✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.**२००५:ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात**१९९९:कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.**१९४२:शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.**१९२०:अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१८४१:जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:सोमनाथ विश्वनाथ गायकवाड-- कवी* *१९८०:प्रीती जंघियानी – अभिनेत्री**१९७९:सावनी शेंडे-साठ्ये-- आघाडीची शास्त्रीय संगीत गायिका**१९७६:प्रा.डॉ.वीरा पवन मांडवकर-- लेखिका, संपादिका* *१९७२:राजश्री विठ्ठल सुतार-- कवयित्री लेखिका* *१९६७:दलेर मेहंदी – भांगडा गायक**१९६५:मुरलीकुमार सोळंके-- लेखक* *१९५९:कामिल पारेख-- लेखक* *१९५९:पूर्णिमा प्रदीप हुंडीवाले-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५६:संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज**१९५५: डॉ.मधुसूदन एकनाथ घाणेकर-- विश्वविख्यात हस्ताक्षर मनोविष्लेशण तज्ञ, संपादक, सुप्रसिद्ध कलाकार* *१९५२:विलास गिते-- लेखक, अनुवादक* *१९४४:शैलजा भालचंद्र काळे -- बालसाहित्यिक (कथा, कादंबरी कविता चरित्र इ.)(मृत्यू:८ एप्रिल २०१०)**१९३६:रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर**१९३४:संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक**१९२३:सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)**१९००:विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू:१ डिसेंबर १९९०)**१८८६:सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)**१८७२:’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)**१७३४:रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)**१७००:थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:प्रभाकर लक्ष्मण मयेकर-- मराठी नाटककार, मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध(जन्म :४ एप्रिल १९४६)* *२००८:नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)**_१९७९:महानायक वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:१ जुलै १९१३)_**१९९८:पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)**१९४५:नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म:२३ जानेवारी १८९७ )**१९४०:वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रावणातल्या कविता*आला आषाढ-श्रावण– बा.सी.मर्ढेकरआला आषाढ-श्रावणआल्या पावसाच्या सरी;किती चातकचोचीनेप्यावा वर्षाऋतू तरी!काळ्या ढेकळांच्या गेलागंध भरून कळ्यांत;काळ्या डांबरी रस्त्याचाझाला निर्मळ निवांत.चाळीचाळीतून चिंबओंली चिरगुटें झाली;ओल्या कौलारकौलारींमेघ हुंगतात लाली.ओल्या पानांतल्या रेषावाचतात ओले पक्षी;आणि पोपटी रंगाचीरान दाखवितें नक्षी.ओशाळला येथे यम,वीज ओशाळली थोडी,धावणाऱ्या क्षणालाहीआली ओलसर गोडी.मनी तापलेल्या ताराजरा निवतात संथ;येतां आषाढ-श्रावणनिवतात दिशा-पंथ.आला आषाढ-श्रावणआल्या पावसाच्या सरी;किती चातकचोचीनेप्यावा वर्षाऋतू तरी!संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर खंडपीठाचं सुटीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , शिर्डीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंहला पदार्पणाची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *जालना* महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा व कुठे झाले ?२) 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' असे कोणी म्हटले होते ?३) सुभाषचंद्र बोस यांना 'देशनायक' कोणी म्हटले होते ?४) फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली ?५) नेताजी हे टोपणनाव कोणाचे आहे ?*उत्तरे :-* १) १८ ऑगस्ट १९४५ ( तैवान, विमान अपघात ) २) सुभाषचंद्र बोस ३) रवींद्रनाथ टागोर ४) सुभाषचंद्र बोस ( ३ मे १९४० ) ५) सुभाषचंद्र बोस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेखर हेमके👤 शेख समदानी, शिक्षक, बिलोली👤 गजानन देवकर👤 अगस्त्या तावरे👤 कल्याण आळंदी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुके प्राणी असोत किंवा झाडे,फुले तसेच इतर अनेक वस्तू न बोलता,सांगता निसर्ग नियमांचे पालन करतात .निसर्गापासून मनुष्याला शिकण्यासारखं बरच काही आहै. पण, ज्याला बोलता,चालता येते,सर्व काही समजते तरीही सत्य काय आहे याकडे मात्र मनुष्य कायमच दुर्लक्ष करत.आला आहे .म्हणून बोलत्या, चालत्या मनुष्याची वागणूक पशुलाही लाजवेल अशी असते.मानव प्राणी समाजशील असूनही अशी वर्तणूक का.? याचा शोध प्रत्येक मनुष्य प्राण्याने घेण्याची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment