✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २१४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.**१९९६:अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०:इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९:नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४:दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३:काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०:अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रशांत देशमुख-- लेखक,सुप्रसिद्ध व्याख्याते**१९७४:सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७:गजानन यशवंत देसाई-- कादंबरीकार* *१९६७:प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे-- कवी,लेखक,संपादक* *१९५८:अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत,लेखक**१९५८:अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७:मा.रमेश बैस-- महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल**१९४१:ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८:गोविंद पुरुषोत्तम देशपांडे-- नाटककार,कवी आणि निबंधलेखक( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९२८:दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी)-- लेखक* *१९२३:विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक,संपादक* *१९१८:दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८)**१९१०:पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार,नाटककार,कवी आणि समीक्षक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर --कवी आणि समीक्षक(मृत्यू:१७ डिसेंबर १९४२)**१८७६:पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३)**१८६१:आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४)**१८३५:अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)**१८२० जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१:प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म:२० जून १९२४)**२०१०:कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**२००८:चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी(जन्म:१९६४)**१९७९:करण दिवाण-- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता(जन्म:६ नोव्हेंबर १९१७)**१९३४:पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७)**१९२२:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म:३ मार्च १८४७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारीनागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2886944718098950&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टला लोकसभेत चर्चा, PM मोदीही देणार उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे कॉरिडोरचा मार्ग मोकळा, नालासोपा-यातील भूसंपादनाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं उठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी अखेरचे 60 दिवस शिल्लक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील टप्पा आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु, 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील चार-पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज मधील अखेरचा सामना भारताने 200 धावाने जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चंद्राला ज्याप्रमाणे ढगातून जावे लागते, त्याप्रमाणे माणसाला संकटातून जावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचा पहिलाच 'उद्योगरत्न पुरस्कार' नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?२) 'फकिरा' ही कादंबरी कोणी लिहिली ?३) जगात राजकिय नेत्यांवर सर्वाधिक विश्वास करणारा देश कोणता ?४) पॉक्सो कायद्याने परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची वय किती वर्ष आहे ?५) AS - ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे ?*उत्तरे :-* १) रतन टाटा २) अण्णाभाऊ साठे ३) भारत ४) १८ वर्षे ५) रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, जेष्ठ पत्रकार, धर्माबाद👤 रवींद्र डी. वाघमारे, सहशिक्षक👤 दिगंबर वाघमारे, सहशिक्षक, कंधार👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ता, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ता, येताळा👤 दुर्गा डांगे, साहित्यिक👤 प्रतिक गाढे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिलानंद कैवारे, चिरली, बिलोली👤 दयानंद भुत्ते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, इतरांसाठी जगता, जगता आपलं स्वत:कडे दुर्लक्ष होऊन जातं. आणि मग जगायचचं राहून जातं. म्हणून असं समोर व्हायला नको यासाठी स्वत:साठीही थोडं वेळ काढायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला. "तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात....', अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला. स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग 5-7 मिनिटे बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले. काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला. आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो बुद्धांना म्हणाला, "मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला? तुम्ही शांत कसे?' त्यावर बुद्ध म्हणाले, "मला एक सांग तू एखाद्याला भेट देण्यासाठी भेटवस्तू खरेदी केली आणि ती भेटवस्तू एखाद्याने स्वीकारलीच नाही. तर ती वस्तू कोणाची असेल?' तो व्यक्ती म्हणाला, "अर्थातच. मी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू माझीच असेल. पण त्याचा इथं काय संबंध?' बुद्ध शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, "वत्सा, तू दिलेल्या शिव्या आणि तू दिलेले वाईट शब्द आम्ही स्वीकारलेच नाहीत. त्यामुळे ते कोणाचे झाले?' त्यावर त्या व्यक्तीला आपली चूक उमगली आणि त्याने बुद्धांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून तो व्यक्ती बुद्धांचा शिष्य बनला. बुद्ध म्हणाले, "आयुष्यात बऱ्याच गोष्टी नाकारणे शक्य असतानाही आपण नको त्या गोष्टी स्वीकारतो त्यामुळे आपण बऱ्याचदा संकटात सापडतो. त्यामुळे चराचरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच स्वीकारा आणि आनंदी, उत्साही, शांत राहा.'संकलक - श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment