✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक छायाचित्रण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २३१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.**१९४५:हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.**१९१९:अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९०९:इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.**१८५६:गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:जगदीशचंद्र शरदचंद्र पाटील-- लेखक,निर्माता,व्याख्याते**१९८०:सुनील प्रभाकर पांडे -- मराठी साहित्यिक* *१९७२:मोहन कुंभार -- लेखक कवी* *१९७१:उत्तम निवृत्ती सदाकाळ-- लेखक कवी**१९६५:हेमंत बिर्जे -- भारतीय अभिनेता**१९५९:प्रा.रेखा अशोक कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका संपादिका* *१९५५:डॉ.अशोक नरहरराव देव-- लेखक, संपादक* *१९५०:सुधा कुळकर्णी-मूर्ती-- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका* *१९४६:बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष**१९४६:प्रा.मधुकर गोपाळ देशपांडे -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक**१९४३:शरद सांभराव देऊळगावकर-- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक* *१९२२:बबनराव नावडीकर(मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार(मृत्यू:२८ मार्च २००६)**१९१८:शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)**१९०७:सरदार स्वर्ण सिंग – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर१९९४)**१९०६:प्राचार्य गणेश हरि पाटील-- मराठी कवी,शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यिक (मृत्यू:१ जुलै १९८९)**१९०५:वामन भार्गव पाठक-- कवी, कादंबरीकार,समीक्षक (मृत्यू:२७ जानेवारी १९८९)**१९०३:गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)**१८८६:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे नेते,वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:खय्याम(मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी)-- भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक(जन्म:१८ फेब्रुवारी १९२७)**२०१९:प्रा.मोतीराज राठोड-- विमुक्त भटक्या चळवळीचे लढवय्ये नेतृत्व,अभ्यासक, साहित्यिक,संशोधक( जन्म:२ सप्टेंबर १९४७)* *१९९४:लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म:२८ फेब्रुवारी १९०१)**१९९३:उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)**१९९०:रा.के.लेले – पत्रकार,संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक* *१९७५:डॉ.विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)**१९४७:विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(जन्म:१९ जानेवारी१९०६)**१६६२:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रावणातल्या कविता*हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आलातांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आलामेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आलालपत छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आलाइंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आलालपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आलासृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला- कुसुमाग्रजसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गौरी गणपती तसेच दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा! भाज्या, खाद्यतेल, इंधन स्वस्त होणार, मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जळगाव : मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ! फक्त 30 किमी अंतरावर, लँडिंगसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठलाची तिजोरी भरली, अधिक मासात भक्तांकडून 7 कोटी 19 लाखांचे दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. आयर्लंड पहिल्या T20 सामन्यात भारताचा दोन धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *कोल्हापूर* महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.➖रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'ज्ञानरचनावाद - समजपूर्वक शिक्षण'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) वीर - विरांगणांच्या सन्मानार्थ कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?३) जगप्रसिद्ध एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंगचे बालपणीचे नाव काय होते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय होते ?५) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे ?*उत्तरे :-* १) अशोक चेपटे व युवराज माने ( दोन्ही प्राथ. शिक्षक ) २) मेरी माटी, मेरा देश ३) नामग्याल वांगडी ४) सुभाषचंद्र जानकीनाथ बोस ५) राजस्थान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. शिवा टाले, नांदेड👤 उत्तम सदाकाळ, साहित्यिक, जुन्नर👤 संभाजी पा. वैराळे👤 महेश हातजाडे👤 संतोष कडवाईकर👤 संदीपराजे गायकवाड, मुख्याध्यापक, बिलोली👤 प्रिती माडेकर-दरेकर, वणी, यवतमाळ👤 योगेश मठपती👤 कवयित्री अंतरा👤 मोहन शिंदे👤 मन्मथ चपळे👤 विलास वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥तया अंतरी क्रोध संताप कैंचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाणी गढूळ दिसत असले तरी तो सदैव निर्मळ असते कारण उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात गरम,थंड या प्रकारे पाण्यात थोडे बदल करून आपण आंघोळीसाठी पाण्याचा वापर करत असतो . पण,शेवटी पाण्याशिवाय आपले काम होत नाही. तसंच आपल्यावर आलेल्या परिस्थितीतून शिकून घ्यावे, हीच जाणीव ठेवून आपण देखील स्वत:त बदल करून घेण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. आपले विचार नेहमीच सकारात्मक असू द्यावे. निर्मळ पाण्यासारखे!🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गवळण आणि तिच्या घागरी* राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरीं मध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार ती करू लागली." जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबड्या विकत घेईन." तिने विचार केला, "कोंबड्या अंडी घालतील आणि मला अजून कोंबड्या मिळतील, त्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन, गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील. ते मला विचारतील, "तुला पोल्ट्री फार्म विकायचे आहे का?" पण मी डोकं असं हलवून नकार देईन असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली. तात्पर्य: पेरल्याशिवाय उगवणार नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment