✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*१९९१:किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७१:अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.**१९७०:राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.**१९९६:पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९६२:त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५७:मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४७:भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:आनंदा हिरालाल जाधव-- कवी, लेखक**१९७७:नारायण दादासाहेब गडाख-- कवी, गीतकार, लेखक* *१९७१:मंगेश मधुकर कवटीकवार -- कवी* *१९६९:जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज**१९६७:मुक्ता संजीव कुलकर्णी-- कवयित्री* *१९५६:ज्योती चांदेकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री**१९५४:अलकनंदा साने -- कवयित्री, लेखिका**१९५०:पंडित उल्हास यशवंत बापट-- प्रसिद्ध संतूरवादक(मृत्यू:४ जानेवारी २०१८)**१९४४:वामन अच्युत देशपांडे -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक,संत वांड:मयांचे गाढे अभ्यासक* *१९४४:क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४०:शिवाजी सावंत – ख्यातनाम मराठी कादंबरीकार.त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी,कन्नड,गुजराती,मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१८ सप्टेंबर २००२)**१९३१:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू:१० जुलै २००५)**१९१९:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू:३१ आक्टोबर २००५)**१९१३:प्रा.सदाशिव नारायण दीक्षित-- कवी, लेखक**१९०७:रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ मार्च १९५७)**१८९३:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक(मृत्यू:५ जानेवारी १९६१)**१८७०:मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.(मृत्यू:६ मे १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रणव मुखर्जी- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(जन्म:११ डिसेंबर १९३५)* *२०१२:काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)**२०००:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता(जन्म:५ एप्रिल १९६०)**१९९५:सरदार बियंत सिंग-‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या(जन्म:१९ फेब्रुवारी १९२२)**१९७६:देविदास गोविंद लांडगे -- इतिहास संशोधक,लेखक (जन्म:१८८९)* *१९७३:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(जन्म:१९ एप्रिल १८९२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *नभं उतरू आलं....*नभं उतरू आलं, चिंब थरथर वलंअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरातअशा वलंस राती, गळा शपथा येतीसाता जल्मांची प्रीती, सरंल दिनरातवल्या पान्यात पारा, एक गगन धरातसा तुझा उबारा, सोडून रीतभातनगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलूगाठ बांधला शालू, तुझ्याच पदरागायक / गायिका : आशा भोसलेसंगीतकार : हृदयनाथ मंगेशकरगीतकार : ना.धो.महानोरचित्रपट : जैत रे जैतसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची झाली निवड, त्यामध्ये रविंद्र बिष्णोई पहिल्या 10 जणांच्या यादीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दोन दिवसांनंतर गोंदिया मधील शेतकऱ्याचं आंदोलन स्थगित, चार सप्टेंबरपर्यंत तांदळाचे पैसे मिळणार; आमदार विनोद अग्रवालांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक, हॉटेलबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा; 280 खोल्या आरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही; अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करुन ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता.. सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शासकीय भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा, परीक्षेसाठी 100 रुपयांचं शुल्क घ्या; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पालघर जिल्ह्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार बाबरचे झंझावती दीडशतक, इफ्तिखारचे वादळी शतक, पाकिस्तानचा नेपाळसमोर 342 धावांचा डोंगर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सांगली* महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिती कोणतीही असो हार न मानता लढायला शिका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दरवर्षी 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' केव्हा साजरा केला जाणार आहे ?२) चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे ?३) चंद्रयान - २ कोसळले त्या ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जाईल ?४) भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत एल - १ कक्षेत कोण भ्रमण करणार आहे ?५) जागतिक महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) २३ ऑगस्ट २) शिवशक्ती पॉईंट ३) तिरंगा ४) आदित्य - एल १ ५) २६ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नांदेड👤 रत्नाकर पा. कदम चोळखेकर, धर्माबाद👤 संतोष पाटील साखरे, बिलोली👤 सुभाष जाधव, शिक्षक, देगलूर👤 सचिन वाघ, शिक्षक, बुलढाणा👤 उदय मोहिते, शिक्षक, कोल्हापूर👤 प्रकाश कल्याणकार👤 अशोक मुदलोड, येवती👤 अशोक जायेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु।निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांची रहाणीमान वेगवेगळी असते. प्रत्येकांचा स्वभाव सुध्दा वेगळा असतो. कारण, हे जग खूप मोठे आहे. आपण त्यांच्यासारखे वागायचे किंवा रहायचे ठरवले तर. .कदाचित ते, जमणार नाही. म्हणून आपण ज्या परिस्थितीत जगत आहात त्याच परिस्थितीला आपलेसे करून समाधानी राहून जगून बघावे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद नक्कीच मिळेल... फक्त, त्या,परिस्थितीला आपलेसे करता आले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी*एका राज्यात मूर्ख राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले,’’ या कुणाच्या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्या उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.तात्पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment