✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००४:राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.**२०००;मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.**१९९४:संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९४:सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.**१९६०:नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४८:भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.**१९३६:आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.**१९१४:बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.**१९००:’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.**१७८३:जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:सुनील छेत्री-- भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू* *१९७७:सुनील ग्रोव्हर--- भारतीय विनोदी अभिनेता* *१९६७: बिपिन मयेकर -- लेखक**१९६५:प्रा.डॉ.शुभांगी रामचंद्र परांजपे (डोरले)-- कवयित्री,लेखिका* *१९५९:अजय बिरारी -- अहिराणी व मराठी कवी,गझलकार व कलाकार* *१९५६: विजया सुकाळे-- लेखिका* *१९५६:बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू**१९५६:प्रकाश शंकरराव जंजाळ-- लेखक* *१९४९:रमेश भाटकर -- मराठी चित्रपट, रंगमंच आणि टीव्ही अभिनेता(मृत्यू:४ फेब्रुवारी २०१९)**१९४२:अनु आगा-- भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या**१९३३:माणिक कामिनी कदम-- कामिनी कदम या नावाने प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री(मृत्यू: १८ जून २०००)**१९३२:भा.ल.महाबळ-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक**१९२४:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)**१९१६:शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू:२० एप्रिल१९७०)**१९००:क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू:६ डिसेंबर १९७६)**१८९८:उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९६६)**१८८७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर-- कवी, जुन्या पिढीतील महत्वाचे समीक्षक (मृत्यू:१७ डिसेंबर १९४२)* *१८८६:मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)**१८६३:सालोमन शालोम आपटेकर: नाटककार व किर्तनसंहिता- लेखक (मृत्यू:२१ हे १९५७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:मिथिलेश चतुर्वेदी--भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता(जन्म :१५ऑक्टोबर१९५४)**२०२०:जॉन ह्यूम - आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी (जन्म: १८ जानेवारी १९३७)* *२००७:सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)**१९९३:स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म:८ मे १९१६)**१९५७:देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म:१९००)**१९३०:व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2892952320831523&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात एक लाखाहून अधिक जणांना 'डोळे आले', महाराष्ट्राला जडलाय डोळ्याचा आजार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या 'आंबोली'त 4500 मिमी पावसाची नोंद, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या तरी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅसिना आणि ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्क्यांचा जीएसटी कर लागू, 1 ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुंबईतील कॉलेज कडून बुरखा बंदीचा निर्णय मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे दुःखद निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टी-२० सामना गुलुराव येथे होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नितीन चंद्रकांत देसाई*नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. तसेच अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कल दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवलं आहे. 🌹 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🌹*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे पार पडणार आहे ?३) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोणत्या संस्थेच्या यजमानपदाखाली आयोजन करण्यात आले आहे ?४) ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?५) महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन किती वर्षांनी भरविले जातात ?*उत्तरे :-* १) अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक २) सांगली, महाराष्ट्र ३) बर्ड साँग ४) २३ व २४ डिसेंबर २०२३ ५) वर्षातून एकदा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पोतन्ना चिंचलोड, सामाजिक कार्यकर्ता, धर्माबाद👤 अजय बिरारी, साहित्यिक, नाशिक👤 शिवराज धोंडापुरे, चिरली, बिलोली👤 प्रदीप कारले👤 भवर सिंग, राजस्थान*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मागे गेलेले दिवस किंवा सर्वासोबत मिळून, मिसळून घालवलेले आनंदाचे क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. त्या सर्व आठवणी मात्र सदैव स्मरणात राहत असतात. म्हणून आजचा दिवस सुद्धा आपलाच आहे. आपल्यासाठी आहे या दिवसाचे महत्व जाणून त्या पद्धतीने आपण जगावे व त्याच जगण्यातून इतरांनाही जगायला लावावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंगी आणि टोळ*मुंगी फार मेहनती असते. त्या अतिशय मेहनतीने कण कण वाळु गोळा करून आपल्यासाठी वारूळ बनवतात. दूर दूर फिरून शिस्तीत कण कण अन्न गोळा करून वारुळात सुरक्षित ठेवतात. ही वारुळे आणि अंतरे त्यांच्या आकाराच्या मानाने प्रचंड असतात. हिवाळ्यात जेव्हा त्यांना अन्न मिळणे दुरापास्त होते त्यासाठी त्या आधीच उन्हाळ्यात राब राब राबुन अन्न साठवुन ठेवतात जेणेकरून पुढे उपासमार होऊ नये. त्यामानाने टोळ उनाड असतो. गुणगुणत नाचत रमत गमत इकडेतिकडे भटकत वेळ घालवत असतो. असंच एका टोळाची हिवाळ्यात उपासमार व्हायला लागली तेव्हा त्याने मुंगीकडे मदत मागितली. मुंगीने त्याला सुनावले “आम्ही जेव्हा राबत होतो तेव्हा तु नाचत उनाडक्या करत होतास. आता अन्न मिळत नाही म्हटल्यावर तु आमच्याकडे मदत मागतो आहेस. आम्ही का आमची मेहनत तुझ्यासारख्या आळश्यावर वाया घालवु? आता हा हिवाळाही असंच नाचत नाचतच घालव.”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment