✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २१६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी,भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.**१९९८:फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९३:राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या दिव्यांग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.**१९८४:'अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ’बुर्किना फासो’ असे करण्यात आले.**१९५६:भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९४७:जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.**१९२४:सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९१४:पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९६५:विशाल भारद्वाज-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीत संयोजक आणि पार्श्वगायक* *१९६१:बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते**१९५९:लीना आनंद दामले-- लेखिका* *१९५८:राजीव तांबे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९५६:श्रद्धा बेलसरे-खारकर-- कवयित्री लेखिका* *१९४८:अनिल निगुडकर-- भोपाळ येथील सुप्रसिध्द कवी* *१९४४:दिलिप प्रभावळकर- मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते**१९३२:शशिकला(शशिकला सैगल)-- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री(मृत्यू :४ एप्रिल २०२१)**१९३१:नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (मृत्यू: १९ मार्च २००२)**१९२९:आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक(मृत्यू:१३ आक्टोबर १९८७)**१९१६:कमला फडके-- मराठी लेखिका (मृत्यू:६ जुलै १९८०)**१९०४:विश्वेश्वरराव अंबादासराव कानोले-- इतिहास संशोधक(मृत्यू :२ फेब्रुवारी १९८४)**१९०४:शंकर बाळाजी शास्त्री-- प्रतिभावंत कवी 'युगवाणी'चे संपादक (मृत्यू:२८ जुलै १९७३)* *१८९४:नारायण सीताराम तथा ना.सी.फडके – सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते (मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)**१८६३:महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान (मृत्यू:१४ऑक्टोबर,१९४२)**१८४५:सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक(मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)**१८३४:जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:पद्मा सचदेव-- कादंबरीकार,डोंगरी भाषेतील त्या पहिल्या आधुनिक महिला कवयित्री(जन्म:१७ एप्रिल १९४०)* *२०२०:इब्राहिम अल्काझी-- भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि नाटक शिक्षक(जन्म :१८ ऑक्टोबर १९२५)* *१९९७:जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (जन्म:२१ फेब्रुवारी १८७५)**१९४३:केशव लक्ष्मण टेंभुर्णीकर -- कवी (जन्म:१८९१)**१९३७:डॉ.काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)**१८७५:हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (जन्म: २ एप्रिल१८०५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!नववा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2901874326605989&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकची काठेगल्ली शाळा 'स्मार्ट स्कूल'मध्ये देशात दुसरी, गोव्यात होणार पुरस्कार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सायकल चालवायला घाबरायची, पण वडिलांच्या पाठिंब्याने शर्मिन शेखने थेट मेट्रोचं स्टेअरींग घेतलं हाती, मोदींनी दाखविला हिरवा झेंडा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारकडून लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध; 'मेक इन इंडिया'चा आग्रह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार, मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *अमरावती* एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात *पॉवरफुल चलन* कोणत्या देशाचे आहे ?२) कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य हे कशावर आधारित असते ?३) संयुक्त राष्ट्रांद्वारे अधिकृतपणे जगभरातील किती देशांच्या चलनांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे ?४) भारताचे चलन कोणते ?५) अमेरिकेचे चलन कोणते ?*उत्तरे :-* १) कुवैत ( आखाती देश ) २) अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा ३) १८० देश ४) रुपया ५) डॉलर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश अमृतवार👤 शिलानंद बुद्धेवार, बिलोली👤 गणेश गं. उदावंत👤 निवेदक विठ्ठल पवार👤 अमित सूर्यवंशी, नागपूर👤 प्रतिभा येवतीकर, मुखेड👤 आनंदराव आवरे👤 प्रभाकर रेब्बावार, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल जेव्हा, आपल्याला आशा दाखवतात तेव्हा, मात्र आपल्याला खूप आनंद होत असतो. पण, त्याच दाखविलेल्या आशेची जेव्हा निराशामध्ये रूपांतर होते तेव्हा मात्र आपल्याला खूप दु:ख होत असतो. मग ती व्यक्ती कोणीही असो कितीही नावाजलेली असो, त्या,व्यक्तीवरचा पूर्णपणे विश्वास उडून जातो. म्हणून चुकूनही कोणाला अशा प्रकारची आशा दाखवू नये. व समोरच्या व्यक्तीला दु:ख होईल असे वागू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कबुतर आणि घार*एकदा कबुतरांनी गरुडाला घाबरून आपले संरक्षण करण्यासाठी एका घारीला आपल्या कळपाचे प्रमुख म्हणुन नेमले. घारीने याचा फायदा घेतला. एक एक कबुतराला आपल्याला भेटण्याचा आदेश देऊन ती त्यांना मारून खात असे. गरुडापेक्षा जास्त कबुतरांना त्या घारीने मारले. कबुतराला हे लक्षात आले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला, पण आता फार उशीर झाला होता. “रोगापेक्षा इलाज भयंकर”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment