✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.**२०००:विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.**१९९८:परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९७:माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान**१९९७:ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९१:अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.**१९६९:सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.**१९४३:दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.**१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.**१८२३:चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:पंकज अडवाणी-- भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू* *१९७६: सप्तर्षी अ.माळी-- लेखक* *१९६९:जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका**१९६४:विष्णू सूर्या वाघ -- कवी लेखक तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती* *१९४९:माधव अनंत विद्वांस-- लेखक* *१९४७:जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज**१९४५:अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन**१९३७:मनोज कुमार( हरिकृष्ण गोस्वामी )-- भारतीय अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,गीतकार आणि संपादक**१९३२:प्रा.मधुकर तोरडमल-- मराठी अभिनेते,लेखक(मृत्यू:२ जुलै २०१७)**१९२९:बाळ जगन्नाथ पंडित-- क्रिकेट समालोचक, लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१५)**१९२८:केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:२९ ऑक्टोबर, २०२०)**१९१७:दि.य.देशपांडे-- महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ व प्राध्यापक(मृत्यू:३१ डिसेंबर २००५)**१९११:अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)**१९११:गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी(मृत्यू:२१ नोव्हेंबर २००२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०२१:सतीश काळसेकर-- लोकप्रिय कवी, संपादक, अनुवादक(जन्म:१२ फेब्रुवारी १९४३)* *२०१४:वसंत विठ्ठल गाडे-- संघटक, संस्थापक(जन्म:२७ जानेवारी १९२७)* *१९८०:अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म:३ सप्टेंबर १९२७)**१९८०:पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)**१९७४:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)**११२९:शिराकावा – जपानी सम्राट *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7344359092247109/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी.. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश .. संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला..*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे ; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क, कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिराजने अर्धा संघ तंबूत पाठवला, कॅरेबिअन आर्मीची 255 पर्यंत मजल, भारताकडे 183 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *दातांवरून माणसाचे वय काढता येते का ?* 📙 काही वेळेस मृत्यूनंतर विशेषतः गुन्ह्याच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे हे सांगावे लागते. त्यासाठी मृत व्यक्तीचे हाडे, दात यांचा उपयोग होतो. दातांचे दोन प्रकार आहेत. दुधाचे दात आणि कायमचे दात यांच्यामध्ये फरक असतो. दुधाचे दात येऊन ते पडून कायमचे दात येण्याच्या पद्धतीला एक विशिष्ट क्रम असतो. विशिष्ट वयात हे दात येत असतात आणि पडत असतात. जसे ३ वर्षांपर्यंतच दुधाचे सर्व दात येतात. कायमच्या व दुधाच्या दातांच्या रंगांमध्ये, आकारांमध्ये फरक असतो, त्यामुळे यावरून वय सांगता येते. २५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचे वय यावरून काढता येते. या वयापर्यंत कायमचे सगळे दात आलेले असतात. वय काढण्यासाठी दातांच्या एक्सरेचाही उपयोग होतो. क्ष- किरण तपासणीने दातांच्या मुळाचे कॅल्सिफिकेशन झालेले आहे की नाही ते समजते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस अक्कलदाढ आलेली नाही पण हिरड्यात त्याच्या मुळाचे कॅल्सिफिशन झालेले क्ष-किरण परीक्षेत दिसल्यास त्या व्यक्तीचे वय सत्तरच्या पुढे आहे, हे नक्कीच ठरते. काही वेळेस एकदम अचूक वय काढावे लागते. अशा वेळेस सूक्ष्मदर्शकाखाली दातांचा छेद घेऊन तपासणी केली जाते. दातावरील निर्माण झालेल्या आडव्या रेषांवरून वय काढले जाते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत, गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोंबडीच्या अंड्यातील *पिवळ्या भागाला* काय म्हणतात ?२) कोंबडीच्या एका अंड्यात किती प्रोटीन ( प्रथिने ) असते ?३) अंड्यामध्ये सर्वात जास्त कोणता घटक असतो ?४) कोणत्या प्राण्याच्या अंड्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात ?५) चिकन अंड्याचे कवच कशाचे बनले असते ?*उत्तरे :-* १) बलक २) ६ ग्रॅम प्रथिने ३) प्रथिने ४) हंस ( १९.९७ ग्रॅम ) ५) CaCo3 ( कॅल्शियम कार्बोनेट )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 विठ्ठल सटवाजी कोंदापुरे, भोसी. ता.बिलोली👤 संतोष मुलकोड, LBS कॉलेज, धर्माबाद👤 संतोष लवांडे, सहशिक्षक, कर्जत👤 राजेश पाटील मनुरकर👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 सचिन टेकाळे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक पण, आपल्या मताप्रमाणे न होता क्षणातच ते,वेगळे झालेले बघायला मिळते. त्या विषयी आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही. म्हणजेच आपल्या पेक्षा कोणीतरी दुसरा असते हे सर्व घडवून आणणारा व बघत राहणारा ती म्हणजेच नियती होय. ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून असे कोणतेच व्यर्थ काम करू नये की, आपल्याला दु:खात बुडण्याची वेळ येईल शेवटी सत्य हे अंतिम सत्यच असते आपण त्याचाच पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने स्वीकार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकाराचे स्मरण*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.' तात्पर्य : माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment