - महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .● १९८० - अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली💥जन्म● १९०९ - जी.एन. जोशी, भावगीतगायक व संगीतकार.● १९१७ - हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु, मराठी कथाकार व कवी.● १९१९ - रघुनाथ विष्णू पंडित, कोंकणी कवी.● १९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग, मराठी उद्योजक.● १९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.● १९७१ - संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.💥मृत्यू● १९८९ - पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती, 24 तासात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हनुमान जन्मोत्सववेळी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढले; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाहेरील औषधं लिहून देण्यास पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात पंजाबचा राजस्थानवर पाच धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिन 07 एप्रिल - प्रासंगिक लेख *आरोग्यम धनसंपदा*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'म्हारी छोरिया छोरो से कम है के ?' हा संवाद कोणत्या चित्रपटातील आहे ?२) तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे मूळ नाव काय आहे ?३) आबेल पुरस्कार - २०२३ कोणाला जाहीर झाला आहे ?४) भारताचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते क्रिकेटपटू कोण ?५) राज्यघटनेच्या कितव्या तरतुदीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संसद वेळोवेळी कायद्याने ठरवेल तसेच वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार आहे ?*उत्तरे :-* १) दंगल २) तेंझिन ग्यात्सो ३) लुईस काफारेली ४) सलीम दुर्रानी ५) कलम १०६*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सय्यद रफिक👤 राजेश सुरकूटवार👤 मारोती कदम👤 दत्ताहरी कदम👤 पोषट्टी सिरमलवार👤 व्यंकट चन्नावार👤 लक्ष्मण दशरथ सावंत👤 अभिनंदन पांचाळ👤 सय्यद साजिद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापने ती धनाची॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुस-याच्या सहाय्याने जीवन जगणे म्हणजे एकप्रकारची गुलामीच आहे. कारण प्रत्येकवेळी तो म्हणेल त्याचपध्दतीने करावे लागणार.त्यामध्ये आपल्याला स्वत: काही नवे करण्याची इच्छा असेल तर ते काहीच करु शकत नाही. मग अशी गुलामी पत्करण्यापेक्षा केव्हाही मुक्तपणे स्वतंत्र राहणे चांगले.स्वतंत्रपणे राहून आपल्या मनातील अभिव्यक्तीला चालना देता येते, आपल्या संकल्पना साकार करता येतात, स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे आपल्या प्रगतीची दारे खुली असतात. आपल्या कोणत्याही सृजनशीलतेला बाधा येत नाही. आपल्याला मुक्तपणे जीवन जगण्याचा आनंद मिळतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रयत्नांती यश*थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.💥 जन्म :-● १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.● १९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९६५ - नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.💥 मृत्यू :- ● १६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले ● १९९१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी पाहिला नाही; वज्रमुठ सभेत अशोक चव्हाणांकडून तोंडभरून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, पॅन कार्ड व आधार कार्ड आवश्यक, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विंग कमांडर गजानंद यादव यांनी दहा हजार फुटीवर उंचीवर G-20 चा फडकावला झेंडा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारमध्ये होत असलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही - गृहमंत्री अमित शहा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाराव्या राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनाचे हेमंत काळमेघ यांच्या हस्ते बुलडाण्यात उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजस्थानने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. हैदराबादला पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटनस्थळे - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?२) 'आंबेडकर - ए लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणत्या वर्षी सुरू झाला ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) लेझरचा शोध कोणी लावला ?*उत्तरे :-* १) कचारगड गुफा, सालेकसा ( गोंदिया ) २) शशी थरूर ३) सन १९५४ ४) बुध व शुक्र ५) गार्डन गोल्ड*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रंगराव संभाजी वाकोडे, सहशिक्षक तळ्याचीवाडी ता. हदगाव👤 भागवत जेठेवाड, सहशिक्षक, बरबडा👤 चंद्रकांत शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 रंगराव वाकोडे👤 माधव शिराळे👤 आकाश पांचाळ👤 नागभूषण भूसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाच्या आयुष्यात पैशाला किती महत्व असावं? एकजण पैशाला आयुष्य समजतो. आयुष्यभर 'पैसा-पैसा' अशी त्याची हाव चालू असते. दुसरा गरजेपुरता पैशाला महत्व देतो. जास्त हाव न करता आवश्यक तेवढा पैसा कमावला तरी जीवन सार्थकी लागल्याची त्याची भावना असते. तर तिसरा 'आहे तेवढ्यात' समाधानी राहतो. पैसा नसला काय अन् असला काय, त्याला काही फरक पडत नाही. या तीनपैकीच आपण एक असतो. पैशाविषयी विरक्त न राहता 'उत्तम व्यवहाराने' तो कमावलाच पाहिजे. अशी काहीशी भूमिका संतांच्या विचारातून व्यक्त होते. एक म्हणजे 'भिक्षापत्र अवलंबणे । जळो जिणें लाजिरवाणे ।।' तुकोबा म्हणतात, "हातात भिकेचं ताट घेऊन भीक मागण्याचा मार्ग स्वीकारणे, अशा लाजिरवाण्या जगण्याला आग लागो."**तुकोबा म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेच करी ।।' म्हणजे, "पैसा कमवायचा पण वाईट मार्गाने नाही, तर उत्तम मार्गाने कमवायचा. आणि तो साठवून नाही ठेवायचा तर, आवश्यक तिथं मोकळ्या मनाने खर्च सुद्धा जरूर करायचा." मी ऐकलं आहे, की 'पैसा चांगल्या माणसाने कमावला नाही, तर तो वाईट माणसाच्या हातात जाईल आणि त्याचा दुरुपयोग होईल.' म्हणून तो चांगल्याच्या हातात असणे आवश्यक आहे.. पैशाने आईवडील विकत घेता येत नाही हे जरी खरं असलं, तरी पैशामुळं शक्यतो बरीच कामं सोपी होतात व पैशाला पैसा ओढतो हेही तितकंच खरं. तुकोबा म्हणतात, "श्रीमंताच्या घरी नोकर नाही तर त्याचा पैसाच ख-या अर्थाने त्याची चाकरी करत असतो." काम करणारी माणसे निमित्तमात्र असतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती प्रयत्नामध्ये माघार घेत नाही ती व्यक्ती आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकते.एखाद्यावेळी एखाद्या प्रयत्नामध्ये यश मिळेलच असे नाही, परंतु स्वातंत्र्याने प्रयत्न केल्यास यश मिळाल्यावाचून राहत नाही हे निश्चित आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विनम्रता*एक बार नदी को अपने पानी के प्रचंड प्रवाह पर घमंड हो गया।नदी को लगा कि मुझमें इतनी ताकत है कि मैं पहाड़, मकान, पेड़, पशु, मानव आदि सभी को बहाकर ले जा सकती हूँ।एक दिन नदी ने बड़े गर्वीले अंदाज में समुद्र से कहा - बताओ ! मैं तुम्हारे लिए क्या क्या लाऊँ ?मकान, पशु, मानव, वृक्ष आदि जो तुम चाहो, उसे मैं जड़ से उखाड़कर ला सकती हूँ।समुद्र समझ गया कि नदी को अहंकार हो गया है। उसने नदी से कहा यदि तुम मेरे लिए कुछ लाना चाहती हो तो, थोड़ी सी घास उखाड़कर ले आओ।नदी ने कहा बस ! इतनी सी बात ! अभी लेकर आती हूँ।नदी ने अपने जल का पुरा जोर लगाया पर घास नहीं उखड़ी। नदी ने कई बार जोर लगाया पर असफलता ही हाथ लगी।आखिर नदी हारकर समुद्र के पास पहुँची और बोली। मैं वृक्ष, मकान, पहाड़ आदि तो उखाड़कर ला सकती।जब भी घास को उखाड़ने के लिए पुरा जोर लगाती हूं तो वह नीचे की ओर झुक जाती है और मैं खाली हाथ उपर से गुजर जाती हूं।समुद्र ने नदी की पूरी बात ध्यान से सुनी और मुस्कुराते हुए बोला -जो पहाड़ और वृक्ष जैसे कठोर होते है, ये आसानी से उखड जाते है, किन्तु घास जैसी विनम्रता जिसने सीख ली हो, उसे प्रचंड आंधी तूफान या प्रचंड वेग भी नहीं उखाड़ सकता।*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फूल दिवस*💥 ठळक घडामोडी● १८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.● १९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.● १९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.● १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.● २००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.💥 जन्म :-● १५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.● १९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म● १९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.● १८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.💥 मृत्यू :-● एस.एम.जोशी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते, या वर्षात कार खरेदी महागण्याची चिन्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जळगावात जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही; राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात, 17 लाख कर्मचाऱ्यांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या निवृत्त अभियंत्याकडूनच न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 : पहिल्या सलामीच्या सामन्यात गुजरात टायटनचा चेन्नई वर सुपर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फुल दिवस*एप्रिल फुल म्हणजे काय ? ही प्रथा कोठे आणि कशी सुरू झाली ? ही माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/april-fool-day.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय रिझर्व बँक ( RBI )*भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती.संसदेत ६ मार्च १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीचा विस्तार करणे आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे दोन नवीन योजना सुरू केल्या. दोन नवीन योजनांमध्ये आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे.सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३० जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर होते. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.*भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत :*◆ भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.◆ भारताची गंगाजळी राखणे.◆ भारताची आर्थिक स्थिती राखणे.◆ भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आळस हा अशा चोर पावलांनीयेतो कि गरिबी त्याला सहजच गाठते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?२) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?३) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करतांना 'जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे ?४) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?५) मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?*उत्तरे :-* १) वड २) गुजरात ३) अण्णाभाऊ साठे ४) ५० मिनिटे ५) छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री हणमंतराव कंदेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड( 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा )👤 प्रकाश नांगरे, सहशिक्षक👤 चिं. शंतनू विजय भगत, वाशिम👤 चिं. अमोल गजानन पाटील, हिंगोली👤 गिरीश पांपटवार, धर्माबाद👤 स. सुरजितसिंघ पुजारी, नांदेड👤 दत्ता वंजे, साहित्यिक नांदेड👤 शीतल सांखे, साहित्यिक👤 पवन सुत्रावे👤 मंचक वाठोरे, वाशिम👤 हरिहर पाठक👤 रवि कोटूरवार, धर्माबाद👤 सतिश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील👤 दिगांबर जगदंबे👤 साईनाथ कंदेवाड, करखेली👤 अजय पेटेकर👤 शुभम मुतकुलवाड👤 कुणाल दिलीपराव सोनकांबळे👤 मनिषा जोशी👤 सदाशिव मोकमवार👤 विनायक भाई राजयोगी👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 शहाजी गोरवे👤 संध्या जिरोणेकर👤 नयनतारा किरण कुलकर्णी, खारघर, मुंबई👤 राम कोयलवाड, नांदेड👤 इंजिनिअर नागेंद्र अलीशेट्टी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन समाजप्रबोधन करीत संतानी इतिहास घडविला. सात-आठशे वर्ष उलटून गेली, तरी त्यांचे स्मरण सर्वदूर होते. भक्तीला ज्ञानाची जोड देऊन जे कर्म त्यांनी उभे केले त्याला 'नमस्कार' म्हणूनच हे स्मरण केले जाते. भक्ती प्रकट करण्यासाठी मनामध्ये आसावा लागणारा भाव संताच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो. म्हणूनच फकिरीतून उभे राहिलेले त्यांचे संतत्व शतकानुशके, पिढ्यानपिढ्या अढळ राहिले आहे. भवसिंधू पार करण्यासाठी संतानी घालून दिलेली भक्तीची पायवाट हा एक मानवी जीवनासाठी मार्गदर्शक असणारा भाव आहे.**प्रेम, ज्ञान, सुमार्ग, मनोरंजन, दया, क्षमा, शांती आणि आनंद हे सगळे रस्ते संतानी आखिल मानव जातीसाठी मोकळे करून दिल्यामुळेच माणसात देवत्व शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नव्या पिढीत काही लोकांनी केला. त्यामुळे अगणित जणांचे आयुष्य सुखकर झाल्याच्या गोष्टी आपण ऐकू वाचू शकतो. जीवन आनंदी असणे आणि कोरडे असणे यातला भाव एकदा कळला की, सुलभता, सोपेपणा वाट्याला येते. दु:ख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. पण त्या दु:खाला योग्य तो उतार मिळावा आणि प्राप्त परिस्थितीत परमानंदाने व्यापून जाणे यासाठी संताचा भक्ती-विचार आपल्याला पावलोपावली मदत करीत राहतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *_तात्पर्य_* *जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना.● १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.● १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.● २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.💥 जन्म :-● १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी 💥 मृत्यू :- ● २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग● २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक नवीन संसदेच्या इमारतीत अवतरले, कामाचा घेतला आढावा, संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, मराठवाड्यात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात, छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 694 रुग्णांची भर, 14 दिवसात तिप्पट रुग्णवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे ; द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयपील 2023 : चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये कांटे की टक्कर, आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचं यजमानपद काढून घेतलं, आशिया कप 2023 संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा कतार येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सैनिक : देशाचा संरक्षक*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हापूर*कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे.कोल्हापूर हे शहर व इथली माणसं ही मन जिंकून घेतात. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. श्री करवीर निवासिनी चे मंदिर खूप सुंदर आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला ?२) बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतांना व्याजदर द्यावा लागतो, त्यास काय म्हटले जाते ?३) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?४) भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?५) गीत सेठी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*उत्तरे :-* १) सन १९०१ २) रेपो दर ३) ५९ टक्के ४) सिक्कीम ५) बिलियर्ड्स*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राम शेवडीकर संपादक, उद्याचा मराठवाडा👤 वंदना गुरुपवार, नांदेड👤 गंगाधर बेलूरवाड👤 एस. जे. पल्लेवाड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद👤 सचिन अनमूलवाड👤 उस्मान चाऊस👤 वरद राजेंद्र चिंतलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले की, आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...तितक्यात,श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "पार्थ, आधी तू रथाच्या खाली उतर."त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला "अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? "तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, "युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस."त्याच प्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १८५७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.● १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.💥जन्म :- ● १९२९ : उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता💥मृत्यू :- ● १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.● १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.● १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ. या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के असेल व्याजदर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत होणार वाढ, पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत होणार वाढ. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर वाढणार बोजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीच्या मुदतीत वाढ , आता नवीन अंतिम मुदत 30 जून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे- अहमदनगर रेल्वे सुरु करा; प्रवाशांची मागणी, केंद्रीय रेल्वे समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या अखिल भारतीय रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले 'योग्य निर्णय'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बनावट औषध प्रकरण - केंद्र सरकारची मोठी कारवाई ! 20 राज्यातील 18 फार्मा कंपन्यांची मान्यता रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट. पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुन्या चालीरीती आणि कोरोना काळ*लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रीमती पुपुल जयकर*(११ सप्टेंबर १९१५: इटावा, उत्तर प्रदेश,- २९ मार्च १९९७ : मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेरअली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अपयशाच्या कठीण खडकाखालीचयशाच्या पाण्याचा झरा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तिबेटचा तिसरा धर्मगुरू म्हणून दलाई लामा यांनी कोणत्या ८ वर्षीय मुलाची निवड केली ?२) पहिले WPL ( वुमन प्रीमियर लीग ) चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?३) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते ?४) पृथ्वीचा आकार कसा आहे ?५) महाराष्ट्रात अपंगांसाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) मंगोलियन मुलाची २) मुंबई इंडियन्स ३) ७५ सदस्य ४) ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर ( जिओइड ) ५) नागपूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दुष्यंत भाऊ सोनाळे, नांदेड👤 पंकजकुमार पालीवाल, सहशिक्षक👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद👤 उदय पवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 धीरज कोयले👤 पिराजी शेळके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा रामनामे वदा पुर्णकामें। कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥ मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय."**'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च सापडतो.**'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प' हिच खरी 'घटस्थापना.'**हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा एक हसरा चेहरा इतरांसाठी खूप काही आनंद देऊन जातो. तुमच्या हस-या चेह-याकडे पाहून समोरच्या जीवनात कितीजरी दुःख असले तरी तो काही क्षण विसरुन तर जातोच पण दुसऱ्या क्षणी तो विचार करतो की,आपला रडका आणि पडका चेहरा करून राहिल्याने दु:ख थोडेच कमी होणार आहे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. आपल्या चेह-यामुळे तर आपल्यासह समोरचाही चिंतेत पडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा थोडा बहुत आनंदाला पारखा होतो एवढेच नाही तर त्याचा आनंद आपण हिरावून घेतल्यासारखा वाटतो. इतरांना आनंद देण्यापेक्षा आपण दु:खच देत आहोत आणि त्यांचे कारण आपणच आहोत असा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने कितीजरी दुःख असले तरी आपल्या चेहऱ्यावर थोडे तरी हास्य फुललेले असू द्यावे.©️ *व्यंकटेश काटकर,नांदेड* 9️⃣4️⃣2️⃣1️⃣8️⃣3️⃣9️⃣5️⃣9️⃣0️⃣🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ युक्ती ❃* सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली . *_तात्पर्य_* नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही .*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले● १९९२ : भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.● १९९८ : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणकदेशाला अर्पण केले💥जन्म● १८६८ : मॅक्झिम गॉर्की, रशियन लेखक.● १९२६ : पॉली उम्रीगर, भारतीय क्रिकेटर💥मृत्यू● १९८४ : स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.● १९९२ : आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.● २००० : शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहिली ते बारावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम NCERT बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात आत्तापासूनच जाणवू लागली पाणीटंचाई, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरीत समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर उंचीवर 'रामगड' नावाचा किल्ला आढळून आल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतही वाढता कोरोना! पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या, कोरोनाचा वेग वाढला! देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार, सुमारे दोन हजार नवे रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधार क्रमांक पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 अशी आहे. एक एप्रिल 2023 पासून लिंक नसलेले पॅन होतील निष्क्रिय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात घेऊ या काळजी* मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८ ते ४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल किंवा काळा गॉगल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक शाळांनी तयार करावे. काही दिवसांत शाळेतील परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *क्रिकेटपटू पॉली उम्रीगर*२८ मार्च १९२६ रोजी सोलापूर येथे पॉली उम्रीगर यांचा जन्म झाला. पॉली उम्रीगर यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडिलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९४४मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्या वेळी ते अठरा वर्षांचे होते. १९४८मध्ये भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. १९५५ ते १९५८ या काळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. १९६२ साली ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्या वेळी त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक म्हणजे ५९ कसोटी खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्या वेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण ३६३१ धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्या वेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. सुनील गावस्कर यांच्यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके उम्रीगर यांच्या नावावर होती.पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्विशतक ठोकले होते. पॉली उम्रीगर यांचे निधन सात नोव्हेंबर २००६ रोजी झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जीवनाचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दुःख भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२१ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोणाला प्राप्त झाला आहे ?२) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी किती असते ?३) पृथ्वीच्या परिभ्रमणचा कालावधी किती आहे ?४) 'उगवत्या सूर्याचे राज्य' असे कोणत्या राज्याला ओळखले जाते ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) आशा भोसले २) ५० सदस्य ३) ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ५४ सेकंद ४) अरुणाचल प्रदेश ५) गुरू *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वानंद बेदरकर, नाशिक👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत👤 कवी स्टीफन कमलाकर खावडिया👤 पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर👤 किरण कदम👤 प्रल्हाद धडे👤 रमेश राजफोडे👤 हर्ष प्रदिपकुमार मुक्कावार, उदगीर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*【माझ्या फेसबुक अकाउंटवरून वाढदिवसाची माहिती संकलित केली जाते. 】[ आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक वर follow करावे किंवा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखानंदकारी निवारी भयातें। जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥ विवेके त्यजावा अनाचार हेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ? बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!**कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?**" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्या चेह-यावरचे थोडे हास्य द्या कारण तुमच्या थोड्या स्मितहास्याने इतरांच्या जीवनात असलेल्या दुःखाचा विसर काही काळ दूर होऊ शकेल.जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्याकडे असणारे थोडे सहकार्य द्या की ज्या सहकार्यातून इतरांना जीवनात चांगले जीवन जगण्याचे बळ मिळेल.जर तुम्हाला द्यायचेच असेलतर थोडे प्रेमही द्यायला विसरु नका. कारण तुमच्या अंतःकरणातील प्रेमामुळे इतरांच्याजीवनात चैतन्यानेजगण्याची पालवी बहरेल.हाच तर तुमच्या आमच्या जगण्यातला माणुसकीचा खरा अर्थ आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’ *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक रंगभूमी दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.● २००४ : नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.💥जन्म● १७८५ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा💥मृत्यू● १८९८ : सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडमध्ये केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आव्हान, म्हणाले, तेलंगणातील शेतकरी कल्याणकारी कार्यक्रम आपल्या राज्यात राबवून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रोच्या सर्वात मोठ्या रॉकेटने 36 वनवेब उपग्रह यशस्वी झेपावले, सलग सहाव्यांदा दिमाखदार कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ; तीन जणांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानपरिषदेचे 125 तास तर विधानसभेचे 165 तास कामकाम; दोन्ही सभागृहात 17 विधेयके संमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई -सोलापूर वंदे भारत ट्रेन सुसाट; 32 दिवसांत 4.3 कोटी रुपयांची केली कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर कोरले आपले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्याच्या रंगभूमीवर आपण अनेक भूमिका वठवित असतो. कधी मुलगा म्हणून, कधी भाऊ म्हणून, कधी दिर म्हणून, कधी नवरा म्हणून, कधी वडील म्हणून, कधी काका म्हणून, कधी आजोबा म्हणून, कधी शिक्षक म्हणून, कधी लेखक म्हणून, कधी कवी म्हणून, कधी मित्र म्हणून अबब..... किती त्या भूमिका अगदी सहजपणे लीलया केल्या आहेत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा .......!~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर सय्यद अहमद खान ( ऑक्टोबर १७, १८१७ - मार्च २७, १८९८ ) हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरुवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.● हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हां इंग्राजांकडून किताब● १८६४ ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना● मोहमेडन अग्लो ओरियंटल स्कुलची स्थापना ● २७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही मिळविण्याच्या नादात मनुष्य बरेच काही सोडून देत असतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?२) ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड कशी होते ?३) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ? ४) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?५) गुगलचे संस्थापक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) एस. सोमनाथ २) थेट जनतेमधून ३) ३ लाख ८४ हजार किमी ४) विल्यम हर्षल ५) सर्जी ब्रिन व लॅरी पेज*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती गायत्री यनगंदेवार, सहशिक्षिका, धर्माबाद👤 स्वरुप सुंदरराज वैद्य, नांदेड👤 कल्याणकर साईनाथ, येवती👤 वैदेही चिलका👤 सुनील खंडेलवाल👤 धनंजय मांजरमकर👤 जगदीश्वर भूमन्ना जंगलोड👤 प्रमोद मोहिते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.**माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकटे राहून कधीच कोणते प्रश्न सुटत नसतात.त्यावर उपायदेखील सापडत नाही.उलट प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्याचा पश्चाताप स्वतःला फार होतो.पश्चातापाचे रुपांतर आपल्या मानसिकतेवर होऊन समोर येणा-या प्रश्नावरदेखील पर्याय शोधू शकत नाही.यासाठी आपल्या सर्व प्रश्नांसाठी कुणाचीतरी मदत घ्यावी लागते.आपल्या प्रश्नाचे उत्तर चर्चेतून किंवा कुणाच्यातरी सल्ल्यानुसार मिळू शकेल.म्हणून एकटे न राहता चार मित्रांच्या सहवासात,वडील माणसांच्या सहवासात आणि चार लोकांच्या समुहात राहणे पसंत करा.त्यामुळे तुम्हीसुखी,आनंदी, समाधानीव मानसिकदृष्ट्या संतुलीत राहाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’ *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.● अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.💥जन्म● १८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.● १९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.● १९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.💥मृत्यू● १९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वाराणसी इथे 1 हजार 780 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण व पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश केले जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेत 355 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी, 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'हाफ तिकीट'मुळे ताई, माई, आक्कांचा प्रवास जोरात; पुणे जिल्ह्यात 3 लाख महिलांनी केला एसटीतून प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *31 मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम ; आरबीआयने सर्व बँकांना रविवारी शाखा सुरु ठेवण्याचे दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गायिका आशा भोसले यांना सन 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची विजेती. कल्याणच्या वैष्णवी पाटीलवर प्रतीक्षाची मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1469220069871429&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत पुरुषोत्तम काळे ( वपु )*वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.व.पु.काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते. त्यांना निराशा आली होती.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात - व. पु. काळे*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'टायगर कॅपिटल' असे कोणत्या शहराला ओळखले जाते ?२) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार आजही किती टक्के लोक अशुद्ध पाणी पितात ?३) जपानचे पंतप्रधान कोण आहेत ?४) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप ( मलेरिया ) होतो ?५) आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला ?*उत्तरे :-* १) नागपूर २) २६ टक्के ३) फुमिओ किशिदा ४) प्लाझमोडियम ५) ग्रेगल मेंडेल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. यश जितेंद्र आमटे👤 राजेश बाहे, अमरावती👤 पिराजी चव्हाण, कृतिशील शेतकरी, धर्माबाद👤 सचिन पेटेकर👤 नेताजी चव्हाण👤 अनिल पेंटावार👤 भीमराव भुरे👤 अभिनंदन एडके, धर्माबाद👤 जगदीश उराडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजूबाजूला असलेल्या आणि एकसारख्याच दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी फरक दिसतो. काही लोक इतिहास वाचवण्यात वेळ वाया घालवतात, तर काही लोक इतिहास घडविण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. या दोघांतील फरक समजून घेणे, आपल्याला ही उपयोगी ठरू शकते. काही लोकांकडे असे काय वेगळे असते ? ज्यामुळे त्या लोकांना इतिहास घडविणे शक्य होते, या प्रश्नाचे उत्तर शोधावेसे वाटत असतेच. शांतपणे कधीतरी समजून घेतले पाहिजे. डोबळमानाने एक मानाने एक बाब एकसारखी दिसते म्हणजे, त्या काही लोकांमध्ये जिद्द आणि चिकाटी भरपूर असते, तेच लोक इतिहास घडवत असतात. शिवाय, तो दृढनिश्चय टिकवून ठेवणे आणि विकसित करणे, हे खूप कठीण काम ते करत असतात, कारण तीच योग्य पद्धत असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे लोक इतरांपेक्षा यशस्वी झालेले दिसतात. ते लोक कधीकधी इतरांवर रागावलेले असतात. हा राग येणेदेखील आपल्यासारखेच असते. पण एक छोटासा फरक असा असतो की, या काही लोकांनी त्यांना आलेल्या रागाचे रूपांतर हे संकल्पात केलेले असते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.💥जन्म● १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया, भारतीय समाजवादी नेते● १९२६ : रविंद्र पिंगे.● १९७६ - स्मृती इराणी, अभिनेत्री व माजी केंद्रीय मंत्री● १९८७ - कंगना राणावत - अभिनेत्री💥मृत्यू● १९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.● २००८ - मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील● २०२२ - भारताचे ३५ वे सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या', कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत पंतप्रधानांच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांना एसटी नंतर खाजगी बसमध्येही 50 टक्के सूट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी, महिला प्रवाश्यानी केले निर्णयाचे स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणताही संप किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 4 दिवस पावसाची शक्यता, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 28 एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत, राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएलनं महत्त्वाचा नियम केला लागू, आता नाणेफेकीनंतरही ठरवता येणार प्लेईंग 11*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1939782872815144&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिन*जगभरात आज २३ मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन पाळला जातो. WMO ची निर्मिती १९५० मध्ये झाली आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यात मदत करण्यासाठी बरेच काही उपक्रम केले आहे. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे १९१ सदस्य देश आणि प्रदेश आहेत. ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यास मदत करते जेणेकरून लोकं त्यांच्यासाठी तयार होऊ शकतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या नियतीचे मालक बनापण परिस्थितीचे गुलाम बनू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक हवामान दिवस - २०२३ ची थीम काय आहे ?३) 'जागतिक हवामान संस्था'चे मुख्यालय कोठे आहे ?४) जागतिक हवामान संस्था केव्हा स्थापन झाली ?५) जागतिक हवामान दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?*उत्तरे :-* १) २३ मार्च २) जागतिक अन्न प्रणालीला समर्थन देणारी मोजमाप ३) जिनेव्हा, स्वित्झर्लंड ४) २३ मार्च १९५० ५) १९६१*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त हिंदी शिक्षक👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद👤 साईनाथ सुत्रावे, माध्यमिक शिक्षक👤 साईनाथ मुलकोड, येवती 👤 विनायक नरवाडे👤 नरसिंग यमेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ धरीं रे मना आदरें प्रीति रामी। नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.**कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव, समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात. हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही. यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस*तात्पर्य –* लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक वनदिन* *पृथ्वी दिन**जागतिक कटपुतली दिन**जागतिक कविता दिवस*💥ठळक घडामोडी● १९७१ - जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिले वहिले शतक, ११६ धावा.● १९९२ : भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली● रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे● २००३ - जळगाव नगरपालिकेची स्थापना💥जन्म● १८४७ - बाळाजी प्रभाकर मोडक● १९१६ : बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.● १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.💥मृत्यू● १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष● १९७३ - नटवर्य शंकर घाणेकर● १९७३ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार२००५ - दिनकर द. पाटील, दिग्दर्शक● २०१० - अर्थशास्त्रज्ञ बाळ गाडगीळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान ; नांदेड जिल्ह्याला मोठा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार, अडीच लाख सरकारी पदं भरणार; राहुल गांधींची कर्नाटकात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मंदीची चाहूल... मेटा कंपनीनंतर अमेझॉनमध्ये मोठी कर्मचारी कपात, 9,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 मार्च रोजी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडिया जिंकून मालिकेवर कब्जा करेल का ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने एक काव्य रचना *।। कविता ।।*शब्द हेच धन शब्द हेच मनशब्दामुळेच जिवंत आहे तनकवितेतील शब्द बोलाविते मलाकवितेतील शब्द जागविते मलाकवितेमध्येच गुंतला माझा प्राणकवितेनेच दिलाय मान सन्मानकविता आहे म्हणून मी आहेकवितेसाठी माझा जन्म आहेकवितेमुळे माझी ओळख झालीयाच कवितेने मला प्रसिद्धी दिलीकवितेने मला नेले सातासमुद्रापारकवितेनेच वाढविला माझा परिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक वन दिवस (International Day of Forests) दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे. जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे. तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. जंगल वाचविणे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टरबूजमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) टरबूजचा उगम कोठे झाला ?३) टरबूजला मराठीत काय म्हणतात ?४) टरबूज खाण्याचे फायदे कोणते ?५) टरबूजला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) जीवनसत्त्व C, A, B6 २) इजिप्त ( आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटात ) ३) कलिंगड ४) रोगप्रतिकार शक्ती वाढते, मन प्रसन्न, हृदयरोगावर प्रभावी etc. ५) Watermelon*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनय चव्हाण, उमरखेड, यवतमाळ👤 प्रकाश सालपे, यवतमाळ👤 श्रीधर बिरादार, अचवला👤 पेंडेला अनिल, चिंचालम, तेलंगना👤 शिवा गुडेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना। अती काम त्या राम चित्ती वसेना॥ अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा। अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अंगी नम्रता असणे, मधुर बोलणे, सत्याचा मार्गावर चालणेआळसाचा त्याग करणे व कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. जर ह्या गोष्टीपासून दूर झाले तर जीवनात यश मिळणे कठीन होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃* *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले. घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्याने पाहणार्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !' *_तात्पर्य_* *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागणी जुन्या पेन्शनची👏👏👏👏👏👏 जुनी पेन्शनजगावे कसे?निवृत्तीनंतरनसेल कोणता आधारपेन्शनविना जीवन आमुचेविचार कराना सरकार 😴सरकार मायबाप तुम्हीच आमुचेनका सोडू आम्हास असे वाऱ्यावर......वृद्धपणी काय होईल?कसा पोसावा आम्ही परिवार 👩👩👧👧निवृत्तीनंतरचे दिवस कसे?पेन्शन विना निघणार!आयुष्यभराचे श्रम आमचेसांगा तुम्हा कधी दिसणार? 😎पंधरा वर्षापासून करतो मागणीआम्ही जुन्या पेन्शनचीसंपावर जाण्याची वेळ ही का हो तुम्ही आणायची?🤔देह आमचा परावलंबी सरकार कसे समजेना तुम्हाला पेन्शन आमच्या हक्काची द्यावीच लागेल आम्हाला ✊✊✊✊✊✊वयाच्या आमच्या येईल साठीहाती येईल ओ आमच्या काठीम्हणूनच लढतोय आम्ही सारेजुन्या पेन्शन साठी जुन्या पेन्शन साठी🤝🤝🤝🤝🤝🤝➖➖➖➖➖➖➖✍️ स्वरचित श्रीमती प्रमिला सेनकुडे(स.शि./कवयिञी)ता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक दिव्यांग दिन*💥 ठळक घडामोडी● १९९७ - मुंबईत ए सी टॅक्सीला सुरुवात💥जन्म● १९०९ - भाषातज्ञ रामचंद्र दांडेकर● १९१० - समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ● १९६२ - भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला💥मृत्यू● १८८२ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.● १९३७ - बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे● १९५७ - रॅमन मॅगेसेसे फिलिफाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष● १९५६ - नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आयरीन क्युरी● २०१९ - गोव्याचे दहावे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना बाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चौथा दिवस, राज्यभरात आज ढोल बजाओ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानपरिषदेत आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही, सरकारने देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना दिला मोठा दिलासा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात; पंतप्रधानांच्या हस्ते 'जानेवारी 2024च्या तिसऱ्या आठवड्यात स्थापन होणार मूर्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकीकडे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सीरिजला मुंबईत आजपासून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ?२) बॉर्डर - गावस्कर चषक २०२३ चा मालिकावीर कोणी पटकावला ?३) महात्मा गांधीजींची फोटो कोणत्या वर्षी नोटांवर छापण्यात आली ?४) मगरला किती दात असतात ?५) नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) मिशेल योह २) रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा, भारत ३) १९९६ ४) ८० दात ५) नेफ्यू रियो *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाराम उर्फ बाबू गुरुपवार, तळणी, बिलोली👤 किशन आसमोड👤 प्रतिक जाधव👤 अमरसिंह चौहान👤 अंगद मारोती कांडले👤 जयानंद मठपती👤 विलास पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संत राबियासंत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली●२००१ - नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान२००० - हॉकीपटू धनराज पिल्ले यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर💥जन्म● १९०१ - पी. बी. गजेंद्रगडकर, भारताचे सातवे सरन्यायाधीश● १९३६ - चित्रकार प्रभाकर बर्वे● १९३६ - संगीतकार भास्कर चंदावरकर💥मृत्यू● १९४५ - गणेश दामोदर सावरकर, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक● १९९० - वि स पागे, रोजगार हमी योजनेचे जनक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस, संपामुळे राज्यतील आरोग्य सेवा झाली विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले, देवेंद्र फडणवीस यांची दिलगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रद्दी विक्रीतून सरकारने कमावले 63 कोटी रुपये, 12 लाख चौरस फूट जागाही झाली रिकामी; सरकारची लोकसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान, पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत ऊर्जामंत्री आर के सिंह यांची राज्यसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंदगड आणि आजऱ्यात काजू फळ विकास योजनेसाठी 1,325 कोटी रुपयांची तरतूद; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची सुधारणा तर गोलंदाजीत आर. अश्विन अव्वल स्थानावर कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार*‘पाचशे रूपयाची लाच घेताना अमूक कर्मचा-यांस अटक’ अशा आशयाच्या बातम्या आत्ता रोजच वर्तमानपत्रातून प्रकाशित होत आहे. कदाचित अशा बातमी शिवाय त्या दिवशीचे पेपर पूर्णच होत नसेल! राज्यात कुठे ना कुठे अशी घटना घडतेच. कारण आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत चालला आहे. तसेच भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी मागे-पुढे अजिबात कसलाही विचार न करता इतरांसोबत वागत असतात. सरकारी कर्मचारी त्यास शासनांकडून त्यांच्या कुटूंबाचे पालन पोषण होईल, एवढा पगार मिळतो. तरी सुद्धा त्यांची पैसा कमाविण्याची लालसा काही केल्या कमी होत नाही. मिळेल त्या पगारात जी व्यक्ती समाधानी असते त्याला कुठेच भ्रष्टाचार करण्याची गरज भासत नाही. असे म्हटल्या जाते की, आडमार्गाने कमावलेला पैसा कसा येतो आणि किती येतो हे जसे कळत नाही तसे गेल्याचे सुद्धा कळत नाही. कारण या पैश्यांसाठी आपल्या शरीरातील घाम गळत नाही. घामाचा पैसा असेल तर त्याचा हिशेब सुद्धा लागतो. आजकाल झटपट पैसा मिळविणे आणि आपले जीवन सुखी समृद्ध बनविण्यासाठी प्रत्येकजण आपली नैतिकता वेशीला टांगून अनैतिक कृत्य करीत आहेत. भ्रष्टाचाराची सुरूवात घराच्या दारांपासून सुरू होते ते थेट मंत्रालयाच्या दारात जाऊन पोहोचते. या दरम्यान अनेकांची दारे लागतात, त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार दृष्टीस पडतो. म्हणजेच भ्रष्टाचाराची सुरूवात स्वत:पासून करावी लागते. स्वत:पासून मग तो स्वत: खासदार असेल, आमदार असेल, उच्चपदस्थ अधिकारी असेल, साधा कर्मचारी असेल किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल, त्यांनी भ्रष्टाचार करणार नसल्याचे जर ठरविले तर याचा नायनाट होऊ शकतो. महात्मा गांधीजी म्हणतात की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून करण्यात यावी. आपण मात्र इतरांकडे बोटं दाखवितो. त्यामुळे कामाची सुरूवात होतच नाही. या भ्रष्टाचाराला सुरूवात अगदी सहजपणे होते, तेव्हा आपणाला असे वाटत सुद्धा नाही की, माझ्यामूळे या भ्रष्टाचाराला सुरूवात झाली. एका कार्यालयातील काम संबंधित कर्मचा-याने अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण करून आपल्या हाती दिल्यानंतर आपल्याला आनंद होणारच. मग त्या आनंदाच्या भरात आपण त्या कर्मचा-याला ‘चला एक कप चहा घेऊ या’ असे म्हणणार. कर्मचारी ही मग आपली टेबल व खुर्ची सोडून चहा पिण्यास जाई. येथूनच मग सुरू होतो ‘चहा-पाण्याचा खर्च’. काही ठिकाणी यापेक्षा वेगळा अनुभव असेल ही कदाचित. परंतु व्यक्ती आपल्या कामाला जेव्हा सुरूवात करतो तेव्हा त्याला कामाची जाणिव अधिक प्रमाणात असते. मात्र जसे जसे सेवा वाढत जाते आणि त्या क्षेत्रात रूळले जातात तसे तसे कामाला प्राधान्य देण्याऐवजी ‘चहा-पानाला’ प्राधान्य देत असतो. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की, भ्रष्टाचाराला सुरूवात कोणी केली, आपण की कर्मचा-याने. प्रत्येक विभागात याचे वेगवेगळे अनुभव येतात जर यदा कदाचित लाच न घेणारा अधिकारी कार्यालयाला भेटला तर त्याचे जीवन हे लोक तंगवून टाकतात. त्याच्यावर वेगवेगळ्या स्तरांवरून दबाव टाकल्या जाते आणि प्रामाणिक असलेल्या कर्मचा-यास सुद्धा या भ्रष्टाचाराच्या खाईत ओढल्या जाते. त्यांची ईच्छा नसतांना सुद्धा जेव्हा भ्रष्टाचार करण्याची पाळी येते तेव्हा त्यांना स्वत:ला पश्चाताप वाटत असेल ही कदाचित परंतु काहीच करता येत नाही. राज्यात असे ही काही विभाग आहेत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार न करणे एकप्रकारे अप्रामाणिक समजल्या जाते. लाच घेणारा व्यक्ती कामाचा निपटारा तात्काळ करतो, हे सत्य आहे. भ्रष्टाचाराची कीड समाजाला लागली आहे. ती कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपल्यात बदल करावा लागेल. माझ्या कामांसाठी मी एक ही रूपाया न देता काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. मग त्यासाठी दहा वेळा चकरा मारले तरी चालेल असा विचार केल्यास यात बदल होऊ शकतो. एखाद्या कर्मचा-यास लाच लुचपत विभागात पकडून दिल्याने समाजातील ही भ्रष्टाचाराची कीड नष्ट होणार नाही. या गुन्ह्यातून सुद्धा अनेक लोक सुटतात त्यामूळे यावर सुद्धा लोकांचा आज विश्वास कमी होत चालला आहे. शेवटी जाता जाता एक बाब सांगावेसे वाटते की, ज्या दिवशी एखाद्या गोष्टीत भ्रष्टाचार करून आपण पैसा कमाविला असेल त्या रात्री आपणांस गाढ झोप लागते का? जर झोप लागत नसेल तर आपण कमाविलेले लाखो रूपये काही कामाचे नाहीत. कारण त्या पैशातून झोप विकत घेता येत नाही. इकडे प्रामाणिक काम करणा-या व्यक्तीला पैसा कमी मिळत असेल परंतु रात्री समाधानाने झोप लागते. त्यासाठी झोपेची गोळी घ्यावी लागत नाही. यावरून प्रत्येकाने विचार करावा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी स्वत: पहिले पाऊल उचलावे, याशिवाय भ्रष्टाचार संपविणे शक्यच नाही. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर*बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक व हिंदुमहासभेचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी दामोदर व राधाबाई या सुशिक्षित दाम्पत्यापोटी भगूर (नाशिक जिल्हा)या गावी सनातन वैदिक कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते. पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी (१८९२) ते तेरा वर्षांचे होते, तेव्हा दामोदरपंतांनी बाबांचे लग्न करण्याचे ठरविले आणि यशोदा या मुलीबरोबर ते विवाहबद्घ झाले (१८९६). वडिलांच्या मृत्यूनंतर (१८९९) घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला.विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नाशिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती. त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. येरवड्याच्या (पुणे) तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. ते आजारी पडले. पुढे त्यांची रवानगी अंदमानातील तुरुंगात झाली.अंदमानच्या तुरुंगातून या बंधूद्वयांची १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर १९२२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इ. कार्य चालू होते. औषधोपचारासाठी बाबा बनारसला जात असत. बनारसच्या बाबारावांच्या मुक्कामात तेथील विद्यापीठातील गोळवलकर गुरुजी, भय्याजी दाणी, तात्या तेलंग वगैरे दिग्गज मंडळी भेटत असत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची भ्रमंती चालू होती. त्यांनी महात्मा गांधींची १९३० मध्ये भेट घेऊन सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी विनंती केली होती. मुंबईला एंपायर चित्रपटगृहात बाँबस्फोट झाला. त्याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बाबारावांना अटक झाली (१० एप्रिल १९३३). या बाँबस्फोटाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता हे सिद्घ होऊनही त्यांना नाशिक येथे स्थानबद्घ करण्यात आले. १८ मे १९३७ रोजी बाबांची बिनशर्त सुटका झाली पण व्याधिग्रस्त शरीरामुळे त्यांना अखेरपर्यंत वेदनांशी सामना करावा लागला. अखेर १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान काहीही कामाचे नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? ४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) २ - १ ने २) एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स ३) कर्नाटक ४) दुसरा ५) कोनराड संगमा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. सुरेश तेलंग, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 कैलास राखेवार, नांदेड👤 अनिलकुमार जैस्वाल, धर्माबाद👤 शिवम भंडारे, धर्माबाद👤 अनिल कांबळे, नांदेड👤 मुरली ईबीतवार👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.**जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाते असे तयार करा की, ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे. जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आपुलकी इ. गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यशस्वी क्रियाशीलता*ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !' प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता ! उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे! यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक ग्राहक हक्क दिन*💥 ठळक घडामोडी● १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना💥जन्म● १८६५ - आनंदी गोपाळ जोशी💥मृत्यू● १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.१९९२ - डॉ. राही मासुम रझा, उर्दू कवी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संपकरी कामगारांवर कारवाई करणारा मेस्मा कायदा संपुष्टात आल्याने हा कायदा पुनर्संचयित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आणि चर्चेविना मंजूर ही करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोना महामारीच्या काळात थांबवण्यात आलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणार नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमेरिकेत आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने आता तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढली, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हिंसाचारामध्ये गेल्या 12 वर्षात 77 टक्क्यांची घट झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचं निधन; बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान*जीवनात सुखी राहायचे असेल तर सर्वप्रथम समाधान राहायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी निव्वळ धावपळ करून काही फायदा नसतो. धावपळ मध्ये कधी कधी थोडा वेळ घरातल्या लोकांसाठी, नातालगासाठी, मित्रांसाठी काढले की भरपूर सुख मिळते आणि तेथेच समाधान मिळते. ही गोष्ट जर पैश्याने मिळाली असती तर श्रीमंत लोकांएवढे समाधानी कोणीच राहिले नसते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769नियमित ही पोस्ट मिळविण्यासाठी या समुहात add व्हावे. त्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागो ग्राहक जागो*वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क प्रदान केले. त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. *ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी*● फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.● वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.● वस्तू खरेदी करताना बिल मागावे.● सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.● डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.● वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.● पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.● ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.● ~वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात लांब रेल्वे फ्लॅटफॉर्म कोणता ?२) सफरचंदांमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?३) घड्याळचा शोध कोणी लावला ?४) चीनच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली ?५) कोणता मासा हवेत उडतो ?*उत्तरे :-* १) हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक ( १५०७ मी लांब ) २) 'अ' जीवनसत्त्व ३) पिटर हेनलेन ४) ली कियांग ५) गरनाई मासा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेंद्र महाजन, औरंगाबाद👤 विलास फुटाणे, औरंगाबाद👤 शुभम सांगळे👤 लक्ष्मण चिंतावार👤 अंबादास पवार👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 बालाजी मामीलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु। निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।**तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!**इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सामान्य माणसांच्या निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली तरी त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे एखादे हाती घेतलेले काम चांगल्याप्रकारे न होणे. त्यामुळे मनावर खूप ताण पडतो आणि मनाची चलबिचल अवस्था निर्माण होऊन निद्रानाश होतो.त्यासाठी हातात काम घेण्यापूर्वी कामाचे नियोजन करावे.कामाचावेळ आणि त्यासाठी लागणारे कौशल्य यांची सांगड घालावी व त्या कामात मन एकाग्रतेने ठेऊन त्यात सातत्य ठेवले तर हातातले काम उत्कृष्ट होते आणि मनाला समाधानही वाटते.एकदा का मनाला समाधान वाटले की, मग शांत झोप लागते.झोप ही ठराविक वेळेत झाली तर आरोग्यही चांगले राहते.त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.पुढे येणारे कामही तितक्याच अधिक गतीने होण्यास मदत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला! *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली💥 जन्म :-१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्नाटकच्या जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करणार, बंगळुरू-म्हैसूर महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा क्रांतिकारी प्रयोग, नितीन गडकरींच्या हस्ते बारामतीत गोवंश गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेत काँग्रेसकडून व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील, तर गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ, शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND vs AUS 4th Test : विराट कोहलीची दमदार 186 धावांची खेळी, शुभमनचं शतक, 571 धावा करत भारताची 91 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोपीनाथ गणेश तळवलकर*गोपीनाथ गणेश तळवलकर (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेल - एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या शेवटच्या डब्याच्या मागे क्रॉस किंवा इंग्रजी अक्षर X असे का लिहिले असते ?२) पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर कोण आहे ? ३) कांदा उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?४) असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ?५) जागतिक श्रवण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) संबंधित गाडी पूर्णपणे सुरक्षित समोर गेलेली आहे असा संकेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळतो. २) मारव्हिया मलिक ३) दुसऱ्या ४) किवी पक्षी ५) ३ मार्च *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भगवान शंकरराव कांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 रुस्तुम शेख, नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 राजेश कवडे👤 साईनाथ बोंबले👤 लक्ष्मण वडजे👤 कामाजी धतुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनाचा दयाळू मनाचा मवाळू। स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥ तया अंतरी क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा,भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.'तात्पर्य :- जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित● २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन💥जन्म● १९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज💥मृत्यू● १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेन्शन योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असं आवाहन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *युद्ध संपवण्यासाठी पुतिन अणुबॉम्बचा वापर करू शकतात; अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात 30 एप्रिलपर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी; शहरात कलम 144 लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकऱ्याला जात विचारु नये, राज्याच्या कृषी विभागाचं केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातून मका निर्यातीत मोठी वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अश्विनचा विकेटचा षटकार, ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपला, भारताची आश्वासक सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - राजू आणि कुत्र्याचे पिल्लू*http://nasayeotikar.blogspot.com/2021/05/02052021-dogs-story.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विजय हजारे*विजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये २३८ सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावांचा पाऊस पाडला. या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा भारतीय धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला.प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी 'द हिंदूज' विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती.ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली.कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे.*विजय हजारे यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला.*हजारे हे मितभाषी असल्यामुळे, भारताने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त 'शाब्बास' म्हणाले.कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या.तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडित मानू लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची एक संधी होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे पार पडत आहे ?२) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?३) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन कोण करत आहे ?४) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?५) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) ११ ते १२ मार्च २०२३ ३) इको - प्रो संस्था, चंद्रपूर ४) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक ५) डॉ. जयंत वडतकर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रलोभ माधवराव कुलकर्णी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि प हा वाघी जि. नांदेड👤 संतोष देवणी कर, देगलूर👤 भाऊसाहेब उमाटे, लातूर👤 विजयकुमार नागलवार, नांदेड👤 संदीप सूत्रावे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 विशाल इंगळे👤 नरसय्या गैनवार👤 जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'दिव्यांना' भारतीय संस्कृतीत खूप महत्व असल्यामुळे अनेक मंगल कार्याच्यावेळी त्यांची पूजाही केली जाते. आमावस्येला घरातले सर्व दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहिलं जातं. घरभर दिवे लावले जातात. घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशमान होऊन दारिद्ररूपी, अज्ञानरूपी अंधार दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी या पाठीमागे भावना असते.* *कोणताही सण-समारंभ असो वा जन्म किंवा मृत्यूचा प्रसंग, दिव्याचं आपल्याशी घट्ट नातं जडलेलं आहे. धर्म, जात कोणतीही असो, दिवा ज्योतीच्या रूपाने असेल किंवा मेणबत्तीच्या रूपाने, तो पुजनीय मानला जातो.* *दिव्यांचे जवळजवळ 250 प्रकार आहेत. दिवे लावताना या दिव्यांचा दैदिप्यमान इतिहास खचितच कोणाला माहित असेल. तो समजून घेऊन जपला तर हा तेजाचा, प्रकाशाचा प्रवास एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाण्यास आपलाही हातभार लागेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे सुगंधी फुले आपल्या सुगंधाने इतरांच्या मनाला आपल्याकडे आकर्षित करून मोहीत करतात.त्याप्रमाणे सज्जन माणसेदेखील आपल्या सद्विचाराने आपल्याकडे आकर्षित करून आपल्या सानिध्यात असलेल्या इतरांच्या जीवनाचा कायापालट करतात. सज्जनांच्या सहवासात राहिले तर आपलेही जीवन सन्मार्गी लागेल व आपल्या जीवनाला एक चांगली नवी दिशा मिळेल. ज्यामुळे आपली प्रगती होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. *तात्पर्य*"माणसाने अपमान तात्काळ विसरून जावे आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.१९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.💥 जन्म :-१९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.१९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.💥 मृत्यू :- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.१९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा देण्याचा दिला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढणार, कोकणात उष्णतेच्या लाटेचा भारतीय हवामान विभागाने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्यासंदर्भातील शासन निर्णयात शिक्षण विभागाने केला बदल, आता इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4,640 सदनिका आणि 14 भूखंडसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरू, 10 मे रोजी सोडत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *WPL :- जेन जोनासनची अष्टपैलू खेळी, दिल्लीचा युपी वॉरिअर्सवर 42 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *संस्कारमोती चॅनल*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎁 *सावित्रीबाई फुले जयंती, जि प प्रा शा कासारखेडा*🎁*व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/7BkmAYy2aGo~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?*उत्तरे :-* १) भारत ( २,९६७ ), रशिया ( ४३३ ), इंडोनेशिया ( ३७१ ) २) संयुक्त राष्ट्र संघ ३) डॉ. भालचंद्र नेमाडे ४) तुंग ५) सूर्यास्ताच्या वेळी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे 👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.**संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *१९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन*💥ठळक घडामोडी● १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.● १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥जन्म● १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे● १९२१ - साहीर लुधियानवी, हिंदी गीतकार.● १९२८ - वसंत अनंत कुंभोजकर, मराठी लेखक.● १९३० - चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.● १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९८९ - हरमनप्रीत कौर, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू💥मृत्यू● १९५७ - बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर, स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री● १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोदावरी नदीवरील डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान, कोपरगाव तालुक्यातील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, एकट्या नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, धुळ्यातही गारपिटीने पिकांचं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान ; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासून तयार राहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सूचक इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *PCB ने पुन्हा केली BCCIची कॉपी! आता पाकिस्तानमध्ये वुमन्स लीगचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने ........*कविता, लेख आणि लघुकथा* वाचा खालील लिंकवर ---http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/world-women-day.htmlसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎁 *प्रसिद्ध महिला प्रश्नमंजुषा- महिला दिन विशेष माहिती*🎁*व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/FpDuS4HGmyM?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिन विशेष*● क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.★ याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.★ यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.★ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.★ त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.★ त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.★ भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.★ महिलांना सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले★ १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली, पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’◆ 2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. ★ काही देशात जसे की, बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? २) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?*उत्तरे :-* १) प्रमोद चौगुले ( सलग दोनदा प्रथम क्रमांक ) २) मराठी ३) गरूड ४) फायलोक्विनोन ५) पुणे*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद👤 साहेबराव बोने, देगलूर👤 शरणप्पा नागठाणे👤 शिवाजी पटारे👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 श्रीनिवास भुतावळे👤 साई पेंटर नुतिवाड👤 संभाजी पाटील👤 विकास खानापूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.**ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रस्ता कोणताही असो तो कधीच कुणाला चुकीच्या दिशेकडे घेऊन जात नाही.चुकतो तो आपण..!आपल्या मनात जे काही विचार असतील त्या विचारानुसार आपण रस्त्यावरुन जातो.मग तुमच्या त्या विचारात चांगले किंवा वाईटही विचार असू शकतील.मग त्यात रस्त्याचा काय दोष ?दोष तर आपलाच आहे ना ? मग केव्हाही चांगले विचार मनात आणून जीवनाला समृद्ध करायचे असेल तर तुमचा कोणताही रस्ता तुमच्या चांगल्याच ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो.तो निरंतर तुम्हाला तुमच्या चांगल्या ध्येयाकडेच जा म्हणून सांगतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तृप्तता*प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.*तात्पर्य*तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १८९६ : पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन● १९५२ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.● १८६९ : दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.💥जन्म● १८९९ - शि.ल. करंदीकर, मराठी लेखक● १९६५ - देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका💥मृत्यू● १९६८ - नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक● १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील नऊ विरोधी पक्षनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप, राज्यपालांच्या भूमिकांवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण म्हाडाची 4,752 घरांची लॉटरी, 8 मार्चपासून अर्जविक्री तर 10 मे रोजी सोडत, विरार-बोळींजमध्ये तब्बल 2 हजार 48 घरांची होणार विक्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *होळीपूर्वी बरसाना-जयपूर शहर जल्लोषात तल्लीन; लाठमार-रासलीला रंगोत्सव उत्सवात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *WPL 2023 - मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच सामन्यात 143 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वूमेन्स प्रीमियर लीग तरुणींना प्रेरणा देईल, त्यांची स्वप्न सत्यात उतरवेल: नीता अंबानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Class-2nd, 4.7 Croosing the Road -poem**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jfK_3KyfiVY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पळस, होळी आणि धुलिवंदन*होळीची चाहूल म्हणजे आजूबाजूच्या परिसरात फुललेला पळस. पळसाची फुले आपल्या विशिष्ट रंगामुळे सर्वाना आकर्षित करत असतात. मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली की शेतात आणि जंगलात पळसाच्या झाडाला अनेक फुले दिसू लागतात. असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळातील माणसे ही पळसाची फुले एकत्र करून त्याचा रंग तयार करीत असत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हा रंग टाकून धुलीवंदनाचा सण साजरा करीत. परंतु काळ बदलत गेला तसा लोकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज या पळसाच्या फुलांकडे लोकांचे फक्त लक्ष जात आहे मात्र त्याचा रंग म्हणून कोणी वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगाचा वापर आज केल्या जात आहे, ज्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याचा धोका देखील संभवत असतो. काही महाभाग मंडळी वोर्निश कलर ही वापरतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मित्रा-मित्रात हा खेळ खेळताना कोण कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही. एकमेकांवर अंडे फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी होतात. अंड्याच्या उग्र वासामुळे रंगाचा खेळ बेरंग होऊ शकतो. म्हणून सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा केल्यास ते सर्वासाठी सोईस्कर होईल. सायंकाळच्या कातरवेळीशेतात करूया मुक्त विहाररखरखत्या वातावरणातपाहू पळस फुलांचा बहार*झजरी दादा, झजरी दादा*फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनीला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळीचा सण जवळ आलेला असायचा. होळीच्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे हार प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळीच्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पाराजवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळीतील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढीची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रामध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते.*धुलिवंदन:-*होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मनातील राग, द्वेष इत्यादी भावनाना मोकळी वाट करून देण्यासाठी हा सण अत्याधिक महत्वाचा आहे. एकीकडे मुले रंगात न्हाऊन निघतात तर याच दिवशी कुमारिका मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात आणि त्यांच्याकडून भेट म्हणून धान्य किंवा पैसे घेतात. घरात काम करणारे जे काही कामगार मंडळी असतात ते देखील खुशाली मागतात आणि घरधनी त्यांना खुशाली देऊन खुश करतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दरवेळी सण येतात नि जातातएकमेकांत प्रेम निर्माण करतातसणाचे महत्व समजून घेतले तरप्रत्येक सण सदा आनंदच देतात.*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.*- नासा येवतीकर, संयोजकफ्रेश मॉर्निंग बुलेटिन 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात एकूण किती वन्यजीव अभयारण्य आहेत ?२) ऑस्ट्रेलियाने महिला टी - २० क्रिकेट विश्वचषक कितव्यांदा जिंकले आहे ?३) 'प्रति शिवाजी' कोणाला म्हटले जायचे ?४) भारतातील सर्वाधिक अंडे उत्पादन करणारा राज्य कोणता ?५) सांचीचा स्तूप कोणी बनवला ?*उत्तरे :-* १) ५६५ २) सहाव्यांदा ३) नेताजी पालकर ४) आंध्रप्रदेश ५) सम्राट अशोक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक दगडे, सरपंच, चिरली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे। न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥ करी सुखसंवाद जो उगमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.**संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळेचे भान ठेऊन व कामाची गती पाहून किती आपण हाती घेतलेल्या कामात किती मेहनत घ्यायची हे आपण ठरवावे.कारण आपल्या कामाचा उत्कृष्ट दर्जा हा वेळ आणि काम यांच्यावरच अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात केलेलं पाप लपत नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *औद्योगिक सुरक्षा दिवस*💥ठळक घडामोडी● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.💥 जन्म :- ● १९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीचा पेपर फुटला नाही, त्यामुळे गणिताची पुन्हा परीक्षा होणार नाही, पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जागतिक बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देणार, आरोग्यसाठी होणार निधीचा वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र सीईटी सेलकडून परीक्षा नोंदणी आणि कॅप राऊंडसाठी मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासनाच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीचा ओघ; 340 प्रकल्पातून 13 लाख कोटींची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती, समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-चिनू व गोगो,fun in metro**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/DjS_bheqK64?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?*👉 चादरीसाठी*२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?*👉 उस्मानाबाद*३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?*👉 माहूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.**आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पायरीच्या दगडावर उभे राहून लोक मंदिरावर असणा-या कळसाची स्तुती करतात.पण लोकांना कुठे माहित आहे की,कळस हा बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर आहे ,मंदिर हे मजबूत असलेल्या पायावर उभे आहे आणि पाया हा पायरीपासूनच सुरू असतो आणि पायरी ही दगडाचीच बनलेली असते.जर एखाद्या पायरीचाच दगड बाजूला झाला तर मंदिरातही जाणे अवघड जाते आणि कळस पाहणेही त्यापेक्षा अवघड.एवढेच नाही तर पायरीविना कळस कसा बरे उभा राहील.कळसाला लोक दुरुन पाहतात तर पायरीला अगदी जवळून. पायरीवर डोक ठेऊन नमन करतात.पायरीचा दगड जरी असला तरी वरच्या कळसापेक्षा अधिक महत्व पायरीला देतात.त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसावरच मोठ्या माणसांचे जीवन अवलंबून आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. लहान आणि सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेदेखील इतरांनी त्यांच्याकडे वेगळ्यादृष्टीने पाहू नये. कारण त्यांच्या कष्टावरच मोठ्या लोकांचे जीवन अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~* जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी● १५६८- सम्राट अकबर बादशहाने राजपुतांचा मोठा पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.💥जन्म● १९८१: भारतीय अभिनेता शहीद कपूर● १९७४: दिव्या भारती● १८९४: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत,💥मृत्यू● भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी● १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन● हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी● १९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *G20 परिषदे निमित्त औरंगाबादेत साकारली 456 फूट लांब आणि सात फूट उंचीचं वारली चित्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात स्वस्त इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी मारुती प्रयत्नशील : शशांक श्रीवास्तव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे, अजित पवार मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पतीचं निधन; पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*📚गोष्टींचा शनिवार-खट्याळ उंदीर📚**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/S903rBGck6o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारुडकार संत एकनाथ*सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश २) विश्वभारती विद्यापीठ ३) बी. व्ही. आर. सुब्रमण्यम ४) होन व शिवराई ५) नायसिन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक,👤 योगेश राजेश पापनवार, वसमत👤 बालाजी आगोड👤 प्रदीप वल्लेमवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पावसाळा आला की कोकिळ मौन होते', कारण पावसाळा हा बेडकांचा असतो.' बेडकांच्या आरडाओरडीपुढे बिचा-या कोकिळेचे मधुर गायन कोण ऐकणार ? एक कवी म्हणतो, 'बाई कोकिळे, येथे समस्त बहिरे बसलेले आहेत. उगीच तू तुझे मधुर बोलणे का सुरू करतेस ? ज्यांना ऐकायला येत नाही, ते तुला तुझ्या काळ्या रंगावरून कावळाच समजतील. तेव्हा गप्प राहणे यातच शहाणपण आहे.**शहाण्याने अनुकूल, प्रतिकूल समय ओळखूनच वागावे. आपली उपेक्षा होत आहे, आपणांस कोणी ओळखत नाही असे समजून कुढत बसू नये. वसंत ऋतु आला म्हणजे कोकिळा कोण नि कावळा कोण हे जसे आपोआप कळते, तसेच जाणकार भेटला म्हणजे परिक्षा होते. गिधाड-गरूड, गाढव-घोडा, बगळा-राजहंस, यातील फरक वरवर कळत नसला तरी योग्य समयी खरे-खोटे, सोंग-ढोंग उघडे पडते.**"हंसाने आपली चाल सोडली नाही, कावळ्याची बढाई उघडी पडली. नुसती बढाई मारून लढाई जिंकता येत नसते. चढाई करतानाच स्वत:ची शक्ती, गुणवत्ता अजमावून पाहायची असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आजची बोधकथा* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक नागरी संरक्षण दिवस*💥 ठळक घडामोडी● १९०७- टाटा आर्यन अॅन्ड स्टील कंपनीची स्थापना● १८१८- सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.● १९१९- रॉलट अॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला प्रारंभ केला.● १९५८- कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात💥जन्म● १९१७: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक करतार सिंह दुग्गल ● १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी ● १९५१: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ● १९६८: सलील अंकोला – क्रिकेटपटू● १९६८: भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी ● १९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम 💥मृत्यू● १९९९: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर● १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई● १९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन● २००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री● २०१७ - विनोदी लेखक तारक मेहता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवरील औषधांच्या किंमती निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *100 कोटींचा कोविड घोटाळा प्रकरण; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक, याविषयी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदी सुरु, दोन दिवसात 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओदिसामधील तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओदिसा सरकारने दिली आहे. देवगढ, क्योंझर आणि मयूरभंज येथे सोन्याचे नऊ साठे सापडले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी आजपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆Class-7th English chapter 3.4 "Please don't read this poem"🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/kXnT2GYHNNU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच निधन झालेले देविसिंह शेखावत कोण होते ?२) कोणत्या वर्षी शिवाजी महाराज 'छत्रपती' झाले ?३) दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती ?४) जीवनसत्त्व ब - ९ चे रासायनिक नाव काय आहे ?५) तुपाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?*उत्तरे :-* १) माजी आमदार तथा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती २) सन १६७४ ३) कोलकाता ४) फॉलीक अँसिड ५) भारत*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय कदम👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य साचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कडू शब्दांनी माणसं दुरावतात तर मधुर शब्दांनी जोडली जातात. त्यामुळे शब्द मोजून-मापून-तोलून वापरण्याचा संदेश संत देतात. शब्द हे शस्त्र असल्याचे सांगतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करून ते आचरणात आणावे. 'शब्द आणि ते ज्या वाणीतून बाहेर पडतात ती वाणी' हे अमृत असल्याचे आपण आपल्याला रोज समजून सांगू, तेव्हाच उत्कर्ष शक्य आहे. ओजस्वी, प्रासादिकता, मांगल्य या शब्द आणि जिव्हाशक्तीशी निगडीत बाबी जगण्याला बळ देतात. आपण चांगले बोलल्याने समोरच्याच्या चेह-यावर विलासणारा आनंद समाधान देतो. काम भले एक दिवस उशीरा होईल; पण जे होईल ते पुन्हा कधी डोके वर काढणार नाही. त्यामुळे संवादाला सुसंवादाच्या पातळीवर नेण्याचे कसब आपल्याला साधायला हवे.**माणसे येतात आणि जातात लक्षात राहतो तो फक्त त्याचा स्वभाव. गेल्यानंतर "फार चांगला माणूस होता" हे एक वाक्य आयुष्यभराच्या कामाचा विजय असतो. शब्द मागे उरतात ते कसे होते याची चर्चा होते आणि ती फक्त व्यक्तीच्या बोलण्यावर अवलंबून असते. त्यामुळे चांगले वागुया, चांगले बोलुया. त्यासाठी अंत:करण शुद्ध हवे. क्लास लावून अमृततुल्य बोलता येत नाही. तिथे जाऊन फार तर पोपट होता येईल. आपल्याला पोपट नव्हे तर कोकिळ होता यायला हवे. असे होणे म्हणजे उन्नती.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाणी पिल्यामुळे तहान भागविता येते.अन्न सेवन केल्यामुळे भूक भागविता येते.त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांच्या आणि चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ज्ञानाचीही भूक भागविता येते.या ज्ञानाच्या भूकेमुळे माणसाला चांगले जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य*-तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.💥 जन्म :-● १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत ● १९५१ : कसोटी क्रिकेटपटू करसन घावरी● १८९७ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी ग्रंथकार व संत साहित्याचे अभ्यासक💥 मृत्यू :- ● १९२६ : स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद ● १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद● १९९८ : विनोदवीर राजा गोसावी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात लवकरच प्रवासी विमानाची ही निर्मिती होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमोगा विमानतळाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक : आपली मराठी भाषा अभिजातच, भाषेला जपणं महत्वाचं, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचं मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *येत्या 5 मार्च रोजी होणारी NEET PG 2023 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बारावीचा निकाल रखडणार ? कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे विकास रखडला असल्याचा आरोप करत गोंदियातील आठ गावांनी मध्य प्रदेशात विलीन करण्याची केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र अजूनही अस्वच्छ, लाखोंचा खर्च करुनही चंद्रभागेची दूरवस्था कायम; विठ्ठलभक्त संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय विज्ञान दिवस*नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं.१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?३) जगातील सर्वात हलका वायू कोणता ?४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणता ?*उत्तरे :-* १) छत्रपती संभाजीनगर २) सईबाई ३) हेलियम ४) बायोटिन ५) बँगलोर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.**चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण करता येते त्यांना जग जिंकणे काही अवघड नाही. जर रागावर नियंत्रण करता येत नसेल तर स्वत:चे जीवन स्वत:च्याच हाताने संपवल्यासारखेच आहे. म्हणून माणसाने कधीही राग आला तरी रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९८७: मराठी राजभाषा गौरव दिन● २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज● १९४३: कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा● १९५२: भारतीय चित्रपट निर्माता प्रकाश झा● भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग💥 मृत्यू :- ● १८८७: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी● १९३१: काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर● १९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार● २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, मतदारांचा अल्प प्रतिसाद, 2 मार्चला मतदानाचा निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना गती, 320 कामांचं केलं भूमीपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी जिल्ह्यातील महत्वाच्या विकास कामांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते झाले उद्घाटन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकची द्राक्ष युरोपात, आतापर्यंत 32 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रीन हाऊससाठी राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-20 च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोर येथील होळकर स्टेडियमवर सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने लेख व कविता खालील👇🏼लिंकवरhttps://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.htmlलेख व कविता वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*🏆Class-8th English chapter 3.2 The Song of songs-Story🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/F5N2EOP_wnk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वि. वा. शिरवाडकर*विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंहाच्या अगोदर कोणत्या प्राण्याला 'जंगलाचा राजा' म्हटले जायचे ?२) जगात शिक्षण क्षेत्रात आघाडी देश कोणता ?३) कोणत्या नदीला 'महाकाली नदी' असे संबोधल्या जाते ?४) जीवनसत्त्व ब - ६ चे रासायनिक नाव काय आहे ?५) कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत ?*उत्तरे :-* १) हत्ती २) कॅनडा ३) शारदा नदी ४) पायरीडॉक्सीन ५) भारत *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.**विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन**१९३६- क्षयरोग निवारण दिन*💥घडामोडी● १९५२ - भारतात कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरुवात झाली.● १९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला💥जन्म● १६७० - छत्रपती राजाराम राजे भोसले, मराठा साम्राज्यचे तृतीय छत्रपती● १९४८ - जे. जयललिता, तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री.● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक💥मृत्यू● १६७४ - प्रतापराव गुजर मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती● १९३६ - लक्ष्मीबाई टिळक, मराठी लेखिका● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार● २०१८ - श्रीदेवी, हिंदी चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भात तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त.. फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सियसचा आकडा गाठण्याची भीती..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईकर प्रवाशांच्या अडचणीत भर, बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विद्यार्थिनींनी केलल्या आरोपांवर चौकशी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, शहापूर परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अदानींच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी पाण्यात; अदानींची संपत्ती 8.5 लाख कोटींनी घटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *WT20 Semi-Final : फायनलमध्ये भारताचा 5 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/r5Mvh_V5F_s~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 54 वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो जेलचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या दिवसापासून महाराष्ट्राने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून अंगीकारले ?३) भारत जागतिक अर्थव्यवस्थामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?४) जीवनसत्त्व ब - २ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार कोण ?*उत्तरे :-* १) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक २) १९ फेब्रुवारी २०२३ ३) पाचव्या ४) रायबोफ्लोविन ५) बाळशास्त्री जांभेकर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे ॥४४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.**परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?**"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १८८७- रिव्हेरा येथे या दिवशी भुकंप💥जन्म● १५६४ - जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअर● १८७६- आधुनिक काळातील एक महान संत गाडगेबाबा💥मृत्यू*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संसदरत्न पुरस्काराची घोषणा; गोपाळ शेट्टी, अमोल कोल्हे, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी, ठाकरे गटांच्या आमदारासाठी व्हीप बजावणार नसल्याचं शिंदे गटाकडून कोर्टातच जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जालन्यातील*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Yt3LFHZtX0o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसिध्दी ही अशी बाब आहेजी कितीही मिळाली तरीमाणसाची तहान भागत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ११ ते १२ मार्च २०२३ २) अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी ३) चंद्रपूर ४) थायमिन ५) सुधीर मुनगंटीवार *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश सितावार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?**जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु● १८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.💥जन्म● १७३२ - अमेरिकेचे पाहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन● १९२२ - भारतीय व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग💥मृत्यू● १९४४- कस्तुरबा गांधी यांचे निधन● १९५८ - भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद● २०००- लेखक व पत्रकार वि. स. वाळिंबे● २००९ - डॉ. लक्ष्मण देशपांडे ( वऱ्हाड निघालय लंडनला फेम )*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक कृषी विभागाने लोकसहभागातून सर्वात जास्त 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 50 पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना बेड आणि उशी मिळणार आहे. अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी घेतला याबाबतचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर, बेळगाव इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसांनंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. लक्ष्मण देशपांडे ( जन्म ५ डिसेंबर १९४३ - मृत्यू २२ फेब्रुवारी २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.लक्ष्मण देशपांडे लहानपणी गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.*प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार*◆ २००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.◆ २००४ : विष्णूदास भावे पुरस्कार.◆ याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.◆ अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल – थॉमस पेन*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••z१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?*उत्तरे :-* १) २० वे २) रेखा शर्मा ३) भारत ४) शिंदे गट ५) देवमासा ( व्हेल )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शाहरुख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसे करावें॥ दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.**लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे.स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे.विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्चा इसम होता. तो गि-हाईकाच्या दळणातील थोडेसे धान्य अथवा पीठ काढून घेत असे. त्याची ही चोरी अनेकांच्या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्याने लोक गप्प बसत असत. एकेदिवशी धान्याच्या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्या उंदराला पकडून तो माणूस त्याच्या मांजराकडे देणार इतक्यात तो उंदीर विनवणीच्या सुरात त्या दळणक-याला म्हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्याकडे येणा-या धान्यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्हा मला कृपया तुम्ही सोडून द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्याला म्हणाला,''अरे उंदरा धान्याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्हणाला, प्रत्येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्ही तर प्रत्येक दळण दळण्याचे पैसेही घेता आणि वरून त्या दळणातील थोडे धान्य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्ही स्वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्या या बोलण्याने माणूस खूपच संतापला व म्हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्हणून त्याने त्या उंदराला मांजराच्या स्वाधीन केले.*तात्पर्य*- जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्ठा मिळते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक मातृभाषा दिन💥 ठळक घडामोडी :- १८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणमशिनचे पेटंट मिळाले.१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.💥 जन्म :-१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर💥 मृत्यू :- १८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बोर्ड बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आंदोलन स्थळी स्ट्रीट लाईट बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * G 20 च्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणचे काम 22 फेब्रुवारीच्या आत संपवावे; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच बेमुदत कामबंद आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gncdHXwtvxA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे(उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*01) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* सहा*02) मेढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?* लोकरी*03) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?* बिहार*04) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे?श्रीहरिकोटा05) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात?*डेसिबल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, नायगांव👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.**हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी⌛१९८७- मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला⌛१९८८- गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली 💥जन्म१९३६: माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह १९५६: भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर १९७३: भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी 💥मृत्यू१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू १९७४: के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक १९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू १९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक २००१: इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच होणार वाढ. यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी गुजरातला रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार? मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा, जयदेव उनाडकटचा संघात पुन्हा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिवजयंती**व्हिडीओ लिंक👇*https://youtu.be/cFWtCFBYWpE~~~~~~~~~~~~~~~~~ *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••कादंबरी - लक्ष्मीhttp://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य आज रोजी इ.स. १९८७ साली स्थापन झाले. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरुणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरुणाचलमधील प्रमुख पिके आहेत.अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.*संकलन *••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?२) इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) केवळ एक २) लिथियम ३) रोहीत शर्मा ४) अँटोनियो गुटेरेस ५) उजीयारो केवटीया, समनापुर, जि. डींडोरी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि. प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपण स्वत:च्या मनाशी कधीतरी संवाद साधला पाहिजे. बाहेरच्यांशी आपण खूप बोलतो. नको तेवढा वेळ घालवतो, पण त्यात 'स्वसंवाद' साधायला विसरतो. हा विसर आयुष्याच्या शेवटाला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपण अनेक गोष्टी सहज करू शकलो असतो, क्षमता असूनही आपण एकही शाश्वत काम उभे करू शकलो नाही, ही जाणीव नैराश्यकडे नेणारी असते.* *" तुका म्हणे होय मनासि संवाद,* *आपुलाचि वाद, आपणाशी।"**असा वाद आता संपला आहे; कारण वाद होण्यासाठी मुळात संवाद व्हावा लागतो. त्यासाठी एकदा स्वत:त डोकावून पाहावे लागते. एकदातरी स्वत:ला कडकडून भेटायला हवे. आपले नेमके उलटे होते.* *हजारों मैंफिले हो,* *लाखो मेले हो,* *खुदसे ना मिलो,* *तो बिलकुल अकेले हो ॥**हे असे एकटेपण कुणालाही, कधीही येता कामा नये. समाजात अनेकांना 'एकांत' आणि 'एकटेपणा' यातला फरक कळत नाही. एकांत साधना, अभ्यास या विषयाशी निगडीत आहे, तर एकटेपणा हा नकारात्मक आहे. एकांताचे अनुमान 'सुखावह' तर एकटेपणाचे 'भयावह' असतात....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत.कारण आपणहीकधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत.मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिं💥 जन्म :-१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे💥 मृत्यू :- १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार, कॉपी बहाद्दरांवर करडी नजर; पुण्यातील दहावी, बारावीच्या परीक्षाकेंद्रावर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाकडून जगातील सर्वात मोठा विमान खरेदी व्यवहार! फ्रान्सच्या एअरबसकडून 250 आणि अमेरिकेच्या बोईंगकडून 220 अशी तब्बल 470 विमाने खरेदी करण्याचा निर्णय, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी, शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन, तीन दिवस कार्यक्रमांची जंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगभरातील किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोक्याची घंटा, मुंबईचा काही भाग पाण्याखाली जाण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऐतिहासिक! विश्व क्रिकेटवर टीम इंडियाचं वर्चस्व! प्रत्येक ठिकाणी भारतीय आघाडीवर, वनडे, टी20 नंतर कसोटीतही टीम इंडिया नंबर 1*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆8 वी शिष्यवृत्ती उत्तरसूची 2023 पेपर-1 व 2🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/rpuiteQHl-U?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकच ध्यास ; वाचन विकास*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *धुंडिराज गोविंद फाळके*धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?*उत्तरे :-* १) नानज अभयारण्य, सोलापूर २) दक्षिण आफ्रिका ३) लिथियम ४) कुतुबुद्दिन ऐबक ५) पाकिस्तान*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाप्पा महाजन, नाशिक👤 प्रदीप वाघमारे, पुणे👤 सतीश चौहान, चौसाळा👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद👤 लता विष्णु वायाळ (स.शिक्षिका) भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.**कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरी नक्कल*भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी :- १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.१९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.१९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.२०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.२०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.💥 जन्म :-१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ१९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर१९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ१९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी१९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी१९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल💥 मृत्यू :- १८६९: ऊर्दू शायर मिर्झा गालिब१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक१९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय२००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एअर इंडियाला मिळणार नवी उभारी, टाटा सन्स 250 विमाने करणार खरेदी; पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद - G20 च्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी अतिक्रमण जमीनदोस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक मनपाने पाणीपट्टीतून जमा केले 44 कोटी, चारशेहून अधिक घराचं पाणी बंद, नाशिक मनपाची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे त्यात मोठे बदल होण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆5 वी शिष्यवृत्ती उत्तरसूची 2023 पेपर-1 व 2🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/vnPaED8nF-o?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वसंत गोवारीकर*वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्याशाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे.वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) पी. व्ही. सिंधू २) ऑपरेशन दोस्त ३) मरुस्थळ ४) ध्वनीची तीव्रता ५) भोपाळ*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक👤 किरण गौड, धर्माबाद👤 घनश्याम नानम, धर्माबाद👤 रमेश सोनकांबळे👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम👤 अविनाश सातपुते👤 गोविंद टेकुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा.ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान.जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/02/2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷=========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन डे*💥 ठळक घडामोडी :- १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.💥 जन्म :-१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार १९१६: संजीवनी मराठे – कवयित्री१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया १९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री१९५०: कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री१९५२: भारतीय जनता पार्टी च्या महिला राजनीतिज्ञ तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराजमा स्वराज१९६०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित निरंजनानंद सरस💥 मृत्यू :- १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग१९८०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक मनहर रसकपूर यांचे निधन२००५: हिंदी साहित्यकार तसेच प्रसिद्ध लेखक विद्यानिवास मिश्र यांचे निधन२००७: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्यामाचरण शुक्ल यांचे निधन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या फ्रेश बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *बंगळुरु : आशियातील सर्वात मोठा Air Show, एअरो इंडिया 2023 ला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात; जगाला दिसणार मेड इन इंडियाची ताकद*-----------------------------------------------------2⃣ *मुंबई : 28 तारखेला महाराष्ट्र एकीककरण समितीचे मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन.. १५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा... परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा...*-----------------------------------------------------4⃣ *नाशिकच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, डीजेलाही बंदी, पोलिसांचं महत्वाचं आवाहन*-----------------------------------------------------5⃣ *घटती प्रवाशी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंंतर आता पदवीधर, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात सवलत. नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय.*-----------------------------------------------------6⃣ *कोल्हापूर : फेब्रुवारी मध्यापूर्वीच कोल्हापूर तापण्यास सुरुवात; पारा 35 अंशांवर*-----------------------------------------------------7⃣ *आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी साहित्य प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/RcFRyzSLghY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जगाला प्रेम अर्पावे .....!वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष फ्रेश माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ========= *कवी संजीवनी मराठे*संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी, इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली.महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.*संकलित माहिती*=========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764=========ஜ۩۞۩ஜ========= *आजची फ्रेश प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) ट्रान्सजेंडर दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होण्याची देशातील पहिली घटना कोणत्या राज्यात घडली ?३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?*उत्तरे :-* १) रमेश बैस २) केरळ ३) ग्राम पंचायत ४) महात्मा गांधी ५) १ एप्रिल २०२३*संकलन - जैपाल भै. ठाकूर* जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 प्रा. डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ मनाचे श्लोक @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ=========असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥ *।। जय जय रघुवीर समर्थ ।।*=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼ *आजचा फ्रेश विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.**एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे फ्रेश विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ========= *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले.*तात्पर्य :-**एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा.ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.〰〰〰〰〰〰〰〰〰*📝 संकलन* 📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.**जि.प.प्रा.शा गोजेगाव**ता.हदगाव, जि. नांदेड*http://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक रेडिओ दिन*💥 ठळक घडामोडी⌛१९८४- भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना💥 जन्म :-⌛१८७९ - सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन⌛ १९११ - विख्यात ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म⌛१९२२ - गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म💥 मृत्यू :-⌛१९१४- ’लल्फ़ान्सो बर्टिलान’ या मानववंश शास्त्रज्ञाचे निधन⌛१९०१- शरीर शास्त्रज्ञ जयवंतसिंग यांचे निधन⌛१९९४ - उत्साद अमीर खाँ यांचं निधन⌛ १९०१ - भाऊराव कोल्हटकर यांचं निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतात येणार नवीन ईव्हीएम मशीन, देशातील कोणत्याही भागातून करता येणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची 25 वर्ष पूर्ण; DRDO कडून शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील सर्वात लांब मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षांत समारंभ सोहळा आज पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vU6PsdookuY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~ *👬 मैत्री 👬* ~~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इतिहासात प्रथमच अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे तब्बल आठ मिनिटे जुनेच अर्थसंकलपीय बजेट कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने वाचन केले ?२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?*उत्तरे :-* १) राजस्थान २) १५ ऑक्टोबर २०२२ ३) नवी दिल्ली ४) महात्मा गांधी ५) उत्तरप्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिकंदर 'जगज्जेता' ठरला, तरीही त्याची अभिलाषा विराम पावली नव्हती, तो मनाच्या घालमेलीत फे-या मारत होता. सारी पृथ्वी जिंकून मी 'जगज्जेता' आणि महान 'सेनापती' ठरलो. मी जेता आहे; पण आता मी जिंकू काय ? त्याचा अहंकार जागा होता. त्याचं मन दु:खी झालं.**सारी छावणी निद्रेच्या अधीन होती. पण या विषण्ण अवस्थेत त्याचा दु:खावेग अनावर झाला अन् तो ढसढसा रडू लागला व ओरडू लागला आता मी जिंकू काय ? मला जिंकण्यासाठी काहीच उरले नाही.**आवाज ऐकून एक वृद्ध सैनिक जागा झाला व म्हणाला.."शहंशाह जिंकायला अजून एक गोष्ट बाकी आहे. ती अत्यंत अवघड गोष्ट म्हणजे माणसाचं मन ! ते जिंकलत तर आपण ख-या अर्थाने 'जगज्जेता' व्हाल !"**" ज्या दिवशी माणूस स्वत:चं मन जिंकेल त्यादिवशी तो खरा जगज्जेता !"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हा आनंदच असतो.आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो.त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही.जेथे सुख,समाधान,शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो.पण जेथे वाद,नैराश्य,दुःख,अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही.आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे.इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो.त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे.कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली. *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛१८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.⌛१९३३ : म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.⌛१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.⌛१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.💥 जन्म :-⌛१८४७ : थॉमस अल्वा एडिसन, सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक.⌛१९२३ : प्रसिध्द हॉकीपटू त्रिलोचनसिंग बाबा.⌛१९४२ : गौरी देशपांडे, मराठी लेखिका.💥मृत्यू :-⌛१९७७ : जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.⌛१९६८ : पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.⌛१९७७ : फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.⌛१९९३ : कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय, परीक्षेच्या आधी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका मिळणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गेल्या 11 वर्षात 16 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, 2022 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी देश सोडला; केंद्र सरकारची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांच्या मागे सामान्य नागरिकांचे पाठबळ, खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३२१ अशी धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Z7aIh7kuNQU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी पेंशन योजना चालू करावी ( दैनिक जनशक्ती )*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://www.ejanshakti.com/जुनी-पेन्शन-योजना-चालू-कर/लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेले. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यात नदी संवर्धन आणि सरंक्षणासाठी कोणते अभियान राबविण्यात येत आहे ? २) संगणक ( कॉम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?३) पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा काय आहे ?४) पंचायत राज हे कोणत्या भारतीय नेत्याचे स्वप्न होते ?५) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ?*उत्तरे :-* १) चला जाणूया नदीला २) चार्ल्स बॅबेज ३) H2O ४) महात्मा गांधी ५) कर्नाटक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव हिमगिरे, सहशिक्षक, कन्या शाळा धर्माबाद👤 रविशंकर बोडके👤 म. जावीद, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤परमेश्वर कल्याणकर, तंत्रस्नेही शिक्षकचिखली (खु) केंद्र निळा ता जि नांदेड👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 दत्तात्रय दळवी👤 प्रमोद शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मन विषयांकडे प्रमाणाबाहेर ओढ घेऊ लागले, तर मनुष्य कुठच्या कुठे आणि कसा वाहावत जातो, ते त्याचे त्यालासुद्धा समजत नाही. त्याउलट मन जर संतुलित आणि संयमित असेल, तर असा माणूस त्याला अंतर्मुख करून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्यदेह दुर्लभ असल्याने तो लाभल्यावर मन ताळ्यावर ठेवून ही आत्मज्ञानाची वाट चोखाळण्याचा उपदेश संतमंडळी करतात. अर्थात, ही वाट चालू लागायचे तेदेखील देह सुस्थितीत असतानाच, गलीतगात्र झाल्यावर नव्हे. पुष्कळ पुण्य गाठीशी असलेल्या व्यक्तिसच मनुष्यदेह लाभत असल्याने जीवनाचे क्षणभंगुरत्व लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच मनुष्याने देहरूपी नौका फुटण्यापूर्वी पैलतीरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.**जर मनुष्याची बुद्धी म्हणजेच विवेक जागृत असेल, तर आपले हित नेमके कशात आहे? हे ओळखून विषयांकडे धाव घेणा-या मनाला वेळीच आवरता येते. थोडक्यात, इंद्रिये म्हणजे रथाचे घोडे आणि मन म्हणजे लगाम मानला आहे. या मनाचा योग्य तेव्हा उपयोग करून घोड्यांना कधी आणि किती आवरायचे अगर ढिले सोडायचे हे ठरविणारा सारथी म्हणजे 'सदसद्विवेकबुद्धी' होय. निराळ्या शब्दात सांगायचे झाले, तर मन हे ओढाळ गुराप्रमाणे अत्यंत चंचल असते. जसे अवखळ गुराच्या गळ्यात लोढणे बांधल्याने त्याला काबूत ठेवणे शक्य होते, तसेच विवेक आणि वैराग्याची योजना केल्यास ओढाळ मन काबूत राहते.* *मन हे ओढाळ गुरू* *पर धन पर कामिनीकडे धावे ।* *वास्तव विवेकपाशें* *कंठी वैराग्यकाष्ठ बांधावे ॥* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं,त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक : 10/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.● १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना२०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥 जन्म :- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- १२४२ - शिजो जपानी सम्राट.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Nagpur ZP : सुरक्षा ठेव घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी; एकाचे निलंबन, वेतनवाढीवरही टांगती तलवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे जिल्ह्यातील राजगुरू विद्यालयात खिचडीतून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका, कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेडमधील जि.प. धामदारी शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, गिरवत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे; सांडपाण्याचा वापर करत फुलवली परसबाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कसबा मतदारसंघात दोन्ही पक्षांना बंडखोर आणि नाराजांची मनधरणी करण्यात यश.. कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज घेतला मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 बळी घेत कसोटी बळीचे शतक केले पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-Mt0MNDMu8~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.४६ शैक्षणिक विभाग आहेत. ४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे यः क्रियावान् स पण्डितः आणि संकेतस्थळ www.unipune.ac.in असे आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?*उत्तरे :-* १) राजा हरिश्चंद्र २) अमेरिका ३) सरडा ४) सोडियम कार्बोनेट ५) गावातील सर्व प्रौढ मतदारांचा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....**"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."**तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. १९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.💥 जन्म :- १८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर. १९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते💥 मृत्यू :- १९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक १९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते. १९८१ - न्या.एम.सी.छगला, नामवंत कायदेपंडित १९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक. २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री. २००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल. २००६ - नादिरा, अभिनेत्री.२००८ - समाजसेवक बाबा आमटे*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकमध्ये भाजपचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तुर्की-सीरिया मृत्यूच्या दाढेत, भूकंपातील बळींचा आकडा 8 हजारांवर, आकडा 20 हजारांपर्यंत वाढण्याची WHOला भीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार जागतिक दूध उत्पादनात भारताने मिळविले प्रथम स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापूर शहरात आजपासून 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fTkTUcOqsrM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जन्म मृत्यूची नोंदणी*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोविंद त्र्यंबक दरेकर*स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर (जन्म: ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणार्या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्तही करण्यात आल्या होत्या.संकलन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'लोकशाहीचा पाळणा' असे कशास संबोधले जाते ?२) 'मिशन भगीरथ योजने'अंतर्गत सुरक्षित व मोफत पिण्याचे पाणी पुरविणारे देशाचे एकमेव राज्य कोणते ?३) 'जोहार मायबाप जोहार' ही रचना कोणाची आहे ?४) लाकडात कोणता प्रमुख घटक असतो ?५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या प्रबंधासाठी डी. एस्सी. पदवी मिळाली ?*उत्तरे :-* १) स्थानिक स्वराज्य संस्था २) तेलंगणा ३) संत चोखामेळा ४) सेल्युलोज ५) द प्रॉब्लेम ऑफ रूपी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'**ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.**याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यातील अहंकाराने आपल्या रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शेरास सव्वाशेर*एका शेतकर्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.💥 जन्म :-१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन💥 मृत्यू :- १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हज यात्रेकरुंना मिळणार 50 हजारांची सूट, VIP कोटा रद्द, अर्जही विनामूल्य; केंद्र सरकारचे नवे धोरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाची लॉटरी निघाली, मराठवाड्यातील 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळाची जाहिरात, 22 मार्चला सोडत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अधांतरी, सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलचा क्रिकेटला अलविदा, सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून घेतली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fij1JJI9a-I~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967.लेखक : मु. मा. घाणेकरस्त्रोत : मराठी विश्वकोश*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आदिवासींचा विश्वकोश' तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?२) "विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली..." असे कोणी म्हटले होते ?३) 'रडार' या यंत्रात कोणत्या लहरी असतात ?४) 'महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन' कोणास म्हणतात ?५) 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) ओडिशा २) महात्मा ज्योतिबा फुले ३) विद्युतलहरी ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) भावार्थदीपिका*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'**ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.**याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.💥 जन्म :-● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.● २०२२ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आंतरराष्ट्रीय युद्ध सरावात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या अवनी चतुर्वेदी; म्हणाल्या, रोमांचक होता अनुभव...*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Vande Bharat Express ची मुंबई ते इगतपुरी ट्रायल, 10 तारखेला सीएसएमटीवरुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलं, वर्ध्यातील उत्तम आयोजनाचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेतून पुनर्विकास होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'मेक इन इंडिया' आता 'जोक इन इंडिया' झाला; तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथील जाहीर सभेत भाजपावर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लता मंगेशकर ( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना कोविड-१९ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिवासींचे श्रद्धास्थान असलेली कचारगड गुफा कोणत्या जिल्ह्यात आहे ?२) माघ पौर्णिमेला गोंडी भाषेत काय म्हटले जाते ?३) राहण्यासाठी, जगण्यासाठी जगातील सर्वाधिक महागडी शहरे कोणती ?४) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे ?५) डोंगर पोखरून आरपार गेलेल्या रस्त्यास काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) गोंदिया २) कोया पुनेम ३) न्यूयॉर्क, सिंगापूर, तेल अविव ४) कटक, ओडिशा ५) बोगदा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना👤 प्रा. पंजाबराव येडे👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी⌛१९४४ : ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.⌛१९८८ : रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला💥 जन्म :-१९०६ : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.⌛१९२२ : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.💥 मृत्यू :-⌛१६७० : कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने झाली सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; नवे दर लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *परळी वैजनाथ-बीड-नगर नवीन रेल्वे मार्ग होणार; रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wHoX5fEylks~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनो, लिहिते व्हा......!*http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील 'पिनकोड सिस्टिम' चेजनक...*कोकणातील 'राजापूर' मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल !त्याचे नाव.. श्रीराम भिकाजी वेलणकरPIN म्हणजे Postal Index Number१९७२ पर्यंत ... जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा..!! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच !या सगळ्या अडचणीतून जात असताना, त्यावर उपाय म्हणून पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली ...*पिनकोडची रचना अशी आहे.*पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत,तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो.यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल११ - दिल्ली१२ व १३ - हरयाणा१४ ते १६ - पंजाब्१७ - हिमाचल प्रदेश्१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड३० ते ३४ - राजस्थान्३६ ते ३९ - गुजरात्४० ते ४४ - महाराष्ट्र४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड५० ते ५३ - आंध्र प्रदेश५६ ते ५९ - कर्नाटक६० ते ६४ - तामिळनाडू६७ ते ६९ - केरळ७० ते ७४ - पश्चिम बंगाल्५५ ते ७७ - ओरिसा७८ - आसाम७९ - पूर्वांचल८० ते ८५ बिहार आणि झारखंड९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला *पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो*.उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...! 💐••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माता ही प्रेमाची सरिता आहे, म्हणून ती सदैव वाहत असते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला ?२) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील वृद्ध व्यक्ती ( ११६ वर्षे ) म्हणून कोणाची नोंद झालेली आहे ? ३) नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या गीताला 'महाराष्ट्राचे राज्यगीत' म्हणून स्विकारण्यात आले ?४) क्रिकेट विश्वातील पहिल्या १२ मोठ्या स्टेडियमपैकी एकट्या भारतात किती स्टेडियम आहेत ?५) ऑस्ट्रेलियन पुरुष ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) भारत २) मारिया ब्रायांस मोरेरा, अमेरिका ३) जय जय महाराष्ट्र माझा ४) आठ ५) नोव्हाक जोकोविच, सर्बिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद👤 राजरेड्डी गडमोड, येताळा👤 संजय गायकवाड, धर्माबाद👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर👤 गोविंद राखेवार👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 शेख इरफान👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे👤 मोहन रेड्डी👤 बालाजी थेटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी, अनेक उत्सव हे मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. या उत्सवांमध्ये 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र धाब्यावर बसवून आनंदी-आनंद केला जातो. आपल्या नाकासमोर जर कोणी सूत धरले, गुदगुल्या केल्या तर प्रचंड शिंका येतील. परंतु श्रीगणेशाच्या मूर्तीवर नाकातोंडात दूर्वा जाईपर्यंत थर मांडायला आपल्याला काही वाटत नाही. साधी झोपमोड आपल्याला चालत नाही, पण मंडपात कानठळ्या बसवणारा डी जे तो गणनायक आपल्या कानांच्या पाळ्यात आणि हा अपराध विशाल उदरात सामावून घेतो.**आपण सिग्नलला दोन मिनिटेही थांबत नाही, पण श्रीगणेशास मात्र दुपारच्या नैवद्याची संध्याकाळपर्यंत वाट पहावयास लावतो. प्रसंगी त्याला एकभुक्त ठेवतो. खरंतर पाहुण्यांचे 'स्वागत' आणि जाताना भावपूर्ण 'निरोप' ही आपली परंपरा. पण गणेशमूर्ती आणताना 'गोंधळ' आणि विसर्जनात 'कल्लोळ' ही नवपरंपरा आहे. मूर्तीपूजेचे हे भयानक स्वरूप आपणच इतर धर्मियांसमोर आणून ख-या पूजेपासून दूर गेलो आहोत. 'मूर्तीपूजन' हे सगुण रूपातील ईश्वरास अनुभवण्याचे साधन आहे, आणि ते समजावून घेतल्यास त्याचा खरा आनंद मिळेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो.पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही.माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो.नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की,आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो.अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.*तात्पर्य :*करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वकर्मा जयंती*💥 ठळक घडामोडी :- १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.💥 जन्म :-१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक :- नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे, नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबाले तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार, मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरता सूचना; मंडळाचे सर्व शाळांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन, त्या 85 वर्षांच्या होत्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2024 च्या अखेरीस आम्ही अमेरिकेप्रमाणे रस्ते अन् उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करु : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/O5CM0SMK60c~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा*वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रघुराम राजन*राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केलीरघुराम राजन भारतीय रिजर्व बैंकेचे 23 वें गवर्नर होते.4 सप्टेंबर 2013 रोजी डी. सुब्बाराव यांच्या सेवानिवृत्तिनंतर त्यांनी पदभार घेतला होता. त्यापूर्वी ते पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व शिकागो विश्वविद्यालयात बूथ स्कूल ऑफ बिजनेस मध्ये एरिक जे ग्लीचर फाईनेंसचे सर्विस प्रोफेसर होते. 2003 ते 2006 पर्यंत ते अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष चे प्रमुख अर्थशास्त्री व अनुसंधान निदेशक होते आणि भारतातील आर्थिक सुधार योजना आयोग द्वारा नियुक्त समितिचे नेतृत्व केले होते.राजन मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी चे अर्थशास्त्र विभाग आणि स्लोन स्कूल ऑफ मैनेजमेण्ट; नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी चे केलौग स्कूल ऑफ मैनेजमेण्ट आणि स्टॉकहोम स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये अतिथि प्रोफेसर म्हणून ही काम पाहिले आहे. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, विश्व बैंक, फेडरल रिजर्व बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.सन 2011 मध्ये अमेरिकन फाइनेंस ऐसोसिएशन चे अध्यक्ष होते तथा सध्या ते अमेरिकन अकैडमी ऑफ आर्ट्स एण्ड साइंसेज़ चे सदस्य आहेत.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन' आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?२) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) भारतीय टेनिस विश्वाची 'सोने की चिडिया' असे कोणाला संबोधले जाते ?४) जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते ?५) महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'ची रक्कम किती करण्यात आली ?*उत्तरे :-* १) अमृत उद्यान २) आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक ३) सानिया मिर्झा, टेनिसपटू ४) न्यूयॉर्क, अमेरिका ५) २५ लाख*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही.अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते. जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्याला जपायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य:ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.💥 जन्म :- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आयकर मर्यादा वाढवण्यात आली असून आता ७ लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ही महत्वाची घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावर राज्य सरकार ठाम, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणतीही कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न : अर्थमंत्री निर्मला सीतारमण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर पोलिसांत मोठी खांदेपालट; 18 पीआय आणि 5 एपीआयच्या बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; ओळखपत्र, पत्ता आणि इतर गोष्टी अपडेट करता येणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Ind vs Nz 3rd T20: शुभमन गिलचं दमदार शतक! 15 चेंडूत कुटल्या 70 धावा, T-20 मधील पहिलं शतक पूर्ण, भारताचा 168 धावांनी तगडा विजय, मालिका 2-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fLMcdaLuXRM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशीसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हॉकी विश्वकप स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?२) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना २०२३ च्या कोणत्या पद्म पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले ?३) कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?५) 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) जर्मनी २) पद्मविभूषण ३) मध्यप्रदेश ४) वर्धा ५) डॉ. सदानंद मोरे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रुखमाजी भोगावार, धर्माबाद👤 चक्रधर ढगे👤 देविदास तारू, सहशिक्षक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे👤 राजू जगदंबे, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय संस्कृतीत सत्तावीस नक्षत्र म्हणजे जीव की प्राण. शेतकरी मृगाचा पाऊस पडला की पेरणीची लगबग करतो. पेरण्या झाल्या की पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांची काळजी घेतो. जमिनीत पेरलेली स्वप्नं सफल झाली की शेतक-यांच्या डोळ्यांतल्या स्वप्नांतही आनंद उत्सव घडतो. पण जर का नक्षत्रांनी साथ दिली नाही तर गणित साफ चुकतं. खेड्यातल्या लोकांना निसर्गातल्या छोट्यामोठ्या घडामोडींचं अचूक ज्ञान असतं. 'अनुभव हीच त्यांची वेधशाळा.'**व्यंकटेश माडगूळकर यांचे लेखन म्हणजे निसर्गातली सूक्ष्म, हळूवार निरीक्षणं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणात एक नानांची गोष्ट आहे. नाना म्हणतात.. मुलांनो, तुम्हाला वजाबाकी येते का ? मग सांगा बघू..सत्तावीसमधून नऊ गेले किती राहिले बाकी ? मुलं बोटं मोजून ओरडली, 'आठरा'. नाना म्हणाले, 'चूक'. एकूण नक्षत्र सत्तावीस. त्यातून पावसाची नऊ नक्षत्र कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काय उरतं ? काही नाही ! पाणी नाही, पिकं नाही, गुरंढोरं नाहीत म्हणून हिशोबाचं उत्तर शून्य. सत्तावीसमधून नऊ गेले, खाली उरतो भोपळा.* *महाराष्ट्रात असे अनेक नाना आहेत. पण ऐकणारे आहेत का कुणी ?* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे अधिक प्रयत्न करायला हवेत.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥* ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस..... त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे..... त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले.... "आता आपण परत भेटणार केव्हा? कुठे? ? ? ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन... धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन... विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. "कारे... ? का रडतोस?" विश्वास हुंदके देत-- *"मी एकदा गेलो तर* .... *पुन्हा* *कधी नाही भेटणार**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛ १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचीपहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.💥 जन्म :-⌛१८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.💥 मृत्यू :-⌛२००३ : कल्पना चावला, महिला अंतराळवीर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'विशाखापट्टणम' आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अस्थिर राजकारणाचा परिणाम राज्याला भोगावा लागतोय : आमदार बच्चू कडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 56 टेबलवर उद्या होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेत वाढ, दहा लाख वरून पंचवीस लाख करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा nirnayq*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/aB0Ipn0I8RE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.**देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.**"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल.ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य*मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31-01-2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :- १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान, प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बहुमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा; 10-12 दिवस आधीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तर पोलीस आयुक्तांकडून तब्बल चार तास पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2 फेब्रुवारीला मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात होणार 'स्मार्ट अंगणवाडी', 800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात, 2 तारखेला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ट्विटरने केली निवृत्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/__Ncdqx8jeo~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - व्यसन* http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ या वर्षी किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे ?२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा कोणी दिली ?३) ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे मोड होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे ?४) आंतर सरकारी तांत्रिक कार्यगटाच्या १२ व्या सत्रात उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली ?५) राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सहा २) भंते चंद्रमणी महास्थविर ३) जम्मू काश्मीर ४) भारत ५) १९४८*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 👤 हिलाल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :-प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुतात्मा दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.१९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.💥 जन्म :-१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९४८: राष्ट्रपिता महात्मा गांधी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांचा अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकानं केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे मतदान आज, 5 मतदारसंघात चुरस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *70 टक्के मागण्या पूर्ण झाल्यानं लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित, मात्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लढा सुरुच राहणार असल्याचं जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले विक्रमी २२ वे ग्रँडस्लॅम जेतेपद, राफेल नडालच्या विक्रमाशी साधली बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकलं, अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात भारताचा विजय, इंग्लंडवर ७ विकेट्सनी मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/zI_Z8omB9No~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - वेळ नाही मला*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नबा किशोर दास*ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु होते.नबा किशोर दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक केली.सध्या ते बिजू जनता दलमध्ये होते. ते नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते. काही दिवसांपूर्वीच नबा किशोर दास यांनी शनिशिंगणापूरच्या शनि देवाला एक कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता.💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जास्वंद हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० मध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?३) सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा देशातील पहिला जिल्हा कोण ठरला आहे ?४) भारताने पुन्हा कोणत्या देशासोबत १०० हून अधिक चित्ते हस्तांतरित करण्याचा करार केला आहे ?५) आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) मलेशिया व दक्षिण कोरिया २) सूर्यकुमार यादव, भारत ( ६८ षटकार ) ३) वायनाड ४) दक्षिण आफ्रिका ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. बालाजी कोंपलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, मुखेड👤 सौ. सारिका सब्बनवार, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतीश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 अंकुश निरावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः**माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● २००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन● २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर💥जन्म● १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारक● १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.● १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.● १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.💥मृत्यू● १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक● १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *"मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील चार शेतकऱ्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या चार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरात 100 आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार, पर्यावरण मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात होणार साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटला नाही तर, राजकारणातून संन्यास घेईन, अपक्ष उमेदवार सुरेश पवारांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. न्यूझीलंड T-20 सामन्यात भारताचा 21 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wqweh0BpWEw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - पाथरवट*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_22.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयसीसीने २०२२ या वर्षातील सर्वोत्तम टी - २० क्रिकेटपटू म्हणून कोणाला निवडले ?२) जीवनविद्या मिशनचे प्रणेते कोण ?३) कोणत्या फळाला पिकवण्यासाठी ३ वर्षे लागतात ?४) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ( ILO ) मुख्यालय कोठे आहे ?५) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना कोणत्या देशाची आहे ?*उत्तरे :-* १) सूर्यकुमार यादव, भारत २) सद्गुरू वामनराव पै ३) अननस ४) जिनिव्हा ५) भारत ( BCCI )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल सोनकांबळे👤 राजेश अर्गे👤 सलीम शेख👤 मोगलाजी मरकटवाड👤 राम पाटील ढगे👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ दि. 27/01/2023 वार - शुक्रवार=========ஜ۩۞۩ஜ=========🌷 . *दिनविशेष* . 🌷=========ஜ۩۞۩ஜ=========💥 ठळक घडामोडी :- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.💥 जन्म :-१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी१९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य💥 मृत्यू :- २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कर्तव्यपथावर देशाच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन*-----------------------------------------------------2⃣ *इस्रोचे यान बदलणार युद्धाची पद्धत, अंतराळात भारताची ताकद वाढणार*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग, 3 दुकाने आगीत जळून खाक*-----------------------------------------------------4⃣ *दहावी-बारावी परीक्षा शुल्कातून बोर्डाला मिळाले तब्बल साडेतेरा कोटी रुपये; शुक्रवारपासून मिळेल प्रवेशपत्र*-----------------------------------------------------5⃣ *देशात धर्म-जातीच्या नावावर जास्त दिवस राजकारण चालणार नाही; कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांची भाजपवर टीका*-----------------------------------------------------6⃣ *आज रांचीच्या मैदानात खेळविला जाणार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 सामना*-----------------------------------------------------7⃣ *Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/sQ9gjdaKcrE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ========= *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*=========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.=========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने न्यूझीलंडला किती फरकाने हरविले ?२) बॅटरी निर्मितीत जगातील अव्वल क्रमांकाचा देश कोणता ?३) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जन्मदिवस कोणता दिवस साजरा केला जातो ?५) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ - ० २) चीन ३) शिपकीला पास ४) पराक्रम दिवस ५) महाराष्ट्र *संकलन* जैपाल भै. ठाकूर जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 दत्तराम बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.**आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ=========इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ========= *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!〰〰〰〰〰〰〰〰〰*📝 संकलन* 📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेडजि.प.प्रा.शा.गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न प्रदान.💥 जन्म :-१८६३: सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे💥 मृत्यू :- १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते१९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *औरंगाबाद महानगरपालिकेचा अतिक्रमण हटावचा धमाका सुरूच; मकबऱ्यासमोरील 30 अतिक्रमण जमीनदोस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका! नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताचे दिग्गज वास्तुविशारद डॉ. दोशी यांचे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांचे संकल्पनेतून आयआयटी मुंबई यांच्याव्दारे बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वकांक्षी उपक्रम नाशिक जिल्हयात राबविण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेक इन इंडियाची थेट गूगलला टक्कर, BharOS ऑपरेटिंग सिस्टमची यशस्वी चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND Vs NZ : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावानी पराभव करत भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vjtbarLmu00~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* मतदार राजा जागा हो....!इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही.......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रमाबाई रानडे*रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २६ जाने.२०२३ ला आपण कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत ?२) भारतीय हॉकी पुरुष संघाचा विश्वचषक स्पर्धेच्या क्रॉसओव्हर लढतीत कोणत्या संघाविरुद्ध ४ - ५ असा पराभव झाला ?३) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके कोणी झळकावली आहेत ?४) नव्या संसद भवनातील राज्यसभा कक्षात बसण्यासाठी एकूण सिटे किती आहेत ?५) दहा ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात ?*उत्तरे :-* १) ७४ वा २) न्यूझीलंड ३) वीरेंद्र सेहवाग ( ३ द्विशतके ) ४) ३८४ सिटे ५) X*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्ता हेलसकर, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर👤 राजीव सेवेकर👤 महेबूब पठाण👤 अंबादास कदम👤 राहुल आवळे👤 नरेश दंडवते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?**जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.**वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो.अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृती महत्वाची*स्वावामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली.एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश!सर्व श्रोते थक्क झाले.तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव*💥 ठळक घडामोडी :- १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.१९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.💥 जन्म :-१९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.२०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिवसानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांचं केलं नामकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे 52 शिक्षक निलंबित; बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या अंगलट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल कोश्यारींचं मोदींना राजीनामापत्र, मुंबई दौऱ्यातच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती, केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखरेच्या उत्पादनात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट; निर्यातीवर केंद्र सरकारनं बंधन लावल्यानं कारखानदार अडचणीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाळासाहेबांच्या जयंतीला शिवसेना आणि वंचितच्या युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती स्वीकारतील, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *500 कोटी रुपये खर्च करुनही पुण्यातील टेमघर धरणाची पाणी गळती सुरुच, जलसंपदा विभागाकडून आणखी 200 कोटींची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या विराट कोहली, सुर्यकुमार यादव आणि हार्दीक पांड्या या 3 खेळाडूंना मिळालं स्थान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/R1OdLe3NCes~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्ताने प्रासंगिक लेख*पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत : महर्षी मार्कंडेय*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. ..........वरील माहिती पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पंडित भीमसेन जोशी*पंडित भीमसेन जोशी (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्याषष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नव्या संसद भवनातील लोकसभा कक्षात बसण्यासाठी एकूण सिटे किती आहेत ?२) गोव्यातील कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला आहे ?३) युरोपचे रणक्षेत्र कोणत्या देशास म्हणतात ?४) केंद्र सरकारने २०२३ हे कोणते वर्ष म्हणून जाहीर केले आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे द्विशतकवीर किती व कोणते ?*उत्तरे :-* १) ८८८ सीटे २) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ३) बेल्जियम ४) तृणधान्य वर्ष ५) पाच - रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ईशान किशन व शुभमन गिल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. " " तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं. पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, " आम्ही महाराज आहोत. "पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे,उघड की दरवाजा. "" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. "महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.१९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.२००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण💥 जन्म :-१९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू१९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ१९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.१९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.२००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.२००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपत💥 मृत्यू :- १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर२०१४ - दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नेपाळमध्ये यति एअरलाईन्सरचं विमान कोसळलं, 68 प्रवाशांचा मृत्यू, यात पाच भारतीयांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईच्या एनटिसी मिलच्या जागेवरील चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा, म्हाडाकडून होणार पुर्नविकास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यभरात मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्सवात साजरा झाला. नांदेडमध्ये लहानथोरासह मोठ्यांनी देखील लुटला पतंग उडवण्याचा आनंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उमेदवारी देऊनही अर्ज भरला नाही, काँग्रेसचा डॉ. सुधीर तांबेंना हिसका, चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाढली थंडी ; महागली अंडी, अंड्यांच्या दरानं सर्व विक्रम मोडीत काढले, एक डझन अंड्याचा दर पोहोचला तब्बल ९० रुपयांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *थिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/j4UGjxOJN0E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर*द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६)हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते.१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नाटू नाटू' या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा पहिला आशियाई चित्रपट कोणता ?२) भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?३) जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?४) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार कोणी पटकावले ? ५) ७३ तासांत ७ खंडाचा प्रवास करण्याचा विश्वविक्रम कोणत्या दोन भारतीयांनी केला ?*उत्तरे :-* १) आरआरआर २) १८८१ ३) ८५ वा ( ५९ देशात व्हिसामुक्त प्रवेश ) ४) सचिन तेंडुलकर, भारत ५) सुजॉय कुमार मित्रा व डॉ. अली इराणी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.**याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भूगोल दिन* *मकरसंक्रांत*💥 ठळक घडामोडी :- १९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.१९४८ - लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.१९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.१९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर.💥 जन्म :-१८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.१८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.१९०८ - द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.१९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार१९२३ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते.१९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.१९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’, ऊर्दू शायर.१९७७ - नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.२०१४ - पं. पुरुषोत्तम वालावलकर, भारतीय हार्मोनियमवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *31 जानेवारी ते 6 एप्रिल, यंदा 66 दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकार गव्हावरील निर्यातबंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *फी न भरल्याने विद्यार्थिनीला अपमानित करुन परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांची तक्रार; दादरच्या शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरीत, लवकरच होणार वेतन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये सिन्नर - शिर्डी मार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-अनुला काय काय दिसतं**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/a0v-UeZYldc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**गोड गोड बोलण्याचा सण*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अभिनेत्री दुर्गा खोटे*दुर्गा खोटे ( जन्म १४ जानेवारी १९०५ - मृत्यू २२ सप्टेंबर १९९१ ) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.दुर्गाबाई यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे हिंदू धर्माच्या कोणत्या सणात म्हटले जाते ?२) नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता ?३) कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा जगातील पहिला 'रोबो वकील' कोणत्या देशात पक्षकारांना सल्ला देणार आहे ?४) देशातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे ?५) महिलांना कामासाठी उत्तम दर्जाचे वातावरण आणि संधी उपलब्ध करून देण्यात भारतातील अव्वल स्थानी कोणते शहर आहे ?*उत्तरे :-* १) मकरसंक्रांत २) सूर्य ३) अमेरिका ४) दिल्ली ५) चेन्नई*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवहार चपळे👤 दीपक उशलवार👤 स्वप्नील अबुज👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कांबळे👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवनकुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?**एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-* *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा* *होतील संग्राम गीते पुरी।* *देशार्थ होतील त्यागी विरागी* *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता,प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/01/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.१९६६ - मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली२०११ - भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला💥 जन्म :-१९३८ - पंडित शिवकुमार शर्मा१९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.१९४९ - राकेश शर्मा💥 मृत्यू :- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.२०११ : मराठी अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा 4 अंशापर्यंत जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एमपीएससी विद्यार्थ्यांचे आज राज्यव्यापी आंदोलन, त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस; नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषक सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिसेंबर महिन्यात सोने आयातीत 79 टक्क्यांची घट, 20 वर्षातील नीचांकी आयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. श्रीलंका - केएल राहुलची यशस्वी झुंज, अर्धशतकाच्या जोरावर भारताचा 4 गडी राखून विजय, मालिकेतही विजयी आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FxKHBNMx6ys~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तरुण भारत देश*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले सोलर शहर कोणते ?२) जगात सर्वात जास्त डेटा कोणत्या देशात स्वस्त मिळतो ?३) पृथ्वीच्या केंद्रस्थानाचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असेल असे अनुमान आहे ?४) कोणत्या जातीचा डास चावल्याने हत्तीपाय हा आजार होतो ?५) भारतातील कोणत्या राज्यात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते ?*उत्तरे :-* १) मलकापूर, सातारा २) इजरायल ३) सुमारे ५००० अंश सेल्सिअस ४) क्युलेक्स डास ५) उत्तरप्रदेश ( २९ % )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते.**बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही.म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा* एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12/01/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय युवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.💥 जन्म :-१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.💥 मृत्यू :- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; सेंद्रीय आणि देशी बीजोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी शिखर संस्था स्थापन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भीम अँप आणि रुपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची मोठी योजना, 2600 कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात ! ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून होणार खुला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'ऑस्कर' सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीत 'मी वसंतराव'चा समावेश होणं अभिमानास्पद : निपुण धर्माधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी, आज भरणार अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याचा पृथ्वी शॉ चे त्रिशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/bo1oFJXBWAY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजमाता जिजाऊ जयंती विशेष**आई असावी जिजाऊसारखी*जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाईवरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वामी विवेकानंद*स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'राष्ट्रीय युवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ कोठे साठवले जातात ?३) कोणता त्रिभुज प्रदेश 'हरित त्रिभुज प्रदेश' म्हणून ओळखला जातो ?४) अमेरीकेत पहिल्या शीख महिला न्यायाधीश बनण्याचा बहुमान कोणाला प्राप्त झाला ?५) राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) १२ जानेवारी २) पानांमध्ये ३) गंगा ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश ४) भारतीय वंशाची मनप्रीत मोनिका सिंग ५) भोसरी, पुणे*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुधाकर थडके, सहशिक्षक संचालक, सहकारी पतपेढी, नांदेड👤 डी. बी. शेख, लोहा👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर👤 सुरेश गभाले👤 भारत राठोड👤 नागनाथ भिडे👤 गणेश पाटील भुतावळे👤 अरशद शेख👤 नरेश परकोटवार👤 अमरदीप वाघमारे👤 राहुल दुबे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥देहेदु:ख ते सूख मानीत जावे।विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.**ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सागरातल्या रौद्ररुप धारण केलेल्या लाटांकडून फायद्याची अपेक्षा कधीच करु नये,कारण त्यांच्याकडून नुकसानच होते.ते कधीही शांत नसतातच.अशा सागरी लाटांपासून सावध रहा असा संदेश सागर किनारी असणा-या लोकांना इशारा दिला जातो.त्याचप्रकारे रौद्ररूप धारण करणारी माणसेदेखील सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसांचे कोणत्याही वेळी नुकसानच करतात.याउलट शांत आणि एका लयीमध्ये सागरातून किना-याकडे येणा-या लाटा सागराचे आणि किना-याचे सौंदर्य वाढवतात.ते कधीही कुणाचे नुकसान करत नाहीत. म्हणून माणसाने रौद्ररूप धारण करणा-या लाटांपेक्षा शांत तरंगणा-या लाटांप्रमाणे जीवनात स्थान निर्माण करुन सुंदर आयुष्य घडवावे आणि सुखी समाधानी व्हावे.जीवनात खुप काही सकारात्मक जीवन जगण्याची अपेक्षा निर्माण होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुझणारा घोडा* एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.💥 जन्म :-१८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.💥 मृत्यू :- १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठा निर्णय, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळनं बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारच्या 75 हजार नोकऱ्यांच्या भरतीत अडथळा येण्याची शक्यता, एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी दोन्ही नियुक्त कंपन्या असमर्थ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा सेवा संघाचं निमंत्रण नाही, मात्र नगरपालिकेकडून रितसर निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जानेवारी महिन्याची 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही, कामगार संघटना आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, तर मुंबईत 13 ते 14 जानेवारीदरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर ट्रिक फोटोग्राफी मास्टर पीटर परेरा यांचं निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND vs SL, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 67 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/n7FC58bV-9g~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विष्णू सखाराम खांडेकर*(जन्म : ११ जानेवारी १८९८ - मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केलेआपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्यावि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)पद्मभूषण पुरस्कार (१९६८)ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठीकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एक मोठे झाड प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत दरवर्षी किती किलो ऑक्सीजन देते ?२) वॉटर व्हिजन @२०२७ या थीमसह पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्री परीषद कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती ?३) पृथ्वीवर सर्वात पहिले सजीव केव्हा आढळले ?४) सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?५) पृथ्वीचा ऑक्सीजनचा सर्वात मोठा स्त्रोत कोण आहे ?*उत्तरे :-* १) १४ किलो २) जलशक्ती मंत्रालय ३) सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी ४) नर्मदा व तापी नदी ५) समुद्री शेवाळ*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सिध्देश्वर मोकमपल्ले👤 हणमंत पांडे👤 राहूल ढगे, सहशिक्षक👤 लोकेश येलगंटवार👤 साई यादव, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण सहज व्हायला हवी, ज्यासाठी पैसे नाही लागत , पण 'नातं' विणलं जातं, गुंफलं जातं त्यामुळे !**यामुळे देणा-याला वाटतं आपण काहीच दिलं नाही नि घेणा-याला वाटतं आपल्याला किती मिळालं ?**घर गुंफलं जाण्यासाठी सगळ्यांनीच टिव्हीपासून उठून एकमेकांच्यासमोर काहीवेळ तरी बसू या, दिवसभराबद्दल बोलू या, जरा हसू या, कधी फुंकर मारू या, कसं छान हलकं-फुलकं वाटतं मग !* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मा आणि ईश्वर हे एक असून ज्यांचे अंत:करणं शुद्ध आणि पवित्र आहे अशा ठिकाणीच परमेश्वर वास करत असतो.म्हणून नेहमी आपल्या अंतःकरणाला शुद्ध विचार,पवित्र मन,इतर जीवांना न दुखवता प्रसन्न ठेवणे,इतरांविषयी वाईट भावना न ठेवता जगणे,ह्या सा-यां गोष्टी आपल्या अंत:करणातून पवित्र मनाने जपल्या तर परमेश्वराशी नातं एकरुप होऊन एक आगळा वेगळा अनुभव आपल्या प्रत्ययास आल्याशिवाय राहत नाही.म्हणून आपले अंत:करण,आचार नि विचार पवित्र ठेवण्यास सदैव प्रयत्नशील असावे© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वानर व कोल्हा* एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची अरण्यात🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 गाठ पडली तेव्हा वानर🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यःकाही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्याला कधीही देणार नाहीत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.💥 जन्म :-१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे१९१९: संस्कृत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास💥 मृत्यू :- १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच लिंगायत समाजाचा मुंबईत निघणार महामोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rW-1XabWegk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गणेश हरी खरे*गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू ०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० मध्ये नो बॉल हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ?२) १०८ वी 'इंडियन सायन्स काँग्रेस' नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ?३) जगातील कोणत्या देशात सर्वाधिक लष्करी सेवा सक्तीची आहे ?४) पाळीव प्राण्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा कोणता ?५) संदेशवहनाची साधने कोणती ?*उत्तरे :-* १) अर्शदीप सिंग २) नागपूर ३) उत्तर कोरिया ( ८ ते १० वर्षे ) ४) गुंथर सहा, जर्मन शेफर्ड ( संपत्ती - ४१३२ कोटी ) ५) वर्तमानपत्रे, रेडिओ, टि. व्ही., मोबाईल, संगणक, पत्र इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद👤 साईनाथ सोनटक्के👤 राजेश कुंटोलू👤 गणेश वाघमारे👤 शत्रूघन झुरे👤 स्वरूप खांडरे👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी.हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरू ,परीक्षा ,शिष्य*गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल.आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे.*तात्पर्यः*अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.💥 जन्म :-१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोबिंद खुराना १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर 💥 मृत्यू :- १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तराखंडमध्ये जोशीमठमधील 500 घरांना तडे, पंतप्रधान मोदींनी दिलं मदतीचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका; महाराष्ट्रात करपा रोगामुळं शेतकरी चिंतेत, अनेक जिल्ह्यात धुक्याची चादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारमध्ये शनिवारी जातीनिहाय जनगणना सुरु झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की बीएसएनएल एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी झाली निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jE5SQ1jz6dY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पार्श्वगायक महेन्द्र कपूर*(९ जनवरी १९३४-२७ सितंबर २००८) हिन्दी फ़िल्मों के एक प्रसिद्ध पार्श्वगायक थे। उन्होंने बी आर चोपड़ा की फिल्मों हमराज़, ग़ुमराह, धूल का फूल, वक़्त, धुंध में विशेष रूप से यादगार गाने गाए। संगीतकार रवि ने इनमें से अधिकाश फ़िल्मों में संगीत दिया।महेंद्र कपूर का जन्म अमृतसर में हुआ था। पार्श्वगायन में कैरियर बनाने के लिए वे कम उम्र में ही मुंबई आ गए थे। 1953 की फिल्म ‘मदमस्त’ के साहिर लुधियानवी के गीत आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया से उन्होंने फिल्मी करियर की शुरुआत की थी। २७ सितंबर २००८ को बीमारी से लड़ने के पश्चात उनका देहावसान हो गया।*पुरस्कार और सम्मान*1963 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - चलो इक बार फ़िर से (ग़ुमराह)1967 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नीले गगन के तले (हमराज़)1974 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नहीं नहीं (रोटी कपड़ा और मकान)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली महिला कोण ?२) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२२ मध्ये पहिल्या क्रमांकाचे तीन देश कोणते ?३) 'सुपर मॉम' ह्या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?४) सूर्यकिरणांमधील कोणती किरणे जंतुनाशक असतात ?५) इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना केली होती ?*उत्तरे :-* १) प्रिया जिंघन २) स्वित्झलंड, अमेरिका, स्वीडन ३) मेरी कोम ४) अल्ट्राव्हायोलेट ५) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ( इ. स. १६०० )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास अनिल देशमुख👤 माधव नरवाडे👤 आमिर अली शेख👤 अजित राठोड👤 राजेश रामगिरवार👤 गजानन सोनटक्के👤 सुप्रिया ठाकूर👤 श्याम कुमारे👤 विष्णुकांत इंगळे👤 शिवकुमार पंतुलवार👤 हमीदसाब शेख👤 चालू अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.**शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात जशी चांगल्या विचारांची गरज आहे तशीच चांगल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे.हे दोघेही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असून ते आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.यांना कधीही अंतर देऊ नका.त्यांची आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी गरज लागते.परंतु गरजेपुरता वापर करत असताल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी कठीण होऊन बसेल.त्यांना आपल्या नात्यांप्रमाणे जपायला हवे.तरच तुमचे जीवन कृतार्थ बनेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *छोटी-छोटी बातें* पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चिनत हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्र यास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण। कील न ठुकाई, घोडा मरा। स्वार न पहुंचा देश हारा॥*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/01/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका.💥 जन्म :-● १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर● १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९६६ - संगीतकार ए. आर. रेहमान💥मृत्यू● २०१० - प्र. ई. सोनकांबळे, लेखक● १८५२ - ब्रेल लुई*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2024 मध्ये होणार गगनयानचे प्रक्षेपण, इस्रोचे अध्यक्ष डॉ.एस सोमनाथ यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण ! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी *•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धुळ्यातील जनावरांचे बाजार पूर्वीप्रमाणे भरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पोलिस भरतीसाठी चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी, औरंगाबादमध्ये तब्बल 1631 उच्चशिक्षित उमेदवार पोलिस भरतीच्या रांगेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या; काँग्रेसची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे निधन; अमेरिकेतील मराठी आवाज हरपला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, मालिका बरोबरीत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/kemVs2B0MZU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य बाळशास्त्री जांभेकर*बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_5.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कपिलदेव निखंज*कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये 1983 मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट क्षेत्रातील योगदान - कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रणजी करंडकाच्या इतिहासात डावाच्या पहिल्या षटकात हॅटट्रिक घेणारा पहिला फलंदाज कोण ठरला ?२) महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत ?३) जगातले सर्वात स्वच्छ ( शुध्द पाणी, हवा आणि स्वच्छता ) प्रथम तीन देश कोणते ?४) पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?५) ग्रहमाला सूर्यकेंद्रीत आहे असे कोणी प्रतिपादित केले ?*उत्तरे :-* १) जयदेव उनाडकट २) सुधीर मुनगंटीवार ३) डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्वित्झलंड ४) हिरड्या ५) निकोलस कोपर्निकस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक अडकटलवार👤 साईनाथ जगदमवार👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे👤 बजरंग माने👤 सुदर्शन कोंपलवार👤 श्रीनिवास गंगुलवार👤 मोहन घोसले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.**स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार गोनू*मिथिला नगरीत राहणार्या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला 1,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला 1,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला 500 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*💥 ठळक घडामोडी :- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.२००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.💥 जन्म :-१८०९ - ब्रेल लुई १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री१९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.२०२२ - अनाथांची आई सिंधुताई सपकाळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाषण स्वातंत्र्यावर अतिरिक्त निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतात बेरोजगारीच्या आकड्यानं गाठला 16 महिन्यातील उच्चांक, डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 वर पोहोचलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 सामन्यात भारताचा दोन धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6V4e-IEAeEc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत ( जन्म ४ जानेवारी १९१४ - मृत्यू १३ जुलै २००० ) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्योदयाच्या काही काळ अगोदर आणि सूर्यास्तानंतर काही काळ आपल्याला एक विशिष्ट रंगाचा प्रकाश मिळत असतो त्याला काय म्हणतात ?२) ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू राहिलेले माजी पोप बेनेडिक्ट हे कितवे पोप होते ?३) स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या कारकिर्दीत स्थापन झाल्या ?४) सरदार वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी कोणी दिली ?५) 'चर्पटपंजरी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?*उत्तरे :-* १) संधिप्रकाश २) १६ वे ३) लॉर्ड रिपन ४) महात्मा गांधी ५) वायफळ बडबड करणे.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.**तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात. ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात. प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते.तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो. त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी, मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली, जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो. अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 07:00 वा. ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ★ १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.★ १८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.★ १९३६: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली.💥 जन्म :-★ १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद★ १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा 💥 मृत्यू :- ★ २००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल★ २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्ष नवी मेगाभरती ; बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी लवकरच होणार भरती प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव्या उत्साहात, नव्या जोमात... नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश, नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं, सुट्टीचा दिवस असल्याने राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अग्नितांडवाचा थरार! इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग, दोन महिलांचा मृत्यू तर, 17 जखमी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल, अनुचित घटना टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांचं घरातूनच डॉ. आंबेडकरांना अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि शेकापचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात झाले निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 102 वर्ष होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाखो विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता, राज्यातील 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-8वा/ The Golden chain कविता👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Uu-z5s1S0TE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वसंत गोवारीकर*वसंत रणछोड गोवारीकर ( जन्म २५ मार्च१९३३ मृत्यू - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.*सौजन्य :- इंटरनेट*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिला वीर बाल दिवस केव्हा साजरा केला गेला ?२) पश्चिम बंगालमधील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावली ?३) माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचे नाव काय आहे ?४) पृथ्वी व सूर्यातील अंतर कमी असणे या खगोलीय घटनेला काय म्हणतात ?५) टेस्ट एटलॉस या वेबसाईटने तयार केलेल्या यादीनुसार सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*उत्तरे :-* १) २६ डिसेंबर २०२२ २) हावडा ते न्यू जलपायगुडी ३) सदैव अटल ४) उपसूर्य ५) पाचवा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद👤 कविता जोशी, शिक्षिका👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 मोगरे शंकर👤 श्रीकांत काटेलवार👤 आनंदराव धोंड👤 रवी खांडरे👤 अक्षय घाटे👤 सचिन कौटवाड👤 संजय पांचाळ👤 संजय फडसे👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 प्रदीप ढगे👤 नरसिंग पेंटम👤 शहाजी पालवे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा.ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान.जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)