✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००२:जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.**१९८३:अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.**१९७६:आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या**१९६०:सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.**१९४४:२० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.**१८३१:बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: सचिन रघुनाथ गांगुर्डे -- कवी, लेखक**१९७१:गणेश रत्नाकर मतकरी -- प्रसिद्ध लेखक,समीक्षक,चित्रपट पटकथा लेखक* *१९६६:श्रीधर नांदेडकर --लेखक,कवी* *१९५७:राजेंद्र यशवंत वैद्य -- लेखक* *१९५४:सुचित्रा मधुकर कातरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४९:सुधा मधुसूदन जोशी-- कवयित्री, गायिका* *१९४८:डॉ जयश्री तोटे-- लेखिका,कवयित्री**१९४८:प्रा. केशवराव वसेकर -- लेखक, कवी, समीक्षक**१९४७:चेतन चौहान –माजी सलामीचे फलंदाज, आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:१६ आॅगस्ट २०२०)**१९४४:अँड.शालिनी पुरी -- कवयित्री**१९३९:प्रा.विनता गद्रे-- कवयित्री* *१९३४:चंदू बोर्डे – माजी क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष**१९३३:माधवी रणजित देसाई--कवयित्री, कथा,कादंबरीकार(मृत्यू:१५ जुलै २०१३)**१९३२:डॉ.उषा जोशी (भोसेकर)-- लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासक* *१९३०:डॉ.रा.चिं.ढेरे – सांस्कृतिक संशोधक(मृत्यू:१ जुलै २०१६)**१९२०:आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)**१९१०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)**१८९९:अर्नेस्ट हेमिंग्वे–नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक(मृत्यू:२ जुलै १९६१)**१८५३:शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००९:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)**२००१:विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)**१९९५:सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ )**१९९७:राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६)**१९९४:डॉ.र.वि.हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक(२५ सप्टेंबर १९१५)**१९९१:पं.बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(जन्म :२४आगस्ट १९१७)**१९७२:जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7333252366691115/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यातच अनुचित काही घडू नये म्हणून पुण्यातील दुर्गम भागातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुजित पाटकर आणि डॉ किशोर बसुरेंना कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रायगड :- इर्शाळवाडीत दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; 19 जणांचा मृत्यू, 98 जणांना वाचवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, राख आणि चिखल शेतात पसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाड्यातील 1023 गावांना बसू शकतो पुराचा फटका ; सर्वाधिक पूरप्रवण गावे नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज 100 व्या ऐतिहासिक कसोटी सामना 20 जून पासून सुरुवात, किंग विराटचा 500वा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाय डिटेक्टर* 📙नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो.या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो.श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो.लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फ्रान्सचा कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले ?२) विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला ?३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात 'वंदे मातरम्' हे गीत प्रथम गायले गेले ?५) महाराष्ट्राचे कृषीमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑनर २) मार्केटा वोंड्रोसोव्हा, चेक प्रजासत्ताक ३) सुरवंट ४) सन १८९६ ५) धनंजय*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजीव गंजगुडे, अध्यक्ष, शिक्षक परिषद, बिलोली👤 वृषाली शिंदे, साहित्यिक, ठाणे👤 चिंतामणी जाधव, साहित्यिक, मुंबई👤 श्रीकांत कांता विनायकराव👤 शशी खंडाळकर, पुणे👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे👤 शिवराज मोरडे, नांदेड👤 विजय वाठोरे, साहित्यिक, सरसम हिमायतनगर👤 रविकांत कुलकर्णी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी सर्वांना एकच मुख्य रस्ता असतो आणि त्याच रस्त्याने एक दिवस प्रत्येकाला जावे लागते व त्या,मुख्य रस्त्याने जाणाऱ्याला शेवटी कोणीही अडवू शकत नाही. हे सत्य आहे याची जाणीव असू द्यावे. निदान माणुसकीच्या नात्याने तरी कोणाच्याही वाटेत काटे, कंकर पेरू नये व आपल्या जीवनाला नको ते वळण देऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाल्याचा वाल्मीकी झाला*पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो, रानात एक मार्गातून येणार्या-जाणार्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.'' तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.'' हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.'' तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.'' याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते. तात्पर्य : संगतीमुळे आपण चांगले बनतो; त्यामुळे नेहमी आपण चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment