✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जुलै 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय काविळ दिन_* *_ या वर्षातील २०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९९:भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड**१९९८:सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन**१९८४:अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७९:भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.**१९३४:पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.**१९३३:अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३३:सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१८२१:पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:धनुष्य -- चित्रपट अभिनेता**१९७९:प्रा.डॉ सावन गिरीधर धर्मपुरीवार-- कथाकार**१९७२:आयशा झुल्का-- भारतीय अभिनेत्री* *१९७२:डॉ.प्रसन्न शेंबेकर-- कवी* *१९६५:प्रा.डॉ.सुहासकुमार वामनराव बोबडे -- प्रसिद्ध लेखक समीक्षक संपादक* *१९५४:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)**१९४९:बाबा साळूबा भांड-- कादंबरीकार, बालवाङ्मयकार, प्रकाशक**१९३९:दलपत सावजी बोरकर-- कवी, लेखक* *१९३६:सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक**१९३५:डॉ.अरविंद दत्तात्रेय लेले -- माजी आमदार तथा कवी,लेखक(मृत्यू:१३ मे २००६)**१९२९:लतामाई जीवनराव बोधनकर -- कवयित्री* *१९२७:बाबासाहेब उर्फ पांडुरंग ज्ञानदेव पाटील(बाबा पाटील)-- लेखक,संपादक* *१९२५:बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग-- हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक (मृत्यू: ५ एप्रिल २०११)**१९२५:डॉ.क्षमा लिमये -- कादंबरी, कथा, बालसाहित्य,चरीत्र इत्यादी क्षेत्रात लेखन (मृत्यू:१२ जानेवारी २००९)* *१९११:गणेश वासुदेव तगारे-- पर्यावरण रक्षक, संस्कृत पंडित, अनुवादक(मृत्यू:१९ नोव्हेंबर २००७)**१९०७:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (मृत्यू:५ आक्टोबर १९८३)**१९०३:कृष्णाबाई हरी मोटे --कथालेखिका, कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:१७ फेब्रुवारी १९९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कुमकुम -- हिंदी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेत्री (जन्म:२२ एप्रिल १९३४)* *१९८८:राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: १९६२)**१९८१:बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)**१९७७:गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक(जन्म:२६ डिसेंबर १९१०)**१९७५:राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २६ नोव्हेंबर१९२३)**१९७३:शंकर बाळाजी शास्त्री -- गीतकार (जन्म:४ आगस्ट १९०४)**१९६८:ऑटो हान – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2870250936434995&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांची घोषणा, सर्वसामान्य जनता मात्र अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 रातांधळेपणा म्हणजे काय ? 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयाचा ध्यास लागला, म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा *राष्ट्रीय पक्षी* कोणता ?२) 'मोर' हा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) 'मोर' हा पक्षी कशाचे प्रतिक आहे ?४) मोराच्या आवाजाला काय म्हणतात ?५) भारतातील/महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य कोठे आहे ?*उत्तरे :-* १) मोर २) २६ जानेवारी १९६३ ३) शांतता व सौंदर्य ४) केका / केकारव ५) नायगाव, जि. बीड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिगंबर जैर मोड, समराळा, धर्माबाद👤 बालू उपलेंचवार, धर्माबाद👤 बालाजी गुट्टे, किनवट👤 अंकुश व्ही. शिंदे, धर्माबाद👤 चंद्रकांत पिलाजी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती जर वरवर कितीही चांगली दिसत असली तरी त्यासारखी असतीलच असे नाही. म्हणून कधी, कधी त्यांच्या विषयी सर्व कळल्यानंतर आपोआप दृष्टीतून उतरून जातात व पुन्हा त्यांच्यावर विश्वास करणे होत नाही. यालाच म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून पुढे दिसणाऱ्या वस्तूला असो, किंवा व्यक्तीला चांगल्याप्रकारे निरखून बघावे व वेळात, वेळ काढून त्यांना वाचायला शिकावे. त्यांच्यात जे, काही चांगले वाईट गुण असतील ते, कळायला जास्त वेळ लागणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला. तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.' तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment