✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* *_ या वर्षातील २४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९७४:चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७:डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८:लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३:युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१:मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५:पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८:वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४:नेताजी रामदास सोयाम-- कवी* *१९७०:डॉ.श्रीराम यशवंत गडेकर-- लेखक, समीक्षक* *१९६९:कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनंत वासुदेव माळवे-- लेखक,कवी* *१९६०:संजय वासुदेव कठाळे-- लेखक* *१९५८:मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक,संगीतकार,निर्माता, अभिनेता (मृत्यू:२५ जून २००९)**१९५७:मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५०:लीना चन्दावरकर- हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७:शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४:डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक-- कथाकार,कवयित्री,लेखिका**१९२९:गो.मा. पुरंदरे-- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५:इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट १९८२)**१९०५:मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू:३ डिसेंबर १९७९)**१९०१:पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू:२७ एप्रिल १९८०)**१८८०:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक,राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू:२६ जानेवारी १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)**२००७:बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म:५ नोव्हेंबर १९१७)**२०००:विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म:५ आक्टोबर १९२३)* *१९८६:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:१५ जून १८९८)**१९७६:काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. (जन्म:२५ मे १८९९)**१९७५:इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२)**१९६९:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म:२० आक्टोबर १९१६)**१९०६:बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक,ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *रक्षाबंधन*भाऊ बहिणीचा सणत्याचे नाव रक्षाबंधनओवाळते भाऊरायाबहिणीचे करतो रक्षणधागा नाही हा कच्चात्यात प्रेमाचे आहे बंधनवर्षानुवर्षे टिकविण्यासाठीकरू या ऋणानुबंध मंथनबहीण नाही ज्या भावालाप्रेमासाठी पहा तळमळतोराखी बांधून घेण्यासाठीतो एका बहिणीला शोधतोदेशातल्या आया बहिणीवरपहा अत्याचार किती वाढलेएक भाऊ येईना चालून पुढेबहिणीला जे त्याने वचन दिलेप्रत्येक स्त्री बहिणीसमान मानावेप्रत्येक भाऊला हे कळले पाहिजेतोच दिवस रक्षाबंधनाचा खरा आपण साजरा केला पाहिजे.- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी आज जाहिरात येणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोयना धरणातील पाणी वीज निर्मितीऐवजी पिण्यासह शेतीसाठी वापरा, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोर्डाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी; निकालाची टक्केवारी 32.13 टक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास! सात वर्षात सात सुवर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *रायगड* महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशाजवळ आहे ?२) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?३) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?४) राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो ?५) भारतीय हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जिंकली ?*उत्तरे :-* १) अमेरिका ( ८१३३ टन ) २) पंतप्रधान ३) राष्ट्रपती ४) सन १९९२ ५) चौथ्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रामचंद्र गणपत वास्ते, शिक्षक गव्हाणे बागल वस्ती पंढरपूर 👤 रवी शिंदे, साहित्यिक, बिलोली👤 रवींद्र केंचे, साहित्यिक👤 शिवराज पाटील चोळखेकर, धर्माबाद👤 ईश्वर सेठीये👤 विनायक कुंटेवाड, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 गणेश राऊत👤 अनिरुद्ध खांडरे👤 गणेश येडमे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥ मनीं कामना राम नाही जयाला। अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल जेव्हा, आपल्याला माहिती मिळते त्यावेळी मात्र आपला आनंद गगणात मावेनासा होतो कारण, तो आनंद विशेष गोष्टीबद्दल असतो. आपल्या कर्तृवाचा असतो. अशा वेळी, आपण स्वतःही आनंदीत रहावे व इतरांना सुद्धा त्या आनंदात सहभागी करून घ्यावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃❝ अहंकार ❞❃* ━━═•●◆●◆●•═━━ उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला. *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* अहंकार आणि अहंकार्याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment