✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६:रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०:एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१:थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्याचे पेटंट घेतले.**१६०८:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७७:नागराज पोपटराव मंजुळे-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,आणि मराठी कवी**१९७६:हंसराज मधुकर देसाई-- बालकवी* *१९७४:बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे-- लेखक, पत्रकार* *१९६२:सुरेश मारोतराव चोपणे- लेखक,कवी* *१९५४:सतीश कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते**१९५१:अनुराधा अरुण नेरुरकर-- कवयित्री लेखिका* *१९४७:प्रा.डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर-- प्रसिद्ध कवी,लेखक,शिक्षणतज्ज्ञ,अनुवादक, संपादक* *१९४७:पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७:प्रा.डॉ.अनिल नागेश सहस्रबुद्धे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४:संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू:२४ जून १९९७)**१९३२:रावसाहेब गणपराव जाधव –मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी,माजी संमेलनाध्यक्ष(मृत्यू:२७ मे २०१६)**१९२९:यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)**१९२४:जनार्दन अमृत जोशी-- कवी,लेखक**१९२१:नामदेव लक्ष्मण व्हटकर- प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:२३ फेब्रुवारी २००४)**१९१७:पं. बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(मृत्यू:२१ जुलै १९९१)**१९०८:शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८८८:बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (मृत्यू:८ मार्च १९५७)**१८८०:बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू:३ डिसेंबर १९५१)**१८७२:साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर –श्रेष्ठ मराठी साहित्यिक,संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू:१४ आक्टोबर १९४७)**१८३३:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक(जन्म:२१ नोव्हेंबर१९३५)**२०१९:अरुण जेटली-- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री(जन्म:२८ डिसेंबर १९५२)**२०१८:विजय चव्हाण-- मराठी रंगभूमीवरचे कलाकार(जन्म:२ मे१९५५)**२०१६:अनुराधा शशिकांत वैद्य--कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले(जन्म:९ जुलै १९४४)**२००६:यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री)--वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म:३ मार्च १९०८)* *२०००:कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)**१९९३:शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)**१९२५:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता - पाऊसढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची ……सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची …….अशोक पत्कीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्या पेन्शनचा संभ्रम दूर करा; केंद्रासारखा जीआर काढा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरात डेंग्यूच्या चाचणीसाठी सहाशे रुपयांचा दर निश्चित केला असून, यापेक्षा अधिकचा दर घेतल्यास रुग्णालये तसेच खासगी लॅबचालकावर कारवाईचा इशारा दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तलाठी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या गणेश गुसिंगेकडून मोबाईल अटकेपूर्वीच रिसेट, गोपनीय माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारत दौऱ्यावर; G-20 परिषदेत सहभागी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *नंदुरबार* महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?२) कॉफीचे मूळ स्थान कोणते ?३) संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात सापडते ?४) पोक्सो ( POCSO ) कायदा केव्हा लागू झाला ?५) तोंडाने भरलेल्या फुग्यातील हवेत कोणते घटक असतात ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) सौदी अरेबिया ३) राजस्थान ४) १४ नोव्हेंबर २०१२ ५) नायट्रोजन, ऑक्सीजन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सावित्री कांबळे, साहित्यिक👤 मारोती बोमले, चिरली👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 सुनील बावसकर👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 ऋषिकेश शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसापासून प्रेम मिळते,माणसापासून धोका असते,माणसापासून आधार मिळते तर.. माणसापासूनच जीवनाची राखरांगोळी होते,माणसापासून सन्मान मिळतोआणि माणसाकडून होणारे अपमान,तिरस्कार, छळ सुद्धा सहन करावे लागतात हे, सर्व माणसांकडून होत असते.माणूस एकसारखा दिसते खरा पण, त्याच्याच असलेली वागणूक अनेक प्रकारची बघायला मिळत असते. म्हणून आज कोणत्याही माणसांवर विश्वास करतेवेळी विचार करावा लागतो हि एक प्रकारची चितांजनक बाब आहे म्हणून कोणत्याही माणसाने जीवन जगत असतांना माणसारखेच जगावे व माणसासाठी जगावे कारण, हा जन्म अनेकदा मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📚 ज्ञानवर्धक बोधकथा 📚 "एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला." तात्पर्यः "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही. " 🌹🌹🌹🌹🌹🌹*नेहमी आनंदी रहा*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment