✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २१९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.**१९९८:अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.**१९९७:चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा 'व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर**१९९१:जमिनीवरुन हवेत मारा करणार्या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी**१९८१:सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.**१९४७:मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.**१९४७:थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.**१९४२:दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:शेखर खंडेराव फराटे-- लेखक* *१९७२:प्रा.डॉ.शैलेंद्र धर्मदास लेंडे-- लेखक* *१९६४: मनीषा निवास कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६२:मिलिंद मधुकर दिवाकर -- लेखक तथा संचालक पालवी फाउंडेशन* *१९५९:प्रा.डॉ.दत्ता नागोराव डांगे-- कवी, लेखक,संपादक* *१९५५:चेतन दळवी-- मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता**१९५५:सुरेश ईश्वर वाडकर --मराठी गायक**१९५४:कलीम खान- कवी,गझलकार, लेखक (मृत्यू:१ मे २०२१)**१९५३:डॉ.प्रतिभा गुरुदत्त देशपांडे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५१:सरोज चंद्रकांत देशपांडे-- प्रसिद्ध कथालेखिका* *१९४८:ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९४७: डॉ. यशवंतराव शंकरराव पाटील-- वैचारिक लेखन करणारे लेखक* *१९४३:रवींद्र घवी -- लेखक,संपादक (५ ऑगस्ट२०१६)**१९४२:सूर्यनारायण माणिकराव रणसूभे-- हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक* *१९४०:शामसुंदर दत्तात्रय मुळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३९: प्रभाकर मुरलीधर बागले -- समीक्षक, संपादक* *१९३४:दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर-- मराठीतले एक कवी,समीक्षक, संपादक (मृत्यू:९ जून २०१२)* *१९२५:डॉ.मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन –भारतातील कृषी शास्त्रज्ञ, भारतीय शेतीतज्ञ, आणि केन्द्रीय कृषी मंत्री**१९१२:केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ(मृत्यू:२२ एप्रिल, १९८३)**१९११: प्राचार्य नारायण वासुदेव कोगेकर-- प्रसिद्ध विज्ञानलेखक**१८९०: काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर -- संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित(मृत्यू:१ डिसेंबर १९७६)**१८७१:अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:जे.ओमप्रकाश-- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(जन्म:२४ जानेवारी १९२६)**२००९:गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा-- प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते(जन्म:१२ एप्रिल १९३७)**२००८:मधुसूदन नरहर देशपांडे--- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार(जन्म:११ नोव्हेंबर १९२०)**१९७४:अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका(मृत्यू:२२ एप्रिल १८८३)**१९४१:रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)**१८४८:जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान*बेगम हजरत महल तथा मुहम्मदी खानुम*( यांचा जन्म फैजाबाद येथे झाला तर ७ एप्रिल १८७९ नेपाळमधील काठमांडू येथे निधन झाले. )बेगम हजरत ह्या अवधच्या नवाब वाजीद अलीची पत्नी होत्या.फैजाबाद या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली मुहम्मदी खानुम ही अत्यंत सुंदर होती. नवाब वाजीद अली याने मुहम्मदी खानुमच्या सौंदर्यावर मोहीत होवून तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर नवाब अली यांनी मुहम्मदी खानुम हिचे नाव बदलून बेगम हजरत महल असे ठेवले.बेगम हजरत महल अत्यंत स्वाभिमानी आणि महत्वकांक्षी होती. नवाब वाजीद अलीचे राज्यकारभारात लक्ष नसल्याने ती राज्यकारभारात लक्ष घालू लागली. १३ फेब्रुवारी १८५६ रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वाजीद अलीला कलकत्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. बेगम हजरत महलने इंग्रजांच्या अरेरावीला विराध करण्याचे ठरवून आपल्या १४ वर्षाच्या मुलासह लखनौमध्येच राहण्याचे ठरविले.बेगम हजरत महल स्त्री असूनही युद्धनिपुण होती. शस्त्रास्त्रे चालविण्यात ती तरबेज होती. तिने महिलांचे सैनिक दल उभारून इंग्रजांच्या सैन्याचा कडवा प्रतिकार केला होता.राणी लक्ष्मीबाईचा लढा पुढे जर कोणी चालू ठेवला असेल तर अवधच्या बेगम हजरत महलने.तिचा लढा केवळ स्वतःचे राज्य वाचावे याकरिताच नव्हता तर ब्रिटिशांनी जे मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबलं होतं त्याला देखील बेगमने विरोध केला.अखेर १८ मार्च १८५८ रोजी बेगम हजरत महलचा इंग्रजांनी पराभव केला. त्यानंतर तिने नेपाळमधल्या तराईच्या जंगलात आश्रय घेतला.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इस्रोच्या कामगिरीला 'चंद्र' साक्षीला! चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल; चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान-3 चा इस्रोला मिळालं पहिला संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या टी20 सामन्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *बीड* हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरती आणि आकाश यांना जोडणारा चैतन्यदायी दुवा म्हणजे वृक्ष होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील 'हळद शहर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?२) तलाठी शाळांची स्थापना कोणी केली ?३) १९२३ साली अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली ?४) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय ?५) भात संशोधन केंद्र कोठे आहे ?*उत्तरे :-* १) सांगली २) शाहू महाराज ३) विठ्ठल रामजी शिंदे ४) तुकाराम भाऊराव साठे ५) कर्जत, रायगड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री दत्ता डांगे, संपादक, इसाप प्रकाशन, नांदेड👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड👤 मंगेश पेटेकर👤 तुकडेदास धुमलवाड👤 रवींद्र चातरमल, धर्माबाद👤 मनोज रापतवार, धर्माबाद👤 मोहन हडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना जे घडी राघवेवीण गेली।जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना सुख, दुःख, अडचणी, संकटे येतील आणि एक दिवस निघूनही जातील. ..पण,एकदा का मन थकले तर.. आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. म्हणून आपल्या जीवनात कितीही संकटे आले तरी मनाने कधीही थकू नये. व चालणे सोडू नये. सदैव प्रयत्न करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेतकरी आणि करकोचा*एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आल्यावर त्या करकोच्याने त्याला विनंती केली कि मी काही तुझं पीक चोरून खायला आलो नव्हतो आणि मी एकही दाना खाल्ला नाही, पण तरी इथे जाळ्यात अडकलो आहे. शेतकरी म्हणाला “तू म्हणतोस तसा तू निर्दोष असशीलही, पण तु इतर चोरांसोबत पकडला गेला आहेस. त्यामुळे त्या चोरांसारखीच तुलाही शिक्षा मिळेलच.”•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment