✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७२:आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.**१९६९:लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.**१९५६:भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.**१९५१:अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळाले.**१९३९:जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.**१९१४:रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.**१९११:पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: राजेंद्र बाबूराव उगले-- कवी,लेखक**१९७०:गणपती कळमकर-- लेखक* *१९६७:मोहन यशवंत सिरसाठ- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४९:अवधूत यशवंत कुडतरकर-- कवी, कथाकार कादंबरीकार* *१९४९:तुळशीराम बोबडे-- कवी,लेखक* *१९४९:पी.ए.संगमा– माजी लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री( मृत्यू:४ मार्च २०१६)**१९४८:प्रा.डॉ.ईश्वर तुकारामजी नंदापुरे-- कवी,लेखक समीक्षक* *१९४७:प्रा.डॉ.विनायक नारायण गंधे-- लेखक, संपादक* *१९४६:पंढरीनाथ तामोरे--लेखक, संशोधक* *१९४४:प्रा. तानसेन जगताप-- लेखक* *१९४४:अनिल वसंत बळेल-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१९)* *१९४०:यशवंत हरी पाध्ये--ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक(मृत्यू:४आक्टोबर २०१४)* *१९३६:डॉ.वसुधा भिडे-- कवयित्री* *१९३५:दयाराम आत्माराम बारस्कर-- प्रसिद्ध लेखक* *१९३३:सी.अर्जुन-- प्रतिभावान चित्रपट संगीतकार (मृत्यू:३० एप्रिल १९९२)**१९३२:कवळू बळीराम पेंदे-- कवी* *१९३२:नारायण जनार्दन जाईल-- प्रसिद्ध कादंबरीकार कथाकार**१९२३:हबीब तन्वीर-- हिंदी व उर्दू नाटककार,नाट्य दिग्दर्शक,कवी आणि अभिनेते (मृत्यू:८जून २००९)**१९२१:माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज(मृत्यू:२३ मे, २०१४)**१९१५:राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२).(मृत्यू: १९८४)**१९०८:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)**१८६७:बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर-- कवी, अनुवादक (मृत्यू:४ डिसेंबर १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)**१८९३:काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती,कायदेपंडीत, समाजसुधारक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म:३० ऑगस्ट १८५०)**१७१५ :सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.(जन्म:५ सप्टेंबर १६३८)**१५८१:गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)**१५७४:गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (जन्म: ५ मे १४७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताटप टप टप काय बाहेर वाजतंय् ते पाहू ।चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ ।।भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?गडड्गुडुम गडड्गुडुम ऐकत ते राहू ।।ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ? - कवी श्रीनिवास खारकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन; 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; पूनावाला यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोराडी विद्युत प्रकल्पात कोळशाचा वापर नको - आदित्य ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषिमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या मायदेशातील सामन्याचे अधिकार रिलायन्स जिओ आणि वायकॉम 18 कडे, 5966 कोटींची बोली, हॉटस्टारचा पत्ता कट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सातारा* महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या राज्यात फाईव्ह स्टार हॉटेल्स ( पंच तारांकित हॉटेल्स ) सर्वाधिक आहेत ?२) भारतात सर्वाधिक पंच तारांकित हॉटेल्स असलेले पहिले तीन राज्य कोणते ?३) सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?४) आर्थिक विषमता म्हणजे काय ?५) पांढऱ्या छातीचा ढीवर या पक्ष्याचे मुख्य अन्न कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ ( ४५ हॉटेल्स ) २) केरळ ( ४५ ), महाराष्ट्र ( ३७ ), गोवा ( २७ ) ३) कृष्णा ४) उत्पन्न, संपत्तीचे लोकसंख्येमधील असमान वितरण होय. ५) मासे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 विजय भगत, शिक्षक, वाशीम👤 शिवाजी पाटील येडे👤 प्रल्हाद जाधव, देगलूर👤 कोंडीबा मुत्तलेवाड👤 संभाजी कोंडलवाडे👤 नागनाथ कौडगावे👤 दिनेश सारंगे👤 आर. डी. चिंतलवाड👤 नवनाथ पिसे👤 आर. के. उन्हाळे👤 सुनीता गायकवाड, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" प्रसंगांचे गांभीर्य "*एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलंडुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि 🐱 आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".( तात्पर्य ) - तत्त्वचिंतक म्हणाला, दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment